Skip to main content

काळजाच्या या तळाशी राहशी तू.

लेखक Deepak Pawar
सोमवार, 20/02/2023 या दिवशी प्रकाशित केले.
काळजाच्या या तळाशी राहशी तू सारखी स्वप्नात माझ्या नांदशी तू. मागणे ते,"विसरुनी जावे मला तू!" काय सांगू? प्राण माझा मागशी तू. प्रेम ना माझे तुझ्यावर सांगताना का गं आता? या टिपाना ढाळशी तू? एवढी आता कशी ही बदलली तू वेचुनी काटे, फुलांशी भांडशी तू. आठवू मी का तुला? म्हणतेस आणिक चांदण्या मोजीत का या जागशी तू.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3193
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

कविता या वेळेस जरा हटके आहे. नेहमीच प्रेमरंगी रगंणारे, साजणी आता इथे तू एकदा येऊन जा सांजवाती सांजवेळी तू इथे लावून जा. बहरली ही बाग सारी, बघ फुले फुलली किती फुललेली ही फुले केसात तू माळून जा शब्द तू,संगीत तू, म्हणणारे तुम्हीं,आज विराणी का लिहीलीत? असो, तुमची रचना ती आमची प्रेरणा. &#129315 तहे दिलसे माफी मांगता हूॅ और चार लाईन खरडता हूॅ l उम्मीद है माफ करोगेl कविता निश्चितच आवडली.

In reply to by कर्नलतपस्वी

सांजवेळी आलेल्या 'साजणी' ला "जा जा" सांगणारा कवी हे सांगायला विसरला की काय ? - साजणी 'सातच्या आत' तू घरी जा - अन जाताना दार तेवढे लावून जा सभ्य सुसंकृत शालीन नारी पोचती सातच्या आत घरी

मस्त ! सुरेख ! मागणे ते,"विसरुनी जावे मला तू!" काय सांगू? प्राण माझा मागशी तू. या ओळी खासच !