ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ३)

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
22 Jun 2022 - 4:20 pm
गाभा: 

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती.

एकनाथ शिंदे यांनी अपक्ष मिळून आपल्या गटात ४६ आमदार आहेत असा दावा केला आहे.

तसेच आपणच शिवसेनेचे गटनेते आहोत असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला असून भारत गोगावले यांची विधीमंडळ पक्षाच्या प्रतोदपदावर त्यांनी नियुक्ती केली आहे.

शिवसेनेचे आणखी चार आमदार गुवाहाटीच्या मार्गावर तर काँग्रेसचे आठ आमदारही गोव्याच्या मार्गावर आहेत अशा बातम्या आहेत.

शिवसेनेने सगळ्या आमदारांची संध्याकाळी पाच वाजता बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला अनुपस्थित राहणार्‍यांवर कारवाई केली जाईल असे शिवसेनेने म्हटले आहे.

प्रतिक्रिया

चंद्रसूर्यकुमार's picture

22 Jun 2022 - 4:49 pm | चंद्रसूर्यकुमार

उध्दव ठाकरे आज संध्याकाळी ५ वाजता फेसबुक लाईव्ह करणार.

यावेळी कोमट पाणी प्यायला कोणाला सांगणार?

राजकारण हा विषय महत्वाचा आहे पण इतका पण महत्वाचा नाही की बाकी सर्व विषय गौण आहेत.
काल च नातेवाईक साठी kem हॉस्पिटल मध्ये जाण्याचा योग आला.
ब्रिटिश कालीन वास्तू आणि ब्रिटिश कालीन च व्यवस्था .
अगदी भव्य.
पण तिथे गेल्यावर मन सुन्न झाले.
किती तरी आजारी लोक .
ना त्यांना बघण्यास डॉक्टर, ना कोणती सुविधा.
व्यवस्था च कोलमडून जावी इतकी गर्दी..
भारतात मुंबई सारख्या ठिकाणी आरोग्य व्यवस्थेचे हे हाल असतील तर देशात काय असेल.
ब्रिटिश नी उभ्या केलेल्या सार्वजनिक भव्य हॉस्पिटल आज पण सामान्य लोकांचे आशा स्थान आहे.
भारतीय स्वदेशी सरकार नी ७०, वर्षात काय केले.

राजकारणात इतके पण गुंतू नका .
सर्व स्वार्थासाठी चालले ले खेळ आहेत.
विकास ,सुविधा,सू व्यवस्था हे विषय अतिशय महत्वाचे आहे.
कोणत्या पक्षाचे सरकार आहे ह्या पॉइंट शी लोकांना काहीच देणे घेणे असले नाही पाहिजेत

विजुभाऊ's picture

23 Jun 2022 - 10:34 am | विजुभाऊ

आरोग्य मंत्रालयाचा हा विषय आहे.
तुम्हाला दिसली ती परिस्थिती त्यांना स्नॅपचॅट किंवा ट्व्विटरने कळवा.

रात्रीचे चांदणे's picture

22 Jun 2022 - 7:57 pm | रात्रीचे चांदणे

तर मी मुख्यमंत्री पद सोडेल तर मी वर्षा बंगला सोडेल, माझा राजीनामा तयार आस म्हणून मुखमंत्र्यांनी भावनिक आवाहन केले आहे.

चौकस२१२'s picture

23 Jun 2022 - 4:04 am | चौकस२१२

उद्धव उवाच अह्ह्ह काय ते आवाहन .. पूर आलं हो अश्रूंचा राज्यात ( जय संतोषी माता चाय नंतर आलेला हा दुसरा पूर )
- काय तर म्हणे मी मुखमंत्री नको असेंन तर सांगावे मग मी राजीनामा देईन ... प्रश्न कोण मुख्यमंत्री हा नाहीच मुळी तुम्ही राष्ट्रवादी आणि kongres बरोबर लग्न लग्न लावून सेनेची धोरणे सोडलीत यामुळे हे घडतंय
- हिंदुत्व आहे .. आहे ना मग भाजप बरोबर फाटल्यावर हिंदूतला हा जरी उच्चर्ला तरी हगवण लागते अशा दोन पक्षांबरोबर युती का केलीत.. स्वतंत्र राहायचे आणि बघ्याची मज्जा !
- आजच वारसा सोडून मातोश्री war जातो.... कुणी अडवलाय ?

हा असला "जनतेशी संवाद " लाजिरवाणा प्रकारच सगळा ,, असें ताठ kana तर सरळ राजीनामा द्यायचा नाहीतर सदनात चाचणी घ्या ,, आहे का हिंमत मत वाघांच्यात
एकूण या सवांदातून त्यानं अजूनही सोनियाजी आणि काकांबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे हे सिद्ध झाले ....

कंजूस's picture

23 Jun 2022 - 6:27 am | कंजूस

आणि शिंदेंनी म्हटलं की ४५सह माझीच शिवसेना तर? कॉन्ग्रेसची बैलजोडी जाऊन दोन वेगळे पक्ष ( इंदिरा आणि उरस) झाले तसं शिवसेना ( बाळासाहेब आणि उद्धव) वेगळे पक्ष होतील दोन वेगळी चिन्हं. धनुष्यबाण गोठेल.

क्लिंटन's picture

23 Jun 2022 - 12:08 pm | क्लिंटन

काल संध्याकाळी भाषणाचे नाटक केल्यानंतर काही आमदार स्वगृही परततील असे कोणाला वाटले असेल तर तसे काहीही होत नाहीये. इतके भावनिक आव्हान करूनही आमदारांची पावले चालती गुवाहाटीची वाट चालूच आहे. सदा सरवणकर आणि आणखी दोघे कालचे भाषण झाल्यावरच गुवाहाटीला गेले.

एकूणच काय तर ठाकरेंनी संजय राऊतांच्या नादी लागून विधानसभा निवडणुकीत लोकांनी स्पष्टपणे दिलेल्या जनमताला लाथाडले आणि स्वतः मुख्यमंत्री झाले तसेच गेल्या अडीच वर्षात जो काही सावळागोंधळ त्यांच्या सरकारने घातला आहे त्याच्याविरोधात सामान्य लोकांमध्ये प्रचंड संताप आहे तेव्हा अशा मुख्यमंत्र्याबरोबर अधिक काळ राहिलो तर आपले पुढच्या वेळेस निवडून येणे कठीण होईल हे आमदारांनाही समजले आहे. गेल्या अडीच वर्षात हळूहळू असंतोष वाढत होता त्याचा उद्रेक आता झाला.

बहुतेक आता ठाकरेंनाही आपला मुख्यमंत्रीपदाचा खेळ संपत आला आहे हे समजलेले दिसते. त्यांनी शिवसेना आमदारांची आज बोलावलेली बैठक रद्द केली आहे. त्यासाठी मल्लीनाथी काहीही केली जाईल- आमदारांना वर्षा बंगल्यावर प्रशासकीय कामे आहेत वगैरे. पण खरे कारण काय ते लपून राहणे कठिण आहे.

शाम भागवत's picture

23 Jun 2022 - 1:02 pm | शाम भागवत

केंद्रीय राजकारणात महत्व मिळण्याच्या दृष्टीनेही आता खासदार शिंदेसाहेबांकडे जाण्याची आता शक्यता निर्माण झाली आही. जर खासदारही मोठ्या प्रमाणात गुहाटीला पोहोचले तर आमची शिवसेना हीच खरी शिवसेना हा मुद्दा आणखी ताकदवान होऊ शकेल.

मला वाटते, उठा यांनी राजिनामा दिल्यावर, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लावली जाईल. मला वाटते सध्याच्या राजकारणाचा हा शेवटचा टप्पा असेल. आपला सोयीचा अध्यक्ष निवडला गेल्यावर पुढील हालचाली केल्या जातील.

दिगोचि's picture

24 Jun 2022 - 6:02 am | दिगोचि

गुवाहाटितल्या हॉटेलचे सात दिवसान्चे भाडे म्हणे ५६ लाख रुपये आहे. एव्हढे पैसे आणले कोठून किम्वा कोणी दिले?

डाम्बिस बोका's picture

24 Jun 2022 - 6:52 pm | डाम्बिस बोका

आमदार फोडायला ५० ते १०० कोटी (कमीतकमी) लागतात त्यात काही लाखांचे काय घेऊन बसलात. बाकी हे पैसे कोण भरतो आणी कुठून येतात हे ED/CBI ला सुद्धा न उलगडणारे कोडे आहे

सुबोध खरे's picture

24 Jun 2022 - 7:04 pm | सुबोध खरे

हायला

मुंबईचे पोलीस आयुक्त च जर महावसुली आघाडीने त्यांना दर महा १०० कोटी गोळा करायला सांगितले होते
असे सांगतात.

Anil Deshmukh asked Waze to collect Rs 100 crore for him per month: Param Bir Singh tells Uddhav Thackeray

https://www.timesnownews.com/mumbai/article/anil-deshmukh-asked-waze-to-...

म्हणजे मग अडीच वर्षात( ३० महिन्यात) ३ हजार कोटी जमा झालेले आहेत.

पण एवढे असूनही आमदार आघाडीबरोबर यायला तयार नाहीत म्हणजे जखम कुठेतरी फार खोल गेलेली आहे.

लष्करात असताना (१९९१) एक माझे वरिष्ठ मला म्हणाले होते कि एक कोटी म्हणजे किती होतात?
रोज दहा हजार रुपये खर्च केले तरी हे पैसे तुम्हाला तीन वर्षे पुरतील.

मी त्यांना म्हणालो कि सर आपण मध्यमवर्गीय आहोत आपली झेप हजाराच्या वर जातच नाही.कारण आपला पगारच चार हजार आहे मग आपण रोज १०० रुपये खर्च करायच्या अगोदर विचार करतो. तेंव्हा रोज सोडाच एक महिन्याला सुद्धा १० हजार खर्च करण्याचा विचार करू शकत नाही.

एकुलता एक डॉन's picture

22 Jun 2022 - 8:29 pm | एकुलता एक डॉन

सुनिल साहेब
राजकारण पासून लांब राहायचा प्रयत्न केला
राजकारण पार आपल्यापर्यंत येते

राजकारण दिसते तितके सरळ नाही.
प्रचंड पैसा,प्रचंड अधिकार ह्याचा खेळ आहे.
समाज हीत,देश हीत हे दुय्यम मुद्दे आहेत.
समाजाची मानसिकता, समाजाला काय ऐकायला आवडेल, समाजात कशी आणि कुठे फूट पाडता येईल.
लोक सर्व असुविधा विसरून काल्पनिक विश्वात कसे जातील.
ह्या साठी प्रचंड पैसा खर्च करून अतिशय हुषार लोकांची टीम काम करत असते.
अती प्रचंड पैसा खर्च करून सल्लागार असतात.
किती ही विचारी व्यक्ती असेल तरी तो सामान्य असतो.
एक दिवस तो राजकारणी लोकांच्या कुटील डाव पेचात अडकतो च.
त्या साठी राजकारणी लोकांच्या प्रतेक शब्द आणि खरी स्थिती ह्याची तुलना करून मत बनवावे लागते
कठीण काम आहे,आपण पैसे खर्च करून सल्लागार नेमू शकत नाही

ते भाजपने नाकारलं होतं. मग साष्टांग घातला. तरीही पवारांनी नाकारले. मग खुर्चीत बसावे लागले. आता खुर्चीतून उठावे लागले.
बाकी शिवसेनेची बाळासाहेबापासून मागे राहून प्यादी हलवायचे धोरण नसते तर मनोहर आणि नारायणाऐवजी उद्धवलाच बाळासाहेबांनी तेव्हा मुख्यमंत्री केले असते.
असा प्रकार जनतेने पाहिला आहे.
बाकी कमी अधिक संजयच सांगेल. चु.भू.द्यावी घ्यावी.

श्रीगुरुजी's picture

22 Jun 2022 - 9:02 pm | श्रीगुरुजी

एकनाथ शिंदेंकडे सेनेचे अजून ३७ आमदार जमले नसावे असे वाटते. कदाचित आमदार असूनही घाई करू नका, ठाकरेंनी पुढील निर्णय घेईपर्यंत वाट पहा असे फडणवीसांनी सांगितले असावे. विधानसभेत बहुमत सिद्ध करा असा आदेश देण्याची राज्यपालांनाही अजिबात घाई दिसत नाही. अजून काही दिवस अधांतरी वातावरण ठेवून उर्वरीत आमदार कोणाकडे झुकतात, राष्ट्रवादी व कॉंग्रेस काय भूमिका घेतात, याची वाट पहात असावे.

काही असले तरी शिंदेंच्या बंडाची सेना कार्यकर्त्यांमध्ये फारशी प्रतिक्रिया उमटलेली दिसत नाही. भुजबळ बाहेर पडले तेव्हा प्रचंड तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. काल काही कार्यकर्ते जमून शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है अश्या स्वरूपाच्या नेहमीच्याच टुकार घोषणा देताना दाखविले. बहुसंख्य कार्यकर्ते थंड दिसतात. बारामतीच्या पोपटाचा सुद्धा स्वर खाली आलाय. ट्विटरवर सुद्धा सेना समर्थकांच्या फारश्या तीव्र प्रतिक्रिया नाहीत.

अररर गुलाबराव पाटील पण गुवाहाटी मध्ये!
देफ.पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे.एवढी सफाई आता फक्त जनतेच्या भल्यासाठी उरलेल्या २.५ वर्षांत दिसू द्यावी .

श्रीगुरुजी's picture

22 Jun 2022 - 9:11 pm | श्रीगुरुजी

एकनाथ शिंदेंकडे सेनेचे अजून ३७ आमदार जमले नसावे असे वाटते. कदाचित आमदार असूनही घाई करू नका, ठाकरेंनी पुढील निर्णय घेईपर्यंत वाट पहा असे फडणवीसांनी सांगितले असावे. विधानसभेत बहुमत सिद्ध करा असा आदेश देण्याची राज्यपालांनाही अजिबात घाई दिसत नाही. अजून काही दिवस अधांतरी वातावरण ठेवून उर्वरीत आमदार कोणाकडे झुकतात, राष्ट्रवादी व कॉंग्रेस काय भूमिका घेतात, याची वाट पहात असावे.

