✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ३)

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
Wed, 06/22/2022 - 16:20  ·  लेख
लेख
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती. एकनाथ शिंदे यांनी अपक्ष मिळून आपल्या गटात ४६ आमदार आहेत असा दावा केला आहे. तसेच आपणच शिवसेनेचे गटनेते आहोत असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला असून भारत गोगावले यांची विधीमंडळ पक्षाच्या प्रतोदपदावर त्यांनी नियुक्ती केली आहे. शिवसेनेचे आणखी चार आमदार गुवाहाटीच्या मार्गावर तर काँग्रेसचे आठ आमदारही गोव्याच्या मार्गावर आहेत अशा बातम्या आहेत. शिवसेनेने सगळ्या आमदारांची संध्याकाळी पाच वाजता बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला अनुपस्थित राहणार्‍यांवर कारवाई केली जाईल असे शिवसेनेने म्हटले आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
38594 वाचन

💬 प्रतिसाद (186)

प्रतिक्रिया

५ वाजता फेसबुक लाईव्ह

चंद्रसूर्यकुमार
Wed, 06/22/2022 - 16:49 नवीन
उध्दव ठाकरे आज संध्याकाळी ५ वाजता फेसबुक लाईव्ह करणार. यावेळी कोमट पाणी प्यायला कोणाला सांगणार?
  • Log in or register to post comments

राजकारण मध्ये न गुंतता

sunil kachure
Wed, 06/22/2022 - 19:03 नवीन
राजकारण हा विषय महत्वाचा आहे पण इतका पण महत्वाचा नाही की बाकी सर्व विषय गौण आहेत. काल च नातेवाईक साठी kem हॉस्पिटल मध्ये जाण्याचा योग आला. ब्रिटिश कालीन वास्तू आणि ब्रिटिश कालीन च व्यवस्था . अगदी भव्य. पण तिथे गेल्यावर मन सुन्न झाले. किती तरी आजारी लोक . ना त्यांना बघण्यास डॉक्टर, ना कोणती सुविधा. व्यवस्था च कोलमडून जावी इतकी गर्दी.. भारतात मुंबई सारख्या ठिकाणी आरोग्य व्यवस्थेचे हे हाल असतील तर देशात काय असेल. ब्रिटिश नी उभ्या केलेल्या सार्वजनिक भव्य हॉस्पिटल आज पण सामान्य लोकांचे आशा स्थान आहे. भारतीय स्वदेशी सरकार नी ७०, वर्षात काय केले. राजकारणात इतके पण गुंतू नका . सर्व स्वार्थासाठी चालले ले खेळ आहेत. विकास ,सुविधा,सू व्यवस्था हे विषय अतिशय महत्वाचे आहे. कोणत्या पक्षाचे सरकार आहे ह्या पॉइंट शी लोकांना काहीच देणे घेणे असले नाही पाहिजेत
  • Log in or register to post comments

आरोग्य मंत्रालयाचा हा विषय

विजुभाऊ
गुरुवार, 06/23/2022 - 10:34 नवीन
आरोग्य मंत्रालयाचा हा विषय आहे. तुम्हाला दिसली ती परिस्थिती त्यांना स्नॅपचॅट किंवा ट्व्विटरने कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

तर मी मुख्यमंत्री पद सोडेल तर

रात्रीचे चांदणे
Wed, 06/22/2022 - 19:57 नवीन
तर मी मुख्यमंत्री पद सोडेल तर मी वर्षा बंगला सोडेल, माझा राजीनामा तयार आस म्हणून मुखमंत्र्यांनी भावनिक आवाहन केले आहे.
  • Log in or register to post comments

उद्धव उवाच

चौकस२१२
गुरुवार, 06/23/2022 - 04:04 नवीन
उद्धव उवाच अह्ह्ह काय ते आवाहन .. पूर आलं हो अश्रूंचा राज्यात ( जय संतोषी माता चाय नंतर आलेला हा दुसरा पूर ) - काय तर म्हणे मी मुखमंत्री नको असेंन तर सांगावे मग मी राजीनामा देईन ... प्रश्न कोण मुख्यमंत्री हा नाहीच मुळी तुम्ही राष्ट्रवादी आणि kongres बरोबर लग्न लग्न लावून सेनेची धोरणे सोडलीत यामुळे हे घडतंय - हिंदुत्व आहे .. आहे ना मग भाजप बरोबर फाटल्यावर हिंदूतला हा जरी उच्चर्ला तरी हगवण लागते अशा दोन पक्षांबरोबर युती का केलीत.. स्वतंत्र राहायचे आणि बघ्याची मज्जा ! - आजच वारसा सोडून मातोश्री war जातो.... कुणी अडवलाय ? हा असला "जनतेशी संवाद " लाजिरवाणा प्रकारच सगळा ,, असें ताठ kana तर सरळ राजीनामा द्यायचा नाहीतर सदनात चाचणी घ्या ,, आहे का हिंमत मत वाघांच्यात एकूण या सवांदातून त्यानं अजूनही सोनियाजी आणि काकांबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे हे सिद्ध झाले ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

