बाजाराचा कल : १४ एप्रिलचा आठवडा

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
12 Apr 2025 - 10:56 am

बाजाराचा कल : १४ एप्रिलचा आठवडा
======================================

मंडळी,

युयुत्सुनेटने परत एकदा अचूक भविष्यवाणी केली.

गॅप डाउनमुळे हिरवी मेणबत्ती तयार झाली असली तरी या आठवड्याचा बंद मागच्या आ्ठवड्याच्या बंदच्या खाली आहे. त्यामुळे एकूण परिणाम घसरण हा आहे.

या आठवड्यात आणखी एक गंमत झाली. टॅरीफ वॉरमुळे बाजारात मोठे चढाव-उतार (व्होलॅटीलिटी) आले. मी युयुत्सूनेट्ची दैनंदिन भाकीते पण तपासत असतो. या आठवड्यातील चढ-उतार युयुत्सुनेट्ला झेपले नाहीत आणि त्याने मान टाकली. इतके दिवस सगळे व्यवस्थित चालू असताना या अचानक उद्भवलेल्या अडचणीने मी पण वैतागलो. आतापर्यंत केलेले कष्ट वाया जाणार अशी भीति वाटत असताना ग्रोकला साकडं घालायचा विचार डोक्यात चमकून गेला.

ग्रोकला मी मग युयुत्सुनेटचे "हृदय" जसेच्या तसे फीड केले. माझी अडचण सांगितली आणि काय करू असे विचारले. मग अहो आश्चर्यं! ग्रोकने मला माझे काय चुकत असेल त्याची थोडी चर्चा करून एकदम नवे करकरीत "हृदय" तयार करून युयुत्सुनेटमध्ये प्रत्यारोपण करण्यासाठी दिले. या नव्या केरास मॉडेलने बाजारातले चढ-उतार पचवून टाकले आणि कालसाठी केलेले भाकीत पण अचूक ठरले.

आकृती १ - निफ्टीचा साप्ताहिक चार्ट

आकृती २ - निफ्टी वर/खाली जायची शक्यता ७३-२७ %

आकृती ३ - सोने वर/खाली जायची शक्यता ११/८९%

आकृती ४ - युयुत्सुनेट्च्या अंदाजानुसार पुढच्या आठवड्यात घसरगुंडी चालू राहील...

मागील आठवड्याचे भाकीत - https://www.misalpav.com/node/52830

वैधानिक इशारा -युयुत्सुनेटच्या भाकीतावर डोळे मिटून विश्वास टाकणे धोक्याचे आहे. मार्केट्मधील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवरच करावेत.

टीप - यावेळचे भाकीत चूकू शकते कारण - अ. मॉडेल पूर्णपणे नवे आहे. ब. या आठवड्यात दोन सुट्ट्या आहेत. क. क्लेमास्पेस डायाग्राम मध्ये वर जाण्याची शक्यता दाखवलीआहे, ती पुरेशी आहे.

समाजविचार

प्रतिक्रिया

अर्जुन's picture

12 Apr 2025 - 12:54 pm | अर्जुन

क्लेमास्पेस डायग्राम आणि युयुत्सुनेटच्या भाकीतामधे तफावत आल्यास कोणता निर्देशक जास्त भरवशाचा आहे. क्लेमास्पेस डायग्राममधे लाल बिंदु मध्य रेषेच्या वर असेल तर, येणारया आठवड्यात बाजार वर जाणार, या व्यतिरिक्त अजून काही माहिती मिळते का ? बाजार किती वर जाणार याचा काही अंदाज बांधू शकतो का ? क्लेमास्पेस डायग्राम कोणत्या टाईम फ्रेमवर जास्त उपयोगी आहे?

आंद्रे वडापाव's picture

12 Apr 2025 - 1:11 pm | आंद्रे वडापाव

आकृती २ - निफ्टी वर/खाली जायची शक्यता ७३-२७ %

.

