त्वचेचा वर्ण

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
24 Sep 2022 - 7:09 pm
गाभा: 

एक प्रश्न आहे.

जर पहिला माणूस अफ्रिकेत जन्माला आला असेल आणि अफ्रिकेत जन्मलेला तो माणूस आणि त्याची जी कोणी सहचारिणी असेल आणि ती सुद्धा अफ्रिकेत जन्मल्यामुळे हे दोघेही कृष्णवर्णीय असतील तर त्यांच्या संबंधातून जन्मलेली पुढची सगळी प्रजा ही सुद्धा कृष्णवर्णीय असायला हवी हा साधा तर्क आहे. पण प्रत्यक्षात मात्र युरोपियन लोक हे 'गोरे' कसे? शिवाय बहुतांश युरोपियन लोकांचे डोळे घारे कसे? जर आदिमानव जोडपे काळे असेल तर मग युरोपियन वंशाची प्रजा ही गोरी कशामुळे झाली? काही जनुकीय बदल घडले का? की इतर काही कारण? हे कधी घडले? किती वर्षे गेली यात? भारतात २ हजार वर्षांपूर्वी ज्यू धर्मीय लोक इझराईलमधून आली. अजूनही ते लोक भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात राहतायत. भारतातल्या सध्याच्या ज्यू लोकांच्या त्वचेचा वर्ण हा त्यांच्या २ हजार वर्षांपूर्वीच्या पूर्वजांच्या तुलनेत बदलला आहे का? फारसा बदल झाला नसेल तर वातावरणाचा त्वचेच्या रंगाशी संबंध फारसा नसतो असे म्हणावे का?

विनंती: १) वेबलिंकपेक्षा सोप्या मराठीत हा विषय उलगडला जावा.

२) कृपया विषयाला अनुसरुन प्रतिसाद यावेत. कशाला हवीय ही माहिती? रंगावर काही नसतं हो! माणसाचं मन चांगलं असलं की झालं वगैरे नको.

मानववंशशास्त्र विषयातली साधी उत्सुकता आहे.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

24 Sep 2022 - 7:22 pm | कंजूस

आदीमानवाच्या पाच जाती आहेत असं मानतात. आफ्रिकन वंशाचे लोक अधिक प्रगत, प्रसारित झाले हे जनुकीय अभ्यास सांगतो. पण इतर चार जाती पूर्ण नष्ट झाल्या नसाव्यात. काही चिंपाझी,काही ओरांग उटांगपासून विकसित झाल्या असा प्रवाद आहे. अस्वलांपासूनही झाल्या असतील. तेच गोरे लोक असतील.

उपयोजक's picture

24 Sep 2022 - 8:29 pm | उपयोजक

आफ्रिकन वंशाचे लोक अधिक प्रगत

मग अफ्रिकन देश इतके मागास का? शिवाय अधिक प्रगत म्हणजे कोणापेक्षा?

अस्वलापासून माणूस??

शेखर काळे's picture

26 Sep 2022 - 9:33 am | शेखर काळे

मला वाटतं दोन वेगवेगळ्या गोष्टींची गल्लत होते आहे.
देश ही संकल्पना बऱ्यापैकी नवीन आहे किंबहुना युरोपियन लोकांकडून आलेली आहे. आणि शिवाय युरोपियनांनी त्यांच्या सोयीनुसार आफ्रिकेत देश केलेले आहेत ते आफ्रिकन लोकांच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीचे आहेत.

मानववंशशास्त्राच्या दृष्टीने आफ्रिकन वंश हा प्रगत होऊन आशिया व युरोप या खंडात सुरुवातीला पसरला. प्रगत होणे ही पण एक बऱ्यापैकी वर्तमान काळातील संकल्पना आहे. आफ्रिकन वंश त्याच्या प्रभागातून बाहेर पडला कारण तिथे कदाचित लोकसंख्या वाढून अन्न मिळवण्यास कठीण झाले असावे आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना अन्न शोधण्यासाठी बाहेर पडावे लागले असावे.

कुमार१'s picture

24 Sep 2022 - 7:42 pm | कुमार१

आफ्रिका खंड खूप मोठा आहे. त्यामध्ये पूर्व आणि दक्षिण अशी तुलना केली तर त्वचा रंगाच्या अनेक छटा आढळतात. पूर्व आफ्रिकेच्या भागात सर्वात काळी त्वचा तर दक्षिण आफ्रिका सर्वात उजळ.

