Skip to main content

(बिल्डींगच्या या तळाशी राहशी तू) - मराठी भाषा गौरव दिन २०२३ - विडंबन विशेष!

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 27/02/2023 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - काळजाच्या या तळाशी राहशी तू - Deepak Pawar बिल्डींगच्या या तळाशी राहशी तू सारखा शेजारी माझ्या नांदशी तू मागणे ते, "उसणवार देत जावे मी तुला!" कसे सांगू? संयम जणू माझा मागशी तू चव नाही माझ्या मीठाला सांगताना का रे आता? जीभ वेड्या चावशी तू? एवढा आता कसा हा बदलला तू जाऊनी वाटे, माझ्याशी भांडशी तू! आठवू मी का तुला? म्हणतोस आणिक उसणवाराला तरी आता जागशी तू?
विशेष

वाचने 8348
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

आवडले. जब्रा.

कविता एकतर डोक्यावरून जातात (खरंतर लैच डोक्यात जातात) त्यामुळे त्यांच्या वाटेला जात नाही 😂 पण कवितांची विडंबने मात्र चेहऱ्यावर हसू फुलवत असल्याने ती आवर्जून वाचतो! उधार-उसनवारी करणाऱ्या शेजारी/सहवासींवरचे हे विडंबन आवडले 😀

काळजाच्या तळाशी असलेल्या शेजाऱ्याला पार उचलून फेकलय!!

मागताना, ताक भांडे किती लपविशील तू दिलेले, पाच हजार परत कधी देशील तू हा हा हा.....

आवडले. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे