Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by A.N.Bapat on Tue, 01/23/2018 - 17:57
डॉ सत्यपाल सिंग यांची उत्क्रांती सिद्धांताबाबतची टिप्पणी : याची माध्यमांमध्ये उलट सुलट चर्चा चालू आहे . या विषयी काही प्रश्न : १. असं काही आहे का ? २. ते नक्की काय म्हणाले याचे ट्रान्सक्रिप्ट कोणाकडे उपलब्ध आहे का ? ३. त्यांनी डार्विन चा सिद्धांत नाकारताना काही शास्त्रीय कारणे देऊन नाकारला का ? असेल तर ती कोणती ? ४. डार्विन च्या सिद्धांताला मर्यादा आहेत असे अभ्यासू तज्ञ् लोकं सांगतात .( हे ऐकीव आहे . मी तज्ञ् नाही ) ३. डॉ सत्यपाल सिंग यांनी मांडलेल्या डार्विन च्या सिद्धांताला पर्यायी सिद्धांताची माहिती कोणाला आहे का ?(म्हणजे जर तसा काही मांडला असेल तर ) धन्यवाद
  • Log in or register to post comments
  • 27182 views

प्रतिक्रिया

Submitted by गॅरी ट्रुमन on Tue, 01/23/2018 - 18:14

Permalink

खुळखुळा

डार्विनच्या सिध्दांताचा खुळखुळा सगळ्यांच्या हाती देऊन मोदी डाव्होसला गेले सुध्दा. तिथे किनोट अ‍ॅड्रेस करून आघाडीच्या कंपन्यांच्या सी.ई.ओंना भेटणारही आहेत. तुम्ही आहात कुठे?
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Wed, 01/24/2018 - 00:09

In reply to खुळखुळा by गॅरी ट्रुमन

Permalink

डाव्होस मध्ये 600 कोटीचा

डाव्होस मध्ये 600 कोटीचा नादखुळा.
  • Log in or register to post comments

Submitted by गॅरी ट्रुमन on Wed, 01/24/2018 - 08:59

In reply to डाव्होस मध्ये 600 कोटीचा by मार्मिक गोडसे

Permalink

दुसरा खुळखुळा

बोलण्याच्या ओघात कोटी आणि मिलिअनमध्ये ही चूक झाली आहे हे लक्षात यायला हरकत नसावी. आणि ते लक्षात आले नसेल तर ६०० कोटींचा हा एक दुसरा खुळखुळा हातात घ्या आणि पाहिजे तितका वेळ खेळत बसा.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Wed, 01/24/2018 - 09:31

In reply to दुसरा खुळखुळा by गॅरी ट्रुमन

Permalink

पंतप्रधान हिंदीमधून बोलत होते

पंतप्रधान हिंदीमधून बोलत होते इंग्रजीतून नव्हे. बढाया मारायच्या सवयीमुळे होत असाव्यात अशा चुका. रडक्या बाळाला असे अजून किती खुळखुळा लागणार कोणास ठावूक.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Wed, 01/24/2018 - 12:23

In reply to पंतप्रधान हिंदीमधून बोलत होते by मार्मिक गोडसे

Permalink

ते सहाशे कोटींच्या चुकीच्या

ते सहाशे कोटींच्या चुकीच्या व्यतिरिक्त ते काय बोलले हे अगदी गौणच असावे बहुतेक! आपल्याला हवे तेच ऐकणे आणि अर्थ काढणे सोपे असते नाही?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 01/24/2018 - 15:25

In reply to ते सहाशे कोटींच्या चुकीच्या by बिटाकाका

Permalink

त्याचं असं आहे काका,

त्याचं असं आहे काका, मोदींविरूद्ध बोलायला मोदीद्वेष्ट्यांना कोणतेही मुद्दे मिळत नाहीत. म्हणून मग असलं काहीतरी बोलावं लागतं. कोणी म्हणतं की मोदी आपले गाल गुलाबी ठेवण्यासाठी रोज ४ लाखांचे मशरूम्स खातात. कोणी म्हणतं की मोदींनी २ वर्षात ७५ कोटींचे झब्बे वापरले. कोणी मोदींना चहा विकायचा सल्ला देतात. कोणी म्हणतं की मोदी १० लाखांचा सूट घालतात. कोणी म्हणतं की प्रत्येकाला १५ लाख देणार असं मोदींनी आश्वासन दिलं होतं. कोणी म्हणतं की मोदी भित्रे आणि मनोरूग्ण आहेत. कोणी म्हणतं की मोदी अस्वच्छ आहेत. कोणी म्हणतं मोदींच्या पदव्या बनावट आहेत. कोणी म्हणतं की मोदी नीच आहेत. कोणी म्हणतं की मोदी खोटारडे आहेत. कोणी म्हणतं की मोदी हुकुमशहा आहेत. कोणी म्हणतं की मोदींनी देश विकला . . . अशा या मतामतांच्या गलबल्यामध्ये एका गोष्टीवर मात्र सर्व मोदीद्वेष्ट्यांचं एकमत आहे. ते म्हणजे "मोदींच्या कारकीर्दीत विचारस्वातंत्र्य लयाला गेले असून मोदींविरूद्ध बोलायला बंदी आहे.".
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Wed, 01/24/2018 - 16:41