त्वचेच्या रंगांमध्ये जनुकीय घटकांचा वाटा सर्वात मोठा आहे.
जनुक बदल का होतात?
खूप गहन विषय. तूर्त फक्त दोन मुद्दे.
१. एका प्रकारच्या बदलाला random genetic drift असं म्हणतात. त्यामुळे 'का' चे उत्तर निसर्ग किंवा रँडम.

२. मूळच्या त्वचेच्या रंगात वातावरणामुळे कसे बदल अनेक पिढ्यानंतर होऊ लागतात ते पाहू.

इथे नुसती उष्णता लक्षात घेऊन चालत नाही.

२a).काही भौगोलिक पट्ट्यांमध्ये सूर्यकिरणांमध्ये नीलातीत किरणांचे प्रमाण खूप असते. ते त्वचेवर वारंवार पडू लागले की त्वचेचे संरक्षण करण्यासाठी मेलॅनिन या रंगद्रव्याचे उत्पादन वाढू लागते. ते काळे आहे.

२b.) या उलट ज्या प्रदेशांमध्ये निसर्गतः नीलातीत किरणांचे प्रमाण कमी आहे तिथे वरील बदल होत नाही. आणि किंबहुना त्वचेत ड जीवनसत्व तयार व्हावे म्हणून त्या प्रांतामधल्या लोकांची त्वचा उजळ राहते.

विषय खूपच गहन आहे. विज्ञानातील तीन-चार शाखांचा त्यात अभ्यास आहे सखोल अभ्यासाशिवाय अधिक काही लिहिणे अयोग्य.

उपयोजक's picture

24 Sep 2022 - 8:30 pm | उपयोजक

धन्स :)

डार्विनची उत्क्रांतीची उपपत्ती (Theory of Evolution by Charles Darwin) हे केवळ उपपत्ती आहे तिला अनेक जण अज्ञानाने सिद्धांत समजतात. सदर उपपत्तीला सिद्धांत समजण्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. त्या उपपत्तीच्या सिद्धतेसाठी कोणतेही पुरेसे पुरावे / तर्क अस्तित्वात नाहीत.

---

वेगवेगळ्या भूप्रदेशांत वेगवेगळ्या भौगोलिक / नैसर्गिक कारणांमुळे जगभरात मुख्यतः काळे, गोरे, तपकिरी, तांबडे आणि पिंगट असे पाच त्वचा वर्ण अस्तित्वात आलेले आहेत. आणि फरक केवळ त्वचा वर्णांतच आहे असे नाही. चेहरा / मस्तक याची ठेवण व आकार, शरीरयष्टी, उंची, केस, हातापायांची लांबी इत्यादींमध्येही फरक आहे. त्याशिवाय, मानवेतर प्राणी वनस्पती यांच्या प्रजाती यांमध्येही फरक आहे.

---

हा प्रतिसाद या चर्चेत / मिपावरील इतर कोणत्याही चर्चेत सहभागी झालेल्या कुणा विशिष्ट सदस्याचा उपमर्द करण्याच्या हेतूने लिहिलेला नाही.

उपयोजक's picture

24 Sep 2022 - 9:24 pm | उपयोजक

डार्विनची उत्क्रांतीची उपपत्ती (Theory of Evolution by Charles Darwin) हे केवळ उपपत्ती आहे तिला अनेक जण अज्ञानाने सिद्धांत समजतात. सदर उपपत्तीला सिद्धांत समजण्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. त्या उपपत्तीच्या सिद्धतेसाठी कोणतेही पुरेसे पुरावे / तर्क अस्तित्वात नाहीत.

म्हणजे एरिख वॉन डॅनिकेन च्या मूळ पुस्तकावर आधारित 'पृथ्वीवर माणूस उपराच!' या पुस्तकातल्या गोष्टी वास्तवाला धरुन आहेत असे म्हणावे का?

म्हणजे एरिख वॉन डॅनिकेन च्या मूळ पुस्तकावर आधारित 'पृथ्वीवर माणूस उपराच!' या पुस्तकातल्या गोष्टी वास्तवाला धरुन आहेत असे म्हणावे का?

पृथ्वीवर माणूस उपराच वाचून बरीच वर्षे झाली. तपशील लक्षात नाहीत पण "मानव हा इथल्या परिस्थितीकीचा भाग नसून ते एक अमेदिनीय अस्तित्व आहे" असं काहीसं त्यात आहे हे लक्षात आहे.

