माझ्या बद्दल थोडं

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
2 May 2024 - 8:27 am

माझ्याबद्दल थोडं.
मी साहित्यिक नाही सराईत साहित्यिक तर नाहीच नाही.
माझा “कृष्ण उवाच” नावाने ब्लॉग आहे तो shrikrishnasamantwordpress.com
ह्या url वर पण मिळू शकतो
मी गेली 17 वर्षे माझा ब्लॉगवर लिहीत आलो आहे January 2007 पासून. लिहित आहे.
मला मराठी लिहिता येतं तसंच मला थोडं फार शुद्धलेखन कळतं आणि मी माझे विचार मांडायला उत्सुक असतो. मी माझ्या ब्लॉगवर झालेली टीका स्पोर्टिंगली घेतो. टीकेचे स्वागत करतो. गेली 30 वर्ष मी अमेरिकेत स्थायिक आहे मी अमेरिकन सिटीझन पण आहे.मी Californiaत राहतो.
मला माझा देश भारत याच्याबद्दल खूप अभिमान आहे तसंच मी शिवाजी महाराज यांना माझं दैवत समजतो. मला माझ्या भारतातल्या सर्व लोकांबद्दल मनापासून आदर आहे.मी माझ्या भारतीयांवर कधी टिका केली तर ती आदरयुक्त प्रेमाची
टिका असं समजावं.शक्यतो मी टिका
टाळतो.पण मी अमेरिकेत राहून टिका करतो त्याचा अर्थ मी स्वतःला
अतिशहाणा समजतो असा कृपया गैरसमज करून घेऊ नये ही विनंती.
(तसा पूर्वी गैरसमज सभासदांकडून
घेतला गेला असल्याने असं लिहित आहे एव्हढंच)
माझं वय सध्या 90 संपून 91 चालू आहे. मला लेखन करायला खूप आवडतं. मी मिसळपाव.कॉमवर
कित्येक वर्ष लिहीत आलो आहे. जवळ जवळ 300 वर यापूर्वी मिसळपाववर पोस्ट लिहिलेले आहेत. मध्यंतरी वैयक्तिक कारणामुळे मला कंटिन्यू करता आलं नाही. मी माझ्या “कृष्ण उवाच” या ब्लॉगवर जवळजवळ चौदाशे पोस्ट (एक हजार चारशे) अद्याप पर्यंत लिहिले आहेत. लेख, कविता, अनुवाद केलेल्या कविता, चर्चा, आदरांजली, वगैरे विषयावर हे लेख लिहिले आहेत.
तात्या म्हणून एक होते किंवा अजून असतील त्यांची माझी ओळख होती.
नीलकांतसरांवर माझा मिसळपाव संबंधाने टेक्निकल कारणास्तव बराच संपर्क यायचा ते पण माझ्या संपर्कात असायचे.
मला मनोमनी असं वाटलं की अलीकडच्या नवीन सभासदांना माझ्याबद्दल थोडी माहिती असावी म्हणून हा प्रपंच केला आहे आभार.

मांडणीसद्भावना

प्रतिक्रिया

"कृष्ण देवा आम्हाला पण थोडा चान्स द्या." हे आठवल.

कर्नलतपस्वी's picture

2 May 2024 - 10:20 am | कर्नलतपस्वी

ओळख आवडली. आपले वय आणी आवड पहाता ,प्रेरणादायी आहे.

चौथा कोनाडा's picture

2 May 2024 - 1:04 pm | चौथा कोनाडा

श्री़कॄष्णजी, आपले पुनश्च हार्दिक स्वागत !
आपलं स्व-गृही परतणं स्वागतार्ह आहे !

आपली माहिती आणि लेखन सेवा थक्क करणारी आहे.
आधी आपलं विविध लेखन वाचलं आहेच... आता ही लेखन करत राहून आम्हाला आपल्या लेखनाचा आस्वाद देत रहावा ही विनंती !

हार्दिक शुभेच्छा !

चौथा कोनाडा's picture

2 May 2024 - 1:25 pm | चौथा कोनाडा
तात्या म्हणून एक होते किंवा अजून असतील त्यांची माझी ओळख होती.

मिपाचे संस्थापक मालक तात्या उर्फ तात्या अभ्यंकर यांचे २०१९ मध्ये दु:खद निधन झाले.
तात्या आंतरजालीय आणि कलासंगीत क्षेत्रातले जाणकार असल्याने वृत्तपत्र माध्यमांनीही त्यांच्या अचानक जाण्याची दखल घेऊन बातमी छापली होती !

बातमी आणी चर्चा :

एक दिलखुलास व्यक्तिमत्व हरवले: मिपा संस्थापक तात्या : https://www.misalpav.com/node/44556

अहिरावण's picture

2 May 2024 - 2:30 pm | अहिरावण

अरे देवा वाचव

चौथा कोनाडा's picture

2 May 2024 - 4:57 pm | चौथा कोनाडा

अरे देवा वाचव

आता हे काय ?

भागो's picture

2 May 2024 - 5:31 pm | भागो

हा मी आलो आहे.
कुणाला वाचवायचं आहे? लौकर बोला. अजून बऱ्याच ठिकाणाचे कॉल आहेत.

विवेकपटाईत's picture

2 May 2024 - 5:19 pm | विवेकपटाईत

कमाल आहे तुमची.या वयात ही लेखन करत आहात. तुमचे स्वागत.

श्रीकृष्ण सामंत's picture

2 May 2024 - 8:07 pm | श्रीकृष्ण सामंत

वाईट वाटलं