(उन्हाळी भटकंती - कोरीगड तैलबैला आणि राजमाची(पण यावेळी एनफिल्ड वर))
(प्रेरणा)
माझी जुनी मोटारसायकल आता बदलायला आली होती म्हणून मग मलाच चालवता येईल अशी रॉयल एनफिल्ड थंडरबर्ड ३५० एक्स मोटारसायकल ऍमेझॉन वरून न मागवता शोरूममधूनच घेतली . एक सहज कोरीगडावर चक्कर मारून येऊ अस ठरवून घरातून सकाळी ७.१५ ला बाहेर पडलो. साधारणतः ६५ ते ७० मिनिटांमध्ये आंबवण्याला पोहोचलो
राजमाचीला जाताना - हे फोटो नंतर कधीतरी काढलेले आहेत
राजमाचीला जाताना - हे फोटो नंतर कधीतरी काढलेले आहेत
राजमाचीच्या गोधनेश्वर मंदिरात बसलेलं भुभू - हे फोटो नंतर कधीतरी काढलेले आहेत
हातात अजून वेळ असल्यामुळे आणि कोरीगडावरुन घरीच यायचे असल्याने असल्यामुळे हाताशी ३ - ४ तास अजून होते मग आज तैलबैल्याला सालतर खिंड ओलांडून परत येऊ असा ठरवलं.
राजमाचीचे आवळेजावळे बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन - हे फोटो नंतर कधीतरी काढलेले आहेत
साधारण १० च्या सुमारास कोरीगडावरुन पुढे सालतर खिंडीकडे रायडिंगला सुरुवात केली. चांगला डांबरी रस्ता आणि त्यानंतर तीव्र चढाचा वळणेवळणे घेत जाणारा अत्यंत खराब रस्ता आहे. पण मी तिथून जायला सुरु केले तेव्हा कडक उन्ह आणि जंगलाची थंडगार सावली एकसाथ सुरु झाली पण माझ्यासाठी ते फायद्याचं ठरलं कारण सावलीमुळे मला अजिबात उन्हाचे चटके बसत नव्हते. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर अतीतीव्र चढ लागला आणि बाईक घसार्यावरुन घसरायची भिती असल्याने ब्रेक न घेता खिंड ओलांडली
जाताना हे घनदाट जंगल खुणावत होतं.
उन्हाळ्यामुळे पुढचा सगळा भाग ओसाड आणि रखरखीत भासत होता.
आणि परत गिअर टाकायला सुरुवात केली. सुट्टीचा दिवस असल्यामुळे रस्त्याला अजिबात गर्दी नव्हती, त्यामुळे आरामात मोटारसायकल चालवत चालवत तैलबैल्याजवळ पोहोचलो आणि घड्याळ बघितलं तर पावणेअकरा होत होते. मग जरा फोटोसेशन केलं
आणि परत जायच असल्यामुळे लगेच निघालो. सालतर खिंड उतरुन थोडा थांबत आणि फोटो काढत आलो.
खिंडीतून उतरताना
कोरीगडाच्या पार्श्वभूमीवर
तिथून निघताना
कोरीगडानंतरचा घाट उतरल्यानंत थेट घरी येऊन थांबलो १२ .३० च्या दरम्यान घरी पोचलो. २०० किमी आणि ५ .३० तास अशा वेळात हि मोटारसायकल भटकंती पूर्ण झाली. त्यावेळी जाताना राजमाचीला गेलो नसल्याने तिथले फोटो काढले नव्हते त्यामुळे नंतर कधीतरी नव्याच्या जुन्या झालेल्या एनफिल्डवर परत राजमाची किल्ल्यापर्यंत जाऊन अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण केली
मोटार सायकल चालवत असताना मनातल्या मनात माझी जुनी पल्सर आणि ही रॉयल एनफिल्डची थंडरबर्ड मोटारसायकल यात मनातल्या मनात तुलना सुरु होती.
दोन्हीचे आपले आपले फायदे आणि तोटे आहेत त्यापैकी मला वाटलेले काही इथे थोडक्यात मांडतो
१) किंमत - पल्सर पेक्षा एनफिल्ड महाग मात्र हार्लेपेक्षा खूपच स्वस्त
२) पल्सर कमी अंतरासाठी उपयुक्त, थंडरबर्ड - लांब अंतर कमी श्रमात कापायचे असेल तर हिला पर्याय नाही
३) पल्सर चालवताना ६० - ७० किमी चालवल्यानन्तर पाठ दुखायला लागायची तस मला थंडरबर्ड चालवताना अजिबात जाणवले नाही.
