महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीवर हा माझा शेवटचा लेख. विविध पक्षांची आजपर्यंतची कामगिरी, २०२४ लोकसभा निवडणुकीतील विविध पक्षांची कामगिरी, महाराष्ट्रातील मतदारांचा नेहमी दिसणारा कल यावर आधारीत काही आकडेमोड करून कोणत्या पक्षाला किती मते मिळण्याची शक्यता आहे व त्यानुसार किती जागा जिंकण्याची शक्यता आहे याचे अंदाज लिहीत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील मागील काही वर्षात निर्माण झालेली खिचडी व गुंतागुंत पाहता जागांचा अंदाज व्यक्त करणे खूप धाडसाचे आहे. मतांच्या टक्केवारीचे अंदाज बर्याच अंशी बरोबर येऊ शकतील, परंतु जागांचा अंदाज बर्याच प्रमाणात चुकू शकतो. तसे झाल्यास माझ्या प्रारूपाकडे नव्याने पहावे लागेल.
मत टक्केवारी
लोकसभा निवडणुकीत ६१.२९% मतदारांनी मत दिले होते. या विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी यापेक्षा कमी असेल असे वाटते. कदाचित ६०% किंवा ५८% पेक्षाही कमी असल्यास नवल वाटणार नाही.
एप्रिल-मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मतांची टक्केवारी खालीलप्रमाणे होती.
महाराष्ट्रातील एकूण दिलेली मते - ५ कोटी ७० लाख (मत टक्केवारी ६१.२९%)
काँग्रेस - १७.९२% (लढविलेल्या जागा - १७ + १ = १८ सांगली धरून)
उबाठा - १६.५२% (लढविलेल्या जागा - २१)
शप गट - १०,२७% (लढविलेल्या जागा - १०)
भाजप - २६.१८% (लढविलेल्या जागा - २८)
शिंदे गट - १२.९५% (लढविलेल्या जागा - १५)
अप गट - ४.४२% (लढविलेल्या जागा - ४ + १ = ५ जानकर धरून)
मविआ आघाडीत सर्वाधिक जागा उबाठाने लढविल्या होत्या, परंतु प्रति मतदारसंघात सर्वात कमी मते उबाठाला मिळाली आहेत. दुसरीकडे महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजपने लढविल्या, परंतु प्रति मतदारसंघात सर्वात कमी मते शिंदे गटाला मिळाली आहेत.
लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकार व पंतप्रधान निवडायचा असल्याने महाराष्ट्रात स्थानिक भाजप नेतृत्वाविरूद्ध काहिशी नाराजी असूनही महायुती व विशेषतः भाजपला काही प्रमाणात लाभ झाला होता. परंतु विधानसभा निवडणुकीत वेगळे मुद्दे असतात. विधानसभा निवडणुकीत राज्य सरकार निवडायचे आहे. त्यामुळे मोदींच्या चेहर्याचा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळणार नाही. महाराष्ट्रातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर साधारणपणे दोन्ही निवडणुका एक वर्षापेक्षा कमी कालावधीत पुढेमागे होतात. आधी लोकसभा निवडणूक होते व नंतर काही महिन्यातच विधानसभा निवडणूक होते (मार्च १९७७ मध्ये लोकसभा निवडणूक व जवळपास १ वर्षानंतर १९७८ मध्ये विधानसभा निवडणू़क झाली होती. मार्च १९९५ मध्ये विधानसभा निवडणूक व मे १९९६ मध्ये लोकसभा निवडणूक झाली होती. सप्टेंबर १९९९ मध्ये दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या होत्या.). २००४ पासून मे महिन्यात लोकसभा निवडणूक व ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणूक होते.
१९८०: लोकसभा - विरोधी पक्ष ९ आणि काँग्रेस ३९, विधानसभा - विरोधी पक्ष ८०, कॉंग्रेस १९२
१९८५: लोकसभा - विरोधी पक्ष ५ आणि काँग्रेस ४३, विधानसभा - विरोधी पक्ष १०४, कॉंग्रेस १६२
१९९०: लोकसभा - महायुती १४, जनता दल ५ आणि काँग्रेस २८, विधानसभा - महायुती ९४, जनता दल २५, कॉंग्रेस १४१
१९९५: विधानसभा - महायुती १३८ आणि काँग्रेस ८०, १९९६ लोकसभा - महायुती ३३, कॉंग्रेस १५
१९९९: लोकसभा - महायुती २७ आणि काँग्रेस २१, विधानसभा - महायुती १२५, कॉंग्रेस १३३
२००४: लोकसभा - महायुती २५ आणि काँग्रेस आघाडी २३, विधानसभा - महायुती ११६, कॉंग्रेस आघाडी १४०
२००९: लोकसभा - महायुती २० आणि काँग्रेस आघाडी २५, विधानसभा - महायुती ९०, कॉंग्रेस आघाडी १४४
२०१४: लोकसभा - महायुती ४२ आणि काँग्रेस आघाडी ६, विधानसभा - महायुती १८६, कॉंग्रेस आघाडी ८३
२०१९: लोकसभा - महायुती ४१ आणि काँग्रेस आघाडी ५, विधानसभा - महायुती १६१, कॉंग्रेस आघाडी ९८
साधारणपणे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जो कल दिसतो, तोच कल बराचसा विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्तीत होतो. लोकसभा निवडणुकीत मोठ्या गटाला जितक्या जागा मिळतात, त्या विधानसभा निवडणुकीत काही प्रमाणात कमी होतात परंतु मतदारांचा कल बर्याच प्रमाणात तसाच राहतो.
_________________________________________________________________________
या पार्श्वभूमीवर २०२४ विधानसभा निवडणुकीत साधारणपणे खालीलप्रमाणे परिस्थिती असू शकते.
काँग्रेस
काँग्रेस १०१ जागा लढवित आहे. काँग्रेस अंदाजे १८% मते व ६०-७० जागा मिळवेल.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ८७ जागा लढवून अंदाजे १५% मते व ५०-६० जागा मिळवेल.
ऊबाठा गट
शिवसेना १९८९ पासून (२०१४ चा अपवाद वगळता) विधानसभा निवडणूक युतीत लढत आहे. परंतु शिवसेनने जिंकलेल्या एकूण जागांचे लढवित असलेल्या एकूण जागांशी प्रमाण (म्हणजे स्ट्राईक रेट) खूप कमी आहे.
१९९० - लढविलेल्या एकूण जागा १८३, जिंकलेल्या जागा ५२, विजयाचे प्रमाण = २८.४१
१९९५ - लढविलेल्या एकूण जागा १७१, जिंकलेल्या जागा ७३, विजयाचे प्रमाण = ४२.६९
१९९९ - लढविलेल्या एकूण जागा १७१, जिंकलेल्या जागा ६९, विजयाचे प्रमाण = ४०.३५
२००४ - लढविलेल्या एकूण जागा १६९, जिंकलेल्या जागा ६२, विजयाचे प्रमाण = ३६.६८
२००९ - लढविलेल्या एकूण जागा १६९, जिंकलेल्या जागा ५२, विजयाचे प्रमाण = २६.०३
२०१४ - लढविलेल्या एकूण जागा २८६, जिंकलेल्या जागा ६३, विजयाचे प्रमाण = २२.०२
२०१९ - लढविलेल्या एकूण जागा १२४, जिंकलेल्या जागा ५६, विजयाचे प्रमाण = ४५.१६
शिवसेनेचा सर्वाधिक स्ट्राईक रेट २०१९ मघ्ये ४५.१६ होता जेव्हा शिवसेना युतीत निवडणू़क लढली होती व सर्वात कमी स्ट्राईक रेट २०१४ मध्ये २२.०२ होता जेव्हा शिवसेना स्वबळावर लढली होती.
