महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ - मत टक्केवारी व जागांचा अंदाज (अंतिम भाग ३)

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in राजकारण
17 Nov 2024 - 8:45 pm

महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीवर हा माझा शेवटचा लेख. विविध पक्षांची आजपर्यंतची कामगिरी, २०२४ लोकसभा निवडणुकीतील विविध पक्षांची कामगिरी, महाराष्ट्रातील मतदारांचा नेहमी दिसणारा कल यावर आधारीत काही आकडेमोड करून कोणत्या पक्षाला किती मते मिळण्याची शक्यता आहे व त्यानुसार किती जागा जिंकण्याची शक्यता आहे याचे अंदाज लिहीत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील मागील काही वर्षात निर्माण झालेली खिचडी व गुंतागुंत पाहता जागांचा अंदाज व्यक्त करणे खूप धाडसाचे आहे. मतांच्या टक्केवारीचे अंदाज बर्‍याच अंशी बरोबर येऊ शकतील, परंतु जागांचा अंदाज बर्‍याच प्रमाणात चुकू शकतो. तसे झाल्यास माझ्या प्रारूपाकडे नव्याने पहावे लागेल.

मत टक्केवारी

लोकसभा निवडणुकीत ६१.२९% मतदारांनी मत दिले होते. या विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी यापेक्षा कमी असेल असे वाटते. कदाचित ६०% किंवा ५८% पेक्षाही कमी असल्यास नवल वाटणार नाही.

एप्रिल-मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मतांची टक्केवारी खालीलप्रमाणे होती.

महाराष्ट्रातील एकूण दिलेली मते - ५ कोटी ७० लाख (मत टक्केवारी ६१.२९%)

काँग्रेस - १७.९२% (लढविलेल्या जागा - १७ + १ = १८ सांगली धरून)
उबाठा - १६.५२% (लढविलेल्या जागा - २१)
शप गट - १०,२७% (लढविलेल्या जागा - १०)

भाजप - २६.१८% (लढविलेल्या जागा - २८)
शिंदे गट - १२.९५% (लढविलेल्या जागा - १५)
अप गट - ४.४२% (लढविलेल्या जागा - ४ + १ = ५ जानकर धरून)

मविआ आघाडीत सर्वाधिक जागा उबाठाने लढविल्या होत्या, परंतु प्रति मतदारसंघात सर्वात कमी मते उबाठाला मिळाली आहेत. दुसरीकडे महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजपने लढविल्या, परंतु प्रति मतदारसंघात सर्वात कमी मते शिंदे गटाला मिळाली आहेत.

लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकार व पंतप्रधान निवडायचा असल्याने महाराष्ट्रात स्थानिक भाजप नेतृत्वाविरूद्ध काहिशी नाराजी असूनही महायुती व विशेषतः भाजपला काही प्रमाणात लाभ झाला होता. परंतु विधानसभा निवडणुकीत वेगळे मुद्दे असतात. विधानसभा निवडणुकीत राज्य सरकार निवडायचे आहे. त्यामुळे मोदींच्या चेहर्‍याचा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळणार नाही. महाराष्ट्रातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर साधारणपणे दोन्ही निवडणुका एक वर्षापेक्षा कमी कालावधीत पुढेमागे होतात. आधी लोकसभा निवडणूक होते व नंतर काही महिन्यातच विधानसभा निवडणूक होते (मार्च १९७७ मध्ये लोकसभा निवडणूक व जवळपास १ वर्षानंतर १९७८ मध्ये विधानसभा निवडणू़क झाली होती. मार्च १९९५ मध्ये विधानसभा निवडणूक व मे १९९६ मध्ये लोकसभा निवडणूक झाली होती. सप्टेंबर १९९९ मध्ये दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या होत्या.). २००४ पासून मे महिन्यात लोकसभा निवडणूक व ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणूक होते.

