ताकुमा बॉयलर

अजय भागवत's picture
अजय भागवत in जनातलं, मनातलं
13 Sep 2009 - 11:24 am

ताकुमा बॉयलर

ताकुमा बॉयलर ह्या जगप्रसिद्ध जापानी कंपनीचे मालक श्री ताकुमा ह्यांनी त्यांच्या जवळची सर्व पुंजी ताकुमा बॉयलर बनविण्यात घालवली पण तो बॉयलर काही केल्या चाचण्या पार पाडू शकत नसे. व त्यामुळे तो बॉयलर विक्रीसाठी उपलब्ध करुन देता येत नव्हता.

अगदी कफल्लक झाल्यानंतर त्यांनी एक शेवटचा उपाय म्हणून कोरियात राहणाऱ्या एका मित्राकडे काही कर्ज मागायचे ठरवले व पुढील चाचण्या व संशोधन करता येईल असा विचार केला.

झाले, ते एका बोटीवर चढले व कोरियाला निघाले. तरीही त्यांच्या मनात धाकधूक होतीच, मित्राने कर्ज नाही दिले तर काय, ह्या विचाराने रात्रभर झोप नाही आली. सकाळी सूर्योदयाच्या वेळी त्यांनी बोटीच्या डेकवर फेरफटका मारण्याचा विचार केला व ते त्याच विचारमग्नतेत फेऱ्या मारु लागले.

आता हळूहळू त्यांच्या मनात आत्मघाताचे विचार येऊ लागले व त्यांनी ठरवले की, पाण्यात ऊडी घ्यायची. कुटूंबियांची मनात माफी मागत ते डेकच्या कठड्यावर चढले आणि ऊडी मारणार तितक्यात सूर्योदय झाला व त्याची प्रसन्न कोवळी ऊने सर्वत्र पसरली. ताकुमा ह्यांच्या मनात एक स्फूर्तिदायक विचार आला. जणू काही आकाशवाणीच झाली. "तुला बॉयलरकडून काय हवे आहे ते तू ठरवले आहेस, बॉयलरला काय हवे आहे हे तू विचारले आहेस का?"

हा विचारच त्यांनी पुर्वी केलेला नव्हता! त्यांनी आत्मघाताचा विचार सोडून दिला, प्रसन्न चित्ताने ते कोरीयाला गेले व संयोगाने मित्रानेही त्यांना कर्ज दिले. जापानला परतून त्यांनी बॉयलरच्या पाणीवहनात बरेच बदल केले व शेवटी त्यांच्या प्रयत्नाने जगाने एक अत्यंत कार्यक्षम असा बॉयलर पाहिला. आजही जगात ताकुमा बॉयलरचे नाव आदराने घेतले जाते.

तंत्रविचार

प्रतिक्रिया

दशानन's picture

13 Sep 2009 - 11:30 am | दशानन

स्पुर्तीदाय !

अमोल खरे's picture

13 Sep 2009 - 11:41 am | अमोल खरे

विट्ठल कामत ह्यांच्मी""ईडली, ऑर्किड आणि मी" ह्या पुस्तकात देखील असाच प्रसंग आहे. उद्योगात भयंकर कर्जबाजारी झाल्यामुळे, रोज देणेकर्‍यांना भेटुन वैतागलेले कामत आत्महत्या करायला निघाले होते. वाटेत एका मित्राला भेटून जाऊ म्हणून त्याच्या ऑफिस मध्ये गेले. चर्चगेट ला कुठेसे ऑफिस होते ते. नेमकी त्या मित्राला अर्जंट मिटींग अटेंद करावी लागली व त्याने कामतांना थोडावेळ माझ्या केबिनमध्ये बस म्हणुन सांगितले. कामत सहज त्या केबिनच्या खिडकीतुन बाहेर बघत होते. तेव्हा त्यांना दिसले कि समोरच्या उंच बिल्डिंग मध्ये काहीतरी रिपेअरचे का रंगाचे काम चालले होते व एक माणुस त्या ऊंच झुल्यावर बेल्ट / दुसर्‍या कोणत्याही संरक्षणाशिवाय काम करत होता. त्यात तल्लीन झाला होता. त्यावेळेस कामत म्हणाले की जर हा न घाबरता एवढी रिस्क घेऊ शकतो तर मी का नाही. त्यांनी लगेच आत्महत्येचा विचार मनातुन काढुन टाकला. एका साधारण वर्कर ने त्यांचं आयुष्य बदलुन टाकले. मला तो प्रसंग फार आवडला होता.

