गुरुचरित्रामधील ४ युगांचे स्वरूपवर्णन

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
27 Oct 2010 - 8:07 am

गुरुचरित्राच्या दुसर्‍या अध्यायामध्ये ४ युगांचे अतिशय काव्यमय आणि बोलके वर्णन येते. जेव्हा विष्णू ब्रम्हदेवाला सृष्टी निर्माण करायची आज्ञा करतात तेव्हा स्थावरजंगम्,स्वेदज, जारज, अंडज आदिंची उत्पत्ती केल्यानंतर ब्रम्हदेव ४ युगांची निर्मीती करतात, आणि प्रत्येक युगाला त्याच्या वेळेनुसार पृथ्वीवर जाण्यास सांगतात.
कृत (सत्य), त्रेता, द्वापार आणि कली या युगांना एकेक करून बोलावणं धाडण्यात येतं. ही कथा गुरुचरित्रात अतिशय रसाळतेने वर्णन केलेली आहे आणि मूळातूनच वाचण्यासारखी आहे. तिचा सारांश थोडक्यात खालीलप्रमाणे.

सर्वात प्रथम पाळी कृतयुगाची. ब्रम्हदेवाने कृतयुगाला "पृथ्वीवर जाऊन प्रकाश पसरण्याचा" निरोप धाडला आहे. त्या कृतयुगाचं लक्षण ऐका - ब्रम्हदेवाचा निरोप ऐकून मोठ्या संतोषाने कृतयुग आले.कधीही असत्य न बोलणारे, वैराग्यपूर्ण आणि ज्ञानी असे हे युग यज्ञोपवीत घातलेले, हातामध्ये रुद्राक्षमाळा घातलेले असे तेजस्वी आहे. अपवादाने का होईना पण पृथ्वीवर जे लोक असत्य, मिथ्या बोलतात, निंदा करतात ते त्याला सहन होत नाही हीच मिनतवारी ते ब्रम्हदेवाकडे करत आहे. पण ब्रम्हदेव तरी त्याला सत्वगुणाचा प्रसार करण्यासाठी धाडतातच.

सत्ययुगाचा अवधी संपल्यानंतर ब्रम्हदेव त्रेतायुगास बोलावणे धाडतात. त्रेता युगाचे लक्षण कसे आहे बरे? तर हे युग स्थूल शरीराचे आहे. याने हाती यज्ञसामुग्री घेतली आहे. कारण त्रेतायुगामध्ये सर्व लोक यज्ञ करणारे, धर्मशास्त्रनिष्ठ, कर्ममार्गी आहेत. त्रेता युगाच्या हाती कुश आणि समिधा आदि सामुग्री आहे. हे युग आनंदाने ब्रम्हदेवाचा निरोप घेऊन पृथ्वीवर गेले.

मग ब्रम्हाने निरोप दिला द्वापार युगाला. द्वापार युग दिसायला उग्र पण असायला शांत आहे. त्याने हातात खड्ग्-खट्वांग धारण केले आहे. निष्ठुरता आणि दया दोहोचा वास त्याच्यात आहे. त्याच्यामध्ये पाप-पुण्य समान आहेत. मोठ्या कौतुकाने त्याने ब्रम्हाचा निरोप घेतला आणि ते भूमीवर गेले.

द्वापारयुगाचे दिवस पुरल्यावर कलीयुगास पाचारण केले गेले. कलीयुगाचे वर्णन खरच फार बीभत्स आहे. विचारहीन अंतःकरणाच्या या युगाचे तोंड हे पिशाच्चासारखे आहे. त्यात तोंड खाली करून चालत असल्याने ठायी ठायी धडपडत ते ब्रम्हदेवापुढे चालत येत आहे. वृद्ध आणि वैराग्यहीन असे हे युग येताना सवे कलह आणि द्वेष घेऊनच आलेलं आहे. हे कमी म्हणून की काय डाव्या हातात शिश्न आणि उजव्या हातात जिव्हा धरून प्रत्यक्ष ब्रम्हदेवापुढे ते नाचत आहे, कधी दुरुत्तरं करत आहे तर कधी हसत आहे, कधी रडत आहे तर कधी वाकुल्या दाखवत आहे.
कलीयुगाचे हे लक्षण पाहून गूढ हसत ब्रम्हाने विनयाने प्रश्न विचारला "शिश्न आणि जीभ का धरली आहेस?" त्यावर कलीयुग म्हणते "समस्त लोकांना मी जिंकेन. पण ज्यांनी लिंग आणि जीभेवर ताबा मिळवला त्यांना मी स्वतःहून हरेन."