१९८०: लोकसभा - विरोधी पक्ष ९ आणि काँग्रेस ३९, विधानसभा - विरोधी पक्ष ८०, कॉंग्रेस १९२
१९८५: लोकसभा - विरोधी पक्ष ५ आणि काँग्रेस ४३, विधानसभा - विरोधी पक्ष १०४, कॉंग्रेस १६२
१९९०: लोकसभा - महायुती १४, जनता दल ५ आणि काँग्रेस २८, विधानसभा - महायुती ९४, जनता दल २५, कॉंग्रेस १४१
१९९५: विधानसभा - महायुती १३८ आणि काँग्रेस ८०, १९९६ लोकसभा - महायुती ३३, कॉंग्रेस १५
१९९९: लोकसभा - महायुती २७ आणि काँग्रेस २१, विधानसभा - महायुती १२५, कॉंग्रेस १३३
२००४: लोकसभा - महायुती २५ आणि काँग्रेस आघाडी २३, विधानसभा - महायुती ११६, कॉंग्रेस आघाडी १४०
२००९: लोकसभा - महायुती २० आणि काँग्रेस आघाडी २५, विधानसभा - महायुती ९०, कॉंग्रेस आघाडी १४४
२०१४: लोकसभा - महायुती ४२ आणि काँग्रेस आघाडी ६, विधानसभा - महायुती १८६, कॉंग्रेस आघाडी ८३
२०१९: लोकसभा - महायुती ४१ आणि काँग्रेस आघाडी ५, विधानसभा - महायुती १६१, कॉंग्रेस आघाडी ९८

साधारणपणे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जो कल दिसतो, तोच कल बराचसा विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्तीत होतो. लोकसभा निवडणुकीत मोठ्या गटाला जितक्या जागा मिळतात, त्या विधानसभा निवडणुकीत काही प्रमाणात कमी होतात परंतु मतदारांचा कल बर्‍याच प्रमाणात तसाच राहतो.

_________________________________________________________________________

या पार्श्वभूमीवर २०२४ विधानसभा निवडणुकीत साधारणपणे खालीलप्रमाणे परिस्थिती असू शकते.

काँग्रेस

काँग्रेस १०१ जागा लढवित आहे. काँग्रेस अंदाजे १८% मते व ६०-७० जागा मिळवेल.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ८७ जागा लढवून अंदाजे १५% मते व ५०-६० जागा मिळवेल.

ऊबाठा गट

शिवसेना १९८९ पासून (२०१४ चा अपवाद वगळता) विधानसभा निवडणूक युतीत लढत आहे. परंतु शिवसेनने जिंकलेल्या एकूण जागांचे लढवित असलेल्या एकूण जागांशी प्रमाण (म्हणजे स्ट्राईक रेट) खूप कमी आहे.

१९९० - लढविलेल्या एकूण जागा १८३, जिंकलेल्या जागा ५२, विजयाचे प्रमाण = २८.४१
१९९५ - लढविलेल्या एकूण जागा १७१, जिंकलेल्या जागा ७३, विजयाचे प्रमाण = ४२.६९
१९९९ - लढविलेल्या एकूण जागा १७१, जिंकलेल्या जागा ६९, विजयाचे प्रमाण = ४०.३५
२००४ - लढविलेल्या एकूण जागा १६९, जिंकलेल्या जागा ६२, विजयाचे प्रमाण = ३६.६८
२००९ - लढविलेल्या एकूण जागा १६९, जिंकलेल्या जागा ५२, विजयाचे प्रमाण = २६.०३
२०१४ - लढविलेल्या एकूण जागा २८६, जिंकलेल्या जागा ६३, विजयाचे प्रमाण = २२.०२
२०१९ - लढविलेल्या एकूण जागा १२४, जिंकलेल्या जागा ५६, विजयाचे प्रमाण = ४५.१६

शिवसेनेचा सर्वाधिक स्ट्राईक रेट २०१९ मघ्ये ४५.१६ होता जेव्हा शिवसेना युतीत निवडणू़क लढली होती व सर्वात कमी स्ट्राईक रेट २०१४ मध्ये २२.०२ होता जेव्हा शिवसेना स्वबळावर लढली होती.

आता शिवसेनेचे तुकडे पडले आहेत. २००९ मध्ये राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचा स्ट्राईक रेट फक्त २६.०३ होता. उबाठा सेना पुन्हा एकदा युतीत आहे व फक्त ९६ जागांवर लढत आहे. अश्या परिस्थितीत उबाठा सेनेला ४० पेक्षा जास्त जागा मिळणे अवघड वाटते. प्रत्यक्षात शिंदे सेनाला मूळ सेनेची जाणार असलेली मते लक्षात घेतली तर उबाठा सेना अंदाजे १२% मते घेऊन २०-३० जागा मिळवेल.

म्हणजे मविआ एकत्रित ४५% मते व १३०--१६० जागा मिळवेल.

____________________________________________________________________

भाजप

भाजपने २०१४ मध्ये स्वबळावर २५२ जागा लढवून २८.५०% मते मिळवून १२२ जागा जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये शिवसेनेशी युती करून भाजपने १६४ ( भाजप १४६ + मित्रपक्ष १८ कमळ चिन्हावर) जागा लढवून २५.७५% मते मिळवून १०३ जागा जिंकल्या आणि सत्ता गमावली. २०२४ मध्ये भाजप १४८ जागांवर लढत आहे. आता मोदींचा चेहरा नाही. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही हिंदुत्व हा मुद्दा अजिबात नाही (लव जिहाद, बटेंगे तो कटंगे, बांगलादेशातील हिंदूंना मारपीट, अयोध्येतील श्रीराम मंदीर अश्या मुद्द्यांचा मतदारांवर शून्य प्रभाव पडेल). इतर सर्व पक्षांप्रमाणे भाजपचा प्रचारही दिशाहीन व निष्प्रभ आहे.

भाजपला साधारणपणे २२-२३% मते मिळतील व ५०--६० च्या आसपास जागा मिळतील.

शिंदे गट

शिंदे गट ८५ जागा लढवित आहे. शिंदेंची प्रतिमा बरीच उजळली आहे. परंतु शिंदेंनी सुद्धा बरेच चिकीचे उमेदवार दिले आहेत. नेत्याची मान्यता पक्षाच्या मान्यतेपेक्षा कायमच जास्त असते. मोदींची लोकप्रियता बहुतेक वेळा ६०% किंवा अधिक असते, परंतु भाजप किंवा रालोआला ४४% हून जास्त मते मिळाली नाही.

शिंदे गटाला साधारणपणे १२% मते व २०-२५ जागा मिळतील.

अजित पवार गट

अप गट ५१ जागा लढवून साधारणपणे ७% मते व १०-१५ जागा मिळवेल.

म्हणजे महायुती एकत्रित ४१-४२% मते व ८०-१०० जागा मिळवेल.

===================================================

बहुतेक सर्व वृत्तवाहिन्यांनी मतदानपूर्व सर्वेक्षण करणे टाळले आहे कारण सद्यस्थितीत प्रचंड खिचडी झालेल्या राजकीय वातावरणात कोण किती जागा जिंकेल याचा अंदाज काढणे खूपच अवघड आहे आणि दुसरं कारण म्हणजे हरयाना निवडणुकीचे सर्व वाहिन्यांचे सर्व अंदाज पूर्ण चुकले होते. तरीसुद्धा अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. मी अंदाज व्यक्त केलेली मतांची टक्केवारी बरोबर असण्याची बरीच शक्यता वाटतेय, पण जागांचा अंदाज बर्‍यापैकी चुकू शकतो.

____________________________________________________________________________________

मनसे १५० जागा लढवित आहे. मनसे २-३% टक्के मते व ३-४ जागा जिंकू शकते.

________________________________________________________________

इतर काही अंदाज -

- मनसे, शेकाप, सप, एमआयएम, वंचित, बच्चू कडूचा पक्ष, जनसुराज्य असे चिल्लर पक्ष एकत्रित १५-२० जागा व अपक्ष १५-२० जागा जिंकतील.

- सर्व पक्षांमधील सर्वात मोठ्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल.

- कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष असण्याची शक्यता आहे. त्याखालोखाल भाजप किंवा शप गट, त्याखालोखाल शिंदे गट, नंतर उबाठा आणि शेवटी सहाव्या क्रमांकावर अप गट असेल.

- कोणत्याही एका पक्षाला तीन अंकी जागा मिळणार नाहीत. कोणत्याही २ पक्षांना एकत्रित १४५ जागा मिळणार नाहीत. सरकार बनविण्यासाठी ३ किंवा अधिक पक्षांना एकत्र यावे लागेल, यातून एखादी नवीन खिचडी निर्माण होण्याची शक्यता आहे.