अगदी नेमकं

कंजूस
गुरुवार, 06/23/2022 - 06:27 नवीन
आणि शिंदेंनी म्हटलं की ४५सह माझीच शिवसेना तर? कॉन्ग्रेसची बैलजोडी जाऊन दोन वेगळे पक्ष ( इंदिरा आणि उरस) झाले तसं शिवसेना ( बाळासाहेब आणि उद्धव) वेगळे पक्ष होतील दोन वेगळी चिन्हं. धनुष्यबाण गोठेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

कालचे भाषण

क्लिंटन
गुरुवार, 06/23/2022 - 12:08 नवीन
काल संध्याकाळी भाषणाचे नाटक केल्यानंतर काही आमदार स्वगृही परततील असे कोणाला वाटले असेल तर तसे काहीही होत नाहीये. इतके भावनिक आव्हान करूनही आमदारांची पावले चालती गुवाहाटीची वाट चालूच आहे. सदा सरवणकर आणि आणखी दोघे कालचे भाषण झाल्यावरच गुवाहाटीला गेले. एकूणच काय तर ठाकरेंनी संजय राऊतांच्या नादी लागून विधानसभा निवडणुकीत लोकांनी स्पष्टपणे दिलेल्या जनमताला लाथाडले आणि स्वतः मुख्यमंत्री झाले तसेच गेल्या अडीच वर्षात जो काही सावळागोंधळ त्यांच्या सरकारने घातला आहे त्याच्याविरोधात सामान्य लोकांमध्ये प्रचंड संताप आहे तेव्हा अशा मुख्यमंत्र्याबरोबर अधिक काळ राहिलो तर आपले पुढच्या वेळेस निवडून येणे कठीण होईल हे आमदारांनाही समजले आहे. गेल्या अडीच वर्षात हळूहळू असंतोष वाढत होता त्याचा उद्रेक आता झाला. बहुतेक आता ठाकरेंनाही आपला मुख्यमंत्रीपदाचा खेळ संपत आला आहे हे समजलेले दिसते. त्यांनी शिवसेना आमदारांची आज बोलावलेली बैठक रद्द केली आहे. त्यासाठी मल्लीनाथी काहीही केली जाईल- आमदारांना वर्षा बंगल्यावर प्रशासकीय कामे आहेत वगैरे. पण खरे कारण काय ते लपून राहणे कठिण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

केंद्रीय राजकारणात महत्व

शाम भागवत
गुरुवार, 06/23/2022 - 13:02 नवीन
केंद्रीय राजकारणात महत्व मिळण्याच्या दृष्टीनेही आता खासदार शिंदेसाहेबांकडे जाण्याची आता शक्यता निर्माण झाली आही. जर खासदारही मोठ्या प्रमाणात गुहाटीला पोहोचले तर आमची शिवसेना हीच खरी शिवसेना हा मुद्दा आणखी ताकदवान होऊ शकेल. मला वाटते, उठा यांनी राजिनामा दिल्यावर, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लावली जाईल. मला वाटते सध्याच्या राजकारणाचा हा शेवटचा टप्पा असेल. आपला सोयीचा अध्यक्ष निवडला गेल्यावर पुढील हालचाली केल्या जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

हॉटेलचा खर्च

दिगोचि
Fri, 06/24/2022 - 06:02 नवीन
गुवाहाटितल्या हॉटेलचे सात दिवसान्चे भाडे म्हणे ५६ लाख रुपये आहे. एव्हढे पैसे आणले कोठून किम्वा कोणी दिले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

खर्च

डाम्बिस बोका
Fri, 06/24/2022 - 18:52 नवीन
आमदार फोडायला ५० ते १०० कोटी (कमीतकमी) लागतात त्यात काही लाखांचे काय घेऊन बसलात. बाकी हे पैसे कोण भरतो आणी कुठून येतात हे ED/CBI ला सुद्धा न उलगडणारे कोडे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिगोचि

हायला

सुबोध खरे
Fri, 06/24/2022 - 19:04 नवीन
हायला मुंबईचे पोलीस आयुक्त च जर महावसुली आघाडीने त्यांना दर महा १०० कोटी गोळा करायला सांगितले होते असे सांगतात. Anil Deshmukh asked Waze to collect Rs 100 crore for him per month: Param Bir Singh tells Uddhav Thackeray https://www.timesnownews.com/mumbai/article/anil-deshmukh-asked-waze-to-collect-rs-100-crore-every-month-from-bars-param-bir-singh-tells-uddhav-thackeray/735046 म्हणजे मग अडीच वर्षात( ३० महिन्यात) ३ हजार कोटी जमा झालेले आहेत. पण एवढे असूनही आमदार आघाडीबरोबर यायला तयार नाहीत म्हणजे जखम कुठेतरी फार खोल गेलेली आहे. लष्करात असताना (१९९१) एक माझे वरिष्ठ मला म्हणाले होते कि एक कोटी म्हणजे किती होतात? रोज दहा हजार रुपये खर्च केले तरी हे पैसे तुम्हाला तीन वर्षे पुरतील. मी त्यांना म्हणालो कि सर आपण मध्यमवर्गीय आहोत आपली झेप हजाराच्या वर जातच नाही.कारण आपला पगारच चार हजार आहे मग आपण रोज १०० रुपये खर्च करायच्या अगोदर विचार करतो. तेंव्हा रोज सोडाच एक महिन्याला सुद्धा १० हजार खर्च करण्याचा विचार करू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डाम्बिस बोका

सुनिल साहेब

एकुलता एक डॉन
Wed, 06/22/2022 - 20:29 नवीन
सुनिल साहेब राजकारण पासून लांब राहायचा प्रयत्न केला राजकारण पार आपल्यापर्यंत येते
  • Log in or register to post comments

संपत्ती आणि प्रचंड पैसा

sunil kachure
Wed, 06/22/2022 - 20:49 नवीन
राजकारण दिसते तितके सरळ नाही. प्रचंड पैसा,प्रचंड अधिकार ह्याचा खेळ आहे. समाज हीत,देश हीत हे दुय्यम मुद्दे आहेत. समाजाची मानसिकता, समाजाला काय ऐकायला आवडेल, समाजात कशी आणि कुठे फूट पाडता येईल. लोक सर्व असुविधा विसरून काल्पनिक विश्वात कसे जातील. ह्या साठी प्रचंड पैसा खर्च करून अतिशय हुषार लोकांची टीम काम करत असते. अती प्रचंड पैसा खर्च करून सल्लागार असतात. किती ही विचारी व्यक्ती असेल तरी तो सामान्य असतो. एक दिवस तो राजकारणी लोकांच्या कुटील डाव पेचात अडकतो च. त्या साठी राजकारणी लोकांच्या प्रतेक शब्द आणि खरी स्थिती ह्याची तुलना करून मत बनवावे लागते कठीण काम आहे,आपण पैसे खर्च करून सल्लागार नेमू शकत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन

आदित्यला मुख्यमंत्री करायची खटपट होती.

कंजूस
Wed, 06/22/2022 - 20:42 नवीन
ते भाजपने नाकारलं होतं. मग साष्टांग घातला. तरीही पवारांनी नाकारले. मग खुर्चीत बसावे लागले. आता खुर्चीतून उठावे लागले. बाकी शिवसेनेची बाळासाहेबापासून मागे राहून प्यादी हलवायचे धोरण नसते तर मनोहर आणि नारायणाऐवजी उद्धवलाच बाळासाहेबांनी तेव्हा मुख्यमंत्री केले असते. असा प्रकार जनतेने पाहिला आहे. बाकी कमी अधिक संजयच सांगेल. चु.भू.द्यावी घ्यावी.
  • Log in or register to post comments

एकनाथ शिंदेंकडे सेनेचे अजून

श्रीगुरुजी
Wed, 06/22/2022 - 21:02 नवीन
एकनाथ शिंदेंकडे सेनेचे अजून ३७ आमदार जमले नसावे असे वाटते. कदाचित आमदार असूनही घाई करू नका, ठाकरेंनी पुढील निर्णय घेईपर्यंत वाट पहा असे फडणवीसांनी सांगितले असावे. विधानसभेत बहुमत सिद्ध करा असा आदेश देण्याची राज्यपालांनाही अजिबात घाई दिसत नाही. अजून काही दिवस अधांतरी वातावरण ठेवून उर्वरीत आमदार कोणाकडे झुकतात, राष्ट्रवादी व कॉंग्रेस काय भूमिका घेतात, याची वाट पहात असावे. काही असले तरी शिंदेंच्या बंडाची सेना कार्यकर्त्यांमध्ये फारशी प्रतिक्रिया उमटलेली दिसत नाही. भुजबळ बाहेर पडले तेव्हा प्रचंड तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. काल काही कार्यकर्ते जमून शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है अश्या स्वरूपाच्या नेहमीच्याच टुकार घोषणा देताना दाखविले. बहुसंख्य कार्यकर्ते थंड दिसतात. बारामतीच्या पोपटाचा सुद्धा स्वर खाली आलाय. ट्विटरवर सुद्धा सेना समर्थकांच्या फारश्या तीव्र प्रतिक्रिया नाहीत.
  • Log in or register to post comments

अररर गुलाबराव पाटील पण

Bhakti
Wed, 06/22/2022 - 21:06 नवीन
अररर गुलाबराव पाटील पण गुवाहाटी मध्ये! देफ.पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे.एवढी सफाई आता फक्त जनतेच्या भल्यासाठी उरलेल्या २.५ वर्षांत दिसू द्यावी .
  • Log in or register to post comments