देखोनि तयाचे लक्षण । ब्रह्मा हासे अतिगहन । पुसतसे अतिविनयाने । लिंग जिव्हा का धरिली ॥८१॥
कलियुग म्हणे ब्रह्मयासी । जिंकीन समस्त लोकांसी । लिंग जिव्हा रक्षणारांसी । हारी असे आपणाते ॥८२॥

मग पुढे ब्रम्हदेव आणि कलीयुगाचा सविस्तर संवाद आहे ज्यामध्ये कशाप्रकारचे लोक कलीयुगास धार्जीणे असतील आणि कोणते वेचक पुण्यात्मे कलीयुगाचे कळीकाळ ठरतील त्याचा उहापोह आहे.

हा अध्याय खूपच रोचक आहे. माझा आवडता अध्याय अर्थात दत्तजन्म अध्याय सर्वात आवडीचा. या २र्‍या अध्यायाचा दुवा - http://www.khapre.org/portal/url/mr/sahitya/pothi/guru/Z71025044827(गुरूचरित्र.अध्याय.दुसरा).aspx

काही कमीजास्त झाले असल्यास चू. भू. द्या. घ्या. , जाणकारांनी त्यात सुधारणा करावी.

धर्मआस्वाद

प्रतिक्रिया

रन्गराव's picture

27 Oct 2010 - 8:27 am | रन्गराव

माहीतीपूर्ण लेख! बरं एका युगाचा कालावधी किती वर्षाचा असतो? आणि युगं सायकलीक असतात का?

रन्गराव's picture

27 Oct 2010 - 11:01 am | रन्गराव

धन्यवाद!

हेच म्हणते.. लेख माहितीपूर्ण आहे.

बहुतेक एक युग म्हणजे साधारण १२०० वर्षे.. नक्की माहिती नाही. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

मृत्युन्जय's picture

27 Oct 2010 - 11:23 am | मृत्युन्जय

१ कृत युग = १७,२८,००० वर्षे
१ त्रेता युग = १२,९६,००० वर्षे
१ द्वापार युग = ८६४,००० वर्षे
१ कली युग = ४,३२,०० वर्षे

१ महायुग = १ कृत युग + १ त्रेता युग + १ द्वापार युग + १ कलीयुग
त्यामुळे १ महायुग म्हणजे ४३,२०,००० वर्षे.

अश्या ७२ महायुगांनंतर म्हणजे ३१,१०,४०,००० वर्षांनंतर एक मन्वंतर येते. प्रत्येक मन्वंतराचा अधिपती एक मनु असतो. सध्या विवस्वत मनु आहे बहुधा. प्रत्येक मन्वंतरानंतर देव आणि सप्तर्षी ब्रह्मांडात विलीन होतात.

१४ मन्वंतरे म्हणजेच ४३५ कोटी ४५ लाख ६० हजार वर्षांचा मिळुन ब्रह्माचा एक दिवस होतो.

ब्रह्माचा एक दिवस आणि एक रात्र मिळुन एक कल्प होतो. एका कल्पानंतर ब्रह्मलोक सोडुन संपुर्ण विश्व नष्ट होते. आणि ३६००० कल्पांनंतर स्वतः ब्रह्मदेव चराचरात विलीन होतात.

अवांतर: कृपया माझ्याकडे या सर्वाचे वैज्ञानिक पुरावे मागु नयेत. मला माहित नाही. हे सगळे पुराणांत लिहिले आहे. खरे आहे की खोटे हे ज्याचे त्याने ठरवावे.

स्वैर परी's picture

27 Oct 2010 - 12:28 pm | स्वैर परी

वर दिलेली आकडेवारी मला माहित नव्हती. तुम्ही महिती पुरवल्याबद्दल धन्यवाद!

बेसनलाडू's picture

28 Oct 2010 - 12:01 am | बेसनलाडू

माहितीबद्दल धन्यवाद!
(आभारी)बेसनलाडू
शुचिताईंचा लेखही रोचक, माहितीपूर्ण वाटला.
(वाचक)बेसनलाडू

पाषाणभेद's picture

27 Oct 2010 - 9:02 am | पाषाणभेद

पोथ्या पुराणे न वाचणार्‍या आम्हासारख्या लोकांसांठी माहितीपुर्ण लेख. अजूनही इतर आध्यात्यामावरील लेख येवूद्या.