- मविआ सत्तेवर आल्यास वर्षा गायकवाड किंवा प्रणिती शिंदे मुख्यमंत्री होण्याची शक्यता किंवा कदाचित यशोमती ठाकूर असतील.

- महायुती सत्तेवर आल्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार

- उद्धव ठाकरे व फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही

- महायुती सत्तेत न आल्यास महाराष्ट्र भाजपत नेतृत्वबदल होण्याची दाट शक्यता. विधानसभा निवडणुकीत पराभव होऊन सत्तेत न येणे हे महाराष्ट्र भाजपसाठी व महाराष्ट्रासाठी इष्टापत्ती ठरेल.

- मविआ सत्तेवर येण्याची शक्यता

- कोणत्याही आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास निकालापश्चात काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिंदे गट ही नवीन आघाडी निर्माण होण्याची शक्यता. अश्या परिस्थितीत उबाठा पुन्हा एकदा भाजपशी जुळवून घेण्याची शक्यता.

- विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार काकांकडे परत जाण्याची शक्यता

- जे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार राखीव जागा वाढविते, ते सरकार नंतर लगेचच्या निवडणुकीत सत्तेत परतत नाही हे १९९१ पासून अनेकदा दिसले आहे.

* १९९० - वि. प्र. सिंगांनी मंडल आयोगाच्या अहवालानुसार २७% राखीव जागा इतर मागासवर्गीयांना दिल्या पण १९९१ लोकसभा निवडणूक हरले.
* १९९३ - जयललिताने तामिळ्लनाडूत राखीव जागांचे प्रमाण ६९% पर्यंत वाढविले, पण १९९६ विधानसभा निवडणूक हरली.
* १९९३ - शरद पवारांनी अनेक नवीण जातींचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश केला, पण १९९५ विधानसभा निवडणूक हरले.
* २००३ - राजस्थान मुख्यमंत्री गेहलोतांनी चक्क ब्राह्मणांना राखीव जागा दिल्या, पण २००३ विधानसभा निवडणूक हरले.
* २००८ - राजस्थान मुख्यमंत्री वसुंधरां राजेंनी गुज्जरांना राखीव जागा दिल्या, पण २००८ विधानसभा निवडणूक हरल्या.
* २०१३ - राजस्थान मुख्यमंत्री गेहलोतांनी गुज्जरांना राखीव जागा दिल्या, पण २०१३ विधानसभा निवडणूक हरले.
*२०१३ - मनमोहन सिंगांनी जाटांचा समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये केला, पण २०१४ लोकसभा निवडणूक हरले.
*२०१४ - पृथ्वीराज चव्हाणांनी मराठ्यांना १६% व मुस्लिमांना ५% राखीव जागा दिल्या, पण २०१४ विधानसभा निवडणूक हरले.
*२०१९ -- फडणवीसांनी मराठ्यांना १६% राखीव जागा दिल्या, पण २०१९ विधानसभा निवडणूकीत सत्तेत परतले नाहीत.

आता २०२४ मध्ये शिंदेंनी मराठ्यांना १०% राखीव जागा दिल्या आहेत. वरील कलानुसार विधानसभा निवडणूकीनंतर ते सत्तेत परततील का हे २३ नोव्हेंबरला समजेलच.

- पुण्यातील सर्व ८ मतदारसंघ भाजपने स्वबळावर २०१४ विधानसभा निवडणुकीत जिंकले होते. २०१९ मध्ये शिवसेनेबरोबर युती असूनही यतील हडपसर व वडगाव शेरी हे मतदारसंघ भाजप हरला होता. आता हे २ मतदारसंघ भाजपने अजित पवार गटाला दिले आहेत. उर्वरीत सर्व ६ मतदारसंघांपैकी पर्वती, कसबा, खडकवासला, कँटोंमेंट व शिवाजीनगर मध्ये खूओ चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. कोथरूडही धोक्यात होता. परण्तु चंपाने धूर्तपणे कोथरूडमधील प्रतिस्पर्धी मेधा कुलकर्णी व मुरलीधर मोहोळ यांना वाटेतून दूर केले व बंडखोर अमोल बालवडकरांना बसविण्यात आले. त्यात भर म्हणून तिरंगी लढत निर्माण झाली (चंपा, उबाठाचे मोकाटे व मनसेचे किशोर शिंदे) ज्याचा लाभ भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत बापटांना कोथरूडमध्ये १ लाख मतांची आघाडी होती. परंतु विधानसभा निवडणूकीत कोंग्रेस, राष्ट्रवादी व मनसेचे संयुक्त उमेदवार किशोर शिंदे यांनी चांगली लढत देऊन ८०,००० मते मिळविल्याने चंपा फक्त २५,००० मतांनी जिंकले. पण आता ३ उमेदवार असल्याने भाजपला काळजी नाही. २०१४ मध्ये ८ पैकी ८ व २०१९ मध्ये ८ पैकी ६ जागा भाजपने जिंकल्या होत्या. आता भाजप ६ व अप गट २ जागा लढवित आहे. २०२४ मध्ये भाजप व अप गट एकत्रित ६ पेक्षा कमी जागा जिंकेल असा अंदाज आहे.