काही असले तरी शिंदेंच्या बंडाची सेना कार्यकर्त्यांमध्ये फारशी प्रतिक्रिया उमटलेली दिसत नाही. भुजबळ बाहेर पडले तेव्हा प्रचंड तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. काल काही कार्यकर्ते जमून शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है अश्या स्वरूपाच्या नेहमीच्याच टुकार घोषणा देताना दाखविले. बहुसंख्य कार्यकर्ते थंड दिसतात. बारामतीच्या पोपटाचा सुद्धा स्वर खाली आलाय. ट्विटरवर सुद्धा सेना समर्थकांच्या फारश्या तीव्र प्रतिक्रिया नाहीत.

चंद्रसूर्यकुमार's picture

22 Jun 2022 - 9:44 pm | चंद्रसूर्यकुमार

आतापर्यंत राज्यपालांकडे काहीही गेलेले नाही. जर एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे आपल्या समर्थक आमदारांच्या सहीचे पत्र देऊन सरकारचा पाठिंबा काढून घेतला असे कळविले तरच राज्यपाल मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करायला सांगतील. अजूनपर्यंत तसे काही झालेले नाही. राज्यपाल मिडियात आलेल्या बातम्यांच्या आधारे मुख्यमंत्र्यांना तसे करायला सांगणार नाहीत आणि त्यांनी तसे सांगूही नये.

शाम भागवत's picture

22 Jun 2022 - 9:56 pm | शाम भागवत

अजून लोकं जमताहेत ना?
३७+झालेले असले तर
५० पर्यंत पोहोचायचंय ना.
:)

चंद्रसूर्यकुमार's picture

22 Jun 2022 - 10:18 pm | चंद्रसूर्यकुमार

अजूनही काही आमदार गुवाहाटीला जाणार आहेत असे वाटते. गुलाबराव पाटील आज संध्याकाळी पोचले. योगेश कदम इतर आमदारांबरोबर मुंबईत हॉटेल मध्ये होते ते पण आज गुवाहाटीत पोचले. मंगेश कुडाळकर ही त्याच मार्गावर आहेत असे दिसते. तेव्हा आपल्याकडे नक्की किती आमदार आहेत हे बघायला एकनाथ शिंदे थांबले असावेत. एकदा शेवटचा आमदार तिथे दाखल झाला की मग पुढची कारवाई होईल ही शक्यता आहे. तसेच स्वतः शिंदे हाडाचे शिवसैनिक आहेत. अजूनही ठाकरे महाभकास आघाडी मोडतील ही (कदाचित भाबडी) आशाही त्यांना असेल ही पण शक्यता आहेच

आपल्याकडे किती आमदार आहेत हे बघायला हवे याचे एक कारण आहे. आधीच एक गट स्थापन केला तर नंतर येणाऱ्यांना त्रास व्हायची शक्यता असते. १९९० मध्ये जनता दलातून चंद्रशेखर आणि देवीलाल यांच्याबरोबर सुरवातीला ५४ खासदार बाहेर पडले. त्यानंतर आणखी पाच ( विद्याचरण शुक्ला, भागेय गोवर्धन वगैरे) बाहेर पडले. पहिले ५४ खासदार बाहेर पडल्यानंतर जनता दलाचे खासदार शिल्लक राहिले ८८. तर नंतर बाहेर पडलेल्या ५ खासदारांचा आकडा ८८ च्या एक - तृतीयांश पेक्षा कमी आहे म्हणून त्या पाच खासदारांचे सदस्यत्व लोकसभा अध्यक्ष रवी रे यांनी पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे रद्द केले होते. तसे काही व्हायला नको हे पण एक कारण असू शकेल.

Bhakti's picture

22 Jun 2022 - 10:25 pm | Bhakti

+१ चांगली माहिती

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Jun 2022 - 9:46 pm | अमरेंद्र बाहुबली

बाकी राज्यपालांना तातडीने कोरोनाची लागण झालीय. गोव्याच्या राज्यपालांकडे कारभार देण्यामागेसगोव्यात भाजपचे सरकार आहे हे कारण असू शकते.

शाम भागवत's picture

22 Jun 2022 - 9:59 pm | शाम भागवत

बरोबर.

गोवा महाराष्ट्राच्या शेजारी आहे.गोवा/गुजरातला राज्यपाल यांना अतिरिक्त भार मिळतो

मुख्यमंत्री इतके दिवस आजारी होते,आधीच अतिरिक्त भार इतर शिवसैनिकाला दिला असता तर चांगलं झालं असते... जास्त भार सोसू नये!

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Jun 2022 - 10:42 pm | अमरेंद्र बाहुबली

मुख्यमंत्री इतके दिवस आजारी होते,आधीच अतिरिक्त भार इतर शिवसैनिकाला दिला असता तर चांगलं झालं असते... जास्त भार सोसू नये! हे सल्ले भाजपेयी बिनभाजप मुख्यमंत्र्यांना देतात, पण हे विसरतात की गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर परीकर ह्यांना सलाईन लावून विधानसभेत आणले होते. त्यांची जागा घेणारा दुसरा कुणी नव्हता का?? चालता येत नव्हतं तरी पर्रीकर पद का सोडत नव्हते?? म्हणजे भाजपचे करतील तर रासलीला ईतर करतील तर कॅरेक्टर ढिला. ह्या असल्या ढोंगा मुळेच भाजपेयींवर कुणी विश्वास ठेवत नाही.

श्रीगुरुजी's picture

22 Jun 2022 - 10:48 pm | श्रीगुरुजी

खिक्क.

भाजपला लोकसभेत ३०३ जागा आहेत. आता गोवा आणि इतर ३ राज्यातही बहुमत मिळाले. कोणीच भाजपेयींवर विश्वास ठेवत नाही, पण बहुमत देतात.

गोव्याचे काय माहित नाही बाई मला.मी महाराष्ट्राचा मतदार या नात्याने मतं दिलं.

श्रीगुरुजी's picture

22 Jun 2022 - 10:49 pm | श्रीगुरुजी

खरंच आजारी की सहानुभूतीसाठी आजाराचे नाटक?

श्रीगुरुजी's picture

22 Jun 2022 - 11:03 pm | श्रीगुरुजी

फेसबुक लाईव्ह करताना मानपट्टा नव्हता. कोरोना झाला असेल घराबाहेर येऊन अगदी जवळून कार्यकर्त्यांशी बोलत होते.

sunil kachure's picture

22 Jun 2022 - 9:52 pm | sunil kachure

१०५ निवडून येवून सत्ता न मिळणे.
आणि युती करून बहुमत असून पण सत्ता न मिळणे हे दुःख खूप मोठे आहे.

मान्य आहे.
त्या मुळे bjp हट्टाला पेटलो हे पण मान्य आहे.
पण राज्य हीत नावाची काही तरी गोष्ट असते ना.. आता नाही पुढे सत्ता मिळेल संयम ठेवून bjp वागली असती तर महाराष्ट्र ची जनता bjp ची पाठी राखी झाली असती .पण सेनेची जिरवण्याच्या नादात महाराष्ट्र चे नुकसान होत आहे लोक नाराज होत आहेत हे त्यांच्या लक्षात नाही आलं.

युती करून निवडणुका जिंकल्या होत्या..
सेने नी आपल्या आमदार ना विश्वासात घेवून .
Bjp sarkar ल बाहेरून पाठिंबा दिला असता तर आज ही अवस्था झाली नसती.
सरकार वर टीका पण करता आली असती आणि युती चे नियम पण मोडले गेले नसते.
पाच वर्षाचा प्रश्न होता.
डोई जड bjp झाली असती तर पाठिंबा काढून सरकार पण पाडता आले असते

चौकस२१२'s picture

23 Jun 2022 - 7:09 am | चौकस२१२

युती करून निवडणुका जिंकल्या होत्या..
सेने नी आपल्या आमदार ना विश्वासात घेवून .
Bjp sarkar ल बाहेरून पाठिंबा दिला असता तर आज ही अवस्था झाली नसती.
सरकार वर टीका पण करता आली असती आणि युती चे नियम पण मोडले गेले नसते.
पाच वर्षाचा प्रश्न होता.
डोई जड bjp झाली असती तर पाठिंबा काढून सरकार पण पाडता आले असते

सहमत। . पण तेव्हा कहहि करूँ मुख्यमंत्री आमचा म्हणुन अडुन बसले। .. आता घरचा आहेर मिळतोय। .. पण खपर फोडणार भाजपवर !
सर्वात हस्य्स्पद अणि घृणात्मक तेव्हा केले होते ते म्हणजे काय " बाळासाहेबांना दिलेल वचन पूर्ण केले सेनेचा मुख्यमंत्री " अरे उध्हवा हे वचन जर स्वबळावर किवा निदान १००+ मिळवून अणि मैग ऐटिट दूसरे ५० घेतले असतेस आणि पूर्ण केलं असतेस म्हणले गेले असते वचन पूर्ती म्हणून रे। ...

आणि काय ती नाटक। ..
- म्हणे रजिनमा तैयार आहे
- वर्षा सोडताना रश्मि वाहिनी भावुक! ( आधी वर्षात घुसलात ते कपटी पनाने सत्ता घेऊन ,, ते विसरायचा "
मातोश्री अलीवर आदित्य गाडीचे सु रूफ मधून उभे रहूं मुठी वळवून जणू मोठा विजय मिळवून ाल्यासारखा काय !

असो शेवटी काय बरमतीच्या काकांणी भाजप मैत्री ला मुठ माति दिली हेच ते विदारक सत्य

कांग्रेस किवा भाजप ला बहुमत दया,,, उरलेल्या या दोघांनाही हाकला

चौकस२१२'s picture

23 Jun 2022 - 7:09 am | चौकस२१२

युती करून निवडणुका जिंकल्या होत्या..
सेने नी आपल्या आमदार ना विश्वासात घेवून .
Bjp sarkar ल बाहेरून पाठिंबा दिला असता तर आज ही अवस्था झाली नसती.
सरकार वर टीका पण करता आली असती आणि युती चे नियम पण मोडले गेले नसते.
पाच वर्षाचा प्रश्न होता.
डोई जड bjp झाली असती तर पाठिंबा काढून सरकार पण पाडता आले असते

सहमत। . पण तेव्हा कहहि करूँ मुख्यमंत्री आमचा म्हणुन अडुन बसले। .. आता घरचा आहेर मिळतोय। .. पण खपर फोडणार भाजपवर !
सर्वात हस्य्स्पद अणि घृणात्मक तेव्हा केले होते ते म्हणजे काय " बाळासाहेबांना दिलेल वचन पूर्ण केले सेनेचा मुख्यमंत्री " अरे उध्हवा हे वचन जर स्वबळावर किवा निदान १००+ मिळवून अणि मैग ऐटिट दूसरे ५० घेतले असतेस आणि पूर्ण केलं असतेस म्हणले गेले असते वचन पूर्ती म्हणून रे। ...

आणि काय ती नाटक। ..
- म्हणे रजिनमा तैयार आहे
- वर्षा सोडताना रश्मि वाहिनी भावुक! ( आधी वर्षात घुसलात ते कपटी पनाने सत्ता घेऊन ,, ते विसरायचा "
मातोश्री अलीवर आदित्य गाडीचे सु रूफ मधून उभे रहूं मुठी वळवून जणू मोठा विजय मिळवून ाल्यासारखा काय !

असो शेवटी काय बरमतीच्या काकांणी भाजप मैत्री ला मुठ माति दिली हेच ते विदारक सत्य

कांग्रेस किवा भाजप ला बहुमत दया,,, उरलेल्या या दोघांनाही हाकला

श्रीगुरुजी's picture

22 Jun 2022 - 10:15 pm | श्रीगुरुजी

परवापासून अग्नीपथ हा विषय एकदम बंद झालाय.

निनाद's picture

23 Jun 2022 - 5:56 am | निनाद

अवांतर: गुवाहाटीचे खूप नाव गाजते आहे. हे मूळ कामरूप साम्राज्याचे एक पुरातन शहर आहे. या गुवाहाटीचे जुने नाव प्रागज्योतिषपुर असे होते. यास प्राग्ज्योतिष किंवा प्राग्ज्योतिष-कामरूप असेही म्हंटले गेले आहे. हा हिंदू प्रदेश हजार वर्षांपेक्षा जास्त अजिंक्य राहिला. हे साम्राज्य सध्याच्या बांगलादेशाच्या भागातही पसरलेले होते. समुद्रगुप्ताच्या शिलालेखात या राज्याचा उल्लेख आहे असे म्हणतात.

येथेच १६व्या शतकात अहोम हे हिंदू साम्राज्य अस्तित्त्वात आले. अहोम सेनापती लछित बडफुकन यांनी मुस्लिम आक्रमकांना असा धडा शिकवला की त्यांनी परत येथे येण्याचे धाडस केले नाही!

तरी सभेतल्या पुढच्या एखाद्या ठरावास विरोधी मतदान करतील तर?

सुरसंगम's picture

23 Jun 2022 - 6:59 am | सुरसंगम

गुरुजी / क्लीन्टन / श्याम भा. साहेब,

पण या बं. खो. नी इतर भाजपशाशित प्रदेश असताना गुवाहाटीच का निवडलं.
इतक्या लांब का गेले.

श्रीगुरुजी / क्लीन्टन साहेब / श्याम भा. साहेब,

पण या बं. खो. नी इतर भाजपशाशित प्रदेश असताना गुवाहाटीच का निवडलं.
इतक्या लांब का गेले.

श्रीगुरुजी's picture

23 Jun 2022 - 8:31 am | श्रीगुरुजी

कर्नाटक, गोवा, गुजरात ही भाजपशासित राज्ये महाराष्ट्राला लागून असल्याने येथे आमदार असतील तर सेनेचे इतर काही नेते त्यांना प्रत्यक्ष भेटणे सोपे आहे.

महाराष्ट्राच्या सीमैवरील छत्तीसगड, आंंध्र, तेलंगण या राज्यात भाजप सरकार नसल्याने तेथील राज्य सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळणे खूप अवघड आहे.

