डाव्या-उजव्याचा वर्णपट खुप मोठा पण नैसर्गिक आहे. बेल कर्व्हचे अस्तित्व विश्व व्यापी आहे. पूर्ण उजवे आणि पूर्ण डावे अपवाद आहेत, नियम नाहीत...
ज्यांना समूहात आणि परंपरेत सुरक्षित वाटते ते सहसा उजवीकडे झुकलेले असतात. त्यांना मुक्तपणा म्ह० स्वैराचार वाटतो. त्यांना समूहाचा व्यक्तीच्या जीवनावर जास्तीत जास्त ताबा ठेवायचा असतो. मग उतरंडीला महत्त्व येते. उतरंडीमधली सर्वात डोक्यावरची व्यक्ती खालच्या व्यक्तीचे महत्त्व आणि भवितव्य घडवते. त्यात त्या व्यक्तीचे नुकसान झाले तर त्याचे काही तरी करून उदात्तीकरण करून भ्रम निर्माण करायचा असतो. उजव्यांनी सर्वात जास्त अन्याय स्त्रियांवर केला आहे. त्यामुळे मुक्त स्त्री त्यांना संस्कृती भ्रष्ट करणारी वाटते. मग मुलांची लग्ने होत नाहीत म्हणून स्त्रियांनी जास्त शिकू नये, कमी शिकलेला नवरा पत्करावा वगैरे, शहर सोडून खेड्यात जावे हे तत्त्वज्ञान उगाळले जाते.
नुकतेच वाचनात आलेले ताजे संशोधन असे सांगते की एखाद्या कुटुंबात एखादी व्यक्ती जितकी बुद्धीमान तितकी ती डावीकडे झुकलेली असायची शक्यता असते. हा सहसबंध आहे, कार्यकारण भाव नाही. डाव्या बुद्धीमत्तेच्या श्रेष्ठत्वाचे उत्तम उदा० म्हणजे चीन.
मग लक्षात आले आतापर्यंत विकसित झालेले सर्व यशस्वी ए०आय० डावीकडे झुकलेले आहेत. उजवीकडे झुकलेला ए०आय० कसा असेल याची मला उत्सूकता आहे. मुळात उजवी कडे झुकलेला ए०आय० अस्तित्वात येईल का, याचीच शंका आहे.
तारतम्य मध्यममार्गात असते याचा डाव्यांना आणि उजव्यांना विसर पडलेला असतो.
प्रतिक्रिया
19 Apr 2025 - 4:47 pm | युयुत्सु
फक्त वानगीदाखल -
१. https://www.theatlantic.com/politics/archive/2013/10/can-your-genes-pred...
२. https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S0160289624000254
" Intelligence is correlated with a range of left-wing and liberal political beliefs. This may suggest intelligence directly alters our political views. Alternatively, the association may be confounded or mediated by socioeconomic and environmental factors. We studied the effect of intelligence within a sample of over 300 biological and adoptive families, using both measured IQ and polygenic scores for cognitive performance and educational attainment. We found both IQ and polygenic scores significantly predicted all six of our political scales. Polygenic scores predicted social liberalism and lower authoritarianism, within-families. Intelligence was able to significantly predict social liberalism and lower authoritarianism, within families, even after controlling for socioeconomic variables. Our findings may provide the strongest causal inference to date of intelligence directly affecting political beliefs."
27 Apr 2025 - 4:46 pm | युयुत्सु
१. https://www.eurekalert.org/news-releases/1057834
२. "Brain scans remarkably good at predicting political ideology"
https://news.osu.edu/brain-scans-remarkably-good-at-predicting-political...
19 Apr 2025 - 6:47 pm | प्रसाद गोडबोले
मी काय म्हणतो, एकदा तुम्ही
"उजवे आणि डावे : माझ्या व्याख्या " असा लेख लिहा की.
19 Apr 2025 - 6:50 pm | मुक्त विहारि
सहमत आहे
19 Apr 2025 - 8:24 pm | युयुत्सु
श्री गोडबोले
तुमची कल्पना चांगली आहे आवडली
21 Apr 2025 - 6:28 pm | विवेकपटाईत
आता पर्यन्त वाचलेला सर्वात विनोदी लेख. बुद्धिमान व्यक्ति नेहमी सकारात्मक विचार करतात. ते स्वत: आणि समाजाचा विकास करतात. ते उजव्या विचार सरणीचे असतात. नकारात्मक विचाराने ग्रसित व्यक्ति डाव्या विचारसरणीचे होतात. स्वत:चे आणि संपूर्ण समाजाचे नुकसान करतात. भारताचे उदा. घ्या. प. बंगाल आणि बिहारचे उद्योग डाव्या विचारसरणीच्या नेत्याने उध्वस्त केले. ज्या राज्यांत डाव्यांचा प्रभाव कमी होता तिथे उद्योगांचा विकास झाला. कोट्यावधी लोकांना रोजगार मिळाला.