__________________________________________________________

इच्छा यादी

खालील निकाल लागावे अशी मनोमन इच्छा आहे. यातील किती इच्छा पूर्ण होतील ते २३ नोव्हेंबरला समजेलच.

- कोणत्याही आघाडीला बहुमत मिळू नये व सरकार बनविता येऊ नये.
- महाराष्ट्रात पुढील १० वर्षे राष्ट्रपती राजवट असावी.
- भाजप व उबाठा गटाला शून्य जागा मिळाव्या.
- कोणीही ठाकरे, राणे व बारामतीकर विधानसभेत नसावा.
- आव्हाड, नबाब मलिक पिता-पुत्री, पटोले, भास्कर जाधव, सर्व मुस्लिम उमेदवार, कडू, संजय राठोड, भ्रष्टाचाराचे आरोप झालेले सर्वजण इ. पराभूत व्हावे.

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Nov 2024 - 9:41 am | अमरेंद्र बाहुबली

.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Nov 2024 - 12:17 pm | अमरेंद्र बाहुबली

*निवडणूक संपली…बटेंगे तो कटेंगेची गोळी संपली…#वक्फ बोर्डाच्या विरोधातला प्रचारही संपला. कालच राज्य शासनाने वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी १० कोटी रुपये निधी जाहीर ही केला.. हिंदू हिंदू म्हणून यांच्या मागे गेलेल्या लोकांचे आता तरी डोळे उघडतील अशी आशा बाळगुया…*

https://marathi.aajtak.in/india/story/mahayuti-government-announced-to-g...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Nov 2024 - 12:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'धर्म' ही अफूची गोळी आहे त्याचं चाटण सर्वांना द्यावं लागतं.

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Nov 2024 - 1:33 pm | अमरेंद्र बाहुबली

हिंदूना मूर्ख बनवणे सोपे आहे.

शाम भागवत's picture

30 Nov 2024 - 7:19 pm | शाम भागवत

तेचं बदलायला सुरवात झालीय.
तेच काही जणांच्या लक्षा येत नाहीये.
तेच भाजपाला फायद्याचंही आहे
😀

वामन देशमुख's picture

29 Nov 2024 - 2:13 pm | वामन देशमुख

'धर्म' ही अफूची गोळी आहे त्याचं चाटण सर्वांना द्यावं लागतं.

"'धर्म' ही अफूची गोळी आहे त्याचं चाटण गोबरवाद्यांना द्यावं लागतं." असं म्हणायचं आहे का?

- शेवगो

वेडा बेडूक's picture

29 Nov 2024 - 4:07 pm | वेडा बेडूक
अमरेंद्र बाहुबली's picture

29 Nov 2024 - 1:33 pm | अमरेंद्र बाहुबली

*लोकशाही वाचवण्यासाठी ९५ वर्षीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव आत्मक्लेश उपोषण करत आहेत.*

https://sarkarnama.esakal.com/pune/maharashtra-evm-row-mahayuti-majority...

*विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यातून थोडा तरी बोध घ्यायला हवा, फॅसिस्ट शक्तीचा नायनाट इतक्या सहज सहजी नाही होणार हे लक्षात ठेवावे!*

*BabaAadhav*
*EVM*
*SaveLokshahi*
चला सामाजिक कार्यकर्ते भाजप नी निवडणूक आयोगा विरुद्ध पुढे येऊ लागलेत किती आनंदाची गोष्ट आहे. सर्वानाच पैसे देऊन किंवा इडीचा गैरवापर करून विकत घेता येत नाही.

वामन देशमुख's picture

29 Nov 2024 - 2:24 pm | वामन देशमुख

आत्मक्लेश करून घेणार म्हणजे नेमके काय करणार?

"लोकशाही वाचवण्यासाठी" म्हणजे नेमके काय करण्यासाठी?

आपले आर्थिक गैरव्यवहार लपविण्यासाठी काही लोक असे उपद्व्याप करतात का?

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Nov 2024 - 3:19 pm | अमरेंद्र बाहुबली

साडे सहा तासात ७६ लाख मते वाढली?
https://www.loksatta.com/maharashtra/parakala-prabhakar-doubts-increased...

सुबोध खरे's picture

29 Nov 2024 - 6:28 pm | सुबोध खरे

नेहमीप्रमाणे फुरोगाम्यांची रडारड सुरु झाली.

हरले कि निवडणूक आयोग, इ व्ही एम, इ डी, सीबी आय, पैसे, खोके हेच राग परत परत आळवत राहतात.

एखादा वाघ गेल्यावर मरतुकडं कुत्रं जसं भरपूर वेळ त्या दिशेने भुंकत राहतं तसं फुरोगाम्यांचं असतं.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Nov 2024 - 6:30 pm | अमरेंद्र बाहुबली

बेकायदा मतांचा हिशेब लागत नाहीये त्यावर बोला. आधी बातमी तर वाचा. निर्मला सीतारामन ह्यांचे पती आहेत आरोप करणारे. आले लगेच दंडपट्टा घेऊन लढायला.

सुबोध खरे's picture

29 Nov 2024 - 6:36 pm | सुबोध खरे

बातमी वाचलेली च आहे.

तुमच्या सारखा नाही. पहिल्यांदा कळफलक बडवायचा आणि मग विचार करायचा

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Nov 2024 - 6:45 pm | अमरेंद्र बाहुबली

मग लक्षात आला असेल तुम्हाला इलेक्शन फ्रॉड.

सुबोध खरे's picture

30 Nov 2024 - 1:42 pm | सुबोध खरे

पाळणा हलत नाही
म्हणून

काही लोक पलंगाला दोष देतात

तसं आहे हे!

चालू द्या!

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Nov 2024 - 1:46 pm | अमरेंद्र बाहुबली

इव्हीएम सेटिंग नव्हती हे सिद्ध करण्याचा किती तो आटापिटा?

वामन देशमुख's picture

30 Nov 2024 - 6:49 pm | वामन देशमुख

एखादा वाघ गेल्यावर मरतुकडं कुत्रं जसं भरपूर वेळ त्या दिशेने भुंकत राहतं तसं फुरोगाम्यांचं असतं.

बरोबर आहे.

- मनुवादी शेवगो

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Nov 2024 - 8:45 pm | अमरेंद्र बाहुबली

.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Nov 2024 - 8:46 pm | अमरेंद्र बाहुबली

.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Nov 2024 - 10:27 pm | अमरेंद्र बाहुबली

चर्चांना पूर्णविराम…अखेर शिक्कामोर्तब! चंद्रकांत पाटील राज्याचे नवे मुख्यमंत्री! अमीत शहा ह्यांचे रात्री उशिराने ट्विट….

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Nov 2024 - 9:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय म्हणता ? धक्काच आहे तसा...लिंक प्लीज.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

30 Nov 2024 - 9:55 am | श्रीगुरुजी

स्वप्नात दिसलेल्या गोष्टींची लिंक असते का?

सुबोध खरे's picture

30 Nov 2024 - 10:06 am | सुबोध खरे

कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?

पहिल्यांदा कळफलक बडवायचा आणि मग केला तर विचार करायचा

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Nov 2024 - 10:22 am | अमरेंद्र बाहुबली

भाजपचे धक्कातंत्र! माधव भंडारी राज्याचे नवे मुख्यमंत्री! अमित शहा पत्रकार परिषदेतून लाइव्ह.

सुबोध खरे's picture

30 Nov 2024 - 10:50 am | सुबोध खरे

राऊत छाप कडक माल

))-((

श्रीगुरुजी's picture

30 Nov 2024 - 11:33 am | श्रीगुरुजी

उठा छाप चुन्यात राऊत छाप मळली की अशी पिचकारी मारता येते.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Nov 2024 - 11:44 am | अमरेंद्र बाहुबली

खिक्क.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Nov 2024 - 11:44 am | अमरेंद्र बाहुबली

डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे किरीट सोमय्या राज्याचे नवे मुख्यमंत्री घोषीत!

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Nov 2024 - 7:06 pm | अमरेंद्र बाहुबली

निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’- भाई जगताप.
https://www.lokmat.com/maharashtra/maharashtra-assembly-election-2024-re...

वामन देशमुख's picture

30 Nov 2024 - 8:42 pm | वामन देशमुख

कोल्हे माणसांना कुत्रे म्हणत आहेत आणि लांडगे त्यांच्या बातम्या इथे टाकत आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Nov 2024 - 8:58 pm | अमरेंद्र बाहुबली

ते सामान्य जनतेच्या मनातले बोलल्याने मनुवादी भक्ताना बोचले असावे का?

वामन देशमुख's picture

30 Nov 2024 - 9:14 pm | वामन देशमुख

ते सामान्य जनतेच्या मनातले बोलल्याने मनुवादी भक्ताना बोचले असावे का?

पुन्हा गैरसमज!

लांडगे कोल्हे तरस काय सिंहांच्या पासंगाला तरी पुरणार आहेत का?

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Nov 2024 - 9:57 pm | अमरेंद्र बाहुबली

सिंव्ह? खो खो.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Nov 2024 - 10:10 pm | अमरेंद्र बाहुबली

पोस्टल मते इव्हिएम प्रमाणे सेट करता येत नसल्याने असे झाले असावे का?
.

नठ्यारा's picture

1 Dec 2024 - 4:20 pm | नठ्यारा

अबा,

टपालमते आणि जनमतदान खूपदा एकमेकांच्या विरोधात असतात. टपालातनं मतं पाठवणारे बरेचसे सरकारी अधिकारी वगैरे असतात. त्यांना मोदी ( हा घटक ) नकोसा वाटतो. पण जनतेस हवाय.

आ.न.,
-ना.न.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Dec 2024 - 5:13 pm | अमरेंद्र बाहुबली

मग २०१९ नी २४ ला इतका फरक पडेल?? घोटाळा आहे हे नक्की.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Dec 2024 - 5:20 pm | अमरेंद्र बाहुबली

खरे मर्द असाल तर पुन्हा निवडणुक घ्या.
https://youtu.be/2CweLtjTZfk?si=4uKCnt3C0k0IKQVe
गुवाहाटी रिटर्न आमदार बच्चू कडू :)

वामन देशमुख's picture

2 Dec 2024 - 10:54 am | वामन देशमुख

खरे मर्द असाल तर पुन्हा निवडणुक घ्या.

ते खरे-खोटे मर्द नसतील, फक्त साधे मर्द असतील तर मग ह्या निवडणुकीचे निकाल चालतील का?

शिवाय, निवडून आलेल्या आमदारांत काही महिला आहेत त्यांचे काय?

श्रीगुरुजी's picture

2 Dec 2024 - 12:31 pm | श्रीगुरुजी

खरे मर्द असाल तर पुन्हा निवडणुक घ्या.

बच्चू खरा मर्द असेल तर पुन्हा निवडणूक घेण्याचा सर्व खर्च एकटा करेल आणि तो सर्व खर्च करणार असेल तर एकदा काय दहादा निवडणूक घ्यायला आक्षेप नाही. होऊ दे खर्च.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Dec 2024 - 2:03 pm | अमरेंद्र बाहुबली

तरीही नाही घेणार निवडणूक आयोग. पितळ उघडं पडेल ना?

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Dec 2024 - 5:24 pm | अमरेंद्र बाहुबली

शिवाजी महाराजांविरुध्द मिर्झाराजे जयसिंग ह्याना वापरून झाल्यावर औरंगजेबाने विष देऊन मारून टाकले होते.
सध्याच्या राजकीय परिस्थिती वरुन आठवले!

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Dec 2024 - 6:23 pm | अमरेंद्र बाहुबली

ईव्हीएम वर शंका का? संगणकतज्ज्ञ माधव देशपांडे ह्यांचे मत ऐका.
https://youtu.be/FydYkvy6RqQ?si=gF8wthZrJOfrzPJ_

सुबोध खरे's picture

2 Dec 2024 - 10:37 am | सुबोध खरे

काय करणार ऐकून?

