Skip to main content

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ - मत टक्केवारी व जागांचा अंदाज (अंतिम भाग ३)

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 17/11/2024 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीवर हा माझा शेवटचा लेख. विविध पक्षांची आजपर्यंतची कामगिरी, २०२४ लोकसभा निवडणुकीतील विविध पक्षांची कामगिरी, महाराष्ट्रातील मतदारांचा नेहमी दिसणारा कल यावर आधारीत काही आकडेमोड करून कोणत्या पक्षाला किती मते मिळण्याची शक्यता आहे व त्यानुसार किती जागा जिंकण्याची शक्यता आहे याचे अंदाज लिहीत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील मागील काही वर्षात निर्माण झालेली खिचडी व गुंतागुंत पाहता जागांचा अंदाज व्यक्त करणे खूप धाडसाचे आहे. मतांच्या टक्केवारीचे अंदाज बर्‍याच अंशी बरोबर येऊ शकतील, परंतु जागांचा अंदाज बर्‍याच प्रमाणात चुकू शकतो. तसे झाल्यास माझ्या प्रारूपाकडे नव्याने पहावे लागेल. मत टक्केवारी लोकसभा निवडणुकीत ६१.२९% मतदारांनी मत दिले होते. या विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी यापेक्षा कमी असेल असे वाटते. कदाचित ६०% किंवा ५८% पेक्षाही कमी असल्यास नवल वाटणार नाही. एप्रिल-मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मतांची टक्केवारी खालीलप्रमाणे होती. महाराष्ट्रातील एकूण दिलेली मते - ५ कोटी ७० लाख (मत टक्केवारी ६१.२९%) काँग्रेस - १७.९२% (लढविलेल्या जागा - १७ + १ = १८ सांगली धरून) उबाठा - १६.५२% (लढविलेल्या जागा - २१) शप गट - १०,२७% (लढविलेल्या जागा - १०) भाजप - २६.१८% (लढविलेल्या जागा - २८) शिंदे गट - १२.९५% (लढविलेल्या जागा - १५) अप गट - ४.४२% (लढविलेल्या जागा - ४ + १ = ५ जानकर धरून) मविआ आघाडीत सर्वाधिक जागा उबाठाने लढविल्या होत्या, परंतु प्रति मतदारसंघात सर्वात कमी मते उबाठाला मिळाली आहेत. दुसरीकडे महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजपने लढविल्या, परंतु प्रति मतदारसंघात सर्वात कमी मते शिंदे गटाला मिळाली आहेत. लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकार व पंतप्रधान निवडायचा असल्याने महाराष्ट्रात स्थानिक भाजप नेतृत्वाविरूद्ध काहिशी नाराजी असूनही महायुती व विशेषतः भाजपला काही प्रमाणात लाभ झाला होता. परंतु विधानसभा निवडणुकीत वेगळे मुद्दे असतात. विधानसभा निवडणुकीत राज्य सरकार निवडायचे आहे. त्यामुळे मोदींच्या चेहर्‍याचा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळणार नाही. महाराष्ट्रातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर साधारणपणे दोन्ही निवडणुका एक वर्षापेक्षा कमी कालावधीत पुढेमागे होतात. आधी लोकसभा निवडणूक होते व नंतर काही महिन्यातच विधानसभा निवडणूक होते (मार्च १९७७ मध्ये लोकसभा निवडणूक व जवळपास १ वर्षानंतर १९७८ मध्ये विधानसभा निवडणू़क झाली होती. मार्च १९९५ मध्ये विधानसभा निवडणूक व मे १९९६ मध्ये लोकसभा निवडणूक झाली होती. सप्टेंबर १९९९ मध्ये दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या होत्या.). २००४ पासून मे महिन्यात लोकसभा निवडणूक व ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणूक होते. १९८०: लोकसभा - विरोधी पक्ष ९ आणि काँग्रेस ३९, विधानसभा - विरोधी पक्ष ८०, कॉंग्रेस १९२ १९८५: लोकसभा - विरोधी पक्ष ५ आणि काँग्रेस ४३, विधानसभा - विरोधी पक्ष १०४, कॉंग्रेस १६२ १९९०: लोकसभा - महायुती १४, जनता दल ५ आणि काँग्रेस २८, विधानसभा - महायुती ९४, जनता दल २५, कॉंग्रेस १४१ १९९५: विधानसभा - महायुती १३८ आणि काँग्रेस ८०, १९९६ लोकसभा - महायुती ३३, कॉंग्रेस १५ १९९९: लोकसभा - महायुती २७ आणि काँग्रेस २१, विधानसभा - महायुती १२५, कॉंग्रेस १३३ २००४: लोकसभा - महायुती २५ आणि काँग्रेस आघाडी २३, विधानसभा - महायुती ११६, कॉंग्रेस आघाडी १४० २००९: लोकसभा - महायुती २० आणि काँग्रेस आघाडी २५, विधानसभा - महायुती ९०, कॉंग्रेस आघाडी १४४ २०१४: लोकसभा - महायुती ४२ आणि काँग्रेस आघाडी ६, विधानसभा - महायुती १८६, कॉंग्रेस आघाडी ८३ २०१९: लोकसभा - महायुती ४१ आणि काँग्रेस आघाडी ५, विधानसभा - महायुती १६१, कॉंग्रेस आघाडी ९८ साधारणपणे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जो कल दिसतो, तोच कल बराचसा विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्तीत होतो. लोकसभा निवडणुकीत मोठ्या गटाला जितक्या जागा मिळतात, त्या विधानसभा निवडणुकीत काही प्रमाणात कमी होतात परंतु मतदारांचा कल बर्‍याच प्रमाणात तसाच राहतो. _________________________________________________________________________ या पार्श्वभूमीवर २०२४ विधानसभा निवडणुकीत साधारणपणे खालीलप्रमाणे परिस्थिती असू शकते. काँग्रेस काँग्रेस १०१ जागा लढवित आहे. काँग्रेस अंदाजे १८% मते व ६०-७० जागा मिळवेल. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ८७ जागा लढवून अंदाजे १५% मते व ५०-६० जागा मिळवेल. ऊबाठा गट शिवसेना १९८९ पासून (२०१४ चा अपवाद वगळता) विधानसभा निवडणूक युतीत लढत आहे. परंतु शिवसेनने जिंकलेल्या एकूण जागांचे लढवित असलेल्या एकूण जागांशी प्रमाण (म्हणजे स्ट्राईक रेट) खूप कमी आहे. १९९० - लढविलेल्या एकूण जागा १८३, जिंकलेल्या जागा ५२, विजयाचे प्रमाण = २८.४१ १९९५ - लढविलेल्या एकूण जागा १७१, जिंकलेल्या जागा ७३, विजयाचे प्रमाण = ४२.६९ १९९९ - लढविलेल्या एकूण जागा १७१, जिंकलेल्या जागा ६९, विजयाचे प्रमाण = ४०.३५ २००४ - लढविलेल्या एकूण जागा १६९, जिंकलेल्या जागा ६२, विजयाचे प्रमाण = ३६.६८ २००९ - लढविलेल्या एकूण जागा १६९, जिंकलेल्या जागा ५२, विजयाचे प्रमाण = २६.०३ २०१४ - लढविलेल्या एकूण जागा २८६, जिंकलेल्या जागा ६३, विजयाचे प्रमाण = २२.०२ २०१९ - लढविलेल्या एकूण जागा १२४, जिंकलेल्या जागा ५६, विजयाचे प्रमाण = ४५.१६ शिवसेनेचा सर्वाधिक स्ट्राईक रेट २०१९ मघ्ये ४५.१६ होता जेव्हा शिवसेना युतीत निवडणू़क लढली होती व सर्वात कमी स्ट्राईक रेट २०१४ मध्ये २२.०२ होता जेव्हा शिवसेना स्वबळावर लढली होती. आता शिवसेनेचे तुकडे पडले आहेत. २००९ मध्ये राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचा स्ट्राईक रेट फक्त २६.०३ होता. उबाठा सेना पुन्हा एकदा युतीत आहे व फक्त ९६ जागांवर लढत आहे. अश्या परिस्थितीत उबाठा सेनेला ४० पेक्षा जास्त जागा मिळणे अवघड वाटते. प्रत्यक्षात शिंदे सेनाला मूळ सेनेची जाणार असलेली मते लक्षात घेतली तर उबाठा सेना अंदाजे १२% मते घेऊन २०-३० जागा मिळवेल. म्हणजे मविआ एकत्रित ४५% मते व १३०--१६० जागा मिळवेल. ____________________________________________________________________ भाजप भाजपने २०१४ मध्ये स्वबळावर २५२ जागा लढवून २८.५०% मते मिळवून १२२ जागा जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये शिवसेनेशी युती करून भाजपने १६४ ( भाजप १४६ + मित्रपक्ष १८ कमळ चिन्हावर) जागा लढवून २५.७५% मते मिळवून १०३ जागा जिंकल्या आणि सत्ता गमावली. २०२४ मध्ये भाजप १४८ जागांवर लढत आहे. आता मोदींचा चेहरा नाही. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही हिंदुत्व हा मुद्दा अजिबात नाही (लव जिहाद, बटेंगे तो कटंगे, बांगलादेशातील हिंदूंना मारपीट, अयोध्येतील श्रीराम मंदीर अश्या मुद्द्यांचा मतदारांवर शून्य प्रभाव पडेल). इतर सर्व पक्षांप्रमाणे भाजपचा प्रचारही दिशाहीन व निष्प्रभ आहे. भाजपला साधारणपणे २२-२३% मते मिळतील व ५०--६० च्या आसपास जागा मिळतील. शिंदे गट शिंदे गट ८५ जागा लढवित आहे. शिंदेंची प्रतिमा बरीच उजळली आहे. परंतु शिंदेंनी सुद्धा बरेच चिकीचे उमेदवार दिले आहेत. नेत्याची मान्यता पक्षाच्या मान्यतेपेक्षा कायमच जास्त असते. मोदींची लोकप्रियता बहुतेक वेळा ६०% किंवा अधिक असते, परंतु भाजप किंवा रालोआला ४४% हून जास्त मते मिळाली नाही. शिंदे गटाला साधारणपणे १२% मते व २०-२५ जागा मिळतील. अजित पवार गट अप गट ५१ जागा लढवून साधारणपणे ७% मते व १०-१५ जागा मिळवेल. म्हणजे महायुती एकत्रित ४१-४२% मते व ८०-१०० जागा मिळवेल. =================================================== बहुतेक सर्व वृत्तवाहिन्यांनी मतदानपूर्व सर्वेक्षण करणे टाळले आहे कारण सद्यस्थितीत प्रचंड खिचडी झालेल्या राजकीय वातावरणात कोण किती जागा जिंकेल याचा अंदाज काढणे खूपच अवघड आहे आणि दुसरं कारण म्हणजे हरयाना निवडणुकीचे सर्व वाहिन्यांचे सर्व अंदाज पूर्ण चुकले होते. तरीसुद्धा अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. मी अंदाज व्यक्त केलेली मतांची टक्केवारी बरोबर असण्याची बरीच शक्यता वाटतेय, पण जागांचा अंदाज बर्‍यापैकी चुकू शकतो. ____________________________________________________________________________________ मनसे १५० जागा लढवित आहे. मनसे २-३% टक्के मते व ३-४ जागा जिंकू शकते. ________________________________________________________________ इतर काही अंदाज - - मनसे, शेकाप, सप, एमआयएम, वंचित, बच्चू कडूचा पक्ष, जनसुराज्य असे चिल्लर पक्ष एकत्रित १५-२० जागा व अपक्ष १५-२० जागा जिंकतील. - सर्व पक्षांमधील सर्वात मोठ्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. - कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष असण्याची शक्यता आहे. त्याखालोखाल भाजप किंवा शप गट, त्याखालोखाल शिंदे गट, नंतर उबाठा आणि शेवटी सहाव्या क्रमांकावर अप गट असेल. - कोणत्याही एका पक्षाला तीन अंकी जागा मिळणार नाहीत. कोणत्याही २ पक्षांना एकत्रित १४५ जागा मिळणार नाहीत. सरकार बनविण्यासाठी ३ किंवा अधिक पक्षांना एकत्र यावे लागेल, यातून एखादी नवीन खिचडी निर्माण होण्याची शक्यता आहे. - मविआ सत्तेवर आल्यास वर्षा गायकवाड किंवा प्रणिती शिंदे मुख्यमंत्री होण्याची शक्यता किंवा कदाचित यशोमती ठाकूर असतील. - महायुती सत्तेवर आल्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार - उद्धव ठाकरे व फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही - महायुती सत्तेत न आल्यास महाराष्ट्र भाजपत नेतृत्वबदल होण्याची दाट शक्यता. विधानसभा निवडणुकीत पराभव होऊन सत्तेत न येणे हे महाराष्ट्र भाजपसाठी व महाराष्ट्रासाठी इष्टापत्ती ठरेल. - मविआ सत्तेवर येण्याची शक्यता - कोणत्याही आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास निकालापश्चात काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिंदे गट ही नवीन आघाडी निर्माण होण्याची शक्यता. अश्या परिस्थितीत उबाठा पुन्हा एकदा भाजपशी जुळवून घेण्याची शक्यता. - विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार काकांकडे परत जाण्याची शक्यता - जे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार राखीव जागा वाढविते, ते सरकार नंतर लगेचच्या निवडणुकीत सत्तेत परतत नाही हे १९९१ पासून अनेकदा दिसले आहे. * १९९० - वि. प्र. सिंगांनी मंडल आयोगाच्या अहवालानुसार २७% राखीव जागा इतर मागासवर्गीयांना दिल्या पण १९९१ लोकसभा निवडणूक हरले. * १९९३ - जयललिताने तामिळ्लनाडूत राखीव जागांचे प्रमाण ६९% पर्यंत वाढविले, पण १९९६ विधानसभा निवडणूक हरली. * १९९३ - शरद पवारांनी अनेक नवीण जातींचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश केला, पण १९९५ विधानसभा निवडणूक हरले. * २००३ - राजस्थान मुख्यमंत्री गेहलोतांनी चक्क ब्राह्मणांना राखीव जागा दिल्या, पण २००३ विधानसभा निवडणूक हरले. * २००८ - राजस्थान मुख्यमंत्री वसुंधरां राजेंनी गुज्जरांना राखीव जागा दिल्या, पण २००८ विधानसभा निवडणूक हरल्या. * २०१३ - राजस्थान मुख्यमंत्री गेहलोतांनी गुज्जरांना राखीव जागा दिल्या, पण २०१३ विधानसभा निवडणूक हरले. *२०१३ - मनमोहन सिंगांनी जाटांचा समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये केला, पण २०१४ लोकसभा निवडणूक हरले. *२०१४ - पृथ्वीराज चव्हाणांनी मराठ्यांना १६% व मुस्लिमांना ५% राखीव जागा दिल्या, पण २०१४ विधानसभा निवडणूक हरले. *२०१९ -- फडणवीसांनी मराठ्यांना १६% राखीव जागा दिल्या, पण २०१९ विधानसभा निवडणूकीत सत्तेत परतले नाहीत. आता २०२४ मध्ये शिंदेंनी मराठ्यांना १०% राखीव जागा दिल्या आहेत. वरील कलानुसार विधानसभा निवडणूकीनंतर ते सत्तेत परततील का हे २३ नोव्हेंबरला समजेलच. - पुण्यातील सर्व ८ मतदारसंघ भाजपने स्वबळावर २०१४ विधानसभा निवडणुकीत जिंकले होते. २०१९ मध्ये शिवसेनेबरोबर युती असूनही यतील हडपसर व वडगाव शेरी हे मतदारसंघ भाजप हरला होता. आता हे २ मतदारसंघ भाजपने अजित पवार गटाला दिले आहेत. उर्वरीत सर्व ६ मतदारसंघांपैकी पर्वती, कसबा, खडकवासला, कँटोंमेंट व शिवाजीनगर मध्ये खूओ चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. कोथरूडही धोक्यात होता. परण्तु चंपाने धूर्तपणे कोथरूडमधील प्रतिस्पर्धी मेधा कुलकर्णी व मुरलीधर मोहोळ यांना वाटेतून दूर केले व बंडखोर अमोल बालवडकरांना बसविण्यात आले. त्यात भर म्हणून तिरंगी लढत निर्माण झाली (चंपा, उबाठाचे मोकाटे व मनसेचे किशोर शिंदे) ज्याचा लाभ भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत बापटांना कोथरूडमध्ये १ लाख मतांची आघाडी होती. परंतु विधानसभा निवडणूकीत कोंग्रेस, राष्ट्रवादी व मनसेचे संयुक्त उमेदवार किशोर शिंदे यांनी चांगली लढत देऊन ८०,००० मते मिळविल्याने चंपा फक्त २५,००० मतांनी जिंकले. पण आता ३ उमेदवार असल्याने भाजपला काळजी नाही. २०१४ मध्ये ८ पैकी ८ व २०१९ मध्ये ८ पैकी ६ जागा भाजपने जिंकल्या होत्या. आता भाजप ६ व अप गट २ जागा लढवित आहे. २०२४ मध्ये भाजप व अप गट एकत्रित ६ पेक्षा कमी जागा जिंकेल असा अंदाज आहे. __________________________________________________________ इच्छा यादी खालील निकाल लागावे अशी मनोमन इच्छा आहे. यातील किती इच्छा पूर्ण होतील ते २३ नोव्हेंबरला समजेलच. - कोणत्याही आघाडीला बहुमत मिळू नये व सरकार बनविता येऊ नये. - महाराष्ट्रात पुढील १० वर्षे राष्ट्रपती राजवट असावी. - भाजप व उबाठा गटाला शून्य जागा मिळाव्या. - कोणीही ठाकरे, राणे व बारामतीकर विधानसभेत नसावा. - आव्हाड, नबाब मलिक पिता-पुत्री, पटोले, भास्कर जाधव, सर्व मुस्लिम उमेदवार, कडू, संजय राठोड, भ्रष्टाचाराचे आरोप झालेले सर्वजण इ. पराभूत व्हावे.

