ताज्या घडामोडी । फेब्रुवारी २०२३

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in राजकारण
2 Feb 2023 - 4:47 am

काल १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्यांचे भाषण इथे वाचता येईल आणि इथे पाहता येईल.

नेहमीप्रमाणे अर्थसंकल्पावर माध्यमांतून चर्वितचर्वण सुरु झाले आहे. अडाणींच्या कंपन्यांवर झालेले आरोप, त्यांनी FPO रद्द केल्याची घटना यांचीही या चर्चेला फोडणी आहेच!

अर्थसंकल्पांतील उत्पन्नकराचा दरप्रस्ताव हा मध्यमवर्गीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. या वर्षी नवीन कर योजनेत सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही.

Budget-2023

अर्थसंकल्पातील "अर्थाशी" थेट संबंधित नसलेल्या या दोन बातम्या

पॅन कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता

एआइ विकसन केंद्र निर्मितीची घोषणा

अर्थचर्चेसाठी काही उपयुक्त दुवे:

केंद्रीय अर्थसंकल्प अधिकृत दुवा

केंद्रीय अर्थसंकल्प विकिपान

भारत आर्थिक सर्वेक्षण विकिपान

अडाणी चर्चेचे मिपापान

---

१ फेब्रुवारी हा हिजाब दिन म्हणून साजरा केला जातो.

त्यासंबंधित हे भारतातील दुवे:

हिजाब हवा

हिजाब नको

हिजाब हे काफिर स्त्रियांना मुस्लिम बनवण्याचे साधन

हिजाबबद्धल डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: मिपापान

इराणी स्त्रियांची हिजाबविरोधी निदर्शने: विकिपान

---

अवांतरः वरील लिखाणात दुवे (links) देताना ही युक्ती वापरण्यात आली आहे.

---

अती-अवांतरः आंतरजालावर कोणत्याही बातम्या शोधल्यावर प्रिंट वायर एनडीटीव्ही टाइम्स लोकसत्ता मटा वगैरे संस्थळे प्रामुख्याने दिसतात. पांचजन्य, ऑर्गनाइझर, तरुण भारत वगैरे संस्थळे दिसत नाहीत. (संघप्रणीत पक्षाचे सरकार केंद्रांत सत्तेत येऊन सलग नऊ वर्षे / एकूण पंधरा वर्षे होत आहेत.)

प्रतिक्रिया

हिंदू कार्यकर्ते आणि नेते मणिकंदन यांची अज्ञातांनी हत्या केली आहे. ते हिंदू मक्कल काची नावाच्या स्थानिक हिंदू गटाचे दक्षिणी मदुराई उपसचिव होते. २०१९ मध्ये अशीच एक घटना नोंदवली गेली होती, जेव्हा पट्टाली मक्कल काची (PMK) या स्थानिक गटाचा सदस्य असलेल्या हिंदू कार्यकर्ता रामलिंगम यांची तंजावर जिल्ह्यातील कुंभकोणम येथे PFI गुंडांनी घरी परतत असताना हत्या केली होती. या कॄर हत्येमध्ये त्यांचे जिवंतपणी हात कापले होते. जास्त रक्तस्त्राव झाल्याने रामलिंगम यांचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला.

स्थानिक हिंदू समाज नेतृत्त्वहीन करण्यासाठी अशा हत्या केल्या जातात असे दिसून येते.

निनाद भाऊ ...छे छे "फेक बातमी " भारतात हिंदूंवर अत्याचार कधीच होत नाहीत! .... काहीतरी गैरसमजुतीतून "रब्बा रब्बा ऍक्सीडेन्ट हो गया" असेल हो "
आणि असल काही झाल तरी आमच्य्या कडे त्या विरोधी मोर्चा काढायला मेणबत्या संपलया आहेत किंवा काडेपेट्या पण संपल्या असतील .. आणि काड्या काही शिल्लक असतील तर त्याचा वपर खालील दोन गोष्टनसाठी करण्यात आम्ही मग्न आहोत त्यामुळे उगाच हे हिंदूंवर अत्याचार वैगरे तुणतुणे लावू नका
१) काड्या वापरून थोडी आग पेटव्याची आहे कि जेणेकरून प्रिय राजपुत्र रागा यांना जी काश्मीर मध्ये बर्फामुळे थंडी वाजली ती कमी करता येईल .. ती कमी झाली कि मग "मी पुन्हा ३७० आणीन" या साठी त्याना बळ येईल
२) अडानि आणि शेठ ला कशी माती खायला लावली या आनंदत्सवासाठी होळी आहे ( लाल भडक ) त्याला हि काही काड्या लागतात

कंजूस's picture

2 Feb 2023 - 6:44 am | कंजूस

घडामोडींचा महिना आहे.

१) जुन्या नव्या करपद्धतींची तुलना इथेही पाहता येईल.
https://www.indiatoday.in/business/budget-2023/story/union-budget-income...

२) लिखाणात दुवे (links) देताना ही युक्ती वापरण्यात आली --
ही target blank ची युक्ती सुरक्षित नाही असे बरेच डेव्हलपर म्हणतात. Links लहान असतील तर जशा आहेत तशा देणे योग्य ठरते कारण तोच लेख वाचकाने वाचला असेल किंवा त्या साईटवर विश्वास नसेल तर वाचक ती लिंक उघडण्याचे टाळू शकतो.
३)सर्च इंजिन bingचेही वापरावे. काही साईटसवरची माहिती उद्बोधक आणि माहितीपर नसून भोंगळही (दोन चार वाक्यें पुन्हा पुन्हा लिहून जागा भरलेली) असते.

कळलं नाही. दुव्यावर टिचकी मारली की तो दुवा नवीन खिडकीत्/टॅबमध्ये उघडावा यासाठी काय करावं लागेल?

कंजूस's picture

2 Feb 2023 - 9:21 pm | कंजूस

सोपं आहे.
<p><a href="https://www.misalpav.com/node/51054" target="_blank" >अडाणी चर्चेचे मिपापान </a></p>

असं दिल्यावर नवीन टॅबमध्ये दुवा उघडतो आणि 'बॅक' बटण दाबल्यावर फक्त तो दुवा मिटतो.

mayu4u's picture

3 Feb 2023 - 12:32 pm | mayu4u
mayu4u's picture

3 Feb 2023 - 12:39 pm | mayu4u

धन्स हो, कंकाका!

