(उन्हाळी भटकंती - कोरीगड तैलबैला आणि राजमाची(पण यावेळी एनफिल्ड वर))

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
23 Sep 2022 - 10:10 pm

(प्रेरणा)

माझी जुनी मोटारसायकल आता बदलायला आली होती म्हणून मग मलाच चालवता येईल अशी रॉयल एनफिल्ड थंडरबर्ड ३५० एक्स मोटारसायकल ऍमेझॉन वरून न मागवता शोरूममधूनच घेतली . एक सहज कोरीगडावर चक्कर मारून येऊ अस ठरवून घरातून सकाळी ७.१५ ला बाहेर पडलो. साधारणतः ६५ ते ७० मिनिटांमध्ये आंबवण्याला पोहोचलो

राजमाचीला जाताना - हे फोटो नंतर कधीतरी काढलेले आहेत
a

राजमाचीला जाताना - हे फोटो नंतर कधीतरी काढलेले आहेत

a

राजमाचीच्या गोधनेश्वर मंदिरात बसलेलं भुभू - हे फोटो नंतर कधीतरी काढलेले आहेत

a

हातात अजून वेळ असल्यामुळे आणि कोरीगडावरुन घरीच यायचे असल्याने असल्यामुळे हाताशी ३ - ४ तास अजून होते मग आज तैलबैल्याला सालतर खिंड ओलांडून परत येऊ असा ठरवलं.

राजमाचीचे आवळेजावळे बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन - हे फोटो नंतर कधीतरी काढलेले आहेत

a

साधारण १० च्या सुमारास कोरीगडावरुन पुढे सालतर खिंडीकडे रायडिंगला सुरुवात केली. चांगला डांबरी रस्ता आणि त्यानंतर तीव्र चढाचा वळणेवळणे घेत जाणारा अत्यंत खराब रस्ता आहे. पण मी तिथून जायला सुरु केले तेव्हा कडक उन्ह आणि जंगलाची थंडगार सावली एकसाथ सुरु झाली पण माझ्यासाठी ते फायद्याचं ठरलं कारण सावलीमुळे मला अजिबात उन्हाचे चटके बसत नव्हते. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर अतीतीव्र चढ लागला आणि बाईक घसार्‍यावरुन घसरायची भिती असल्याने ब्रेक न घेता खिंड ओलांडली

जाताना हे घनदाट जंगल खुणावत होतं.

a

उन्हाळ्यामुळे पुढचा सगळा भाग ओसाड आणि रखरखीत भासत होता.

a

आणि परत गिअर टाकायला सुरुवात केली. सुट्टीचा दिवस असल्यामुळे रस्त्याला अजिबात गर्दी नव्हती, त्यामुळे आरामात मोटारसायकल चालवत चालवत तैलबैल्याजवळ पोहोचलो आणि घड्याळ बघितलं तर पावणेअकरा होत होते. मग जरा फोटोसेशन केलं

a

a

a

आणि परत जायच असल्यामुळे लगेच निघालो. सालतर खिंड उतरुन थोडा थांबत आणि फोटो काढत आलो.

खिंडीतून उतरताना

a

कोरीगडाच्या पार्श्वभूमीवर

a

तिथून निघताना

a

कोरीगडानंतरचा घाट उतरल्यानंत थेट घरी येऊन थांबलो १२ .३० च्या दरम्यान घरी पोचलो. २०० किमी आणि ५ .३० तास अशा वेळात हि मोटारसायकल भटकंती पूर्ण झाली. त्यावेळी जाताना राजमाचीला गेलो नसल्याने तिथले फोटो काढले नव्हते त्यामुळे नंतर कधीतरी नव्याच्या जुन्या झालेल्या एनफिल्डवर परत राजमाची किल्ल्यापर्यंत जाऊन अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण केली