मला वाटतं, केवळ "डार्विन बरोबर की डनिकिन बरोबर" असा binary प्रश्न मांडून चालणार नाही.

---
ज्याप्रमाणे पृथ्वीवरील भौगोलिक-नैसर्गिक घडामोडींमुळे इतर सजीव घटक जन्मास आले त्याचप्रमाणे मानवदेखील जन्माला आला. त्याबाबतीत, इतर सजीवांपेक्षा मानवाला वेगळे समजण्याची गरज नाही.

ज्याप्रमाणे गहू, आंबा, कुत्रा, साप, झुरळ, इ च्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्याचप्रमाणे मानवांच्यादेखील वेगवेगळ्या प्रजाती आहेत, इतकेच.

डार्विनची उत्क्रांतीची उपपत्ती (Theory of Evolution by Charles Darwin) हे केवळ उपपत्ती आहे तिला अनेक जण अज्ञानाने सिद्धांत समजतात. सदर उपपत्तीला सिद्धांत समजण्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. त्या उपपत्तीच्या सिद्धतेसाठी कोणतेही पुरेसे पुरावे / तर्क अस्तित्वात नाहीत.

अनेक पातळ्यांवर चुकीचे आहे. उत्क्रांतीचे ढिगाने पुरावे आहेत. पिव रिसर्च नुसार जवळपास सगळेच वैज्ञानिक उत्क्रांती मानतात. उत्क्रांती हि फक्त थियरी आहे (उपपत्ती) असे उत्क्रांतीची विश्वासार्हता कमी करण्यासाठी नेहेमी म्हणले जाते. त्यातसुद्धा फारसा अर्थ नाही. ९५+% वैज्ञानिक उत्क्रांतीस तथ्य मानतात.

श्रीगुरुजी's picture

24 Sep 2022 - 11:55 pm | श्रीगुरुजी

डार्विनचा सिद्धांत अनेक पाश्चिमात्य वैज्ञानिकांनी चुकीचा ठरविला आहे. गुगलवर शोधल्यास सापडेल.

त्यासंबंधी हे मिपावरील जुने लेख

डार्विन १

डार्विन २

येथेसुद्धा बरेच प्रतिसाद आहेत.

श्रीगुरुजी's picture

24 Sep 2022 - 11:56 pm | श्रीगुरुजी
वामन देशमुख's picture

25 Sep 2022 - 6:05 am | वामन देशमुख

लिंकांबद्धल धन्स.

पहिली व दुसरी लिंक याआधी माझ्या वाचण्यात आली नव्हती बहुतेक.

तिसऱ्या लिंकेचे प्रयोजन कळले नाही (सगळे प्रतिसाद्स् अजून वाचले नाहीत).

श्रीगुरुजी's picture

25 Sep 2022 - 10:52 am | श्रीगुरुजी

तिसऱ्या लिंकमध्ये पुढे डार्विन संदर्भात बरेच प्रतिसाद आहेत.

कॉमी's picture

25 Sep 2022 - 10:18 am | कॉमी

पाश्चिमात्य असो व नसो, वैज्ञानिकांचा कन्सेन्शस महत्वाचा असतो. मी स्वतः वैज्ञानिक नाही, त्यामुळे प्रत्येक क्लेम तपासणे मला शक्य नसते. म्हणून मी कन्सेन्शस मानतो. केवळ २% वैज्ञानिक उत्क्रांती मानत नाहीत.

स्रोत

(बादवे, डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत अनेक दावे करतो, मुख्यत्वे खालील-
Evolution, natural selection, gradualism, common ancestors, speciation, non selective mechanism of natural selection.

ह्यातले काही दावे नाकारता येण्याचा पुढचे आहेत इतके जास्त पुरावे असलेले आहेत. खुद्द उत्क्रांती हा दावा, स्पेसिएशन हा दावा. त्यामुळे जेव्हा तुम्ही म्हणता कि "पाश्चिमात्य वैज्ञानिकांनी डार्विनचा उत्क्रांतिसिद्धांत चुकीचा ठरवला आहे" ते वरील ६ दाव्यांमधल्या फायनर दाव्यांबद्दल खरे असू शकते. पण खुद्द उत्क्रांती हि संकल्पना आणि माणूस उत्क्रांत झाला आहे आणि माणूस व माकड ह्यांचा पूर्वज एकच, हे कोणत्याही वैज्ञानिकाकडून नाकारले जाणार नाही ह्याची खात्री देतो.

