शेन वॉर्नची अकाली एक्झिट

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
4 Mar 2022 - 11:17 pm

1

आत्ता लेट तिशीत असलेल्या पिढीचं नव्वदीतलं बालपण, शेन वाॅर्न या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, इतकं मोठं वलय त्या नावामागे होतं. बहुतेकांच्या स्मरणात शेन वाॅर्न म्हणजे शारजातला कोका-कोला कप, धुळीचे वादळ, सचिनने पुढे सरसावत मिड ऑनला मारलेले षटकार, इतकंच असेल, पण सच्च्या क्रिकेटवेड्या लोकांच्या हा फिरकीचा जादूगार कायम स्मरणात राह्यला, तो त्याच्या जादूई लेगस्पिनमुळे.

सचिन आणि शेन वाॅर्नच्या रायव्हलरीत भलेही सचिन सरस ठरला असेल, पण शेन वाॅर्नचे विकेट्सचे आकडे आणि क्रिकेट खेळणाऱ्या जवळपास सर्वच देशांविरूद्धची त्याची अफाट कामगिरी, ऑस्ट्रेलिया, भारतीय उपखंड, इंग्लंड, न्यूझीलंडमधील प्रत्येक मैदानावर त्याने दाखवलेली लेगस्पिनची कमाल यामुळे, तो नकळत दिग्गज क्रिकेटर्सच्या पंक्तीत जाऊन बसला.

माईक गॅटींगचा काढलेला बोल्ड विस्फारल्या डोळ्यांनी बघताना पिचवर, हातभर बाॅल वळवणं म्हणजे काय, हे शेन वाॅर्नने त्याच्या मनगटी फिरकीने दाखवून दिलं होतं. अगदी तसाच एमएसके प्रसादचा ढुंगणामागून काढलेला बोल्डही आयुष्यभर न विसरता येण्याजोगा. ज्याने आपल्या खेळातून सच्च्या क्रिकेट चाहत्याला कायमच मनमुराद आनंद देण्याचे काम केलं.

असा शेन वॉर्न आपल्यातून आज अचानक अकाली निघून गेला.

अशा सर्वकालीन उत्कृष्ट लेगस्पिनर शेन वाॅर्नला भावपूर्ण श्रद्धांजली!!

समाजबातमीमाहिती

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Mar 2022 - 11:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जगप्रसिद्ध फिरकीपटू शेन वॉर्न गोलंदाजीला आला म्हणजे आपल्या विकेट्स काढणार अशी एक धाकधुक तो गोलंदाजीला आला म्हणजे असायची. सचिनने त्याला धु धु धुतल्यावर सचिन मला स्वप्नातही धुतोय असे खेळाडूवृत्तीने सांगणारा, हातभर बॉल आत-बाहेर काढत आपल्या एका ख़ास शैलीत छोट्याशा रनप घेऊन गोलंदाजी करणारा, आपले कपाळावर येणारे केस बोटांनी मागे ढकलणा-या या जगप्रसिद्ध क्रिकेटपटूची अशी अचानक एक्झिट दुःखद आहे. कायम स्मरण राहील. भावपूर्ण श्रद्धांजली.

-दिलीप बिरुटे

शब्दच नाहीयेत, एकदम अचानक.. :(

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Mar 2022 - 9:04 am | ज्ञानोबाचे पैजार

रिस्ट बँड लावलेले त्याचे ते जाडजुड मनगट आणि त्या मनगटाच्या जोरावर हातभर वळवलेला चेंडू खेळताना भल्या भल्यांची हबेलांडी उडताना पहायला मजा यायची.

जगातल्या कुठल्याही मैदानावर चेंडू वळावण्याची ताकद असलेले दोनच गोलंदाज, एक मुरली आणि दुसरा शेन वॉर्न. संपूर्ण क्रिज चा तो यथेच्च वापर करायचा.

फलंदाजावर दबाव आणण्याकरता कोणत्याही थरला जायला तो मागे पुढे पहायचा नाही. विचित्र फिल्डिंग लावणे, खोटी अपिल करणे इत्यादी तो बिनदिक्कत करायचा.

सचिनची आणि त्याची जुगलबंदी बघायला मजा यायची. सचिन अतिशय सहज पणे त्याला खेळून काढायचा.

पण एकदा त्याला सेहवागनेही खुप दमवले होते. मला आठवते ती सेहवागची चेपॉकच्या मैदानावरची खेळी. इरफान पठाणच्या साथीने त्याने यशस्वी पणे किल्ला लढवला होता. आपल्या नैसर्गिक खेळाला मुरड घालून संघाकरता खेळणारा सेहवाग आणि त्याची विकेट काढण्यासाठी जीवापाड धडपड करणारा शेनवॉर्न अजूनही लक्षात आहेत.

तो जिकडे कुठे असेल तिकडे मजेत असेल.

पैजारबुवा,

वाईट बातमी. फार अकाली.

त्याचा तो बॉल ऑफ द सेन्च्युरी, ९० अंश वळलेला. त्याचा व्हिडो शोधणे आले.

प्रचेतस's picture

5 Mar 2022 - 9:44 am | प्रचेतस
गवि's picture

5 Mar 2022 - 4:19 pm | गवि

धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Mar 2022 - 4:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, काय बॉल वळायचे याचे. आपल्याकडे असे फक्त आपल्या पिढीत, नरेंद्र ( हे राम) हिरवाणीचेच चेंडु असे असे वळतांना पाहिले. अनिल कुंबळेचे बॉल टाकतांना हातपाय सगळे वाकडे तिकडे वळतात, पण बॉल देवाच्या भरवशावर वळाले तर वळाले. भज्जी पण तसाच, त्याची तर मला फार दया येते. बाकी, कधी कधी कुंबळे लेग ब्रेक वगैरे भारी टाकायचा पण, पण फिरकी म्हटलं की बॅट्समन नुसता नाचत राहीला पाहिजे, असे माझे व्यक्तीगत मत आहे. आणि ते नाचवले शेन वॉ यांनी काय म्हणता ?

-दिलीप बिरुटे

श्रीरंग_जोशी's picture

5 Mar 2022 - 9:51 am | श्रीरंग_जोशी

क्रिकेटमधे डावखुरे फलंदाज व लेगस्पिन गोलंदाजी करणारे फिरकीपटू नैसर्गिकपणे इतरांपेक्षा अधिक कलात्मक वाटतात. शेन वॉर्नच्या गोलंदाजीमधे यांत्रिकपणपेक्षा कलात्मकता ठासून भरलेली आहे असे जाणवत राहायचे. हाडाच्या क्रिकेट रसिकांना खेळाचा मनमुराद आनंद शेन वॉर्नची गोलंदाजी पाहताना पुरेपूर मिळत राहायचा. विश्वचषकांमधले महत्त्वाच्या सामन्यांतही अवघड परिस्थितीत मोक्याच्या क्षणी बळी घेऊन शेन वॉर्न सामन्यांचे पारडे ऑस्ट्रेलियाकडे झुकवायचा.

त्याच्या अकाली मृत्यूमुळे दु:ख झाले. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली.

ऐनवेळी या विषयावर केलेले थोडक्यात पण संतुलित संतुलित लेखन भावले.

गामा पैलवान's picture

5 Mar 2022 - 7:58 pm | गामा पैलवान

शेन वॉर्न यास श्रद्धांजली.

गेल्या ऑगस्टात तो करोनामुळे रुग्णालयात दाखल होता. त्या वेळेस श्वासोत्तेजकही लावला होता. कदाचित लस दिलेली असू शकते. त्या लशीच्या दुष्परिणामामुळे जीव गेलेला असू शकतो. करोनालशीपायी हृदयाचा दाह होऊन हृत्शूल बळावून ( हार्ट अॅटॅक येऊन ) जीव गेल्याच्या असंख्य घटना घडल्या आहेत. तीव्र चयापचय असलेले खेळाडू, तरुण वगैरे गटांत याचे प्रमाण अधिक आहे.

ज्योकोव्हिचने लस नाकारून चांगला पायंडा पाडला आहे.

-गा.पै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Mar 2022 - 6:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लशीचं थोतांड तुम्ही इकडे पण आणले का ? अहो लस घेतलेल्या लोकांना सुखाने जगू द्या....!

-दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके's picture

6 Mar 2022 - 8:16 pm | धर्मराजमुटके

लस घेतलेल्या माणसांचे किंवा मदणबाण यांचे जालिय अस्तित्त्व जोपर्यंत आहे तोपर्यंत बहुधा लस घेतल्याबद्द्ल सतत टोचून घ्यावे लागणार ! :)

धर्मराजमुटके's picture

6 Mar 2022 - 8:17 pm | धर्मराजमुटके

लस घेतलेल्या माणसांचे किंवा गा.पै. यांचे जालिय अस्तित्त्व जोपर्यंत आहे तोपर्यंत बहुधा लस घेतल्याबद्द्ल सतत टोचून घ्यावे लागणार ! :)
स्वसंपादनाची सुविधा नसल्यामुळे मदणबाण माफ करतील अशी अपेक्षा आहे.

मुक्त विहारि's picture

6 Mar 2022 - 7:06 pm | मुक्त विहारि

त्यामुळे, लशीचा कुठल्या माणसावर, काय परिणाम होतो? हे सांगता येत नाही ...

त्यामुळे, तुमच्या तर्काला ठाम नकार देता येत नाही...

कुणाला दोन पेग दारू पुरते तर कुणाला 14 पेग ... हो ... 14 पेग रिचवणारा बघीतला आहे ...

जेम्स वांड's picture

8 Mar 2022 - 8:39 am | जेम्स वांड

कदाचित तुम्हीच चौदा पेग रिचवले असतील, फुकट मिळाल्यावर काय दारू काय बिसलेरी ! अन काय नीट !

(कृ ह घ्या हो मुवि)

जेम्स वांड's picture

8 Mar 2022 - 8:49 am | जेम्स वांड

कदाचित लस दिलेली असू शकते.

तुम्ही एकंदरीत मजेशीर माणूस असल्याचे वाटत असे, आज कन्फर्म झाले बुआ एका कदाचितवर अख्खी ष्टोरी ! तुम्ही ज्या गतीने कॉन्स्पिरसी थेअरी प्रसवता ते पाहता आपण पटकथा लेखक व्हायला हवे होतात.

&#129315 &#129315 &#129315 &#129315

गामा पैलवान's picture

10 Mar 2022 - 8:32 pm | गामा पैलवान

जेम्स वांड,

फक्त शक्यता व्यक्त केली त्यास तुम्ही आख्खी ष्टोरी म्हणता?

बाकी, मी मजेशीर माणूस आहेच. जिवंत राहायचं असेल तर थोडीफार मजा करायला हवीच, असं माझं मत आहे.

आ.न.,
-गा.पै.

उत्खनक's picture

5 Mar 2022 - 10:17 pm | उत्खनक

काय अफाट कलाकारी ती! कमालीचा खडूसपणा भरलेला पण त्यामागची ती कलाकारीची दमदार बैठक नजाकत द्यायची!
भारतीय उपखंडात त्यामानानं कमी चालला वॉर्न पण बाकी जगात धुमाकूळ घातलेला त्यानं. बिरुटेसर वर म्हणतात तसे अगदी अक्षरशः बोटांवर नाचवायचा तो!
आज पेपरातच वाचली डायरेक्ट बातमी... जबर धक्का बसला. आणि जायच्या १२च तास आधी म्हणे त्यानं रॉडनी मार्शना श्रद्धांजलीचं ट्वीट केलेलं होतं. चटका लावून जाणारा शेवट.. :-(

अत्रुप्त आत्मा's picture

5 Mar 2022 - 11:04 pm | अत्रुप्त आत्मा

जादूगार . ग्येला. :(

उगा काहितरीच's picture

6 Mar 2022 - 8:34 am | उगा काहितरीच

श्रद्धांजली!
कधी काळी शेन वॉर्नची नक्कल करत बॉलींग टाकत होतो. खरंच एक महान बॉलर होता तो. मुरली पेक्षा कधी पण तोच आवडत होता. कागदावर कदाचित मुरली असेल सरस पण माझा आवडता बॉलर म्हणजे वॉर्न!