In reply to ते सहाशे कोटींच्या चुकीच्या by बिटाकाका

Permalink

आपल्याला हवे तेच ऐकणे आणि

आपल्याला हवे तेच ऐकणे आणि अर्थ काढणे सोपे असते नाही? धन्यवाद! कपाळावर गोंदवून घेतो आता हे वाक्य. पंतप्रधान काहीही विशेष बोलले नाही. मागील सरकारला FDI व GST ला विरोध केला व आज त्याच्याच बढाया मारत आहेत. तुम्हाला काय विशेष आढळले तेही कळवा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 01/24/2018 - 17:05

In reply to आपल्याला हवे तेच ऐकणे आणि by मार्मिक गोडसे

Permalink

मागील सरकारमधील वसेक

मागील सरकारमधील वसेक विधेयकाला १५ राज्यांचा विरोध होता. त्याचं काही खांग्रेसशासित राज्ये सुद्धा होती. २०१७ मधील वसेक विधेयक व २०१३ मधील वसेक विधेयक यात खूप फरक आहे. बाकी नेहमीचंच चालू द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Wed, 01/24/2018 - 17:16

In reply to आपल्याला हवे तेच ऐकणे आणि by मार्मिक गोडसे

Permalink

अतिशय अवांतर होतंय

अतिशय अवांतर होतंय धाग्यापासून पण एखादा संबंधित धागा असेल तर खालील गोष्टींवर चर्चा करता येईल. १. गोंदवणे चांगले नसते म्हणे, जरा काळजीपूर्वक. २. जीएसटी ला विरोध होता कि काँग्रेसप्रणित सरकारने आणलेल्या जीएसटीला विरोध होता? ३. एफडीआयला सरसकट विरोध होता कि काही स्पेसिफिक गोष्टींना? आणि समजा केला विरोध तेव्हा आणि आता असेल आवडत त्यांना तर यात बिघडले कुठे? तुम्हाला जीएसटी आणि एफडीआय आवडते कि नाही? ४. तुमच्यामते काय बोलणे म्हणजे विशेष बोलणे आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Wed, 01/24/2018 - 17:25

In reply to अतिशय अवांतर होतंय by बिटाकाका

Permalink

मल्टी ब्रांड एफ्डिआयला विरोध

मल्टी ब्रांड एफ्डिआयला विरोध होता असं आठवतय ब्वॉ.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Wed, 01/24/2018 - 20:41

In reply to अतिशय अवांतर होतंय by बिटाकाका

Permalink

@ बिटाकाका, डूआयडी ओळखला आहे.

@ बिटाकाका, डूआयडी ओळखला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on गुरुवार, 01/25/2018 - 13:50

In reply to @ बिटाकाका, डूआयडी ओळखला आहे. by मार्मिक गोडसे

Permalink

@ बिटाकाका, डूआयडी ओळखला आहे.

@ बिटाकाका, डूआयडी ओळखला आहे.
याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! लगेहाथ वरील प्रश्नांसोबत डू-आयडी म्हणजे आपल्यामते काय हेही सांगून टाका. डू -आयडी-चिखलफेक गॅंगमध्ये नाहीयेत ना तुम्ही?
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Wed, 01/24/2018 - 13:35

In reply to पंतप्रधान हिंदीमधून बोलत होते by मार्मिक गोडसे

Permalink

कसली बढाई

मा.गो., मोदींनी कसल्याही बढाया मारल्या नाहीत. आणि जरी मारलेल्या असल्या तरी त्या बढायांचा या चुकीशी निर्विवाद संबंध प्रस्थापित झालेला नाहीये. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by A.N.Bapat on Tue, 01/23/2018 - 18:28

Permalink

:) :) . वेगळे विषय आहेत हो .

:) :) . वेगळे विषय आहेत हो . मोदी साहेबांना कशाला यात आणायचं ?
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 01/23/2018 - 20:56

Permalink

मोदि साहेबांचं हे एक मला कळत नाहि.

मनुष्यबळ विकास मंत्रालयासाठी असे नमुने का निवडतात मोदि कोण जाणे.
  • Log in or register to post comments

Submitted by गॅरी ट्रुमन on Tue, 01/23/2018 - 21:31

In reply to मोदि साहेबांचं हे एक मला कळत नाहि. by अर्धवटराव

Permalink

मनुष्यबळविकास मंत्रालयाला लागलेला शाप

मोदीच नाही हो. मनुष्यबळविकास मंत्रालयाला शापच लागला आहे बहुतेक. एकेक नगच येतात बहुतेक तिथे. यापूर्वीचे मनुष्यबळविकास मंत्र्यांची यादी बघितली तर मला नक्की काय म्हणायचे ते समजेल. या यादीत अर्जुनसिंग, शशी थरूर, कपिल सिब्बल अशा सारख्यांचाही समावेश होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 01/24/2018 - 07:50

In reply to मनुष्यबळविकास मंत्रालयाला लागलेला शाप by गॅरी ट्रुमन

Permalink

अपवाद

कदाचीत अपवाद पहीले मनुष्यबळ विकास मंत्री असतील - पि व्ही नरसिंहराव. (राजीव गांधींच्या कारकिर्दीत एच आर डी मिनिस्ट्री तयार झाली. त्या आधी शिक्षणमंत्री असायचे!)
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Wed, 01/24/2018 - 12:20

In reply to मनुष्यबळविकास मंत्रालयाला लागलेला शाप by गॅरी ट्रुमन

Permalink

जावडेकरांबद्दल काय मत आहे

जावडेकरांबद्दल काय मत आहे आपलं? शिवाय स्मृती इराणींच्या बाबतीत विचहंटिंग (लौकिकार्थाने, शब्दशः: नाही :)) झाले असे वाटत नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by गॅरी ट्रुमन on Wed, 01/24/2018 - 12:47