आकृती ४ - युयुत्सुनेट्च्या अंदाजानुसार पुढच्या आठवड्यात घसरगुंडी चालू राहील...

यातिल कशाचि शक्यता जास्त ?

प्रसाद गोडबोले's picture

12 Apr 2025 - 1:55 pm | प्रसाद गोडबोले

एक मजेशीर निरीक्षण

ह्या लेखनात केवळ फायनान्स , मार्केट ह्या विषयीचं लिहिलं आहे.
इथे मोदी, भाजप, संघ, भक्त , आणि गोबर असला काहीही उल्लेख नाममात्र नाही !

एक अनुमान
ह्या वरील निरीक्षणावरून एक अनुमान काढता येते की तुमच्या मेंदूतील फायनान्स चा विचार करणारा काही भाग सोडला तर अन्य सर्व भागांवर गोबर पसरलेले आहे. आणि म्हणूनच अन्य कोणत्याही विषयावर काहीही लिहिताना तुम्ही विषयांतर करून गाडी भलतीकडेच भरकटवता.

अवांतर : ह्यावर तुम्ही काय प्रत्युत्तर देता हे पाहणे रोचक आहे, कारण मी फायनान्स हा विषय बदलून तुमच्या लेखनातील pattern recognition हा विषय आणला आहे. ह्यावर प्रतिसात तुम्ही गोबर आणल्यास मजा येईल !!

युयुत्सु's picture

12 Apr 2025 - 3:09 pm | युयुत्सु

अर्जुन आणि आंद्रे वडापाव,

तुम्ही बारकाईने हे सदर वाचता याचा आनंद झाला आणि प्रश्न पण चांगला आणि नेमका विचारला आहे. -

- सध्याच्या परिस्थितीमध्ये क्लेमास्पेस डायाग्रॅम जास्त भरवशाचा. फक्त किंमत (प्राईस) जास्तीत जास्त 'पिळून' जास्तीत जास्त माहिती त्यात मिळवायचा प्रयत्न त्यात केला आहे. पण डावीकडे बघितलेत तर निळीरेघ (सध्याची पातळी) ज्या क्षेत्रात आहे (दोन लाल डॅश्ड लाइन्मधले), ते "अनिश्चित क्षेत्र" आहे. तिथून बाहेर पडल्याशिवाय काही खरे नाही.

"द मार्केट्स आर प्रेडिक्टेबल अ‍ॅट एक्स्ट्रीमिटीज" हे श्री० युयुत्सु यांचे वचन नेहेमी लक्षात ठेवावे. :)

बाजार किती वर जाणार याचा काही अंदाज बांधू शकतो का ?

कोणत्याही टाईमफ्रेम साठी क्लेमास्पेस तयार करता येतो. बाजाराची दिशा हा खरा आह्वानात्मक आणि मूलभूत प्रश्न असल्याने अजून "किती वर जाणार" इ० प्रश्नाची उत्तरे शोधली नाहीयेत. तुम्हाला रिग्रेशन चॅनेल बद्द्ल माहिती असेल तर हे तंत्र वापरून थोडाफार अंदाज बांधू शकता. सपोर्ट आणि रेझिस्टन्स हे तर जुने पारंपरिक तंत्र आहे. र्मी मॉण्टे कार्लो सिम्युलेशन पण यासाठी पूर्वी वापरत असे. पण सध्या मला दिशा ओळखणे हेच आह्वान पुरून उरले आहे.

- युयुत्सुनेटमध्ये एकंदर ७ फिचर्स भाकीत करण्यासाठी प्रेडीक्टर म्हणून सध्या वापरली आहेत. ते अजुन एक दोन आठवड्यांनी स्थिर झाले की ते विचारात घेणे योग्य ठरेल.