वाचने 39428
प्रतिक्रिया 517

प्रतिक्रिया

काही लोक फडणवीसांचा आत्यंतिक द्वेष करतात. याला वैयक्तिक कारणे असू शकतात किंवा ते केवळ ब्राम्हण आहेत हे असू शकते किंवा जास्त महत्त्वाचे कारण म्हणजे आजतागायत फडणवीस हे विरोधकांच्या हातास लागलेले नाहीत. फडणवीस हि विरोधकांच्या उरात झालेली आणि खोलवर चरत गेलेली जखम काही केल्या भरत नाही त्यांच्या वर कितीही आरोप झाले तरी त्यांच्याविरुद्ध तसूभर पुरावा सापडलेला नाही. काकांना पुरून उरेल असा हा एकमेव नेता आहे. गेल्या पाच वर्षातील कारकीर्द पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे काकांनी १०५ आमदारांना घरी बसवले म्हणून भूभू:कार करत असलेले अनेक वाचाळवीर पुढच्या अडीच वर्षात काकांचा पक्ष आणि शिवसेना यांचे पक्ष दुभंगले आणि काका आणि उद्धव ठाकरे घरी बसले याबद्दल एक शब्द बोलत नाहीत. १०५ आमदारांपैकी एकही पाच वर्षात फुटला नाही आणि दोन विरोधी पक्षांचे चार पक्ष झाले याकडे लोक सोयीस्कर दुर्लक्ष करतात. अर्थात याचे श्रेय ते फडणवीसांना देण्याचा उदार पणा दाखवणार नाहीत यात मला कोणतीही शंका नाही. आणि ईडी आणि आयकर खात्याची भीती हे इव्ही एम मशीन सारखे कायम वाजवणारे तुणतुणेच ते पुढे करतील यात शंका नाही. बाकी सांख्यिकीने सर्व काही गोष्टी सिद्ध करता येतात केवळ एक गोष्ट सोडून ती म्हणजे सत्य. बाकी येणाऱ्या काही दिवसात सत्य पुढे येईलच. पण माझा अंदाज असा आहे कि भाजप सोडला तर कोण्ताही पक्ष शंभरी काही गाठणार नाही. ( काकांचे चेले इतका ऊदो उदो करतात पण काकांना आजतागायत काही आमदारांचे शतक गाठता आलेले नाही कि खासदारांची दोन आकडी संख्या काही गाठता आलेली नाही) गमतीची गोष्ट म्हणजे मोदींना केवळ २४० जागा मिळाल्या म्हणून तिच्या बडवणारे त्यांचे चेले हे विसरतात कि सुनील तटकरे यांची एकमेव जागा (रायगड) काकांना २०२४ मध्ये निवडून आणता आलेली आहे. आणि ती सुद्धा तटकरे यांची वडिलोपार्जित जागा त्यांच्या स्वबळावर आलेली आहे.