In reply to जावडेकरांबद्दल काय मत आहे by बिटाकाका

Permalink

जावडेकर-इराणी

जावडेकरांविषयी आतापर्यंत कुठचेच मत नाव्हते. डार्विनच्या सिध्दांताप्रकरणी त्यांनी केलेला हस्तक्षेप आणि स्मृती इराणींच्या आय.आय.बिलाच्या घोळानंतर त्यांनी केलेले बदल यामुळे चांगले मत नक्कीच झाले आहे. एच.आर.डी मंत्रालयाअंतर्गत देशातील आघाडीच्या शिक्षणसंस्था येत असतील तर त्या खात्याचा मंत्री त्या तोलामोलाचे शिक्षण घेतलेला असावा असे माझे वैयक्तिक मत आहे. कायदामंत्री हा स्वतः वकिल असावा अशी अपेक्षा असते त्याच प्रकारची ही अपेक्षा. शैक्षणिक पदव्यांना एका मर्यादेपर्यंतच महत्व असावे. माणूस शिकला म्हणजे लै शाना झाला असे अजिबात नाही. पण तरीही अशा शिक्षणसंस्था हाताळायच्या असतील तर त्या संस्थांच्या नक्की गरजा काय आहेत याचा स्वतः त्या वातावरणात राहिले नसेल तर अंदाज कितपत येईल याविषयी साशंकता आहे. स्मृती इराणी एच.आर.डी मंत्री असताना मंत्रालयाने बनवलेल्या आय.आय.एम बिलाचा घोळच झाला होता आणि संस्थांकडून त्या बिलाला विरोध झाला होता. मंत्री अशा कुठच्या संस्थेत कधीच विद्यार्थी म्हणून राहिला नसेल तर अशी अडचण उभी राहू शकेल असे वाटते. शेवटी पी.एम.ओ ने हस्तक्षेप केला आणि नंतर जावडेकरांनी त्या बिलाच्या मसुद्यात बदल केले म्हणून ठिक झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 01/23/2018 - 21:24

Permalink

सद्यातरी, मोदींसाठी, विरोधी

सद्यातरी, मोदींसाठी, विरोधी पक्षांपेक्षा त्यांच्याच पक्षातील वाचाळ आणि नाठाळ मंडळी जास्त धोकादायक आहेत ! :) :(
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 01/24/2018 - 17:58

In reply to सद्यातरी, मोदींसाठी, विरोधी by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

कदाचित

अडचणीत आणण्यासाठी विरोधक कमी पडत असल्याने ते कार्य हेच गणंग करीत असतील भाजपचे आणि मिपाच्याही अहितचिंतकांनी त्रस्त नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by जेसीना on Wed, 01/24/2018 - 10:02

Permalink

नक्की काय प्रकार आहे ... कोणी

नक्की काय प्रकार आहे ... कोणी डिटेल मध्ये समजावून सांगेल का
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Wed, 01/24/2018 - 11:45

In reply to नक्की काय प्रकार आहे ... कोणी by जेसीना

Permalink

हम्म

सत्यपाल सिंग ह्यानी खालील विधान केले आहे ग जेसीने. He also claims that Charles Darwin's theory of evolution is scientifically wrong and should not be taught in schools and colleges because "no one saw an ape turning into a man". https://en.wikipedia.org/wiki/Satyapal_Singh पूर्वी भारतात प्लास्टिक सर्जरी अस्तित्वात होतीअसे खुद्द पंतप्रधानही म्हणाले होते. तेव्हा ह्याचे काही विशेष नाही असे आमचे मत. https://www.washingtonpost.com/news/worldviews/wp/2015/01/04/indians-invented-planes-7000-years-ago-and-other-startling-claims-at-the-science-congress/?utm_term=.f23729b89303
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Wed, 01/24/2018 - 11:52

In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

तेव्हा ह्याचे काही विशेष नाही

तेव्हा ह्याचे काही विशेष नाही असे आमचे मत.
तुमचे मत की तुमच्या "ह्यां"चे मत? बेअरिंग सुटतेय असे आमचे मत :)
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Wed, 01/24/2018 - 11:56

In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

तुटकी नाकं वगैरे दुरुस्तं

तुटकी नाकं वगैरे दुरुस्तं केली जायची भारतात सैनिकांची. एका भागावरची त्वचा दुसरीकडे लावणे वगैरेपण होते. सुषृत संहितेमध्ये याचे संदर्भ आहेत असं म्हणतात ब्वॉ. सो पं.प्रंचे विधान चूक नव्हते. असो... एकदा नावंच ठेवायची ठरवलं असेल तर सत्य-असत्याने काय फरक पडतो विचारवंतांना. ( फक्त त्या प्लास्टीक सर्जरीचा गणपतीशी संबंध लावणे जरा जास्तंच होतं. )
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 01/24/2018 - 16:27