परंतू असे नवीन टॅबचे दुवे देण्यात धोका असतो असे बरेच लेख वाचण्यात आल्यावर ते देणे बंद केले.

कंजूस's picture

5 Feb 2023 - 1:26 pm | कंजूस

एखादा अड्रेस ब्राउजरच्या खिडकीत टाकून 'गो' करतो तेव्हा फोनची आणि ब्राउजरची सिक्युरिटी सिस्टम कामाला लागते आणि त्या साईटवर वार्निंग मिळते. पण न्युज विंडो टार्गेट मध्ये तसं काही होत नाही असे डिवेलपर म्हणतात. एवढंच मला कळलं. मी तो टार्गेट कोड बंद केला.
सर्च केल्यास याबद्दल लेख सापडतील.

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Feb 2023 - 6:51 am | राजेंद्र मेहेंदळे

सामान्य करदात्यांना जुन्या पद्धतीमध्ये १० लाख उत्पन्नावर १.२५ लाख आयकर भरावा लागत होता आणि वरच्या उत्पन्नावर ३०%

आता नवीन पद्धतीमध्ये १५ लाखावर १.५० लाख आणि वरच्या उत्पन्नावर ३०% आयकर आहे. त्यामुळे खिशात जास्त पैसा राहील असे वाटते. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

पगारी नोकरदार उतपन्न घेणारे हे ८०सीसी वगैरे सवलती घेत असत आणि गुंतवणूक,विमा काढत. परंतू ते काढले आहे. सरसकट no tax limit वाढवून 80 cc सवलती काढल्या आहेत. दोन वर्ष जुन्या पद्धतीने टॅक्स भरण्याचा पर्याय ठेवला आहे. जे उत्पन्न दार कोणतीच गुंतवणूक करत नाहीत त्यांना नवीन करपद्धतीचा फायदा होईल. तसेच ही सवलत काढल्याने ppf मधली गुंतवणूक बंद होईल. "Forced investments to save tax" बंद होईल.
अधिक इथे वाचा -
https://www.businesstoday.in/union-budget/budget-2023-reactions/story/ol...

आग्या१९९०'s picture

2 Feb 2023 - 8:09 am | आग्या१९९०

तसेच ही सवलत काढल्याने ppf मधली गुंतवणूक बंद होईल. "Forced investments to save tax" बंद होईल.
खूपच चांगली सुरुवात. हळूहळू आयकर प्रत्येक उत्पन्न गटाला लागू करावा आणि दर कमी ठेवावे. खासकरून कृषि उत्पन्नाला आयकर कक्षेत आणावे.

श्रीगुरुजी's picture

2 Feb 2023 - 7:33 pm | श्रीगुरुजी

विधानपरीषदेच्या एकूण ५ शिक्षक-पदवीधर मतदारसंघात भाजपला पुन्हा एकदा जोरदार धक्का बसताना दिसतोय. यातील कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचा उमेदवार जिंकलाय, परंतु तो मूळ भाजपचा नसून शिउबाठातून आयात केलेला होता. नाशकात सत्यजित तांबे जिंकत आहेत, पण ते अपक्ष आहेत. संभाजीनगर शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसने राखलाय. मागील सलग २ वेळा अमरावती पदवीधर मतदारसंघात व नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजप उमेदवार जिंकला होता. परंतु आज हे दोघेही हरले आहेत.

म्हणजे ५ पैकी फक्त १ मतदारसंघात भाजप जिंकलाय, तो सुद्धा आयाराम आहे. २ मतदारसंघ भाजपने हातातून घालविले.

२ वर्षांपूर्वी विधानपरीषदेच्या एकूण ६ शिक्षक-पदवीधर मतदारसंघात निवडणूक झाली होती. त्यात फक्त १ मतदारसंघात भाजप जिंकला, तो सुध्दा कॉंग्रेसमधून उमेदवार आयात करून. उर्वरीत ५ मतदारसंघात भाजप हरला होता. त्यात नागपूर पदवीधर (भाजप सलग ६ वेळा विजयी) व पुणे पदवीधर (भाजप सलग २ वेळा विजयी) या दोन्ही मतदारसंघात भाजपचा पराभव झाला होता.

शिक्षक मतदारसंघ, विशेषतः पदवीधर मतदारसंघ सुशिक्षित मतदारांचा मतदारसंघ असतो. भाजपला सुशिक्षित वर्गात मोठा पाठिंबा आहे असे गृहीतक आहे. परंतु या ११ मतदारसंघात फक्त २ ठिकाणी भाजप जिंकला (आयात उमेदवारांमुळे) व पूर्वी जिंकलेले किमान ४ मतदारसंघात भाजपचा पराभव झालाय. या मतदारसंघात साधारणपणे १ ते ४ लाख मतदार असतात व ही संख्या दुर्लक्षिण्याजोगी नाही. भाजप फक्त आयारामांच्या जिवावरच जिंकतो व मूळ भाजप उमेदवारांना मतदार जिंकून देत नाहीत, असे चित्र २ वर्षांनंतरही कायम आहे.

माझ्या मते भाजप समर्थक मतदारांची स्थानिक नेतृत्वाविरूद्ध (फडणवीस, चंपा, गिरीश महाजन, मुनगंटीवार इ.) असलेली नाराजी यातून दिसते. भाजपने स्थानिक नेतृत्व बदलले पाहिजे हा यातून संदेश आहे. दोन वर्षांपूर्वी चंपा राज्याध्यक्ष होते व फडणवीस महाराष्ट्रात भाजपचे एकमेव प्रमुख नेता शिल्लक होते. मुंडे, तावडे, खडसे, बावनकुळे वगैरे नेत्यांना २ वर्षांपूर्वी अडगळीत टाकले होते. ६ महिन्यांपूर्वी फक्त बावनकुळेंना आमदार करून राज्याध्यक्ष करण्यात आले. इतर नेते अजूनही अडगळीत आहेत. बावनकुळे राज्याध्यक्ष झाले असले तरी निर्णयप्रक्रियेत त्यांना कितपत स्थान आहे याची कल्पना नाही. अजूनही सर्व निर्णय फडणवीसच घेत आहेत असे चित्र आहे. त्यामुळे बावनकुळेंना आणूनही फरक पडलेला नाही, कारण सर्व सूत्रे फडणवीसांच्याच हातात आहेत व या ११ मतदारसंघातील मतदारांनी याच विरोधात मत दिले आहे, असे माझे मत आहे.

शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या कौलाला फारसे महत्त्व नाही असे काही जणांना वाटेल. परंतु सलग दोन वेळा मतदारांनी स्पष्ट कौल दिला आहे. फडणवीसांना व त्यांच्या कोटरीला भाजपने नेतेपदावरून हटविले नाही व अडगळीत टाकलेल्या नेत्यांचे पुनर्वसन केले नाही, तर पुढील सर्व स्थानिक व विधानसभा निवडणुकीत हेच चित्र दिसेल. फडणवीसांना बहुतेक याचा अंदाज आला आहे, म्हणूनच १५ महापालिकांची मुदत संपून १ वर्षाहून अधिक काळ लोटल्यानंतरही तेथे निवडणूक टाळली जात आहे. या १५ पैकी ९ महापालिकेत भाजपची सत्ता आहे व निवडणूक झाल्यास बहुसंख्य महापालिकेत भाजपचा पराभव होऊन आपला फुगा फुटेल ही भीति असावी.

श्रीगुरुजी's picture

2 Feb 2023 - 11:36 pm | श्रीगुरुजी

ऑक्टोबर २०१९ नंतर ४ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली व विधानपरीषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या एकूण ११ मतदारसंघात निवडणूक झाली. या १५ पैकी भाजपने फक्त ३ जागा जिंकल्या (पंढरपूर विधानसभा मतदारसंघ, धुळे पदवीधर मतदारसंघ व कोकण पदवीधर मतदारसंघ). या तीनही मतदारसंघात भाजपने इतर पक्षांचा नेता भाजपत आणून त्याला उमेदवारी दिली होती. इतर १२ पैकी अंधेरी मध्ये भाजपने आयत्या वेळी पळ काढला तर काही ठिकाणी अपक्षाला पाठिंबा दिला.

पुढील विधानसभा निवडणुकीत काय होईल हे स्पष्ट दिसत आहे.

आता कसबा व पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघात २७ फेब्रुवारीस पोटनिवडणूक आहे. या दोन्ही जागा भाजपकडे आहेत व दोन्ही मतदारसंघात भाजपला फटका बसू शकतो. भाजप जिंकला तरी मताधिक्य खूप कमी असेल. विशेषतः कसब्यात भाजपने ब्राह्मण उमेदवार दिला नाही तर पराभव अटळ आहे.

श्रीगुरुजी's picture

2 Mar 2023 - 2:25 pm | श्रीगुरुजी

आता कसबा व पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघात २७ फेब्रुवारीस पोटनिवडणूक आहे. या दोन्ही जागा भाजपकडे आहेत व दोन्ही मतदारसंघात भाजपला फटका बसू शकतो. भाजप जिंकला तरी मताधिक्य खूप कमी असेल. विशेषतः कसब्यात भाजपने ब्राह्मण उमेदवार दिला नाही तर पराभव अटळ आहे.

अंदाज बरोबर ठरला. कसब्यात मुद्दाम अब्राह्मण उमेदवार देऊन आपण ब्राह्मणांपासून फटकून राहतो याचे प्रदर्शन वारंवार करण्याचा अट्टाहास अंगाशी आला.

हे होणारच होतं. टिळक कुटुंबात उमेदवारी नाकारली तेव्हाच भाजपचा पराभव नक्की झाला होता. ब्राह्मणांची मते हवीत, पण ब्राह्मण उमेदवार नको, ब्राह्मणांना शिव्या घालणाऱ्या राणे कुटुंबियांना आम्ही मंत्री करणार, राखीव जागा वाढवून आम्ही ब्राह्मण विद्यार्थ्यांचे नुकसान करणार, गडकरींचा पुतळा तोडणाऱ्याला आम्ही आमदार करणार . . . पण तरीही आम्हाला ब्राह्मण डोळे झाकून मते देतीलच हे गृहीतक व माज ब्राह्मणांनी मोडून काढला. सदाशिव, शनिवार, नारायण या पेठातून कॉंग्रेसला भरपूर मते मिळालीत.

नवीन मते मिळविण्यासाठी पारंपारिक समर्थक मतदारांना गृहीत धरून लाथाडल्यास ते तुम्हाला लाथ घालतात हे आज सिद्ध झाले.

एक अत्यंत सोपी निवडणूक फडणवीसांच्या अट्टाहासाने विनाकारण अवघड करून शेवटी पराभव करून घेतला. केवळ १८-१९ महिने शिल्लक राहिलेल्या या पोटनिवडणुकीसाठी फडणवीसांनी प्रचंड ताकद लावली होती. फडणवीसांसह ५ मंत्री १५ दिवस कसब्यात तळ ठोकून बसले होते. अगदी अमित शाह व एकनाथ शिंदेंनाही प्रचारासाठी आणले. राज ठाकरेंचाही पाठिंबा मिळविला. कचरापेटीत फेकून दिलेल्या पंकजा मुंडेंनाही प्रचाराला आणले. प्रत्येक मतामागे २ त ४ हजार वाटप झाल्याचेही बोलले जाते. परंतु इतकी ताकद लावूनही पराभव झाला. पेठातील ब्राह्मण मतदार फार तर नोटा हा पर्याय स्वीकारतील पण कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेसला मत देणार नाहीत, या भ्रमात भाजप होता. पण चंपा-फडणवीसांच्या ब्राह्मणविरोधी निर्णयांना तडाखा देण्यासाठी यावेळी अनेक ब्राह्मणांनी मुद्दाम कॉंग्रेसला मत दिले. समाजमाध्यमातून यावेळी अनेक ब्राह्मण उघड उघड भाजपविरोधात बोलत होते.

पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा पराभव होणार होता. ते ओळखून फडणवीसांनीच राहुल कलाटेला अपक्ष उभे रहायला सांगितले असेही बोलले जाते.