श्रीगणेशा's picture

6 Mar 2022 - 8:39 pm | श्रीगणेशा

गल्ली क्रिकेटमधे मीही बऱ्याचदा शेन वॉर्नची नक्कल करायचो.
मुरलीधरनच्या ऑफस्पिनपेक्षा शेन वॉर्नची लेगस्पिन गोलंदाजी जास्त जादुई वाटायची.

श्रद्धांजली _/\_

सौंदाळा's picture

7 Mar 2022 - 12:35 pm | सौंदाळा

श्रद्धांजली!
फिरकीचा जादूगार आणि ज्याने भारताच्या कितीही विकेट घेतल्या तरी त्याचा राग आला नाही कधीच. (मॅकग्रा, गिलेस्पी, ली, कस्प्रोविच वगैरेच्या बाबतीत असे कधी वाटले नाही)
रविंद्र जडेजाला पैलु पाडण्याचे काम पण पहिल्या आयपील सिझन मधे वॉर्नने केले.
आजच वॉर्नच्या हॉटेलमधील खोलीत आणि टोवेलवर रक्ताचे डाग सापडले अशी बातमी वाचली. त्यामुळे घातपाताचा संशयपण आहे आणि त्या दिशेने तपास केला जाईल.

श्रीरंग_जोशी's picture

11 Mar 2022 - 11:04 pm | श्रीरंग_जोशी

ते रक्ताचे डाग सीपीआर देताना झालेल्या जखमेमुळे होते असे परवा एका बातमीत वाचले होते. आता पटकन ती बातमी सापडली नाही.
स्थानिक पोलिसांनी चौकशीअंती शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणांनीच झाला आहे हे स्पष्ट केले आहे - Shane Warne died of natural causes - Thai police .

जेम्स वांड's picture

8 Mar 2022 - 8:46 am | जेम्स वांड

गोलंदाजी असो, खाणे अन खासकरून पिणे असो, लफडी कुलंगडी करणे असो पोरी फिरवणे असो वा मैत्री करणे निभावणं असो,

वॉर्न वॉज वॉर्न !

प्रोफेशनली अमेझिंग माणूस च्यामारी. इतका की ब्रॅडमनने आपल्या नव्वदाव्या वाढदिवशी दोनच क्रिकेटर्स बोलवले होते, एक तेंडुलकर अन दुसरा वॉर्न !

वॉर्नी, रेस्ट इन पीस मेट !

.

पी महेश००७'s picture

11 Mar 2022 - 8:04 pm | पी महेश००७

खेळपट्टी कशीही असो, पण त्याचा लेग स्पिन त्याच्या मनगटातच होता... जादूई फिरकीचा बादशाह

गामा पैलवान's picture

29 Mar 2022 - 7:43 pm | गामा पैलवान

लोकहो,

शेन वॉर्नचा मुलगा जॅकसन वॉर्न याने बापाच्या मृत्यूसाठी लशीस जबाबदार धरलं आहे. इंग्रजी बातमी बातमी ( हटवलेली ) : https://principia-scientific.com/son-of-cricket-legend-shane-warne-blame...

वरील बातमीची प्रतिराशी ( गूगल क्याश ) : https://webcache.googleusercontent.com/search?q=cache:tsLvb2YQz0UJ:https...

प्रतिराशी गूगलकडून उडवली जाण्याआधी लेख वाचून घ्या. अन्यथा माझ्याकडे दुसरी प्रत आहे.

जॅकसन वॉर्नचं चलचित्र : https://www.thetruthseeker.co.uk/wordpress/wp-content/uploads/2022/03/VI...

वरील बातमी व चलचित्रानुसार करोनाची लस घेतल्यावर शेन वॉर्नास छातीदुखी सुरू झाली. तिच्यावर उपचार घेण्यासाठी म्हणून तो थायलंडात गेला. तिथे त्याची प्रकृती अचानक गंभीर होऊन तो वारला. काही तासांपूर्वी रॉडनी मार्श हा माजी क्रिकेटपटूही अशाच काही कारणाने वारला होता. जॅकसन वॉर्नच्या म्हणण्यानुसार त्याचा बाप शेन हा व्यवस्थाग्रही ( सिस्टीम सपोर्टर ) होता. त्यानुसार शेनने लस घेतली होती. आणि नेमकी तीच उलटली.