एकनाथ शिंदेंकडे सेनेचे अजून

श्रीगुरुजी
Wed, 06/22/2022 - 21:11 नवीन
एकनाथ शिंदेंकडे सेनेचे अजून ३७ आमदार जमले नसावे असे वाटते. कदाचित आमदार असूनही घाई करू नका, ठाकरेंनी पुढील निर्णय घेईपर्यंत वाट पहा असे फडणवीसांनी सांगितले असावे. विधानसभेत बहुमत सिद्ध करा असा आदेश देण्याची राज्यपालांनाही अजिबात घाई दिसत नाही. अजून काही दिवस अधांतरी वातावरण ठेवून उर्वरीत आमदार कोणाकडे झुकतात, राष्ट्रवादी व कॉंग्रेस काय भूमिका घेतात, याची वाट पहात असावे. काही असले तरी शिंदेंच्या बंडाची सेना कार्यकर्त्यांमध्ये फारशी प्रतिक्रिया उमटलेली दिसत नाही. भुजबळ बाहेर पडले तेव्हा प्रचंड तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. काल काही कार्यकर्ते जमून शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है अश्या स्वरूपाच्या नेहमीच्याच टुकार घोषणा देताना दाखविले. बहुसंख्य कार्यकर्ते थंड दिसतात. बारामतीच्या पोपटाचा सुद्धा स्वर खाली आलाय. ट्विटरवर सुद्धा सेना समर्थकांच्या फारश्या तीव्र प्रतिक्रिया नाहीत.
  • Log in or register to post comments

राज्यपाल

चंद्रसूर्यकुमार
Wed, 06/22/2022 - 21:44 नवीन
आतापर्यंत राज्यपालांकडे काहीही गेलेले नाही. जर एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे आपल्या समर्थक आमदारांच्या सहीचे पत्र देऊन सरकारचा पाठिंबा काढून घेतला असे कळविले तरच राज्यपाल मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करायला सांगतील. अजूनपर्यंत तसे काही झालेले नाही. राज्यपाल मिडियात आलेल्या बातम्यांच्या आधारे मुख्यमंत्र्यांना तसे करायला सांगणार नाहीत आणि त्यांनी तसे सांगूही नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अजून लोकं जमताहेत ना?

शाम भागवत
Wed, 06/22/2022 - 21:56 नवीन
अजून लोकं जमताहेत ना? ३७+झालेले असले तर ५० पर्यंत पोहोचायचंय ना. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

शक्यता

चंद्रसूर्यकुमार
Wed, 06/22/2022 - 22:18 नवीन
अजूनही काही आमदार गुवाहाटीला जाणार आहेत असे वाटते. गुलाबराव पाटील आज संध्याकाळी पोचले. योगेश कदम इतर आमदारांबरोबर मुंबईत हॉटेल मध्ये होते ते पण आज गुवाहाटीत पोचले. मंगेश कुडाळकर ही त्याच मार्गावर आहेत असे दिसते. तेव्हा आपल्याकडे नक्की किती आमदार आहेत हे बघायला एकनाथ शिंदे थांबले असावेत. एकदा शेवटचा आमदार तिथे दाखल झाला की मग पुढची कारवाई होईल ही शक्यता आहे. तसेच स्वतः शिंदे हाडाचे शिवसैनिक आहेत. अजूनही ठाकरे महाभकास आघाडी मोडतील ही (कदाचित भाबडी) आशाही त्यांना असेल ही पण शक्यता आहेच आपल्याकडे किती आमदार आहेत हे बघायला हवे याचे एक कारण आहे. आधीच एक गट स्थापन केला तर नंतर येणाऱ्यांना त्रास व्हायची शक्यता असते. १९९० मध्ये जनता दलातून चंद्रशेखर आणि देवीलाल यांच्याबरोबर सुरवातीला ५४ खासदार बाहेर पडले. त्यानंतर आणखी पाच ( विद्याचरण शुक्ला, भागेय गोवर्धन वगैरे) बाहेर पडले. पहिले ५४ खासदार बाहेर पडल्यानंतर जनता दलाचे खासदार शिल्लक राहिले ८८. तर नंतर बाहेर पडलेल्या ५ खासदारांचा आकडा ८८ च्या एक - तृतीयांश पेक्षा कमी आहे म्हणून त्या पाच खासदारांचे सदस्यत्व लोकसभा अध्यक्ष रवी रे यांनी पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे रद्द केले होते. तसे काही व्हायला नको हे पण एक कारण असू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

+१ चांगली माहिती

Bhakti
Wed, 06/22/2022 - 22:25 नवीन
+१ चांगली माहिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

बाकी राज्यपालांना तातडीने

अमरेंद्र बाहुबली
Wed, 06/22/2022 - 21:46 नवीन
बाकी राज्यपालांना तातडीने कोरोनाची लागण झालीय. गोव्याच्या राज्यपालांकडे कारभार देण्यामागेसगोव्यात भाजपचे सरकार आहे हे कारण असू शकते.
  • Log in or register to post comments

बरोबर.

शाम भागवत
Wed, 06/22/2022 - 21:59 नवीन
बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

गोवा महाराष्ट्राच्या शेजारी

Bhakti
Wed, 06/22/2022 - 22:27 नवीन
गोवा महाराष्ट्राच्या शेजारी आहे.गोवा/गुजरातला राज्यपाल यांना अतिरिक्त भार मिळतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मुख्यमंत्री इतके दिवस आजारी

Bhakti
Wed, 06/22/2022 - 22:30 नवीन
मुख्यमंत्री इतके दिवस आजारी होते,आधीच अतिरिक्त भार इतर शिवसैनिकाला दिला असता तर चांगलं झालं असते... जास्त भार सोसू नये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मुख्यमंत्री इतके दिवस आजारी

