Skip to main content

बंडवीर

लेखक बाजीगर यांनी गुरुवार, 23/06/2022 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
।। उध्दवाते ना धरवे धीर ।। ।।सेने त उभे बंडवीर ।। ।। गेली ही सत्तेची खीर ।। ।।हातातून।। ।। बदलली नाही पार्टी ।। ।। बदल फक्त रिसाॅर्टी ।। ।। अजून कलटी मारती ।। ।। एकएक ।। ।।राहीले पंधरा जेमतेम ।। ।।नंबरचा हा सर्व गेम ।। ।। कुणाचा धरावा नेम ।। ।।नाॅट रिचेबल ।। ।।गनीमीने करता वार ।। ।।कोण नवा हा सूत्रधार ।। ।।विठ्ठला महापूजा करणार।। ।।कोण आता?।।
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4761
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

केवळ विठ्ठलाला माहीती की पुजा कोण करणार उद्धव या देवेंद्र. प्रतीसादाचा संबध थेट राजकारणाशी नाही याची नोंद घ्यावी &#128526

In reply to by कर्नलतपस्वी

केवळ विठ्ठलाला माहीती की पुजा कोण करणार उद्धव या देवेंद्र.
आज पुजा मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे ह्यांच्या हस्ते संपन्न झाली.

केवळ विठ्ठलाला माहीती की पुजा कोण करणार उद्धव या देवेंद्र. प्रतीसादाचा संबध थेट राजकारणाशी नाही याची नोंद घ्यावी &#128526

In reply to by कर्नलतपस्वी

आमदार चालती गोहाटीची वाट तरी आम्ही शेपटी फेंदारली ताठ गांजुनिया भारी, राष्ट्रवादाने, पडले रिकामे निधीचे हे ताट आमदार चालती आप्तइष्ट सारे, सगे सोयरे ते मिळोनी लावती, सैनिकाची वाट आमदार चालती मुखी नाम यांच्या, बाळासाहेबांचे मैद्याच्या पोत्याने ओढला, बसायचा पाट, आमदार चालती निवडणुक येता, जाउ कोणाकडे?, मतदार घालतील, पेकाटात लाथ आमदार चालती पैजारबुवा,