विट्ठल कामत ह्यांच्मी""ईडली, ऑर्किड आणि मी" ह्या पुस्तकात देखील असाच प्रसंग आहे. उद्योगात भयंकर कर्जबाजारी झाल्यामुळे, रोज देणेकर्यांना भेटुन वैतागलेले कामत आत्महत्या करायला निघाले होते. वाटेत एका मित्राला भेटून जाऊ म्हणून त्याच्या ऑफिस मध्ये गेले. चर्चगेट ला कुठेसे ऑफिस होते ते. नेमकी त्या मित्राला अर्जंट मिटींग अटेंद करावी लागली व त्याने कामतांना थोडावेळ माझ्या केबिनमध्ये बस म्हणुन सांगितले. कामत सहज त्या केबिनच्या खिडकीतुन बाहेर बघत होते. तेव्हा त्यांना दिसले कि समोरच्या उंच बिल्डिंग मध्ये काहीतरी रिपेअरचे का रंगाचे काम चालले होते व एक माणुस त्या ऊंच झुल्यावर बेल्ट / दुसर्या कोणत्याही संरक्षणाशिवाय काम करत होता. त्यात तल्लीन झाला होता. त्यावेळेस कामत म्हणाले की जर हा न घाबरता एवढी रिस्क घेऊ शकतो तर मी का नाही. त्यांनी लगेच आत्महत्येचा विचार मनातुन काढुन टाकला. एका साधारण वर्कर ने त्यांचं आयुष्य बदलुन टाकले. मला तो प्रसंग फार आवडला होता.
हो "ईडली, ऑर्किड आणि मी" हे मराठीतील अशा विषयांवरील सर्वोत्तम पुस्तकांमधे एक फार वरच्या क्रमांकाचे पुस्तक आहे.
मला त्यातील त्यांची श्री. ओबेराय ह्यांच्या बरोबरचा प्रसंगही फार आवडतो.
स्फूर्तिदायक लेख.
कामतांचे वरील पुस्तक खरंच अतिशय उत्तम उदाहरण आहे अशा विषयांवरील मराठी पुस्तकाचं. त्यातले बरेच प्रसंग वाचताना लेखकाची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आशावाद सातत्याने जाणवत रहातो.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखारूह की शायरी
पण त्या बॉयलरची जास्त माहिती द्या ना.
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
लिझ माईट्नरचं चरित्र वाचायला हवे आता. तसे पाहिले तर चार्ली चापलिनचेही चरीत्र वाचण्यासारखे आहे. त्याने ही अत्यंत प्रतिकुल परीस्थितीतून मार्ग शोधला.
अवांतर- चार्ली ने अखेरचा श्वास स्वित्झर्लंडमधे घेतला. टूरिझम कंपन्यांच्या माऊंट टिटलिस च्या टूर मधे त्याचे थडगे दाखवतात. तेव्हा अगदी भरुन येते.
खरंच स्फुर्तिदायक. छानच आहे.
@ अदिती : लिझ मायट्नरचं चरित्र नाही वाचलंय. पण कार्व्हरचं मात्र अनेक वेळा वाचलंय. लहान कार्व्हरची फरफट वाचून अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. :(
बिपिन कार्यकर्ते
>>लहान कार्व्हरची फरफट वाचून अक्षरशः डोळ्यात पाणी येतं.
अगदी खरे. टेक्सास युनि. च्या एका जॉनसन नावाच्या आफ्रिकन प्रोफेसरला जेव्हा मी सांगितले की आमच्याकडे कार्व्हरचे चरीत्र मराठीत भाषांतरीत झाले आहे, तर तो अत्यांनंदाने उडालाच. त्याने माझ्याकडून त्या पुस्तकाची सर्व माहिती मागवून घेतली.
आम्ही नंतर त्याविषयी खूप चर्चा केल्याचेही मला आठवते.
असेच एक मनाला खोल जखमा करणारे पुस्तक होते "रुट" नावाचे.
प्रतिक्रिया
स्पुर्तीद
+१
हो "ईडली,
+२
+३
पण त्या
बॉयलरची जास्त माहिती
अतिशय
लिझ
छान...
>>लहान
+१
रोचक