Skip to main content

बिष्णोई,कॅनडा आणि रॉ

लेखक माईसाहेब कुरसूंदीकर यांनी रविवार, 20/10/2024 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
'रॉ' ह्या भारतिय गुप्तचर संघटना. कामाप्रमाणे ह्या संघटनेचे काम गेली अनेक वर्षे गुप्तपणे चालत आले आहे. एवढे की इंटरनेट येउन ३० वर्षे झाली तरी ह्यांची वेबसाईट नाही.(अनेक देशांच्या गुप्तचर संघटनांची आहे). आत्ता पर्यंत केवळ पाकिस्तान कोणत्याही घातपातामागे 'रॉ'चा हात आहे असे सांगायचा. गेल्या वर्षी 'निज्जर' भारताविरुद्ध कारनामे करणार्या कॅनडास्थित खलिस्तानी समर्थकाची हत्या झाली आणि कॅनडाच्या RCMP पोलिसानी सरळ भारतिय गुप्तचर यंत्रणेवर आरोप केला. भारताने अर्थात तो फेटाळला. RCMP पोलिसानी 'आम्ही पुरावे दिले आहेत पण भारत स्वीकारायला तयार नाही' असे सांगितले. ह्यावर मात्र भारताची प्रतिक्रिया आली नाही. गेल्या आठवड्यात 'बाबा सिद्दीकी' ह्या माजी मंत्र्याची हत्या झाली आणि ह्या मागे 'लॉरेन्स बिष्णोई' ह्या गुजरातमधील तुरुंगात असणार्या गुन्हेगाराची गँग आहे असे सांगितले. एवढेच नाही तर त्याची ७० की ७०० लोकांची टोळी आहे असेही सांगितले. योगायोग असा की RCMP पोलिसानी गेल्या आठवड्यात निज्जरच्या हत्येमागे हीच 'लॉरेन्स बिष्णोई' टोळी आहे असे पत्रकार परिषदेत्च सांगितले.(https://www.youtube.com/watch?v=fcL8mDb0bqk&list=RDNSfcL8mDb0bqk&start_…). गेल्या आठवड्यात अजित डोवाल ह्यांनी सिंगापूरमध्ये 'लॉरेन्स बिष्णोई हा कोठेही घातपात घडवुन आणु शकतो' असे विधान केले. https://www.tribuneindia.com/news/india/at-secret-meet-ajit-doval-told-… हा लॉरेन्स बिषणोई कोण? हा गेले दहा वर्षे साबरमती येथील तुरुंगात बंद आहे. मग अजित दोवाल ह्यांच्या विधानाचा अर्थ असा काढायचा की रॉ'ने ह्या बिष्णोई टोळीच्या मदतीने निज्जर ह्याची हत्या केली? आणि मग बाबा सिद्दीकीच्या हत्येमागे कोण आहे? ह्या सगळ्या प्रकारात रॉ ह्या संघटनेची अब्रु चव्हाट्यावर आली असे वातते. ह्यांच्या अधिकार्याची नावे, त्यांचे 'गुप्त' काम कॅनडाच्या पोलिसांनी जगासमोरच मांडले. त्यानंतर दूतावासात काम करणार्या अधिकांर्याच्या बदल्या ओघाने आल्या. 'जस्टिन ट्रुडो अपरिपक्व आहेत ' वगैरे चर्चा भारतिय चॅनेल्सनी चालु केल्या पण RCMP पोलिस पत्रकार परिषदेत जे भारतावर थेट आरोप करतात त्याचे काय?

वाचने 11282
प्रतिक्रिया 92

प्रतिक्रिया

बाकी हे खलिस्तान एक कोडंच आहे. ही बहुतांशी जाट/जट्ट शिखांनी लावून धरलेली मागणी आहे. बर्‍याचश्या खत्री शिखांचा ह्याला आजिबात पाठिंबा नाही. खरं तर हे खत्री शिख आपले घर दार, जमीन जुमला सोडून निर्वसित म्हणून पकिस्तानातून भारतात आले. पण, जट्ट शिखांना फारशी झळ कधीच बसली नाही. (अपवाद - इन्दिरा गांधी हत्येनंतरच्या दिल्ली दंगली)

In reply to by चावटमेला

खराब माणसं थोडीच असतात. पण सगळं नासवून टाकतात. मुख्य म्हणजे चांगली लोकं डोळेझाक फार करतात. त्यामुळे तर खराब माणसांचं फार फावतं. आता राजकारणचा बघाना. किती महत्वाची गोष्ट आहे ही. सगळा देश, आपली मुलं बाळं, सगळ्यांच्या हितासाठी योग्य लोक निवडून देणे किती महत्वाचे आहे. पण फक्त ५ टक्के लोक यात भाग घेतात. या ५ टक्यातले .०१ टक्के व्यक्त होतात. बाकी ९५ टक्के लोकांना काय चाललंय हे माहीतही नसतं. एखादा मुद्दा पटला तर सहमत किंवा असहमत एवढेही लिहीण्याचे मनावर घेत नाहीत. एवढे जरी केले तरी अयोग्य मुद्दे बाजूला पडच जातील. असो.

In reply to by चावटमेला

पण अनेक शिखांची खलिस्तानी समर्थकांना सहानुभुती असते किंवा त्याना ते विरोध करताना दिसत नाहीत. विषय काढला तर नेहमीचे उत्तर ठरलेले असते-"हे सगळे राजकारण आहे. ह्याला इंदिरा गांधी जबाबदार होत्या"

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

शेखर गुप्ता नेहमी एक किस्सा सांगत असतो. आधी तो सांगतो, की भारतातल्या शिख समुदायाचा खलिस्तान म्हणजे वेगळ्या शिख देशासाठी खूपच कमी सपोर्ट आहे. पण शिख माणसाला खलिस्तान बद्दल विचारले तर त्यांचे म्हणणे असते की जर भाजप/संघवाले हिंदू राष्ट्राची मागणी करत असतील तर काही लोकांनी शिख देशाची मागणी केली तर काय बिघडले?

In reply to by कॉमी

तुम्हाला म्हणायचंय काय नककी? खलिस्तान ची मागणी रास्त आहे? ? भारत तोडून ? सरळ बोला ना कनिष्क विसरला का आज अगदी थोडे हिंदुराष्ट्र व्हावे असे म्हणत असले तरी ते उद्वेगातून आहे, प्रत्यक्षात बहुतेक हिंदू " हिंदूंना सन्मान असलेले पण सर्वधर्मसमभावी राष्ट्र " व्हावे येवढेच म्हणत आहेत ,,हिंदू तेढे संकुचित नाहीत अंगाडी शेंण पट्ट्यात सुद्धा राजदूत संजय वर्मा यांची हि मुलखात पाहावी https://www.youtube.com/watch?v=AJWJus9WfGI

In reply to by चौकस२१२

सर उगाच तावातावाने उलटंतपासणी करण्याचा अविर्भाव सोडा. जे लिहिलंय ते ऍड्रेस करा, उगाच मनाचे काहीही प्रश्न विचारू नका.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अगदी बरोबर ... आणि जगभर कटकट निर्माण केलीय भारतीय दूतासावरावर हल्ला , हिंदू मंदिरांवर हल्ला .. पण हे उदारमतवाद्यांना दिसत नाही आणि येथे फुकटची भारतीय लोकांची बदनामी होते ,,इथल्या गोर्याला काय कळणार कि हे दोन्ही भारतीय का भांडत आहेत ?

काही लोकाना एक सरकारी अधिकारी ( पण भाजपसाठी काम करणारा) बद्दल खरे बोलले तर मिरच्या लागलेल्या दिसताहेत, अतिशय घाणेरड्या भाषेत खालच्या पातळीवर उतरून ते माझ्यावर टीका करुन आपले संघाचे “कुसंस्कार” दाखवत आहेत. काही वर्षाआधी निवडणूक जवळ आलो की सीमेवर हल्ले वाढायचे, देशप्रेमाचे उबाळे आणून निवडणुका जिंकायच्या अशी भाजपची रणनिती होती, विरोधकांनी नेमके ह्यावरच बोट ठेवले नी तो प्रकार बंद झाला, ह्यामागे आज जो रॉ ची अब्रू चव्हाट्यावर आणणारा अधिकारी होता तोच होता अशी शंका येते. एखादा अधिकारी भाजप जिंकावा म्हणून देशाशी अप्रामाणिकपणा करत असेल, सैनिकांचे जीव जाऊ देत असेल त्यावर टीकाही करू नये??कारण का तर तो भाजपेयी आहे म्हणून?? आज रॉ अधिकारी जगात अनेक ठिकाणी सापडत आहेत पण तो निर्लज्ज पद लालसा असलेला अधिकारी अजूनही जागा अडवून बसलाय असले निर्लज्ज अधिकारी “परीक्षा” पास होतात म्हणून चांगले ठरतात??? भाजप समर्थकानाच त्या अधिकाऱ्यावर टीका केलायवर मिरची लागतेय ह्याचा अर्थ सरळ आहे तो अधिकारी भाजप कायकर्ता आहे. भाजपने ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग अश्या ठिकाणी अनेक हस्तक घुसवलेत. आता काही संघी, भाजपी रुदाल्या छाती पिटत पुरावा द्या म्हणून येतील. पण त्यांना सांगू इच्छितो की संरक्षण क्षेत्रातल्या बातम्या गुप्त असतात. आणी अधिकारी म्हणून सर्वोच्च अधिकाऱ्याची जबाबदारी असते.