@प्रसाद गोडबोले

तुम्हाला मी वर्गाबाहेर उभे राहायची शिक्षा द्यायला हवी आहे का? ;)

आंद्रे वडापाव's picture

12 Apr 2025 - 3:39 pm | आंद्रे वडापाव

आपण बाजाराचे पायाचे ठसे पाहत पाहत, त्याचा रस्ता ट्रॅक करत असताना, रस्त्यात आपणास एखाद दुसरे शेणाचे पो कुठला बैल टाकून गेला असेल, तर आपण त्या पो ला टाळून वळसा घालून.. आपले काम चालू ठेवा ही सुचना...

युयुत्सु's picture

12 Apr 2025 - 4:58 pm | युयुत्सु

हो हो नक्कीच!

मस्त, वाक्य खूप म्हणजे खूपच आवडले आहे. बहुतेक प्रगो यांचे पण हेच सांगणे आहे की जसे स्वतःच्या रस्त्यावर इतरांचा पो आवडत नाही तसे स्वतःपण इतरांच्या रस्त्यावर पो टाकू नाही.

वामन देशमुख's picture

12 Apr 2025 - 5:39 pm | वामन देशमुख

>>> आकृती २ - निफ्टी वर/खाली जायची शक्यता ७३-२७ %

>>> आकृती ४ - युयुत्सुनेट्च्या अंदाजानुसार पुढच्या आठवड्यात घसरगुंडी चालू राहील...

हे परस्पर विरोधी दिसत आहे; स्पष्ट करून सांगाल का?

क्लेमास्पेस डायाग्रॅम, कसा बघायचा याबद्दल अधिक माहिती कशी मिळेल?

युयुत्सु's picture

13 Apr 2025 - 9:45 am | युयुत्सु

क्लेमास्पेस डायाग्रॅम हे मी स्वत: विकसित केलेले तंत्र आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दल कुठेही माहिती सापडणार नाही. या ना त्या कारणाने त्याबद्दल लिहायचे राहून गेले आहे. तुम्हाला "मिन रिव्हर्जन" - किंमती सरासरी कडे खेचल्या जातात - या परिणामाबद्दल जर माहित असेल तर क्लेमास्पेस ही संकल्पना समजायला सोपे जाईल. "मिन रिव्हर्जन" ची माहिती जालावर उपलब्ध आहे.

क्लेमास्पेस डायाग्रॅममध्ये एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या कालावधी (पिरीयड) साठी किंमतीचा अभ्यास केला जातो. क्लेमास्पेस डायाग्रॅममध्ये डावीकडे ढगाप्रमाणे तयार झालेल्या क्षेत्रामध्ये काही डोळे तयार होतात. यात सर्वात जवळच्या डोळ्याकडे किंमत सतत झेपावत असते. तांबड्या रेघा (१ आणि २ सिग्मा - स्टॅण्डर्ड डेव्हीएअन - च्या अंतरावर दोन्ही बाजूला आहेत. तांबडी रेघ ओलांडली की जवळच्या पिवळ्या डोळ्याकडे किंमत झेपावायचा प्रयत्न करते.

डावीकडे जो ग्राफ आहे तो अल्पकालीन भाकीत वर्तवण्यासाठी तसेच, संभाव्यता/शक्यता यांचे गणित करण्यासाठी उपयोगी पडतो. या आलेखावर ज्या तांबड्या रेघा आहेत त्यापण मिन्पासून १ आणि २ सिग्मा अंतरावर काढल्या आहेत. या रेघा ओलांडल्या की मार्केट परत फिरायची शक्यता वाढते.

मला माहितीये ही जरा जास्तच अपेक्षा होतेय, त्यामुळे आधीच क्षमस्व, पण जमले तर तुम्ही एखादा you tube व्हिडीओ बनवून समजावू शकता का?