आसाम महाराष्ट्रापासून सर्वाधिक अंतरावर आहे, तेथे भाजपचे सरकार आहे व तेथील मुख्यमंत्री हिंमता बिस्व सर्मा हे प्रति अमित शहा असून अत्यंत खमके आहेत. तेथे जाऊन या आमदारांना प्रत्यक्ष भेटणे जवळपास अशक्य आहे।

शाम भागवत's picture

23 Jun 2022 - 10:59 am | शाम भागवत

शरद पवार हे लॉबिंग करण्यात अत्यंत कुशल आहेत. लॉबिंगसाठी भरपूर ओळखी व तिव्र स्मरणशक्ति लागते. यासाठी राष्ट्रवादी + कॉंग्रेस + शिवसेना या तिघांनाही संपर्कासाठी कमीत कमी वाव मिळेल असं ठिकाण निवडलं असावं.

सुरसंगम's picture

23 Jun 2022 - 9:06 am | सुरसंगम

धन्यवाद गुरुजी.
आता तर मुबंईतले इतर नेतेही जाऊन मिळाले.
ही नक्की उठा ची चाल हे जाहीर आहे.

क्लिंटन's picture

23 Jun 2022 - 9:27 am | क्लिंटन

उठा इतके कुटिल राजकारण खेळू शकतील असे वाटत नाही. इतकी जाण त्यांना असती तर मुळात त्यांनी ही परिस्थितीत उद्भवू दिली नसती. स्वतःच्या (पक्षाच्याही नाही) अल्पकालीन फायद्यासाठी दीर्घकालीन नुकसान आपण करून घेऊ नये हे त्यांना कळले नाही?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jun 2022 - 9:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मा. अटलबिहारी वाजपेयी यांचं तेरा पक्षांचं मिळून सरकार बनलेलं होतं तेव्हा मा. अटलजींचं लोकसभेतलं भाषण ' हम संख्याबल के सामने सर झुकाते है, और अध्यक्ष महोदय, मै अपना त्यागपत्र राष्ट्रपती महोदय को सोपने जा रहा हू ' असे म्हणून भाषण संपवलं आणि त्यांनी राजीनामा दिला. काल संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे असेच फेसबूक लाइव्हला लागले होते. राजकारणात सत्ता येते, सत्ता जाते. पण, काही माणसं कायम लक्षात राहतात. मा. अटलजी जसे लक्षात राहीले तसेच कालच्या भाषणामुळे मा.उद्धव ठाकरे कायम लक्षात राहतील. आजच्या राजकारणातले आक्रस्ताळपणे ओरड-आरड करणारे नेते पाहिल्यावर सुसंस्कृत आणि चतुर राजकारणी कसा असतो त्याचं एक उदाहरण म्हणून कालच्या भाषणाकडे पाहावे लागेल. 'या समोरासमोर बसून बोलू, आणि निर्णय घेऊ, मुख्यमंत्रीपद म्हणून नको असेल तर सोडतो. शिवसेनाप्रमुख म्हणून नको असेल तर तेही सोडतो' यात भावनिक आवाहन होते आणि चतुरपणाही होता. मतं- मतांतरे असू शकतील. बहुमत नसल्यामुळे मुख्यमंत्री राजीनाम्याची घोषणा करतील असे बहुसंख्यांकांचे अंदाज चुकले. आवाहानात 'शिवसैनिक मोठे आहेत, सत्ता नाही' असे आवाहन करुन 'ये मै जा रहा हू'ची आठवण झाल्याशिवाय राहीली नाही. अर्थात, राजीनाम्याची घाई करु नका. अजून कोणत्याच आमदारांनी राजीनामा दिलेला नाही. अजूनही महाविकास आघाडीचं संख्याबळ जशाच तसे आहे, हा सल्ला दिलेला असल्यामुळे त्यांनी धुरंदरपणे काल किल्ला लढवला. वर्षा निवासस्थान सोडल्यामुळे समर्थक पक्षांची चलबिचल झालीच असेल पण, फूटलेले मावळे शिंदे शिवसैनिक आहेत, हेही त्यांना माहिती आहे. आणि ज्या दिवशी आघाडीचं सरकार बनले त्याच दिवशी 'सत्तांतर' कधीही होऊ शकतं, हे त्यांना कळत नव्हते असे म्हणने म्हणजे मुर्खपणा ठरेल. राजकारणातला संयम आणि राजकीय खेळीसाठी जे कौशल्य लागतं ते कालच्या भाषणात दिसले. रस्त्या रस्त्यावर शिवसैनिकांनी केलेली पुष्पवृष्टी आणि त्यानिमित्ताने केलेले शक्तीप्रदर्शन महाराष्ट्राने एक उत्तम, सुसंस्कृत राजकारणी बघायला मिळाला. बाकी, पक्षीय गळती स्थिर झाल्यावर आकड्यांचा- कायद्यांचा खेळ कोणाला पायउतार करतो आणि कोणाला सिंहासन देतो त्या संगीत खुर्चीचा खेळ बघायला आपण सध्या मोकळे आहोत. सत्तेचं काय होईल ते माहिती नाही पण, मुख्यमंत्री साहेब, कालचं भाषण आवडलं. जय महाराष्ट्र.

-दिलीप बिरुटे

कानडाऊ योगेशु's picture

23 Jun 2022 - 9:54 am | कानडाऊ योगेशु

बिरुटे सर मा.अटलबिहारी वाजपेयींचे भाषण हे लोकसभेतील सभागृहात सर्व सदस्यांसमोर झाले होते. तो अगदी रणांगणात डोळ्यात डोळे घालुन छातीठोक पणे बोलण्याचा प्रकार होता. मा.उध्दव साहेब घरातुन निघालेही नाहीत आणि प्रत्यक्ष कोणासमोर न येता असे भाषण दिले. माझ्यामते हे भाषण वगैरे नसुन स्वतःला सहानुभुती मिळवुन केलेली तहाची बोलणी होती. भाजप इतर पक्षांसारखाच विधिनिषेध बाळगणार पक्ष असेल पण शिवसेनेची अवस्था पाहुन वाईट नक्कीच वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jun 2022 - 10:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मा. अटलजींचं ते भाषण काळजीपूर्वक ऐकलं तर त्यातही आकड्यांच्या खेळामुळे झालेला हताशपणा दिसतो, ते भाषण सहानुभूती मिळवणारंही होतं आणि तितकंच दमदारही होतं. ( हे माझं मत) ते भाषण मला कायम आवडतं. बाकी कालच्या भाषणाबद्दल मतं-मतांतरे असू शकतील. आपल्या मतांचा आदर आहेच. बाकी, भाजपाने सत्तेत असतांना शिवसेनेचा जो कायम अपमान केला, हीन वागणूक दिली. आणि शिवसेनेने सत्ता स्थापून अपमानाचा हिशेब पूर्ण केला. पण, ते करतांना शिवसेनेची आता पिछेहाट होतांना दिसते आहे. राजकारणात असे प्रत्येक पक्षाचे बॅडपॅच यायचेच आणि पुन्हा उभारी घेणेही येतेच. सत्तेच्या बाबतीत इथे कोणीच आणि कोणताच पक्ष अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला नाही, त्यामुळे राजकारणाच्या संगीत खुर्चीचा खेळ कायम असाच रंगणार आणि चालणार.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

23 Jun 2022 - 9:45 am | श्रीगुरुजी

सुसंस्कृत आणि चतुर राजकारणी कसा असतो त्याचं एक उदाहरण म्हणून कालच्या भाषणाकडे पाहावे लागेल.

हे वाचून अजून हसतोय. शंका लघुशंका असला काहीतरी पांचट विनोद, लाकूडतोड्याची गोष्ट, रडतोंडीचा घाट या नावाचा रडकुंडीचा घाट असा चुकीचा उल्लेख असले भाषण सुसंस्कृत व चतुर राजकारण्याचे भाषण!

श्रीगुरुजी's picture

23 Jun 2022 - 9:51 am | श्रीगुरुजी

मी सर्वोत्कृष्ट पाच मुख्यमंत्र्यांपैकी एक हे पण होतं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jun 2022 - 10:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून हसतोय

आपल्याही संस्थळावरील लेखन प्रवासात सभ्य- सुसंस्कृतपणा यावा (कधी कधी तो असतोही ) अशा मनापासून शुभेच्छा देऊन
असेच, मनसोक्त हसा, हसत राहा. आरोग्यासाठी ते चांगलंही असतं. अशी अपेक्षाही व्यक्त करतो. ;)

जय महाराष्ट्र.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

23 Jun 2022 - 10:23 am | श्रीगुरुजी

धन्यवाद! तुम्हालाही अशाच शुभेच्छा देतो.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Jun 2022 - 10:02 am | माईसाहेब कुरसूंदीकर

कसले चतुर उद्धव.? ४० हुन अधिक आमदार तुम्हाला सोडुन जातात. त्यांच्या मनात काय चालु होते ह्याचा तुम्हाला थांगपत्ताही लागत नाही. हे एका-दोन महिन्यात झालेले नाही. ई.डी.च्या भीतीमुळे असे जे म्हणत आहेत ते मूर्ख म्हणावे लागतील. ३६/४० आमदारांना ई.डी.ची भिती?ह्याचा अर्थ सेनेचे बहुसंख्य आमदार भ्रष्ट आहेत असेच म्हणावे लागेल.
"समोर येऊन बोला" असे सांगणे म्हणजे राजकारण तुम्हाला कळत नाही असेच म्हणावे लागेल. उद्धव ज्यांचा सल्ला घेतात ते शरद पवार समोर येऊन बोलतात का ?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Jun 2022 - 9:51 am | माईसाहेब कुरसूंदीकर

गिरीश कुबेर भांग्/गांजा पिऊन लोक्सत्तेत अग्रलेख लिहितात की काय असे नेहमी संशय येतो. आजचा अग्रलेखही तसाच. ३६/४० हुन अधिक सेनेच्या आमदारांना उद्धव ह्यांचे नेतृत्व/सध्याची प़क्षाची भूमिका नको आहे ही वस्तुस्थिती आहे. हे असे का झाले ह्यावर चर्चा करण्यापेक्षा सक्तवसुली संचलनालयाचा दट्ट्या.. म्हणत भाजपावरच टीका केली आहे. हे कुबेर आयकर भरतात का? की त्या करालाही 'आयकर खात्याच्या दट्ट्या" म्हणतात?
जर नेत्यांचे व्यवहार स्वच्छ नसतील तर ई.डी.ने नोटिस का पाठवू नये? ह्यावर कुबेर/मीडिया मूग गिळून गप्प. चौकशीला सामोरे जा.. कारवाई झाली नाही तर लोकांत येऊन "कारवाई चुकीची होती" असे सांगा की.

sunil kachure's picture

23 Jun 2022 - 9:53 am | sunil kachure

गेल्या 2.5 वर्ष सेना काशी वाईट आहे,सेनेत कसे भ्रष्ट लोक आहेत.सेना कशी दगाबाज आहे .
अशी टीका bjp वाले करत होते.
अगदी उद्धव ठाकरे ना शिव्या देण्या पर्यंत पण ह्यांची मजल गेली होती.

आता हेच बघायचे आहे ह्या नालायक सेने चा पाठिंबा घेवून सुसंस्कृत bjp सत्तेवर येते का?

सेना सोडली म्हणून सेने चे आमदार काही पवित्र होत नाहीत.
यांचा पण पाठिंबा सू संस्कृत bjp नी घेवू नये.

१९९१ मध्ये भुजबळ फुटले तेव्हा स्वतः भुजबळ हे एकटेच मुंबईतून विधानसभेवर निवडून गेले होते. बाकीचे ११ आमदार(*) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून निवडून गेले होते. त्यावेळी शिवसेनेचा मुंबई, ठाणे आणि कोकण या बालेकिल्ल्यातील एकही आमदार सोडाच कोणी नगरसेवक आणि शाखाप्रमुखही फुटला नव्हता. कोणीही जाहीरपणे भुजबळांचे समर्थन केले नव्हते. त्यावेळेस मी ठाण्यात राहायला होतो. भुजबळ फुटल्यानंतर दोन दिवसांनी सकाळी शाळेत जाताना स्थानिक शिवसैनिकांकडून रस्त्यावर काही पोस्टर लावली होती ती अजूनही आठवतात. एका पोस्टरमध्ये उल्लेख होता- मोराचे पीस लावले म्हणून कावळा मोर बनत नाही आणि दुसर्‍या पोस्टरमध्ये उल्लेख होता- ज्या पानात खाल्ले त्याच पानात.... एकंदरीतच एकूण शिवसैनिकांची त्यावेळी भुजबळांविरोधात अगदी तिखट प्रतिक्रिया होती.

२००५ मध्ये नारायण राणे आणि नंतर राज ठाकरे फुटले तेव्हा शिवसैनिकांची प्रतिक्रिया तिखट होती पण १९९१ मध्ये भुजबळ फुटले तेव्हा होती तितकी तिखट नव्हती. जास्त करून सामनामधून नारायण राणेंविरोधात गटारगंगा वाहात होती पण भुजबळांविरोधात जशी रस्त्यावर प्रतिक्रिया होती तितक्या प्रमाणावर प्रतिक्रिया राणेंविरोधात नव्हती. काही प्रमाणात नारायण राणेंचे 'राणे एकच अंगार बाकी सब भंगार' वगैरे समर्थनही झाले होते. भुजबळांचे जाहिर समर्थन करायची हिंमतच कोणाची नव्हती तशी परिस्थिती नारायण राणे बाहेर पडले तेव्हा नव्हती. बहुतेक १९९१ ते २००५ या काळात बाळ ठाकरे अधिक वृध्द झाले होते आणि एकूणच शिवसेनेची जुनी धार कमी झाली होती हे कारण असू शकेल.

यावेळेस मात्र अगदी रस्त्यावर एकनाथ शिंदेंचे समर्थन चालू झाले आहे. ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये पुढील प्रकारची पोस्टरही लागली आहेत
picture

या पोस्टरमध्ये केवळ बाळ ठाकरे आणि आनंद दिघे यांची चित्रे आहेत. उध्दव ठाकरे आणि आदूबाळ यांचा उल्लेखही नाही हे विशेष.

