सविस्तर माहिती (कोणी लिहिली तर) येईलच नंतर, हे आपलं 'सिनॉप्सिस' :)
स्थळ : हॉटेल अभिषेक आणि हॉटेल पुरेपूर कोल्हापुर - दोन्ही एरंडवणे, मेहेंदळे गॅरेज जवळ (फु़कट पत्त्यावरून परत पुण्यालाशिव्या नकोत)
(सु) संवाद -
प्र. हॉटेल अभिषेक कुठे आहे?
उ. हॉटेल पुरेपूर कोल्हापुर समोर.
प्र. बरं, हे हॉटेल पुरेपूर कोल्हापुर कुठे आहे?
उ. हॉटेल अभिषेक समोर!
प्र. हम्म! दोन्ही कुठे आहेत?
उ. समोरासमोर! ;)
असो! हजेरी -
- दस्तुरखुद्द, मि.पा. मालक, अण्णांचे (मानस)शिष्य संत तात्याबा महाराज उर्फ तात्या अभ्यंकर
- मि.पा. संचालक नीलकांत
- मि.पा. विश्वस्त तथा मि.पा. तांत्रिक सहाय्यक ओंकार (हम्म 'ओम' कसा बरे काढावा?)
- मि.पा. सदस्य प्राजु (लवकर पळाली...)
- मि.पा. सदस्य विजुभाऊ
- मि.पा. सदस्य इनोबा
- मि.पा. सदस्य भडकमकर मास्तर
- मि.पा. सदस्य डॉ. प्रसाद दाढे
- मि.पा. सदस्य मनिष
बाकी सविस्तर वृत्तांत, फोटो...नंतर!
प्रतिक्रिया
13 Jun 2008 - 1:10 pm | प्राजु
काय रे काल ते फोटो उगाच काढलेस का?? चढव ना इथे... :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Jun 2008 - 1:13 pm | मनिष
मी फक्त फोटोग्राफर होतो...कॅमेरा नीलकांत व इनोबा चा. ते लवकरच फोटो चढवतील अशी आशा आहे!
13 Jun 2008 - 1:43 pm | अनिल हटेला
काय हे मनिष राव!!!
सगळच अर्धवट - अर्धवट वाटतये!!!!
ना सविस्तर व्र् त्तान्त ना फोटो !!!!
अस काय करताय?
13 Jun 2008 - 2:59 pm | अमितकुमार
पूरेपूरच नाव काढ्ल की आसे वाटते उगच पूणे सोड्ल. अस्स मटण कुढे मिळेल इथे गूजराथ मध्ये कुणाला ठाऊक आहे का ?
धन्यवाद,
अमितकुमार
13 Jun 2008 - 5:13 pm | मनिष
आता दिसतील नीट - खाली बघा! :)
13 Jun 2008 - 5:01 pm | मनिष
हे घ्या...
16 Jun 2008 - 12:34 pm | गनेश कान्हेरे
जेउ कधि धालता
13 Jun 2008 - 5:05 pm | शितल
फोटो पाहिले मस्त आलेत.
13 Jun 2008 - 5:09 pm | ब्रिटिश टिंग्या
सही आलेत फोटो.....
13 Jun 2008 - 5:12 pm | मनिष
जमले बुवा एकदाचे! :)
प्राजु आणि इनोबा -

वाट पहातोय...कुठे आहेत बाकीचे?

तात्या, नीलकांत, मनिष आणि इनोबा

विजुभाऊ आणि तात्या

इनोबा आणि ओंकार

डॉ. प्रसाद दाढे आणि भडकमकर मास्तर

डॉ. प्रसाद दाढे आणि भडकमकर मास्तर - काय बरं घ्यावे?

तात्या आणि विजुभाऊ

14 Jun 2008 - 9:48 am | मनिष
कोणीच काही लिहिल नाही?
14 Jun 2008 - 10:04 am | यशोधरा
पहिल्यांदा टाकलेले फोटो दिसत नाही आहेत...
14 Jun 2008 - 10:50 am | रिमझिम
फोटो छान आले आहेत , सही मजा आली असनार,इथे लेख वाचत असताना प्रत्येकाची मनामध्ये एक प्रतीमा तयार झाली होती
चेहर्यावरुन कुनीतरी टारगट वाट्तय का बघा :D (ह्.घ्या)
बाकी फोटो मस्तच!!!!
14 Jun 2008 - 11:03 am | नाखु
आपण पुण्यात येऊन आम्ही आपले दर्शन घेऊ श़कलो नाही ...
पुन्हा "योग" यावा हि विनंती.
आपला "संत तात्या" भक्त..
नाद खुळा.
मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
14 Jun 2008 - 4:21 pm | भडकमकर मास्तर
हाहा, मनीष मस्त फोटो...
संपूर्ण वृत्तांत कोण लिहितंय?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
14 Jun 2008 - 7:01 pm | प्रशांतकवळे
वृत्तांत कुठे आहे?
विजूभाऊ, क्लायंट ने केस उपट्लेले दिसतायात ;) आमची पण एस ए पी मध्ये हिच अवस्था झालीय...
डॉ. प्रसाद दाढे आणि भडकमकर मास्तर : ह्यांच्या लि़खाणावरून कोणीतरी मोठ्या वल्ली (आकाराने आणी वयाने) असतील असे वाटले होते, आमच्या भ्रमाचा भोपळा फुटला..
17 Jun 2008 - 6:31 am | वरदा
की व्रुत्तांत पण येईल आणि मी एकत्र प्रतिक्रीया देईन म्हणून्.....काय काय गप्पा मारल्या सगळ्यांनी?
फोटो मस्त आलेत एकदम....
17 Jun 2008 - 9:50 am | शैलेन्द्र
मस्तच आलेत हो फोटो, पन एका फोटोत(वरुन ३ नंबर) तात्या थोडे हललेत, आता तात्याना हलवने म्हणजे साधे काम का? पन जमलय बुवा...
17 Jun 2008 - 9:55 am | ऋचा
मला वाटलेल भडकमकर मास्तर म्हणजे आजोबाच असणार पण हे तर एकदम वेगळेच निघाले..... :)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
17 Jun 2008 - 10:37 am | चाणक्य
नमस्कार, मी नुकताच मि.पा. चा सदस्य झालो आहे. एका मित्राकडुन मि.पा. बद्दल ऍकले होते. एक दिवस सहज म्हणुन मि.पा. वर आलो आणि मग........ रोज येत राहिलो. तात्या, भडकमकर, धमाल मुलगा, ईनोबा, प्राजु वाचायचा जणु छंदच लागला. कधीकधी तर एखाद्या लेखावरच्या नुसत्या प्रतिक्रीया वाचत बसायचो. गेले २-३ महिने हा उद्योग चालु आहे. काडिमात्र ओळख नसताना देखिल मि.पा. चे सदस्य ओळखिचे वाटायला लागले. आत्ता फोटो बघताना सुध्दा मित्रांचे फोटो बघितल्यासारखे वाटले. सदस्य बनायचे डोक्यात होते पण उगाचच चालढकल करत होतो. वाटत होतं काहीतरी लिहायला असल्याशिवाय कसं व्हायचं सदस्य. शेवटी काल झालो दाखल मि.पा. वर.
चाणक्य