मोटार सायकल चालवत असताना मनातल्या मनात माझी जुनी पल्सर आणि ही रॉयल एनफिल्डची थंडरबर्ड मोटारसायकल यात मनातल्या मनात तुलना सुरु होती.
दोन्हीचे आपले आपले फायदे आणि तोटे आहेत त्यापैकी मला वाटलेले काही इथे थोडक्यात मांडतो
१) किंमत - पल्सर पेक्षा एनफिल्ड महाग मात्र हार्लेपेक्षा खूपच स्वस्त
२) पल्सर कमी अंतरासाठी उपयुक्त, थंडरबर्ड - लांब अंतर कमी श्रमात कापायचे असेल तर हिला पर्याय नाही
३) पल्सर चालवताना ६० - ७० किमी चालवल्यानन्तर पाठ दुखायला लागायची तस मला थंडरबर्ड चालवताना अजिबात जाणवले नाही.
४) ऑफ रोड - थंडरबर्ड ही मोटारसायकल मी कसल्याही रस्त्यात बिनधास्त चालवली आहे पण पल्सर चालवताना सारखा टायर घसरतो कि काय किंवा तीव्र वळणावर पडू कि काय हि भीती सारखी वाटत राहते. सालतर खिंडीतून जाताना जो घसार्‍याचा खडबडीत रस्ता लागतो त्याच्यातून पल्सर नक्की घसरली असती.
५) पल्सर कि थंडरबर्ड अशी जेव्हा द्विधा मनस्थिती असेल आणि ज्यांना वाटत आपण मोटारसायकलिंग सुरु करतोय पण किती दिवस करू शकतो त्यांनी थंडरबर्ड मोटारसायकल घ्यावी कारण यांच्यात आपण खूप थकत नसल्यामुळे मोटारसायकलिंग चा उत्साह टिकून राहू शकतो. मात्र गाडी वजनदार असल्याने आपल्याला पेलते का ते आधी बघावे.
अर्थात हि सगळी माझी मते आहेत ज्याला जे आवडेल आणि पटेल अशी मोटारसायकल घ्यावी.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

24 Sep 2022 - 3:35 am | कपिलमुनी

जंगलात गेल्यानंतरच्या सगळ्या फोटोंचा गणेशा झालाय..

कपिलमुनी's picture

24 Sep 2022 - 3:36 am | कपिलमुनी
कपिलमुनी's picture

24 Sep 2022 - 3:38 am | कपिलमुनी

किती सुंदर फोटो !

re

एक नंबर भारी मोटर्सायकल भटकंती ! किल्ल, मंदीर, जंगल, मोटर्सायकल ई चे प्रचि ऑक्के मंदेच की !
वल्ली भाऊ, तुम्ही तर आता भटकंती धाग्याचे व्यसनच लावलेत !

कंजूस's picture

24 Sep 2022 - 5:42 am | कंजूस

आताचे पावसाळी फोटो काढले असतील ना? तेपण हवेत.

यावेळी पावसाळ्यात बाईकवरुन कुठेच गेलो नाहीये म्हणून ते फोटो नाहीत :)

मुक्त विहारि's picture

24 Sep 2022 - 8:35 am | मुक्त विहारि

फोटो पण मस्तच ...

बुलेट ही माझ्या साठी तरी, न झेपणारी ..

आम्ही आपले 100 cc वाले

प्रसाद गोडबोले's picture

24 Sep 2022 - 8:36 am | प्रसाद गोडबोले

उत्तम प्रचि.

आपले भटकंतीची प्रमाण फारच कमी आले आहे . वेळात वेळ काढुन फिरायला हवे .

कर्नलतपस्वी's picture

24 Sep 2022 - 9:08 am | कर्नलतपस्वी

मोटरसायकल मधे बुलेट भारीच वाटते. पाकिटाला सोईस्कर व मर्दानी संगीताचे सुख.

स्कुटर मधे पहिली लॅम्ब्रेटा व नंतर चेतक.

त्यातही आपली नसेल, एखाद्या वरीष्ठ अधिकाऱ्याची असेल तर आणखीनच भारी.