बाकी कर्नाटक, हिमाचल प्रदेश, झारखंड, दिल्ली येथे इ व्ही एम यंत्रे कशी काय बरोबर चालली?

अर्थात याच्या तर्कशुद्ध उत्तराची भुजबळांकडून अपेक्षा नाहीच.

तेंव्हा २०२९ मध्ये श्री मोदीच परत येणार यात शंका नसावी. कारण त्यांनी इ व्ही एम, निवडणूक आयोग, ईडी, आयकर खाते, सी बी आय या सर्वाना कामाला लावलेले असल्याने त्यांचा विजय १०० % आहे

मग मी काय म्हणतो उगाच निवडणूक घेऊन त्यावर खर्च कशासाठी करायचा? त्या ऐवजी ते पैसे लाडका भाऊ लाडकी बहीण याना देऊनच टाकावे

हा का ना का

काय म्हणताय भुजबळ बुवा?

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Dec 2024 - 11:43 am | अमरेंद्र बाहुबली

इ व्ही एम यंत्रे कशी काय बरोबर चालली? राज्य, त्याचे उत्पन्न, संशय येऊ नये म्हणून काही राज्य सोडणे, अदानीची राज्यातील गुंतवणूक ह्या सगळ्या गोष्टी इव्हिएम सेट करायला मॅटर करत असाव्यात.

सुबोध खरे's picture

2 Dec 2024 - 6:57 pm | सुबोध खरे

म्हणजे २०२९ मध्ये श्री मोदी परत येणार तर !

भुजबळ बुवा तुमच्या पत्रिकेत शनी, साडेसाती , घातवार, संक्रांत सगळं एकदमच उपटलं वाटतं

नठ्यारा's picture

2 Dec 2024 - 9:45 pm | नठ्यारा

अमरेंद्र बाहुबली,

दुव्याबद्दल धन्यवाद. पहिली दहाएक मिनिटं पाहिली. माधव देशपांड्यांनी मतमोजणीत पारदर्शकता आणण्यासंबंधी प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणतात की जर २१०० वाजता मतदान संपलं असेल तर २१०१ वाजता एकंदर मतांचा आकडा जाहीर करायला काय हरकत आहे? तो जाहीर करण्यासंबंधी काही निर्देश आहेत का अशी त्यांनी निवडणूक आयोगाकडे माहितीच्या अधिकारात पृच्छा केली. त्यास आजून उत्तर आलेलं नाही.

माझ्या मते हा मुद्दा महत्त्वाचा आहे. प्रत्येक यंत्रात नेमकी किती मतं पडली हे जाणून घ्यायचा हक्क नागरिकांना आहेच. म्हणतात ना, राजपत्नी संशयातीत हवीच ( Caesar's wife should be above suspicion ).

आपला नम्र,
-नाठाळ नठ्या

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Dec 2024 - 10:01 pm | अमरेंद्र बाहुबली

निवडणूक आयोगाने उत्तर देणे अपेक्षित अस्ताना आयोगाच्या बचावात भाजप पक्ष उतरलाय. काहीतरी काळेबेरे आहे हे नक्की..

श्रीगुरुजी's picture

2 Dec 2024 - 10:20 pm | श्रीगुरुजी

काळंबेरं शोधण्यासाठी ५ वर्षे आहेत तुमच्याकडे. आता दु:खावेग आवरा आणि लागा कामाला.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Dec 2024 - 11:27 pm | अमरेंद्र बाहुबली

काय कामे करायची? इव्हीएम सेटिंग?

श्रीगुरुजी's picture

2 Dec 2024 - 11:38 pm | श्रीगुरुजी

काळंबेरं शोधायचं, निवडणूक आयोग आणि मतयंत्राच्या नावाने दोन्ही तळव्यांना चुना लावून बोंबा मारायच्या, आम्ही यांव त्यांव करू अश्या फुशारक्या मारायच्या, दरवर्षी २३ नोव्हेंबरला राष्ट्रवादी (शप) आणि उबाठा गटाला श्रद्धांजली वाहायची . . . बरीच मोठी यादी आहे