बंडवीर

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
23 Jun 2022 - 9:08 am

।। उध्दवाते ना धरवे धीर ।।
।।सेने त उभे बंडवीर ।।
।। गेली ही सत्तेची खीर ।।
।।हातातून।।

।। बदलली नाही पार्टी ।।
।। बदल फक्त रिसाॅर्टी ।।
।। अजून कलटी मारती ।।
।। एकएक ।।

।।राहीले पंधरा जेमतेम ।।
।।नंबरचा हा सर्व गेम ।।
।। कुणाचा धरावा नेम ।।
।।नाॅट रिचेबल ।।

।।गनीमीने करता वार ।।
।।कोण नवा हा सूत्रधार ।।
।।विठ्ठला महापूजा करणार।।
।।कोण आता?।।

अभंगकविता

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

23 Jun 2022 - 11:13 am | कर्नलतपस्वी

केवळ विठ्ठलाला माहीती की पुजा कोण करणार उद्धव या देवेंद्र.

प्रतीसादाचा संबध थेट राजकारणाशी नाही याची नोंद घ्यावी &#128526

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jun 2022 - 1:10 am | अमरेंद्र बाहुबली

केवळ विठ्ठलाला माहीती की पुजा कोण करणार उद्धव या देवेंद्र.

आज पुजा मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे ह्यांच्या हस्ते संपन्न झाली.

कर्नलतपस्वी's picture

23 Jun 2022 - 11:13 am | कर्नलतपस्वी
कर्नलतपस्वी's picture

23 Jun 2022 - 11:14 am | कर्नलतपस्वी

केवळ विठ्ठलाला माहीती की पुजा कोण करणार उद्धव या देवेंद्र.

प्रतीसादाचा संबध थेट राजकारणाशी नाही याची नोंद घ्यावी &#128526

नि३सोलपुरकर's picture

23 Jun 2022 - 11:27 am | नि३सोलपुरकर
नि३सोलपुरकर's picture

23 Jun 2022 - 11:40 am | नि३सोलपुरकर
कर्नलतपस्वी's picture

23 Jun 2022 - 12:59 pm | कर्नलतपस्वी

&#128526

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Jun 2022 - 6:05 pm | ज्ञानोबाचे पैजार

आमदार चालती गोहाटीची वाट
तरी आम्ही शेपटी फेंदारली ताठ

गांजुनिया भारी, राष्ट्रवादाने,
पडले रिकामे निधीचे हे ताट
आमदार चालती

आप्तइष्ट सारे, सगे सोयरे ते
मिळोनी लावती, सैनिकाची वाट
आमदार चालती

मुखी नाम यांच्या, बाळासाहेबांचे
मैद्याच्या पोत्याने ओढला, बसायचा पाट,
आमदार चालती

निवडणुक येता, जाउ कोणाकडे?,
मतदार घालतील, पेकाटात लाथ
आमदार चालती

पैजारबुवा,

शशिकांत ओक's picture

24 Jun 2022 - 11:16 pm | शशिकांत ओक

निवडणुक येता, जाउ कोणाकडे?,
मतदार घालतील, पेकाटात लाथ

विदारक सत्य आहे...

कर्नलतपस्वी's picture

23 Jun 2022 - 5:48 pm | कर्नलतपस्वी

पाऊले चालती

माऊली मस्तच.

श्वेता व्यास's picture

27 Jun 2022 - 6:00 pm | श्वेता व्यास

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील :D