दुपारी भावड्याबरोबर खेळताना झालेल्या भांडणानंतर आईचा मार खाऊन छोटी आन्जी दिवसभर रूसून बसलेली. संध्याकाळी बाबा घरी आले की धावत जाऊन त्यांना बिलगली.
"काय झालं बबड्या?"
"मला तर वाटतं हा भावड्या नसताच तर बरं झालं असतं बाबा." आन्जी बाबांच्या कुशीत हुंदका देत बोलली.
रात्री जेवतानाही बाबांनी आन्जीला बळंच आणून बसवली. आई अजूनही जाणूनबुजून तिच्याकडे लक्ष देत नव्हती.
जेवायला सुरूवात झाली तसा भावड्या रडवेला होत आईला म्हटला, "आई! भोपळ्याची भाजी नाय ग आवडत मला." "खातोयस का मुकाट्याने, का देऊ धपाटा?" आई रागावून बोलली.
"हम्म, कशी मारतेस ग माझ्या भावाला? बघतेच की." आन्जी नाकपुड्या फुगवीत आईला बोलली आणि आई-बाबांना फिस्सकन हसू फुटलं.
प्रतिक्रिया
9 May 2022 - 10:10 pm | सुखी
+१
9 May 2022 - 10:36 pm | ब़जरबट्टू
मस्त !
9 May 2022 - 11:18 pm | सुक्या
+१
10 May 2022 - 11:18 am | सिरुसेरि
मस्त +१ . आईचा मार = ताईची माया .
10 May 2022 - 12:48 pm | श्वेता व्यास
+१
10 May 2022 - 1:17 pm | मोहन
+१
10 May 2022 - 1:54 pm | प्रचेतस
कथा अशी वाटलीच नाही.
10 May 2022 - 3:09 pm | अमरेंद्र बाहुबली
:( ही काय कथाय का? काहीही.
10 May 2022 - 3:43 pm | Bhakti
+१ छान भावंडांमधल प्रेम!
10 May 2022 - 3:54 pm | यश राज
+१
10 May 2022 - 4:22 pm | अमरेंद्र बाहुबली
फारच शामळू कथा आहे.
10 May 2022 - 8:43 pm | कपिलमुनी
ह्ये शामळू असेल तर तुम्ही लिहा एखादी तडक-भडक कथा !
11 May 2022 - 8:02 pm | अमरेंद्र बाहुबली
मी लिहीन हो. पण ह्या कथेत ट्विस्ट वगैरे काय होता? आणी फिस्सकन कस हसतात मुनिवर?? खुदकन हसणं माहीतीय. :)
12 May 2022 - 1:54 pm | चौथा कोनाडा
म्हणे ट्वीस्ट नाही !
असायलाच पाहिजे का ?
लोक ट्वीस्ट, धक्कातंत्र, सनसनाटीच्या आहारी गेलेत.
निरलस,निर्मळ, निरागसतेच्याबाबतीत संवेदनाहीन झालेआहेत!
बोथटपणा वाढत चाललाय !
12 May 2022 - 1:54 pm | चौथा कोनाडा
म्हणे ट्वीस्ट नाही !
असायलाच पाहिजे का ?
लोक ट्वीस्ट, धक्कातंत्र, सनसनाटीच्या आहारी गेलेत.
निरलस,निर्मळ, निरागसतेच्याबाबतीत संवेदनाहीन झालेआहेत!
बोथटपणा वाढत चाललाय !
12 May 2022 - 2:31 pm | अमरेंद्र बाहुबली
कथा मला फारच शामळू वाटली. म्हणजे महागुरू छाप. कथेचे नाव “बहीणीचे प्रेम आणी तिरूमला” असेकाहीतरी हवे होते. :)
12 May 2022 - 5:21 pm | चौथा कोनाडा
“बहीणीचे प्रेम आणी तिरूमला”
😃
13 May 2022 - 9:38 am | सुरसंगम
तुमच्यासाठी हा लहान पण खूप छान video
नक्की बघा.
https://youtu.be/ay4G2Q7RV7k
10 May 2022 - 8:42 pm | कपिलमुनी
+१
10 May 2022 - 8:57 pm | तर्कवादी
निरागस कथा आवडली.
10 May 2022 - 11:03 pm | सौन्दर्य
गोष्टीतील निरागसता, हळुवारपणा भावला म्हणून +१
11 May 2022 - 2:02 am | गामा पैलवान
+१
आंजी, येल्कंब्याक !
-गा.पै.
11 May 2022 - 4:53 am | नगरी
+1
11 May 2022 - 6:08 am | निनाद
+१
11 May 2022 - 11:38 am | चांदणे संदीप
+१
सं - दी - प
11 May 2022 - 8:41 pm | चौथा कोनाडा
+१
छान, निरागस.
धक्कातंत्र नसलेली शशक ही अशीही उत्तम असू शकते !
12 May 2022 - 3:56 am | लोथार मथायस
+१