श्रीगुरुजी's picture

25 Sep 2022 - 11:12 am | श्रीगुरुजी
कॉमी's picture

25 Sep 2022 - 11:31 am | कॉमी

९८%

श्रीगुरुजी's picture

25 Sep 2022 - 11:54 am | श्रीगुरुजी

९८% किंवा ९९.९९% असले तरी काहीच फरक पडत नाही. सिद्धांत खोटा ठरविणारे एक उदाहरण असले तरी सिद्धांत खरा समजला जात नाही.

कॉमी's picture

25 Sep 2022 - 12:44 pm | कॉमी

कसले उदाहरण ?

श्रीगुरुजी's picture

25 Sep 2022 - 1:17 pm | श्रीगुरुजी

कोणताही सिद्धांत हा निर्विवाद सिद्ध व्हावा लागतो.

उत्क्रांती आणि स्पेसिएशनचे निर्विवाद म्हणता येतील असे पुरावे अस्तित्वात आहेत. अनुवंशास्त्राच्या अभ्यासाने अस्तित्वात असलेल्या पुराव्यांची पुष्टी झाली आहे.

श्रीगुरुजी's picture

25 Sep 2022 - 1:57 pm | श्रीगुरुजी

पायथागोरस सिद्धांत जसा जगभरातील गणितींनी निर्विवाद मान्य केला आहे, तसा डार्विनचा सिद्धांत जगभरात निर्विवाद मान्य झाला आहे का?

नाही, पूर्णपणे नाही. पण एकूण सिद्धांतातले काही घटक निर्विवादपणे मान्य आहेत- evolution, speciation हे दोन घटक, उदाहरणार्थ, १००% मान्य आहेत- पायथागोरसच्या सिद्धांताईतकेच,कारण त्यासाठी ढीगभर जिवाष्म तथा अनुवंशशास्त्रीय पुरावे आहेत.

Common ancestry, natural selection इत्यादी घटक बहुतांश शास्त्रज्ञांना मान्य असले तरी मतभेद आहेत म्हणता येईल.

थोडक्यात, माणसे माणसांपेक्षा वेगळ्या प्राण्यांपासून उत्क्रांत झाली हे १००% सत्य आहे, आणि वर दिल्याप्रमाणे, आल्मोस्ट एकमत आहे. उत्क्रांतीची कारणे हि नैसर्गिक निवड आहे का आणि काय, उत्क्रांतीचा वेग किती होता इत्यादी बाबींवर एकमत नाही, पण बहुतांश वैज्ञानिकांना डार्विनच्या अभ्यासावर उभी केलेली मते अजूनही पटतात.

श्रीगुरुजी's picture

25 Sep 2022 - 2:46 pm | श्रीगुरुजी

सिद्धांत खरा असेल तर बहुतांशी, बऱ्याच, सिद्धांतातील काही घटक, ऑलमोस्ट एकमत अश्या समर्थनाला अर्थ नसतो. जे सिद्धांत १००% सिद्ध होतात, जे सिद्धांत १००% तज्ज्ञ मान्य करतात, जे सिद्धांत खोटे ठरविता येत नाहीत असेच सिद्धांत खरे असतात. बाकी नुसती मते किंवा अंदाज असतात जे कायमच वेगवेगळी असू शकतात. डार्विनचे एक स्वत:चे मत किंवा अंदाज आहे जे सर्वमान्य नाही. काही जणांना ते पटते काही जणांना पटत नाही. आपापल्या कलानुसार प्रत्येक जण भूमिका घेतो.

माणसाची उत्क्रांती वेगळ्या प्राण्यांपासून झाली आणि माणूस आणि माकडांचा पूर्वज एकच आहे हे १००% सत्य आहे. सिद्धांत वैगेरे बाजूला ठेवले तरी.

श्रीगुरुजी's picture

25 Sep 2022 - 3:10 pm | श्रीगुरुजी

हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. हे फक्त काही जणांचे मत आहे. त्यामुळे ते सत्य वगैरे मानता येत नाही.

कॉमी's picture

25 Sep 2022 - 3:30 pm | कॉमी

चूक.

तुर्रमखान's picture

25 Sep 2022 - 4:17 pm | तुर्रमखान

विज्ञानात प्रत्येक गोष्टीसाठी फ्रेम ऑफ रेफरन्स असते. त्रिकालवादी सत्य वगैरे नसतं. त्यामुळे उत्क्रांतीवाद *अजुनतरी पूर्णपणे* सिद्ध झाला नाही म्हणून असत्य म्हणणे पटत नाही. हे म्हणजे झाकीर नाईक सारखं झालं.

