आप की बदमाशियोंके....

विकास's picture
विकास in राजकारण
18 Jan 2014 - 7:59 pm

"आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है" ... आज बर्‍याच दिवसांनी एका जुन्या सुरेल गाण्याच्या ओळी आठवल्या. पण दरोज जे काही गेल्या २१ दिवसात दिल्लीत चाळे चालले आहेत त्या बदमाशियोंच्या संदर्भात...

वास्तवीक नव्याने सत्तास्थापना केल्यावर कुठल्याही सत्ताधारी पक्षास, त्यांच्यावर टिका करण्याआधी काही काळ देणे योग्य अहे असे वाटते. आम आदमी पार्टी अर्थात आप च्या बाबतीत तर हे जास्तच असावेसे वाटत होते. तसे पाळायचा प्रयत्न देखील करणार होतो, पण हे पठ्ठे जसे महाभारतात श्रीकृष्णाला शपथ मोडायला लावून रणांगणात येण्यास भाग पाडले गेले तसे करत आहेत. अर्थात येथे कोणी कृष्णही नाही आणि त्याला युद्धात उडी मारायला लावणारा कोणी भिष्मही नाही, हा भाग वेगळा. पण सत्तेत येऊ का नये हे जनतेला एस एम एस करून विचारणे हे आता अगदी विचारी कृत्य वाटावे असे चढत्या भाजणीने आप आणि त्यांच्या नेत्यांचे वागणे चालू आहे. २१ दिवसात यांनी जितके रंग दाखवलेत तितके इतर कुठल्याच पक्षाने दाखवले नसतील असे वाटते.

लोकशाहीतले राजकारण हे काही अंशी ग्यानबा-तुकाराम असे म्हणत अर्थात दोन पाउले पुढे एक पाऊल मागे असे करत जात असते. निवडणुकीतल्या घोषणा आणि सत्तेत आल्यावर वास्तवाचे भान या दोन गोष्टींचा विचार केल्यास सत्ताधारी पक्षाने काही माघारी घेतल्या तरी गैर वाटत नाही. आप च्या बाबतीत देखील त्यांनी काही मते बदलली असली किंबहूना "असती" तर विशेष असे वाटले नसते. पण त्यांनी जिथे मते बदलली आणि जिथे बदलली नाहीत त्याच्या जागा चुकीच्या आहेत. भ्रष्टाचारावरून निवडून आलेली ही पार्टी आता शीला दिक्षित यांचे नाव देखील घेण्यास तयार नाही. त्या भ्रष्टाचारी आहेत का नाहीत, मला माहीत नाही. पण केजरीवाल रिपोर्ट घेऊन आध हिंडायचे. बरं आता शक्य वाटत नसले तरी हरकत नाही, पण भाजपच्या हर्ष वर्धन नी पुरावा द्यावा असे म्हणणे म्हणजे अतीच झाले.

वीजदराबाबत आणि पाण्याबाबत निर्णय घेतलेत ते राजकीय घोषणाच अधिक आहेत कारण त्यात किती पैसे उधळले जाणार आहेत आणि नक्की कुणाला फायदा होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. त्या व्यतिरीक्त काही गोष्टी विधानसभेत संमत झाल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीत. तेंव्हा काँग्रेस काय करते त्यावर अवलंबून रहाणार.