क्लेमास्पेस डायाग्रॅममध्ये एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या कालावधी (पिरीयड) साठी किंमतीचा अभ्यास केला जातो. क्लेमास्पेस डायाग्रॅममध्ये डावीकडे ढगाप्रमाणे तयार झालेल्या क्षेत्रामध्ये काही डोळे तयार होतात. यात सर्वात जवळच्या डोळ्याकडे किंमत सतत झेपावत असते. तांबड्या रेघा (१ आणि २ सिग्मा - स्टॅण्डर्ड डेव्हीएअन - च्या अंतरावर दोन्ही बाजूला आहेत. तांबडी रेघ ओलांडली की जवळच्या पिवळ्या डोळ्याकडे किंमत झेपावायचा प्रयत्न करते.

म्हणजे हे कळल्यासारखे वाटतेय

टीपीके's picture

13 Apr 2025 - 10:39 am | टीपीके

डावीकडे जो ग्राफ आहे तो अल्पकालीन भाकीत वर्तवण्यासाठी तसेच, संभाव्यता/शक्यता यांचे गणित करण्यासाठी उपयोगी पडतो. या आलेखावर ज्या तांबड्या रेघा आहेत त्यापण मिन्पासून १ आणि २ सिग्मा अंतरावर काढल्या आहेत. या रेघा ओलांडल्या की मार्केट परत फिरायची शक्यता वाढते.

पण इथे अडखळलो, त्यातूनही बोल्ड केलेल्या ओळीचा अर्थ नक्की कसा लावायचा यात गोंधळ झालाय

युयुत्सु's picture

13 Apr 2025 - 11:26 am | युयुत्सु

@ टीपीके

तुमची युट्यूब व्हीडीओची कल्पना चांगली आहे. पण माझ्या पाठदुखीमुळे ब-याचदा उत्साहावर पाणी पडते.

या रेघा ओलांडल्या की मार्केट परत फिरायची शक्यता वाढते.

गोधळ उडणे स्वाभाविक आहे. तुमच्या हे लक्षात आहे का की क्लेमाची किंमत एखाद्या अनियमित लंबकाप्रमाणे खालीवर आंदोलित होत राहते. अनियमित हा शब्द अशासाठी वापरला की बाजार जर मध्येच रेंगाळला तर क्लेमाची किंमत पण रेंगाळते. मोठ्या कालचौकटीवरील (टाईमफ्रेम) आंदोलने जास्त ताकदवान असतात.

ही क्लेमाची किंमत आंदोलित होत असताना मिनपासून जेव्हा लांब जाते तेव्हा +१ किंवा -१ सिग्मा ही रेषा प्रथम ओलांडते. मार्केट्मध्ये जर आणखी जोर असेल तर +२ किंवा -२ सिग्मा या रेषा ओलांडल्या जातात. +२ किंवा -२ सिग्मा या रेषा जर ओलांडल्या गेल्या तर मार्केट हमखास उलटे फिरते.

धन्यवाद. आता निरीक्षण करून समजून घ्यायचा प्रयत्न करीन

युयूत्सु तुमची भाकिते बरोबर येत आहेत त्या बद्दल अभिनंदन. पण हि चित्र वाचायची कशी या बद्दल थोडी माहिती देऊ शकाल का? तसेच टेरीफ सध्या थांबवले आहे, रेपो रेट कमी केला आहे ( आणि आणखी कोणतातरी एक पॅरामीटर जो आता मला आठवत नाहीये) असल्याने बाजार वर नको का जायला? मला तर वाटले होते की शुक्रवारी निफ्टी 500-700 पॉइंट्स नी चढतो काय, पण तसे झाले नाही. का?