श्रीगुरुजी's picture

25 Sep 2022 - 4:48 pm | श्रीगुरुजी

मांडलेला कोणताही नवीन सिद्धांत हा निर्विवाद सिद्ध व्हावा लागतो. अन्यथा तो सिद्धांत म्हणजे अमुकतमुक यांच्या मतानुसार, he believes that, he feels that, he is of the opinion that असै समजले जाते व असे कोणाचेतरी मत हेच त्रिकालाबाधित सत्य असे मानत नाहीत. विशेषतः ज्या सिद्धांताबद्दल विविध मते आहेत, तो खराच आहे व त्याविषयी शंका घेणारे सर्वजण "चूक" हेच म्हणणे झाकीर नाईकसारखे आहे.

असो.

तर्कवादी's picture

26 Sep 2022 - 5:08 pm | तर्कवादी

काही लोक डार्विनचा उत्क्रांतीवाद अमान्य करतात. हरकत नाही. पण मग या लोकांनी दुसरी कोणती थिअरी /सिद्धांत मान्य केला आहे ?

अनेक पातळ्यांवर चुकीचे आहे. उत्क्रांतीचे ढिगाने पुरावे आहेत. पिव रिसर्च नुसार जवळपास सगळेच वैज्ञानिक उत्क्रांती मानतात. उत्क्रांती हि फक्त थियरी आहे (उपपत्ती) असे उत्क्रांतीची विश्वासार्हता कमी करण्यासाठी नेहेमी म्हणले जाते. त्यातसुद्धा फारसा अर्थ नाही. ९५+% वैज्ञानिक उत्क्रांतीस तथ्य मानतात.

गृहीतके:

१. इतर सजीवांपेक्षा मानवाला वेगळे समजण्याची गरज नाही.
२. उत्क्रांती सर्वंकष असते, उत्क्रांतीपश्चात त्या घटकाचे पूर्णतः नवीन स्वरूपात परिवर्तन होते.

प्रश्न:

अ. मानव हा जर माकडापासून उत्क्रांत झाला असे समजले तर अजूनही पृथ्वीवर माकडे कशीकाय दिसतात?
ब. मानव-ते-माकड ही उत्क्रांती केवळ माकडांबाबतीतच का घडली? इतर प्राणी, पक्षी व वनस्पती या उत्क्रांतीप्रक्रियेपासून अलिप्त का राहिले?

निष्कर्ष:

डार्विनची उत्क्रांतीची उपपत्ती (Theory of Evolution by Charles Darwin) हे केवळ उपपत्ती आहे तिला अनेक जण अज्ञानाने सिद्धांत समजतात. सदर उपपत्तीला सिद्धांत समजण्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात.

---

असो, ही चर्चा धाग्याच्या मूळ विषयापासून दूर जातेय म्हणून इथेच थांबतो.

कॉमी's picture

25 Sep 2022 - 9:54 am | कॉमी

देशमुख ह्यांच्या खरडवहित उत्सुकांनी वाचावे.

उपयोजक's picture

25 Sep 2022 - 6:41 pm | उपयोजक

चर्चा करुयात. युरोपियन गौरवर्णीय का?

स्मिथसोनियन मॅगझीन या मासिकात आलेल्या लेखात मी खालील माहिती वाचली.
जवळजवळ 8500 वर्षांपूर्वी हंगरी, स्पेन आणि लक्ष नंबर या भागात सापडलेल्या काही मानव अवशेषात खालील दोन जीन्स सापडले नाहीत - SLC24A5 आणि SLC45A2. त्यांची कातडी काळी होती. ही जीन्स गौरवर्णीय कातडयांसाठी आहेत असे शोधाअंती कळलेले आहे. पण स्वीडनमध्ये सापडलेल्या 7700 वर्षांपूर्वीच्या मानव अवशेषात ही जीन्स आहेत. याशिवाय काय आणखीही एक जीन यात सापडले - HERC2/OCA2. या जीन मुळे डोळे निळे होतात.
पण हे कोणत्या कारणामुळे झाले ते सांगणे कठीण आहे.
यात आणखीन एक सिद्धांत पुढे आला आहे तो म्हणजे जसा मानव आफ्रिकेतून युरोप खंडाकडे आला, तसे त्याचे खाद्य बदलले - जास्त धान्य खाण्यात आले आणि मास कमी झाले. यामुळे विटामिन डी खाद्यातून कमी मिळायला लागले व त्याचा कदाचित वर्णावर परिणाम झाला असावा.