असे बरेच काही २१ दिवसात झाले. पण गेल्या दोन दिवसात झालेली घटना ही केवळ आप पुरतीच नाही तर सगळ्या भारताला लांछनास्पद आहे. ज्या भारताने एकमुखाने, देवायनी खोब्रागडेंशी अमेरीकन पोलीस कायद्यानुसार वागले तरी स्त्री म्हणून आणि राजनैतिक अधिकारी म्हणून योग्य ट्रिटमेंट दिली नाही, म्हणून निषेध केला, त्याच भारतात युगांडातून आलेल्या स्त्रीयांवर कायदा हातात घेऊन (पक्षि: बेकायदेशीर पणे) दिल्ली सरकारातील कायदामंत्र्याने धक्कबुक्की केली, त्या बायकांना त्यांचे युरीन सँपल देण्यास भाग पाडले, ज्यातून काहीच सिद्ध होऊ शकले नाही. असे का करावे? तर त्या जेथे रहात होत्या तिथल्या रहीवाशांची तक्रार होती की ड्रग्ज-वेश्याव्यवसाय वगैरे चालत आहे म्हणून. या कायदा मंत्र्यांनी सोमनाथ भारतींनी पोलीसांना त्यांना पकडायला सांगितले. पोलीसांनी अर्थातच वॉरंट शिवाय पकडणे शक्य नाही म्हणून नाकारले. तर आता त्या पोलीसांनाच सस्पेंड करा म्हणून केजरीवाल ओरडत आहेत आणि ज्या कायदामंत्र्याने लोकशाहीतला कायदा हातात घेतला त्यांची भलावण करत (बेवजा तारीफ करना आप की आदत तो नही?), हे देशाच्या गृहमंत्रालयासमोर धरणे धरून बसायचे जाहीर करत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय हे ते ज्या गोर्‍या लोकांना रेसिस्ट म्हणतात त्यांच्या पेक्षा अधिक रेसिस्ट असल्याचे चित्र जगापुढे येत आहे. आणि त्याला कारण हे केरसुणीवाले नेते आहेत. विचार करा असली सर्कस मुंबई-बंगलोर-चेन्नई सारख्या ठिकाणी येऊन तिथल्या काही म्होरक्यांचे असले हट्ट पुरवायला लागली तर.

व्हिपी सिंग आले आणि साधारण एक-दिड आठवड्यातच भारताने पहील्यांदा दहशतवाद्यांना सोडले जो जनतेने नियम मानून नंतर कंदहार प्रकरणात केवळ राजकारण्यांच्याच मुलांसाठी का म्हणत पुढे रेटला. यात भाजपा-मोदींना निवडण्याचा प्रचार नाही, पण यांच्यापुढे अगदी आजचे भ्रष्ट आणि कोडगे काँग्रेसी नेते पण चालतील, अगदी मुलायम आले तरी चालतील असे म्हणण्यासारखी अवस्था आहे. पण आप च्या मदतीवीना... कारण उद्या हे असले आप-मतलबी नेते जर केंद्रात आले तर काय होईल याचा विचार करून त्यांना उर्वरीत ठिकाणाहून लागण होण्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे असे वाटत आहे.

प्रतिक्रिया

हे आता काळच ठरवेल. सो, मी इथे थांबतो. ज्यांच्याकडे मुद्दे नाहीत त्यांनी खफ, खव असले पुचाट मार्ग स्विकारलेयंत. पण व्यक्तिगत उपहास एकच दर्शवतो : समर्थकांकडे आता काहीही उरलं नाही. काही लोक `आरतीचे' स्कोर सेटल करतायंत, काही `देवाला रिटायर केल्याबद्दल खंतावलेत, कुणाचं काही तर कुणाचं काही, आणि मला इतका वेळ घालवता येणार नाही.

प्यारे१'s picture

28 Jan 2014 - 12:19 pm | प्यारे१

खिक्क्क्क!

पुण्याचे वटवाघूळ's picture

28 Jan 2014 - 12:20 pm | पुण्याचे वटवाघूळ

ज्यांच्याकडे मुद्दे नाहीत त्यांनी खफ, खव असले पुचाट मार्ग स्विकारलेयंत. पण व्यक्तिगत उपहास एकच दर्शवतो : समर्थकांकडे आता काहीही उरलं नाही. काही लोक `आरतीचे' स्कोर सेटल करतायंत, काही `देवाला रिटायर केल्याबद्दल खंतावलेत, कुणाचं काही तर कुणाचं काही, आणि मला इतका वेळ घालवता येणार नाही.