पुढील विधानसभा निवडणुकीत चंपाला परत कोथरूडवर लादले, तर तेथेही भाजप नक्की हरणार. चंपा-फडणवीस हे महाराष्ट्रात भाजप संपविणार. जे काम शिवसेनेत राहून राऊत करतोय तेच काम भाजपत राहून फडणवीस करताहेत. महाराष्ट्रात भाजपला आपली घसरण थांबवायची असेल तर चंपा-फडणवीस या दोघांना नेतेपदावरून व निर्णय प्रक्रियेतून हटविणे आवश्यक आहे. ऑक्टोबर २०१९ पासून विधानपरीषद व विधानसभेच्या एकूण १७ मतदारसंघात निवडणूक झाली व त्यातील फक्त ४ जागा भाजप जिंकला. आपले ६ मतदारसंघ भाजपने घालविले. हेच पुढे सुरू राहणार आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

3 Feb 2023 - 1:57 pm | चंद्रसूर्यकुमार

रशिया-युक्रेन युध्दात नवी घडामोड होत आहे. १०-१२ दिवसांपूर्वी जानेवारीच्या ताज्या घडामोडींच्या धाग्यात जर्मनीकडून युक्रेनला दिल्या जाणार्‍या रणगाड्यांसाठी परवानगीचा उल्लेख केला होता. ती परवानगी आता जर्मनीने दिली आहे आणि काही दिवसातच जर्मन रणगाडे युक्रेनच्या मदतीला जातील.

दुसरे महायुध्द हा रशियात अजूनही काळजाला भिडणारा विषय आहे. त्या युध्दाला रशियात Great Patriotic War असे म्हटले जाते. त्यामुळे रशियाविरोधात जर्मन रणगाडे हा आपल्या सैनिकांना चेतवायला एक मुद्दाच पुतीनकाकांना मिळाला. कालच दुसर्‍या महायुध्दातील स्टालिनग्राडच्या लढाईत जर्मन सैन्याच्या शरणागतीला ८० वर्षे पूर्ण झाली. ती लढाई तर रशियात अगदीच अभिमानाचा विषय आहे. तो धागा पकडून पुतीनकाका म्हणाले- 'ज्या प्रकारे स्टालिनग्राडमध्ये आपण जिंकलो तसेच युक्रेनविरूध्द युध्दात जिंकू'.

पुतीनकाकांची युक्रेन युध्दाची स्टालिनग्राडशी तुलना अंमळ गंडलेली वाटली. एक तर स्टालिनग्राडमध्ये रशियन आपल्या देशावरील आक्रमणाला तोंड देत होते ते आक्रमक नव्हते. त्यामुळे युक्रेन युध्दाशी त्याची तुलना कशी करता येईल? दुसरे म्हणजे स्टालिनग्राडपूर्वी रशियाची अवस्था अगदीच डेस्परेट (मराठी शब्द?) होती. जर स्टालिनग्राड पडले असते तर मग रशियाला आपला देश वाचविणे कठीण गेले असते त्यामुळे रशियन सैनिक आणि सामान्य लोक अगदी त्वेषाने लढले. त्याची युक्रेन युध्दाशी तुलना कशी होईल? तिसरे म्हणजे स्टालिनग्राडच्या लढाईपुढे युक्रेनमध्ये जे काही चालू आहे त्याला फार तर चकमकी म्हणता येईल इतकी मोठी ती लढाई होती. अशा चकमकी जिंकायला इतक्या मोठ्या लढाईत आपण जिंकलो होतो हे म्हणणे म्हणजे शाळकरी मुलांच्या गच्चीतील क्रिकेटच्या सामन्यात 'बघा आपण १९८३ चा वर्ल्ड कप जिंकलो होतो' असे म्हणून उत्साह निर्माण करणे झाले.

हे बोलून आपल्याला अपेक्षेइतकी प्रगती युक्रेनमध्ये करता आलेली नाही हे पुतीनकाका मान्य करत आहेत का?

चित्रगुप्त's picture

3 Feb 2023 - 2:56 pm | चित्रगुप्त

डेस्परेट = घायकुतीला आलेले/आलेली - - घायकुतीला येण्याची परिस्थिती ???

चंद्रसूर्यकुमार's picture

3 Feb 2023 - 3:06 pm | चंद्रसूर्यकुमार

डेस्परेट = घायकुतीला आलेले/आलेली - - घायकुतीला येण्याची परिस्थिती ???

हो तसे म्हणता येईल.

धन्यवाद.

कानडाऊ योगेशु's picture

3 Feb 2023 - 6:32 pm | कानडाऊ योगेशु

डेस्परेट = अगतिक.

साहना's picture

7 Feb 2023 - 8:24 am | साहना

७२ तासांचे युद्ध १ वर्ष लांबले ह्यांतच पुतीन काकांची नामुष्की आहे. एकूण बराच चोप रशियन सैन्याला मिळाला आहे. जबरदस्तीने सैनिक भरती करावी लागली ह्यांतच रशियाच्या तथाकथित बलाढ्य पणाचा बुडबुडा फुटला. पण तरी सुद्धा रशियन विश्वगुरुत्वाकर्षण काही संपत नाही. युद्ध जितका काळ लांबेल तितका काळ रशियाचा शक्तिपात होत राहील. युक्रेन च्या मागण्या थोड्या अति वाटत असल्या तरी जेंव्हा जेंव्हा पाशात्य देशांनी युक्रेन ला सामरिक मदत दिली त्याचा अत्यंत चांगला फायदा युक्रेन ने करून घेत रशियाला विविध ठिकाणी मात दिली आहे.

बोलघेवडा's picture

3 Feb 2023 - 4:55 pm | बोलघेवडा

डेस्परेट = उतावीळ ?

बारीक बारीक हल्ले करून नाही मर्म करत राहाणे हेच ध्येय ठेवले आहे. त्यात यशस्वी झालेत. मोठ्या राष्ट्रांना युद्धसाहित्य तपासण्याची संधी मिळते, युक्रेनचा जीव जातोय. युरोपात तेल,गॅस पोहोचत नाही आणि जेरीस आणता येतंय त्यांना.

नाही मर्म करत राहाणे नुकसान करत राहायचे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Feb 2023 - 10:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बीबीसीने गुजरात दंगलीवरील इंडिया : दी मोदी क्वश्चन नावाची दोन भागाची डॉक्युमेंट्री प्रसारीत केली होती आणि त्यावर भारतीय प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली होती. आता अनेकांनी ती डॉक्युमेंट्री बघितली असावी. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असून बीबीसीचा माहितीपट रोखण्याचा मूळ नोंदी सादर करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिला. जेष्ठ पत्रकार, एन. राम.तृणमल, काँग्रेस खासदार महुआ मोईन्ना आणि अ‍ॅड. प्रशांत भूषण आदींनी या प्रकरणात याचिका दाखल केली आहे.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2023 - 1:44 pm | श्रीगुरुजी

२०१४ विधानसभा निवडणुकीत पुण्यातून ३ ब्राह्मण आमदार निवडून आले होते. २०१९ मध्ये फडणवीसांच्या मराठा लांगूलचालन धोरणामुळे कोथरूड व शिवाजीनगर मतदारसंघातील ब्राह्मण आमदारांना घरी पाठवून मराठा उमेदवार दिले. फक्त कसब्यात ब्राह्मण आमदार शिल्लक राहिला आता मुक्ता टिळकांच्या निधनानंतर ब्राह्मण उमेदवार देण्याऐवजी हेमंत रासने हा मराठा उमेदवार दिला आहे. म्हणजे पुण्यातून आता एकही ब्राह्मण आमदार नाही. पिंपरी चिंचवड मध्ये मात्र लक्ष्मण जगतापांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. परंतु कसब्यात मुक्ता टिळकांच्या कुटुंबातील कोणालाही उमेदवारी दिली नाही.

