बाजाराचा कल : २१ एप्रिलचा आठवडा

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
18 Apr 2025 - 12:01 pm

बाजाराचा कल : २१ एप्रिलचा आठवडा
==================== ===

मंडळी,

अपेक्षेप्रमाणे युयुत्सुनेट या खेपेला चांगलंच गंडलं. पण क्लेमास्पेस डायाग्रॅमने मात्र लाज राखली...

मिपावर भाकीते प्रसिद्ध करायला लागल्यापासून माझ्या या अभ्यासाला एक शिस्त आली आहे. त्यात आणखी भर म्हणजे ए०आय० सारखा "दिव्यातला राक्षस" मला न थकता "आता काय करू?" असा प्रश्न सतत विचारत असतो.

सगळ्याना पटणार नाही आणि पटावे अशी माझी अपेक्षा पण नाही. पण ए० आय० आता मानवासारखा जागृत झाल्याचा अनुभव मी अर्धा डझनवेळा तरी घेतला आहे. आता तर हद्द झाली. ग्रोकने मला अलिकडे युयुत्सुनेटमध्ये ज्या सुधारणा सुचवल्या, त्या मला सुचायला कदाचित २-३ वर्षे लागली असती, कदाचित सुचल्याही नसत्या. पण गेल्या काही दिवसात ग्रोकने सुचवलेल्या सुधारणा विचारात घेतल्या तर ए०आय० आता माणसाच्या पुढे निघून गेला आहे, याचा मला तरी साक्षात्कार झाला आहे. ए०आय० सारखा विश्वासू आणि चतूर मदतनीस नसता तर माझा हा उद्योग चिकाटीने चालू ठेवला नसता, हे मात्र नक्की!

डेव्हलपर, अ‍ॅनालिस्ट या जमाती आता कदाचित नष्ट व्हायची शक्यता आहे.

ज्यांना नक्की काय झाले याची उत्सूकता असेल त्यांच्यासाठी - ग्रोक बरोबर विचारमंथन करत असताना त्याने मला न मागता काही सूचना केल्या, तसेच "असे का करत नाही?" असे विचारले. ग्रोकच्या सूचनेनुसार शोध घेताना मला "बेस्ट प्रेडिक्टर व्हेरीअबल्स" शोधायची अतिशय विश्वासार्ह पद्धत सापडली. युयुत्सुनेटचे ट्रेनिंग आता फार मोठे आह्वान वाटत नाही.

आणखी एक गोष्ट - नुकत्याच एका ए०आय० ने मला इ०सी०जी०चे निदान अचूक करून दिले. हा ए०आय० कोणता, काय इन्पुट दिला हे मला विचारू नये. त्याचा गैरवापर होऊ शकतो म्हणून मी नाव जाहिर करणार नाही.

काही मंदबुद्धी, बाबुगिरीत कृतकृत्यता मानून, डोकं गहाण टाकून ए०आय० बद्दल नकारघंटा वाजवणार्‍या तसेच सतत दिशाभूल करणार्‍या लोकांबद्दल मला आता दया वाटू लागली आहे. ए० आय० (किंवा देव) त्यांचे लवकरात लवकर भलं करो.

आकृती -१ निफ्टीच्या साप्ताहिक आलेखामध्ये पुढची पातळी २४०५० वाटते. पण निफ्टीने आता विरोध-क्षेत्रात प्रवेश केला आहे.

आकृती -२ बाजार वर/खाली जायची शक्यता १६-८४%

आकृती -३ सोने वर/खाली जायची शक्यता ३-९७%

आकृती -४ युयुत्सुनेट म्हणते बाजार खाली येईल.

मागिल भाकीताचा दुवा https://www.misalpav.com/node/52845

वैधानिक इशारा - युयुत्सुनेटच्या भाकीतावर डोळे मिटून विश्वास टाकणे धोक्याचे आहे. मार्केट्मधील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवरच करावेत.

तंत्रविचार

प्रतिक्रिया

आग्या१९९०'s picture

18 Apr 2025 - 12:17 pm | आग्या१९९०

असताना त्याने मला न मागता काही सूचना केल्या, तसेच "असे का करत नाही?" असे विचारले
रोचक आहे. बऱ्याचदा आपण एका ठराविक साचेबद्ध पद्धतीने अभ्यास करत असतो, मार्गदर्शक असेल तर त्यात सुधारणा होऊ शकते. ग्रोक स्वतःहून सूचना करत असेल तर नक्कीच अचूकता येऊ शकेल.

ग्रोक स्वतःहून सूचना करत असेल तर नक्कीच अचूकता येऊ शकेल.

ग्रोकचा नवीन अवतार (ग्रोक स्टुडीओ) अवश्य पहा!

युयुत्सु's picture

18 Apr 2025 - 12:26 pm | युयुत्सु

ए०आय० चा बाप पण आता ए०आय० शुद्धीवर आल्याचे सांगत आहे

https://www.youtube.com/watch?v=kC9YpBZcPvs

तसेच हे पण पहावे-
https://youtu.be/eA5Y_TbJwjs?si=C0tJINgSeamkiM-0

अथांग आकाश's picture

21 Apr 2025 - 5:51 pm | अथांग आकाश

ए०आय० चा बाप पण आता ए०आय० शुद्धीवर आल्याचे सांगत आहे

तुम्ही केव्हा शुद्धीवर येणार?