Skip to main content

अरविंद बरोबर दीड तास!

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 20/03/2014 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
India Today Conclave 2014 मधे अत्यंत सधन, निष्पक्ष आणि विचारवंत लोकांसमवेत अरविंद केजरीवालांचा झालेला हा पूर्णपणे खुला संवाद तुमच्या-माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. दीड तास लोकांचं अवधान एकचित्त आहे आणि कुणाही पूर्वग्रहरहित व्यक्तीचं तसं राहील यात शंका नाही. स्वतःवर झालेल्या टिकेला दिलेली उत्तरं. स्वतः दुसर्‍यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण. झालेल्या चुकांची प्रांजळ कबुली. देशाला पुढे नेण्यासाठी सरकारनं काय करायला हवं आणि सामान्यांचा सत्तेतल्या सहभागाची अनिवार्यता. पंतप्रधानपदाच्या संघरात त्यांची भूमिका. आणि सरते शेवटी देशासाठी एक स्वप्न अशा बहुविध अंगांनी हा मनमोकळा संवाद एखाद्या मैफिलासारखा बहरलायं. प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, कमालीची सुसंगत विचारसरणी, कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं साहस आणि अत्यंत समतोल व्यक्तिमत्त्व या इंडिया टुडेच्या निष्पक्षिय चित्रफितीतून व्यक्त होतं. या देशासाठी एक विधायक स्वप्न पाहणार्‍या प्रत्येक सुजाण नागरिकाला या विडिओमुळे समोर आलेल्या संधीचं सोनं करता येईल या अपेक्षेनं आणि खरं तर विनंतीनं ही पोस्ट संपन्न करतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 80440
प्रतिक्रिया 219

प्रतिक्रिया

स्वतःवर झालेल्या टिकेला दिलेली उत्तरं. स्वतः दुसर्‍यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण. झालेल्या चुकांची प्रांजळ कबुली. देशाला पुढे नेण्यासाठी सरकारनं काय करायला हवं आणि सामान्यांचा सत्तेतल्या सहभागाची अनिवार्यता. पंतप्रधानपदाच्या संघरात त्यांची भूमिका. आणि सरते शेवटी देशासाठी एक स्वप्न अशा बहुविध अंगांनी हा मनमोकळा संवाद एखाद्या मैफिलासारखा बहरलायं. प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, कमालीची सुसंगत विचारसरणी, कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं साहस आणि अत्यंत समतोल व्यक्तिमत्त्व वर उल्लेखीत एक तरी वाक्य सत्यात उतरतांना पाहिलय का कोणि ? प्रांजळपणा, साहस, समतोल व्यक्तिमत्व, तर्कशुद्ध दृष्टीकोन, ब्ला ब्ला ब्ला हे आलय का अनुभवास.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे. उत्पादनशुल्क गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी वारंवार समन्स बजावून देखील त्याकडे दुर्लक्ष करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराची ईडीच्या अधिकाऱ्यांनी २१ मार्चला रात्री झडती घेतली. केजरीवालांचे दूरध्वनी जप्त करून त्यांची तब्बल दोन तासांपेक्षाही जास्त काळ चौकशी करण्यात आली. आणि यानंतर केजरीवालांना अटक करण्यात आली.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ह्या भीती पाईच, केजरीवाल यांनी, ED चे बोलावणे टाळले... ED, CBI आणि NIA, ह्यांच्या पाठीमागे, न्यायालय देखील उभे आहे...

केजरीवाल की गिरफ्तारी-रिमांड पर हाईकोर्ट का अर्जेंट सुनवाई से इनकार:कहा- बुधवार को मामला सुनेंगे; आतिशी का आरोप- हमारा दफ्तर सील किया गया https://www.bhaskar.com/national/news/delhi-cm-arvind-kejriwal-ed-arres…