जॅकसन वॉर्न पुढे म्हणतो की प्रस्थापितांतील उच्चपदस्थांना ही लस नसून विष आहे हे माहित आहे. मग त्यांनी लस नाकारायला हवी होती. पण ते ही दिसंत नाही. म्हणजे तो सूचित करतोय की, लस घेणारे प्रस्थापित उच्चपदस्थ डोक्याने बथ्थड आहेत.

तुम्ही हा संदेश जर वाचू शकंत असाल तर तुम्ही जिवंत आहात. तुमचा लशीचा ढोस घेऊन बहुधा बरेच दिवस झाले असावेत. त्यामुळे ती लस आतापावेतो विरून गेलेली असावी. म्हणजेच तुम्ही धोक्याबाहेर आहात. फक्त परत या झंझटात पडू नका. बाकी चालू द्या.

आ.न.,
-गा.पै.

चौकस२१२'s picture

30 Mar 2022 - 4:51 am | चौकस२१२

एकीकडे युक्रेन वर एवढा विचार पूर्वक लेख आणि एकीकडे हि भलती "कॉन्स्पिरसी" थेअरी .. अजब !

उग्रसेन's picture

30 Mar 2022 - 12:19 pm | उग्रसेन

तुम्ही हा संदेश जर वाचू शकंत असाल तर तुम्ही जिवंत आहात. तुमचा लशीचा ढोस घेऊन बहुधा बरेच दिवस झाले असावेत. त्यामुळे ती लस आतापावेतो विरून गेलेली असावी. म्हणजेच तुम्ही धोक्याबाहेर आहात.

देवा पांडुरंगा ! कसं सुचतं यांना इतकं जीवघेणे लिहायला. तीसरा बुष्टर ढोस घ्यायचा कंफिडंस लूज झाला हे सगळं वाचून.

गामा पैलवान's picture

30 Mar 2022 - 6:43 pm | गामा पैलवान

बाबुराव,

फक्त एकंच कॉन्फिडन्स अंगी असू द्या. तो म्हणजे कोणी कोव्हिडच्या लशीचं नाव काढलं तर त्याच्या कानाखाली जोरदार जाळ काढायचा कॉन्फिडन्स.

यापेक्षा तुम्हांस इतर कशाचीही जरुरी नाही. कोव्हिड लशीची तर नाहीच नाही.

आ.न.,
-गा.पै.

तुम्ही आजपर्यंत किती कानाखाली जाळ काढलाय खरोखर.
आपल्या भावना बघता एव्हाना वडवानल पेटला असेल राणीदेशात.

फक्त परत या झंझटात पडू नका. बाकी चालू द्या.
हे विधान अतिशय बेजबाबदार आहे
असले मिपावरचे संदेश ना लक्षात घेता लोकांनी आप लया देशातील वयद्यकीय सल्ला लक्षात घयावा .. सुन्यास अधिक सांगणे ना लागे

गामा पैलवान's picture

30 Mar 2022 - 6:40 pm | गामा पैलवान

तरुण खेळाडू पोरं हार्टअॅटकने कशी टपाटप मरताहेत ते वाचून पहा (इंग्रजी दुवा) : https://newspunch.com/three-fully-jabbed-top-cyclists-suffer-major-heart...

आणि म्हणे तत्ज्ञांना माहित नाहीये cardiac arrhythmia मागचं कारण काय आहे ते. घ्यायचा का डॉक्टरांचा सल्ला ? घंटा तिच्यायला कोव्हिडचा सल्ला!

लस हे एक जैविक हत्यार आहे. तुम्हाआम्हाला ठार मारण्यासाठी खास विकसित केलेलं. घ्यायचंय टोचून?

-गा.पै.

यंदा तब्बल १५ खेळाडूंनी मायामी मास्टर्स टेनिस स्पर्धेतून अंग काढून घेतलंय ( इंग्रजी दुवा ) : https://thelibertydaily.com/buried-bombshell-tennis-world-rocked-as-fift...

लशीचे दुष्परिणाम उघड दिसंत असतांना सगळी वर्तमानपत्रं मूग गिळून गप्प बसलीत. घ्या सुया टोचून अन व्हा जायबंदी.

-गा.पै.