२०२४ लोकसभा निवडणुकीत गिरीश बापटांऐवजी मुरलीधर मोहोळ किंवा संजय काकडे हे उमेदवार असणार. एकंदरीत राजकारणातून सर्व ब्राह्मण लोकप्रतिनिधींना संपविण्याची फडणवीसांची चाणक्यनीति आहे.

कसब्यातील भाजपच्या मतदारांनी रासनेला हरवून फडणवीसांना धडा शिकवावा अशी इच्छा आहे. २०१९ मध्ये मेधा कुलकर्णी चंपाच्या आश्वासनांना न फसता अपक्ष उभ्या राहिल्या असत्या तर सहज निवडून आल्या असत्या. आता सुद्धा शैलेश टिळक अपक्ष किंवा कॉंग्रेसकडून उभे राहिले तर सहज निवडून येतील.

फडणवीसांची सर्व कारस्थाने पूर्ण फसली आहेत हे २०१९ विधानसभा निवडणुकीपासून अनेकदा सिद्ध झाले आहे. २०१९ मध्ये सत्ता घालवून बसले. नंतर झालेल्या विधानसभा व विधानपरीषदेच्या एकूण १५ मतदारसंघांच्या निवडणुकीत फक्त ३ मतदारसंघात विजय मिळाला व तो सुद्धा आयाराम पक्षात आणून. उठांना घालविले, परंतु मुख्यमंत्रीपद मिळाले नाही व भाजपला फक्त ९ मंत्रीपदे मिळाली. २०१९ चे सरकारही जेमतेम ८० तासात आटोपले.

दुर्दैवाने ना फडणवीस यातून काही धडा घेताहेत ना मोदी-शहा.

रात्रीचे चांदणे's picture

5 Feb 2023 - 1:24 pm | रात्रीचे चांदणे

कसब्यातील किंवा पुण्यातील लोकांना ब्राह्मणच उमेदवार कशाला पाहिजे? जो योग्य उमेदवार असेल त्याला लोकांनी जात पात न बघता मते द्यावीत.

रामचंद्र's picture

6 Feb 2023 - 12:10 pm | रामचंद्र

म्हणजे हा समाजसुद्धा इतर समाजांसारखाच विचार करतो हेच खरं.

निवडून येणारे उमेदवार हवेत. कोणत्याही जातीचे असोत. (दुर्दैवाने भाजप यातच "कोणत्याही पक्षातील असोत" हे ही जोडत आहे.)

उमेदवारांना जातीच्या निकषावर तोलायचे कशाला?

निवडून येईल तो वर जाईल.

चंद्रसूर्यकुमार's picture

5 Feb 2023 - 11:53 am | चंद्रसूर्यकुमार

परवेझ मुशर्रफ मेला. मरणान्तानि न वैराणि वगैरे बकवास व्यक्तिशः मला तरी अजिबात मान्य नाही. तो जिवंत असताना हलकट होता आणि कायमच हलकटच राहणार आहे. तरीही ही बातमी २५ वर्षांपूर्वी आली असती (किंवा खरं तर तो जन्मलाच नसता) तर त्याचा काहीतरी उपयोग होता. आता तो काहीही करण्याच्या स्थितीत नसताना मेल्यावर जगाचा काही विशेष फायदा झालेला नाही. तरीही हजारो भारतीयांच्या मृत्यूला जबाबदार असलेला मुशर्रफ मेला याचा आनंद आहे.

https://www.hindustantimes.com/world-news/former-pakistani-president-per...

तुषार काळभोर's picture

6 Feb 2023 - 6:30 am | तुषार काळभोर

' ओसामा बिन लादेन ' यांचं निधन.
हे जसं म्हणता येत नाही, तसंच मुशर्रफविषयी.
कदाचित कोणत्याही पाकिस्तानी राज्यकर्त्याविषयी.
पाकिस्तानी लष्कराचा अधिकारी, लष्करप्रमुख, राष्ट्रप्रमुख या प्रत्येक भूमिकेत भारताचा द्वेष, भारताला जास्तीत जास्त त्रास देणं, भारताविरुद्ध कारस्थाने करणं याच गोष्टी मुशर्रफने आयुष्यभर केल्या. शेवटची काही वर्षे परागंदा होऊन अंथरुणाला खिळून काढताना जरी त्याच्या मनात (यदाकदाचित) त्याच्या कृत्याविषयी पश्चाताप असला तरी त्यामुळे ही पापे धुतली जाण्यासारखी नव्हती.

त्याला सामान्य माणसाप्रमाणे हॉस्पिटलांत मरण आले म्हणून दुःख वाटते. त्याच्यासारख्या युद्ध गुन्हेगारांना कारावासात मृत्यू यायला पाहिजे होता.

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2023 - 8:14 am | श्रीगुरुजी

मुशर्रफ कोल्ह्यासारखा धूर्त होता. त्याने धूर्तपणे अमेरिका व भारतालाही यशस्वीपणे खेळविले आणि हे करीत असताना त्याने आय एस आय, तालिबान, दहशतवादी यांना पोसून दहशतवादाचा भस्मासूर मोठा केला.

एकीकडे तालिबानचा नि:पात करण्यासाठी अमेरिकेला मदत व त्या मदतीच्या बदल्यात अब्जावधी डॉलर्स किंमतीची मदत व शस्त्रास्त्रे मिळविणे आणि दुसरीकडे गुपचूप तालिबान, अल कैदा, लादेन अशांना मदत असा डबल गेम तो अत्यंत यशस्वीपणे खेळला. नवाज शरीफला घालवून सत्तेवर बसणे, भारताच्या कोणत्याही इशाऱ्याला व धमकीला भीक न घालता मसूद अझर, दाऊद अश्या वॉंटेड दहशतवाद्यांना सर्व प्रकारे मदत देऊन भारतात वारंवार दहशतवादी हल्ले करणे, भारताचे विमान अपहरण, लादेनला सर्व प्रकारची मदत, लादेन व मुल्ला ओमरला गुपचूप आश्रय देणे, हे सर्व करीत असताना वाटाघाटींचे नाटक रंगवून जगाच्या डोळ्यात सातत्याने धूळ फेकणे, नवाज शरीफ व बेनझीर भुट्टो या विरोधकांना देशाबाहेर जाण्यास भाग पाडणे . . . हे सर्व करण्यात मुशर्रफ अत्यंत यशस्वी झाला होता. इतके धूर्त राजकारणी जगाच्या इतिहासात क्वचितच झाले असतील.

सुबोध खरे's picture

6 Feb 2023 - 11:46 am | सुबोध खरे

इतक्या धूर्त राजकारण्याने स्वार्थासाठी आपल्या देशाची इतकी वाट लावून ठेवली आहे जितकी झिया उल हक यांनी सुद्धा लावली नव्हती.

या दोन्ही लष्करशहांच्या विषवल्लीला इतकी विषारी फळे आली आहेत कि ती स्वभूमीलाच गिळंकृत करू लागली आहेत.

दोन्ही लष्करशहानी तेथील लोकशाही कायमची खिळखिळी करून टाकली आहे. आणि आता त्यानी पाळलेल्या दहशतवादाची पिल्ले लष्करशाहीलाच आव्हान देऊ लागली आहेत. यामुळे लोकशाही नाही कि हुकूमशाही- तेथे संपूर्ण अराजकाची स्थिती निर्माण झाली आहे.

कपिलमुनी's picture

6 Feb 2023 - 11:38 am | कपिलमुनी

Imahe

श्रीगुरुजी यांचा अंदाज योग्य ठरला आणि टिळकांचा तिकीट कापला आहे.

सध्या पुण्यात यांबाबत बराच रोष दिसतो. अर्थात ३-५ % असलेल्या समाजाला कोणी हिंग लावून विचारणार नाही.

भाजपच्या सुरुवातीच्या काळात या पक्षाला ज्या समाजाने साथ दिली, पक्ष वाढवला त्या समाजाला भाजपने बरोबर धोबी पछाड दिली आहे.

भाजप ला खात्री आहे की हे लोक काँग्रेस, रा काँग्रेस कडे जाणार नाहीत.. त्यामुळे घर की मुर्गी टाईप अवस्था आहे

>>>भाजप ला खात्री आहे की हे लोक काँग्रेस, रा काँग्रेस कडे जाणार नाहीत.. त्यामुळे घर की मुर्गी टाईप अवस्था आहे

या मुद्द्याबद्द्ल नाही पण भाजपने पारंपारिक मतदारांना फारच गृहीत धरले आहे. राणे किंवा एकंदर झालेली आयात असो, सकाळचा शपथविधी असो की वेगवेगळ्या निवडणुकांदरम्यान घेतलेले अनेक अवसानघातकी निर्णय असोत.

यासाठी भाजपला लवकरात लवकर उजवीकडे एक पर्याय उभा राहिला पाहिजे. भाजपने हुशारीने तेथे आजिबात जागा तयार होऊ दिली नाहीये.

आप, डावे, पप्पू, ममता वगैरे देशद्रोही पिलावळ सध्या सत्तेपासून दूर आहे ही चांगलीच बाब आहे.. पण भाजपला आव्हान देणारा पक्ष उजवीकडचाच हवा.

कपिलमुनी's picture

6 Feb 2023 - 4:55 pm | कपिलमुनी

भाजपचा थिंक टँक अतिशय हुशार आहे.
अतिउजव्या विचार सरणी चे बजरंग दल किंवा विहिंप असोत ते भाजपच्या पंखाखाली आहेत.
त्यामुळे इतक्या लौकर भाजपा ला पर्याय नाही. आपकडे प्रोग्राम आहे पण संघट्न आणि दुसर्‍या फळीतले नेतृत्वनाही. कोंग्रेसकडे सध्या ना नेतृत्व , ना संघटन ना कोणता प्रोग्राम अशी अवस्था आहे. डावे किंवा दाक्षिणात्य पक्ष फार लिमिटेड आहेत.
येन केन कारणेन भाजप फुटला तरच भाजप ला पर्याय असेल.. नाहीतर अजून २-३ केंद्रीय निवडनूका तरी भाजप वाले निवांत आहेत.

मोठा राष्ट्रीय पक्ष काढणे सोपे नाही. कॉम्ग्रेस ला स्वातंत्र्यलढा व कित्येक दशकांचा इतिहास होता व आद्य पक्ष असण्याचा फायदा मिळाला.
भाजप चा प्रवास हिंदू महासभा - भारतीय जन संघ - जनता पार्टी -भाजप असा आहे . एवढा दीर्घ लढा देउन , संघटना उभी करावी लागते. तेव्हा राष्ट्रीय पक्ष तयार होतो.
त्यासाठी केजरीवाल, ममता सारखे एकखांबी तंबू उपयोगि नाहीत. आणी सध्या तशी आयडॉलॉजी घेउन कोंणीही काम करत नाहीये.

मोदक's picture

6 Feb 2023 - 9:39 pm | मोदक

भाजप फुटणे मला तरी शक्य वाटत नाहीये. मतभेद होऊन एक दोन लोकं सोडून जाणे वगैरे चालू राहील पण उभी फूट अशक्यच वाटत आहे. कारण संघाचा भक्कम वैचारीक कणा, मोठे चित्र पाहण्याची क्षमता आणि परम् वैभवं नेतुमेतत स्वराष्ट्रम्..

सध्याचा विचार केला तर मोदी २०२४ ला ७४ वर्षांचे होत आहेत. नंतर ते २०२५ ला मार्गदर्शक मंडळात जाणार की संघ / भाजप त्यांच्यासाठी वेगळा नियम करून २०२९ पर्यंत पंतप्रधानपदी टिकवून ठेवणार याचे उत्तर मिळेल तेंव्हा पुढच्या अनेक गोष्टी स्पष्ट होतील.
ज्या प्रकारे जगभरातून मोदींना २००२ साठी अजून दोष दिला जातो ते बघता मोदी सरळ २०२७ ला राष्ट्रपती होतील. म्हणजे सर्वांनाच देशाच्या सर्वोच्च पदावरच्या नेत्यावर राळ उडवणे थोडे अवघड जाणार.