अमरेंद्र बाहुबली
Wed, 06/22/2022 - 22:42 नवीन
मुख्यमंत्री इतके दिवस आजारी होते,आधीच अतिरिक्त भार इतर शिवसैनिकाला दिला असता तर चांगलं झालं असते... जास्त भार सोसू नये! हे सल्ले भाजपेयी बिनभाजप मुख्यमंत्र्यांना देतात, पण हे विसरतात की गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर परीकर ह्यांना सलाईन लावून विधानसभेत आणले होते. त्यांची जागा घेणारा दुसरा कुणी नव्हता का?? चालता येत नव्हतं तरी पर्रीकर पद का सोडत नव्हते?? म्हणजे भाजपचे करतील तर रासलीला ईतर करतील तर कॅरेक्टर ढिला. ह्या असल्या ढोंगा मुळेच भाजपेयींवर कुणी विश्वास ठेवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

खिक्क.

श्रीगुरुजी
Wed, 06/22/2022 - 22:48 नवीन
खिक्क. भाजपला लोकसभेत ३०३ जागा आहेत. आता गोवा आणि इतर ३ राज्यातही बहुमत मिळाले. कोणीच भाजपेयींवर विश्वास ठेवत नाही, पण बहुमत देतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

गोव्याचे काय माहित नाही बाई

Bhakti
Wed, 06/22/2022 - 23:32 नवीन
गोव्याचे काय माहित नाही बाई मला.मी महाराष्ट्राचा मतदार या नात्याने मतं दिलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

खरंच आजारी की सहानुभूतीसाठी

श्रीगुरुजी
Wed, 06/22/2022 - 22:49 नवीन
खरंच आजारी की सहानुभूतीसाठी आजाराचे नाटक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

फेसबुक लाईव्ह करताना मानपट्टा

श्रीगुरुजी
Wed, 06/22/2022 - 23:03 नवीन
फेसबुक लाईव्ह करताना मानपट्टा नव्हता. कोरोना झाला असेल घराबाहेर येऊन अगदी जवळून कार्यकर्त्यांशी बोलत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

१०५ निवडून येवून

sunil kachure
Wed, 06/22/2022 - 21:52 नवीन
१०५ निवडून येवून सत्ता न मिळणे. आणि युती करून बहुमत असून पण सत्ता न मिळणे हे दुःख खूप मोठे आहे. मान्य आहे. त्या मुळे bjp हट्टाला पेटलो हे पण मान्य आहे. पण राज्य हीत नावाची काही तरी गोष्ट असते ना.. आता नाही पुढे सत्ता मिळेल संयम ठेवून bjp वागली असती तर महाराष्ट्र ची जनता bjp ची पाठी राखी झाली असती .पण सेनेची जिरवण्याच्या नादात महाराष्ट्र चे नुकसान होत आहे लोक नाराज होत आहेत हे त्यांच्या लक्षात नाही आलं. युती करून निवडणुका जिंकल्या होत्या.. सेने नी आपल्या आमदार ना विश्वासात घेवून . Bjp sarkar ल बाहेरून पाठिंबा दिला असता तर आज ही अवस्था झाली नसती. सरकार वर टीका पण करता आली असती आणि युती चे नियम पण मोडले गेले नसते. पाच वर्षाचा प्रश्न होता. डोई जड bjp झाली असती तर पाठिंबा काढून सरकार पण पाडता आले असते
  • Log in or register to post comments

हेच ते विदारक सत्य

चौकस२१२
गुरुवार, 06/23/2022 - 07:09 नवीन
युती करून निवडणुका जिंकल्या होत्या.. सेने नी आपल्या आमदार ना विश्वासात घेवून . Bjp sarkar ल बाहेरून पाठिंबा दिला असता तर आज ही अवस्था झाली नसती. सरकार वर टीका पण करता आली असती आणि युती चे नियम पण मोडले गेले नसते. पाच वर्षाचा प्रश्न होता. डोई जड bjp झाली असती तर पाठिंबा काढून सरकार पण पाडता आले असते सहमत। . पण तेव्हा कहहि करूँ मुख्यमंत्री आमचा म्हणुन अडुन बसले। .. आता घरचा आहेर मिळतोय। .. पण खपर फोडणार भाजपवर ! सर्वात हस्य्स्पद अणि घृणात्मक तेव्हा केले होते ते म्हणजे काय " बाळासाहेबांना दिलेल वचन पूर्ण केले सेनेचा मुख्यमंत्री " अरे उध्हवा हे वचन जर स्वबळावर किवा निदान १००+ मिळवून अणि मैग ऐटिट दूसरे ५० घेतले असतेस आणि पूर्ण केलं असतेस म्हणले गेले असते वचन पूर्ती म्हणून रे। ... आणि काय ती नाटक। .. - म्हणे रजिनमा तैयार आहे - वर्षा सोडताना रश्मि वाहिनी भावुक! ( आधी वर्षात घुसलात ते कपटी पनाने सत्ता घेऊन ,, ते विसरायचा " मातोश्री अलीवर आदित्य गाडीचे सु रूफ मधून उभे रहूं मुठी वळवून जणू मोठा विजय मिळवून ाल्यासारखा काय ! असो शेवटी काय बरमतीच्या काकांणी भाजप मैत्री ला मुठ माति दिली हेच ते विदारक सत्य कांग्रेस किवा भाजप ला बहुमत दया,,, उरलेल्या या दोघांनाही हाकला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

