'रॉ' ह्या भारतिय गुप्तचर संघटना. कामाप्रमाणे ह्या संघटनेचे काम गेली अनेक वर्षे गुप्तपणे चालत आले आहे. एवढे की इंटरनेट येउन ३० वर्षे झाली तरी ह्यांची वेबसाईट नाही.(अनेक देशांच्या गुप्तचर संघटनांची आहे). आत्ता पर्यंत केवळ पाकिस्तान कोणत्याही घातपातामागे 'रॉ'चा हात आहे असे सांगायचा. गेल्या वर्षी 'निज्जर' भारताविरुद्ध कारनामे करणार्या कॅनडास्थित खलिस्तानी समर्थकाची हत्या झाली आणि कॅनडाच्या RCMP पोलिसानी सरळ भारतिय गुप्तचर यंत्रणेवर आरोप केला. भारताने अर्थात तो फेटाळला. RCMP पोलिसानी 'आम्ही पुरावे दिले आहेत पण भारत स्वीकारायला तयार नाही' असे सांगितले. ह्यावर मात्र भारताची प्रतिक्रिया आली नाही.
गेल्या आठवड्यात 'बाबा सिद्दीकी' ह्या माजी मंत्र्याची हत्या झाली आणि ह्या मागे 'लॉरेन्स बिष्णोई' ह्या गुजरातमधील तुरुंगात असणार्या गुन्हेगाराची गँग आहे असे सांगितले. एवढेच नाही तर त्याची ७० की ७०० लोकांची टोळी आहे असेही सांगितले.
योगायोग असा की RCMP पोलिसानी गेल्या आठवड्यात निज्जरच्या हत्येमागे हीच 'लॉरेन्स बिष्णोई' टोळी आहे असे पत्रकार परिषदेत्च सांगितले.(https://www.youtube.com/watch?v=fcL8mDb0bqk&list=RDNSfcL8mDb0bqk&start_r...).
गेल्या आठवड्यात अजित डोवाल ह्यांनी सिंगापूरमध्ये 'लॉरेन्स बिष्णोई हा कोठेही घातपात घडवुन आणु शकतो' असे विधान केले. https://www.tribuneindia.com/news/india/at-secret-meet-ajit-doval-told-c...
हा लॉरेन्स बिषणोई कोण? हा गेले दहा वर्षे साबरमती येथील तुरुंगात बंद आहे. मग अजित दोवाल ह्यांच्या विधानाचा अर्थ असा काढायचा की रॉ'ने ह्या बिष्णोई टोळीच्या मदतीने निज्जर ह्याची हत्या केली? आणि मग बाबा सिद्दीकीच्या हत्येमागे कोण आहे?
ह्या सगळ्या प्रकारात रॉ ह्या संघटनेची अब्रु चव्हाट्यावर आली असे वातते. ह्यांच्या अधिकार्याची नावे, त्यांचे 'गुप्त' काम कॅनडाच्या पोलिसांनी जगासमोरच मांडले. त्यानंतर दूतावासात काम करणार्या अधिकांर्याच्या बदल्या ओघाने आल्या. 'जस्टिन ट्रुडो अपरिपक्व आहेत ' वगैरे चर्चा भारतिय चॅनेल्सनी चालु केल्या पण RCMP पोलिस पत्रकार परिषदेत जे भारतावर थेट आरोप करतात त्याचे काय?
प्रतिक्रिया
22 Oct 2024 - 7:36 am | वामन देशमुख
१००% सहमत
22 Oct 2024 - 9:59 am | अमरेंद्र बाहुबली
नाही ब्वा. उलट मनुवाद्यांनी कशी चुकीच्या लोकांच्या हातात पद दिली नी आमचे अधिकारी अलगद कॅनडा अमेरिकेच्या हातात सापडून शिक्षा भोगू लागलेत ह्याचं दुःख आहे. अर्थात मनुवाद्याना काय फरक पडतो दोन चार रॉ चे अधिकारी अमेरिकेच्या हातात सापडले नी टॉर्चर होताहेत? मनुवादी आपले हस्तिदंती मनोऱ्यात ऐशो आरामात आहेत.