मस्त प्रचेतस भौ गाडी घेतल्यावर पेढे खायला बोलवा.

प्रचेतस's picture

24 Sep 2022 - 9:43 am | प्रचेतस

हा धागा म्हणजे कॅलक्युलेटर यांच्या पावसाळी भटकंती सिंहगड सायकलवरून या धाग्याचं विडंबन होतं पण कॅलक्युलेटर यांनी मनाला लावून त्यांचा मूळ धागाच अप्रकाशित केलेला दिसतोय. अशा स्थितीत ह्या धाग्याचेही प्रयोजन काही राहात नाही.

कंसातले शीर्षक बघुन हा विडंबनात्मक धागा आहे हे लक्षात आले म्हणुन आधी ‘पेरणा’ वाचु म्हंटलं तर तो धागा दिसला नाही त्यामुळे तुलनात्मक प्रतिसाद देतां येत नाहीये. पण सगळे फोटोज भारी आहेत.
कॅलक्युलेटर भाऊ एवढं मनाला लाऊन घेऊ नका, मिपावर विडंबनाची फार समृद्ध परंपरा आहे तेव्हा त्याकडे खिलाडुवृत्तीने बघा असा आगंतुक सल्ला तुम्हाला देतो.

अगदी. या भो कॅल्क्युलेटरसाहेब

कपिलमुनी's picture

24 Sep 2022 - 12:14 pm | कपिलमुनी

नवीन उमेदवार लेखनाची भ्रूणहत्या केल्याबद्दल तीव्र निषेध ..

प्रचेतस's picture

24 Sep 2022 - 2:58 pm | प्रचेतस

नै हो, मी हे पाप कसे करु धजेन?

प्रसाद गोडबोले's picture

25 Sep 2022 - 12:01 pm | प्रसाद गोडबोले

मा प्रचेतसप्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः ।

वगैरे वगैरे =))))

गणपा's picture

24 Sep 2022 - 9:47 am | गणपा

खोडकर आहेस तू.

नै रे, कितीतरी वर्षांनी एखादे विडंबन करु गेलो आणि तोंडावर आपटलो.

सुरिया's picture

24 Sep 2022 - 4:20 pm | सुरिया

तोंडावर कुठले आपटताय सर, स्वताच्याच धाग्यावर स्वतःच प्रत्येक प्रतिसादास उपप्रतिसाद देत बसायचा आणि आपलाच वर ठेवायचा (धागा) ह्या लेटेस्ट ट्रेण्ड नुसार वीकेंड कारणी लावताच आहात की.
हलके घ्या बरका सर.

स्वतःच प्रत्येक प्रतिसादास उपप्रतिसाद देत बसायचा आणि आपलाच वर ठेवायचा (धागा)

=))

बघा, म्हणजे मूळ लेखक नाराज झाले त्याचे तुम्हाला कै नै आणि भलतंच कायतरी.

कर्नलतपस्वी's picture

24 Sep 2022 - 10:48 am | कर्नलतपस्वी

हायला,

मला तर कल्लाच नाय....

On duty मुकादम शिरीयस..

कर्नलतपस्वी's picture

24 Sep 2022 - 10:48 am | कर्नलतपस्वी

हायला,

मला तर कल्लाच नाय....

On duty मुकादम शिरीयस..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Sep 2022 - 10:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्याकडे थंडरबर्ड आहे आणि आपण भटकंती करतो हा दाखविण्याचा क्षीण प्रयत्न.
पुलेशु.

-दिलीप बिरुटे

गवि's picture

24 Sep 2022 - 11:17 am | गवि

+१

मागची सीट जरा अंमळ जास्तच लहान वाटतेय ना सर?.. मागील व्यक्तीस अगदीच चिकटून बसणे प्राप्त असावे..