डाव्या विचारांचे शेतकरी नेता. चक्का जाम करतात. आंदोलन करून राज्याचे नुकसान करतात. उजव्या विचारधारेचे शेतकरी नेता आता पर्यन्त तीन फूड पार्क सहित 80 जास्ती प्रोसेसिंग यूनिट स्थापित करून काही लाख लोकांना रोजगार आणि लाखो शेतकर्यांना शेतीचे नवीन विकल्प उपलब्ध करून देतात.
उजव्यानी स्त्री वर अत्याचार केले याचे प्रमाण नाही. उजव्या देशांत स्त्री शोषण कमी आहे. भारतात तर 498 किंवा स्त्री शोषण आरोपला घाबरून पुरूष आत्महत्या करतात. पण डाव्या देशांत स्त्रीयांचे शोषण सामान्य आहे कारण सत्तेवर असलेले डाव्यांची इच्छा म्हणजे न्याय.
मानसिक रूपेण विकृत आणि पुरुषार्थहीन व्यक्ति डाव्या विचारधारेचे होतात.
21 Apr 2025 - 8:14 pm | युयुत्सु
संघ शिक्षा वर्गात प्रचारकी थाटाच्या आणि परिणामकारक अशा सोशल मीडिया पोस्ट कशा लिहायच्या यावर जास्तीत जास्त कार्यशाळा आयोजित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
22 Apr 2025 - 12:20 pm | विवेकपटाईत
संघ शिक्षा वर्गात प्रचारापासून दूर राहून समाज सेवेचे कार्य करणे शिकविले जाते. बाकी डावे मुळातच आळशी असतात. बिना काम करता फक्त प्रचार करून पैसा कमवायची मनोवृती त्यांच्यात ठासलेली असते. दिल्लीत काळे पांढरे कपडे घालून डावे पथ नाट्य कलाकार ही हजारपेक्षा जास्त रोजचे घेतात. शिवाय "खाना-पींना".
1 May 2025 - 8:23 pm | स्वधर्म
>> संघ शिक्षा वर्गात प्रचारापासून दूर राहून
संघात 'प्रचारक' म्हणून पदच असते ना? त्यांचे कामच मुळी संघाचा व त्याच्या विचारांचा प्रचार करणे हे असते, नाही का?
21 Apr 2025 - 8:15 pm | युयुत्सु
संघ शिक्षा वर्गात प्रचारकी थाटाच्या आणि परिणामकारक अशा सोशल मीडिया पोस्ट कशा लिहायच्या यावर जास्तीत जास्त कार्यशाळा आयोजित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
27 Apr 2025 - 5:03 pm | मुक्त विहारि
ह्यावर पण एक लेख लिहा की...
27 Apr 2025 - 5:22 pm | युयुत्सु
@ मुक्त विहारि
मी सर्व विचारसरणींचे आदर करणार्या वातावरणात वाढलो. २०२४ च्या निवडणूकीपर्यंत मला संघाबद्दल बर्यापैकी आदर होता. निवडणूक ज्वर जसा शिगेला पोचला तसा संघाच्या तळागातल्या कार्यकर्त्यांचा उन्माद त्रासदायक ठरला. त्यात संघ कार्य्कर्त्यांच्या बालीश आणि विकृत मानसिकतेचे जवळून दर्शन झाले. फार काय भारत हे कधिच "हिंदुराष्ट्र" होऊ शकणार नाही, या कडवट सत्याचे यथार्थ ज्ञान झाले (याचे वानगीदाखल उदा० म्हणजे मला आजवर "सनातन धर्म" या संकल्पनेची कोर्टात टिकेल अशी व्याख्या कुणीही देऊ शकलेले नाही). मोदी सत्तेवर येण्यापूर्वीचा संघ आणि नंतरचा संघ यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
27 Apr 2025 - 6:01 pm | मुक्त विहारि
तुम्हाला खरोखरच संघाचे कार्य समजावून घ्यायचे असेल तर,
खालील काही साईट देतो.
https://www.rss.org/hindi/
https://vanvasi.org/
ह्या साईटला भेट द्या आणि त्यांच्या एखाद्या सामाजिक उपक्रमात जरूर भाग घ्या.
आणि ते पण नाही जमले तर, तुम्ही ज्या शहरात राहता त्या जिल्ह्यातील प्रचारकाला जरूर भेटा.
संघटन में शक्ती हैं..... आणि राष्ट्र उभारणी साठी, त्याचीच तर गरज असते...
27 Apr 2025 - 7:02 pm | युयुत्सु
वेबसाईट पाहून एखाद्या व्यक्तीचे वा संघटनेचे मूल्यमापन/ओळ्ख इ० करायला मी काल भाऊच्या धक्क्यावर उतरलो नाही.
27 Apr 2025 - 7:45 pm | मुक्त विहारि
RSS च्या कुठल्याही सामाजिक उपक्रमात भाग घ्या...
मी RSS च्या शाखेत जात नाही. पण RSS च्या दोन उपक्रमांना आर्थिक मदत जरूर करतो....
