गाभा:
माझ्या लॅप्टॉपवर, एक फोल्डर आहे(त्यात काय आहे ते विचारु नका, महत्वाचे आहे), मी नवीन अॅन्टी व्हायरस(इ स्कॅन) टाकल्यापासुन हे फोल्डर मला उघडता येते पण त्यातल्या फाईल उघडत नाही. तसेच सीस्टीम रीस्टोअरपण करता येत नाही. फोल्डर कॉपी कींवा कट करता येत नाही. त्याच फोल्डरमध्ये नव्याने साठवलेल्या फाइल मात्र नीट चालतात, एरर चेक वगैरे करुन पाहीले पण ऊपयोग होत नाही...
काय करता येइल? मिपावरील जाणकार मदत करतील का?
प्रतिक्रिया
3 Aug 2010 - 5:54 pm | परिकथेतील राजकुमार
ड्राईव्ह फॉर्मॅट मारुन बघा ;)
विनोदाचा भाग सोडा.. कुठल्या फाईल्स आहेत हे तरी सांगु शकाल का ? लॅपटॉप दुसर्या कुठल्या संगणकाशी शेअर करुन त्या संगणकावर ह्या फाईल्स चालु होतात का ते बघितले आहे का?
3 Aug 2010 - 6:25 pm | शैलेन्द्र
हां.. हे करुन पाहीले पाहीजे...
(व्हीडीओ व पीडीएफ फाइल आहेत,१५ जी बी "डाटा" इतर कसला असणार? )
3 Aug 2010 - 6:26 pm | शैलेन्द्र
हां.. हे करुन पाहीले पाहीजे...
(व्हीडीओ व पीडीएफ फाइल आहेत,१५ जी बी "डाटा" इतर कसला असणार? )
3 Aug 2010 - 11:48 pm | मी-सौरभ
त्यापेक्शा णविन स्टाक घावतो का?
ते बगा की.. :)
4 Aug 2010 - 8:44 am | शैलेन्द्र
संपादन करण्यात फार वेळ जातो हो... बरं इथे संपादक मंडळ स्थापुन चालत नाही..
3 Aug 2010 - 6:09 pm | वेताळ
तुम्ही त्या फोल्डरला फोल्डरलॉक टाकला होता का?दुसरे म्हणजे इस्कॅनच्या सेटींग मध्ये जावुन सर्व फोल्डरसेटिंग डिसेबल करा व तो फोल्डर रेनेम करुन चालतो का पहा.आजकाल फोल्दरमधे काही साथवायची कोलेती मतरिअल मिलत नाही.
4 Aug 2010 - 8:45 am | शैलेन्द्र
कोलेती मतरिअल होत हो... म्हणुन तर नां...
3 Aug 2010 - 9:35 pm | कार्लोस
नेटिव बूट स्कैन होतो का बघा कीवा सेफ मोड़ मधे सिस्टम चालू करा
3 Aug 2010 - 10:45 pm | शानबा५१२
वरती एका महान व्यक्तींनी सांगितल्याप्रमाणे युएसबीमधे न उघडणारे काही व्हीडीओ व पीडीएफ टाका व दुस-या संगणकात चालतात का बघा.जर ते काही व्हीडीओ चालले तर सर्वच चालतील मग नवीन युएसबी नको घ्यायला.सर्व डाटा एकेक करुन टाका.
पीसपीमधे व्हीडीओ एका फाईलशी जुळलेला असतो(ती फाईल पीसीवर दीसते,पीसपीवर नाही दीसत),जर ती फाईल डीलीट झाली तर त्या फाईलशी निगडीत व्हीडीओ प्ले नाही होत.तस काही चक्कर असेल व 'ती' फाईल व्हायरस स्कॅनमधे डीलीट झाली असेल तर असा प्रॉब्लम येईल.
अशी काही भानगड असेल अस नाही वाटत.
बाकी हा उपाय एकदम सोप्पा आहे,तुम्हाला सुचायला हवा होता.
- दारु पिणारा,पण जगाला हॅंगओवरचे सल्ले देत न बसणारा.
4 Aug 2010 - 9:00 am | शैलेन्द्र
अहो, त्या सगळ्या फाइल अक्सेस्च नाही करता येत, ट्रान्सफरसुद्धा नाही होत.. पण दिसतात तर आहे.. शिवाय त्याच फोल्डरमध्ये नव्याने टाकलेल्या फाइल नीट चालतायेत.. समजत नाही काय प्रोब्लेम आहे ते..
3 Aug 2010 - 11:01 pm | शशांक मच्छिंद्र...
नक्किच थंबनेल व्हिव असेल तर असा प्रोब्लेम येतो. कुरपया थंबनेल व्हिव काढुन लिस्ट किवा दुसरी व्हिव सिलेकट करा. तुमचा प्रोब्लेम सोल्व होयिल :)