पूर्वी भुजबळ आणि राणे फुटले तेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर आमदार फुटलेले नव्हते. पण यावेळी मात्र पक्षाचे अगदी दोन-तृतीयांश आमदार बरोबर घेऊन आपला गट म्हणजेच खरी शिवसेना हा दावा करायची संधी एकनाथ शिंदेंना मिळत आहे.

*: शिवसेनेच्या ५२ पैकी भुजबळांसह सुरवातीला १८ आमदार फुटले होते. पण त्यानंतर ६ आमदार स्वगृही परतले. तेव्हा पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत भुजबळ आणि इतर ११ आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी शिवसेनेने केली होती. पण विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरींनी निर्णय दिला की शिवसेनेच्या ५२ पैकी सुरवातीला १८ आमदार फुटले आणि या १८ आमदारांच्या गटापैकी ६ आमदार परत फुटले आणि शिवसेनेत परत गेले आणि कोणाचेच सदस्यत्व रद्द केले नाही.

श्रीगुरुजी's picture

23 Jun 2022 - 10:28 am | श्रीगुरुजी

जास्त करून सामनामधून नारायण राणेंविरोधात गटारगंगा वाहात होती

त्यावेळी सामनातून राणेंविरोधात जितकं घाणेरडं लिहिलं होतं तितकं घाण लेखन मी त्यापूर्वी किंवा त्यानंतर कधीही वाचले नाही.

राणेंविरूद्ध अत्यंत घाण लिहून व पोटनिवडणुकीत स्वतः बाळ ठाकरेंनी राणेंविरोधात राणेंच्या मतदारसंघात सभा घेऊनही सेनेच्या परशुराम उपरकरांविरूद्ध राणे ८५,००० हून अधिक मताधिक्याने जिंकले होते.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jun 2022 - 11:18 am | अमरेंद्र बाहुबली

हरणं जिंकणं चालूच असतं. आता पहाना सातारा ह्या सेनेच्या मतदारसंघातील जागा बळकावून भाजपने ऊदयनराजेंना ऊभे केले साक्षात मोदी येऊनही पराभव पहावा लागला.

बारामतीच्या काकांनी राउतांचा खूपच छान वापर करून घेतला.
इतका की ते त्यांना अजूनही समजत नाहिय्ये.
ज्या दिवशी समजेल तोवर वेळ निघून गेलेली असेल.

क्लिंटन's picture

23 Jun 2022 - 11:14 am | क्लिंटन

बारामतीच्या काकांनी राउतांचा खूपच छान वापर करून घेतला.

हे सगळ्या दुनियेला उघड उघड दिसत आहे. फक्त स्वतः राऊत, ठाकरे आणि त्यांचे समर्थक यांनाच ते दिसत नाहीये. महाभकास आघाडी सरकारची अर्धी कारकिर्द संपली तरी त्यांचा अजूनही १०५ ना घरी बसविले, १०६ ना घरी बसविले हाच घोषा चालू आहे. मागे म्हटल्याप्रमाणे शिवसेनेच्या सत्तेतून चार आण्याचा फायदा व्हायचीही सुतराम शक्यता नसलेले लोकही अजून १०५-१०६ चाच जप करत आहेत. त्यांचा असा अ‍ॅटिट्यूड असेल तर मग शिवसेनेच्या सत्तेचा फायदा ज्यांना होत आहे ते आणि त्यापेक्षाही जास्त स्वतः सत्तेत असलेले लोक किती अ‍ॅटिट्यूड दाखवत असतील. अशा अ‍ॅटिट्यूडची नशा डोक्यात चढली की समोर दिसत असलेल्या अगदी स्पष्ट असलेल्या गोष्टीही त्यांना दिसणे बंद होते.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jun 2022 - 11:19 am | अमरेंद्र बाहुबली

चांगलंय की. महाराष्ट्राच्या हितासाठी राऊत पवार एकत्र आले नाहीतर सर्व कार्यालये गुजरातला हलवले असते.

विजुभाऊ's picture

23 Jun 2022 - 10:43 am | विजुभाऊ

एक प्रश्न मनात येतोय.
इथे उल्लेखले आहे तसे जर शिंदींची सेना ही अधिकृत सेना मानली गेली तर सम्जय राउत याम्च्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचे काय होईल?
ते अपक्ष असतील की शिवसेनेचे

क्लिंटन's picture

23 Jun 2022 - 10:46 am | क्लिंटन

शिंदेंची सेना अधिकृत सेना मानली तर मग ठाकरेंच्या सेनेसाठी शिवसेना(टी) वगैरे काहीतरी बिरूद लागेल आणि त्या गटाचे खासदार म्हणून संजय राऊत वावरतील.

रात्रीचे चांदणे's picture

23 Jun 2022 - 10:45 am | रात्रीचे चांदणे

55 पैकी १०-१५ आमदार फुटणे एकवेळ समजू शकतो परंतु एकाच वेळी ४० च्या आसपास आमदार फुटणे तेही सत्ताधारी पक्षातून आणि तेही सत्ताधार्यांना माहिती न होता हे न समाजण्यापालिकडचे आहे. ह्यात अब्दुल सत्तार, बचू कडू सारखे आमदार हे केवळ आणि केवळ सेने मुळेच मंत्री झालेत हे पण आहेत. ह्यात ED मुळे फुटले असतील हे जितकं खोटं वाटतय तितकंच निधी मिळत नव्हता म्हणून फुटले असतील हे पण खरं वाटत नाही.

सुबोध खरे's picture

23 Jun 2022 - 10:49 am | सुबोध खरे

पस्तीस चाळीस आमदार फुटून सुरत ला जातात एवढे होऊन सुद्धा गृह खात्याला त्याची साधी कुणकुण सुद्धा लागली नाही याबद्दल श्री शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

साहेब काहीही करू शकतात (धृपद)

पण हे कसे समजले नाही ( अर्थात पहाटे शपथविधीसाठी आपला पुतण्या जातो हेही त्यांना समजले नव्हते)

पण साहेब काहीही करू शकतात (धृपद)

त्यावर गृह खात्याकडून असे उत्तर आले आहे कि हि गोष्ट गेले ६ महिने चालू होती आणि त्याबद्दल चार पाच वेळेस मुख्यमंत्र्यांना कळवले होते आणि एकदा विस्तृत अहवाल पाठवला होता परंतु मुख्यमंत्र्यानी त्याकडे दुर्लक्ष केले.

गृह खाते राष्ट्रवादी कडे आहे आणि पहिले गृहमंत्री तुरुंगात आहेत पण दुसरे सुद्धा श्री दिलीप वळसे पाटील हेही राष्ट्रवादीचेच आहेत. पण साहेबाना काहीच माहिती नव्हती. आमदार आणि मंत्र्यांना हत्यारी पोलिसांची सुरक्षा असते आणि तरी सुद्धा गृह खात्याला काहीच समजले नाही?

साहेब काहीही करू शकतात (धृपद)

कर्नलतपस्वी's picture

23 Jun 2022 - 11:00 am | कर्नलतपस्वी

अग्निपथ या धाग्यावर झालेल्या राड्याने वाईट वाटले.

राजकारण कळत नाही,राजकारण करत नाही.

"चंसुकु" याच्या "ताज्या घडामोडी" वाचतोय. वाचकांची राजकारणातील समज उत्तर प्रतीउत्तर वाचताना पदोपदी जाणवत आहे. भाषेवरील संयम व प्रतिसादाची मांडणीवरून ते किती अपडेटेड आहेत ते कळते. विषयाची खोलवर माहीती आसल्यामुळेच कुठेही तोल जाताना व अतार्किक दिसत नाही.

लिहीत रहा जमल्यास काही शिकण्याचा प्रयत्न करतो. अर्थात खुप उशीर झालाय पण ज्ञानवर्धन व मनोरंजन दोन्ही उद्देश सफल होतायत.

साधोवाली,फाजिल्का,हुसैनिवाला सीमेवरील पाकिस्तानी रेजंर्स व भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची आठवण आली.

sunil kachure's picture

23 Jun 2022 - 11:05 am | sunil kachure

सत्ता आहे मंत्री पद आहे तरी बंड ?
का?
ते पण मोठ्या संख्येने?
ते पण कट्टर शिव सैनिक असणाऱ्या नेत्याचे?
हे पचायला अवघड जात आहे.
मागणी काय तर आघाडी सोडा आणि bjp ल पाठिंबा ध्या.
उद्या उद्धव नी ही मागणी मान्य केली
कार्यकर्त्यांना आघडि नको.
माझा नाईलाज आहे म्हणून मागणी मान्य केली तर.

हा डाव पण असू शकतो.
पण एकट्या सेनेचा नाही राष्ट्रवादी चा पण .
सेनेला बरोबर घेवून मत मागणे राष्ट्रवादी साठी पण कठीण आहे आणि सेने साठी पण काँग्रेस लं बरोबर घेवून

हिंदुत्व आणि सर्वधर्म समभाव .
असा फरक आहे ना

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Jun 2022 - 11:23 am | माईसाहेब कुरसूंदीकर

सेनेच्या एकूण आमदारांपैकी २/३ आम्दारांना उद्धव नको आहेत.त्यांनी दोन पक्षांबरोबर केलेली युती आवडलेली नाही. त्यांनी २.५ वर्षे वाट पाहिली पण बदल झाला नाही. निवडणूका येतील तेव्हा सेनेच्या आमदारांनी कुठल्या तोंडाने मतदारांना सामोरे जायचे ?"तुम्हाला मत देण्यापेक्षा काँग्रेस्/राष्ट्रवादीला मत का नाही द्यायचे? कारण तुमची युती आहे" असा प्रश्न मतदार विचारणार ना ?
शिवसेनेच्या आमदारांना जी मते मिळाली होती त्यात त्यांची स्व्तःची काही(), काही भाजपाच्या समर्थकांची तर काही मते 'राष्ट्रवादी/काँग्रेस नको म्हणून तुम्हाला मत " म्हणणार्यांची. आता भविष्यात भाजपा समर्थकांची मते मिळणार नाहीत. शिवाय 'काँग्रेस नको' म्हणणार्यांचीही मते मिळणार नाहीत.कारण ते लोक कदाचित भाजपाला मत देतील.
म्हणजे सेनेची एकूणच मते कमी होणार.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jun 2022 - 11:33 am | अमरेंद्र बाहुबली

कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बरा ह्या ततव्नार सेनेने काॅग्रेस राष्ट्रवादी सोबत युती केली. पाच वर्षे “राज्नामा द्या“ म्हणून भाजपेयी सेनेला टोमणे मारायचे. सोनेनो राजिनामा दिला तर “हिंदूत्वा” शी गद्दारी केली बोलायचे. भाजप म्हणजे हिंदूत्व. व्वा.
भाजपने हिंदूंसाठी कधी काडीचे कार्य केले नाही. ऊलट प्रचंड महाग पेट्रोल डिझेल करून बहुसंख्य असलेल्या हिंदूंचेच कंबरडे मोडलेय. भाजपचे हिंदूत्व फक्त मते मागण्यासाठी असते. गोव्यात पर्रीकर बिफ कमी पडू देनार नाही म्हणतात पण युपीत भाजपेयी गोहत्याबंदीचा मागणी करतात. असा दुतोंड्या पक्ष जगात भाजप हा एकमेव असावा. त्यामुळे भाजपने स्वतला हिंदूत्ववादी म्हणणे सोडावे.

सुबोध खरे's picture

23 Jun 2022 - 11:37 am | सुबोध खरे

आमदार बाहेर पडण्याची काही मुख्य कारणे

१) आमदारांनाच कशाला मंत्र्यांना सुध्दा मुख्यमंत्र्यांशी संपर्कच करता येत नव्हता.

रात्री १० ते सकाळी ११ पर्यंत मुख्यमंत्र्यांचा फोन बंदच असे. याचे एक उदाहरण मी मागे मिपावर लिहिलेले आहे.( शोधकांनी शोध घ्यावा).

करोना काळात श्री राजेश टोपे हे ससून रुग्णालयात मध्ये गेलेले असताना त्यांना मुख्यमंत्र्यांशी काही तातडीचे बोलायचे होते. पण काही केल्या फोन लागतच नव्हता. म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाला फोन करून साहेबांशी तातडीने बोलायचं आहे म्हणून सांगितले. त्यानंतर तिकडून जे उत्तर आले ते ऐकून श्री टोपे यांचा चेहरा उतरला आणि ते ससून सोडून निघून गेले. हे तेथे प्रत्यक्ष हजर असलेल्या एका व्यक्ती ( जी माझ्याकडे रुग्ण म्हणून येते) ने मला स्वतः सांगितले.

हीच स्थिती आरोग्य खात्यातील अनेक वरिष्ठांनी करोना काळात तातडीचे निर्णय घेण्यासाठी संपर्क साधताना होणारी कुचंबणा आणि दिरंगाई बोलून दाखवलेली होती

२) मतदार संघासाठी निधी मिळत नव्हता. कारण अर्थ खाते राष्ट्रवादीकडे होते( अर्थ मंत्री जयंत पाटील).

श्री एकनाथ शिंदे याना सुध्दा मतदारसंघातील कामे करण्यासाठी निधी हवा होता त्यांना पैसे मिळत नसत पण शेजारच्या मतदारसंघात श्री आव्हाड यांना मात्र त्यांच्या मुंब्रा या मुस्लिम बहुल मतदारसंघासाठी निधीची कमतरता पडत नव्हती.
आपल्या मतदारांना सत्तेत मंत्री असून हि निधी मिळत नाही कामे रखडली आहेत हे समजावणे आमदार / मंत्र्यांना अधिकाधिक कठीण होत चाललेले होते.

शेवती उद्या तिकीट मिळाले तरी स्वतः काम केलेले नसले तर निवडून येणे अशक्य होते हे जुन्या मुरलेल्या नेत्यांना चांगले माहिती असते.