डॉ जीवनसत्त्व निर्माण व्हावे म्हणुन रंग कमी गडद होत गेला उत्क्रांतीत. सुर्यकिरणातील युव्ही बी प्रकाश तरंगामुळे त्वचेमध्ये ड जीवनसत्त्व तयार होते. त्यासाठी सुर्यकिरणांचा पृथ्वी शी असलेला कोन हा एक महत्त्वाचा घटक आहे. पृथ्वी च्या परिवलन आणि परिभ्रमणाचा ह्या कोणावर आणि पर्यायाने डॉ जीवनसत्त्व निर्मिती वर परिणाम होतो. म्हणजे पृथ्वीवरील वेगवेगळ्या जागी आणि वेगवेगळ्या ऋतुंमध्ये हा कोन किती वेळासाठी तयार होउ शकेल हे बदलते आणि पर्यायाने ड जीवनसत्त्व निर्मिती ची संधी सुद्धा.विषुववृत्तावर दिवसातील सगळ्यात जास्त वेळ सूर्यकिरण पृथ्वी वर काटकोनात पडतात. त्यामुळे तितकी जास्त वेळ ड जीवनसत्त्वाची निर्मिती होऊ शकते. विषवृत्तापासुन जसजसे दुर जाउ तसतशी ही वेळ कमी कमी होत जाते. धृवावर तर ड जीवनसत्त्व निर्मिती ही वर्षातील फक्त काही दिवसच होऊ शकते.

विषुववृत्तावर रहाणार्या व्यक्ती च्या शरीरात सततच्या सूर्य प्रकाशाने आवश्यकतेपेक्षा जास्त ड जीवनसत्त्व तयार होउ नये म्हणून (आणि अतिनील किरणांमुळे होणारे इतर दुष्परिणाम होऊ नये म्हणून देखिल) तेथील मानवाच्या त्वचेत मेलॅनिन च प्रमाणा जास्त असते. मेलॅनिन हे नैसर्गिक सनस्क्रीन आहे जे अतिनील किरणांना त्वचेमध्ये शिरुन देत नाही. जिथे अतिनील किरणांची उपलब्धता कमी होती तिथे गडद त्वचेपेक्षा कमी गडद त्वचेला प्राधान्य मिळाले. कारण डॉ जीवनसत्त्वाची गरज पूर्ण होते तगुन रहाण्यासाठी आवश्यक होते.

धृविय प्रदेशात जिथे तयार होणार ड जीवनसत्त्व पुरेसे नव्हते तिथे मानव जलचरांद्वारे मिळालेल्या ड जीवनसत्त्वावर तगला

स्वप्निल रेडकर's picture

25 Sep 2022 - 6:44 pm | स्वप्निल रेडकर

पहिली गोष्ट म्हणजे मानवाची उत्क्रांती माकडांपासून झाली नाही. अगदी ढोबळपणे म्हणायचं झालं तर माकडे आणि मानव एक यांचे पूर्वज सामायिक होते जे सुमारे 25 दशलक्ष वर्षांपूर्वी विकसित झाले.मानवी उत्क्रांती हि लिनिअर नाहीय उत्क्रांती ही शाखीय प्रक्रिया आहे जिथे एक प्रजाती दोन किंवा अधिक प्रजातींना जन्म देऊ शकते.उदाहरणार्थ कोणी म्हणत असेल की माझे आजी आजोबा आणि माझे चुलत भाऊ पण हयात आहेत मग माझे आणि माझ्या चुलत भावंडांचे आजी आजोबा सामायिक कसे असू शकतील?तर उत्तर असेल कि तुमच्या आजी-आजोबांना एकापेक्षा जास्त मुले होती आणि त्यांनी स्वतःच्या कुटुंबाच्या नवीन शाखा तयार करण्यास सुरुवात केली."उत्क्रांतीवादी कुटुंबांमध्येही असेच घडते. एक प्रजाती दोन किंवा अधिक वंशज प्रजातींमध्ये विभागली जाऊ शकते आणि ती पिढ्यांमध्ये पुन्हा पुन्हा विभाजित होऊ शकते.
साभार
Dr Paul Willis is the Director of RiAus and formerly a presenter on ABC TV's Catalyst program.

उपयोजक's picture

1 Oct 2022 - 11:33 pm | उपयोजक

शेखर काळे
कालिंदी
स्वप्निल रेडकर

छान माहिती!