आता शिवसेनेचे तुकडे पडले आहेत. २००९ मध्ये राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचा स्ट्राईक रेट फक्त २६.०३ होता. उबाठा सेना पुन्हा एकदा युतीत आहे व फक्त ९६ जागांवर लढत आहे. अश्या परिस्थितीत उबाठा सेनेला ४० पेक्षा जास्त जागा मिळणे अवघड वाटते. प्रत्यक्षात शिंदे सेनाला मूळ सेनेची जाणार असलेली मते लक्षात घेतली तर उबाठा सेना अंदाजे १२% मते घेऊन २०-३० जागा मिळवेल.
म्हणजे मविआ एकत्रित ४५% मते व १३०--१६० जागा मिळवेल.
____________________________________________________________________
भाजप
भाजपने २०१४ मध्ये स्वबळावर २५२ जागा लढवून २८.५०% मते मिळवून १२२ जागा जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये शिवसेनेशी युती करून भाजपने १६४ ( भाजप १४६ + मित्रपक्ष १८ कमळ चिन्हावर) जागा लढवून २५.७५% मते मिळवून १०३ जागा जिंकल्या आणि सत्ता गमावली. २०२४ मध्ये भाजप १४८ जागांवर लढत आहे. आता मोदींचा चेहरा नाही. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही हिंदुत्व हा मुद्दा अजिबात नाही (लव जिहाद, बटेंगे तो कटंगे, बांगलादेशातील हिंदूंना मारपीट, अयोध्येतील श्रीराम मंदीर अश्या मुद्द्यांचा मतदारांवर शून्य प्रभाव पडेल). इतर सर्व पक्षांप्रमाणे भाजपचा प्रचारही दिशाहीन व निष्प्रभ आहे.
भाजपला साधारणपणे २२-२३% मते मिळतील व ५०--६० च्या आसपास जागा मिळतील.
शिंदे गट
शिंदे गट ८५ जागा लढवित आहे. शिंदेंची प्रतिमा बरीच उजळली आहे. परंतु शिंदेंनी सुद्धा बरेच चिकीचे उमेदवार दिले आहेत. नेत्याची मान्यता पक्षाच्या मान्यतेपेक्षा कायमच जास्त असते. मोदींची लोकप्रियता बहुतेक वेळा ६०% किंवा अधिक असते, परंतु भाजप किंवा रालोआला ४४% हून जास्त मते मिळाली नाही.
शिंदे गटाला साधारणपणे १२% मते व २०-२५ जागा मिळतील.
अजित पवार गट
अप गट ५१ जागा लढवून साधारणपणे ७% मते व १०-१५ जागा मिळवेल.
म्हणजे महायुती एकत्रित ४१-४२% मते व ८०-१०० जागा मिळवेल.
===================================================
बहुतेक सर्व वृत्तवाहिन्यांनी मतदानपूर्व सर्वेक्षण करणे टाळले आहे कारण सद्यस्थितीत प्रचंड खिचडी झालेल्या राजकीय वातावरणात कोण किती जागा जिंकेल याचा अंदाज काढणे खूपच अवघड आहे आणि दुसरं कारण म्हणजे हरयाना निवडणुकीचे सर्व वाहिन्यांचे सर्व अंदाज पूर्ण चुकले होते. तरीसुद्धा अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. मी अंदाज व्यक्त केलेली मतांची टक्केवारी बरोबर असण्याची बरीच शक्यता वाटतेय, पण जागांचा अंदाज बर्यापैकी चुकू शकतो.
____________________________________________________________________________________
मनसे १५० जागा लढवित आहे. मनसे २-३% टक्के मते व ३-४ जागा जिंकू शकते.
________________________________________________________________
इतर काही अंदाज -
- मनसे, शेकाप, सप, एमआयएम, वंचित, बच्चू कडूचा पक्ष, जनसुराज्य असे चिल्लर पक्ष एकत्रित १५-२० जागा व अपक्ष १५-२० जागा जिंकतील.
- सर्व पक्षांमधील सर्वात मोठ्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल.
- कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष असण्याची शक्यता आहे. त्याखालोखाल भाजप किंवा शप गट, त्याखालोखाल शिंदे गट, नंतर उबाठा आणि शेवटी सहाव्या क्रमांकावर अप गट असेल.
- कोणत्याही एका पक्षाला तीन अंकी जागा मिळणार नाहीत. कोणत्याही २ पक्षांना एकत्रित १४५ जागा मिळणार नाहीत. सरकार बनविण्यासाठी ३ किंवा अधिक पक्षांना एकत्र यावे लागेल, यातून एखादी नवीन खिचडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
- मविआ सत्तेवर आल्यास वर्षा गायकवाड किंवा प्रणिती शिंदे मुख्यमंत्री होण्याची शक्यता किंवा कदाचित यशोमती ठाकूर असतील.
- महायुती सत्तेवर आल्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार
- उद्धव ठाकरे व फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही
- महायुती सत्तेत न आल्यास महाराष्ट्र भाजपत नेतृत्वबदल होण्याची दाट शक्यता. विधानसभा निवडणुकीत पराभव होऊन सत्तेत न येणे हे महाराष्ट्र भाजपसाठी व महाराष्ट्रासाठी इष्टापत्ती ठरेल.
- मविआ सत्तेवर येण्याची शक्यता
- कोणत्याही आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास निकालापश्चात काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिंदे गट ही नवीन आघाडी निर्माण होण्याची शक्यता. अश्या परिस्थितीत उबाठा पुन्हा एकदा भाजपशी जुळवून घेण्याची शक्यता.
- विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार काकांकडे परत जाण्याची शक्यता
- जे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार राखीव जागा वाढविते, ते सरकार नंतर लगेचच्या निवडणुकीत सत्तेत परतत नाही हे १९९१ पासून अनेकदा दिसले आहे.
* १९९० - वि. प्र. सिंगांनी मंडल आयोगाच्या अहवालानुसार २७% राखीव जागा इतर मागासवर्गीयांना दिल्या पण १९९१ लोकसभा निवडणूक हरले.
* १९९३ - जयललिताने तामिळ्लनाडूत राखीव जागांचे प्रमाण ६९% पर्यंत वाढविले, पण १९९६ विधानसभा निवडणूक हरली.
* १९९३ - शरद पवारांनी अनेक नवीण जातींचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश केला, पण १९९५ विधानसभा निवडणूक हरले.
* २००३ - राजस्थान मुख्यमंत्री गेहलोतांनी चक्क ब्राह्मणांना राखीव जागा दिल्या, पण २००३ विधानसभा निवडणूक हरले.
* २००८ - राजस्थान मुख्यमंत्री वसुंधरां राजेंनी गुज्जरांना राखीव जागा दिल्या, पण २००८ विधानसभा निवडणूक हरल्या.
* २०१३ - राजस्थान मुख्यमंत्री गेहलोतांनी गुज्जरांना राखीव जागा दिल्या, पण २०१३ विधानसभा निवडणूक हरले.
*२०१३ - मनमोहन सिंगांनी जाटांचा समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये केला, पण २०१४ लोकसभा निवडणूक हरले.
*२०१४ - पृथ्वीराज चव्हाणांनी मराठ्यांना १६% व मुस्लिमांना ५% राखीव जागा दिल्या, पण २०१४ विधानसभा निवडणूक हरले.
*२०१९ -- फडणवीसांनी मराठ्यांना १६% राखीव जागा दिल्या, पण २०१९ विधानसभा निवडणूकीत सत्तेत परतले नाहीत.
आता २०२४ मध्ये शिंदेंनी मराठ्यांना १०% राखीव जागा दिल्या आहेत. वरील कलानुसार विधानसभा निवडणूकीनंतर ते सत्तेत परततील का हे २३ नोव्हेंबरला समजेलच.