स्वतः भाग न घेता, तुम्ही एकांगी विचार कसा काय करू शकता?
असो, तुम्ही खूप शिकलेले दिसता....
आनंद आहे....
27 Apr 2025 - 8:51 pm | श्रीगुरुजी
सोडा हो. संघावर जन्मापासून टीका होतेय. ३ वेळा बंदी सुद्धा आणली होती. संघाचे नेते, प्रचारक व स्वयंसेवक तुरूंगात डांबले होते. सरकारी कर्मचाऱ्यांना संघाशी कोणताही संबंध ठेवण्यास बंदी होती. एखादा संघाशी संबंधित आहे असे समजले की त्याला झुरळासारखे लांब ढकलले जायचे.
परंतु ९९ वर्षांनतरही संघ नुसताच टिकला नाही तर अधिकाधिक बलवान होऊन सर्व क्षेत्रात पसरला आहे व उत्तरोत्तर अजून बलवान होईल.
संघाला संपवायला निघालेले केव्हाच बाराच्या भावात गेले, पण संघाला साधा ओरखडा सुद्धा काढू शकले नाही.
27 Apr 2025 - 10:48 pm | मुक्त विहारि
कुठल्याही संघटनेची माहिती घ्यायची असेल तर त्या संघटनेत स्वतः सामील व्हा किंवा आपल्या विश्वासू व्यक्ती मार्फत ती माहिती जाणून घ्या.... संदर्भ... "कौटिल्याचे अर्थशास्त्र.."
तुम्ही जर, "मुसाफिर" हे पुस्तक, लेखक अच्युत गोडबोले,वाचले असेल तर, मी काय म्हणत आहे, ते पण नक्की समजेल...
ते पण हुकलेलेच होते.
27 Apr 2025 - 10:41 pm | मुक्त विहारि
https://vanvasi.org/our-team/
ह्यात पत्ते आणि फोन नंबर दिले आहेत.
स्वतः जा, चौकशी करा, त्यांचे कार्य स्वतः बघा आणि मग जे काही बरे वाईट समजेल ते इथे जरूर सांगा...
28 Apr 2025 - 7:24 am | युयुत्सु
As the researchers defined them, right-wing authoritarians are people who ascribe to conservative ideologies and so-called "traditional values" who advocate for "punitive measures for social control," while left-wing authoritarians are interested in "violently overthrow[ing] and [penalizing] the current structures of authority and power in society."
https://futurism.com/neoscope/authoritarian-brain-scans
1 May 2025 - 10:31 am | सुबोध खरे
कशाला चर्चा करायची?
जगात असलेली सर्व डावी राष्ट्रे रसातळाला गेली किंवा त्यांनी डावी विचारसरणी सोडून दिली म्हणून प्रगती करू शकले.
बाकी (तथाकथित)अति उच्च बुद्धिमत्ता असलेले डावे लोक लोकशाही राष्ट्रांत मोठा पगार घेऊन उजव्या विचारसरणी वर गरळ ओकताना सर्वच लोकशाही राष्ट्रांत दिसतात.
खाल्ल्या घरचे वासे मोजणारे लोक जगात कमी आहेत का?
1 May 2025 - 11:12 am | मुक्त विहारि
RSSच्या विरोधात ह्यांची वैचारिक भूमिका आहे...
आणि गंमत अशी आहे की, नुह बाबतीत, संदेशखाली बाबतीत, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारा बाबतीत,हे महाशय कधीही बोलले नाहीत...
2 May 2025 - 10:02 am | युयुत्सु
मला जे प्रश्न जास्त भेडसावतात त्यावर मी प्राधान्याने बोलू इच्छितो. ज्या प्रश्नांचा माझा अभ्यास नाही त्यावर मी का बोलू?
2 May 2025 - 10:19 am | युयुत्सु
आज संघाच्या लोकांची मदत घेणं म्हणजे - "आवळा देऊन कोहळा काढायचा" किंवा "चवलीची मदत आणि रुपयाची वसुली" असा प्रकार असतो. एकवेळ सावकाराचं कर्ज फिटेल पण संघाचे "उपकार" फिटत नाहीत. घरात घुसून घरातल्या व्यवहारात नाकं खुपसणे, आणी सतत दिशाभूल, चुकीचे सल्ले देत बसायचे, नको ती अक्कल शिकवणे, हे वेगळेच असते. भाजपा अजून संघा इतका नतद्रष्ट बनला नाहीये, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू.
2 May 2025 - 8:18 pm | अमरेंद्र बाहुबली
+1
त्यामुळेच मोदी शहा संघाला चार हात लांब ठेवत असावेत!
2 May 2025 - 10:57 am | सुबोध खरे
चुकीचे सल्ले देत बसायचे, नको ती अक्कल शिकवणे
हि काही हुच्च लोकांची मक्तेदारी असते त्यात दुसर्यांनी नाक खुपसलेले अजिबात चालत नाही.
लोल