३) ज्या तर्हेने युतीचे राज्य चालले होते त्यात जर पुढच्या निवडणुकीत शिवसेनेची दोन्ही काँग्रेस बरोबर युती झाली तर मिळणाऱ्या जागा फारच कमी होतील आणि आपला पत्ता कट होणार हे बऱ्याच लोकांना समजत होते.

मग मतदार संघात काम करण्यासाठी पैसे नाहीत, अधिकार पद नाही, असले तरी त्यात अधिकार नाहीत आणि पुढच्या निवडणुकीत तिकीट मिळण्याची खात्री नाही. मग आमदार व्हायचेच कशाला? जनतेची सेवा वगैरे रिकाम्या खिशाने होत नाही.
सत्ता हातात असली तर खरी जनसेवा सुद्धा करणे जास्त सोपे असते हि सुद्धा वस्तुस्थिती आहे.

४) मूळ हिंदुत्वापासून शिवसेनेने घेतलेली फारकत हि अनेक आमदारांना अजिबात मान्य नव्हती.

शिवसेनेने पालघरच्या साधूंच्या हत्येबद्दल घेतलेले बोटचेपे धोरण किंवा अजान स्पर्धा भरवणे, मशिदीवरचे भोंगे उतरवण्याबाबत घेतलेली बोटचेपी भूमिका, जनाब औरंगजेब, टिपू सुलतान जयंती साजरी करणे या गोष्टी त्यांच्या मनात असलेल्या इतिहासाशी फारकत घेणाऱ्या होत्या.

५) मुळात युती हि शिवसेना आणि भाजपची होती आणि अनेक शिवसेनेच्या आमदारांच्या मतदार संघात त्यांच्या विजयासाठी भाजप आणि संघाचे स्वयंसेवक राबले त्यांनी स्वतः पाहिलेले होते. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलेला त्यांना आतून कुठे तरी टोचणी देत होता.

अशी अनेक कारणे आहेत

चौकस२१२'s picture

23 Jun 2022 - 12:23 pm | चौकस२१२

४, ५ येस
अगदी सहमत
भाजपनं सत्ता स्थापू नये नवी निवडणूतिची मागणी करावी पण ते कदाचित या ४० ना परवडणार नाही

युती असताना आणि फडणवीस मुख्यमंत्री असताना पण हीच तक्रार होती.
सेने च्या आमदार ना निधी मिळत नाही.
सेने च्या आमदार च्या मतदार संघातील योजने ना मंजुरी मिळत नाही.
पुढल्या निवडणुकीत तीन पक्षाशी युती म्हणजे सेनेच्या वाट्याला कमी जागा येणार
युती केली तर दोन च पक्ष जादा जागा मिळू शकतात.
म्हणून बंड.
हे कारण असू शकते.
मुख्यमंत्री उपलब्ध होत नाहीत हा आरोप आहे .
स्वतः मुख्यमंत्री आजारी होते,परत covid ची साथ होती
त्या मुळे भेट न होणे नॉर्मल आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jun 2022 - 1:04 pm | अमरेंद्र बाहुबली

मूळ हिंदुत्वापासून शिवसेनेने घेतलेली फारकत हि अनेक आमदारांना अजिबात मान्य नव्हती. खिक्क. भाजपशा फारकत म्हणजे हिंदूत्वाशी फारकत. कैच्या कै डाक्टर. मूळ हिंदूत्व ख्या ख्या ख्या.

sunil kachure's picture

23 Jun 2022 - 1:17 pm | sunil kachure

Bjp सारखा महा स्वार्थी पक्ष जेव्हा स्वतःला हिंदुत्व वादी म्हणतो त्या पेक्षा मोठा जोक नाही.
राम मंदिर बांधले की हिंदू हीत होत नाही.
Bjp चे राज्य देशात आल्यावर च हिंदू कमजोर झाला हे सत्य आहे.
Bjp ल हिंदुत्व शी काही देणे घेणे नाही.
उद्योगपती आणि हे स्वतः मिळून देश लुटणे आणि लोकांना भावनिक प्रश्न मध्ये गुंतवणे हेच ह्यांचे अंतिम उद्दिष्ट आहे

क्लिंटन's picture

23 Jun 2022 - 11:39 am | क्लिंटन

तुम्ही परत निवडून येऊन दाखवाच असे आव्हान संजय राऊतांनी एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना दिले आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shivsena-leader-san...

संजय राऊत म्हणजे नक्की काय चीज आहे हे या एका आव्हानावरून समजून येईल. स्वतः संजय राऊत एकदाही कसलीही निवडणुक लढलेले नाहीत. कधीही लोकांपुढे स्वतःसाठी मते मागायला गेलेले नाहीत. नुसत्या हवेतल्या फुशारक्या मारून उंटावरून शेळ्या हाकणे आणि सामनामधून एक तर अर्वाच्य शिव्या देणे किंवा मोठेमोठे दावे करणे यापलीकडे त्यांनी काहीही केलेले नाही. त्याउलट एकनाथ शिंदे १९९७ मध्ये पहिल्यांदा ठाणे महापालिकेत नगरसेवक बनले होते. त्यानंतर २००२ मध्येही ते परत ठाणे महापालिका निवडणुक जिंकले. २००४ ते २०१९ या चार विधानसभा निवडणुक जिंकले. २०१७ मध्ये महापालिका निवडणुकांमध्ये ठाणे वगळता इतर कुठेही शिवसेनेला एकहाती बहुमत मिळाले नव्हते ते एकनाथ शिंदेंनी मिळवून दिले. अशा जमिनीवरील नेत्याला कोण आव्हान देत आहे तर संजय राऊत. आहे की नाही मज्जा?

sunil kachure's picture

23 Jun 2022 - 1:20 pm | sunil kachure

खरेच बंड खोरी झाली असेल
हे राजकीय नाट्य नसेल तर.

बंडखोर लोकांना bjp मध्ये प्रवेश करणे हा एकमेव पर्याय आहे.
संजय राऊत योग्य बोलत आहेत.
बंडखोर स्वतःचे वेगळे अस्तित्व राखून निवडणुका जिंकू शकतं नाहीत.
हे सत्य आहे.

sunil kachure's picture

23 Jun 2022 - 1:21 pm | sunil kachure

खरेच बंड खोरी झाली असेल
हे राजकीय नाट्य नसेल तर.

बंडखोर लोकांना bjp मध्ये प्रवेश करणे हा एकमेव पर्याय आहे.
संजय राऊत योग्य बोलत आहेत.
बंडखोर स्वतःचे वेगळे अस्तित्व राखून निवडणुका जिंकू शकतं नाहीत.
हे सत्य आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jun 2022 - 12:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकनाथ शिंदेगटाला आठ कॅबिनेट मंत्रीपदं आणि पाच राज्यमंत्रीपदाची ऑफरच्या बातम्या धडकत आहेत त्याचबरोबर केंद्रात दोन पदंही दिली जाणार आहेत.

लोकसत्ताचा अग्रलेख 'सत्ताकारणाची 'बद' सुरत'

-दिलीप बिरुटे

Trump's picture

23 Jun 2022 - 1:25 pm | Trump

जुना धागा:
शिवसेनेचे हे काय चाललय: https://www.misalpav.com/node/47483
--
प्रत्येकाने आपाआपले आखाडे पारखुन घ्यावेत.

1)देशाचे सरकार आपल्याच राज्यात भेद भाव करत आहे.२) देशाचे सरकार आपल्याच देशातील राज्यांना कमजोर करत आहे.आपल्याच देशातील राज्य सरकार अडचणीत यावीत म्हणून ताकत लावत आहे.
आपल्याच राज्यांचा विकास रोखत आहे.
३) देशाचे सरकार देशातील आपल्याच राज्यातील स्थिती बिघडली जावी म्हणून केंद्रीय एजन्सी वापरत आहे.
४) देशाचे सरकार आपल्याच देशातील लोकात भेदभाव करत आहे काही घटकांची प्रगती,त्यांचे हक्क नाकारले जात आहेत
५) देशाचे सरकार गुंड टोळ्या सारखे आपल्याच देशातील आपल्याच राज्यातील आमदार चे अपहरण करत आहे सरकारी यंत्रणा वापरून.

हे कोणते देश प्रेम आहे.
हे असले देश प्रेम आणि राष्ट्र निष्ठा फक्त भारतात च असावी .
पाकिस्तान सरकार पण आपल्याच राज्या ना कमजोर करत नाही.

वेगळा गट करणार्या आमदारांचे हे पत्र पाहता,शिवसेनेतील अंतर्गत खदखद बर्याच काळापासून होती हे स्पष्ट होतेय,दुर्लक्षाचा धडा हे उदाहरण आता राजकारणात ओळखलं जाईल.
https://www.tv9marathi.com/politics/rebel-shiv-sena-mla-sanjay-shirsats-...

वेगळा गट करणार्या आमदारांचे हे पत्र पाहता,शिवसेनेतील अंतर्गत खदखद बर्याच काळापासून होती हे स्पष्ट होतेय,दुर्लक्षाचा धडा हे उदाहरण आता राजकारणात ओळखलं जाईल.
https://www.tv9marathi.com/politics/rebel-shiv-sena-mla-sanjay-shirsats-...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Jun 2022 - 2:08 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

तशी खदखद असल्याशिवाय एवढ्या संख्येने आमदार शिंदे ह्यांच्या बाजूने जाणार नाहीत. भाजपा/ई.डी वगैरे गौण मुद्दे आहेत.भविष्यात होणार्या निवडणूकांना सामोरे कसे जायचे हा त्यांचा मुख्य प्रश्न असणार. आमदार काही दुधखुळे नसतात. अनेकांना २०-२५ वर्षांचा अनुभव आहे. लोकांच्या तक्रारी असतील, निधी मिळत नसेल, कामे होत नसतील तर त्यांनी काय करायचे?

क्लिंटन's picture

23 Jun 2022 - 2:14 pm | क्लिंटन

२००३ मध्येच बाळ ठाकरेंना वयोमानानुसार पूर्वीइतकी धावपळ करणे शक्य राहिले नाही आणि त्यांनी उध्दव ठाकरेंना शिवसेनेचे कार्याध्यक्ष केले. त्यानंतर हे सगळे प्रश्न अगदी प्रकर्षाने पुढे आले. उध्दव ठाकरे कितीही बढाया मारत असले तरी त्यांचा स्वभाव असाच तुसडा आहे. २००५ मध्ये राज ठाकरे बाहेर पडले तेव्हाही त्यांनी अगदी हीच खंत व्यक्त केली होती- माझे भांडण विठ्ठलाशी नाही तर त्याच्याभोवतीच्या बडव्यांशी आहे. या बडव्यांमध्ये एक प्रमुख नाव होते- संजय राऊत. राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांनी संजय राऊतांच्या गाडीवर हल्ला करून गाडीच्या काचाही फोडल्या होत्या.

उध्दव कार्याध्यक्ष झाल्यावर त्यांनी नारायण राणेंचेही महत्व कमी करायचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता. शिवसेनेत अगदी पहिल्या दिवसापासून असलेले ठाण्याचे सतीश प्रधान आणि पार्ल्याचे रमेश प्रभू हे सुध्दा नेमके उध्दव कार्याध्यक्ष झाल्यावर का बाहेर पडले?

सुधीर जोशी हे शिवसेनेचे तळमळीचे कार्यकर्ते होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले त्यापूर्वी त्यांचे नाव किमान २० वर्षे बातम्यांमध्ये येणेच बंद झाले होते. शिवसेनेच्या बैठकांनाही त्यांना बोलावले जायचे की नाही काय माहित. शिवसेना आपण मराठी माणसांना नोकर्‍या मिळवून दिल्या या ज्या टिमक्या मारत असते ते काम सुधीर जोशींच्या स्थानिय लोकाधिकार समितीने केले होते. एका माजी मंत्र्याचे निधन झाल्यावर त्यांना विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांमध्ये नियमाप्रमाणे श्रध्दांजली वाहायची असते तशी श्रध्दांजली सुधीरभाऊंना द्यायला हवी याकडेही मुख्यमंत्री कार्यालयाचे दुर्लक्ष झाले होते असे वाचल्यासारखे आठवते.

पूर्वी सक्रीय असलेले रामदास कदम, दिवाकर रावते वगैरे नेते अडगळीतच टाकले आहेत ना? आता शिवसेनेत नेते कोण आहेत? तर संजय राऊत, वरूण सरदेसाई, आदित्य ठाकरे वगैरे. ज्यांनी कधीच लोकांमध्ये जाऊन संघटना बांधायचे काम कधीच केलेले नाही. फक्त उध्दव ठाकरेंच्या मर्जीतले किंवा नात्यातले हे एक क्वालिफिकेशन.

एकूणच काय बाळ ठाकरेंनी अनेक वर्षे एकेक माणसे वेचून संघटना उभी केली पण पुत्रमोहामुळे त्यांनी उध्दव या तुसड्या माणसाकडे संघटनेची सुत्रे दिली. तसेही उध्दवला राजकारणात कधीच रस नव्हता. त्याला फोटोग्राफीत रस होता. मग करू द्यायची ना फोटोग्राफी. तसा उध्दवचा जयदेव हा एक भाऊ आहे. त्याचे कधी राजकारणात नाव असते का? तसेच उद्धवलाही करता आले असते की. राज ठाकरेंनी शिवसेना कशी सांभाळली असती हा जर-तरचा मुद्दा झाला आणि जर-तरला विशेष अर्थ नसतो. पण राज उध्दवइतका तुसडा नसावा असे वरकरणी तरी वाटते. निदान राज्यसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कोणीकोणी आमच्याशी 'दगाबाजी' केली असे जाहीरपणे बोलून त्या आमदारांना दुखावणार्‍या संजय राऊतसारख्याला तरी त्याने इतके पुढे येऊ दिले नसते असे वाटते.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jun 2022 - 2:41 pm | अमरेंद्र बाहुबली

सेना ऊध्दव ठाकरेंना ऊत्तमरीत्या सांभाळलीय. पाच वर्षे शिवसेनेची अवहेलना करनार्या भाजपला राऊतांनी चांगला धडा शिकवून १०५ घरी बसवले. तुमची ही खदखद त्या रागातून आलीय.