- पुण्यातील सर्व ८ मतदारसंघ भाजपने स्वबळावर २०१४ विधानसभा निवडणुकीत जिंकले होते. २०१९ मध्ये शिवसेनेबरोबर युती असूनही यतील हडपसर व वडगाव शेरी हे मतदारसंघ भाजप हरला होता. आता हे २ मतदारसंघ भाजपने अजित पवार गटाला दिले आहेत. उर्वरीत सर्व ६ मतदारसंघांपैकी पर्वती, कसबा, खडकवासला, कँटोंमेंट व शिवाजीनगर मध्ये खूओ चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. कोथरूडही धोक्यात होता. परण्तु चंपाने धूर्तपणे कोथरूडमधील प्रतिस्पर्धी मेधा कुलकर्णी व मुरलीधर मोहोळ यांना वाटेतून दूर केले व बंडखोर अमोल बालवडकरांना बसविण्यात आले. त्यात भर म्हणून तिरंगी लढत निर्माण झाली (चंपा, उबाठाचे मोकाटे व मनसेचे किशोर शिंदे) ज्याचा लाभ भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत बापटांना कोथरूडमध्ये १ लाख मतांची आघाडी होती. परंतु विधानसभा निवडणूकीत कोंग्रेस, राष्ट्रवादी व मनसेचे संयुक्त उमेदवार किशोर शिंदे यांनी चांगली लढत देऊन ८०,००० मते मिळविल्याने चंपा फक्त २५,००० मतांनी जिंकले. पण आता ३ उमेदवार असल्याने भाजपला काळजी नाही. २०१४ मध्ये ८ पैकी ८ व २०१९ मध्ये ८ पैकी ६ जागा भाजपने जिंकल्या होत्या. आता भाजप ६ व अप गट २ जागा लढवित आहे. २०२४ मध्ये भाजप व अप गट एकत्रित ६ पेक्षा कमी जागा जिंकेल असा अंदाज आहे.
__________________________________________________________
इच्छा यादी
खालील निकाल लागावे अशी मनोमन इच्छा आहे. यातील किती इच्छा पूर्ण होतील ते २३ नोव्हेंबरला समजेलच.
- कोणत्याही आघाडीला बहुमत मिळू नये व सरकार बनविता येऊ नये.
- महाराष्ट्रात पुढील १० वर्षे राष्ट्रपती राजवट असावी.
- भाजप व उबाठा गटाला शून्य जागा मिळाव्या.
- कोणीही ठाकरे, राणे व बारामतीकर विधानसभेत नसावा.
- आव्हाड, नबाब मलिक पिता-पुत्री, पटोले, भास्कर जाधव, सर्व मुस्लिम उमेदवार, कडू, संजय राठोड, भ्रष्टाचाराचे आरोप झालेले सर्वजण इ. पराभूत व्हावे.
प्रतिक्रिया
19 Nov 2024 - 9:13 am | अमरेंद्र बाहुबली
मलाही माहीत नाही. पण मोदींना ते नक्की माहीत असेल. उगीच का तिसऱ्यांदा पंतप्रधान बनताहेत.
ह्या अंधभक्ती म्हणतात.19 Nov 2024 - 8:45 am | चंद्रसूर्यकुमार
बरं तुम्ही स्वतःला भाजपपेक्षा अधिक हिंदुत्ववादी मानता ना? मग तुम्ही किती वेळा या सुधारणा करा अशी मागणी गेल्या दहा वर्षांत केली? तुम्ही खरोखरचे हिंदुत्ववादी असाल तर समजा भाजपला दहा वर्षांनंतर का होईना अक्कल आली असेल तर मग त्याचे स्वागत करायला नको का? आजही तुम्ही त्या सुधारणांचे स्वागत करत आहात का? खुल्या दिलाने पाठिंब देत आहात का? नाही ना?
19 Nov 2024 - 9:18 am | अमरेंद्र बाहुबली
तुम्ही किती वेळा या सुधारणा करा अशी मागणी गेल्या दहा वर्षांत केली?
२०१४ ला मी भाजपला मत दिले होते. तरीही पुन्हा मागणी करायची म्हणजे?भाजपला दहा वर्षांनंतर का होईना अक्कल आली असेल तर मग त्याचे स्वागत करायला नको का?
भाजपला अक्कल जाहीर झालीय हा गैरसमज आहे. निवडणूक जाहीर झाल्यामुळे भाजप वक्फ चा स्टंट खेळतय, निवडणूक झाली की पुढच्या पंचवार्षिकलाच वक्फ आठवेल.आजही तुम्ही त्या सुधारणांचे स्वागत करत आहात का? खुल्या दिलाने पाठिंब देत आहात का? नाही ना?
वक्फ सुधारणेला माझा पाठिंबा कायम राहील. पण भाजपच्या तालावर नाचून नी भाजपच्या स्टंट ला फसून मी भाजपला मत देणार नाही.24 Nov 2024 - 10:06 pm | शाम भागवत
मला हे मनापासून आवडलेले आहे.
🙏
19 Nov 2024 - 8:47 am | चंद्रसूर्यकुमार
वक्फ बोर्ड मशीदींची देखभाल वगैरे पण करते. त्यासाठी हे १० कोटी रूपये दिले आहेत. एवढे समजायला हवे. समजत नसेल तर सोडून द्या.
19 Nov 2024 - 9:28 am | अमरेंद्र बाहुबली
अच्छा. म्हणजे एका बाजूला वक्फ हिंदूंच्या जमिनींवर कब्जा करते म्हणून प्रचार करायचा नी दुसऱ्या बाजूला मशिदींच्या देखभालीसाठी १० कोटी रुपये द्यायचे. भाजप सारखा दुतोंडी साप दुसरा नसावा.
19 Nov 2024 - 11:47 am | सुबोध खरे
समजत नसेल तर सोडून द्या.
खांद्याखाली बळकट असणाऱ्या माणसांशी कुठे चर्चा करताय?
19 Nov 2024 - 11:54 am | अमरेंद्र बाहुबली
फक्त ५६ इंची बळकट ढेरीवाल्याचीच वाहवा करायची का डॉ साहेब??
19 Nov 2024 - 2:35 am | रामचंद्र
<लोकसभेपेक्षा मतदान वाढल्यामुळे लेखातील सगळे अंदाज साफ चुकणार आहेत. झारखंड याची साक्ष देत आहे.>
भागवतांचा हा मुद्दा बहुधा कोणीच विचारात घेतलेला दिसत नाही.
19 Nov 2024 - 2:36 pm | श्रीगुरुजी
मतांची टक्केवारी आणि निवडणूक निकालाचा संबंध जोडता नाही.
मतांची टक्केवारी वाढली म्हणून सत्ताधारी पक्ष जिंकेलच किंवा विरोधी पक्ष हरेलच असे निर्णायकरित्या सिद्ध होत नाही. तसेच मतांची टक्केवारी घटली म्हणून सत्ताधारी पक्ष हरेलच किंवा विरोधी पक्ष जिंकेलच असेही निर्णायकरित्या सिद्ध होत नाही.
19 Nov 2024 - 2:39 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
19 Nov 2024 - 3:38 pm | शाम भागवत
अरेच्या.
आता खरडपट्यावर लिहिलेलं इथेही आणायला लागणार. खरतर ते मी मायबोलीवर लिहिण्यासाठी टंकले होते.
तिथूनच कॉपीपेस्ट करतो.
19 Nov 2024 - 3:47 pm | शाम भागवत
माझे सगळ्यांत मोठे गृहितक हे मतदान वाढेल हे आहे. तसेच ते भाजपाला लाभदायक आहे असेही मला वाटते.
मतदान टक्केवारी वाढण्याची कारणे खालील असावीत असे वाटते आहे.
१. मोदी शहा आपल्याला गृहीत धरायला लागले आहेत अशी समजून भाजपाला मत देणाऱ्यांची व्हायला लागली होती. त्यांसाठी एक हलकासा धक्का मोदी शहांना बसावा अशी एक सुप्त इच्छा जाणवत होती. पण मोदींचे बहुमत जावं एवढा काही राग नव्हता. त्यामुळे भाजपा २४० पर्यंत आल्यावर त्या लोकांच्या लक्षात आलं की जरा जास्तच जोरात धक्का मोदी शहांना मारलाय. ती लोकं परत येतील.