In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

पूर्वी भारतात प्लास्टिक

पूर्वी भारतात प्लास्टिक सर्जरी अस्तित्वात होतीअसे खुद्द पंतप्रधानही म्हणाले होते. माईसाहेब, "सुश्रुत" हे नाव तुम्ही कधी ऐकले आहे काय ? प्लास्टिक सर्जरीचे उल्लेख भारतात इसविसनपूर्व ८०० पासून सापडतात. सुश्रुत ऋषी (इ स पूर्व ६ वे शतक) यांना आजच्या वैद्यकीय क्षेत्रात, जागतिक स्तरावर केवळ प्लास्टिक सर्जरीचेच नव्हे तर सर्वच सर्जरीचे जनक समजले जाते. जेव्हा युरोपात अंधारयुग चालू होते, त्या काळात भारतात सुश्रुताने प्लास्टिक सर्जरी, मोतीबिंदू , इत्यादी अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया शेकडोने केल्या. त्यांची माहिती व प्रक्रिया "सुश्रुतसंहिता ($)" या ग्रंथात शब्दबद्ध झाली आहे. सुश्रुतानंतर आलेल्या अनेक वैद्यकिय तज्ज्ञांनी या ग्रंथातिल ज्ञानसंपदेत अधिकाधिक भर टाकलेली आहे. मोदीविरोधाच्या भरात निदान भारताचा खरा इतिहास विसरणे किंवा दुर्लक्षित करणे हा अंधत्वाचा कळस झाला ! अश्या खर्‍या इतिहासाची हेटाळणी करणे, हे मानसिक गुलामगिरीचे व Self-flagellationचे लक्षण असते. अवांतर : माहित नसलेल्या विषयाबाबत जालावर थोडाशी विचारणा करून मगच किबोर्ड वापरला तरी सपशेल तोंडघशी पडणे सहज टाळता येईल... नाही तर "उचलली जीभ..." हे आहेच, म्हणा ! =)) =)) =)) ********************************* $ : The Suśruta-saṃhitā, in its extant form, in 184 chapters contains descriptions of 1,120 illnesses, 700 medicinal plants, 64 preparations from mineral sources and 57 preparations based on animal sources. The text discusses surgical techniques of making incisions, probing, extraction of foreign bodies, alkali and thermal cauterization, tooth extraction, excisions, and trocars for draining abscess, draining hydrocele and ascitic fluid, removal of the prostate gland, urethral stricture dilatation, vesicolithotomy, hernia surgery, caesarian section, management of haemorrhoids, fistulae, laparotomy and management of intestinal obstruction, perforated intestines and accidental perforation of the abdomen with protrusion of omentum and the principles of fracture management, viz., traction, manipulation, apposition and stabilization including some measures of rehabilitation and fitting of prosthetic. It enumerates six types of dislocations, twelve varieties of fractures, and classification of the bones and their reaction to the injuries, and gives a classification of eye diseases including cataract surgery.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 01/25/2018 - 13:19

In reply to पूर्वी भारतात प्लास्टिक by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

सुश्रुतसंहितेत नोंदलेली काही

सुश्रुतसंहितेत नोंदलेली काही शल्यक्रिया साधने... Image removed.   Image removed. (जालावरून साभार)
  • Log in or register to post comments

Submitted by राही on गुरुवार, 01/25/2018 - 14:33

In reply to पूर्वी भारतात प्लास्टिक by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

सुश्रुत

सुश्रुत हे नाव सुप्रसिद्ध आणि प्लास्टिक सर्जरीचे प्रणेते म्हणून जगन्मान्य आहे. सुश्रुत हे त्या काळातले निष्णात वैद्य होते. शालेय अभ्यासक्रमातही चरकसंहिता, सुश्रुत संहिता, वाग्भट, नागार्जुन, आर्यभट अशा संशोधकांचा नामोल्लेख असतोच. आपल्याकडे ही अशी दैदीप्यमान परंपरा होती. दुर्दैवाने ती खंडित झाली. आजही डॉक्टर रवीन थत्तेंसारखे अनेकानेक अभ्यासू संशोधक आपल्याकडे या क्षेत्रात आहेत. पण आज जी सर्जरी केली जाते ती सुश्रुतसंहितेनुसार नाही. आजच्या शल्यकर्माला उपयोगी आणि साहाय्यभूत अशी अनेक शास्त्रे, तंत्र, उपकरणे, पद्धती, कौशल्ये, उपचारपद्धती, निदानपद्धती मधल्या काळात जगभर विकसित झाल्या. अनेक इम्प्रोवाय्ज़ेशन्स, इम्प्रूव्मेंट्स जगभर झाली जी आपल्याकडे झाली नाहीत. आपण या सुधारणा आणि बदलांपासून दूर राहिलो. पूर्वसंचित होते ते त्या काळाला पुरेसे होते. त्यात काहीच वाढ आपण केली नाही किंवा अगदी नाममात्र वाढ केली. ते संचित सध्याच्या काळास कसे पुरेल? पूर्वसूरींचा नावलौकिक सद्यकालासाठी पुरेसा नाहीय. काहीतरी नवनिर्माण हवे आहे. विसाव्या शतकात थोडीफार चालना मिळाल्यासारखी दिसते. हा प्रवाह जोमदार व्हायला हवा. आपल्याकडे विद्यमानात सुधारणा आणि नव संशोधन झाले नाही ही खरी मुद्द्याची गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 01/25/2018 - 17:52

In reply to सुश्रुत by राही

Permalink

+ १

सहमत... "आपल्याकडे विद्यमानात सुधारणा आणि नव संशोधन झाले नाही ही खरी मुद्द्याची गोष्ट आहे." प्रचंड सहमत.... आणि एकूण राजकीय पाठबळ पाहता, पुढे-मागे होईल असेही वाटत नाही.शिवाय कुठल्या तरी फालतू गोष्टीतच आपला समाज जास्त गुंतून राहतो. क्रिकेट आणि सिनेमे ह्यांच्यात होणार्‍या आर्थिक उलाढालीत, किमान १०-१५ उत्तम संशोधन संस्था भारतात निर्माण होवू शकतात.पण आंधळ्या, मुक्या, बहिर्‍या आणि ढोंगी समाजाला जास्त सांगण्यात काही हशील नाही. असो, तुम्ही नोंदवलेले निरीक्षण एका धाग्याचा विषय मात्र नक्कीच होवू शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on गुरुवार, 01/25/2018 - 18:25