सेना ऊध्दव ठाकरेंना ऊत्तमरीत्या सांभाळलीय. पाच वर्षे शिवसेनेची अवहेलना करनार्या भाजपला राऊतांनी चांगला धडा शिकवून १०५ घरी बसवले. तुमची ही खदखद त्या रागातून आलीय.

महाराष्ट्र वाचवला हे राहिले.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jun 2022 - 3:04 pm | अमरेंद्र बाहुबली

तो मोदींच्या गुरूंनी वाचवलाय :)

sunil kachure's picture

23 Jun 2022 - 3:06 pm | sunil kachure

भारतात राहतं असाल तर काहीच दिवसात नळा नी पाणी येणे बंद होईल .
अजून पावूस नाही..
शिंदे,मोदी ,शाह घरात पाणी भरून देणार नाहीत.
त्याची काळजी करा.

Trump's picture

23 Jun 2022 - 3:11 pm | Trump

भारतात राहतं असाल तर काहीच दिवसात नळा नी पाणी येणे बंद होईल .

बरोबर. माविआ घेउन येईल पाणी ते.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Jun 2022 - 3:09 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

अदानी-अंबानीनी देश ताब्यात घेतलाय असे सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या होत्या. गेल्या आठवड्यात बारामतीला एका समारंभाला गौतम अदानीना शरद पवारांनी आमंत्रण दिले होते. सुळे कुटुंबियान्कडे अदानींचे/रिलायन्सचेच १/२ लाख शेयर्स आहेत असे नंतर प्रसिद्ध झाले होते.

सुळे कुटुंबियान्कडे अदानींचे/रिलायन्सचेच १/२ लाख शेयर्स आहेत

माई

इथे असं काही लिहायचं नाही.

इथल्याच काही उच्च पदस्थांचा पापड मोडेल

आग्या१९९०'s picture

23 Jun 2022 - 9:20 pm | आग्या१९९०

ह्या कंपन्यांचे शेअर सुळे आणि पवार ह्यांनी का घेऊ नये? मी सुद्धा अडाणी आणि अंबानींच्या विरोधात असून त्या कंपन्यांचे शेअर घेतो विकतो. काय चुकीचे आहे?

कंजूस's picture

23 Jun 2022 - 11:29 pm | कंजूस

वायलं. वायलं.

वेगळा गट करणार्या आमदारांचे हे पत्र पाहता,शिवसेनेतील अंतर्गत खदखद बर्याच काळापासून होती हे स्पष्ट होतेय,दुर्लक्षाचा धडा हे उदाहरण आता राजकारणात ओळखलं जाईल

अगदी अगदी,
एवढा निष्क्रिय कारभार करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच बघितला नसेल. जनतेच्या मनात असलेली खदखद त्यांच्याच पक्षात असलेल्या आमदारांच्या पत्रातून बाहेर पडते आहे.
जी लोकं आपल्या पक्षात रात्रंदिवस झटणाऱ्या कर्यकत्यांसोबत उभी राहू शकत नाहीत ते जनतेसाठी काय ऊभे राहतील.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jun 2022 - 2:54 pm | अमरेंद्र बाहुबली

Video : कंठ दाटला...उरंही भरून आला...'वर्षा'चा कर्मचारी मुख्यमंत्र्यांसमोर हात जोडून उभा राहिला

https://zeenews.india.com/marathi/maharashtra/employee-of-varsha-bunglow...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Jun 2022 - 3:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

दक्षिणेत विशेष करून तामिळनाडूत ही अशी रडण्याची पद्धत आहे. करूणानिधी ह्यांनी सरकारी निवास्स्थान सोडले तेव्हा बागेत काम करणारा माळी दोन दिवस जेवला नव्हता अशी बातमी होती.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jun 2022 - 3:09 pm | अमरेंद्र बाहुबली

चांगला नेता असेल तर जनतेच्या डोळ्यात पाणी येतेच.

माई त्या साठी राज्यावर अतोनात प्रेम असावे लागते.
दक्षिण मधील प्रतेक राज्यातील लोक त्यांच्या राज्यावर खूप प्रेम करतात..
महाराष्ट्र मधील नालायक लोकांना स्वतःच्या राज्यावर प्रेम नाही ..हे पण त्यांना समजत नाहीत आपले अस्तित्व च आपल्या राज्यावर अवलंबून आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jun 2022 - 3:11 pm | अमरेंद्र बाहुबली

+१ महाराष्ट्रातील काही नेते मुंबईतील कार्यालये अहमदाबादला हलवायला मदत करतात.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Jun 2022 - 4:49 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

'जाणते राजे' अहमदाबादच्या 'मराठी द्वेष्ट्या'उद्योगपतींना आमंत्रण का देतात?
गौतम अदानींना मुंबई विमानतळावर रिसिव्ह करायला रोहित पवार गेले होते. गाडी चालवत. एवढी हुजरेगिरी?
https://www.jansatta.com/business/gautam-adani-reached-baramati-pawar-ne...

adani
https://www.hindustantimes.com/cities/pune-news/bizman-gautam-adani-atte...

अडानी मेरे अच्छे दोस्त: इससे पहले मई की शुरुआत में शरद पवार ने जैन अंतरराष्ट्रीय व्यापारिक संगठन (JITO) में कारोबारी गौतम अडानी की प्रशंसा की थी। उन्होंने कहा था कि गौतम अडानी मेरे अच्छे दोस्त हैं उन्होंने शून्य से शुरुआत की थी। पहले केवल टाटा और बिड़ला का नाम अमीर लोगों में शामिल होता था, लेकिन अब एक जैन व्यक्ति देश का सबसे अमीर कारोबारियों में से एक बन गया है और वह गौतम अडानी है।

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Jun 2022 - 4:20 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"महाराष्ट्र मधील नालायक लोकांना स्वतःच्या राज्यावर प्रेम नाही"
राज्यावर आहे पण राज्यातील नेत्यांवर नाही असे म्हणा.
करूणानिधी असोत वा जयललिता वा एन टी रामाराव, त्यांचे पक्ष आपल्या राजकीय भूमिकांशी ते शेवट्पर्यंत ठाम असत. शिवसेना/मनसे/राष्ट्रवादी आपल्या राजकीयभूमिकांशी कधीही प्रामाणिक राहिले नाहीत.कम्युनिस्टांना संपवायला कधी काँग्रेसकडुन सुपारी घे.. हिंदुत्वाचे वारे वहायला लागले की जा अयोध्येला, काढ मशीदीवरील भोंगे.. मोदी/शहांना औरंगझेब म्हण तर कधी दिल्लीला जाउन त्यांची भेट घेऊन गुणगान गा ..ह्या अशा १८० कोनातल्या भूमिकांमुळे अनेक मतदार त्यांच्यापासुन दुरावले.
वाय एस आर कोंग्रेस्/द्रमुक्/टी.आर एस च्या नेत्यांना कधी अयोध्या/मशीदीवर बोलताना पाहिलेय ? मोदी/शहांवर गलिच्छ टीका करताना ऐकलय?
ह्या तिन्ही पक्षांचे नेते नालायक आहेत म्हणून ही अशी अवस्था झाली.

श्रीगुरुजी's picture

23 Jun 2022 - 4:59 pm | श्रीगुरुजी

बरोबर लिहिलंय माई. ना सेना कधी मराठीवादी होती ना कधी हिंदुत्ववादी होती. कायम दुसऱ्या पक्षांच्या मदतीने सत्ता मिळविणे व आम्हीच स्वबळावर सत्ता मिळविली अशा फुशारक्या मारणे एवढंच यांनी आजवर केलंय. कधी मुस्लिम लीगशी युती कधी कॉंग्रेसशी कधी भाजपशी कधी राष्ट्रवादीशी कधी शेकापशी . . . . कायमच दुसऱ्याने केलेली शिकार पळविणे किंवा दुसऱ्याने अर्धवट खाऊन सोडलेली शिकार पळवून पोट भरणे हीच यांची मर्दुमकी. पण आम्हीच झडप घालून शिकार केली या फुशारक्या मोठ्या तोंडाने सांगणार.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jun 2022 - 3:10 pm | अमरेंद्र बाहुबली

चांगला नेता असेल तर जनतेच्या डोळ्यात पाणी येतेच.

तुमचे एकंदरीत इथले प्रतिसाद बघून हसावे की रडावे हेच कळत नाही.

किंबहुना हसायलाच पाहिजे, बाकी सध्या रडण्याचा कोटा आता मामु आणि उरलेल्या २/४ मावळ्याकडे(? त्यांनाही कधीही पंख फुटू शकतात ) उरला आहे

sunil kachure's picture

23 Jun 2022 - 3:37 pm | sunil kachure

संपादित

व्यक्तिगत रोख टाळावा.

-मिपा व्यवस्थापन

जरा सांभाळून प्रतिक्रिया द्या हो...
बाकी तोंडाचा हाताचा संबंध नव्हताच...
कुठल्या आयडी न प्रतिक्रिया देताय ते तर नीट बघून प्रतिक्रिया द्या....

नाही तसही हसू होतंच आहे, त्यात आयडी ची अदलाबदल म्हणाल्यावर अंमळ जास्तच हसू येतंय

sunil kachure's picture

23 Jun 2022 - 3:37 pm | sunil kachure

संपादित

व्यक्तिगत रोख टाळावा.

-मिपा व्यवस्थापन

सुबोध खरे's picture

23 Jun 2022 - 8:06 pm | सुबोध खरे

मेंदूच्या दोन भागांचा एकमेकांशी समन्वय नसला कि आईन्स्टाईनला पण सफरचंद पडल्यावर ज्ञान येते.

क्लिंटन's picture

23 Jun 2022 - 5:49 pm | क्लिंटन

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निर्माण होणार्‍या तांत्रिकतेविषयी थोडे लिहितो. त्यांच्याकडे दोन-तृतीयांश आमदार आहेत की नाही या प्रश्नालाच बायपास करता येईल अशी एक गोष्ट त्यांच्याकडे आहे आणि ती म्हणजे शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांचे गटनेते पद.

एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून काढून त्यांच्या जागेवर अजय चौधरींची नियुक्ती करण्याच्या निर्णयावर १७ आमदारांच्याच सह्या होत्या. तर त्याविरोधात शिवसेनेच्या अर्ध्याहून जास्त आमदारांच्या सह्या असलेले पत्र विधानसभा उपाध्यक्षांकडे पाठवले गेले असेल तर शिंदेंना गटनेतेपदावरून काढायच्या पत्रावर उपाध्यक्षांना एकनाथ शिंदेंच्या विरोधात निर्णय घेणे नियमानुसार घेता येणे कठीण आहे. आणि तसा निर्णय घेतल्यास तो न्यायालयात टिकेल याची शक्यता कमी.

त्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपल्या गटातल्या भारत गोगावले यांची विधीमंडळ पक्षाच्या प्रतोदपदावर नियुक्ती केली. त्यामुळे आता पक्षाचा प्रतोद नक्की कोण? ठाकरे गटातील सुनील प्रभू की शिंदे गटातील भारत गोगावले? हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण विधानसभेत होणार्‍या कोणत्याही मतदानात जो पक्षादेश (व्हिप) काढला जातो तो या प्रतोदाकडून काढला जातो आणि तसा पक्षादेश काढायचा अधिकार प्रतोदालाच असतो. तसेच अमुक अमुक आमदार हा आमच्या विधीमंडळ पक्षाचा प्रतोद असेल हे विधीमंडळ पक्षाच्या नेत्याने पत्र लिहून विधानसभा अध्यक्षांना कळवायचे असते. तेव्हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा की प्रतोद नक्की कोण? सुनील प्रभू की भारत गोगावले? जर अजूनही एकनाथ शिंदेच गटनेते असतील आणि त्यांनी भारत गोगावलेंची नियुक्ती प्रतोद पदावर केली असेल तर गोगावले हेच प्रतोद असायला हवेत असे मला वाटते. अर्थात हे प्रकरणही न्यायालयात जाऊ शकेल.

त्यापुढचा मुद्दा म्हणजे समजा एकनाथ शिंदे यांनी आपला वेगळा गट स्थापन केल्याचे पत्र विधानसभा उपाध्यक्षांना दिलेच नाही तर विधानसभा उपाध्यक्षांनाही पक्षांतरबंदी कायद्याखाली कोणालाही अपात्र ठरवता येणार नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेत राहून एकनाथ शिंदे आपल्या प्रतोदाकरवी विधानसभेत होणार्‍या मतदानात सरकारविरोधात मत द्यायचा पक्षादेश काढू शकतील. अशा परिस्थितीत समजा फडणवीसांनी सरकारवर अविश्वास ठराव आणला तर मग ठाकरे सरकारविरोधात मत न देणार्‍या शिवसेना आमदारांचे विधानसभा सदस्यत्व पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे रद्द होऊ शकेल का? समजा एकनाथ शिंदे गटाचे सदस्यत्व रद्द करा अशी मागणी विधानसभा उपाध्यक्षाकडे ठाकरेंना करायची असेल तर ती करावी लागेल विधीमंडळ पक्षाच्या गटनेत्याकरवी- म्हणजे परत एकनाथ शिंदेंकरवीच. अर्थातच ते शक्य नाही. त्याउलट तांत्रिकदृष्ट्या एकनाथ शिंदेच गटनेते असतील तर ते ठाकरेंच्या बाजूने मतदान करणार्‍या आमदारांचे सदस्यत्व रद्द करायचे पत्र ते देऊ शकतील.

