एका हाँटेलाच्या बाहेर झनझनीत मीसल मीलेळ अशी पा्टी लावलेली होती.भाषा विशारदनांही विचार करायला लावेल अशी ही पाटी .पाटी वाचल्यावरच त्यातील झणझणीतपणा जाणवतो.एका ठिकाणी गावढी चीकण मीलेल अशी अस्सल मराठीतील पाटी वाचली आणि शाळेत गुरुजी शुध्दलेखनाच्या चार ओळी लिहा असे घसा ओकलून का सांगायचे ते कळले.अनेक हाँटेलात मेदूवडयाचे मेंदूवडा असे नामकरण कधीच झाले आहे.असे लज्जतदार मेदूवडे नाहितर गावठी चिकन आपल्याही वाट्याला आले असेलचकी मग होऊन जाऊदे झनझनीत मीसल
लिहा तुमचे अनुभव
प्रतिक्रिया
7 Oct 2009 - 10:36 pm | टारझन
गुरूजी शाळेत ओकलून विरामचिन्हांच्या वापरांविषयी नाही का सांगायचे ?
असो ,
-- (पाटीवरच्या शुद्धलेखनापेक्षा,मेनुच्या चवीला महत्व देणारा) टारझन
8 Oct 2009 - 12:05 am | अश्विनीका
अशीच अजून एक वाचलेली पाटी - फ्रूट स्लार्ड
- अश्विनी
8 Oct 2009 - 1:13 am | चतुरंग
गरम इटली आणि सांबर मीळेल! :D
चतुरंग
8 Oct 2009 - 4:16 pm | गणपा
या वरुन हे आठवल.
8 Oct 2009 - 8:47 am | llपुण्याचे पेशवेll
येथे कांधा-फोवे मिलतील.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
8 Oct 2009 - 11:25 am | रेवा
चिकण मांचुरिया...!!
8 Oct 2009 - 12:34 pm | अमृतांजन
सुनील की सुनिल? काय बरोबर?
ह. घ्या. सुनिलभाऊ राग मानू नका.
8 Oct 2009 - 12:39 pm | चिरोटा
इकडे एका दुकानात कन्नडमध्ये लिहिलेली पाटी होती-"मुंबई बडापाव मिळेल."
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
8 Oct 2009 - 3:52 pm | भाग्यश्री कुलकर्णी
इथे इंदोरातही दहीबडा ,आलुबडा असंच म्हणतात.
8 Oct 2009 - 12:44 pm | राजा
हाफ गल्लास ७ रुपये फुल गल्लास १० रुपये
येथे वाडदिवसाच्या आर्डर घेतल्या जातात
8 Oct 2009 - 8:07 pm | व्यंकु
येथे आयस्क्रीमच्या ऑडर्स स्विकार्ल्या जातील.