अजय भागवत's picture

13 Sep 2009 - 11:50 am | अजय भागवत

हो "ईडली, ऑर्किड आणि मी" हे मराठीतील अशा विषयांवरील सर्वोत्तम पुस्तकांमधे एक फार वरच्या क्रमांकाचे पुस्तक आहे.
मला त्यातील त्यांची श्री. ओबेराय ह्यांच्या बरोबरचा प्रसंगही फार आवडतो.

क्रान्ति's picture

13 Sep 2009 - 12:20 pm | क्रान्ति

स्फूर्तिदायक लेख.
कामतांचे वरील पुस्तक खरंच अतिशय उत्तम उदाहरण आहे अशा विषयांवरील मराठी पुस्तकाचं. त्यातले बरेच प्रसंग वाचताना लेखकाची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आशावाद सातत्याने जाणवत रहातो.

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

मदनबाण's picture

13 Sep 2009 - 1:54 pm | मदनबाण

हेच म्हणतो.
मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=758...

पाषाणभेद's picture

13 Sep 2009 - 11:43 am | पाषाणभेद

पण त्या बॉयलरची जास्त माहिती द्या ना.
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Sep 2009 - 2:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अतिशय स्फूर्तीदायक.

कधी कधी कामाचा फार आळस येतो तेव्हा मी कार्व्हर किंवा लिझ माईट्नरचं चरित्र उघडून बसते.

अदिती

अजय भागवत's picture

13 Sep 2009 - 6:53 pm | अजय भागवत

लिझ माईट्नरचं चरित्र वाचायला हवे आता. तसे पाहिले तर चार्ली चापलिनचेही चरीत्र वाचण्यासारखे आहे. त्याने ही अत्यंत प्रतिकुल परीस्थितीतून मार्ग शोधला.

अवांतर- चार्ली ने अखेरचा श्वास स्वित्झर्लंडमधे घेतला. टूरिझम कंपन्यांच्या माऊंट टिटलिस च्या टूर मधे त्याचे थडगे दाखवतात. तेव्हा अगदी भरुन येते.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Sep 2009 - 4:05 pm | बिपिन कार्यकर्ते

खरंच स्फुर्तिदायक. छानच आहे.

@ अदिती : लिझ मायट्नरचं चरित्र नाही वाचलंय. पण कार्व्हरचं मात्र अनेक वेळा वाचलंय. लहान कार्व्हरची फरफट वाचून अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. :(

बिपिन कार्यकर्ते

अजय भागवत's picture

13 Sep 2009 - 6:48 pm | अजय भागवत

>>लहान कार्व्हरची फरफट वाचून अक्षरशः डोळ्यात पाणी येतं.

अगदी खरे. टेक्सास युनि. च्या एका जॉनसन नावाच्या आफ्रिकन प्रोफेसरला जेव्हा मी सांगितले की आमच्याकडे कार्व्हरचे चरीत्र मराठीत भाषांतरीत झाले आहे, तर तो अत्यांनंदाने उडालाच. त्याने माझ्याकडून त्या पुस्तकाची सर्व माहिती मागवून घेतली.
आम्ही नंतर त्याविषयी खूप चर्चा केल्याचेही मला आठवते.

असेच एक मनाला खोल जखमा करणारे पुस्तक होते "रुट" नावाचे.

अजिंक्य's picture

13 Sep 2009 - 6:45 pm | अजिंक्य

सहमत. खरोखरच स्फूर्तीदायक.
-अजिंक्य.

सहज's picture

13 Sep 2009 - 6:56 pm | सहज

रोचक माहीती.