In reply to by सुबोध खरे

अर्रर्रर्र शेवटच्या वाक्यात घोळ झाला आहे. राष्ट्रवादीचे दोन पक्ष झाल्यामुळे हा घोळ झाला आहे. काकांचे ८ खासदार निवडून आलेले आहेत ( तरीही दोन आकडी काही आलेले नाहीत) असो चुकी बद्दल दिलगिरी आहे

In reply to by सुबोध खरे

ह्यावर लिहायला भरपूर आहे पण असो. २०१९ ला तुम्ही लोकसभेला फडणवीसांनी २३/२४ खासदार भाजपला निवडून दिले असे म्हणत होतात, पण २०२४ ला पराभव झाल्यावर फडणवीसांमुळे पराभव झाला असे आपण कुठेही लिहिले नाही. ही संघ टेक्निक झाली, विजय झाला तर संघामुळे, पराभव झाला तर संघ नव्हताच असे हात वर करायचे. असे आंधळे एकतर्फी प्रेम असल्यावर लिहायला काही उरतच नाही. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

२०२४ ला पराभव झाल्यावर फडणवीसांमुळे पराभव झाला कोणाचा पराभव झाला? केंद्रात श्री मोदींचे सरकार घट्ट आहे आणि महाराष्ट्रात शिंदे सरकार. दुसऱ्या कोणत्याही पक्षाला १०० चा आकडा गाठता आलेला नाही कुठे आणि कुणाचा पराभव झाला? असली भंपक वक्तव्ये करता म्हणूनच तुम्हाला कोणी सिरियसली घेत नाही

In reply to by सुबोध खरे

कुठे आणि कुणाचा पराभव झाला? लोकसभेला पराभव झाला ना भाजपचा महाराष्ट्रात? फडणवीस बोलले ना? “मला मोकळे करा” :)

हिमाचल प्रदेश सरकारने पैसे नाहीत म्हणून दिल्लीतील हिमाचल भवनाच्या वीजेचे बिल भरले नाही म्हणून ते हिमाचल भवनच आता लिलावात निघायची वेळ आली आहे. कोणीही सत्तेत आले तरी महाराष्ट्रात पण असे काही होईल ही भिती वाटते. अशा फुकटची खिरापत वाटायच्या घोषणा करायला बंदी घालायला हवी. अर्थात तसे होणे नाही. कारण तो कायदा पास कोण करणार? तर तेच राजकारणी- त्यापैकी जे संसदेत गेले असतील ते. सगळ्यांचेच हितसंबंध अशा खिरापती वाटण्यात गुंतलेले आहेत मग त्यावर बंदी घालणार कोण? कोणी १५००, कोणी २१००, कोणी ३०००, कोणी खटाखट ८५०० द्यायची आश्वासने देत आहे. काय चालू आहे?

एक चूक लक्षात आलीये. लोकसभा निवडणुकीत प्रमुख पक्ष वगळता इतर फारसे स्थानिक पक्ष निवडणुकीत नव्हते (उदा. मनसे, जनसुराज्य). पण विधानसभा निवडणुकीत अनेक स्थानिक लहान पक्ष रिंगणात आहेत. ते पक्ष, बंडखोर व अपक्ष काही टक्के मते घेतील हे लक्षात आले नाही. हे पक्ष एकत्रित ७-८% मते घेऊ शकतील. उदाहरणार्थ मनसे जी २-३% मते घेईल त्यातील बहुतांशी शिवसेनेच्या दोन्ही गटातून येतील. इतर पक्षसुद्धा प्रमुख पक्षांची काही मते घेतील. म्हणजे दोन्ही आघाड्यांची अंदाजे ३-४% मते या पक्षांकडे वळतील. म्हणजे मविआ अंदाजे ४२% मते मिळवेल (कॉंग्रेस अंदाजे १७%, शप गट अंदाजे १४% व उबाठा अंदाजे ११% मते मिळवेल). दुसरीकडे महायुती अंदाजे ३८-३९% मते मिळवेल (भाजप अंदाजे २१-२२%, शिंदे गट अंदाजे ११%, अप गट अंदाजे ६% मिळवेल). अर्थात यामुळे जागांच्या अंदाजात बदल होणार नाही.

मनसेचा निवडून येईल असा कुठल्या मतदारसंघात उमेदवार आहे का?

कुठे कुठे मतदानाचे काय चित्र? कितपत गर्दी, रांगा वगैरे? टीव्हीवर आकडे, टक्के दाखवत आहेत. पण ऑन ग्राउंड आपापल्या एरियात काय दिसते ते वेगळेच असू शकते.

मतदानाचे आकडे अजूनही बदलत आहेत. याचा अर्थ सहा वाजता मतदान केंद्रात लाईनमधे माणसे होती व सहानंतरही मतदान चालू होतं. मतदान चांगलेच वाढले आहे. मविआ १०० गाढू शकणार नाही असं वाटायला लागले आहे. मला नव्याने आकडेमोड करायला लागणार आहे. अंदाजे आणखीन ४ टक्के मतदान वाढले आहे. कटेंगें तो बटेंगें यशस्वी झाल्यासारखे वाटतंय. जर युति स्विप करणार असं दिसलं तर उद्या शेअरबाजार गॅपअप होऊ शकतो का ते बघायचं.