४) ऑफ रोड - थंडरबर्ड ही मोटारसायकल मी कसल्याही रस्त्यात बिनधास्त चालवली आहे पण पल्सर चालवताना सारखा टायर घसरतो कि काय किंवा तीव्र वळणावर पडू कि काय हि भीती सारखी वाटत राहते. सालतर खिंडीतून जाताना जो घसार्याचा खडबडीत रस्ता लागतो त्याच्यातून पल्सर नक्की घसरली असती.
५) पल्सर कि थंडरबर्ड अशी जेव्हा द्विधा मनस्थिती असेल आणि ज्यांना वाटत आपण मोटारसायकलिंग सुरु करतोय पण किती दिवस करू शकतो त्यांनी थंडरबर्ड मोटारसायकल घ्यावी कारण यांच्यात आपण खूप थकत नसल्यामुळे मोटारसायकलिंग चा उत्साह टिकून राहू शकतो. मात्र गाडी वजनदार असल्याने आपल्याला पेलते का ते आधी बघावे.
अर्थात हि सगळी माझी मते आहेत ज्याला जे आवडेल आणि पटेल अशी मोटारसायकल घ्यावी.
वाचने
12418
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
गणेशा
किती सुंदर फोटो ! एक
किती सुंदर फोटो ! एक
भारी.
In reply to भारी. by कंजूस
यावेळी पावसाळ्यात बाईकवरुन
छान लिहिले आहे ...
उत्तम प्रचि.
बुलेटला पर्याय नाही.....
हा धागा म्हणजे कॅलक्युलेटर
In reply to हा धागा म्हणजे कॅलक्युलेटर by प्रचेतस
कंसातले शीर्षक बघुन हा विडंबनात्मक धागा आहे
In reply to कंसातले शीर्षक बघुन हा विडंबनात्मक धागा आहे by टर्मीनेटर
अगदी. या भो कॅल्क्युलेटरसाहेब
In reply to हा धागा म्हणजे कॅलक्युलेटर by प्रचेतस
लेखकांची भ्रूणहत्या
In reply to लेखकांची भ्रूणहत्या by कपिलमुनी
नै हो, मी हे पाप कसे करु धजेन
In reply to नै हो, मी हे पाप कसे करु धजेन by प्रचेतस
मा प्रचेतसप्रतिष्ठां त्वमगमः
खोडकर आहेस तू.
In reply to खोडकर आहेस तू. by गणपा
नै रे, कितीतरी वर्षांनी एखादे
In reply to नै रे, कितीतरी वर्षांनी एखादे by प्रचेतस
बाकी काही नाही
In reply to बाकी काही नाही by सुरिया
स्वतःच प्रत्येक प्रतिसादास
हायला,
हायला,
वाहवा...!
In reply to वाहवा...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to +१ by गवि
हेतू तोच... स्पष्ट
In reply to हेतू तोच... स्पष्ट by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्व अचूक समजले..!!
मधे सॅक धरुन बसणे.पुरुष असेल तर,देवाच्या भरवशावर बसणे. अशी किंचित सुधारणा.In reply to सर्व अचूक समजले..!! by गवि
आई गं...!
In reply to आई गं...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोन ज्येष्ठ सदस्य लैच
In reply to दोन ज्येष्ठ सदस्य लैच by प्रचेतस
दोन ज्येष्ठ सदस्य लैच
In reply to दोन ज्येष्ठ सदस्य लैच by टर्मीनेटर
बघा तर =))
निषेध...
In reply to निषेध... by सतिश गावडे
=))
In reply to =)) by प्रचेतस
मी पण येईन... फक्त किमान २-३ दिवस आधी कळवा...
घरचा आहेर आला.
बाकी लेखाबद्द्ल काही लिहिण्यासारखे नाही.
In reply to बाकी लेखाबद्द्ल काही लिहिण्यासारखे नाही. by धर्मराजमुटके
हे कॅलक्यूलेटर ह्यांच्या
In reply to हे कॅलक्यूलेटर ह्यांच्या by प्रचेतस
परिमार्जन करावे.
दोन्ही लेखन वेगळे
सगळ्याच प्रचिंमध्ये थंडरबर्ड
अरेरे
भारी विडम्बन वल्ली दा, मजा आ गया
मस्त भटकंती
धमाल...
धमाल...
धमाल...
धमाल...