In reply to + १ by मुक्त विहारि

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 01/26/2018 - 00:15

In reply to सुश्रुत by राही

Permalink

पूर्वसूरींचा नावलौकिक

पूर्वसूरींचा नावलौकिक सद्यकालासाठी पुरेसा नाहीय. काहीतरी नवनिर्माण हवे आहे. विसाव्या शतकात थोडीफार चालना मिळाल्यासारखी दिसते. हा प्रवाह जोमदार व्हायला हवा. याबद्दल वाद असूच शकत नाही. पण सद्या दोन प्रकारचे एकेरी लोकच फार दिसतात... एक तर ते इतिहासाचे अतिशयोक्त वर्णन करणारे असतात किंवा आपला सर्व इतिहास अत्यंत क्षूद्र आणि लाजिरवाणा असल्याचे मानणारे. माझ्यामते दोन्हीही तितकेच निषिद्ध आहेत. आपल्या खर्‍या इतिहासाकडे दुर्लक्ष किंवा त्याची उपेक्षा करण्यापेक्षा, त्यातून (आपणही बरेच काही केले आहे / करू शकतो) हा बोध घेऊन आताच्या काळात काही उत्तम करण्यासाठी प्रेरणा घेणे जास्त योग्य होईल. तसेच, माझ्या प्रतिसादाचा मूळ रोख माईसाहेब या आयडीच्या प्रतिसादाच्या संदर्भात (आधीच लिहिल्याप्रमाणे) असा होता... मोदीविरोधाच्या भरात निदान भारताचा खरा इतिहास विसरणे किंवा दुर्लक्षित करणे हा अंधत्वाचा कळस झाला ! अश्या खर्‍या इतिहासाची हेटाळणी करणे, हे मानसिक गुलामगिरीचे व Self-flagellationचे लक्षण असते.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Wed, 01/24/2018 - 12:28

Permalink

डार्विनचा सिद्धांत मांडला

डार्विनचा सिद्धांत मांडला होता तेव्हा देखील शास्त्रिय नव्हता. ============= आजच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतांचा आणि डार्विनच्या सिद्धांतांचा काही संबंध नाही. डार्विनला कचरापेटीत टाकला आहे. ================== आजचा उत्क्रांतीचा सिद्धांत देखील सिडोसायन्स आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 01/24/2018 - 14:02

In reply to डार्विनचा सिद्धांत मांडला by arunjoshi123

Permalink

तीन प्रश्न

@ अ . जो . आणि इतर, या विषयाचा फारसा ट्रॅक न ठेवल्यामुळे विचारतोय . आपला डार्विन आणि उत्क्रांतीवादावर विश्वास नसेल तरीही विश्वास असलेल्यांच्या दृष्टीकोणातून डार्विनची मांडणी ते आजचा उत्क्रांतीवाद यात कोणते फरक झाले आहेत ते जाणून घेणे आवडेल. आजच्या सर्वसाधारण विज्ञानाच्या अभ्यासकांना आजच्या उत्क्रांती वादातील सहज स्वीकार्य भाग कोणता आहे . आणि साशंकता किंवा अद्यापही संशोधनास वाव असलेला भाग कोणता आहे असे वाटते .
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 01/24/2018 - 15:40

Permalink

डार्विनचा सिद्धांत खराच असणार....

शेतकर्‍यांचा एक नंबरचा शत्रू म्हणजे माकडे. माणूस नामक प्राणी, ज्या वेगाने निसर्गाचा र्‍हास करत आहे, ते बघता, माकडाच्या आणि माणसाच्या स्वभाव धर्मात अजिबात फरक नाही. १. माकडांना पण नेते लागतात आणि माणसाला पण. २. माकडांना पण वेळी-अवेळी खायला लागते, तसेच माणसांना पण लागते. ३. माकडे खातात कमी पण विध्वंस जास्त करतात.माणसात पण हा गूण आहेच.रस्ते बांधणी असो किंवा कुठलेही सरकारी काम.अंदाजपत्रकात तूट ही आहेच. ४. शिवाय कुठल्याही शूल्लक गोष्टीवरून वाद-विवाद घालणे, युद्धे करणे, एकमेकांना चावणे, बोचकारणे आणि बहू पत्निकत्वाची चाल, इ. गोष्टी माकडांपासून आल्या असतील असा माझा संशय आहे. असो, डार्विनने हेच गूण ओळखलेअसतील आणि माणसांत आणि माकडात अजिबात फरक नाही, असे सांगीतले असेल. (माणसाची शेपटी म्हण्जे विचारशक्ती.काही लोक आपल्या अशा शेपटीने अशी काही करामत करतात की, भल्या-भल्या माणसांची मती पार बाराच्या भावात जाते.) वरील प्रतिसाद हा निव्वळ विनोदी आहे.माकडांचा अपमान झाल्या असल्यास, आम्ही दिलगीर आहोत.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 01/25/2018 - 07:18

In reply to डार्विनचा सिद्धांत खराच असणार.... by मुक्त विहारि

Permalink

माकडांचा अपमान झाल्या असल्यास, आम्ही दिलगीर आहोत.

=)) =)) =))
  • Log in or register to post comments
Profile picture for user चामुंडराय

Submitted by चामुंडराय on गुरुवार, 01/25/2018 - 08:22

Permalink

शेपट्या अजूनही न झडलेले कित्येक जन दिसतात समाजात ते उगीच?