22 Oct 2024 - 1:40 pm | वामन देशमुख
शेणपट्ट्यासहित संपूर्ण देशाने मनुवाद्यांच्या हातात सत्ता दिलीय, काय करणार तुमच्या सारखे फुरोगामी बिच्चारे!
22 Oct 2024 - 2:40 pm | अमरेंद्र बाहुबली
त्याचीच फळे भोगतोय आपण. रॉ ची अब्रू चव्हाट्यावर असा लेख आला तो ह्या मनुवाद्यांमुळेच.
22 Oct 2024 - 3:08 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
चर्चा रॉ,कॅनडा,बिश्णोई ह्या पुरती सीमीत असावी. चर्चा मनुवादी,शाहु-फुले-आंबेडकर्,गांधी,गोडसे,दलित पॅन्थर पर्यंत येऊ नये ही माफक अपेक्षा!!
मूळ मुद्दा भारत कॅनडाला प्रत्युत्तर कसे देणार हा आहे. डोवाल/कॅनडा पोलिस ह्यांची क्षमता वगैरे सगळे दुय्यम आहे.
जस्टिन ट्रुडो राजकीय फायदा उठवू पाहत आहेत का? नक्कीच . ते राजकारणी आहेत. कॅनडात दर ५० माणसांमागे एक माणुस शीख पंथिय आहे आणि दर २५ माणसांमागे एक माणुस भारतिय वंशाचा आहे. शीख समुदायाचे देशप्रेम वगैरे कितीही कौतुक केले तरी अमेरिका,कॅनडात शीख लोक अनेक उद्योग करत असतात, त्यापैकी एक म्हणजे खलिस्तानची मागणी.
१९८५ साली एयर इंडिया 'कनिष्क' विमान बाँबने उडवुन ३३१ लोकांना ठार मारणारे खलिस्तानी अतिरेकी कॅनडाचे नागरिक होते. तेव्हा खलिस्तान समस्या,भारत बद्दल विशेष माहिती नसणार्या कॅनडाने सुरुवातीला दुर्लक्ष केले आणि नंतर त्यांना पकडायच्या हालचाली चालु केल्या.
ह्या अतिरेक्यांपैकी एक म्हणजे 'रिपुदमन सिंग मलिक'. सुरुवातीला अटक झालेल्या मलिक ह्याची २००५ साली मुक्तता झाली. २०२२ साली ह्याची दोन लोकांनी हत्या केली. ह्या दोघाना काल कॅनडाच्या न्यायालयात दोषी ठरवण्यात आले. मलिक ह्याच्या कुटुंबियानी त्या दोघाना "हत्या करण्यासाठी कोणी सुपारी दिली ते जाहीर करा' म्हणून आवाहन केले आहे. आता तेथील शीख समुदायाने 'भारताच्या वकिलाती कचेर्या बंद करा' म्हणून कॅनडा सरकारकडे मागणी केली आहे.
ट्रुडो आणि त्यांच्या पक्षाचे राजकारण स्थानिक शीख समुदायला न दुखावणे आणि चुचकारणे हे स्पष्ट आहे. पण तेवढयसाठी भारताबरोबर जवळ्पास संबंध तुटेपर्यंत ही वेळ आणावी लागणे, हे न समजण्यएवढे ट्रुडो मूर्ख नाहीत.
https://www.cbc.ca/news/canada/british-columbia/pro-khalistan-groups-ind...
22 Oct 2024 - 5:26 pm | चौकस२१२
शीख समुदायाचे देशप्रेम वगैरे कितीही कौतुक केले तरी अमेरिका,कॅनडात शीख लोक अनेक उद्योग करत असतात, त्यापैकी एक म्हणजे खलिस्तानची मागणी.