मतांची अंतिम टक्केवारी ६५.०८% आहे. म्हणजे २०२४ लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सुमारे ३.७९% वाढ झाली आहे. विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी कमी होईल हा माझा अंदाज पूर्ण चुकला. असो. उद्या भाकड दिवस आहे. ज्याची अत्यंत आतुरतेने प्रतीक्षा होती ती ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका परवा २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होत आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थ येथे आहे. २३ ला मतमोजणी आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ मतदान केंद्र : वधघट टक्केवारी (उतरत्या क्रमानुसार) अहमदनगर वाढलेले मतदान Shrirampur : 5.95 Rahuri : 5.78 Ahmednagar City : 5.1 Shrigonda : 4.55 Akole : 3.57 Shirdi : 3.54 Sangamner : 2.58 Shevgaon : 2.03 Karjat jamkhed : 0.86 घटलेले मतदान Nevasa : -0.51 Parner : -4.17 Kopargaon : -4.91 अकोला वाढलेले मतदान Murtizapur : 11.72 Balapur : 6.75 Akola West : 6.5 Akola East : 5.56 Akot : 4.02 अमरावती वाढलेले मतदान Teosa : 8.42 Melghat : 7.14 Amravati : 6.02 Badnera : 5.12 Morshi : 5.02 Achalpur : 3.87 Daryapur : 1.88 Dhamamgaon railway : 0.54 औरंगाबाद वाढलेले मतदान Vaijapur : 10.03 Gangapur : 8.55 Sillod : 4.77 Paithan : 4.42 Phulambri : 2.11 Aurangabad West : 1.02 घटलेले मतदान Aurangabad central : -0.35 Aurangabad East : -0.57 Kannad : -2.36 बीड वाढलेले मतदान Ashti : 6.74 Kaij : 0.11 घटलेले मतदान Parli : -1.12 Georai : -1.57 Majalgaon : -2.76 Beed : -4.37 भंडारा वाढलेले मतदान Bhandara : 5 Tumsar : 1.74 Sakoli : -3.74 बुलठाणा वाढलेले मतदान Mehkar : 9.25 Chikhli : 5.86 Sindkhed Raja : 5.6 Khamgaon : 5.39 Buldhana : 3.64 Jalgaon (Jamod) : 2.7 Malkapur : 1.44 चंद्रपूर वाढलेले मतदान Brahmapuri : 9.04 Ballarpur : 7.27 Chimur : 6.91 Warora : 6.89 Chandrapur : 6.77 Rajura : 1.56 धुळे वाढलेले मतदान Dhule City : 8.61 Sakri : 4.48 Dhule Rural : 3.62 घटलेले मतदान Shirpur : -0.87 Shindkheda : -0.88 गडचिरोली वाढलेले मतदान Gadchiroli : 4.7 Armori : 2.95 Aheri : 2.91 गोंदिया वाढलेले मतदान Gondiya : 6.09 Amgaon : 3.78 Arjuni-morgaon : 0.3 घटलेले मतदान Tirora : -1.27 हिंगोली वाढलेले मतदान Kalamnuri : 3.97 Hingoli : 3.89 घटलेले मतदान Basmath : -2.29 जळगांव वाढलेले मतदान Bhusawal : 8.38 Jalgaon City : 7.42 Pachora : 4.18 Jalgaon Rural : 3.83 Raver : 2.72 Amalner : 2.64 Muktainagar : 2.62 Erandol : 2.26 "Jamner : 2.17" घटलेले मतदान Chopda : -0.81 Chalisgaon : -1.85 जालना वाढलेले मतदान Jalna : 7.75 Bhokardan : 6.47 Badnapur : 5.9 Ghansawangi : 3.85 Partur : 0.67 कोल्हापूर वाढलेले मतदान Chandgad : 5.97 Kolhapur North : 4.31 Shirol : 3.35 Radhanagari : 2.66 Hatkanangle : 2.12 Kagal : 0.51 Karvir : 0.46 Ichalkaranji : 0.36 घटलेले मतदान Kolhapur South : -0.02 Shahuwadi : -1.1 लातूर वाढलेले मतदान Latur Rural : 7.77 Udgir : 7.05 Latur City : 5.74 Nilanga : 3.44 Ausa : 2.73 Ahmadpur : 1.69 मुंबई शहर वाढलेले मतदान Malabar hill : 5.54 Mahim : 5.33 Shivadi : 5.09 Worli : 4.8 Mumbadevi : 4.75 Colaba : 4.49 Wadala : 4.08 Byculla : 2.28 Dharavi : 2.12 Sion koliwada : 0.96 मुंबई उपनगर वाढलेले मतदान Andheri West : 9.48 Goregaon : 8.99 Versova : 8.82 Kurla(SC) : 7.83 Mulund : 6.68 Vandre West : 6.36 Jogeshwari East : 6.32 Borivali : 5.44 Dahisar : 5.1 Ghatkopar East : 5.05 Charkop : 5.03 Mankhurd shivaji Nagar : 4.91 Bhandup West : 4.89 Andheri East : 4.78 Kandivali East : 4.72 Ghatkopar West : 4.57 Vandre East : 4.3 Vile parle : 3.89 Magathane : 3.25 Kalina : 2.76 Chembur : 2.67 Dindoshi : 2.06 Vikhroli : 1.63 Malad West : 0.68 घटलेले मतदान Anushakti Nagar : -1.27 Chandivali : -1.69 नागपूर वाढलेले मतदान Nagpur North : 7.17 Nagpur West : 6.45 Nagpur South : 5.65 Nagpur East : 5.3 Ramtek : 5.05 Nagpur central : 4.66 Nagpur South West : 4.51 Kamthi : 4.15 Umred : 0.61 घटलेले मतदान Savner : -2.06 Hingna : -2.09 Katol : -3.09 नांदेड वाढलेले मतदान Bhokar : 0.68 Hadgaon : 0.32 घटलेले मतदान Kinwat : -1.05 Deglur : -1.28 Loha : -2.63 Nanded North : -3.79 Naigaon : -4.6 Mukhed : -5.91 Nanded South : -6.1 नंदूरबार वाढलेले मतदान Nandurbar : 9.95 Nawapur : 3.12 Shahada : 1.97 घटलेले मतदान Akkalkuwa : -5.94 नाशिक वाढलेले मतदान Nandgaon : 9.29 Dindori : 8.09 Malegaon outer : 7.98 Sinnar : 7.98 Igatpuri : 7.82 Nashik central : 7.74 Nashik East : 6.71 Chandvad : 6.67 Yevla : 6.36 Devlali : 5.54 Baglan : 5.14 Kalwan : 2.52 Nashik West : 1.59 Malegaon central : 1.49 घटलेले मतदान Niphad : -2.01 उस्मानाबाद वाढलेले मतदान Umarga : 4.32 Osmanabad : 2.55 Tuljapur : 2.02 घटलेले मतदान Paranda : -3.51 पालघर वाढलेले मतदान Palghar : 23.83 Dahanu : 11.5 Vikramgad : 9.16 Nalasopara : 5.27 घटलेले मतदान Boisar : -1.31 Vasai : -1.9 परभणी वाढलेले मतदान Pathri : 3.24 Parbhani : 2.87 Gangakhed : 2.7 Jintur : ? पुणे वाढलेले मतदान Pune cantonment : 9.42 VADGAON SHERI : 8.74 Kasbapeth : 7.14 Shivajinagar : 7.04 Parvati : 6.21 Khadakwasala : 5.13 Bhor : 4.91 Daund : 4.11 Kothrud : 3.98 Ambegaon : 3.14 Chinchwad : 3.07 Hadapsar : 2.88 Baramati : 2.36 Bhosari : 1.43 Shirur : 1.19 Pimpri : 1.08 Junnar : 0.92 Maval : 0.89 Khed alandi : 0.32 घटलेले मतदान Indapur : -0.24 Purandar : -5.72 रायगड वाढलेले मतदान Mahad : 3.88 Alibag : 3.67 Karjat : 3.47 Panvel : 3.19 Uran : 1.57 घटलेले मतदान Shrivardhan : -0.14 Pen : -8.09 रत्नागिरी वाढलेले मतदान Rajapur : 7.35 Ratnagiri : 5.17 Guhagar : 3.13 Chiplun : 2.54 घटलेले मतदान Dapoli : -0.24 सांगली वाढलेले मतदान Miraj : 10.5 Tasgaon-Kavathe Mahankal : 5.89 Sangli : 4.91 Palus-Kadegaon : 4.9 Khanapur : 3.99 Islampur : 0.78 Shirala : 0.21 सातारा वाढलेले मतदान Koregaon : 9.93 Karad North : 6.94 Phaltan : 6.27 Patan : 5.3 Karad South : 4.39 Man : 4.39 Satara : 4.36 घटलेले मतदान Wai : -0.96 सिंधुदुर्ग वाढलेले मतदान Kudal : 7.29 Sawantwadi : 4.16 Kankavli : 1.71 सोलापूर वाढलेले मतदान Madha : 6.18 Solapur South : 6 Sangola : 4.83 Akkalkot : 4.49 Solapur City North : 4.42 Mohol : 3.03 Malshiras : 1.78 Solapur City central : 1.23 घटलेले मतदान Barshi : -0.08 Karmala : -1.52 Pandharpur : -2.24 ठाणे वाढलेले मतदान Dombivali : 15.38 Kalyan East : 14.82 Kalyan West : 12.85 Kalyan Rural : 11.24 Kopri-Pachpakhadi : 10.65 Belapur : 10.02 Bhiwandi Rural (S.T.) : 9.29 Ovala - Majiwada : 9.19 Airoli : 8.32 Ulhasnagar : 7.03 Murbad : 6.4 Thane : 6.25 Ambernath : 5.31 Bhiwandi West : 3.76 shahapur : 3.36 Mira Bhayandar : 3.35 Mumbra-Kalwa : 1.94 Bhiwandi East : 1.31 वर्धा वाढलेले मतदान Wardha : 10.97 Hinganghat : 4.81 Arvi : 4.27 Deoli : 4.05 वाशिम वाढलेले मतदान Washim : 5.46 Karanja : 3.63 Risod : 1.64 यवतमाळ वाढलेले मतदान Yavatmal : 6.36 Arni : 5.07 Ralegaon : 3.68 Pusad : 1.75 Umarkhed : 1.72 Wani : 1.46 घटलेले मतदान Digras : -2.9