वेताळ's picture

27 Oct 2010 - 10:08 am | वेताळ

होय पोथ्या-पुराणे न वाचणार्‍या आमच्या सारख्या आळशी लोकाना शुचीचे लेख म्हणजे एक मेजवानीच असते. दिवसभर चकाट्या पिटुन झालेवर हे लेख वाचणे खुपच आल्हाददायक वाटते. दुसर्‍या दिवसासाठी परत एकदा ऊर्जा मिळते.
शुची तै आपण काम करत करत इतके वाचन करता का वाचत वाचत काम करता? वाचनाचा एकादा मुलमंत्र आम्हाला पण द्या.

चिंतामणी's picture

27 Oct 2010 - 9:13 am | चिंतामणी

लेख माहितीपूर्ण आहे.

पण थोडे अजुन विस्ताराने लिहा.

अजून येउ द्यात.

भारतीय पुराणांमधील युगवर्णने हा कल्पनाविलासाचा उत्कृष्ट नमुना असुन बोधकथांमधुन नीतीचे धडे देण्याचा सुरेख प्रयत्न आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Oct 2010 - 11:34 am | llपुण्याचे पेशवेll

छान लेख गं शुची.
@ मृत्युंजय,
कल्पांतानंतर ब्रम्हदेव बदलतो. तसा विष्णू आणि महादेव यांचे आयुर्मान काय आहे. ते ही पुराणांमधे येते. त्याबद्दल काही माहीती मिळेल का?

मृत्युन्जय's picture

27 Oct 2010 - 12:10 pm | मृत्युन्जय

विष्णु आणि शिव स्वयंभु मानले जातात. त्यांना जन्म आणि मृत्यु नाही.

अवलिया's picture

27 Oct 2010 - 12:10 pm | अवलिया

हा हा हा

मागे आम्ही एकाला यातल्या एका ठिकाणी हात ठेवुन नाचतांना पाहिला होता ब्वा !

तुमचा आवडता गायक हो... मायकेल का कोण बगा !! ;)

अवलिया's picture

27 Oct 2010 - 12:37 pm | अवलिया

आणि बाकी लोक हात जीभेवर.. आपलं बोटं तोंडात घालुन शिट्ट्या मारायचे... !! कलीयुग ते हेच !

नगरीनिरंजन's picture

27 Oct 2010 - 12:45 pm | नगरीनिरंजन

शिश्न आणि जीभेवर ताबा ठेवलेल्या माणसासमोर कलियुग हारणार म्हणजे नक्की काय होणार? त्या मनुष्याला काय मिळणार?

परिकथेतील राजकुमार's picture

27 Oct 2010 - 12:47 pm | परिकथेतील राजकुमार

शिश्न आणि जीभेवर ताबा ठेवलेल्या माणसासमोर कलियुग हारणार म्हणजे नक्की काय होणार? त्या मनुष्याला काय मिळणार?

जगबुडी आली की नोहाअ येउन त्याला घेउन जाणार.

चिगो's picture

27 Oct 2010 - 1:40 pm | चिगो

हायजॅकींग म्हणतात ते हेच का वो ? :-)

नावातकायआहे's picture

27 Oct 2010 - 1:53 pm | नावातकायआहे

>>हायजॅकींग म्हणतात ते हेच का वो ?
हायजॅकींग नाय. ह्याला 'बाटवणे' म्हनतात.

रन्गराव's picture

27 Oct 2010 - 2:15 pm | रन्गराव

अशा पवित्र धाग्याचं अवांतर हा कलीयुगाचाच महिमा!

सगळ्यांना ही बुद्धी तो ब्रह्माच तर देतो ना? मग कशाला उगाच कलीला दोष देता?

-कली.

मितभाषी's picture

27 Oct 2010 - 2:37 pm | मितभाषी

अहं ब्रह्मास्मि

वाल्या कलि

अनुराग's picture

27 Oct 2010 - 2:51 pm | अनुराग

शुचि, लेख आवडला. गुरु चरित्र केव्हा वाचावे ?

शुचि, खूप त्रोटक लिहिलेस असे वाटले. जरा विस्ताराने लिहित जा.

नितिन थत्ते's picture

27 Oct 2010 - 3:01 pm | नितिन थत्ते

गुरुचरित्र स्त्रियांनी मुळीच वाचू नये म्हणतात....ते का?

नियम स्पष्ट लिहले आहेत. बायकानी गुरुचरित्र वाचु नये. ते कधी,कसे व कश्या पध्दतीने वाचावे ह्या करिता वेगळे मार्गदर्शन केले आहे.
आता शुची तै ने वाचले म्हणजे त्याचे नियम तोडले असेच होते का?
ह्याने हिंदु धर्म बुडेल अशी देखिल मनात भिती येते.