होय, डार्विनचा सिद्धांत खराच असणार. माणूस नक्कीच माकडांपासून तयार झाला असणार. शेपट्या अजूनही न झडलेले कित्येक जन दिसतात समाजात ते उगीच?
  • Log in or register to post comments

Submitted by पुंबा on गुरुवार, 01/25/2018 - 11:28

Permalink

डार्विनचा सिद्धांत चुकीचा

डार्विनचा सिद्धांत चुकीचा ठरणे/न ठरणे हे विज्ञानाच्या कक्षेत येणारे काम आहे. निरनिराळ्या अनेक विद्याशाखांत उत्क्रांतीच्या प्रक्रियेचा अभ्यास करण्याचे काम सध्या चालू आहे. काही विद्याशाखांत बर्‍यापैकी प्रगतीही अंतिम सत्याकडे जाण्यापर्यंत झाली आहे. सध्या डार्विन म्हणतो त्यातील काही गोष्टी निश्चितच कालबाह्य झालेल्या दिसतात. त्यामूले डार्विनला काही तरी सार्वकालिक सत्य सांगणारा समजून पुज्य ठरवणे मुर्खपणाचे आहे तसेच त्याला पूर्णपणे मोडीत काढणे देखिल. सत्यपाल सिंगांनी उत्क्रांतीची थियरी डार्विनने सांगीतली ती तशीच्या तशी स्विकारणे योग्य नाही आणि तिच्यावर अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे असे म्हटले असते तर आक्षेप कुणीच घेतला नसता. नविन संशोधनांना आधारून उत्क्रांतीविषयक पोर्शन बदलला जाईल असे मह्टले असते तरी ते योग्य होते. मात्र त्यांनी हे म्हटले.
1. "Darwin's theory (of evolution of humans) is scientifically wrong. It needs to change in school and college curriculum. 2.Since the man is seen on Earth he has always been a man," 3. "Nobody, including our ancestors, in written or oral, have said they saw an ape turning into a man," 4. "No books we have read or the tales told to us by our grandparents had such a mention,"
यातल्या पहिल्या वाक्यावर फारसे आक्षेप घेण्यासारखे काही नाही(अर्थात डार्विनची थियरी पूर्णपणे मोदीत निघाली नाही. आणि पुर्वी कोणती थियरी होती हे विज्ञानाच्या इतिहासात अंतर्भूत केल्याने अभ्यासक्रमात असणे क्रमप्राप्तच आहे). दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या वाक्यांना आक्षेप घ्यायलाच हवा. कारण ती तीन वाक्य पहिल्या दोन वाक्यांचा अन्वय लावण्यासाठी सत्यपालांनी दिलेली कारणे आहेत. जर राज्य शिक्षणमंत्री असणारा मनुष्य अशाप्रकारे भोंगळपणे शिक्षण धोरण बदलण्याविषयी बोलत असेल तर ते चुकीचेच आहे. यावर जावडेकरांनी घेतलेली भुमिका अशी..
Intervening in the row over the remarks, Javadekar said there are no plans for a national seminar to prove Darwin wrong. "I have discussed the matter with my MoS and I have asked him to refrain from making such comments. We should not dilute science. This is the advice I have given him," Javadekar said. "We are not going to fund any event or don't have any plan for a national seminar to prove Darwin wrong. It is the domain of scientists and we should let them free to continue their efforts for progress of the country," he added.
हे स्वागतार्ह आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमितदादा on गुरुवार, 01/25/2018 - 13:40

Permalink

ज्यांना हा विषय अधिक समजावून

ज्यांना हा विषय अधिक समजावून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सकाळ मध्ये प्रदीप रावत ह्या जैविक उत्क्रांतीचे अभ्यासक यांचा छोटाखाणी लेख आला आहे. त्यतिल काही वाक्ये उत्क्रांतीची चित्तरकथा आणि सत्यपाल सिंह... "विज्ञानात सर्वाधिक विरोध कशाला झाला असेल तर तो जैविक उत्क्रांतीच्या सिद्धांताला. चार्ल्स डार्विनने तो मांडला १८५९मध्ये. गेल्या दीडशे वर्षांत जी नवनवी शास्त्रे उदयाला आली त्यातून या सिद्धान्ताला बळकटीच मिळाली आहे. वैज्ञानिकदृष्ट्या तो खोडून काढण्यात आल्याचा केंद्रीय मनुष्यबळविकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांना भास झालेला दिसतो! त्यांनी केलेला हा दावा सपशेल चुकीचा आहे. त्यांच्या खात्याचे कॅबिनेटमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सरकारची ही भूमिका नसल्याचे सांगून शास्त्रज्ञांना आणि विज्ञानप्रेमींना दिलासा दिला, हे बरे झाले. " "डार्विनच्या काळात उपलब्ध पुरावा त्याच्या सिद्धांताबद्दल विश्‍वसनीयता निर्माण करू शकत होता; परंतु संपूर्णपणे निर्णायक नव्हता. त्यामुळे डार्विनने प्रथम प्रतिपादले तेव्हा उत्क्रांती हे प्रमेय होते. (भले भरभक्‍कम पुराव्यांवर आधारित होते, तरीसुद्धा!) पण १८५९ पासून पुराव्यांचे ढीग साचू लागले, तसतसे पायरी पायरीने तो सिद्धांतपदाला पोहोचला. तो सिद्धांत आहेच; वास्तवाचे प्रतिबिंबही आहे, हे विशेष." सत्यपाल सिंह यांना विरोध करणारे पत्र देशातील वैज्ञानिकांनी लिहिले, त्यावर तब्बल २००० शास्त्रज्ञांच्या स्वक्ष्यार्या होत्या त्यात ते म्हणतात (संधर्भ> इंडिअन express) 1. We, the scientists, science communicators and scientifically-oriented members of the public, are deeply pained by your claim. It is factually incorrect to state that the evolutionary principle has been rejected by the scientific community. On the contrary, every new discovery adds support to Darwin’s insights.
  • Log in or register to post comments

