गुरुचरित्रामधील ४ युगांचे स्वरूपवर्णन
गुरुचरित्राच्या दुसर्या अध्यायामध्ये ४ युगांचे अतिशय काव्यमय आणि बोलके वर्णन येते. जेव्हा विष्णू ब्रम्हदेवाला सृष्टी निर्माण करायची आज्ञा करतात तेव्हा स्थावरजंगम्,स्वेदज, जारज, अंडज आदिंची उत्पत्ती केल्यानंतर ब्रम्हदेव ४ युगांची निर्मीती करतात, आणि प्रत्येक युगाला त्याच्या वेळेनुसार पृथ्वीवर जाण्यास सांगतात.
कृत (सत्य), त्रेता, द्वापार आणि कली या युगांना एकेक करून बोलावणं धाडण्यात येतं. ही कथा गुरुचरित्रात अतिशय रसाळतेने वर्णन केलेली आहे आणि मूळातूनच वाचण्यासारखी आहे. तिचा सारांश थोडक्यात खालीलप्रमाणे.
सर्वात प्रथम पाळी कृतयुगाची. ब्रम्हदेवाने कृतयुगाला "पृथ्वीवर जाऊन प्रकाश पसरण्याचा" निरोप धाडला आहे. त्या कृतयुगाचं लक्षण ऐका - ब्रम्हदेवाचा निरोप ऐकून मोठ्या संतोषाने कृतयुग आले.कधीही असत्य न बोलणारे, वैराग्यपूर्ण आणि ज्ञानी असे हे युग यज्ञोपवीत घातलेले, हातामध्ये रुद्राक्षमाळा घातलेले असे तेजस्वी आहे. अपवादाने का होईना पण पृथ्वीवर जे लोक असत्य, मिथ्या बोलतात, निंदा करतात ते त्याला सहन होत नाही हीच मिनतवारी ते ब्रम्हदेवाकडे करत आहे. पण ब्रम्हदेव तरी त्याला सत्वगुणाचा प्रसार करण्यासाठी धाडतातच.
सत्ययुगाचा अवधी संपल्यानंतर ब्रम्हदेव त्रेतायुगास बोलावणे धाडतात. त्रेता युगाचे लक्षण कसे आहे बरे? तर हे युग स्थूल शरीराचे आहे. याने हाती यज्ञसामुग्री घेतली आहे. कारण त्रेतायुगामध्ये सर्व लोक यज्ञ करणारे, धर्मशास्त्रनिष्ठ, कर्ममार्गी आहेत. त्रेता युगाच्या हाती कुश आणि समिधा आदि सामुग्री आहे. हे युग आनंदाने ब्रम्हदेवाचा निरोप घेऊन पृथ्वीवर गेले.
मग ब्रम्हाने निरोप दिला द्वापार युगाला. द्वापार युग दिसायला उग्र पण असायला शांत आहे. त्याने हातात खड्ग्-खट्वांग धारण केले आहे. निष्ठुरता आणि दया दोहोचा वास त्याच्यात आहे. त्याच्यामध्ये पाप-पुण्य समान आहेत. मोठ्या कौतुकाने त्याने ब्रम्हाचा निरोप घेतला आणि ते भूमीवर गेले.
द्वापारयुगाचे दिवस पुरल्यावर कलीयुगास पाचारण केले गेले. कलीयुगाचे वर्णन खरच फार बीभत्स आहे. विचारहीन अंतःकरणाच्या या युगाचे तोंड हे पिशाच्चासारखे आहे. त्यात तोंड खाली करून चालत असल्याने ठायी ठायी धडपडत ते ब्रम्हदेवापुढे चालत येत आहे. वृद्ध आणि वैराग्यहीन असे हे युग येताना सवे कलह आणि द्वेष घेऊनच आलेलं आहे. हे कमी म्हणून की काय डाव्या हातात शिश्न आणि उजव्या हातात जिव्हा धरून प्रत्यक्ष ब्रम्हदेवापुढे ते नाचत आहे, कधी दुरुत्तरं करत आहे तर कधी हसत आहे, कधी रडत आहे तर कधी वाकुल्या दाखवत आहे.
कलीयुगाचे हे लक्षण पाहून गूढ हसत ब्रम्हाने विनयाने प्रश्न विचारला "शिश्न आणि जीभ का धरली आहेस?" त्यावर कलीयुग म्हणते "समस्त लोकांना मी जिंकेन. पण ज्यांनी लिंग आणि जीभेवर ताबा मिळवला त्यांना मी स्वतःहून हरेन."
देखोनि तयाचे लक्षण । ब्रह्मा हासे अतिगहन । पुसतसे अतिविनयाने । लिंग जिव्हा का धरिली ॥८१॥
कलियुग म्हणे ब्रह्मयासी । जिंकीन समस्त लोकांसी । लिंग जिव्हा रक्षणारांसी । हारी असे आपणाते ॥८२॥
मग पुढे ब्रम्हदेव आणि कलीयुगाचा सविस्तर संवाद आहे ज्यामध्ये कशाप्रकारचे लोक कलीयुगास धार्जीणे असतील आणि कोणते वेचक पुण्यात्मे कलीयुगाचे कळीकाळ ठरतील त्याचा उहापोह आहे.
हा अध्याय खूपच रोचक आहे. माझा आवडता अध्याय अर्थात दत्तजन्म अध्याय सर्वात आवडीचा. या २र्या अध्यायाचा दुवा - http://www.khapre.org/portal/url/mr/sahitya/pothi/guru/Z71025044827(गुरूचरित्र.अध्याय.दुसरा).aspx
काही कमीजास्त झाले असल्यास चू. भू. द्या. घ्या. , जाणकारांनी त्यात सुधारणा करावी.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान
http://en.wikipedia.org/wiki/
वॉव
हेच म्हणते.. लेख माहितीपूर्ण
१ कृत युग = १७,२८,०००
धन्यवाद!
उत्तम सांख्यिकी
पोथ्या पुराणे न वाचणार्या
+१ सहमत
छान छान.
भारतीय पुराणांमधील युगवर्णने
छान लेख गं शुची. @
विष्णु आणि शिव स्वयंभु मानले
हा हा हा मागे आम्ही एकाला
आणि बाकी लोक हात जीभेवर..
शिश्न आणि जीभेवर ताबा
शिश्न आणि जीभेवर ताबा
हायजॅकींग
हायजॅकींग नाय
बरोबर
सगळ्यांना ही बुद्धी तो
अहं ब्रह्मास्मि वाल्या कलि
छान !!
शुचि, खूप त्रोटक लिहिलेस असे
गुरुचरित्र स्त्रियांनी मुळीच
होय गुरु चरित्राच्या बॅक पानावर तसे
तपशिलाचा गोंधळ होत आहे असे वाटते.
तपशिलाचा गोंधळ होत आहे असे वाटते.
पण बुवा
हे काय आहे?
यात बीभत्स काय आहे हे समजले
कलीयुगाचे वर्णन खरच फार बीभत्स आहे
प्रेषक सहज दि. बुध,
अहो कोणी लिहलं म्हणुन काय
छान!
समूळ ग्रंथ पाहिल्यावीण | उगाच
हे वाक्य वाचल्यावर मला
आमी काय वाचलच नाय... आमाला
गुरुचरीत्र वाचा किंवा वाचू
???
शुचि तै
शुचिताईंकडे विषयांची विविधता