In reply to by शाम भागवत

अंदाजे ७०-८० ठिकाणी कॉंग्रेस व भाजपाच्या थेट लढती आहेत. तिथे वाढलेल्या मतदानाने काय परिणाम केलाय ते नीट तपासता येऊ शकेल.

प्रशासकांना विनंती आहे की कृपया खालील पोस्ट काढून टाकावी. पूर्वपरीक्षण बटणा दाबण्याच्या ऐवजी चूकून प्रकाशित करा बटण दाबले गेले होते. नंतर ही पोस्ट व्यवस्थीत रित्या लिहून पोस्ट केलेली आहे. https://www.misalpav.com/comment/1186378#comment-1186378

खालील निकाल लागावे अशी मनोमन इच्छा आहे. यातील किती इच्छा पूर्ण होतील ते २३ नोव्हेंबरला समजेलच. - कोणत्याही आघाडीला बहुमत मिळू नये व सरकार बनविता येऊ नये. - महाराष्ट्रात पुढील १० वर्षे राष्ट्रपती राजवट असावी. - भाजप व उबाठा गटाला शून्य जागा मिळाव्या. - कोणीही ठाकरे, राणे व बारामतीकर विधानसभेत नसावा. - आव्हाड, नबाब मलिक पिता-पुत्री, पटोले, भास्कर जाधव, सर्व मुस्लिम उमेदवार, कडू, संजय राठोड, भ्रष्टाचाराचे आरोप झालेले सर्वजण इ. पराभूत व्हावे.
हम्म...... तथास्तु !!

काहीही झाले तरी मविआ सत्तेत येणार आहे. कमी पडणारे मनुष्यबळ अजितदादा पुरवतील. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

काहीही झाले तरी मविआ सत्तेत येणार आहे अगदी बोगस मतदान, पैसे वाटणे, खोके आणि पेट्या आणि शेवटी इ व्ही एम होऊनही? काय सांगताय? मग हे असं कसं झालं ? आता या लोकांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाहीये!

सर्व सर्व पक्ष, अपक्ष, चोरपक्ष आणि सर्व इतर सर्व उमेदवारांना आणि महाराष्ट्राला अच्छे दिनासाठी शुभेच्छा. श्री-गुरुजींनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा. डोळे पाणावले पुन्हा धागा वगैरे पाहुन. मला वाटलं लोकसभेच्या निकाला नंतर, 'झोला लेके चल पडेंगे' म्हणना-या शेठबरोबर नर्मदामय्याच्या दर्शनाला गेले की काय... बरं वाटलं येत राहा. (अजून दळन वाचलं नाही) -दिलीप बिरुटे

आजपासून हिंदू धर्मावरील धोका पुढील साडेचार वर्षांसाठी टळलाय. वक्फ बोर्डलाही पुढे ४.५ वर्षा घाबरू नये .:) - जनहितार्थ.

In reply to by टीपीके

असू दे. ते बाजार चांगलारितीने खाली आणतात. २३ तारखेपर्यंत मविआ जिंकलीच पाहिजे. 😀

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आजपासून हिंदू धर्मावरील धोका पुढील साडेचार वर्षांसाठी टळलाय. वक्फ बोर्डलाही पुढे ४.५ वर्षा घाबरू नये .:)
=)) अरे देवा, हे काही बरं नै ये हं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वक्फ बोर्डाला कोण घाबरतोय? :) लढाई ते वक्फ बोर्ड चालवणाऱ्या २०० घराण्यांविरूध्द आहे. ती लढाई जिंकली मग वक्फ बोर्डाचा पैसा या लोकांची घरे भरण्यासाठी वापरला न जाता सर्वसामान्य मुस्लिमांसाठी वापरता येईल. फक्त ती २०० घराणी सांगत सुटली आहेत की सगळं इस्लाम विरोधात आहे. त्यामागे मुस्लिम जाताहेत. ते नैसर्गिकही आहे. तसच हिंदूमधले काही असतात की ज्यांना शेखर गुप्तांसारख दिसत असूनही पहावयाचं नसतं. त्यांच्याशी अप्रत्यक्ष लढाई आहे. :)

सोलापूरमधील एका मतदारसंघात उबाठाचा उमेदवार आहे. त्याच्या प्रचारात प्रणिती शिंदे सहभाग घेत नाही असे उठांनी एका भाषणात सांगून नाराजी व्यक्त करून मुकाट्याने प्रचारात सामील व्हा, लोकसभा निवडणुकीत तुमच्या प्रचारासाठी मी २-३ सभा घेतल्या होत्या अशी दमदाटी केली होती. अर्थात शिंदे कुटुंबियांनी पूर्ण दुर्लक्ष केले होते. काल मत देऊन बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुशीलकुमार शिंदेंनी आमचा पाठिंबा एका स्थानिक अपक्ष उमेदवारास आहे असे सांगितल्याने उबाठावाल्यांना संताप अनावर झाला आहे. समाजमाध्यमांवर प्रणिती शिंदेंचे चित्र टाकून त्याखाली गद्दार, विश्वासघातकी, दगाबाज वगैरे लिहित आहेत. उबाठावाल्यांचा संताप पाहून गुदगुल्या होताहेत. लोकसभा निवडणुकीत सांगलीमध्ये कॉंग्रेसने उबाठावाल्यांना अशीच सणसणीत चपराक हाणली होती.