२. ४००+ पर्यंत आरामात आपण जातोय या नादात काही लोकं फिरकलीच नाहीत. ४००+ नाऱ्यामुळे गाफीलपणा वाढला. पूर्वी शिवाजी महाराज शत्रूगोटात गाफीलपणा यावा यासाठी शरणागतीची हूल उठवत असत. इथे तर आपलीच लोकं गाफील राहण्यासाठी प्रयत्न केला गेलाय. ती चूक दुरूस्त होताना दिसते आहे.
३. यावेळेस आरएसएस सक्रीय झालीय असे वाटतंय. लोकसभेत जरा थंडपणा जाणवला होता. नेहमीची उत्साही मंडळी गायब झाल्याचे लक्षात आले होते. ती परत दिसायला लागली आहेत.
४. बांगला देश फॅक्टर खूप प्रभावी ठरेल असे वाटतंय. सैन्य व रेल्वेच्या खालोखाल वक्फ बोर्डाकडे जमीन आहे हे बऱ्याच जणांना प्रथमच कळतंय असं वाटतंय. वक्फ बोर्डावर सरकारचे काहीच नियंत्रण नाही याउलट हिंदूंच्या मंदिरांवर सरकारचे संपूर्ण नियंत्रण हा आपपर भाव प्रथमच हिंदू धार्मिक लोकांच्या लक्षात येतोय. त्यामुळे किर्तनकार, प्रवचनकार, वारकरी आपआपसात काही बोलत असतील तर तो अंडर करंट खूप मोठा असू शकतो.
५. नेमानी सारख्या लोकांनी आपल्या मागण्या ऊघडरित्या मांडायला सुरवात केल्याने मविआची पंचाईत होतीय तर लोकांमधे धृविकरण होतंय. बंद दाराआड करायच्या गोष्टी हा माणूस सर्व दारं खिडक्या सताड उघडून का करतोय हे उबाठामधल्या कित्येकांना कळेनासं झालं असेल. 😁
६. भाजपाच्या धोरणांना आंतरराष्ट्रीय परिस्थिती खूप अनुकूल आहे. आहेरे वर्गातले, सुशिक्षीत, परदेशात राहणारे असे बरेच हिंदू आहेत की ते भाजपाच्या मुस्लीम धोरणांबाबत संपूर्णपणे तटस्थ आहेत. मुस्लीमांनी देवळे फोडली. लोकं मारली हे त्यांना माहीत आहे. पण त्याचे त्यांना सोयरसुतक फारसे नाही. तो इतिहास झाला. तो आता उगाळून आता काय फायदा हा त्यामागे व्यवहार्य विचार असतो. पण मुस्लीम राष्ट्रांत मंदिरे उभारायला मुस्लीमच मदत करताहेत हे पाहिल्यावर तेही प्रथमच विचार करायला लागले आहेत. स्पेन, इंग्लंड, जर्मनी मधे मुस्लीमांचे अतिरेकी वागणे व त्यावर त्या देशांनी केलेली कार्यवाही यामुळे यालोकांना प्रथमच असे वाटायला लागले आहे की भाजपा जे काही मुद्दे मांडतो आहे त्यात काहीतरी तथ्य असावे. बांगलादेशातील घटनांमुळे या सगळ्यावर फोकस पडून जणूकाही त्याकडे बहिर्गोल भिंगातून तपासणी सुरू झाली आहे.
७. कॅनडा प्रकरणातूनही भारताचे हित व अहीत या मुद्यांतून परकीय भारतीय विचार करायला लागले की काय असे वाटायला लागले आहे.
७. यातूनच ट्रंप हा भारताचा मित्र व ओबामा वगैरे भारताचे हितशत्रू असा काहीसा प्रकार अमेरिकेत प्रथमच होऊन डेमोक्रोटीक पक्षाकडील हिंदू मते रिपब्लिकनांकडे वळली असावीत असा संशय यायला लागला आहे. ट्रंप यांचा विजय ऐतिहासीकच मानावा लागेल. दोन्ही सभागृहे व इलोक्टरल मतांनामधील त्यांचा विजय हा काही निसटता विजय म्हणता येत नाहीये . त्याला निर्विवाद विजयच म्हणायला लागेल. या सर्व घडामोडींचे पडसाद त्यांच्या भारतातील नातेवाईक व परिचीतांमधे उमटणे साहजिक आहे. त्यामुळे परदेशीय भारतीयांचे भारतातील नातेवाईक व तत्सम श्रेणीतील आहेरे वर्गातली लोकं प्रथमच भाजपाचा मुस्लीम विरोधाकडे डोळसपणे पहावयास सुरवात करायला लागले असावेत असं वाटू लागलं आहे. याबाबत नारायण मूर्तींचे उदाहरण दिलेले आहेच.
या सगळ्यामुळे हिंदूंचे मतदान वाढेल अशी मी समजूत करून घेतलेली आहे. 😁
त्याच बरोबर यातूनच मी काश्मिर व हरियाना निवडणूकांकडे पाहातो आहे. मला असे वाटते आहे की,
१. हिंदूं हितैषी मतदान वाढण्याचा गेल्या ४० वर्षांचा कल चालूच राहीलेला असून, प्रथमच हिंदूबहुल जम्मूमधून कॉंग्रेस संपूर्णपणे उखडली गेली आहे. पंडितांच्या पलायनाच्यावेळी व त्यानंतरही कॉंग्रेस १०-११ आमदार निवडून आणू शकत असे.
२. हुरियत कॉन्फरन्स किंवा तत्सम उमेदवार खूप मोठ्या प्रमाणावर उभे राहूनही त्यांना काश्मिर खोऱ्याने नाकारलेले आहे. यांच्यापेक्षा नॅशनल कॉन्फरन्स नक्कीच राष्ट्रीय आहे असे माझे मत आहे. त्यांनी नक्कीच काश्मिरसाठी जास्त तुरूंगवास भोगला आहे. हाल सहन केले आहेत. स्वतंत्र उमेदवार जेवढे पाकिस्तान धार्जिणे असतील त्यापेक्षा नॅशनल कॉन्फरन्स नक्कीच कमी पाकिस्तान धार्जिणी असेल. ही गोष्टही भाजपाच्या धोरणाला अनुकूल आहे असे मला वाटते. कारण मुल्ला मौलवी धार्जिण्या मुस्लिमांकडून राष्ट्रीय मुसलमांनाकडे मतदान जाणे ही भारताच्या दृष्टीने खूपच भाग्याची गोष्ट मी समजतो.
३. हरियानामधे कॉंग्रेसची मते २७% वरून ३९% पर्यंत गेली तर भाजपाची ३६% वरून ३९% पर्यंत गेली. धृविकरण झाले लोकसभेचे तंतोतंत प्रतिबिंब विधानसभेत पडले यात वादच नाही. पण वाढलेले मतदान हे सर्वस्वी भाजपाकडेच गेले हे त्यातूनच लक्षात आले. त्यामुळेही माझ्या पहिल्या भागाला पुष्टी मिळाली असेच वाटले.
४. झारखंडातही पहिल्या फेरीचा तोच मतदान वाढीचा कल दिसून येतो आहे.
मोदींच्या बाबतीत काहीही लिहीले की, काही जणांकडून विरोध होतो. त्यामुळे वाचकवर्गातील मोदीविरोधकांना यांत काहीच तथ्य नाही असे वाटते. त्यातून काहीही ते शिकणे शक्यच नसते. त्यामुळे ते आहेत तिथेच राहतात. बऱ्याच जणांची वागणूक शेखर गुप्तांसारखी असते. त्यांना दिसत असूनही पहावयाचे नसते. ते तर मी मांडलेले मुद्दे फारच हिरीरीने खोडून काढतात. माझ्या पोस्टमुळे मोदी विरोधकांचा यत्किंचीतही फायदा होऊ नये याची अत्युच्च दर्जाची काळजी त्यांच्यामुळे घेतली जाते.