हे केवळ घोषणेवर थांबलेले नाहीये ,,
मग आम्ही हि काय वेगळे म्हणतोय? आणि जे म्हणतोय ते हे प्रत्यक्ष अनुभवातुन , येथील हिंदू मंदिरांवर हल्ला, जमलेलंय हिंदूंवर हल्ला किंवा विरुद्ध घोषणाबाजी
दिवाळीचं कार्यक्रमात कन्नड मराठी ओदिशी , तामिळ सगळ्या भाषिक समूहाने नृत्य सादरीकरण केले फक्त भग्नडवल्यानी " फार्मर प्रोटेट्स चा उल्लेख केले"
का? त्यावेळी काय इतर राज्यात शेतकरी नवहते ?
कॅनडात इंदिरा गांधींच्या खुनाचा
" न्यून गंड असलेले आणि पोळी भाजून घेणारे वे गोऱ्यांना "सामावून घेणार हिंदू स्थलांतरित आणि फुटीरतावादी खलिस्तानी यात फरक कळात नाही " याचे दुर्दैव
आत्ताच स्थानिक निवडणुकीचे मतदान करून आलो त्यात
१) उजव्या पक्षाची उमेदवार भारतीय वंशाची होती तिला विचारले कि काय ग तुमच्य पक्षाचे खलिस्तानी लोंकांबद्दल काय काय मत आहे ( ती व्यक्ती पंजाबी आहे ) तिने सरळ सांगितले कि हे अजिबात बरोबर नाही
२) हाच प्रश्न लेबर ( डाव्या ) पक्षाचं उमेदवाराला विचारला , तिने प्रथम गोंधळ घातलला " दोन देश व्हायला पाहिजेत " म्हणाली मी उडालो .. मग लक्षात आले कि तील बहुतेक वाटले कि मी पॅलेस्टाईन आणि इस्राएल बद्दल बोलतोय .. मग मी तिला सांजवाले कि बाई काही संबंध नाही जसे कानडा तुझ्य सारखे डावे त्रुदो खलिस्तान्यांना असून पाठिंबा देतायत तसे तुमचे काय मत आहे ? बाई गडबडली
22 Oct 2024 - 6:50 pm | वामन देशमुख
१००% सहमत.
पण मिपावर काही फुरोगामी लोक सतत शेणपट्ट्यात लोळत असतात त्यांच्यामुळे अनेक धाग्यांचा काश्मीर होतो.
असो.
22 Oct 2024 - 6:56 pm | अमरेंद्र बाहुबली
शाहू फुले आंबेडकर ही नावे वाचून मनूप्रेमी वामन सर भकडकलेले दिसताहेत. :)
22 Oct 2024 - 7:33 pm | वामन देशमुख
आवरा स्वतःला, तुमची झाली तितकी बेअब्रू पुरेशी नाहीय का?
---
महत्वाच्या विषयावरील प्रत्येक धाग्याचा काश्मीर करण्याचा चंग बांधलेले हे आयडी मिपाला रसातळाला नेत आहेत.
22 Oct 2024 - 9:33 pm | अमरेंद्र बाहुबली
ओ हो हो, काय ती मीपाची काळजी. जरा स्कोप दिसला की मनुवादी विचार घुसडणारे तुम्ही मिपाची काळजी वाहताहेत हे पाहून डोळे पाणावले. :)
बाकी तुम्ही प्रतिक्रिया नाही दिल्या तरी मिपाला बहर येईल. थोडी अब्रू वाचवा स्वतःची.
22 Oct 2024 - 9:46 pm | वामन देशमुख
नक्राश्रू!
पुरावे वगैरे... जाऊ द्या; नागव्याला राजा भितो!
23 Oct 2024 - 7:36 pm | चंद्रसूर्यकुमार
सदर सदस्याने आतापर्यंत कित्येकदा असेच उथळ प्रतिसाद दिले आहेत हे माहित असून परत त्याच्या तोंडी लागण्याचे काय प्रयोजन आहे? चिखलात दगड मारला तर आपल्या अंगावर पण चिखल उडणारच आहे. त्यापेक्षा सदर सदस्याकडे पूर्ण दुर्लक्ष का करत नाही?
