या संवादात बायकांवर टीका करण्याचा अजिबात हेतू नाही. एकूण सामाजिक व्यवस्थेवर मात्र आहे. गैरसमज नसावा.
सदू आणि दादू बसस्टॉपवर उभे असतात. एका जुन्या नाटकातले संवाद पुटपुटत असतात.
सदू : बस आली बस.
दादू : कुठाय बस, आपली नाही ती बस!
(तेवढ्यांत त्यांची बस येते. बसमधे चढल्यावर सदू डावीकडच्या पहिल्या सीटवर बसायला जातो.)
दादू : अरे, थांब थांब, ती सीट अपंगांसाठी आहे.
सदू : मग दुसर्या सीटवर बसु या का ?
दादू : नको रे, ती पण अपंगांसाठीच आहे.
सदू : अरेच्चा, एवढ्या सीट खाली असताना का नाही बसायचं ?
दादू : अरे लेका, हा आरक्षणाचा जमाना आहे. तिसरी सीट तान्ह्या बाळांना पाजणार्या आयांसाठी आहे. त्या मागची बाप्यांना पाजणार्या बायांसाठी!
सदू : त्वांड फोडू का ? काय बोलणं शोभतं का हे ?
दादू : उगाच चावट अर्थ काढू नकोस. बाप्यांना पाजणार्या म्हणजे बारबाला. एवढ्यानं संपतय का ? त्याच्या मागच्या सीट गरोदर स्त्रियांसाठी. त्यामागच्या तरुण स्त्रियांसाठी, मग आज्यांसाठी.
सदू : म्हणजे ही "लेडीज स्पेशल" दिसतीये, चल लवकर उतरुया.
दादू : का ...ही उपयोग नाही. प्रत्येक बसमधे असंच असतंय बघ.
सदू : काही हरकत नाही. आपण उजवीकडे बसुया.
दादू : अहं, ते शक्य नाही.
सदू : का बरं ?
दादू : अरे, तिथे पण आरक्षणच!
सदू : आता ते कोणासाठी ?
दादू : पहिल्या चार सीट ज्येष्ठ नागरिकांसाठी. त्यामागल्या चार शाळेतल्या पोरांसाठी. त्या मागच्या ..........
सदू : पुरे, पुरे, आपल्यासाठी कुठल्या रहातात ते सांग बघू.
दादू : आहेत ना आहेत, त्या शेवटल्या पांच सीट पाहिल्यास का ? सर्वांच्या झाल्यावर आपल्यासाठी तेवढ्याच उरतात. आपल्यातला जो कोणी नशीबवान असेल तो स्पीडब्रेकरवर उडून कधीतरी अपंग होईलच ना, तेंव्हा त्याची बढती एकदम डावीकडल्या पहिल्या सीटवर!
सदू : आन तोपर्यंत ??
दादू : तोपर्यंत लोंबकळायचं आपण ! नाहीतरी सामान्यांच्या कपाळी याउपर लिहिलंय काय या देशांत ?
प्रतिक्रिया
27 Apr 2008 - 3:56 pm | गणपा
वाह हेरंबराव!
आरक्षणावर छान हाणलय.
सर्वांच्या झाल्यावर आपल्यासाठी तेवढ्याच उरतात. आपल्यातला जो कोणी नशीबवान असेल तो स्पीडब्रेकरवर उडून कधीतरी अपंग होईलच ना, तेंव्हा त्याची बढती एकदम डावीकडल्या पहिल्या सीटवर!
हे दादूच म्हणण एकदम पटल.
- (लोंबकळता ) गणपा
27 Apr 2008 - 4:44 pm | देवदत्त
छान लिहिलंय...
आपल्यातला जो कोणी नशीबवान असेल तो स्पीडब्रेकरवर उडून कधीतरी अपंग होईलच ना, तेंव्हा त्याची बढती एकदम डावीकडल्या पहिल्या सीटवर!
हे मस्तच :)
27 Apr 2008 - 8:48 pm | अविनाश ओगले
:D
27 Apr 2008 - 9:03 pm | शितल
तुम्ही लिहले आहे ते बरोबर आहे, बाकी मी स्त्री असुन ही आरक्षणा मला आरक्षणा बद्द्ल चीड आहे, इथे स्त्री पुरुष समान म्हणायचे आरक्षणाची इच्छा धरायची. बसमध्ये जो पहिला त्याला बसायला जागा पण जर कोणाला गरज असेल त्याला जे बसलेले असतील त्या॑नी जागा द्यावी.
