(बिल्डींगच्या या तळाशी राहशी तू) - मराठी भाषा गौरव दिन २०२३ - विडंबन विशेष!

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in लेखमाला
27 Feb 2023 - 4:43 pm

प्रेरणा -
काळजाच्या या तळाशी राहशी तू - Deepak Pawar

बिल्डींगच्या या तळाशी राहशी तू
सारखा शेजारी माझ्या नांदशी तू

मागणे ते, "उसणवार देत जावे मी तुला!"
कसे सांगू? संयम जणू माझा मागशी तू

चव नाही माझ्या मीठाला सांगताना
का रे आता? जीभ वेड्या चावशी तू?

एवढा आता कसा हा बदलला तू
जाऊनी वाटे, माझ्याशी भांडशी तू!

आठवू मी का तुला? म्हणतोस आणिक
उसणवाराला तरी आता जागशी तू?

मराठी दिन

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 Feb 2023 - 8:14 pm | प्रचेतस

=))

आवडले

उग्रसेन's picture

1 Mar 2023 - 9:16 am | उग्रसेन

आवडले. जब्रा.

कविता एकतर डोक्यावरून जातात (खरंतर लैच डोक्यात जातात) त्यामुळे त्यांच्या वाटेला जात नाही 😂
पण कवितांची विडंबने मात्र चेहऱ्यावर हसू फुलवत असल्याने ती आवर्जून वाचतो!
उधार-उसनवारी करणाऱ्या शेजारी/सहवासींवरचे हे विडंबन आवडले 😀

भागो's picture

1 Mar 2023 - 10:07 pm | भागो

आवडलीच!

तुषार काळभोर's picture

4 Mar 2023 - 1:01 pm | तुषार काळभोर

काळजाच्या तळाशी असलेल्या शेजाऱ्याला पार उचलून फेकलय!!

कर्नलतपस्वी's picture

6 Mar 2023 - 1:03 pm | कर्नलतपस्वी

मागताना, ताक भांडे किती लपविशील तू
दिलेले, पाच हजार परत कधी देशील तू

हा हा हा.....

प्रचेतस's picture

7 Mar 2023 - 7:54 am | प्रचेतस

यावरून भांडे का लपविता ... ??? हे मिपावरील एक अजरामर विडंबन आठवले

रंगीला रतन's picture

7 Mar 2023 - 3:07 am | रंगीला रतन

खिक्क

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Mar 2023 - 9:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडले. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

विवेकपटाईत's picture

10 Mar 2023 - 11:09 am | विवेकपटाईत

आवडली.