त्यामुळे विधानसभा उपाध्यक्षांना काही चावटपणा करायचा असेल तर त्यावरही एकनाथ शिंदे पूर्णपणे नियमात बसून मार्ग काढू शकतील. या तांत्रिकतेला आणि नियमांना खूप महत्व असते. याविषयीची एक आठवण लिहितो. १९९७ मध्ये उत्तर प्रदेशात कल्याणसिंग यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर (ज्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस आमदारांनी मारामारी केली आणि ध्वनीक्षेपकांची फेकाफेक केली होती तोच कुप्रसिध्द विश्वासदर्शक ठराव) बहुजन समाज पक्षाच्या ६७ पैकी २० च्या आसपास (१/३ पेक्षा कमी) आमदारांनी कल्याणसिंगांच्या सरकारच्या बाजूने मतदान केले होते. तेव्हा मायावतींनी विधानसभा अध्यक्ष केसरीनाथ त्रिपाठींना पत्र लिहून या आमदारांचे सदस्यत्व पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे रद्द करावे ही मागणी केली. त्यावेळी मायावतींनी आपल्या आमदारांना कल्याणसिंगांच्या सरकारविरोधात मत द्यावे असा पक्षादेश जारी केला होता. पण यात एक गोम अशी होती की मायावती विधीमंडळ पक्षाच्या नेत्या असतील हे पत्र राज्यपालांकडे गेले होते (जेव्हा मायावतींनी मार्च १९९७ मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली) पण त्यानंतर मायावतींनी पत्र लिहून विधानसभा अध्यक्षांना आपल्या पक्षाचा कोण प्रतोद असेल हे कळवलेच नव्हते. त्यामुळे मायावतींनी तसा पक्षादेश जारी केला असला तरी त्यांना तो पक्षादेश जारी करायचा अधिकारच नव्हता (कारण तसे पत्र विधानसभा अध्यक्षांना पाठवलेले नव्हते) त्यामुळे त्यांचा पक्षादेश अवैध असल्याने त्याचे उल्लंघन व्हायचा प्रश्नच उभा राहत नाही असा निवाडा विधानसभा अध्यक्षांनी केला होता.

या सगळ्या तांत्रिकतेकडे ठाकरे-संजय राऊत यांचे लक्ष गेले आहे की नाही याची कल्पना नाही.

चौकस२१२'s picture

24 Jun 2022 - 5:21 am | चौकस२१२

क्लिंटन साहेब ,, माझा दुसरा धागा नागरिक शास्त्र धडा वाचलात का ? तांत्रिक दृष्ट्या जरी या गटाकडे संसदीय शिवसेना गेली तरी
मुख्य शिवसेना पक्ष त्यांच्या कडे अपपोआप कसा काय सुपूर्द होऊ शकतो? किंवा त्यांच्याकडे अगदी निवडणूक चिन्ह जे कि त्या पक्षाचं मालकीचे असणार
जर अश्या कोणाला संपूर्ण पक्षावर ( संसदीय + मुख्य ) ताबा मिलव्ययाचा असेल तर त्यानं तो त्या पक्षाच्या अंतरंगात पद्धती नुसार मिळवावा लागतो ? बरोबर का ?

मला तरी वाटते कि
१) ताणतरिक दृष्ट्या ४० आणि १५ असे दोन भाग च राहतील विधानसभेत
२) मग एकतर भाजपला संधी दिली जाईल
३) मध्यवर्दी निवडणूक
४) दूरची शक्यता ---- घरवापसी आणि बंडाळी विसर्जित ,

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jun 2022 - 8:18 pm | अमरेंद्र बाहुबली

बंडाचं सोंग यशस्वी झालंय. ठाकरेंची पुढची चाल असेल की भाजपेयींच्या आॅफर ता वाट पाहणे. सत्तेसाठी हपापलेले भाजपेयी मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात अर्धे मंत्रीपदं, केंद्रात दोनेक मंत्रीपदं, मुंबई पालिकेत भरमसाठ जागा असं सर्व सेनेला सोडतील. कारण २.५ वर्ष सेनेन दिलेला दणका लक्षात असेलच. ठाकरे आता वेट ॲंड वाॅच च्या भुमीकेत जानार, १५ दिवस तरी. राज्यपाल चा कोरोना संपेपर्यंत ठाकरे राजिनामा देनार नाहीत. सेनेचे सर्व आमदार गुवाहाटीत सेफ आहेत. शिंदेंच्या निगराणीत ऊरले सुरलेलेही ठाकरेंना मुंबईत भेटायला आले होते त्यांनाही पटकन गुवाहाटीत कवाना करणेयात आलेय. भाजपला रक्षणाची जबाबदारी दिली असावी :)
आता राष्ट्रपती निवडणूकीत सेना भाजप ऊमेदवाराला पाठींबा देईल नी मग लगेच युतीची चर्चा होईल. भाजप नेत्यांची मातोश्रावर रीघ लागेल. विनवन्या वर विनवन्या सुरू होतील मग ठाकरेंची कृपा झाली, त्यांना दया आली तर भाजपला राज्यात सत्ता मिळेल. पन ठाकरेंचा अंकूश सदा भाजपवर असेल. पहीले सारखा माजोरडे पणा भाजपला करता येनार नाही.

sunil kachure's picture

23 Jun 2022 - 8:30 pm | sunil kachure

Bjp sarkar राज्यात येणे हे राज्याच्या पण हिताचे नाही आणि राज्यातील लोकांच्या तर बिलकुल हिताचे नाही.
युतीत bjp आली तरी नेहमी दबावात राहिली पाहिजत

स्वतःचे ५६ आणि तुम्ही म्हणणार १०६ वर दबाव.. अरे बास कि नाटक ,,, घ्या निवडणूक आणि आना स्वतःचे १०५ + मग काय दबाव टाकायचा ते टाका

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Jun 2022 - 8:10 am | अमरेंद्र बाहुबली

१०५ सेनेमुळे आले. लढायचं होतं एकटं. का आले मातोश्रीवर युती करा म्हणून?

क्लिंटन's picture

23 Jun 2022 - 9:34 pm | क्लिंटन

शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे एकनाथ शिंदे गटातील १५ आमदारांना अपात्र ठरवायची मागणी केली गेली आहे.

एक गोष्ट समजत नाही. पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे पक्षादेशाचे उल्लंघन करणार्‍या आमदार/खासदारांचे सदस्यत्व रद्द करायची मागणी करता येऊ शकेल. आणि पक्षादेशाचे उल्लंघन केल्यावरही आधी संबंधित आमदारांना कारणे दाखवा नोटिस बजाविणे वगैरे प्रक्रीया असते. इथे विधानसभेत कसलेच मतदान झालेले नाही. मग नक्की कोणत्या आधारावर शिवसेना ही कारवाई करायची मागणी करत आहे? गुवाहाटीला जाऊन हॉटेलात राहणे यात काय आक्षेपार्ह आहे?

श्रीगुरुजी's picture

23 Jun 2022 - 9:50 pm | श्रीगुरुजी

मी आधीच लिहिले आहे. नरहरी झिरवळ जास्तीत जास्त अडथळे आणणार. शेवटी शिंदे गटाला न्यायालयात जावेच लागेल.

शाम भागवत's picture

24 Jun 2022 - 12:08 am | शाम भागवत

विधानसभेत बाजी मारून न्यायला व योग्य डावपेच आखायला देफ पुरेसे ठरावेत. निदान मागील प्रत्येक वेळेस तसं त्यांनी सिध्द केलंय. कदाचित त्यांचे डावपेच तयारही असतील व मनातल्या मनात त्यावर शेवटचा हात फिरवत असतील.
मुद्दा एकच आहे की या आमदारांना अटक करून विधानसभेत पोहचूच द्यायचे नाही असं काही मविआ करू बघत असेल का?

नारायण राणे केंद्रीय मंत्री असूनही जुनी केस काढून त्यांना अटक करायचा प्रयत्न झाला होता.
खोट्या केसेस करून सगळ्यांना अडकवून टाकण्याचे पेन ड्राईव तर देफ यांनीच विधानसभेत सादर केले होते.
आणि
हे आमदार आहेत शिवसेनेचे. त्यामुळे कुठल्यातरी आंदोलनात वगैरे एकाद दुसरी पेंडिंग केस असणे अगदी सहज शक्य आहे.

अर्थात हे मुद्दे माझ्या मनात येत असतील तर देफंच्या मनात येऊन त्यावर अटकपूर्व जामीन वगैरे सारख्या उपाय योजना पण तयार असतील म्हणा. :)))

शाम भागवत's picture

24 Jun 2022 - 12:11 am | शाम भागवत

काये की, मविआचे सगळे नेते प्रथम महाराष्ट्रात या असंच एकमुखाने सुचवत आहेत म्हणून शंका आली.

श्रीगुरुजी's picture

24 Jun 2022 - 12:15 am | श्रीगुरुजी

या सर्व संभाव्यता लक्षात घेऊन भाजपने नामवंत वकीलांची फौज तयार ठेवली असणार. विधानपरीषदेच्या मत देण्याच्या दिवशी सुद्धा आमदार रवी राणांना अटक करून त्यांना मत देता येऊ नये अशी योजना असल्याच्या बातम्या होत्या. पण तसे काही झाले नाही. विश्वासदर्शक ठरावावर तुरूंगातील आमदार/खासदारांना मत देण्याचा कायदेशीर हक्क आहे. मलिक व देशमुख सुद्धा तात्पुरते विधानसभेत येऊन मत देतील.

१९९० मध्ये भाजपने वि. प्र. सिंह सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर झालेल्या विश्वासदर्शक ठरावालर मत देण्यासाठी रथयात्रा व श्रीरामजन्मभूमी आंदोलन या कारणावरून अटकेत असलेल्या अडवाणी व वाजपेयींना मत देण्यासाठी न्यायालयाने जामिनावर सोडले होते.

क्लिंटन's picture

24 Jun 2022 - 1:05 pm | क्लिंटन

उत्तर प्रदेश विधानसभेत २१ ऑक्टोबर १९९७ (*) या दिवशी अशी लाज आणणारी दृश्ये बघायला मिळाली होती. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्र विधानसभेत नाही झाली तरच ते शिवछत्रपती आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रावर अनंत उपकार असतील.

*: व्हिडिओत २ ऑक्टोबर ही तारीख चुकून लिहिली आहे.

क्लिंटन's picture

24 Jun 2022 - 10:26 am | क्लिंटन

एकनाथ शिंदेंनी ट्विट करून शिवसेनेने त्यांच्या गटातील आमदारांना अपात्र ठरवायची मागणी अप्रस्तुत आहे हे म्हटले आहे.

यात नक्कीच तथ्य आहे असे वाटते. पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे २/३ पेक्षा कमी आमदारांनी पक्षांतर केले तर त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. आणि त्यांनी पक्षांतर केले असे कधी म्हणायचे? तर त्यांनी पक्षादेशाचे (व्हीप) उल्लंघन केले तर. हा पक्षादेश नक्की कोण जारी करू शकतो या तांत्रिकतेवर आधी लिहिलेच आहे. पण त्याबरोबर महत्वाचा मुद्दा म्हणजे पक्षादेश हा सभागृहातील कामकाजाशीच निगडीत असतो/असायला हवा. सभागृहाबाहेर संबंधित सदस्य काय करतात याचा पक्षांतरबंदी कायद्याशी काहीही संबंध नाही. पक्षाने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहायलाच पाहिजे हा पक्षादेश कागदावर काढला तरी त्याची वैधता शून्य. उद्या 'मातोश्रीवर येऊन माझे पाय चेपलेच पाहिजेत' असा पक्षादेश काढाल आणि त्या पक्षादेशाचे पालन न करणार्‍या आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत अपात्र ठरवावे अशी मागणी कराल. ते कसे चालेल?

श्रीगुरुजी's picture

23 Jun 2022 - 9:48 pm | श्रीगुरुजी

३९ दिवसांच्या तुरूंगवासानंतर केतकी चितळ्यांची जामिनावर सुटका झाली. काल निखिल भामरेसुद्धा अंतरीम जामिनावर बाहेर आला.

इतरांवर अत्यंत अर्वाच्य टीका करताना,
आपल्यावर टीका करण्यांच्या जीवनाची वाट लावणारे हे नीच सरकार गेलेच पाहिजे.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jun 2022 - 10:54 pm | अमरेंद्र बाहुबली

आपल्यावर टीका करण्यांच्या जीवनाची वाट लावणारे हे नीच सरकार गेलेच पाहिजे. मोदींवर टिका केली म्हणून अनेकांना अटक झालीय. मग मोदी सरकार चांगले की नीच? मोदी सरकार राहीले पाहीजे की गेले पाहीजे?

श्रीगुरुजी's picture

23 Jun 2022 - 10:59 pm | श्रीगुरुजी

मोदी सरकार चांगलेच आणि चांगले सरकार राहिलेच पाहिजे.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jun 2022 - 11:10 pm | अमरेंद्र बाहुबली

इतरांवर अत्यंत अर्वाच्य टीका करताना,
आपल्यावर टीका करण्यांच्या जीवनाची वाट लावणारे हे नीच सरकार गेलेच पाहिजे.
हे तुम्हीच
म्हटलात ना? मोदींवर टिका केली म्हणून अनेकांना अटक झालीय. मग मोदी सरकार चांगले कसे?

श्रीगुरुजी's picture

23 Jun 2022 - 11:15 pm | श्रीगुरुजी

राऊत, उद्धव, पटोले, मोदी कुत्तेकी मौत मरेगा म्हणणारा तो नागपूरचा कोणतरी, भास्कर जाधव, मोदी हिटलरकी मौत मरेगा म्हणणारा उत्तर प्रदेशातला कोणतरी, मोदींचे बोटाएवढे तुकडे करू म्हणणारा कोणतरी इ. ना कधी अटक झाली?

म्हणूनच सांगतोय मोदी चांगलेच आहेत आणि चांगले सरकार टिकलेच पाहिजे.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jun 2022 - 11:35 pm | अमरेंद्र बाहुबली

ठाकरे सरकारला नालायक, ठाकरेंना तुसड्या स्वभावाचा, मातोश्राला पैशांच्या बॅगा. हे मिपावरील धाग्यात अनूक्रमे तुम्ही, क्लिंटन नी साहना ह्यांना लिहीलंय. तुमच्या आयड्यांवर तरा कारवाई झाली का?? (शशक विजेता काड्यासारू आयडी मात्र गुपचूप ब्लाॅक मारला गेला)

म्हणूनच सांगतोय मोदी चांगलेच आहेत आणि चांगले सरकार टिकलेच पाहिजे.