गुरुचरित्र स्त्रियांनी मुळीच वाचू नये म्हणतात....ते का?

माझा माहीतीप्रमाणे स्त्रींयानी गुरूचरीत्राचे पारायण करू नये असे म्हणतात. वाचु नये असे नव्हे.

पारायणासाठी ज्या गोष्टींचे पालन करायला लागते त्याचे पालनात स्त्रीधर्मामुळे खंड पडण्याची शक्यता असते.

गुरुचरित्र स्त्रियांनी मुळीच वाचू नये म्हणतात....ते का?

माझा माहीतीप्रमाणे स्त्रींयानी गुरूचरीत्राचे पारायण करू नये असे म्हणतात. वाचु नये असे नव्हे.

पारायणासाठी ज्या गोष्टींचे पालन करायला लागते त्याचे पालनात स्त्रीधर्मामुळे खंड पडण्याची शक्यता असते.

वेताळ's picture

28 Oct 2010 - 11:24 am | वेताळ

ते पुस्तक गोष्टीचे समजुन नुसतेच वाचु नये असे देखिल त्यात आहे ना? मग त्याचा काय अर्थ होतो?
गुरुचरित्र वाचण्याचे काय काय नियम आहेत ते बघा. कोणता अध्याय कधी व दिवसाला किती अध्याय वाचावे,किंवा पारायणे किती दिवसात संपवावी असे बरेच काही दिले आहे त्यात.

सहज's picture

27 Oct 2010 - 3:12 pm | सहज

>ब्रम्हदेव ४ युगांची निर्मीती करता आणि प्रत्येक युगाला त्याच्या वेळेनुसार पृथ्वीवर जाण्यास सांगतात.

असला बीभत्स प्रकार ब्रम्हदेवाने मुळात बनवलाच का?

हे गुरुचरित्र कोणी लिहले?

------------------------------------------------------------
निदान तो बिल गेटस तरी शिव्या घातल्यावर ऑपरेटींग सिस्टीम थोड्याफार सुधारतो...

यात बीभत्स काय आहे हे समजले नाही. समजावुन सांगितल्यास बरे होईल.

कलीयुगाचे वर्णन खरच फार बीभत्स आहे... पुढे अजुन अमुक आणी तमुक धरुन....

असाही 'बीभत्स वर्णन' उल्लेख मुळ लेखात आला आहे. धन्यवाद.

अजुन समजले नसेल तर सोडून द्या.

अवलिया's picture

27 Oct 2010 - 5:43 pm | अवलिया
प्रेषक सहज दि. बुध, 27/10/2010 - 15:12.

>ब्रम्हदेव ४ युगांची निर्मीती करता आणि प्रत्येक युगाला त्याच्या वेळेनुसार पृथ्वीवर जाण्यास सांगतात.

हे वाक्य उद्धृत करुन तुम्ही बीभत्स असा उल्लेख केला आहे. पुन्हा तुमचाच प्रतिसाद वाचावा.
एखादे वाक्य उचलुन त्यापुढे काही लिहिणे म्हणजेच लिहिल्या जाणार्‍या वाक्याचा उचलल्या गेलेल्या वाक्याशी काहीतरी संबंध (सरळ, तिरका, ओढुन ताणुन) आहे असे प्रतिसादकाच्या मनात आहे असे समजुन, उमजुन प्रतिसादाचा अर्थ लावला जातो. हे चूक असेल तर बरोबर कसे आहे हे समजावुन सांगावे. याच अनुषंगाने तुम्ही लिहिलेल्या वाक्याचा उचललेल्या वाक्याशी संबंध लावण्याचा मी अल्पमती प्रयत्न केला, अपयशी झाल्याने विचारणा केली. असो.

तुम्ही फक्त कलीयुगाचे वर्णन असलेले वाक्य उचलले असते किंवा कोणतेही वाक्य न उचलता प्रतिसाद दिला असता तर गोष्ट निराळी असती.

समजले असावे. नसेल तर सोडुन द्या !

अहो कोणी लिहलं म्हणुन काय विचारता सहज काका, तुम्ही म्हणजे की नै अगदी ह्यॅ आहात ब्वॉ. अहो आदम,हवा अन सफरचंदाबरोबर ब्रह्मानेच नायका धाडलं ते जमीनीवर! आता त्यात थोड्या प्रिंटींग मिश्टेका राह्यला असतील पण ब्रह्माला अवतार घ्यायला चानसच नाय ना मिळाला अजुन. परवाच ब्रह्मे काकु म्हणत होत्या, "पॉलीटीक्स आहे मेलं सगळं, आमच्या ह्यांना नेहमीच डावलतात ऑफ शोअरची वेळ आली की". मिळाला की तो येउन करेक्ट करुन जाईल. कळ्ळं का तुम्हाला आता?