दुसरी फळी कोण असणार हे बघणे महत्वाचे असेल.

बाकी विरोधी पक्षांबद्दल फारसे बोलण्यासारखे नाहीच आहे. केजरूने सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागून सेल्फ गोल केला आहेच. त्याच्याकडे पुढच्या ४-५ वर्षात कुंपणावरची आणखी एक दोन राज्ये गेली तरी भरपूर झाले.

पप्पू तर भाजपचा स्टार प्रचारक आहे.. त्यामुळे त्याने कायम बॅटिंग करावी आणि त्यांच्याच प्लेयरला रन आऊट करत बसावे ही भाजपची इच्छा तो पूर्ण करतो आहेच.

(हे माझे वैयक्तिक मत आहे आणि यात बहुतांश सगळे जर तर असे आहे)

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2023 - 10:51 pm | श्रीगुरुजी

केंद्रात २०२४ ला परत मोदीच येणार याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही आणि महाराष्ट्रात पुढील दोन विधानसभा निवडणुकीत तरी भाजप येणार नाही व तीन अंकी जागा मिळणार नाहीत याविषयी सुद्धा माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

किंबहुना फडणवीस-चंपा आपल्या चुकीच्या निर्णयांमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सरकार बनविण्याची वाटचाल सुकर करीत आहेत, याविषयी सुद्धा माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. २०२४ व २०२९ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येणार याविषयी सुद्धा माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

२०२४ मध्ये शिऊबाठा अधिकृतपणे पूर्णपणे संपणार व शिंदे गट किरकोळ जागा जिंकून अंतिमतः भाजपत विलीन होईल याविषयी सुद्धा माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

अर्थात हे टाळण्यासाठी फडणवीस-चंपा या दोघांना भाजपने तातडीने सर्व पदांवरून हाकलणे आवश्यक आहे. जितक्या उशिरा ते जातील तितकी भाजपची जास्त घसरण होत राहणार व जितक्या लवकर ते जातील तितकी भाजपची घसरण थांबून पुनरूज्जीवनला सुरूवात होईल व निदान २०३४ पर्यंत तरी भाजप २०१४ च्या अवस्थेत पोहोचेल याविषयी सुद्धा माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

+१

भाजप चा प्रवास हिंदू महासभा - भारतीय जन संघ - जनता पार्टी -भाजप असा आहे . एवढा दीर्घ लढा देउन , संघटना उभी करावी लागते. तेव्हा राष्ट्रीय पक्ष तयार होतो.

हे सगळे खरे आणि वाखाणण्यासारखेच असले तरी मला तरी भारतीय समाज भावनात्मक पद्धतीने मतदान करतो असे वाटते
त्यामुळेच भाजप ला २ वरून ३०३ आणि इंदिराजींन्च्य्या खुनानंतर केवळ भावनेपोटी ४०४ सभासद एका पक्षाचे हे त्याचे लक्षण आहे

२०२४ साली खाडकन भाजप खाली आणि काँग्रेस १६० वगैरे असे होईल कि काय कोण जाणे कारण केवळ राहूल गांधी कसे चांगले व्यक्ती आहेत विदागार ( मग त्यांचं पाकसाचे काय धोरण वैग्रे ते गेले तेल लावत )

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2023 - 2:25 pm | श्रीगुरुजी

आपण ब्राह्मणांविरूद्ध काहीही केले तरी शेवटी ब्राह्मण भाजपलाच मते देतील किंवा फार तर नोटा वापरतील या गृहीतकावर फडणवीस-चंपा यांनी मागील काही वर्षांत अनेक ब्राह्मणविरोधी निर्णय घेतले. प्रगत मराठा जात अत्यंत मागास आहे असा खोटा अहवाल तयार करून मराठ्यांना १६% राखीव जागा देऊन ब्राह्मणांचे नुकसान करणे, ब्राह्मण आमदारांना घरी पाठवून त्यांच्या जागी मराठा उमेदवार देणे, ब्राह्मण महापुरूषांची बदनामी करून त्यांच्यावर चिखलफेक खरणाऱ्यांविरूद्ध मौन पाळून त्यांना पायघड्या घालून पक्षात आणून मंत्रीपदे देणे ही कारस्थाने याच गृहीतकातून केली गेली.

२०१९ पर्यंत ही कारस्थाने बहुसंख्य ब्राह्मणांच्या लक्षातच आली नव्हती. आपल्या जातीचा माणूस सलग ५ वर्षे मुख्यमंत्री आहे व पुढेही त्यालाच मुख्यमंत्री करायचे या धुंदीत बरेच ब्राह्मण फडणवीसांना खांद्यावर घेऊन नाचत होते. फडणवीस मराठा मतांसाठी ब्राह्मणांचा बळी देत आहेत हे त्यांना समजतच नव्हते.

परंतु काही ब्राह्मणांनी हे ओळखले होते. त्यामुळे ३०१९ मध्ये कोथरूडमध्ये चंपा जेमतेम २५००० मतांनी निवडून आले (जेथ १ लाख मताधिक्य अपेक्षित होते). पर्वती, शिवाजीनगर व कसब्यातही मताधिक्य घटले.

यावेळी मात्र टिळकांना ठरवून उमेदवारी नाकारल्याने बऱ्यापैकी विरूद्ध आवाज उठला आहे. समाजमाध्यमे व इतर माध्यमातून ब्राह्मण उघडपणे ब्राह्मणांना सातत्याने डावलल्याविरूद्ध बोलत आहेत. पोटनिवडणुकीत याचा परीणाम दिसणार आहे. रासने हरण्याची बरीच शक्यता आहे किंवा अगदी काठावर ते निवडून येतील.