मोदांवर टिका करनार्या अनेकांनर कारवाई झालाय गुगल केलं तरी अनेक नावे सापडतील. करताय सर्त का स्पून फिडींग करू? मग मोदी सरकार चांगले कसे?? हे सरकार नाच तर मोदी सरकार चांगले कसे?? ते नीच कसे नाही?

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jun 2022 - 11:37 pm | अमरेंद्र बाहुबली

ठाकरे सरकारला नालायक, ठाकरेंना तुसड्या स्वभावाचा, मातोश्राला पैशांच्या बॅगा. हे मिपावरील धाग्यात अनूक्रमे तुम्ही, क्लिंटन नी साहना ह्यांनी लिहीलंय. तुमच्या आयड्यांवर तरी कारवाई झाली का?? (शशक विजेता काड्यासारू आयडी मात्र गुपचूप ब्लाॅक मारला गेला)

म्हणूनच सांगतोय मोदी चांगलेच आहेत आणि चांगले सरकार टिकलेच पाहिजे.>>>$

मोदांवर टिका करनार्या अनेकांनर कारवाई झालीय गुगल केलं तरी अनेक नावे सापडतील. करताय सर्च की स्पून फिडींग करू? मग मोदी सरकार चांगले कसे?? हे सरकार नीच तर मोदी सरकार चांगले कसे?? ते नीच कसे नाही?

श्रीगुरुजी's picture

23 Jun 2022 - 11:44 pm | श्रीगुरुजी

खिक्क . . . ख्या ख्या ख्या . . .

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jun 2022 - 11:46 pm | अमरेंद्र बाहुबली

गुरूजी तुम्ही रिटायरमेंट घ्या आता. :)

श्रीगुरुजी's picture

24 Jun 2022 - 12:04 am | श्रीगुरुजी

मी फार पूर्वीच स्वेच्छानिवृत्ती घेतलीये.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Jun 2022 - 12:11 am | अमरेंद्र बाहुबली

मी काहीबीही लिहीण्यापासून म्हणतोय. एकेकाळी तुमचे प्रतिसाद वाचनीय असायचे. पण आता शेंडासबूडखा नसलेलं काहीही लिहीत असतात.

श्रीगुरुजी's picture

24 Jun 2022 - 12:17 am | श्रीगुरुजी

असे असेल तर माझे प्रतिसाद वाचू नये.

कंजूस's picture

23 Jun 2022 - 11:32 pm | कंजूस

यांवर आपण मते मांडत आहोत ना?

साहना's picture

24 Jun 2022 - 1:38 am | साहना

पॉपकॉर्न घेऊन बसले आहे schadenfreude चा मस्त आनंद घेत आहे.

डाम्बिस बोका's picture

24 Jun 2022 - 6:57 pm | डाम्बिस बोका

साहना, schadenfreude हा नवीन शब्द दाखवला म्हाणून आभार. गूगल केल्यावर अर्थ कळला. :)

शाम भागवत's picture

24 Jun 2022 - 7:19 pm | शाम भागवत

अर्थ इथे टंकायचा नाही का?
मलाही गुगलायला लागला.
:)

इतरांना हा त्रास होऊ नये यासाठी.....
इतरांच्या दुर्दैवीपणाबद्दल आनंदित होण्याची वाईट वृत्ती;

आता मला याचा विरूध्दार्थी शोधायची इच्छा होते आहे.

याला शुद्ध मराठीत विघ्नसंतोषी पणा म्हणतात

आग्या१९९०'s picture

24 Jun 2022 - 8:41 am | आग्या१९९०

जर्मन राजकीय तत्त्वचिंतक हॅना अ‍ॅरेन्ड्ट यांनी खोटय़ाच्या या संस्थात्मकीकरणाचे परिणाम स्पष्ट केले आहेत. त्या म्हणतात, ‘‘प्रत्येक जण नेहमी तुमच्याशी खोटे बोलत असेल, तर त्याचा परिणाम असा होत नाही की तुम्ही खोटय़ा गोष्टींवर विश्वास ठेवता, परंतु त्यानंतर कोणीही कशावरही विश्वास ठेवत नाही.. आणि कशावरही विश्वास ठेवू न शकणारे लोक कशासाठीही उभे राहू शकत नाहीत. मग ते फक्त कृती करण्याची क्षमताच हरवून बसत नाहीत तर विचार करण्याची आणि बरे-वाईट ठरवण्याची क्षमताही हरवून बसतात. आणि मग अशा लोकांशी तुम्ही तुम्हाला हवे तसे वागू शकता.
- लोकसत्ता, योगेंद्र यादव
आपली वाटचाल त्याच मार्गाने जात आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jun 2022 - 9:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केंद्रातील भाजपा सरकार हे सत्तापिपासू आहेत, म्हणजे सत्तेशिवाय आता राहूच शकत नाही, सत्तेसाठी वाट्टेल ते करायचे पण सत्ता मिळवायची केवळ इतक्याच हेतूने राजकीय उलथापालथ देशभर चालू असते. राजस्थान, कर्नाटक, आणि आता महाराष्ट्र. गेली अडीच वर्ष सत्तेसाठी भाजपाने जो हावरटपणा केला. केंद्रसरकारच्या मदतीने इडीच्या माध्यमातून सतत एक दबाव ठेवला. सत्ता नको पण हा त्रास आवरा ही अवस्था सरकारमधील लोकांची अवस्था करुन ठेवली. कालच्या व्हायरल व्हीडीयो मधे केंद्रसरकार आपल्याला पूर्ण मदत करेल असे म्हटलेले दिसत आहे, त्यामुळे हे सत्तांतराचे नाटकाच्या पाठीमागे कोण आहे हे काही लपून राहीलेलं नाही. आता ते अधिकच स्पष्ट झालं आहे. जनतेसमोर या गोष्टी येत गेल्या पाहिजेत. लोक योग्यवेळी त्याचा हिशेब पूर्ण करतात.

महाराष्ट्रात शिवसेना गटनेता अजय चौधरी आहे आणि उपाध्यक्ष यांनी त्यांना तसे पत्र दिल्यामुळे ही लढाई भाजपासाठी सोपी राहीलेली नाही. काल बारा आमदारांची आमदारकी रद्द करा अशी मागणी नव्हे तर, पिटीशन उपाध्यक्षांकडे केल्यामुळे हे प्रकरण आता थेट न्यायालयातच जाणार आहे. सर्व प्रकरणात विधानसभा उपाध्यक्ष यांची भूमिका महत्वाची राहणार आहे. काल शिंदे यांनी कायदे आम्हाला कळतात व्हीप कोणी द्यायचा आणि कोणत्या प्रसंगी द्यायचा या मुद्द्याला आता अर्थ उरला नाही. कारण असे म्हटल्या जात आहे की, घटनेच्या भाग ६ मधील कलम १८० नुसार तो अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे, आणि ते आमदारकी रद्द करु शकतील. सध्या महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आलं आहे, असा दावा अजून कोणी केला नाही. त्याला ही सर्व कायद्याची लढाई अडथळा आहे, असे दिसते.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

24 Jun 2022 - 10:10 am | सुबोध खरे

केंद्रातील भाजपा सरकार हे सत्तापिपासू आहेत,

हे मूळ विधानच भंपक आहे.

सत्ता नको असेल तर राजकारणात यायचंच कशाला? केवळ विरोधी पक्ष हवा म्हणून? का घरी बसून वेळ जात नाही म्हणून?

हे म्हणजे वाघ जंगलात कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी जंगलात फिरतो आणि त्याने शिकार केली तर वाघ रक्तपिपासू आहे असे म्हणण्यासारखे आहे.

आणि कुठेही सत्तेच्या बाहेर असेल तर सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणे यात काहीही गैर नाही. भाजप-- शिवसेना (किंवा कोणताही) पक्ष फोडून आपल्याकडे वळवून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करणारच. त्यांनी काय विरोधातच बसायची शपथ घेतली आहे का?

शेवटी दुधापार्यंत पोचता येत नसेल तर मांजर सुद्धा प्रामाणिकपणाची माळ गळ्यात घालून फिरते.

तेंव्हा विरोधकांचा हा दावा कि आम्ही कसे धुतल्या तांदुळाचे आहोत ते साफ खोटे आहे. मुळात हि तिघाडी सरकार हेच जनतेचा विश्वासघात आहे.

जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या युतीला निवडून आणलेले होते. त्यातून शिवसेनेस फोडून हे असंगत सरकार स्थापन केले त्याबद्दल त्यांची वाहवा करत होतात आणि आता हे सरकार फुटलं तर रडारड

बिरुटे सर

इ चोलबे ना !

हा शुद्ध दांभिकपणा आहे

फक्त गैरमार्गांचा अवलंब करून सत्तेत आल्यास ते वाईट आहे. पण ७० वर्षांचा काँग्रेसचा इतिहास पहिला तर काँग्रेसने यापेक्षा दुसरे काहीही केलेलं नाही असेच लक्षात येईल.

श्रीमती इन्दिरा गांधी यांनी तर याचा कळस गाठला होता. येनकेनप्रकारेण त्यांनी विऱोधी पक्षाच्या सत्ता कलम ३५६ वापरून बरखास्त केल्या होत्या.

आता बाजी उलटली आहे म्हणून हि रडारड चालू आहे.

मला लहानपणी वाचलेला एक विनोद आठवतो आहे.

एक १० वर्षाचा मुलगा घाईघाईने पोलिसाला बोलावत होता "पोलीस पोलीस लवकर या, हा माणूस माझ्या बाबांशी गेला अर्धा तास मारामारी करतो आहे".

पोलीस - मग इतका वेळ का गप्प होतास?

मुलगा - इतका वेळ माझे बाबाच त्याला बुकलत होते
आता आता तो वर आलाय

गुलाम आणि चमच्यांची हि स्थिती आहे.

इतके दिवस काँगेस जे करत होते ते चालत होते आणि आता भाजप वर आलाय तर साधनशुचिता पार्टी विथ डिफरंन्स सारखी पालूपदे घोळवताहेत

कानडाऊ योगेशु's picture

24 Jun 2022 - 12:30 pm | कानडाऊ योगेशु

प्रश्न १: गाळलेली जागा भरा.
------------------- हे सत्तापिपासू आहेत, म्हणजे सत्तेशिवाय आता राहूच शकत नाही.

प्रश्न २ : वरिल विधान संदर्भासहीत स्पष्ट करा.

हिंटः स्वतःला जाणता राजा म्हणवुन घेणारा एक साधारण खासदार.

डाम्बिस बोका's picture

24 Jun 2022 - 6:21 pm | डाम्बिस बोका

आता बाजी उलटली आहे म्हणून रडारड नाही तर सत्ताधारी पक्ष आणि राजकारणी ७० खर्चात बदलले नाही ह्याचे दुःख होते.
इंदिरा गांधी नी तेच केले. काँग्रेस काय बाकी चिंधी पक्ष काय तेच रडगाणे गायले.
हे सगळं जाईल किंवा कमी होईल अशी अपेक्षा होती वा भक्तांनी तशी खोटी आशा दाखवली.
BJP चा जर काँग्रेस झाला तर रडारड म्हणायची की अपेक्षाभंग?

सुबोध खरे's picture

24 Jun 2022 - 7:55 pm | सुबोध खरे

गुलाम किंवा चमचे लोकांनी अपेक्षाच कशाला करावी?

म्हणजे मग अपेक्षा भंगच होत नाही

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Jun 2022 - 11:44 am | माईसाहेब कुरसूंदीकर

ट्रम्प्/पुतीन वर हिरीरीने पुढे बोलायला येणारी मंडळी-कुबेर्/निखिल वागळे/हेमंत देसाई अजून गप्प कशी? की जे घडतेय ते रूचत नाही आहे?

श्रीगुरुजी's picture

24 Jun 2022 - 11:45 am | श्रीगुरुजी

जर उद्धव ठाकरे स्वतः किंवा आदित्य ठाकरे गुवाहाटीस जाऊन एकनाथ शिंदे व इतर बंडखोर आमदारांना प्रत्यक्ष भेटले, तर हे बंडोबा थंडोबा होतील, कारण ही बहुतांशी अहंकाराची लढाई आहे. पण त्यासाठी उद्धव ठाकरेंना स्वत:चा अहंकार सोडावा लागेल. अर्थात वाचाळवीर राऊतला यात अजिबात न घेता त्याला तोड बंद ठेवायचा आदेश द्यावा लागेल.

उपेक्षित's picture

24 Jun 2022 - 12:42 pm | उपेक्षित

मला वयक्तिक अस वाटत आहे की या शिंदे वगैरे मंडळींच्या नादी भाजप ने न लागता सरळ निवडणुका लावून स्वबळावर बहुमत मिळवावे (जे खरं तर आधीच करायला पाहिजे होत साला) 5 वर्ष कटकट नाय राहणार.

शाम भागवत's picture

24 Jun 2022 - 1:00 pm | शाम भागवत

भाजपाकडून पाठिंबा मिळेल असं वाटल्यानेच शिंदे यांनी धाडस केले असणार.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Jun 2022 - 1:18 pm | अमरेंद्र बाहुबली

सरळ निवडणुका लावून स्वबळावर बहुमत मिळवावे भाजपला बहुमत मिळणे शक्य नाही आता.

उपेक्षित's picture

24 Jun 2022 - 12:44 pm | उपेक्षित
उपेक्षित's picture

24 Jun 2022 - 12:44 pm | उपेक्षित

बाकी उद्धव ठाकरेंचे कालचे फेबु लाईव्ह पाहून मनोमन जाणवले की हा माणूस राजकारणा साठी आणि राजकारण यांच्यासाठी कधीच नव्हते आणि नसणारे

सुबोध खरे's picture

24 Jun 2022 - 7:59 pm | सुबोध खरे

असं नव्हे तर इतकी वर्षे राजकारणात राहून ते काहीच शिकले नाहीत असेच म्हणावे लागेल.

ना राज्यशकट चालवायची कुवत

ना नोकरशाहीवर यांची पकड

म्हणून राष्ट्रवादीने त्यांचा वापर करून घेतला/ घेत आहेत.

वारसा हक्काने गादी मिळू शकते,

बुद्धी नाही

हे त्यांनी परत एकदा सिद्ध करून दाखवले आहे.