धमाल मुलगा's picture

27 Oct 2010 - 3:13 pm | धमाल मुलगा

यशोधराशी सहमत आहे.
शुचि, खुपच त्रोटक लिहिलंयस, आणखी विस्ताराने लिही ना.

बाकी, गेल्या शनिवारी गुरुचरित्राच्या पारायणाचा गप्पांच्या ओघात आलेला उल्लेख आणि मी ते वाचून पहायची प्रदर्शित केलेली इच्छा आणि आज काही ध्यानीमनी नसताना, एकदम गुरुचरित्रावर छोटेखानी का होईना असा लेख ह्या योगायोगाने चमकलोच. :)
आहे वाटतं गुरुचरित्र वाचण्याचा योग आमच्या नशिबी. :)

समूळ ग्रंथ पाहिल्यावीण | उगाच ठेवी जो दूषण | गुण सांगता अवगुण | पाहे तो एक पढतमूर्ख |
अक्षरे गाळून वाची | कां घाली पदरिंची | निगा न करी पुस्तकाची | तो एक मूर्ख

--- दासबोध

हे गुरुचरित्र कोणी लिहले?
http://en.wikipedia.org/wiki/Shri_GuruCharitra
हल्ली सहज काकांना गुगल चे पान उघडावेसे वाटत नाही असं दिसतयं... ;)

शुचि तू लिहीत रहा... :)

अवांतर :--- गुरुचरित्र वाचण्या सारखा दुसरा आनंद नाही. :) ९७ साली मी एकदा पारायण केले होते, त्यानंतर कधी पारायण करणे झाले नाही.
गुरुचरित्राचा १४ वा अध्याय हा सर्व अध्यायातील मेरुमणि आहे, माझा हा अध्याय आधी पाठ होता, पण आता नियमित वाचन नसल्याने पाठांतर बोंबलले आहे.
मिपाकरा पैकी एका आयडीच्या( आयडी :--- उमराणी सरकार) "सही" मधे या १४व्या अध्यायातील एक ओळ लिहली असल्याचे स्मरते...
(ओळ :--- न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे) या पुढची ओळ मी त्यांच्या खरड वहीत लिहल्याचे आठवते.

वेताळ's picture

27 Oct 2010 - 6:45 pm | वेताळ

पण ज्यांनी लिंग आणि जीभेवर ताबा मिळवला त्यांना मी स्वतःहून हरेन
बॉबी डार्लिगची आठवण झाली. त्याने/तीने फक्त आता जीभेवर ताबा मिळवला तर काय मजा येईल नै?

सेरेपी's picture

27 Oct 2010 - 6:50 pm | सेरेपी

आमी काय वाचलच नाय...
आमाला सक्काळ सक्काळ "डाव्या हातात शिश्न आणि उजव्या हातात जिव्हा धरून प्रत्यक्ष ब्रम्हदेवापुढे ते नाचत आहे" अस्लं कायबाय डोळ्यांसमोर येऊन उलटी आल्यागत झालंच नाय...

विसोबा खेचर's picture

27 Oct 2010 - 9:20 pm | विसोबा खेचर

गुरुचरीत्र वाचा किंवा वाचू नका..

भोग चुकत नाहीत..!

तुमच्याआमच्या जीवनातले भोग संपवायची ताकद गुरुचरीत्रात नाही..!

असमर्थ आहे ती बापडी पोथी..!

ती पोथी वाचण्यात वेळ घालवण्यापेक्षा एखादा छानसा सिनेमा पाहावा, गाणं ऐकावं किंवा अन्य काहीही चकाट्या पिटाव्यात..!

तात्या.

अर्धवटराव's picture

28 Oct 2010 - 2:12 am | अर्धवटराव

हा तुमचा अनुभव आहे कि तर्क ?

(प्रश्नार्थी) अर्धवटराव

डावखुरा's picture

28 Oct 2010 - 2:59 am | डावखुरा

शुचि तै लेखोत्तम्,माहीतीपुर्ण..
उद्या गावाल निघाय्चंय
परवा छान प्रतिसाद देतो..
जागा राखिव..

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Oct 2010 - 3:47 pm | बिपिन कार्यकर्ते

शुचिताईंकडे विषयांची विविधता आहे. आणि, लेखनाचे सातत्य. लिहित रहा.