याउलट मोदी आवडणारे सगळं वाचतात. त्यांचे मोदीप्रेम वाढते. कुंपणावर बसलेला मोदींकडे सरकायची शक्यता वाढीस लागते. मुख्य म्हणजे ही लोकं माझ्या पोस्टला
अनुमोदन देत नाहीत. यामुळे होत काय की, माझ्या पोस्टचा फायदा युतीला किती झाला हे कधीच कळत नाही. त्यामुळे मोदी विरोधक कायमच निकाल येईपर्यंत जिंकलेल्या अवस्थेत राहतात. 🤣
अरेच्या, मुख्य मुद्दा लिहावयाचा राहूनच गेला.
या पोस्टला मोठ्या प्रमाणावर विरोध करा. 🤣
19 Nov 2024 - 3:54 pm | श्रीगुरुजी
एवढा मोठा प्रतिसाद पाडण्याची आवश्यकता नव्हती. माझा मुद्दा एवढाच आहे की मत टक्केवारी वृद्धी/घट व प्रत्यक्ष निकालाचा निर्णायक संबंध लावता येत नाही.
असो. अजून मेगाबायटी प्रतिसाद येऊ दे. घोडामैदान जवळच आहे.
19 Nov 2024 - 4:27 pm | शाम भागवत
तो मायबोलीवर टाकला होता हो. तिथे मोदींच्या बाजूने बोलायला कोणीच तयार नसतो. त्याला लागलीच ट्रोल करतात. मग तोच कॉपी पेस्ट केला.
शिवाय पैसेही संपत आले होते. गेले ७-८ दिवस खरेदीच चालू आहे. त्यामुळे खरेदी फारशी करायची नव्हती. अगोदर घेतलेले फायदा दाखवायला लागले होते. त्यामुळे फक्त त्याकडे फक्त बघत बसायचे होते.
थोडक्यात भरपूर वेळही होता.😀
काहीतरी तरी लिहा हो. त्याशिवाय मला कसं काय सुचेल? 😀
घोडा आहे का घोडी आहे? कोणि पाहिलंय?
19 Nov 2024 - 5:27 pm | रामचंद्र
मुस्लिम समाज आपली मतांची टक्केवारी वाढवून भाजपविरोधात जास्तीत जास्त मतदान करताना दिसत असेल तर भाजपही हाच मुद्दा पुढे करून आपल्या बाजूने एकगठ्ठा मतदान होण्यासाठी प्रयत्न करणार हे उघड आहे. हाच मुद्दा जोरकसपणे मांडला गेला तर कुंपणावरचे मतदार भाजपकडे वळायला मदत होईल हेही खरे. मात्र संघप्रणीत संघटना कितीही प्रचारात उतरल्या तरी संघविरोधी विचाराचे पण हिंदू मतदार त्यांच्याकडे वळण्याची शक्यता कमी वाटते. इथे अजित पवारांसारख्यांचे समर्थक मात्र आपल्या नेत्याला, पर्यायाने युतीला काहीसे फायदेशीर ठरतील असे वाटते.
19 Nov 2024 - 5:59 pm | शाम भागवत
राजकारण चांगलंच फिरलंय. खर्गेंनी जाहीर केलं की बीजेपी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ साप आहे आणि त्यांना मारून टाकलं पाहिजे.
त्यामुळे भाजपची लोकं व संघाची लोकं घाबरून लपून बसली आहेत. ती निवडणूक संपेपर्यंत बाहेर येण्याची शक्यता वाटत नाहीये. त्याचा मतदानावर प्रचंड परिणाम होणार आहे. त्यामुळे मतदान मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता वाटायला लागली आहे. काश्मीरचे कमी मतदानाचे विक्रम मोडले जाऊ नयेत यासाठी त्यांनी देव पाण्यात घातले आहेत.
🤣
गुरूजी कृहघ्या.
तुमचे विचार बरोबर आले तर जाहीरपणे माझे तर्क चुकले सांगायला नक्की येईन. पण जर माझे तर्क बरोबर आले तर इकडे फिरकणार देखील नाही.
ही माझी शेवटची पोस्ट.
🙏
19 Nov 2024 - 6:03 pm | श्रीगुरुजी
माझा आणि खर्गेंचा शष्प संबंध नाही. मग ओढूनताणून हा संबंध का जोडता?
तुमच्या प्रतिसादातून हे स्पष्ट दिसतंय की माझे मुद्दे आपणास समजले नाही किंवा समजूनही न समजल्यासारखे करताहात.
असो.
19 Nov 2024 - 6:19 pm | शाम भागवत
ही पोस्ट मायबोलीसाठी लिहीली होती हो.
मी आता थांबतोय हे इथेही लिहावयाचे होते.
मग तीच पोस्ट इथेही चिकटवली.
ती तुमच्यासाठी नाहीये.
तुम्हाला मी ओळखत नाही का? तुमचा व खर्गेंचा संबंध जोडायचा विचार माझे स्वप्नांतही येणार नाही. तुमच्या राष्ट्रभक्ती बद्दल माझ्या मनांत तिळमात्र शंका नाही.
वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा व्हावी. समान नागरी कायदा व्हावा. मुस्लीम राष्ट्रीय प्रवाहात यावेत. काश्मीरमधील अलगतावादी जसे बाजूला पडून त्यातल्या त्यात राष्ट्रीय समजता येतील अशी नॅशनल कॉन्फरन्स पुढे आली तसं काहीसं भारतभर व्हावं यासाठी गेले ५-६ दिवस भाग उघड उघड भाग घेतला. त्या अगोदर हे सगळं लिहीलं होत. पण ते खरडफळ्यावर लिहीत होतो.
असो.
19 Nov 2024 - 7:21 pm | अमरेंद्र बाहुबली
५ दिवसापूर्वी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे टिव्ही मुलाखती दरम्यान म्हणाले होते, 'भाजपमध्ये ज्या गोष्टीची चर्चा असते ते शंभर टक्के होतेच असे नाही. राजस्थानमध्ये पाहा, भजनलाल मुख्यमंत्री झाले. मध्य प्रदेशात मोहन यादव मुख्यमंत्री झाले. चर्चा होते ते मुख्यमंत्री होतातच असं नाही.'
आज विनोद तावडे नालासोपाऱ्याच्या विवांता हाॅटेल मध्ये होते. बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर, मुलगा क्षितिज ठाकूर यांनी कार्यकर्त्यांसह विनोद तावडेंना घेरले. त्यांच्या बॅगेतील पैसे, पैसे वाटपाच्या नोंदी असलेली डायरी व इतर साहित्याचे व्हिडिओ माध्यमांनी प्रसिध्द केलेत.
आमदार ठाकूर म्हणालेत, 'भाजपा मधीलच हितचिंतकांनी विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याची माहिती त्यांना दिली. हा प्रकार जागेवर मिटविण्यासाठी तावडेंनी हितेंद्र ठाकूर यांना २५ फोन केले.' तावडेंना सुमारे २ तास विवांता हाॅटेल मधून बाहेर पडता आले नाही. हा सगळा तमाशा गोदी मेडीयाचे चॅनेल चर्वितचर्वण करुन दाखवत आहेत.
दुसरीकडे डहाणू विधानसभा मतदारसंघातील बविआचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी उद्या मतदान असताना आजच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अर्थ स्पष्ट आहे, निवडणूकीच्या आधीच घोडेबाजार झाला आहे. तावडे त्याच कामगिरीवर होते. पण भाजपमधील तावडेंच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रतिक्रियेमुळे तावडेंचा करेक्ट कार्यक्रम झाला.
राष्ट्रीय सरचिटणीस यांचा दौरा लीक करत, मुद्देमालासह पकडून देण्यासाठीच्या प्रकारामागे कोण आहे? हे एव्हाना उभ्या महाराष्ट्राला समजलेले आहे. महाविकास आघाडीला घवघवीत जागा मिळण्यासाठी आजचा प्रकार हा मैलाचा दगड ठरलेला आहे.