जोरदार असहमती. तुमच्या तोंडी लागण्यात काही अर्थ नाही हे ज्या मिपाकरांच्या लक्षात आले नसेल त्यांच्या लक्षात आले असावे म्हणून इतर सगळे गप्प बसत आहेत. शेवटी काहीही झाले तरी तुमची गिरा तो भी टांग उपरच असणार आणि म्हणून इतर लोक गप्प बसले तर बघा मला वादविवादात कोणी हरवू शकत नाही म्हणून फुकटचा भाव खायला तुम्ही परत मोकळे होणार हे पण माहित आहे. मिपावर आतापर्यंत इतक्या वेळा वेगवेगळ्या ज्येष्ठ सदस्यांनी तुमच्या लई-शहाणपणावर टिका केली आहे म्हणजे त्या टिकेत नक्कीच काहीतरी तथ्य असले पाहिजे. सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे तुम्ही जे काही बोलाल त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे आणि हा मनुष्य सुधारण्याच्या पलीकडचा आहे ही बेशर्त स्विकृती करणे हाच आहे.

संजय क्षीरसागर's picture

28 Jan 2014 - 1:10 pm | संजय क्षीरसागर

मला वादविवादात कोणी हरवू शकत नाही म्हणून फुकटचा भाव खायला तुम्ही परत मोकळे होणार हे पण माहित आहे.

मोदी समर्थकांकडे मुद्दा आहे कुठे? मला आश्चर्य वाटतं एखाद्याला बिनधास्त बदनाम करणं योग्य वाटतं कारण ते समर्थकांच्या सोयीचं आहे. आणि लेखातल्या मुद्यांचे बारा वाजले की हा रडीचा डाव खेळायचा :

मिपावर आतापर्यंत इतक्या वेळा वेगवेगळ्या ज्येष्ठ सदस्यांनी तुमच्या लई-शहाणपणावर टिका केली आहे म्हणजे त्या टिकेत नक्कीच काहीतरी तथ्य असले पाहिजे.

देव ही भंपक कप्लना आहे म्हटलं की प्रतिवाद करण्यापेक्षा `स्वतःला शहाणा समजतो म्हटलं' की समविचारी खिक्क आणि हा,हा,हा करायला मोकळे. कारण त्याला काय लागतंय?

>हा मनुष्य सुधारण्याच्या पलीकडचा आहे ही बेशर्त स्विकृती करणे हाच आहे.

वॉट अ ज्योक! इतक्याविरोधात (अर्थात काही पूर्वग्रहविरहित विचार करणारे इथेही आहेत), मी पोस्टचे सर्व निष्कर्ष चुकीचे आहेत हे दाखवून दिलंय.

श्रीगुरुजी's picture

28 Jan 2014 - 1:26 pm | श्रीगुरुजी

>>>

मोदी समर्थकांकडे मुद्दा आहे कुठे?

पण केजरीवालांचं विधानसभेतलं भाषण आणि त्यांनी राजदीप सरदेसाईला दिलेली मुलाखत हे जबरदस्त मुद्दे माझ्याकडे आहेत.

>>> मला आश्चर्य वाटतं एखाद्याला बिनधास्त बदनाम करणं योग्य वाटतं कारण ते समर्थकांच्या सोयीचं आहे. आणि लेखातल्या मुद्यांचे बारा वाजले की हा रडीचा डाव खेळायचा :

बरोब्बर! मोदींना विनाकारण बिनधास्त बदनाम करणे अनेकांना योग्य वाटतं कारण ते मोदीविरोधकांच्या सोयीचं आहे.

क्लिंटन's picture

28 Jan 2014 - 1:27 pm | क्लिंटन

पोट धरधरून गडाबडा लो़ळत हसायची स्मायली आहे का हो कोणाकडे?

प्रचंड ह.ह.पु.वा. संक्षींच्या या अशा प्रतिसादांमुळे अगदी प्रचंड मनोरंजन होते.त्यामुळे बाकी कोणी काही म्हणो मी तर संक्षींचा फॅनच आहे :)

श्रीगुरुजी's picture

28 Jan 2014 - 1:21 pm | श्रीगुरुजी

>>> मी पोस्टचे सर्व निष्कर्ष चुकीचे आहेत हे दाखवून दिलंय.

आणि कोणी अजून नवीन निष्कर्ष काढला किंवा भविष्यात केजरीवालांनी परत नाटकीपणा केला किंवा काही चुकीचे केलेले दिसले तरी त्यांच्या समर्थनार्थ मी लिहिनच की "केजरीवालांचे विधानसभेतले भाषण बघा किंवा त्यांनी राजदीप सरदेसाईला दिलेली मुलाखत बघा. बाकी इतर कशावरही बोलू नका."