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on गुरुवार, 01/25/2018 - 14:23

In reply to ज्यांना हा विषय अधिक समजावून by अमितदादा

Permalink

सत्यपाल सिंग यांनी त्यांचे मत

सत्यपाल सिंग यांनी त्यांचे मत ज्या शब्दांमध्ये मांडले ते नक्कीच चुकीचे होते. अर्थात हा सिद्धांत मांडल्यापासून याला विरोध होतच आला आहे. सुरुवातीला वैज्ञानिकांनी केला नंतर बहुतांशी धार्मिक संघटनांनी केला (किंबहुना अजूनही केला जातो). त्यामुळे सत्यपाल सिंह ज्या पद्धतीने बोलले त्या पद्धतीवर आक्षेप घेणे संयक्तिक आहे पण त्याला काही प्रमाण, मर्यादा? तुम्ही वर दिलेल्या परिच्छेदात वैज्ञानिक म्हणतात कि त्यांना अतीव दु:ख झाले. कैच्या कै! का बरे अतीव दुःख व्हायला हवे? सह्यांची मोहीम वगैरे कशाला चालवायला हवी? हे जरा जास्तच नौटंकी प्रकारात जात नाहीये का? बाकी, डिस्कवरी इन्स्टिटयूट च्या टिच दि काँट्रावर्सि मोहिमेबद्दल या वैज्ञानिकांचे (आणि आपलेही ) काय मत आहे? त्यानेही या वैज्ञानिकांना अतीव दुःख वगैरे झाले/होत असेल का? नुसते सिद्धांत शिकवण्यापेक्षा त्यासोबत त्याबद्दल असलेली मतमतांतरे का बरे शिकवली जाऊ नयेत? खासकरून या उत्क्रांती सिद्धांतासारख्या "सिद्धांत " या व्याख्येत न बसणाऱ्या गोष्टींमध्ये या सिद्धान्तावरील आक्षेप का बरे शिकवले जाऊ नयेत? जर उद्या भारतात कोणी (आणि खासकरून भाजपशी संबंधित व्यक्तीने :)) टिच दि काँट्रावर्सि मोहीम सुरु केली आणि शाळांमध्ये काँट्रावर्सि (आणि खासकरून या उत्क्रांती सिद्धान्ताबद्दल) शिकवा असे म्हणाले तर तेव्हाही हि अशीच सह्यांची मोहीम चालेल का? ते योग्य असेल का? या सह्यान्च्या मोहिमेला इंटॉलरन्स प्रकारात टाकून माझं शाळेतलं एखादंतरी प्रशस्तिपत्रक परत करता येईल का असा विचार करतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by अमितदादा on गुरुवार, 01/25/2018 - 15:02

In reply to सत्यपाल सिंग यांनी त्यांचे मत by हतोळकरांचा प्रसाद

Permalink

सत्यपाल सिंग यांनी त्यांचे मत

सत्यपाल सिंग यांनी त्यांचे मत ज्या शब्दांमध्ये मांडले ते नक्कीच चुकीचे होते.
नक्कीच हेच तर सगळे जण सांगतायत आणि तेच माझे म्हणणे आहे. यावरती एकमत होणे खूप महत्वाच आहे. काही शास्त्रज्ञांनी ह्या सिद्धांताला विरोध केला आहे, त्यांच्यामते हा परिपूर्ण नाही, यात संशोधनाची गरज आहे, हे असे ते म्हणाले असते तर माझा तसेच अनेक लोकांचा काहीच आक्षेप नसता. परंतु ते म्हणतात हि गोष्ट वेदात लिहिलेली नाही, आपल्या पूर्वजांनी माकडाचा माणूस झालेला पाहिला नाही म्हणून डार्विन चुकीचा.
सह्यांची मोहीम वगैरे कशाला चालवायला हवी? हे जरा जास्तच नौटंकी प्रकारात जात नाहीये का?
माझ्या मते नाही, याच कारण हे मंत्री HRD शी संबंधित आहेत, जर ते इतर खात्याचे मंत्री असते किंवा फक्त भाजप पदाधिकारी असते तर एवडा विरोध झाला नसता.
बाकी, डिस्कवरी इन्स्टिटयूट च्या टिच दि काँट्रावर्सि मोहिमेबद्दल या वैज्ञानिकांचे (आणि आपलेही ) काय मत आहे?
याब्बदल काही कल्पना नाही काय आहे हा कार्यक्रम ते. परंतु काँट्रावर्सि शिकविताना दुसर्या बाजूचे वैज्ञानिक पुरावे देत असतील, ती गोष्ट वेदात नाही किंवा पूर्वजांनी माकडाचा माणूस झालेला पाहिलं नाही अशी बाळबोध कारणे देत नसावेत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Tue, 01/30/2018 - 19:43

In reply to सत्यपाल सिंग यांनी त्यांचे मत by अमितदादा

Permalink

प्रतिसाद आवडला.