काल दिवसभर अंधभक्त धर्माचे रक्षण करून थकून झोपलेच होते की सकाळी सकाळी अडाणीच रक्षण करायची जबाबदारी अंगावर येऊन पडली :)

कालपासून सुरू झालेला कसोटी सामना अत्यंत रोमांचक अवस्थेत आहे. तस्मात् तीन वाजेपर्यंत सामना पाहणार. अधूनमधून निकाल पाहणार.

माझे अंदाज संपूर्ण चुकले आहेत असं दिसतंय. ते मी मान्य करतो. लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची थकीत वीजबिल शेतीपंपांना नि:शुल्क वीज या योजनांचा प्रचंड लाभांश मिळताना दिसतोय. याबरोबरीने स्थिर सरकारसाठी कौल मिळताना दिसतोय. भाजप स्वबळावर बहुमत मिळवू शकेल. अगदी १३० जागा जिंकल्या तरी भाजपचाच मुख्यमंत्री होणार. म्हणजे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्याची प्रचंड शक्यता आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेता नसणार अशी चिन्हे आहेत. शपंची राज्यसभेच्या खासदारकीची मुदत मे २०२६ मध्ये, राऊतच्या खासदारकीची मुदत जून २०२८ मध्ये व उठाच्या विधानपरीषद आमदारकीची मुदत मे २०२६ मध्ये संपणार आहे. आतापर्यंतच्या आकड्यांवरून हे पुन्हा राज्यषभेत किंवा विधानपरीषदेत परतण्याची शक्यता शून्य आहे. म्हणजे शपंची राजकीय कारकीर्द कायमस्वरूपी संपणार व उबाठाला अखेरची घरघर लागणार. हे दोघे व त्यांचे पक्ष संपणे हे महाराष्ट्रासाठी वरदान ठरेल.

In reply to by श्रीगुरुजी

अशी काय कामे केली होती भाजपाने? अशी काय भाषणे दिली होती मोदिनी महाराष्ट्रात. मोदींच्या सभांना, शहांच्या सभांना गर्दीही नव्हती. लोकसभेला प्रचंड मते मिळवलेले पक्ष एवढे मागे पडतील? असा कुठला चेहरा होता भाजपकडे?? हुच्च कोटीचे अंधभक्त सोडले तर ह्या निकालांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही. निकाल स्वीकारार्ह्य नाहीत. लोकशाही सरणावर चढलीय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मोदींच्या सभांना, शहांच्या सभांना गर्दीही नव्हती.
सभांना होणारी गर्दी मतांमध्ये परावर्तीत होत असती तर राज ठाकरेंचा पक्ष महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर राहिला असता, त्यामुळे हा निकष निरुपयोगी आहे.
हुच्च कोटीचे अंधभक्त सोडले तर ह्या निकालांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही.
ह्या विधानावर केवळ नावाचा 'संजय' पण प्रत्यक्षात ठार आंंधला असलेला एक कंडम पत्रकार ज्यांना प्रातःस्मरणीय वाटतअसेल त्यांचाच विश्वास बसु शकेल!
निकाल स्वीकारार्ह्य नाहीत. लोकशाही सरणावर चढलीय.
आपले अंदाज चुकले, आपल्याला जे वाटत होते त्यापेक्षा वेगळे काही घडले असले तरी खिलाडुवृत्तीने निकाल स्वीकारणे हे कुठल्याही समंजस व्यक्तीचे कर्तव्य आहे.

शिंदे गट (५६), उबाठा (१८), शरद पवार गट (१४), अजित पवार गट (३८) ही आताची स्थिती पाहता नजीकच्या भविष्यकाळात उबाठा गटातील बहुसंख्य आमदार/खासदार शिंदे गटाकडे व शरद पवार गटातील बहुसंख्य आमदार/खासदार अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. म्हणजे शरद पवार गट, शरद पवार, सुळे आणि उबाठा गट, उठा, आदूबाळ वगैरे कायमस्वरूपी संपण्याची शक्यता आहे. आव्हाड, कोल्हे वगैरे बहुदा कॉंग्रेसमध्ये जातील.

माझे इतर सर्व अंदाज संपूर्ण चुकले असले तरी एक अंदाज बराचसा बरोबर येतोय. मी उबाठासाठी २०-३० जागांचे भाकीत केले होते. उबाठाची कामगिरी अंदाजाच्या जवळपास आहे.

झारखंड झामुमो व कॉंग्रेसची आघाडी राखताना दिसतेय. आतापर्यंत ८१ पैकी भाजप ३० व झामुमो ५० अशी स्थिती आहे. वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रियंका वाड्रा जवळपास ३,३९,००० मतांनी पुढे आहे तर नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार हंबर्डे १२,२८३ मतांनी पुढे आहेत. ते जिंकले तर भाजपची संख्या २४१ होईल.

एक नवी अफवा पसरत आहे. भाजप शिंदे व अजित पवारांची साथ सोडून उबाठा आणि/किंवा शप गटाच्या मदतीने सरकार स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळविणार.

श्रीगुरुजींच्या धाग्याने शंभरी गाठल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन. बऱ्याच दिवसांनी कुठला धागा शंभरी पार करता झाला.

नबाब मलिक, बच्चू कडू हरले हे उत्तम झाले. आठा, भास्कर जाधव, आव्हाड, भुजबळ जिंकल्याचे दु:ख झाले. पृथ्वीराज चव्हाण निष्क्रिय असले तरी सभ्य आहेत. ते जिंकले असते तरी चालले असते.

In reply to by श्रीगुरुजी

बच्चू कडू हरले हे उत्तम झाले. +१ गुवाहाटी जाण्यात हाही होता. मागे नाशकात एका लव्ह जिहाद प्रकरणात पाठिंबा द्यायला गेला होता. नबाब मलिक नवाब मलिक हरायला नको होते, शाहरुखपुत्र आर्यन खान प्रकरणावेळी त्यानी भाजप्यांना सळो की पळो करुन सोडले होते, उत्तम पुरावे आले की भाजपे बिथरतात. भाजप्यांनी शेवटी तडजोड करुन आर्यन खान ला सोडले नी वानखेडेला चेन्नई ट्रान्सफर केले होते. मस्त गुडघ्यावर आणलं होतं मलिकांनी. आठा, भास्कर जाधव, आव्हाड, भुजबळ जिंकल्याचे दु:ख झाले.आठा अभ्यासू आहेत भाजपे त्यांच्या नादी लागत नाहीत. मुंबईचा चांगला अभ्यास आहे. भास्कर जाधव वाघ आहेत. अध्यक्षपदावर असताना १२ भाजपे निलंबित केले होते. खरा, कडवा, नी निर्भय शिवसैनिक हे जिंकल्याचा आनंद झाला. आव्हाडही चांगले आहेत, अभ्यासक्रमात मनुस्मृती घुसवणाऱ्या मनुवाद्याना विरोध करण्यात ते आघाडीवर होते अशी लोक जिंकायलाच हवीत. भुजबळाणीही ओबीसी व्होट बँक राखलीय. जिंकायलाच हवे होते. पृथ्वीराज चव्हाण निष्क्रिय असले तरी सभ्य आहेत. ते जिंकले असते तरी चालले असते. ह्याबाबतीत प्रचंड सहमत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हायला हसावं कि रडावं हेच कळत नाही. सगळ्या मिळून २१ जागा निवडून आलेल्या पक्षाच्या संस्थापकांचा "केवळ नातू" हाच निकष असलेल्या नेत्याबद्दल जळजळ? भुजबळ बुवा तुमचं विमान कायम हवेतच कसं असतंय?