23 Oct 2024 - 7:39 pm | अमरेंद्र बाहुबली
चंसुकु सर, नेमका कुठला प्रतिसाद उथळ वाटला, संगितलत तर नक्कीच स्वतःत सुधारणा करेन. _/\_
बाकी मनुवादी प्रवृत्तीना काही वेळा उत्तर द्यावे लागते.
23 Oct 2024 - 8:25 pm | राघव
आपलं म्हणणं मान्य आहे. पण समोरच्याला उकसवत हसत हसत बुडाखाली वार करत राहणं.. लोकं चिडतातच अशानं. अर्थात् अबांची हातोटी आहे ती.. त्याचं क्रेडीट त्यांना द्यायला हवं!
माझ्या मते अबांचे प्रतिसाद त्रयस्थपणं पाहिलेत तर हसूच जास्त येऊन त्यामागचा त्यांचा, समोरच्याला फोकलण्याचा, हेतू स्पष्ट दिसल्यानं उत्तर द्यायची गरज भासणार नाही! :-)
25 Oct 2024 - 7:26 pm | सुबोध खरे
खांद्याखाली बळकट असणाऱ्या लोकांना मुळात गंभीरपणे घेण्याची आवश्यकता नसतेच.
त्यातून काही महाशय असे असतात कि आपला पगार किती आपण बोलतो किती याचा काहीही संबंध नसल्यासारखे जिथे तिथे "पो" टाकत घाण करत फिरत असतात. यामुळे चांगल्या चर्चांचा विचका होतो हे याना समजतच नाही
आय पी एस परीक्षा पास होण्यासाठी किती कष्ट लागतात आणि किती बुद्धिमत्ता लागते याची पुसटसुद्धा कल्पना नसताना केवळ हातात कि बोर्ड आहे आणि डेटा स्वस्त आहे म्हणून वाटेल ते टंकताना काही लोकांना अजिबात लाज वाटत नाही.
वाईट गोष्ट म्हणजे संपादक मंडळ अशा व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्यापोटी मोकळे सोडतात यामुळे अनेक लेखक आणि प्रतिसाद्क उद्विग्न होतात आणि मिपावर वाचन मात्र होतात हे लक्षात घेत नाहीत.
असो
25 Oct 2024 - 7:36 pm | अमरेंद्र बाहुबली
खरं बोललं की सख्या आईलाही राग येतो. ही म्हण आज खरी ठरताना पाहतोय. अती हुशार, संघस्वयंसेवक पाकिस्तानचा खबऱ्या कुरुळकर हुशार होता म्हणून, परीक्षा पास व्हायचा म्हणून त्यालाही हाच न्याय. लावणार का??
उत्तर नाही दिलं तरी चालेल. सगळीकडे भाजप संबंधित, संघ संबंधित अधिकारी चांगले म्हणायचे, त्यांच्या बद्दल, छान छान, गॉड गोड, आपल्याला आवडेल टीची बोलायचे. नी जो सत्य दाखवेल त्याला वयक्तिक उतरून, खालच्या पातळीवर काहीही बोलायचे. चांगलंय.
25 Oct 2024 - 7:40 pm | सुबोध खरे
आपला पगार किती आपण बोलतो किती
ते दिनानाथ मंगेशकर जशी तान घेतात तशी तान घेऊन पहा मूळव्याध होते कि नाही ते.
23 Oct 2024 - 8:18 pm | राघव
भारतानं स्वच्छपणं सर्व अमान्य केलेलं आहेच. सोबत जसे त्यांनी आपले अधिकारी परत पाठवलेत तसे भारतानंही पाठवलेत/पाठवत आहोत. तेच राजनैतिक प्रत्युत्तर नाही का? भारताला स्वत:हून या वादात वाढ करायची इच्छा आणि गरज दोन्हीही नाही. मग अजून काय प्रत्युत्तर अपेक्षित आहे इथं?
अगोदरपासून भारताबरोबरचे कॅनडाचे राजनैतिक संबंध फार चांगले होतेत असं तुम्हाला म्हणायचं नाही हे गृहित धरतो. :))
- ट्रुडोला नेटिव कॅनडियन a good looking idiot एवढंच समजतात. त्याची लायकी काय ते त्याच्या देशवासियांना नीट ठाऊक आहे.
- ट्रुडो खलिस्तानी समर्थकांना सोबत घेऊन जमेल तसे सरकार हाकतो आहे यातच सर्व आलं. खलिस्तानी भारत विरोधक आहेत हे जगजाहीर आहे. मग ट्रुडोला भारतासोबतचे राजनैतिक संबंध बिघडल्याचं काय सोयरसुतक असणार?
- कॅनडा अगोदरपासून अमेरिकेचं प्यादं राहिलेलं आहे. अमेरिकेला धार्जिणं असंच कॅनडाचं परराष्ट्र धोरण राहिलेलं आहे.
- आत्तासुद्धा कॅनडानं आपल्याला दिलेले तथाकथित पुरावे अमेरिकन एजन्सीजनंच पुरविलेले आहेत.
- दोन्ही बाजूंनी गोची झाल्यावर ट्रुडो काय करणार? मागे फक्त ट्रकच्या चालकांनी मोर्चा/बंद केल्यावर आणिबाणी घोषित करणारा राष्ट्रप्रमुख तो.. अशा परिस्थितीत तो अजून काय करू शकणार?
अशा माणसाला प्रत्युत्तर देण्याचीही त्याची लायकी नाही. केवळ आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल्समुळं काही गोष्टी सांभाळाव्या लागतात इतकंच.
सामान्य जनतेपर्यंत बऱ्याच गोष्टी सर्व घडून गेल्यावर पोहोचतात. कदाचित अजून बरीच कथानकं यात असतील, कुणी सांगावं?
त्यामुळं उगाचच निष्कर्ष काढत बसण्याला गॉसिप पेक्षा अजून काहीही अर्थ नाही.
विराम.
22 Oct 2024 - 11:36 pm | कॉमी
Canada border agency confirms Sandeep Sidhu, accused in Shaurya Chakra awardee’s murder, is its employee
Sidhu is also wanted for 'promoting terrorist activities' in Punjab. Canada Border Services Agency says it follows 'extensive' clearance process to make sure it hires the right people.
https://theprint.in/diplomacy/now-wanted-in-india-for-promoting-terror-s...
23 Oct 2024 - 8:38 am | माईसाहेब कुरसूंदीकर
छान. संदीपबद्द्लची ही माहिती तेथील पोलिसांना अचानक कळलेली नाही. सिंगापूरमध्ये दोवाल आणी कॅनडाचे अधिकारी, ह्यांच्यात जी चर्चा झाली त्याचे हे फलित आहे. "आधी तुमच्या खात्यातला माणुस तुम्ही पकडा, मग पुढे काय ते बघु" असे भारताने सांगितले असणार आहे.
23 Oct 2024 - 1:09 pm | चावटमेला
बाकी हे खलिस्तान एक कोडंच आहे. ही बहुतांशी जाट/जट्ट शिखांनी लावून धरलेली मागणी आहे. बर्याचश्या खत्री शिखांचा ह्याला आजिबात पाठिंबा नाही. खरं तर हे खत्री शिख आपले घर दार, जमीन जुमला सोडून निर्वसित म्हणून पकिस्तानातून भारतात आले. पण, जट्ट शिखांना फारशी झळ कधीच बसली नाही. (अपवाद - इन्दिरा गांधी हत्येनंतरच्या दिल्ली दंगली)
23 Oct 2024 - 1:31 pm | शाम भागवत
खराब माणसं थोडीच असतात. पण सगळं नासवून टाकतात. मुख्य म्हणजे चांगली लोकं डोळेझाक फार करतात. त्यामुळे तर खराब माणसांचं फार फावतं. आता राजकारणचा बघाना.