प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by A.N.Bapat on गुरुवार, 01/25/2018 - 15:16

In reply to सत्यपाल सिंग यांनी त्यांचे मत by हतोळकरांचा प्रसाद

Permalink

प्रसाद साहेब , आपण डिसकव्हरी

प्रसाद साहेब , आपण डिसकव्हरी इन्स्टिट्यूट म्हणजे विकी वर जे येतंय त्याबद्दलच लिहीत आहात का ? ( त्यातील पहिला परिच्छेद कॉपी पेस्ट करत आहे ) ' "The Discovery Institute (DI) is a politically conservative[4][5][6] non-profit think tank based in Seattle, Washington, best known for its advocacy of the pseudoscientific principle[7][8][9] of intelligent design (ID). Its "Teach the Controversy" campaign aims to permit teaching of anti-evolution, intelligent-design beliefs in United States public high school science courses alongside accepted scientific theories, positing that a scientific controversy exists over these subjects.[10][11][12][13][14][15][16]" intelligent-design हे म्हणजे कर्मठ उजव्या ख्रिश्चन धर्माची लोकं जी थिअरी सांगतात तीच थिअरी हे मांडतात का ?
  • Log in or register to post comments

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on गुरुवार, 01/25/2018 - 15:47

In reply to प्रसाद साहेब , आपण डिसकव्हरी by A.N.Bapat

Permalink

हो विकीवरही येत आहे आणि

हो विकीवरही येत आहे आणि हल्लीच चेपू आणि कुठल्यातरी वर्तमानपत्रातील लेखातही याबद्दल उल्लेख वाचला. ते कर्मठ उजव्या लोकांची थिअरी मांडतात कि नाही हे मला नक्की माहित नाही पण त्यांच्यातील बरेच वैज्ञानिक किंवा त्या क्षेत्राशी संबंधित आहेत. मला त्यांची नक्की मते किंवा आक्षेप माहीत नाहीत पण त्यांची टिच दि काँट्रावर्सि हि मोहीम पटते. कुठल्याही गोष्टींवरचे आक्षेप हे फक्त धार्मिक संदर्भात आहेत म्हणून सरसकट चुकीचे ठरवले जावेत का? मला असे वाटते कि मुळात आक्षेप शिकवले जावेत, त्यासोबत ते आक्षेप कसे चुकीचे आहेत हेहि शिकवले गेले तर उत्तमच, मग विचारसरणी उजवी असो कि डावी.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on गुरुवार, 01/25/2018 - 17:45

In reply to हो विकीवरही येत आहे आणि by हतोळकरांचा प्रसाद

Permalink

क्षेत्र/ अभिव्यक्ती कोणतेही

क्षेत्र/ अभिव्यक्ती कोणतेही असो आक्षेपांची दखल आणि खोडावयाचे असल्यास त्या प्रतिवादासहीत असे स्वरुप असणे सुद्धा योग्य होईल का ? पद्मावत आणि त्यासारख्या अनेक वादांवरुन वाटते. हे असोत अथवा ते कुणिही असो एकांगी माहिती देण्यावर मर्यादा हवी दुसर्‍या बाजू माहित कर घेण्याचा आणि त्यात उणीवा / मर्यादा असाल्यास त्या समजून घेण्याचा अधिकार हवा.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 01/25/2018 - 16:44

In reply to सत्यपाल सिंग यांनी त्यांचे मत by हतोळकरांचा प्रसाद

Permalink

>>

<<< त्यामुळे सत्यपाल सिंह ज्या पद्धतीने बोलले त्या पद्धतीवर आक्षेप घेणे संयक्तिक आहे पण त्याला काही प्रमाण, मर्यादा?>>> ==>> hasun hasun pure vaat lagli...!!
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 01/25/2018 - 16:49

In reply to >> by विशुमित

Permalink

sampadak mandal ha pratisad

sampadak mandal ha pratisad krupaya hatava. chukun taypo zala ahe.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on गुरुवार, 01/25/2018 - 18:17

Permalink

एकूणात काय ....

एकूणात काय पदमावती असो , आनंदीबाई असो , वा उत्क्रांती भारतीयाना इतिहासात रामायची नशा चढली आहे.आनंद आहे !! खरे तर उत्क्रांती वादावर खल करण्यापेक्षा आजची मोठी काळजी अधुनिक रसायन युगामुळे मानवावर व इतर जीवामात्रावर काय विपरित परिणाम होत आहे यावर विचार झाला पाहिजे .
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on गुरुवार, 01/25/2018 - 18:28

In reply to एकूणात काय .... by चौकटराजा

Permalink

आनंदीआनंद

आनंदी सोबत आनंद येतोच म्हणूनच आनंदीआनंद असा शब्दही आहे ! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 01/25/2018 - 18:39

Permalink

भारतीयाना इतिहासात रमायची नशा

भारतीयाना इतिहासात रमायची नशा चढली आहे.आनंद आहे !!
१+ बरं इतिहास असला तर संशोधन तरी करता येते, परंतु पद्मावती ते रामजन्मभूमी (रामायण), अश्या काल्पनिक कालाकृतीद्वारे सुद्धा भारतात काही शक्ती वाद निर्माण करतात... नसलेल्या इतिहासात रमायची ही अफू कोण वाटत फिरत आहे भारतभर ???
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on गुरुवार, 01/25/2018 - 23:35

In reply to भारतीयाना इतिहासात रमायची नशा by पगला गजोधर

Permalink

जाम इच्छा आहे बोलायची, पण

जाम इच्छा आहे बोलायची, पण अवांतर नको म्हणून गप्प बस्तो.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com