अर्धवटराव's picture

28 Jan 2014 - 1:27 pm | अर्धवटराव

धाग्याने त्रीशतक गाठले व त्यानिमित्ताने केकें(केजरीवाल काका)चा टीआरपी वाढवायला हातभार लावल्याचे बघुन अत्यंत समाधान झाले. छान जुनी उणि-दुणी निघाली, अनेकांच्या नासलेल्या (असलेल्या + नसलेल्या) रिडींग बिट्वीन द लाईन्स कर्तुत्वाची साक्ष निघाली, बर्‍याच(बर्‍या)मिपाकरांचे बरेच(बरे)स्वभाव अनेक दिवसांपासुन दृगोच्चर न झाल्यामुळे अम्मळ सपक झालेल्या मिपाला ताजी फोडणी मिळाली. आता (बरच)बरं वाटतय.

पण काहि म्हणा... केकेंचं जssssरा चुकलच ;)

आणि विकासदादांच्या धाग्याचा पण टीआरपी वाढला की. ;)

श्रीगुरुजी's picture

28 Jan 2014 - 1:29 pm | श्रीगुरुजी

>>> पण काहि म्हणा... केकेंचं जssssरा चुकलच

काय सांगता? तुम्ही केजरीवालांचं विधानसभेतले भाषण ऐकलेले दिसत नाही. निदान त्यांची राजदीप सरदेसाईने घेतलेली मुलाखत तरी बघा.

आमचा धन्या 'तुमची कॅसेट अडकली, पेन्सिल टाकू का' वगैरे लोककलागीत सादर करेल बरका गुरुजी! =))

(धन्या आता स्वतःची तिसरी कॅसेट टाकेल ते वेगळं पण चालतंय ;) )

अर्धवटराव's picture

28 Jan 2014 - 1:59 pm | अर्धवटराव

प्रच्छन्न व्यक्तीपूजा आपल्याला (पक्षी मला स्वतःला) जमत नाहि. अरे, माणसाने माणसाचं कौतुक नाहि करायचं तर एखाद्या एलीयनने करायचं काय... सिरीयस आणि कॉमेडी असे सर्वप्रकारची भाषणं आम्हि ऐकतोच. पण कितीही ऐकलं तरी माणसाचा अ‍ॅक्च्युअल पोत समजल्याचा दावा करणं आमच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. पण त्यामुळे भमनिरास व्हायचे चान्सेस कमि होतात हे ही सत्य. असो.
केके आणखी बरेच शतकी धागे प्रसवायला कारणं पुरवतील हे मात्र निर्वीवाद.

वेडा बेडूक's picture

22 Mar 2024 - 5:32 pm | वेडा बेडूक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे. उत्पादनशुल्क गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी वारंवार समन्स बजावून देखील त्याकडे दुर्लक्ष करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराची ईडीच्या अधिकाऱ्यांनी २१ मार्चला रात्री झडती घेतली. केजरीवालांचे दूरध्वनी जप्त करून त्यांची तब्बल दोन तासांपेक्षाही जास्त काळ चौकशी करण्यात आली. आणि यानंतर केजरीवालांना अटक करण्यात आली.

शराब घोटाले के समय का केजरीवाल का फोन गायब, पूछताछ में बोले CM-पता नहीं कहां है?

------

https://www.indiatv.in/delhi/big-reveal-in-delhi-liquor-scam-case-cm-arv...

------

कुछ ना कहो....कुछ भी ना कहो..

ईडी की कस्टडी से सीएम केजरीवाल का पहला आदेश, जल मंत्रालय के लिए जारी किया नोट

https://navbharattimes.indiatimes.com/metro/delhi/politics/delhi-cm-arvi...

-----

जहां पानी की कमी है, वहां उचित संख्या में टैंकरों का इंतजाम कीजिए।

जरूरत पड़ने पर उपराज्यपाल महोदय का भी सहयोग लें। वे भी आपकी मदद जरूर करेंगे।

--------

कूछ ना कहो ,कूछ भी ना कहो....