किती महत्वाची गोष्ट आहे ही. सगळा देश, आपली मुलं बाळं, सगळ्यांच्या हितासाठी योग्य लोक निवडून देणे किती महत्वाचे आहे.
पण फक्त ५ टक्के लोक यात भाग घेतात. या ५ टक्यातले .०१ टक्के व्यक्त होतात. बाकी ९५ टक्के लोकांना काय चाललंय हे माहीतही नसतं.
एखादा मुद्दा पटला तर सहमत किंवा असहमत एवढेही लिहीण्याचे मनावर घेत नाहीत.
एवढे जरी केले तरी अयोग्य मुद्दे बाजूला पडच जातील.
असो.
23 Oct 2024 - 3:04 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
पण अनेक शिखांची खलिस्तानी समर्थकांना सहानुभुती असते किंवा त्याना ते विरोध करताना दिसत नाहीत. विषय काढला तर नेहमीचे उत्तर ठरलेले असते-"हे सगळे राजकारण आहे. ह्याला इंदिरा गांधी जबाबदार होत्या"
23 Oct 2024 - 4:40 pm | कॉमी
शेखर गुप्ता नेहमी एक किस्सा सांगत असतो.
आधी तो सांगतो, की भारतातल्या शिख समुदायाचा खलिस्तान म्हणजे वेगळ्या शिख देशासाठी खूपच कमी सपोर्ट आहे. पण शिख माणसाला खलिस्तान बद्दल विचारले तर त्यांचे म्हणणे असते की जर भाजप/संघवाले हिंदू राष्ट्राची मागणी करत असतील तर काही लोकांनी शिख देशाची मागणी केली तर काय बिघडले?
25 Oct 2024 - 7:41 am | चौकस२१२
तुम्हाला म्हणायचंय काय नककी? खलिस्तान ची मागणी रास्त आहे? ? भारत तोडून ?
सरळ बोला ना
कनिष्क विसरला का
आज अगदी थोडे हिंदुराष्ट्र व्हावे असे म्हणत असले तरी ते उद्वेगातून आहे, प्रत्यक्षात बहुतेक हिंदू " हिंदूंना सन्मान असलेले पण सर्वधर्मसमभावी राष्ट्र " व्हावे येवढेच म्हणत आहेत ,,हिंदू तेढे संकुचित नाहीत अंगाडी शेंण पट्ट्यात सुद्धा
राजदूत संजय वर्मा यांची हि मुलखात पाहावी
https://www.youtube.com/watch?v=AJWJus9WfGI
25 Oct 2024 - 8:14 am | कॉमी
सर उगाच तावातावाने उलटंतपासणी करण्याचा अविर्भाव सोडा. जे लिहिलंय ते ऍड्रेस करा, उगाच मनाचे काहीही प्रश्न विचारू नका.
25 Oct 2024 - 8:00 am | चौकस२१२
अगदी बरोबर ... आणि जगभर कटकट निर्माण केलीय भारतीय दूतासावरावर हल्ला , हिंदू मंदिरांवर हल्ला .. पण हे उदारमतवाद्यांना दिसत नाही
आणि येथे फुकटची भारतीय लोकांची बदनामी होते ,,इथल्या गोर्याला काय कळणार कि हे दोन्ही भारतीय का भांडत आहेत ?
25 Oct 2024 - 7:45 am | चौकस२१२
लिबरल अंड्यांसाठी हि खास मुलखात , आणि ती सुधाच कोणी घेतलिय ती प्रिय बुरखाने !