हेच ते विदारक सत्य

चौकस२१२
गुरुवार, 06/23/2022 - 07:09 नवीन
युती करून निवडणुका जिंकल्या होत्या.. सेने नी आपल्या आमदार ना विश्वासात घेवून . Bjp sarkar ल बाहेरून पाठिंबा दिला असता तर आज ही अवस्था झाली नसती. सरकार वर टीका पण करता आली असती आणि युती चे नियम पण मोडले गेले नसते. पाच वर्षाचा प्रश्न होता. डोई जड bjp झाली असती तर पाठिंबा काढून सरकार पण पाडता आले असते सहमत। . पण तेव्हा कहहि करूँ मुख्यमंत्री आमचा म्हणुन अडुन बसले। .. आता घरचा आहेर मिळतोय। .. पण खपर फोडणार भाजपवर ! सर्वात हस्य्स्पद अणि घृणात्मक तेव्हा केले होते ते म्हणजे काय " बाळासाहेबांना दिलेल वचन पूर्ण केले सेनेचा मुख्यमंत्री " अरे उध्हवा हे वचन जर स्वबळावर किवा निदान १००+ मिळवून अणि मैग ऐटिट दूसरे ५० घेतले असतेस आणि पूर्ण केलं असतेस म्हणले गेले असते वचन पूर्ती म्हणून रे। ... आणि काय ती नाटक। .. - म्हणे रजिनमा तैयार आहे - वर्षा सोडताना रश्मि वाहिनी भावुक! ( आधी वर्षात घुसलात ते कपटी पनाने सत्ता घेऊन ,, ते विसरायचा " मातोश्री अलीवर आदित्य गाडीचे सु रूफ मधून उभे रहूं मुठी वळवून जणू मोठा विजय मिळवून ाल्यासारखा काय ! असो शेवटी काय बरमतीच्या काकांणी भाजप मैत्री ला मुठ माति दिली हेच ते विदारक सत्य कांग्रेस किवा भाजप ला बहुमत दया,,, उरलेल्या या दोघांनाही हाकला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

परवापासून अग्नीपथ हा विषय

श्रीगुरुजी
Wed, 06/22/2022 - 22:15 नवीन
परवापासून अग्नीपथ हा विषय एकदम बंद झालाय.
  • Log in or register to post comments

प्रागज्योतिषपुर

निनाद
गुरुवार, 06/23/2022 - 05:56 नवीन
अवांतर: गुवाहाटीचे खूप नाव गाजते आहे. हे मूळ कामरूप साम्राज्याचे एक पुरातन शहर आहे. या गुवाहाटीचे जुने नाव प्रागज्योतिषपुर असे होते. यास प्राग्ज्योतिष किंवा प्राग्ज्योतिष-कामरूप असेही म्हंटले गेले आहे. हा हिंदू प्रदेश हजार वर्षांपेक्षा जास्त अजिंक्य राहिला. हे साम्राज्य सध्याच्या बांगलादेशाच्या भागातही पसरलेले होते. समुद्रगुप्ताच्या शिलालेखात या राज्याचा उल्लेख आहे असे म्हणतात. येथेच १६व्या शतकात अहोम हे हिंदू साम्राज्य अस्तित्त्वात आले. अहोम सेनापती लछित बडफुकन यांनी मुस्लिम आक्रमकांना असा धडा शिकवला की त्यांनी परत येथे येण्याचे धाडस केले नाही!
  • Log in or register to post comments

काही आमदार गुवाहाटीला जाणार नसले

कंजूस
गुरुवार, 06/23/2022 - 06:31 नवीन
तरी सभेतल्या पुढच्या एखाद्या ठरावास विरोधी मतदान करतील तर?
  • Log in or register to post comments

गुरुजी / क्लीन्टन / श्याम भा.

सुरसंगम
गुरुवार, 06/23/2022 - 06:59 नवीन
गुरुजी / क्लीन्टन / श्याम भा. साहेब, पण या बं. खो. नी इतर भाजपशाशित प्रदेश असताना गुवाहाटीच का निवडलं. इतक्या लांब का गेले.
  • Log in or register to post comments

श्रीगुरुजी / क्लीन्टन साहेब /

सुरसंगम
गुरुवार, 06/23/2022 - 07:00 नवीन
श्रीगुरुजी / क्लीन्टन साहेब / श्याम भा. साहेब, पण या बं. खो. नी इतर भाजपशाशित प्रदेश असताना गुवाहाटीच का निवडलं. इतक्या लांब का गेले.
  • Log in or register to post comments