:))
27 Apr 2008 - 9:29 pm | प्रभाकर पेठकर
गर्भवती महिला, कडेवर मुल असलेल्या महिला, लहान मुले, आजारी माणसे, वृद्ध स्त्री-पुरूष ह्यांना बसण्यासाठी जागा द्यावी. अनेक जणं देतातही.
27 Apr 2008 - 11:56 pm | लंबूटांग
माझे पण अगदी असेच म्हणणे आहे ...
28 Apr 2008 - 4:42 pm | विकि
तुम्ही स्री आहात आणि तुम्हाला आरक्षणाबद्दल चीड आहे. आरक्षणामुळे स्रीयांना (अपवाद सोडून)सर्व क्षेत्रात पुढे येण्याची संधी मिळाली. आधीच आपल्या देशात स्रियांना दुय्यम दर्जची वागणू़क .
आणी बेस्टच्या बसेसमध्ये स्रियांसाठी आरक्षण असायलाच हवे. गर्दीच्या वेळी स्रियांची काय हालत होते ते आम्ही नेहमी बघतो.
कळावे
कॉ.विकि
27 Apr 2008 - 9:28 pm | ब्रिटिश टिंग्या
सुरेख लेख :)
28 Apr 2008 - 12:40 am | भडकमकर मास्तर
वावा.... मस्त लेख...
माझ्या कॉलेजच्या वेळी पी एम टी मध्ये लिहिलेले असायचे........ गरोदर स्त्रिया ,वृद्ध, अपंग आणि महिलांना बसायला जागा द्या.
मी कोणत्या महिलेला विचारले नाही, पण वाटायचे की मी स्वतः निरोगी, तरूण आणि सक्षम महिला असतो तर त्या वाक्यावर मला आक्षेप घ्यावासा वाटला असता....
असो...
28 Apr 2008 - 10:11 am | विसोबा खेचर
मस्त!
वरील सर्वांशी सहमत...
आपला,
(आरक्षित) तात्या.
28 Apr 2008 - 3:15 pm | सागर१२३
मस्त! मस्त! मस्त!
28 Apr 2008 - 3:36 pm | धमाल मुलगा
एकदम ठकाठक टोले....
मस्त!
अवांतरः स्त्रिया आणि आरक्षणावरुन 'अगंबाई अरेच्च्या' मधला एक डायलॉग आठवला...
स्थळःमंत्रालयाचं गेट, बायकांचा घोळका घोषणा देतोय "साडे-तेहत्तीस टक्के आरक्षण मिळालंच पाहिजे! "
त्यावर नार्वेकरः आयला, तिथंसुध्दा नापास...पुर्ण ३५% सुध्दा नाही?
28 Apr 2008 - 4:21 pm | आनंदयात्री
असेच म्हणतो .. छान लेख.
28 Apr 2008 - 6:57 pm | शितल
>>>>>तुम्ही स्री आहात आणि तुम्हाला आरक्षणाबद्दल चीड आहे. आरक्षणामुळे स्रीयांना (अपवाद सोडून)सर्व क्षेत्रात पुढे येण्याची संधी मिळाली. आधीच आपल्या देशात स्रियांना दुय्यम दर्जची वागणू़क .
आणी बेस्टच्या बसेसमध्ये स्रियांसाठी आरक्षण असायलाच हवे. गर्दीच्या वेळी स्रियांची काय हालत होते ते आम्ही नेहमी बघतो.
तुमचे म्हणने बरोबर आहे, पण आरक्षण म्हणजेच दुय्यम लेखणे, कि॑वा दया देणे -करणे,(माझे हे वैयक्तीक मत) आरक्षणाचा लाभ स्त्रिया॑ना होतो ही, पण आरक्षण नसत तरी त्या॑नी आपले कर्तुत्व सिध्द केलेच असते.
>>>बस मध्ये गर्दीच्या वेळी स्रियांची काय हालत होते ते आम्ही नेहमी बघतो.
पण आरक्षण नसताना बसमध्ये गरजु स्त्रिया॑ना जागा दिली अथवा मदत केली तर ती माणुसकीच ठरेल.
8 Feb 2014 - 5:58 pm | तिमा
जुने धागे उकरुन नवीन सभासदांना वाचायला देणे हा ही एक उद्योग आहे.
हे बहुतेक मुंबईतल्या बसला रुपक धरुन आहे.