Brigadier Israr Rahim Khan.
https://www.youtube.com/watch?v=9jmIjUQIQfE
25 Oct 2024 - 7:48 pm | अमरेंद्र बाहुबली
काही लोकाना एक सरकारी अधिकारी ( पण भाजपसाठी काम करणारा) बद्दल खरे बोलले तर मिरच्या लागलेल्या दिसताहेत, अतिशय घाणेरड्या भाषेत खालच्या पातळीवर उतरून ते माझ्यावर टीका करुन आपले संघाचे “कुसंस्कार” दाखवत आहेत.
काही वर्षाआधी निवडणूक जवळ आलो की सीमेवर हल्ले वाढायचे, देशप्रेमाचे उबाळे आणून निवडणुका जिंकायच्या अशी भाजपची रणनिती होती, विरोधकांनी नेमके ह्यावरच बोट ठेवले नी तो प्रकार बंद झाला, ह्यामागे आज जो रॉ ची अब्रू चव्हाट्यावर आणणारा अधिकारी होता तोच होता अशी शंका येते. एखादा अधिकारी भाजप जिंकावा म्हणून देशाशी अप्रामाणिकपणा करत असेल, सैनिकांचे जीव जाऊ देत असेल त्यावर टीकाही करू नये??कारण का तर तो भाजपेयी आहे म्हणून?? आज रॉ अधिकारी जगात अनेक ठिकाणी सापडत आहेत पण तो निर्लज्ज पद लालसा असलेला अधिकारी अजूनही जागा अडवून बसलाय असले निर्लज्ज अधिकारी “परीक्षा” पास होतात म्हणून चांगले ठरतात??? भाजप समर्थकानाच त्या अधिकाऱ्यावर टीका केलायवर मिरची लागतेय ह्याचा अर्थ सरळ आहे तो अधिकारी भाजप कायकर्ता आहे. भाजपने ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग अश्या ठिकाणी अनेक हस्तक घुसवलेत.
आता काही संघी, भाजपी रुदाल्या छाती पिटत पुरावा द्या म्हणून येतील. पण त्यांना सांगू इच्छितो की संरक्षण क्षेत्रातल्या बातम्या गुप्त असतात. आणी अधिकारी म्हणून सर्वोच्च अधिकाऱ्याची जबाबदारी असते.
26 Oct 2024 - 10:27 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
https://www.youtube.com/watch?v=pCVq0KfkDDUकॅनडा अधिकाधिक आक्रमक होताना दिसत आहे.
भारतिय अधिकार्यांच्या विरोधात 'सबळ पुरावे' असल्याचा दावा RCMP चेमुख्य कमीशनर ह्यानी काल परत केला आहे. 'गुप्त माहिती किंवा चर्चा नाही तर ठोस पुरावे. हे पुरावे दिल्यावरच कॅनडाने भारतिय अधिकार्याना भारतात परत पाठवले असणार. भारताने अर्थात हे नाकारले आहे.
वॉशिन्ग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत कॅनडाचे अधिकारी म्हणतात-
"attacks were green-lit by Modi ally Amit Shah, India’s home affairs minister."
"U.S. authorities allege that after Nijjar was killed, Yadav sent a video clip to Gupta showing the separatist leader’s “bloody body slumped in his vehicle.” He later sent Pannun’s address to Gupta and said his killing was a priority, authorities say."
https://www.washingtonpost.com/world/2024/10/18/canada-india-conflict-si...
कॅनडात स्थायिक झालेल्या भारतियांची मात्र 'इकडे आड तिकडे विहीर' झाली असणार.
26 Oct 2024 - 11:03 pm | सुक्या
स्टेजड ईंटरव्यु आहे हा. पाने भरुन नोट्स घेउन आला आहे. बाकी वापो ला आम्ही पुसायला पण वापरत नाही.
26 Oct 2024 - 11:05 pm | कॉमी
सिंगापूर मध्ये झालेल्या भेटीत भारतीय अधिकाऱ्यांच्या आपापसात कम्युनिकेशन सोबत इतर पुरावे श्री. डोवाल ह्यांना दिले आहेत असे कॅनडा बऱ्याच दिवसांपासून म्हणत आहे. त्यातले कम्युनिकेशन म्हणजे हेच असावे.
26 Oct 2024 - 11:17 pm | सुक्या
भारतीय अधिकाऱ्यांच्या आपापसात कम्युनिकेशन
हे कॅनडा ला कसे कळाले? कॅनडा भारतीय अधिकार्याण्वर पाळत ठेउन होता काय? तसे असेल तर हे आंतर राष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन नाही काय?
26 Oct 2024 - 11:26 pm | कॉमी
कल्पना नाही.
27 Oct 2024 - 9:37 am | माईसाहेब कुरसूंदीकर
"हे कॅनडा ला कसे कळाले?आंतर राष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन नाही काय?"
कल्पना नाही. एवढे धडधडीतपणे सांगत आहेत म्हणजे उल्लंघन नसावे. अन्यथा भारताने त्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिली असती. असो.
कॅनेडियन मीडिया बिलंदर आहे. ३ दिवसापुर्वीच राणा अय्युब ह्या महिला पत्रकाराला Press Freedom Award देण्यात आले! हा योगायोग निश्चित नाही.
https://www.theglobeandmail.com/world/article-investigative-journalist-r...
कॅनडाच्या गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुखांच्या मुलाखतीतून काही महत्वाची माहिती मिळते.
https://www.theweek.in/theweek/current/2024/10/26/canadian-security-inte...
भारत-कॅनडा संबंध अधिकाधिक बिघडत जातील असे ते म्हणतात.
सध्या काही वॉट्स-अॅप् ग्रूप्समध्ये लॉरेन्स बिष्णोई टोळीचे कौतुक चालु आहे. ह्या टोळीतले काहीजण कॅनडात आहेत. सिद्दू मुसेवालाची हत्या करणारा टोळीतला गोल्डी ब्रार हा कॅनडात होता.
27 Oct 2024 - 1:27 pm | रात्रीचे चांदणे
भारत पण तेच म्हणतोय भारताच्या बऱ्याच शत्रूंना कॅनडा ने आश्रय दिला आहे.
27 Oct 2024 - 7:17 pm | चौथा कोनाडा
या सगळ्या चर्चेत सोनिया गांधी, रॉबर्ट वाद्रा यांची नावे कशी आली नाहीत याचे आश्चर्य वाटते.
28 Oct 2024 - 11:24 am | माईसाहेब कुरसूंदीकर
कॅनडा ऐवजी ईटाली असते तर ती नावे कदाचित आली असती असे ह्यांचे मत. अजित डोवाल ह्यांच्या ऐवजी कुणी अमजद दुर्रानी असता तरीही वॉट्स-अॅप' वर चर्चेला सुरुवात झाली असती.
28 Oct 2024 - 11:54 am | रात्रीचे चांदणे
कॅनडा फुटीरतावादी लोकांना संरक्षण देतोय आणि खोटे आरोप करतोय हे जय शंकर ऐवजी कोणी John smith असला असता तर कदाचित विश्वास बसला असता.
29 Oct 2024 - 7:00 pm | कंजूस
ट्रुडो जर सांगेल ते ऐकतो तर .......
क्यानडातच खलिस्तान भाग का मागत नाहीत?
29 Oct 2024 - 9:44 pm | राघव
मागायची गरजच काय.. ते आज ना उद्या होणारच आहे.
त्यामुळे आमंत्रण देऊन भांडणाला का बोलवावे? :-)
29 Oct 2024 - 10:30 pm | रात्रीचे चांदणे
एकीकडे कॅनडा सरकार म्हणतंय की, भारत लॉरेन्स बिश्नोई गँगचा वापर कॅनडात हिंसाचार करतं आहे आणि दुसरीकडे भारताकडून मागणी होऊनही बिश्नोई गँगचा गोल्डी ब्रार चे आणि इतर लोकांचं प्रत्यार्पण करत नाही.