- तुषार गायकवाड
#नोंद #महाराष्ट्रविधानसभा२०२४
19 Nov 2024 - 8:07 pm | सुबोध खरे
काही लोक फडणवीसांचा आत्यंतिक द्वेष करतात. याला वैयक्तिक कारणे असू शकतात किंवा ते केवळ ब्राम्हण आहेत हे असू शकते किंवा जास्त महत्त्वाचे कारण म्हणजे आजतागायत फडणवीस हे विरोधकांच्या हातास लागलेले नाहीत.
फडणवीस हि विरोधकांच्या उरात झालेली आणि खोलवर चरत गेलेली जखम काही केल्या भरत नाही
त्यांच्या वर कितीही आरोप झाले तरी त्यांच्याविरुद्ध तसूभर पुरावा सापडलेला नाही. काकांना पुरून उरेल असा हा एकमेव नेता आहे.
गेल्या पाच वर्षातील कारकीर्द पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे काकांनी १०५ आमदारांना घरी बसवले म्हणून भूभू:कार करत असलेले अनेक वाचाळवीर पुढच्या अडीच वर्षात काकांचा पक्ष आणि शिवसेना यांचे पक्ष दुभंगले आणि काका आणि उद्धव ठाकरे घरी बसले याबद्दल एक शब्द बोलत नाहीत.
१०५ आमदारांपैकी एकही पाच वर्षात फुटला नाही आणि दोन विरोधी पक्षांचे चार पक्ष झाले याकडे लोक सोयीस्कर दुर्लक्ष करतात.
अर्थात याचे श्रेय ते फडणवीसांना देण्याचा उदार पणा दाखवणार नाहीत यात मला कोणतीही शंका नाही.
आणि ईडी आणि आयकर खात्याची भीती हे इव्ही एम मशीन सारखे कायम वाजवणारे तुणतुणेच ते पुढे करतील यात शंका नाही.
बाकी सांख्यिकीने सर्व काही गोष्टी सिद्ध करता येतात केवळ एक गोष्ट सोडून ती म्हणजे सत्य.
बाकी येणाऱ्या काही दिवसात सत्य पुढे येईलच.
पण माझा अंदाज असा आहे कि भाजप सोडला तर कोण्ताही पक्ष शंभरी काही गाठणार नाही.
( काकांचे चेले इतका ऊदो उदो करतात पण काकांना आजतागायत काही आमदारांचे शतक गाठता आलेले नाही कि खासदारांची दोन आकडी संख्या काही गाठता आलेली नाही)
गमतीची गोष्ट म्हणजे मोदींना केवळ २४० जागा मिळाल्या म्हणून तिच्या बडवणारे त्यांचे चेले हे विसरतात कि सुनील तटकरे यांची एकमेव जागा (रायगड) काकांना २०२४ मध्ये निवडून आणता आलेली आहे. आणि ती सुद्धा तटकरे यांची वडिलोपार्जित जागा त्यांच्या स्वबळावर आलेली आहे.
19 Nov 2024 - 8:21 pm | सुबोध खरे
अर्रर्रर्र
शेवटच्या वाक्यात घोळ झाला आहे.
राष्ट्रवादीचे दोन पक्ष झाल्यामुळे हा घोळ झाला आहे. काकांचे ८ खासदार निवडून आलेले आहेत ( तरीही दोन आकडी काही आलेले नाहीत)
असो
चुकी बद्दल दिलगिरी आहे
19 Nov 2024 - 8:25 pm | अमरेंद्र बाहुबली
ह्यावर लिहायला भरपूर आहे पण असो. २०१९ ला तुम्ही लोकसभेला फडणवीसांनी २३/२४ खासदार भाजपला निवडून दिले असे म्हणत होतात, पण २०२४ ला पराभव झाल्यावर फडणवीसांमुळे पराभव झाला असे आपण कुठेही लिहिले नाही. ही संघ टेक्निक झाली, विजय झाला तर संघामुळे, पराभव झाला तर संघ नव्हताच असे हात वर करायचे. असे आंधळे एकतर्फी प्रेम असल्यावर लिहायला काही उरतच नाही. :)
20 Nov 2024 - 11:27 am | सुबोध खरे
२०२४ ला पराभव झाल्यावर फडणवीसांमुळे पराभव झाला
कोणाचा पराभव झाला?
केंद्रात श्री मोदींचे सरकार घट्ट आहे आणि महाराष्ट्रात शिंदे सरकार.
दुसऱ्या कोणत्याही पक्षाला १०० चा आकडा गाठता आलेला नाही
कुठे आणि कुणाचा पराभव झाला?
असली भंपक वक्तव्ये करता म्हणूनच तुम्हाला कोणी सिरियसली घेत नाही
20 Nov 2024 - 11:35 am | अमरेंद्र बाहुबली
कुठे आणि कुणाचा पराभव झाला?
लोकसभेला पराभव झाला ना भाजपचा महाराष्ट्रात? फडणवीस बोलले ना? “मला मोकळे करा” :)19 Nov 2024 - 9:55 pm | चंद्रसूर्यकुमार
हिमाचल प्रदेश सरकारने पैसे नाहीत म्हणून दिल्लीतील हिमाचल भवनाच्या वीजेचे बिल भरले नाही म्हणून ते हिमाचल भवनच आता लिलावात निघायची वेळ आली आहे. कोणीही सत्तेत आले तरी महाराष्ट्रात पण असे काही होईल ही भिती वाटते.
अशा फुकटची खिरापत वाटायच्या घोषणा करायला बंदी घालायला हवी. अर्थात तसे होणे नाही. कारण तो कायदा पास कोण करणार? तर तेच राजकारणी- त्यापैकी जे संसदेत गेले असतील ते. सगळ्यांचेच हितसंबंध अशा खिरापती वाटण्यात गुंतलेले आहेत मग त्यावर बंदी घालणार कोण? कोणी १५००, कोणी २१००, कोणी ३०००, कोणी खटाखट ८५०० द्यायची आश्वासने देत आहे. काय चालू आहे?
19 Nov 2024 - 10:14 pm | श्रीगुरुजी
एक चूक लक्षात आलीये. लोकसभा निवडणुकीत प्रमुख पक्ष वगळता इतर फारसे स्थानिक पक्ष निवडणुकीत नव्हते (उदा. मनसे, जनसुराज्य). पण विधानसभा निवडणुकीत अनेक स्थानिक लहान पक्ष रिंगणात आहेत. ते पक्ष, बंडखोर व अपक्ष काही टक्के मते घेतील हे लक्षात आले नाही.
हे पक्ष एकत्रित ७-८% मते घेऊ शकतील. उदाहरणार्थ मनसे जी २-३% मते घेईल त्यातील बहुतांशी शिवसेनेच्या दोन्ही गटातून येतील. इतर पक्षसुद्धा प्रमुख पक्षांची काही मते घेतील. म्हणजे दोन्ही आघाड्यांची अंदाजे ३-४% मते या पक्षांकडे वळतील.
म्हणजे मविआ अंदाजे ४२% मते मिळवेल (कॉंग्रेस अंदाजे १७%, शप गट अंदाजे १४% व उबाठा अंदाजे ११% मते मिळवेल).
दुसरीकडे महायुती अंदाजे ३८-३९% मते मिळवेल (भाजप अंदाजे २१-२२%, शिंदे गट अंदाजे ११%, अप गट अंदाजे ६% मिळवेल).
अर्थात यामुळे जागांच्या अंदाजात बदल होणार नाही.
19 Nov 2024 - 10:27 pm | अमरेंद्र बाहुबली
मनसेचा निवडून येईल असा कुठल्या मतदारसंघात उमेदवार आहे का?
20 Nov 2024 - 2:01 am | नठ्यारा
अमित स्वरराज ठाकरे असू शकतील काय ?