घाटात वगैरे कसे म्यानेज करत असतील ते आय मीन.. अर्थात त्यांचा खाजगी प्रश्न..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Sep 2022 - 11:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मागील व्यक्तीस अगदीच चिकटून बसणे प्राप्त असावे..
घाटात वगैरे कसे म्यानेज करत असतील ते आय मीन

थंडरबर्डला मागे बसणा-या व्यक्तीला सायकलच्या शीटाखाली असतं,
तसं काही पकडून बसायची सोय नसते. मागील बसणा-या व्यक्तीकडे
अनुक्रमे काहीच पर्याय शिल्लक असतात.

महिला असेल तर, मधे सॅक धरुन बसणे.
पुरुष असेल तर, देवाच्या भरवशावर बसणे.

बरं, गाडीचा आवाज इतका भडभड असतो की कानाजवळच बोलावे लागते.
त्याशिवाय पुढे असणा-याला आवाज पोहोचतच नै. आप समज रहे हो ना सर.

-दिलीप बिरुटे

गवि's picture

24 Sep 2022 - 11:35 am | गवि

सर्व अचूक समजले..!!

महिला असेल तर, मधे सॅक धरुन बसणे.
पुरुष असेल तर, देवाच्या भरवशावर बसणे.

अशी किंचित सुधारणा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Sep 2022 - 11:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

खपलो.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

24 Sep 2022 - 3:00 pm | प्रचेतस

दोन ज्येष्ठ सदस्य लैच कल्पनाभरार्‍या घेऊ लागलेले दिसतात. :)

टर्मीनेटर's picture

24 Sep 2022 - 3:44 pm | टर्मीनेटर

दोन ज्येष्ठ सदस्य लैच

सहमत...
कल्पनेत सुद्धा एका सभ्य, साध्या आणि सरळमार्गी व्यक्तीबद्दल असे (पटण्यासारखे) लिखाण करणाऱ्या दोन ज्येष्ठ मिपाकरांचा द्विवार निषेध 😀😂

प्रचेतस's picture

24 Sep 2022 - 4:23 pm | प्रचेतस

बघा तर =))

सतिश गावडे's picture

24 Sep 2022 - 1:35 pm | सतिश गावडे

एका भटक्याचे सुंदर सुंदर फोटो पाहून जळजळ झाल्याने असूयेने काढलेला धागा.

त्यांनी मनावर घेऊन आपला धागाच अप्रकाशित केला असावा असे वाटते. आता हे पाप तुम्हाला वेरुळलाच जाऊन फेडावे लागेल.

प्रचेतस's picture

24 Sep 2022 - 3:00 pm | प्रचेतस

=))

चला जाऊयात वेरुळला, मी तर कधीही तयार :)

मी पण येईन... फक्त किमान २-३ दिवस आधी कळवा...
आधी पाहीलेली वेरुळ लेणी तुमच्या मार्गदर्शनाखाली पहाण्याचा अनुभव वेगळाच असेल!

कंजूस's picture

24 Sep 2022 - 1:44 pm | कंजूस

#मलाघेऊनचला

बाकी लेखाबद्द्ल काही लिहिण्यासारखे नाही. (म्हणजे लेख नेहमीप्रमाणे उत्तमच. नुसतच छान छान, व्वा असले लिहिण्यात काय हशील नाही)
ऍमेझॉन वरून न मागवता शोरूममधूनच घेतली हे वाचून मी पुराणकाळात वावरतो की काय असा भास झाला. बुलेट अ‍ॅमेझॉन वरुन मागवता येते ही गोष्ट माझ्यासाठी नवीन आहे.

प्रचेतस's picture

24 Sep 2022 - 3:04 pm | प्रचेतस

हे कॅलक्यूलेटर ह्यांच्या धाग्याचे विडंबन आहे, त्यांनी नाराज होऊन मूळ लेख अप्रकाशित केल्यामुळे इतर सर्व संदर्भ गेले आहेत :)
सायकलच्या जागी मोटारसायकल, सिंहगडच्या जागी कोरीगड आणि पावसाळ्याच्या जागी उन्हाळा घातलेला आहे. मूळ लेख असता तर ह्या विडंबनाची अचूक संगती लागली असती.