कर्नाटक, गोवा, गुजरात ही

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/23/2022 - 08:31 नवीन
कर्नाटक, गोवा, गुजरात ही भाजपशासित राज्ये महाराष्ट्राला लागून असल्याने येथे आमदार असतील तर सेनेचे इतर काही नेते त्यांना प्रत्यक्ष भेटणे सोपे आहे. महाराष्ट्राच्या सीमैवरील छत्तीसगड, आंंध्र, तेलंगण या राज्यात भाजप सरकार नसल्याने तेथील राज्य सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळणे खूप अवघड आहे. आसाम महाराष्ट्रापासून सर्वाधिक अंतरावर आहे, तेथे भाजपचे सरकार आहे व तेथील मुख्यमंत्री हिंमता बिस्व सर्मा हे प्रति अमित शहा असून अत्यंत खमके आहेत. तेथे जाऊन या आमदारांना प्रत्यक्ष भेटणे जवळपास अशक्य आहे।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरसंगम

शरद पवार हे लॉबिंग करण्यात

शाम भागवत
गुरुवार, 06/23/2022 - 10:59 नवीन
शरद पवार हे लॉबिंग करण्यात अत्यंत कुशल आहेत. लॉबिंगसाठी भरपूर ओळखी व तिव्र स्मरणशक्ति लागते. यासाठी राष्ट्रवादी + कॉंग्रेस + शिवसेना या तिघांनाही संपर्कासाठी कमीत कमी वाव मिळेल असं ठिकाण निवडलं असावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरसंगम

धन्यवाद गुरुजी.

सुरसंगम
गुरुवार, 06/23/2022 - 09:06 नवीन
धन्यवाद गुरुजी. आता तर मुबंईतले इतर नेतेही जाऊन मिळाले. ही नक्की उठा ची चाल हे जाहीर आहे.
  • Log in or register to post comments

कुटिल राजकारण

क्लिंटन
गुरुवार, 06/23/2022 - 09:27 नवीन
उठा इतके कुटिल राजकारण खेळू शकतील असे वाटत नाही. इतकी जाण त्यांना असती तर मुळात त्यांनी ही परिस्थितीत उद्भवू दिली नसती. स्वतःच्या (पक्षाच्याही नाही) अल्पकालीन फायद्यासाठी दीर्घकालीन नुकसान आपण करून घेऊ नये हे त्यांना कळले नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरसंगम

संगीत खुर्ची आणि राजकारणातला सुसंस्कृतपणा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/23/2022 - 09:40 नवीन
मा. अटलबिहारी वाजपेयी यांचं तेरा पक्षांचं मिळून सरकार बनलेलं होतं तेव्हा मा. अटलजींचं लोकसभेतलं भाषण ' हम संख्याबल के सामने सर झुकाते है, और अध्यक्ष महोदय, मै अपना त्यागपत्र राष्ट्रपती महोदय को सोपने जा रहा हू ' असे म्हणून भाषण संपवलं आणि त्यांनी राजीनामा दिला. काल संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे असेच फेसबूक लाइव्हला लागले होते. राजकारणात सत्ता येते, सत्ता जाते. पण, काही माणसं कायम लक्षात राहतात. मा. अटलजी जसे लक्षात राहीले तसेच कालच्या भाषणामुळे मा.उद्धव ठाकरे कायम लक्षात राहतील. आजच्या राजकारणातले आक्रस्ताळपणे ओरड-आरड करणारे नेते पाहिल्यावर सुसंस्कृत आणि चतुर राजकारणी कसा असतो त्याचं एक उदाहरण म्हणून कालच्या भाषणाकडे पाहावे लागेल. 'या समोरासमोर बसून बोलू, आणि निर्णय घेऊ, मुख्यमंत्रीपद म्हणून नको असेल तर सोडतो. शिवसेनाप्रमुख म्हणून नको असेल तर तेही सोडतो' यात भावनिक आवाहन होते आणि चतुरपणाही होता. मतं- मतांतरे असू शकतील. बहुमत नसल्यामुळे मुख्यमंत्री राजीनाम्याची घोषणा करतील असे बहुसंख्यांकांचे अंदाज चुकले. आवाहानात 'शिवसैनिक मोठे आहेत, सत्ता नाही' असे आवाहन करुन 'ये मै जा रहा हू'ची आठवण झाल्याशिवाय राहीली नाही. अर्थात, राजीनाम्याची घाई करु नका. अजून कोणत्याच आमदारांनी राजीनामा दिलेला नाही. अजूनही महाविकास आघाडीचं संख्याबळ जशाच तसे आहे, हा सल्ला दिलेला असल्यामुळे त्यांनी धुरंदरपणे काल किल्ला लढवला. वर्षा निवासस्थान सोडल्यामुळे समर्थक पक्षांची चलबिचल झालीच असेल पण, फूटलेले मावळे शिंदे शिवसैनिक आहेत, हेही त्यांना माहिती आहे. आणि ज्या दिवशी आघाडीचं सरकार बनले त्याच दिवशी 'सत्तांतर' कधीही होऊ शकतं, हे त्यांना कळत नव्हते असे म्हणने म्हणजे मुर्खपणा ठरेल. राजकारणातला संयम आणि राजकीय खेळीसाठी जे कौशल्य लागतं ते कालच्या भाषणात दिसले. रस्त्या रस्त्यावर शिवसैनिकांनी केलेली पुष्पवृष्टी आणि त्यानिमित्ताने केलेले शक्तीप्रदर्शन महाराष्ट्राने एक उत्तम, सुसंस्कृत राजकारणी बघायला मिळाला. बाकी, पक्षीय गळती स्थिर झाल्यावर आकड्यांचा- कायद्यांचा खेळ कोणाला पायउतार करतो आणि कोणाला सिंहासन देतो त्या संगीत खुर्चीचा खेळ बघायला आपण सध्या मोकळे आहोत. सत्तेचं काय होईल ते माहिती नाही पण, मुख्यमंत्री साहेब, कालचं भाषण आवडलं. जय महाराष्ट्र. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