https://www.youtube.com/watch?v=pCVq0KfkDDUकॅनडा अधिकाधिक आक्रमक होताना दिसत आहे. भारतिय अधिकार्यांच्या विरोधात 'सबळ पुरावे' असल्याचा दावा RCMP चेमुख्य कमीशनर ह्यानी काल परत केला आहे. 'गुप्त माहिती किंवा चर्चा नाही तर ठोस पुरावे. हे पुरावे दिल्यावरच कॅनडाने भारतिय अधिकार्याना भारतात परत पाठवले असणार. भारताने अर्थात हे नाकारले आहे. वॉशिन्ग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत कॅनडाचे अधिकारी म्हणतात- "attacks were green-lit by Modi ally Amit Shah, India’s home affairs minister." "U.S. authorities allege that after Nijjar was killed, Yadav sent a video clip to Gupta showing the separatist leader’s “bloody body slumped in his vehicle.” He later sent Pannun’s address to Gupta and said his killing was a priority, authorities say." https://www.washingtonpost.com/world/2024/10/18/canada-india-conflict-s… कॅनडात स्थायिक झालेल्या भारतियांची मात्र 'इकडे आड तिकडे विहीर' झाली असणार.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

स्टेजड ईंटरव्यु आहे हा. पाने भरुन नोट्स घेउन आला आहे. बाकी वापो ला आम्ही पुसायला पण वापरत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सिंगापूर मध्ये झालेल्या भेटीत भारतीय अधिकाऱ्यांच्या आपापसात कम्युनिकेशन सोबत इतर पुरावे श्री. डोवाल ह्यांना दिले आहेत असे कॅनडा बऱ्याच दिवसांपासून म्हणत आहे. त्यातले कम्युनिकेशन म्हणजे हेच असावे.

In reply to by कॉमी

भारतीय अधिकाऱ्यांच्या आपापसात कम्युनिकेशन हे कॅनडा ला कसे कळाले? कॅनडा भारतीय अधिकार्‍याण्वर पाळत ठेउन होता काय? तसे असेल तर हे आंतर राष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन नाही काय?

In reply to by सुक्या

"हे कॅनडा ला कसे कळाले?आंतर राष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन नाही काय?" कल्पना नाही. एवढे धडधडीतपणे सांगत आहेत म्हणजे उल्लंघन नसावे. अन्यथा भारताने त्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिली असती. असो. कॅनेडियन मीडिया बिलंदर आहे. ३ दिवसापुर्वीच राणा अय्युब ह्या महिला पत्रकाराला Press Freedom Award देण्यात आले! हा योगायोग निश्चित नाही. https://www.theglobeandmail.com/world/article-investigative-journalist-… कॅनडाच्या गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुखांच्या मुलाखतीतून काही महत्वाची माहिती मिळते. https://www.theweek.in/theweek/current/2024/10/26/canadian-security-int… भारत-कॅनडा संबंध अधिकाधिक बिघडत जातील असे ते म्हणतात. सध्या काही वॉट्स-अ‍ॅप् ग्रूप्समध्ये लॉरेन्स बिष्णोई टोळीचे कौतुक चालु आहे. ह्या टोळीतले काहीजण कॅनडात आहेत. सिद्दू मुसेवालाची हत्या करणारा टोळीतला गोल्डी ब्रार हा कॅनडात होता.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

भारत पण तेच म्हणतोय भारताच्या बऱ्याच शत्रूंना कॅनडा ने आश्रय दिला आहे.

या सगळ्या चर्चेत सोनिया गांधी, रॉबर्ट वाद्रा यांची नावे कशी आली नाहीत याचे आश्चर्य वाटते.

In reply to by चौथा कोनाडा

कॅनडा ऐवजी ईटाली असते तर ती नावे कदाचित आली असती असे ह्यांचे मत. अजित डोवाल ह्यांच्या ऐवजी कुणी अमजद दुर्रानी असता तरीही वॉट्स-अ‍ॅप' वर चर्चेला सुरुवात झाली असती.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कॅनडा फुटीरतावादी लोकांना संरक्षण देतोय आणि खोटे आरोप करतोय हे जय शंकर ऐवजी कोणी John smith असला असता तर कदाचित विश्वास बसला असता.

In reply to by कंजूस

मागायची गरजच काय.. ते आज ना उद्या होणारच आहे. त्यामुळे आमंत्रण देऊन भांडणाला का बोलवावे? :-)

एकीकडे कॅनडा सरकार म्हणतंय की, भारत लॉरेन्स बिश्नोई गँगचा वापर कॅनडात हिंसाचार करतं आहे आणि दुसरीकडे भारताकडून मागणी होऊनही बिश्नोई गँगचा गोल्डी ब्रार चे आणि इतर लोकांचं प्रत्यार्पण करत नाही.