ब्राह्मण मते जेमतेम ३-४% असली तरी ती सर्वत्र समान पसरलेली नाहीत. पुण्यातील ४ मतदारसंघ, नाशिक, नागपूर, डोंबिवली अश्या ७-८ मतदारसंघात निकाल ठरविण्याइतकी त्यांची संख्या आहे. भाजपची सर्वोत्तम कामगिरी २०१४ मध्ये १२२ जागा व २८.५% अशी आहे. २०१९ मध्ये २५.७५% मते व १०३ जागा अशी कामगिरी घसरली. अशी तोळामासा प्रकृती असलेल्या पक्षाला ब्राह्मणांची ३-४% मते व ७-८ जागा गमावणे परवडणार नाही. पुढील निवडणुकीत भाजप फार तर ६० व शिंदे गट फार तर २० जागा जिंकेल. आहे ती मते कायम ठेवून नवीन मते मिळवण्याऐवजी हक्काची ब्राह्मण व इतर मागासवर्गीय मते घालवून नवीन मराठा मते मिळविण्याचे भाजपचे अ तथाकथित मास्टर स्ट्रोक फसलेला आहे. हातात आहेत ती ब्राह्मण व इतर मागासवर्गीय मते जाणारच आहेत आणि नवीन मराठा मते मिळणार नाहीत. भाजप-शिंदे गटाला सत्तेत राहण्यासाठी किमान १४० जागा जिंकल्या पाहिजे. त्यासाठी एकत्रित किमान ३६% मते हवी. सद्यस्थितीत भाजप १८-२०% व शिंदे गट ५-६% मते मिळतील.

मोदक's picture

6 Feb 2023 - 2:31 pm | मोदक

हे सगळे तुमचे स्वतःचे निष्कर्ष आहेत का?

असल्यास चुकीचे आहेत इतकेच नोंदवतो आहे.

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2023 - 2:57 pm | श्रीगुरुजी

हे माझे अंदाज आहेत. माझे अंदाज पूर्णपणे चुकीचे ठरू शकतीलही किंवा काही प्रमाणात बरोबर व काही प्रमाणात चुकीचे ठरतील किंवा पूर्णपणे बरोबर डरतील.

माझे मागील काही अंदाज पूर्ण बरोबर ठरले होते. फडणवीस ऑक्टोबर २०१९ नंतर मुख्यमंत्री होणार नाहीत हा अंदाज अजूनपर्यंत बरोबर ठरलाय. २०१९ मध्ये सेनेशी पुन्हा एकदा युती करणे ही भाजपची घोडचूक आहे व भाजप बहुमतापासून बराच दूर राहून शिवसेना भाजपला पाठिब्मासाठी अडचणीत आणणार हा सुद्धा अंदाज बरोबर होता. कसब्यातून टिळकांना उमेदवारी देणार नाहीत हा सुद्धा अंदाज बरोबर ठरलाय.

पुढील लोकसभा निवडणुकीत गिरीश बापटांऐवजी मुरलीधर मोहोळ किंवा संजय काकडे भाजपचा उमेदवार असतील असा माझा अंदाज आहे. भाजपला २०२४ व २०२९ मध्ये सुद्धा महाराष्ट्रात संधी नाही हा अजून एक अंदाज आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत शिऊबाठा पूर्ण संपलेली असेल, शिंदे गटाला निम्म्या सुद्धा जागा टिकविता येणार नाही व शेवटी शिंदे काही सहकाऱ्यांसह भाजपत येऊन फडणवीसांच्या जागेवर बसतील हा सुद्धा माझा अंदाज आहे.

बघूया, पुढील दीडदोन वर्षात समजेलच.

कपिलमुनी's picture

6 Feb 2023 - 8:16 pm | कपिलमुनी

kasba

कसब्यात ब्राह्मण समाजाची १३ % मते आहेत.
ब्राह्मण समाजाचा इतिहास बघता हे भाजप पाठी उभे राहतात किंवा मतदान करायला बाहेर पडत नाहीत.

मतदान किती % होणार यावर बरेच अवलंबून असेल

श्रीगुरुजी's picture

2 Mar 2023 - 2:29 pm | श्रीगुरुजी

ब्राह्मण समाजाचा इतिहास बघता हे भाजप पाठी उभे राहतात किंवा मतदान करायला बाहेर पडत नाहीत.

या पोटनिवडणुकीत हे चुकीचे ठरले. शनिवार, सदाशिव, नारायण, नवी पेठ या ब्राह्मणबहुल भागात कॉंग्रेसला जास्त मते मिळालीत.

कपिलमुनी's picture

2 Mar 2023 - 3:13 pm | कपिलमुनी

ब्राह्मण समाजाविषयी अंदाह सपशेल चुकला.
धंगेकर च्या संपर्काला / कामाला कौल देत मतदार काँग्रेसकडे वळले

चौकस२१२'s picture

7 Feb 2023 - 11:04 am | चौकस२१२

ब्राह्मण मते जेमतेम ३-४%
आहेत तर या सगळ्या हिशेबात असा काय फरक पडतो? , एखाद्य भागात फक्त काय तो बाकी राज्यव्यापी ३-४% ला कोण किंमत देतो !

त्यात अजुन काही "जाणते राजे" बी ग्रेड वगैरे नावाखाली गुंड पोसुन आणि पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडी घालणे, दादोजी कोंडदेव आणि शिवरायांचे एकत्र असलेले पुतळे कापुन वेगळे करणे, असे उद्योग करुन (आणि आरक्षणाचे मुद्दे उपस्थित करुन्/मोर्चे काढुन) मराठा समाजाची वोट बँक मिळावी म्हणुन धडपड करत आहेत.

खरेतर हे फोडा आणि राज्य करा असले प्रयत्न लोकांनी एकत्रित रित्या हाणुन पाडले पाहीजेत.

चौकस२१२'s picture

22 Feb 2023 - 5:58 am | चौकस२१२

अनंतफंदी साहेब आहात कुठे तुम्ही .. नवीन इतिहास ठाऊक नाही तुम्हास असे दिसते !

जसे प्रत्येकाला लागलेलया हागवणीला श्री मोठीशेठ जबादार असतात ! तसेच पुढील १०००० वर्षे राज्यात जे काई वाईट आहे त्याला ३.५% च जबादार आहेत .
मग अजून काही वर्षात या ३.५% टक्यांचे १% झाले तरी तेच जबाबदार मग या ३.५% ना पैकी अनेकांनी स्वराज्य /स्वातन्त्र्य / समाजसुधारणा , शोध / शिक्षण / यात कितीही देशासाठी केले असले तरी ते लक्षात घेतो कोण
एन्ड ऑफ ष्टोरी .
(काय हाय कि बारामतील शिबीर आहे तिकडे जायचंय , तानाजी सावंत बोलू नये ते बोलून गेले तया वर काय राडा घालायचा यावर जाणते राजे बोलणारे आहेत )
https://www.youtube.com/watch?v=fZzCpUfycWw
https://www.youtube.com/watch?v=EXeI_SoKbaY