-ना.न.
20 Nov 2024 - 9:52 am | अमरेंद्र बाहुबली
तिथे मूळ शिवसेनेचे सावंतक येतील असे म्हणतात.
20 Nov 2024 - 1:22 pm | गवि
कुठे कुठे मतदानाचे काय चित्र? कितपत गर्दी, रांगा वगैरे?
टीव्हीवर आकडे, टक्के दाखवत आहेत. पण ऑन ग्राउंड आपापल्या एरियात काय दिसते ते वेगळेच असू शकते.
20 Nov 2024 - 11:01 pm | शाम भागवत
मतदानाचे आकडे अजूनही बदलत आहेत. याचा अर्थ सहा वाजता मतदान केंद्रात लाईनमधे माणसे होती व सहानंतरही मतदान चालू होतं.
मतदान चांगलेच वाढले आहे. मविआ १०० गाढू शकणार नाही असं वाटायला लागले आहे.
मला नव्याने आकडेमोड करायला लागणार आहे. अंदाजे आणखीन ४ टक्के मतदान वाढले आहे.
कटेंगें तो बटेंगें यशस्वी झाल्यासारखे वाटतंय.
जर युति स्विप करणार असं दिसलं तर उद्या शेअरबाजार गॅपअप होऊ शकतो का ते बघायचं.
21 Nov 2024 - 12:01 am | श्रीगुरुजी
मतांची अंतिम टक्केवारी ६५.०८% आहे. म्हणजे २०२४ लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सुमारे ३.७९% वाढ झाली आहे. विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी कमी होईल हा माझा अंदाज पूर्ण चुकला.
असो. उद्या भाकड दिवस आहे. ज्याची अत्यंत आतुरतेने प्रतीक्षा होती ती ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका परवा २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होत आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थ येथे आहे. २३ ला मतमोजणी आहे.
21 Nov 2024 - 2:27 am | शाम भागवत
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४
मतदान केंद्र : वधघट टक्केवारी (उतरत्या क्रमानुसार)
अहमदनगर वाढलेले मतदान
Shrirampur : 5.95
Rahuri : 5.78
Ahmednagar City : 5.1
Shrigonda : 4.55
Akole : 3.57
Shirdi : 3.54
Sangamner : 2.58
Shevgaon : 2.03
Karjat jamkhed : 0.86
घटलेले मतदान
Nevasa : -0.51
Parner : -4.17
Kopargaon : -4.91
अकोला वाढलेले मतदान
Murtizapur : 11.72
Balapur : 6.75
Akola West : 6.5
Akola East : 5.56
Akot : 4.02
अमरावती वाढलेले मतदान
Teosa : 8.42
Melghat : 7.14
Amravati : 6.02
Badnera : 5.12
Morshi : 5.02
Achalpur : 3.87
Daryapur : 1.88
Dhamamgaon railway : 0.54
औरंगाबाद वाढलेले मतदान
Vaijapur : 10.03
Gangapur : 8.55
Sillod : 4.77
Paithan : 4.42
Phulambri : 2.11
Aurangabad West : 1.02
घटलेले मतदान
Aurangabad central : -0.35
Aurangabad East : -0.57
Kannad : -2.36
बीड वाढलेले मतदान
Ashti : 6.74
Kaij : 0.11
घटलेले मतदान
Parli : -1.12
Georai : -1.57
Majalgaon : -2.76
Beed : -4.37
भंडारा वाढलेले मतदान
Bhandara : 5
Tumsar : 1.74
Sakoli : -3.74
बुलठाणा वाढलेले मतदान
Mehkar : 9.25
Chikhli : 5.86
Sindkhed Raja : 5.6
Khamgaon : 5.39
Buldhana : 3.64
Jalgaon (Jamod) : 2.7
Malkapur : 1.44
चंद्रपूर वाढलेले मतदान
Brahmapuri : 9.04
Ballarpur : 7.27
Chimur : 6.91
Warora : 6.89
Chandrapur : 6.77
Rajura : 1.56
धुळे वाढलेले मतदान
Dhule City : 8.61
Sakri : 4.48
Dhule Rural : 3.62
घटलेले मतदान
Shirpur : -0.87
Shindkheda : -0.88
गडचिरोली वाढलेले मतदान
Gadchiroli : 4.7
Armori : 2.95
Aheri : 2.91
गोंदिया वाढलेले मतदान
Gondiya : 6.09
Amgaon : 3.78
Arjuni-morgaon : 0.3
घटलेले मतदान
Tirora : -1.27
हिंगोली वाढलेले मतदान
Kalamnuri : 3.97
Hingoli : 3.89
घटलेले मतदान
Basmath : -2.29
जळगांव वाढलेले मतदान
Bhusawal : 8.38
Jalgaon City : 7.42
Pachora : 4.18
Jalgaon Rural : 3.83
Raver : 2.72
Amalner : 2.64
Muktainagar : 2.62
Erandol : 2.26
"Jamner : 2.17"
घटलेले मतदान
Chopda : -0.81
Chalisgaon : -1.85
जालना वाढलेले मतदान
Jalna : 7.75
Bhokardan : 6.47
Badnapur : 5.9
Ghansawangi : 3.85
Partur : 0.67
कोल्हापूर वाढलेले मतदान
Chandgad : 5.97
Kolhapur North : 4.31
Shirol : 3.35
Radhanagari : 2.66
Hatkanangle : 2.12
Kagal : 0.51
Karvir : 0.46
Ichalkaranji : 0.36
घटलेले मतदान
Kolhapur South : -0.02
Shahuwadi : -1.1
लातूर वाढलेले मतदान
Latur Rural : 7.77
Udgir : 7.05
Latur City : 5.74
Nilanga : 3.44
Ausa : 2.73
Ahmadpur : 1.69
मुंबई शहर वाढलेले मतदान
Malabar hill : 5.54
Mahim : 5.33
Shivadi : 5.09
Worli : 4.8
Mumbadevi : 4.75
Colaba : 4.49
Wadala : 4.08
Byculla : 2.28
Dharavi : 2.12
Sion koliwada : 0.96
मुंबई उपनगर वाढलेले मतदान
Andheri West : 9.48
Goregaon : 8.99
Versova : 8.82
Kurla(SC) : 7.83
Mulund : 6.68
Vandre West : 6.36
Jogeshwari East : 6.32
Borivali : 5.44
Dahisar : 5.1
Ghatkopar East : 5.05
Charkop : 5.03
Mankhurd shivaji Nagar : 4.91
Bhandup West : 4.89
Andheri East : 4.78
Kandivali East : 4.72
Ghatkopar West : 4.57
Vandre East : 4.3
Vile parle : 3.89
Magathane : 3.25
Kalina : 2.76
Chembur : 2.67
Dindoshi : 2.06
Vikhroli : 1.63
Malad West : 0.68
घटलेले मतदान
Anushakti Nagar : -1.27
Chandivali : -1.69
नागपूर वाढलेले मतदान
Nagpur North : 7.17
Nagpur West : 6.45
Nagpur South : 5.65
Nagpur East : 5.3
Ramtek : 5.05
Nagpur central : 4.66
Nagpur South West : 4.51
Kamthi : 4.15
Umred : 0.61
घटलेले मतदान
Savner : -2.06
Hingna : -2.09
Katol : -3.09
नांदेड वाढलेले मतदान
Bhokar : 0.68
Hadgaon : 0.32
घटलेले मतदान
Kinwat : -1.05
Deglur : -1.28
Loha : -2.63
Nanded North : -3.79
Naigaon : -4.6
Mukhed : -5.91
Nanded South : -6.1
नंदूरबार वाढलेले मतदान
Nandurbar : 9.95
Nawapur : 3.12
Shahada : 1.97
घटलेले मतदान
Akkalkuwa : -5.94
नाशिक वाढलेले मतदान
Nandgaon : 9.29
Dindori : 8.09
Malegaon outer : 7.98
Sinnar : 7.98
Igatpuri : 7.82
Nashik central : 7.74
Nashik East : 6.71
Chandvad : 6.67
Yevla : 6.36
Devlali : 5.54
Baglan : 5.14
Kalwan : 2.52
Nashik West : 1.59
Malegaon central : 1.49
घटलेले मतदान
Niphad : -2.01
उस्मानाबाद वाढलेले मतदान
Umarga : 4.32
Osmanabad : 2.55
Tuljapur : 2.02
घटलेले मतदान
Paranda : -3.51
पालघर वाढलेले मतदान
Palghar : 23.83
Dahanu : 11.5
Vikramgad : 9.16
Nalasopara : 5.27
घटलेले मतदान
Boisar : -1.31
Vasai : -1.9
परभणी वाढलेले मतदान
Pathri : 3.24
Parbhani : 2.87
Gangakhed : 2.7
Jintur : ?
पुणे वाढलेले मतदान
Pune cantonment : 9.42
VADGAON SHERI : 8.74
Kasbapeth : 7.14
Shivajinagar : 7.04
Parvati : 6.21
Khadakwasala : 5.13
Bhor : 4.91
Daund : 4.11
Kothrud : 3.98
Ambegaon : 3.14
Chinchwad : 3.07
Hadapsar : 2.88
Baramati : 2.36
Bhosari : 1.43
Shirur : 1.19
Pimpri : 1.08
Junnar : 0.92
Maval : 0.89
Khed alandi : 0.32
घटलेले मतदान
Indapur : -0.24
Purandar : -5.72
रायगड वाढलेले मतदान
Mahad : 3.88
Alibag : 3.67
Karjat : 3.47
Panvel : 3.19
Uran : 1.57
घटलेले मतदान
Shrivardhan : -0.14
Pen : -8.09
रत्नागिरी वाढलेले मतदान
Rajapur : 7.35
Ratnagiri : 5.17
Guhagar : 3.13
Chiplun : 2.54
घटलेले मतदान
Dapoli : -0.24
सांगली वाढलेले मतदान
Miraj : 10.5
Tasgaon-Kavathe Mahankal : 5.89
Sangli : 4.91
Palus-Kadegaon : 4.9
Khanapur : 3.99
Islampur : 0.78
Shirala : 0.21
सातारा वाढलेले मतदान
Koregaon : 9.93
Karad North : 6.94
Phaltan : 6.27
Patan : 5.3
Karad South : 4.39
Man : 4.39
Satara : 4.36
घटलेले मतदान
Wai : -0.96
सिंधुदुर्ग वाढलेले मतदान
Kudal : 7.29
Sawantwadi : 4.16
Kankavli : 1.71
सोलापूर वाढलेले मतदान
Madha : 6.18
Solapur South : 6
Sangola : 4.83
Akkalkot : 4.49
Solapur City North : 4.42
Mohol : 3.03
Malshiras : 1.78
Solapur City central : 1.23
घटलेले मतदान
Barshi : -0.08
Karmala : -1.52
Pandharpur : -2.24
ठाणे वाढलेले मतदान
Dombivali : 15.38
Kalyan East : 14.82
Kalyan West : 12.85
Kalyan Rural : 11.24
Kopri-Pachpakhadi : 10.65
Belapur : 10.02
Bhiwandi Rural (S.T.) : 9.29
Ovala - Majiwada : 9.19
Airoli : 8.32
Ulhasnagar : 7.03
Murbad : 6.4
Thane : 6.25
Ambernath : 5.31
Bhiwandi West : 3.76
shahapur : 3.36
Mira Bhayandar : 3.35
Mumbra-Kalwa : 1.94
Bhiwandi East : 1.31
वर्धा वाढलेले मतदान
Wardha : 10.97
Hinganghat : 4.81
Arvi : 4.27
Deoli : 4.05
वाशिम वाढलेले मतदान
Washim : 5.46
Karanja : 3.63
Risod : 1.64
यवतमाळ वाढलेले मतदान
Yavatmal : 6.36
Arni : 5.07
Ralegaon : 3.68
Pusad : 1.75
Umarkhed : 1.72
Wani : 1.46
घटलेले मतदान
Digras : -2.9
21 Nov 2024 - 7:36 am | शाम भागवत
अंदाजे ७०-८० ठिकाणी कॉंग्रेस व भाजपाच्या थेट लढती आहेत. तिथे वाढलेल्या मतदानाने काय परिणाम केलाय ते नीट तपासता येऊ शकेल.
21 Nov 2024 - 2:27 am | शाम भागवत
महायुतीला १७५ जागा मिळायला हरकत नसावी.
21 Nov 2024 - 7:34 am | शाम भागवत
प्रशासकांना विनंती आहे की कृपया खालील पोस्ट काढून टाकावी. पूर्वपरीक्षण बटणा दाबण्याच्या ऐवजी चूकून प्रकाशित करा बटण दाबले गेले होते. नंतर ही पोस्ट व्यवस्थीत रित्या लिहून पोस्ट केलेली आहे.
https://www.misalpav.com/comment/1186378#comment-1186378
21 Nov 2024 - 11:30 am | सस्नेह
हम्म......
तथास्तु !!
21 Nov 2024 - 11:44 am | अमरेंद्र बाहुबली
काहीही झाले तरी मविआ सत्तेत येणार आहे. कमी पडणारे मनुष्यबळ अजितदादा पुरवतील. :)
21 Nov 2024 - 12:26 pm | टीपीके
हे मात्र पटले, महायुती निवडणूक जिंकली तरी सत्तेवर येईल की नाही हे नक्की नाही
21 Nov 2024 - 2:19 pm | शाम भागवत
:)
25 Nov 2024 - 12:05 pm | सुबोध खरे
काहीही झाले तरी मविआ सत्तेत येणार आहे
अगदी बोगस मतदान, पैसे वाटणे, खोके आणि पेट्या आणि शेवटी इ व्ही एम होऊनही?
काय सांगताय?
मग हे असं कसं झालं ?
आता या लोकांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाहीये!
25 Nov 2024 - 12:19 pm | अमरेंद्र बाहुबली
हाच तर मोठा चमत्कार आहे.
21 Nov 2024 - 11:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्व सर्व पक्ष, अपक्ष, चोरपक्ष आणि सर्व इतर सर्व उमेदवारांना आणि महाराष्ट्राला अच्छे दिनासाठी शुभेच्छा.
श्री-गुरुजींनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा. डोळे पाणावले पुन्हा धागा वगैरे पाहुन.
मला वाटलं लोकसभेच्या निकाला नंतर, 'झोला लेके चल पडेंगे' म्हणना-या शेठबरोबर
नर्मदामय्याच्या दर्शनाला गेले की काय... बरं वाटलं येत राहा. (अजून दळन वाचलं नाही)
-दिलीप बिरुटे
21 Nov 2024 - 12:56 pm | अमरेंद्र बाहुबली
आजपासून हिंदू धर्मावरील धोका पुढील साडेचार वर्षांसाठी टळलाय. वक्फ बोर्डलाही पुढे ४.५ वर्षा घाबरू नये .:)
- जनहितार्थ.
21 Nov 2024 - 1:09 pm | टीपीके
तुम्ही मवीआ हरल्यासारखे प्रतिसाद का देत आहात आज? तुम्हाला काही आतली खबर आहे का?
21 Nov 2024 - 1:24 pm | अमरेंद्र बाहुबली
मविआ हरली जिंकली तरीही वरील प्रतिसादात काहीही फरक पडत नाही.
21 Nov 2024 - 1:26 pm | टीपीके
जरा समजावून सांगा
21 Nov 2024 - 2:21 pm | शाम भागवत
असू दे.
ते बाजार चांगलारितीने खाली आणतात. २३ तारखेपर्यंत मविआ जिंकलीच पाहिजे.
😀
21 Nov 2024 - 5:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=))
अरे देवा, हे काही बरं नै ये हं.
-दिलीप बिरुटे