टीपीके's picture

12 Apr 2025 - 7:05 pm | टीपीके

शुक्रवारी निफ्टी 500-700 पॉइंट्स नी चढतो का

म्हणजे मला तसे फारसे कळत नाही की लोकं 200 किंवा 500 किंवा 1000 हा आकडा कुठून काढतात, पण एकूण अनेकांनी जोरदार तेजी असा कल सांगितला होता, म्हणून हा प्रश्न

युयुत्सु's picture

13 Apr 2025 - 10:11 am | युयुत्सु

@टीपीके

मार्केट्मध्ये अमुक एक गोष्ट का झाली किंवा नाही याची कारणे शोधण्यात फारसा अर्थ नसतो. "मार्केट इज सुप्रीम" हे सत्य स्वीकारून आपल्याला सोईचा एक कोपरा शोधून जेव्हढे जमेल तेव्हढे अर्थार्जन आपण करावे.

@वामन देशमुख

क्लेमास्पेस आणि युयुत्सुनेट ही दोन वेगवेगळी मॉडेल्स आहेत, ती मार्केटकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून बघतात. त्यामुळे दोन मॉडेलचे अंदाज निराळे असू शकतात. यात विशेष काही नाही. हे सर्वत्र दिसते. फार काय दोन मॉडेल जर एकच सांगत असतील तर ती गोष्ट लक्ष देण्ञासारखी असते.

उद्या सर्वांना सविस्तर उत्तर देईन आत्ता जरा बाहेर बिझी आहे

या आठवड्यात आणखी एक गंमत झाली. टॅरीफ वॉरमुळे बाजारात मोठे चढाव-उतार (व्होलॅटीलिटी) आले. मी युयुत्सूनेट्ची दैनंदिन भाकीते पण तपासत असतो. या आठवड्यातील चढ-उतार युयुत्सुनेट्ला झेपले नाहीत आणि त्याने मान टाकली
उद्या सकाळी कोणते निर्णय घेणार हे टृम्प तात्यांनाही माहीत नसते, तर ते युयुत्सुनेट कसे कळणार? कोणतेही युयुत्सुनेट मॉडेल बाजारातले सर्वचढ ऊतारांचे भाकीताचे अचुक निदान करेल ही अपेक्षाच चूकीची आहे, आणि तुम्ही प्रत्येक वेळेला जर मॉडेलमधे बदल करत राहीलात तर ते फेल होण्याची शक्यता जास्त आहे. जर तुमचे युयुत्सुनेट ७०% अचूक निदान देत असेल, तरी तुम्ही ते एक चांगले सॉफ्ट्वेअर आहे, असे म्हणू शकता.

युयुत्सु's picture

13 Apr 2025 - 12:42 pm | युयुत्सु

अर्जुनराव,

जुने मॉडेल पूर्णपणे टाकून दिले नाहीये. ग्रोकने केलेल्या सूचना पटल्या म्हणून नवे मॉडेल स्वीकारले. नव्या मॉडेलने अपेक्षित परफॉर्मन्स दिला नाही तर जुन्याला परत आणता येईलच.

युयुत्सु's picture

13 Apr 2025 - 12:04 pm | युयुत्सु

कोणतेही युयुत्सुनेट मॉडेल बाजारातले सर्वचढ ऊतारांचे भाकीताचे अचुक निदान करेल ही अपेक्षाच चूकीची आहे

पूर्णपणे सहमत आहे. प्रयोग चालू असल्यामुळे जास्तीत जास्त रोबस्ट/स्टेबल मॉडेल तयार करायचा प्रयत्न करताना असे प्रयोग करावे लागतात.

ए० आय० मुळे डीएल मॉडेल्स तयार करणे खुपच सोपे झाले आहे. मॉडेल ट्यून करताना मात्र घाम फुटू शकतो. प्रथम आपली डेडा फाईल ए० ए०आय० साठी उपलोड करावी. मग पुढील प्रमाणे प्रॉम्प्ट द्यावा-

Construct a hybrid DL model using Keras R-
- co and chg are dependent variable
- convert chg to numeric, remove '%' sign
- look back period is 5
-Date, Symbol are to be removed
- all other columns other than co and chg are independent variables.
- Give predictions for the next 10 days

Pls give full code in R

मला ग्रोकचा आणि गुगलचा अनुभव चांगला आला.