In reply to by सुबोध खरे

ते स्वतः अभ्यासू आहेत नी वरळीतून २ वेळा जिंकले देखील आहेत. बाकी ठाकरे आडनाव जरी आले तरी जळजळ होते अगदी प्रबोधनकारांपासून, तरीही ते चौथ्या पिढीतही पुरून उरताहेत. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

काही काळ का होईना, पण माझ्या मनावर त्यांनी भुरळ घातली होती... पण, त्यांनी जादूने समुद्रात बुडालेली Enron बाहेर काढली आणि मग एक रुपयांत झुणका भाकर ही दुसरी जादू केली आणि संजय दत्तला त्यांनी माफ केले आणि मी मग पुढे त्यांची जादू बघणे सोडून दिले...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्ही भाजप द्वेष्टे आहात हे एक वेळ समजु शकतो, पण त्याकरता नवाब मलिक सारखा माणुस जिंकावा वाटतो, तुमच्या मनसिकतेची किव पण कराविशी वाटत नाही.

In reply to by भुमन्यु

जो, भाजप विरोध करतो तो आपला, असे त्याचे मत... त्यामूळेच, त्यांचे प्रतिसाद पण खुपच मनोरंजक असतात.... आपण तर बुवा, त्यांच्या प्रतिसादांची वाटच बघत असतो. परमपूज्य राहुल गांधी पण त्यांच्या इतके मनोरंजन करत नाहीत, हे माझे वैयक्तिक मत....

In reply to by श्रीगुरुजी

जिंकलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन, आणि ओमि कलानी, हितेंद्र ठाकुर आणि क्षितीज ठाकुर पराभुत झाल्याचा आनंद आणि बाकी सर्व पराभुत उमेदवारांना 'कोरडी' सहानुभुती! उल्हासनगरला पुन्हा दहशतीच्या वातावरणात जाण्यापासुन रोखल्याबद्दल आणि वसई-विरार-नालासोपारा परिसर दहशतमुक्त करण्यासाठी कौल दिलेल्या तिथल्या मतदारांचे विषेश अभिनंदन!

रोहीत पवार पडल्याची बातमी ऐकून आनंद झाला. पण नाना पटोले ५२९ मतांनी जिकल्याने आनंद ओसरला. बावनकुळें व वडेट्टीवार अजून समजलं नाही.

In reply to by श्रीगुरुजी

नाना पटोले ५२९ मतांनी जिकल्याने आनंद ओसरला.
काँग्रेसला मोठा धक्का; नाना पटोलेंचाही पराभव "नाना पटोले यांचा अवघ्या ६५८ मतांनी पराभव झाला आहे." अशी बातमी अत्ता लोकसत्तावर बघितली.

आजच्या निकालाचे बिहार विधानसभेच्या २०१० मधील निकालाशी बरेचसे साम्य आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप व नीतिशकुमारच्या संयुक्त जनता दलाची युती होती. नीतिशकुमार २००५ पासून भिजप पाठिंब्यावर मुख्यमंत्री होते. २०१० मध्ये संजदने १२९ जागा लढवून ११५ जिंकल्या व भाजपने उर्वरित १०१ लढवून ९१ जिंकून दोघांनी एकत्रित २०६/२३० जिंकल्या. लालूच्या पक्षाला फक्त २१ जागा मिळाल्याने विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मिळाले नाही. आज २८८ पैकी भाजप १३३, शिंदे ५६, अजितदादा ४० अशी स्थिती आहे. भाजप बहुमताच्या अगदी जवळ आहे. २०१३ मध्ये भाजपने मोदींना प्रचारप्रमुख केल्याने नीतिशने भाजपशी युती तोडली कारण आपण भाजपविना बहुमत सिद्ध करू शकतो हा आत्मविश्वास होता. महाराष्ट्रात भविष्यात भाजपने एकटे जायचे ठरविले तर ते अशक्य नाही.

In reply to by श्रीगुरुजी

भाजपला २०२९ ल एकटे जाता येईल असं आत्ताच्या निकालामुळेच सांगता येत नाही. जर भविष्यात पुन्हा काही गडबड झाली आणि महायुती तुटली तर चा हा प्रश्न आहे.. पण पहाटेचे शपथविधी तेव्हाही होऊच शकतील.. असो.

"एक तर तू तरी राहशील, नाही तर मी तरी राहीन" हे आपले जाहीर आव्हान उठाने खरे करून दाखविले. ठाकरे शब्दाचे पक्के आहेत. दिलेले आव्हान स्वीकारून तडीस नेतातच.

श्रीगुरुजी,
पृथ्वीराज चव्हाण निष्क्रिय असले तरी सभ्य आहेत. ते जिंकले असते तरी चालले असते.
याच पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्री असतांना दाभोलकरांच्या हत्येचा तपास भरकटवून टाकला होता. हत्येच्या दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की ही हत्या गोडसेवादी शक्तींनी केली आहे. पृथ्वीराज चव्हाणांच्या चांगुलपणाचा हिदूंना फायदा शून्य आहे. आ.न., -ना.न.

In reply to by नठ्यारा

पृथ्वीराज चव्हाण सुद्धा काँग्रेसच्या इतर नेत्यांप्रमाणेच आहेत. पण कितीही डांबरट असले तरी आपण फार सात्विक आणि सोवळे आहोत असे खोटे चित्र उभे करण्यात काही नेते वाकबगार असतात. पृथ्वीराज चव्हाण त्यातलेच आहेत.

झारखंड मध्ये आम्ही हरलोय, म्हणजे आम्ही महाराष्ट्रात काहीही गडबड केलेली नाही असे वाटून घ्यावे. :) कळावे. :)

मी मोदींचे भाषण एकले नाही. वक्फ बोर्ड रद्द करण्याची कुठली तारीख सांगितली मोदीनी? कळेल का?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मी मोदींचे भाषण एकले नाही. वक्फ बोर्ड रद्द करण्याची कुठली तारीख सांगितली मोदीनी? कळेल का?
मोदींचे भाषण ऐकलं नाही तर मग वक्फ् बोर्डाबद्दल मोदी काय बोलले ते तुम्हाला काय माहित? - शेणपट्ट्यात वळवळणारा गोबरवादी

In reply to by वामन देशमुख

नाही अनेक गोबरवादी प्रचारात सांगत होते ना भाजपला मत द्या नाहीतर वक्फ जमीन घेईल म्हणून.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नाही अनेक गोबरवादी प्रचारात सांगत होते ना भाजपला मत द्या नाहीतर वक्फ जमीन घेईल म्हणून.
मग तसं म्हणा की, एकाचं ऐकून दुसऱ्याच नाव का घेताय?