-----

ED ने केजरीवाल से की 4 घंटे तक पूछताछ, सिसोदिया के सचिव से करवाया जाएगा दिल्ली CM का आमना-सामना

https://www.abplive.com/news/india/delhi-cm-arvind-kejriwal-phone-missin...

मुक्त विहारि's picture

26 Mar 2024 - 6:07 am | मुक्त विहारि
अमरेंद्र बाहुबली's picture

26 Mar 2024 - 10:48 am | अमरेंद्र बाहुबली

ईडी ही संस्था भ्रष्ट आहे. केजरीवाल सारख्या सज्जन माणसावर कोणाच्या ईशार्यानरून अटक केलीय हे आपण जाणतोच.

तरी कोर्ट ईडीवर विश्वास ठेवते?
ईडीच्या विरोधात तुम्ही कोर्टात का जात नाही?

कोर्टावर नसेल विश्वास तर आंतरराष्ट्रीय कोर्टात? जर्मनी नक्की सहाय्य करेल तुम्हाला. ते पण तुमच्यासारखेच चिंतेत आहेत फार.

मुक्त विहारि's picture

26 Mar 2024 - 3:20 pm | मुक्त विहारि

मज्जा मज्जा आहे.....

मुक्त विहारि's picture

26 Mar 2024 - 3:15 pm | मुक्त विहारि

हे नक्की का?

कारण, कोर्टाचा तर ED वर विश्वास आहे आणि तुमचा कोर्टावर विश्र्वास आहे....

कर्नलतपस्वी's picture

26 Mar 2024 - 3:23 pm | कर्नलतपस्वी

इडी चा जन्म १९५६साली झाला. सन दोन हजार तेरा पर्यंत इडी इमानदार संस्था होती.

हम करे तो रासलिला.......

मुक्त विहारि's picture

26 Mar 2024 - 4:55 pm | मुक्त विहारि

काही लोकं, डब्बल ढोलकी असतात.

ईडी की कस्टडी में किसी को पेन और पेपर नहीं मिलता, फिर ऑर्डर कैसे दे रहे अरविंद केजरीवाल?

https://zeenews.india.com/hindi/india/how-arvind-kejriwal-issuing-orders...
------

Now You See Me.... हा सिनेमा आठवला...

ईडी हिरासत में पत्र लिखने पर दर्ज हो सकता है केस, नई मुश्किलों में घिर सकते हैं केजरीवाल

https://www.amarujala.com/india-news/arvind-kejriwal-case-may-be-registe...

-------

इकडे आड आणि तिकडे विहीर.....

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Mar 2024 - 9:12 pm | अमरेंद्र बाहुबली

ईडीने कितीही त्रास देऊद्या. केजरीवाल वाकनार्यांमधले नाहीत.

मुक्त विहारि's picture

26 Mar 2024 - 7:15 pm | मुक्त विहारि

https://www.livehindustan.com/national/story-arvind-kejriwal-arrest-upda...

------
विशेष असे काही नाही....

लालू आणि सोरेनच्या वेळी, अमेरिका गप्प होती आणि आता ह्याच्या मागे उभी आहे..

ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी, अशी म्हण आठवली....

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Mar 2024 - 9:17 pm | अमरेंद्र बाहुबली

जर्मनीनं केजरीवाल यांच्याबाबत विधान केलं आणि ही कोर्ट केस न्यायोचित मार्गानं चालेल अशी अपेक्षा व्यक्त केली. मोदी सरकार तापलं आणि हा आमच्या अंतर्गत बाबतीत हस्तक्षेप आहे अशी चिडचीड करून दाखवली.

आता अमेरिकेनं 'आम्ही या खटल्यावर लक्ष ठेऊन आहोत, हा खटला उचित आणि पारदर्शक पद्धतीनं होईल अशी आमची अपेक्षा आहे' असा तंबीवजा इशारा दिला आहे. आता सरकारची प्रतिक्रिया काय राहील ते पाहू. राॅयटर्स या जगप्रसिद्ध वृत्तसंस्थेनं दिलेलं वृत्त पहिल्या comment मध्ये.