बिरुटे सर मा.अटलबिहारी

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 06/23/2022 - 09:54 नवीन
बिरुटे सर मा.अटलबिहारी वाजपेयींचे भाषण हे लोकसभेतील सभागृहात सर्व सदस्यांसमोर झाले होते. तो अगदी रणांगणात डोळ्यात डोळे घालुन छातीठोक पणे बोलण्याचा प्रकार होता. मा.उध्दव साहेब घरातुन निघालेही नाहीत आणि प्रत्यक्ष कोणासमोर न येता असे भाषण दिले. माझ्यामते हे भाषण वगैरे नसुन स्वतःला सहानुभुती मिळवुन केलेली तहाची बोलणी होती. भाजप इतर पक्षांसारखाच विधिनिषेध बाळगणार पक्ष असेल पण शिवसेनेची अवस्था पाहुन वाईट नक्कीच वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मताचा आदर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/23/2022 - 10:18 नवीन
मा. अटलजींचं ते भाषण काळजीपूर्वक ऐकलं तर त्यातही आकड्यांच्या खेळामुळे झालेला हताशपणा दिसतो, ते भाषण सहानुभूती मिळवणारंही होतं आणि तितकंच दमदारही होतं. ( हे माझं मत) ते भाषण मला कायम आवडतं. बाकी कालच्या भाषणाबद्दल मतं-मतांतरे असू शकतील. आपल्या मतांचा आदर आहेच. बाकी, भाजपाने सत्तेत असतांना शिवसेनेचा जो कायम अपमान केला, हीन वागणूक दिली. आणि शिवसेनेने सत्ता स्थापून अपमानाचा हिशेब पूर्ण केला. पण, ते करतांना शिवसेनेची आता पिछेहाट होतांना दिसते आहे. राजकारणात असे प्रत्येक पक्षाचे बॅडपॅच यायचेच आणि पुन्हा उभारी घेणेही येतेच. सत्तेच्या बाबतीत इथे कोणीच आणि कोणताच पक्ष अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला नाही, त्यामुळे राजकारणाच्या संगीत खुर्चीचा खेळ कायम असाच रंगणार आणि चालणार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

सुसंस्कृत आणि चतुर राजकारणी

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/23/2022 - 09:45 नवीन
सुसंस्कृत आणि चतुर राजकारणी कसा असतो त्याचं एक उदाहरण म्हणून कालच्या भाषणाकडे पाहावे लागेल. हे वाचून अजून हसतोय. शंका लघुशंका असला काहीतरी पांचट विनोद, लाकूडतोड्याची गोष्ट, रडतोंडीचा घाट या नावाचा रडकुंडीचा घाट असा चुकीचा उल्लेख असले भाषण सुसंस्कृत व चतुर राजकारण्याचे भाषण!
  • Log in or register to post comments

मी सर्वोत्कृष्ट पाच

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/23/2022 - 09:51 नवीन
मी सर्वोत्कृष्ट पाच मुख्यमंत्र्यांपैकी एक हे पण होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

इंजॉय करा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/23/2022 - 10:00 नवीन
अजून हसतोय
आपल्याही संस्थळावरील लेखन प्रवासात सभ्य- सुसंस्कृतपणा यावा (कधी कधी तो असतोही ) अशा मनापासून शुभेच्छा देऊन असेच, मनसोक्त हसा, हसत राहा. आरोग्यासाठी ते चांगलंही असतं. अशी अपेक्षाही व्यक्त करतो. ;) जय महाराष्ट्र. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

धन्यवाद! तुम्हालाही अशाच

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/23/2022 - 10:23 नवीन
धन्यवाद! तुम्हालाही अशाच शुभेच्छा देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कसले

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 06/23/2022 - 10:02 नवीन
कसले चतुर उद्धव.? ४० हुन अधिक आमदार तुम्हाला सोडुन जातात. त्यांच्या मनात काय चालु होते ह्याचा तुम्हाला थांगपत्ताही लागत नाही. हे एका-दोन महिन्यात झालेले नाही. ई.डी.च्या भीतीमुळे असे जे म्हणत आहेत ते मूर्ख म्हणावे लागतील. ३६/४० आमदारांना ई.डी.ची भिती?ह्याचा अर्थ सेनेचे बहुसंख्य आमदार भ्रष्ट आहेत असेच म्हणावे लागेल. "समोर येऊन बोला" असे सांगणे म्हणजे राजकारण तुम्हाला कळत नाही असेच म्हणावे लागेल. उद्धव ज्यांचा सल्ला घेतात ते शरद पवार समोर येऊन बोलतात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा