'रॉ' ह्या भारतिय गुप्तचर संघटना. कामाप्रमाणे ह्या संघटनेचे काम गेली अनेक वर्षे गुप्तपणे चालत आले आहे. एवढे की इंटरनेट येउन ३० वर्षे झाली तरी ह्यांची वेबसाईट नाही.(अनेक देशांच्या गुप्तचर संघटनांची आहे). आत्ता पर्यंत केवळ पाकिस्तान कोणत्याही घातपातामागे 'रॉ'चा हात आहे असे सांगायचा. गेल्या वर्षी 'निज्जर' भारताविरुद्ध कारनामे करणार्या कॅनडास्थित खलिस्तानी समर्थकाची हत्या झाली आणि कॅनडाच्या RCMP पोलिसानी सरळ भारतिय गुप्तचर यंत्रणेवर आरोप केला. भारताने अर्थात तो फेटाळला. RCMP पोलिसानी 'आम्ही पुरावे दिले आहेत पण भारत स्वीकारायला तयार नाही' असे सांगितले. ह्यावर मात्र भारताची प्रतिक्रिया आली नाही.
गेल्या आठवड्यात 'बाबा सिद्दीकी' ह्या माजी मंत्र्याची हत्या झाली आणि ह्या मागे 'लॉरेन्स बिष्णोई' ह्या गुजरातमधील तुरुंगात असणार्या गुन्हेगाराची गँग आहे असे सांगितले. एवढेच नाही तर त्याची ७० की ७०० लोकांची टोळी आहे असेही सांगितले.
योगायोग असा की RCMP पोलिसानी गेल्या आठवड्यात निज्जरच्या हत्येमागे हीच 'लॉरेन्स बिष्णोई' टोळी आहे असे पत्रकार परिषदेत्च सांगितले.(https://www.youtube.com/watch?v=fcL8mDb0bqk&list=RDNSfcL8mDb0bqk&start_…).
गेल्या आठवड्यात अजित डोवाल ह्यांनी सिंगापूरमध्ये 'लॉरेन्स बिष्णोई हा कोठेही घातपात घडवुन आणु शकतो' असे विधान केले. https://www.tribuneindia.com/news/india/at-secret-meet-ajit-doval-told-…
हा लॉरेन्स बिषणोई कोण? हा गेले दहा वर्षे साबरमती येथील तुरुंगात बंद आहे. मग अजित दोवाल ह्यांच्या विधानाचा अर्थ असा काढायचा की रॉ'ने ह्या बिष्णोई टोळीच्या मदतीने निज्जर ह्याची हत्या केली? आणि मग बाबा सिद्दीकीच्या हत्येमागे कोण आहे?
ह्या सगळ्या प्रकारात रॉ ह्या संघटनेची अब्रु चव्हाट्यावर आली असे वातते. ह्यांच्या अधिकार्याची नावे, त्यांचे 'गुप्त' काम कॅनडाच्या पोलिसांनी जगासमोरच मांडले. त्यानंतर दूतावासात काम करणार्या अधिकांर्याच्या बदल्या ओघाने आल्या. 'जस्टिन ट्रुडो अपरिपक्व आहेत ' वगैरे चर्चा भारतिय चॅनेल्सनी चालु केल्या पण RCMP पोलिस पत्रकार परिषदेत जे भारतावर थेट आरोप करतात त्याचे काय?
वाचने
11282
प्रतिक्रिया
92
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाकी हे खलिस्तान एक कोडंच आहे
खराब माणसं थोडीच असतात. पण
In reply to बाकी हे खलिस्तान एक कोडंच आहे by चावटमेला
पण
In reply to बाकी हे खलिस्तान एक कोडंच आहे by चावटमेला
शेखर गुप्ता नेहमी एक किस्सा
In reply to पण by माईसाहेब कुरसूंदीकर
शिख देशाची मागणी केली तर काय बिघडले????
In reply to शेखर गुप्ता नेहमी एक किस्सा by कॉमी
सर उगाच तावातावाने उलटंतपासणी
In reply to शिख देशाची मागणी केली तर काय बिघडले???? by चौकस२१२
शिखांचा मूक पाठींबा ....
In reply to पण by माईसाहेब कुरसूंदीकर
Brigadier Israr Rahim Khan.
काही लोकाना एक सरकारी अधिकारी
सबळ
स्टेजड ईंटरव्यु आहे हा. पाने
In reply to सबळ by माईसाहेब कुरसूंदीकर
सिंगापूर मध्ये झालेल्या भेटीत
In reply to सबळ by माईसाहेब कुरसूंदीकर
भारतीय अधिकाऱ्यांच्या आपापसात
In reply to सिंगापूर मध्ये झालेल्या भेटीत by कॉमी
भारतीय अधिकाऱ्यांच्या आपापसात कम्युनिकेशनहे कॅनडा ला कसे कळाले? कॅनडा भारतीय अधिकार्याण्वर पाळत ठेउन होता काय? तसे असेल तर हे आंतर राष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन नाही काय?कल्पना नाही.
In reply to भारतीय अधिकाऱ्यांच्या आपापसात by सुक्या
माहित
In reply to भारतीय अधिकाऱ्यांच्या आपापसात by सुक्या
भारत पण तेच म्हणतोय भारताच्या
In reply to माहित by माईसाहेब कुरसूंदीकर
या सगळ्या चर्चेत सोनिया गांधी
कॅनडा
In reply to या सगळ्या चर्चेत सोनिया गांधी by चौथा कोनाडा
कॅनडा फुटीरतावादी लोकांना
In reply to कॅनडा by माईसाहेब कुरसूंदीकर
ट्रुडो जर सांगेल ते ऐकतो तर .
मागायची गरजच काय.. ते आज ना
In reply to ट्रुडो जर सांगेल ते ऐकतो तर . by कंजूस
एकीकडे कॅनडा सरकार म्हणतंय की