ईडीसह सर्वच तपास यंत्रणांचा चाललेला दररोजचा नंगानाच आता परदेशात सुद्धा चर्चेचा विषय झाला आहे. एक भारतीय म्हणून मला हे अतिशय दुःखद वाटतं. आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय पत घसरत आहे हे खेदजनक आहे.
- श्री. विश्वंभर चौधरी
https://www.reuters.com/world/india/us-encourages-fair-transparent-proce...

मुक्त विहारि's picture

26 Mar 2024 - 9:22 pm | मुक्त विहारि

आमच्या देशातला अंतर्गत बाबतीत ढवळाढवळ करू नका, हे ठाम पणे सांगितले...

ये नया भारत हैं.... झुकेगा नहीं साला...

आधी ट्रम्पवरचा खटला नीट चालवा म्हणाव ! स्वतः नागडे आणि दुस-याचा सदरा काखेत फाटलाय असं म्हणून हसतात !!

भारत, गुलाम कशाला झाला असता?

गोरा बोले, गुलाम डोले...

विवेकपटाईत's picture

10 Apr 2024 - 3:40 pm | विवेकपटाईत

ज्यांना मेगासे अवॉर्ड फोर्ड फोंडेशन कडून मदत मिळते त्यांची काळजी अमेरिकेला होणार. बाकी शाळांऐवजी दारूची मोठ्या प्रमाणात दुकाने उघडणे. थोक विक्रेत्याचे कमिशन पाच वरून 12% करणे फुटकर विक्रेत्याचे कमिशन 30 रू वरून ३६३ रुपये करणे. एकावर एक बाटली फ्री. जास्त दारू पिण्याचा परीणाम... तिहाड च्या जनकपुरी वाल्या बाजूने एक गटर ही वाहते.

मुक्त विहारि's picture

27 Mar 2024 - 3:03 pm | मुक्त विहारि

'मेरी याददाश्त कमजोर तो क्या ये गिरफ्तारी की वजह होगी', कोर्ट में ED की कार्रवाई पर बोले केजरीवाल

https://www.abplive.com/news/india/arvind-kejriwal-custody-delhi-cm-ques...

-------

बदाम खाल्ले की, सगळे आठवेल....

अहिरावण's picture

27 Mar 2024 - 7:31 pm | अहिरावण

No immediate relief for Kejriwal; Delhi HC issues notice to ED, next hearing on April 3

https://indianexpress.com/article/cities/delhi/arvind-kejriwal-arrest-pl...

कांदा लिंबू's picture

27 Mar 2024 - 8:04 pm | कांदा लिंबू

अरेरे! कित्ती वैट्ट झालं ना!

यांच्यापेक्षा ते मेनन का कसाब का कुणीतरी त्यांचे बरे होते, रात्री तीन वाजता की काहीतरी त्यांच्यासाठी सर्व हुच्च् न्यायालयात जाऊन न्यायमूर्तींना विनंती करत होते.

मुक्त विहारि's picture

28 Mar 2024 - 5:27 pm | मुक्त विहारि

कोर्ट में केजरीवाल की दलीलें

https://www.aajtak.in/legal-news/story/arvind-kejriwal-asked-why-were-yo...

-------

केजरीवाल हे लिखीत उत्तरे पण देत नाही आहेत आणि मोबाईलचा पासवर्ड पण देत नाही आहेत....

कर नाही तर, डर कशाला?

केजरीवाल को CM पद से हटाने वाली याचिका खारिज, जानें दिल्ली HC ने क्या कहा

https://www.indiatv.in/delhi/delhi-high-court-reject-petition-to-remove-...

------

हाई कोर्ट ने कहा कि ये कार्यपालिका से जुड़ा मामला है। दिल्ली के उपराज्यपाल इस मामले को देखेंगे और फिर वह राष्ट्रपति को इस भेजेंगे। इस मामले में कोर्ट की कोई भूमिका नहीं है।

-------

‘अरविंद केजरीवाल की तबीयत ठीक नहीं’, पत्नी सुनीता का दावा- मुख्यमंत्री को किया जा रहा परेशान

https://www.prabhatkhabar.com/national/arvind-kejriwal-not-well-wife-sun...