कंजूस's picture

24 Sep 2022 - 3:59 pm | कंजूस

कॅलक्यूलेटर यांस काही ट्रीट देणे आले.
( लेख गेला, पण ते वाचनमात्र झाले तर थंडरबर्डची लुना होईल.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Sep 2022 - 7:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मूळ लेखन ’पावसाळी भटकंती - सिंहगड’ चांगले लेखन होते. खरं तर, सायकलचा वापर तसा कमी झालाय.
त्यामुळे ती एक वेगळी भटकंती होती. आणि प्रचेतस यांचे लेखन नावालाच विडंबन होते, कारण हेही स्वतंत्र लेखन ठरावे इतके वेगळे
होते.

मूळ लेखन लेखकाने पुन्हा टाकले पाहिजे. लेखक महोदय विचार करतील अशी अपेक्षा.

-दिलीप बिरुटे

श्वेता व्यास's picture

25 Sep 2022 - 1:40 pm | श्वेता व्यास

सगळ्याच प्रचिंमध्ये थंडरबर्ड कोणत्याही पार्श्वभूमीवर खासच दिसतेय.

चांदणे संदीप's picture

26 Sep 2022 - 5:54 am | चांदणे संदीप

प्रेरणेला मिसल्यामुळे थोडी मजा गेली. पण स्वतंत्र भटकंती लेख म्हणूनही भारीच!

रच्याकने, आपलाच धागा अप्रकाशित कसा करायचा?

सं - दी - प

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Sep 2022 - 9:28 am | ज्ञानोबाचे पैजार

तुमचे बुलेट प्रेम तर सर्व विश्वात जगप्रसिध्द आहे. आता मागची सीट पण भरुन टाका म्हणजे इथल्या दु दु म्हातार्‍यांच्या कवळ्या घशात जातील.

तुमच्या कडून भविष्यातही अशाच सकस विडंबनांची अपेक्षा करतो. लिहित रहा.

पैजारबुवा,

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Sep 2022 - 12:12 pm | राजेंद्र मेहेंदळे

उन्हाळ्यातील वाळक्या पिवळट डोंगरांच्या पार्श्वभूमीवर थंडरबर्ड एकदम कातील दिसते आहे. नवीन बुलेट घेतल्याबद्दल अभिनंदन.

(आणि मूळ धागा वाचायचा राहीला असल्याने तो ही पुनः प्रकाशित करावा अशी लेखकाला विनंती.)

किल्लेदार's picture

19 Oct 2022 - 11:43 pm | किल्लेदार

एनफिल्डला पांढरा किंवा आर्मी ग्रीन (जो सिव्हिलिअन्सला उपलब्ध नाही ) हे दोनच रंग दमदार दिसतात हे माझे वैयक्तिक मत आहे.

किल्लेदार's picture

19 Oct 2022 - 11:47 pm | किल्लेदार

एनफिल्डला पांढरा किंवा आर्मी ग्रीन (जो सिव्हिलिअन्सला उपलब्ध नाही ) हे दोनच रंग दमदार दिसतात हे माझे वैयक्तिक मत आहे.

किल्लेदार's picture

19 Oct 2022 - 11:48 pm | किल्लेदार

एनफिल्डला पांढरा किंवा आर्मी ग्रीन (जो सिव्हिलिअन्सला उपलब्ध नाही ) हे दोनच रंग दमदार दिसतात हे माझे वैयक्तिक मत आहे.

किल्लेदार's picture

19 Oct 2022 - 11:51 pm | किल्लेदार

एनफिल्डला पांढरा किंवा आर्मी ग्रीन (जो सिव्हिलिअन्सला उपलब्ध नाही ) हे दोनच रंग दमदार दिसतात हे माझे वैयक्तिक मत आहे.