-----

केजरीवाल ने स्वीकार किया कि वह सहयोग करने के लिए तैयार हैं और उन्हें हिरासत में रहने पर कोई आपत्ति नहीं है.

-------

ही पण डब्बल ढोलकी निघाली...

केजरीवाल, मोबाईलचा पासवर्ड द्यायला तयार नाहीत आणि म्हणते की, केजरीवाल मदतीला तय्यार....

मुक्त विहारि's picture

28 Mar 2024 - 8:17 pm | मुक्त विहारि

https://www.livehindustan.com/national/story-india-attacks-america-for-c...

-------
जाता जाता...

अमेरिकेला, ह्या प्रकरणांत, इतका रस का? ज्या ज्या देशांत, अमेरीका नाक खुपसते,त्या त्या देशांत अराजक होते... मग तो अफगानिस्तान असो, किंवा इराक असो किंवा पाकिस्तान असो...

------

त्याचमुळे जेव्हा जेव्हा इतर कुणी नाक खुपसायचा प्रयत्न करेल तेव्हा त्याचे नाक शुर्पणखेसारखे कापणे हीच रामराज्याकडे वाटचाल सुरु असल्याची खुण आहे.

जय श्रीराम
जय हिंद
जय महाराष्ट्र
जय सनातन धर्म
जय शिवशंकर
जय भवानी जय शिवाजी

मुक्त विहारि's picture

29 Mar 2024 - 7:31 pm | मुक्त विहारि

झुकेगा नहीं साला....

मुक्त विहारि's picture

28 Mar 2024 - 10:39 pm | मुक्त विहारि

अरविंद केजरीवाल का बयान कोर्ट में दर्ज, बोले- रिमांड बढ़ाने का विरोध नहीं, पर...

https://hindi.news18.com/news/nation/arvind-kejriwal-statement-recorded-...
------

जिसमें उन्होंने कहा था कि वह जांच एजेंसी के साथ सहयोग करने के लिए तैयार है

-----
ED ला मदत करायची होती तर मग, पहिले बोलावणे आले, तेंव्हाच का मदत केली नाही?

------

सुनीता केजरीवाल ने लॉन्च किया 'केजरीवाल को आशीर्वाद' अभियान, वॉट्सऐप नंबर किया जारी; करना होगा ये काम

https://www.jagran.com/delhi/new-delhi-city-ncr-delhi-cm-arvind-kejriwal...

-------

कर नाही तर डर कशाला?

गवर्नर सक्सेना का केजरीवाल पर गंभीर आरोप, अटका रखी है सेक्शुअल हैरेसमेंट की फाइल

https://zeenews.india.com/hindi/zeesalaam/news/arvind-kejriwal-news-cm-g...

------

आनंद आहे......

निष्पक्ष माहौल में हो चुनाव... अमेरिका, जर्मनी के बाद केजरीवाल विवाद में कूदा संयुक्त राष्ट्र, जानें क्या कहा

https://navbharattimes.indiatimes.com/world/america/united-nations-on-ar...

--------

बांग्लादेशी पत्रकार ने इससे जुड़ा सवाल पूछा...

-------

ह्या , बांगलादेशी पत्रकाराला, नूह हिंसाचार , Haldwani हिंसाचार किंवा संदेशखाली प्रकरण दिसले नाही....

------

चुनावी फंडिंग से विजय नायर तक, आखिर केजरीवाल के मंत्री से 5 घंटे की पूछताछ में ED ने क्या-क्या पूछे सवाल

https://www.jansatta.com/national/delhi-excise-policy-ed-kailash-gehlot-...

----

कैलाश गहलोत, हे दुसरे समन्स मिळतात हजर झाले...

------

केजरीवाल तिहाड़ जेल पहुंचे, बैरक में अकेले रहेंगे:ED बोली- दिल्ली CM ने बताया कि विजय नायर आतिशी-सौरभ को रिपोर्ट करता था

https://www.bhaskar.com/national/news/delhi-cm-arvind-kejriwal-ed-case-l...