D I Y घरगुती दुरुस्ती

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
17 Nov 2021 - 12:29 pm

DIY
घरगुती दुरुस्ती

माइक्रोवेव अवनची panel buttons काही बंद पडलेली. पण स्टार्ट बटन चालत होते. तसंच काम भागत होते. पण परवा तेही बंद पडल्यावर रिपेरिग करणे आले. आता आठ दहा वर्षांनी नवीन panel सर्वच मॉडेल्सची मिळतीलच असं नाही.
यूट्यूबवर काही विडिओज पाहिले. मग उघडून फॉल्ट सापडला. बटणाच्या वायरी प्रिंटेड सर्किटमधून एका कनेक्टिंग रिबनने जोडल्या आहेत . त्याच्या लीडस आणि बटण यांमध्ये ब्रेक सापडला. जंपर वायर जोडल्या आणि सर्व बटन्स चालू झाली.
फोटो

२.
ऐन दिवाळीत टीवी स्क्रीनवर आडव्या लाईन्स आणि फ्लिकरिंग सुरू झाले. दिवाळीमुळे चमचम रोषणाई विजेच्या माळा लावल्या जातात त्यानेही होऊ शकते. पण नंतरही तसेच राहिले. उघडून पाहिल्यावर समजले की बटणाच्या वायरी एका कनेक्टिंग रिबनमधून जिथे जोडल्या होत्या त्यात कनेक्शन लीड्स गंजले आहेत. ते उघडून जरा स्वच्छ केल्यावर फॉल्ट क्लिअर झाला. ( हल्ली सीआरटी पिक्चर ट्यूबवाले जुने टिवी नसतात ,त्यात वरच्या बाजूला ट्यूबवर बंद असतानाही इलेक्ट्रिर चार्ज असतो. एलसीडी/एलईडी स्क्रीनवाल्या टीवीत हा धोका नसतो.)

वापरलेली उपकरणे
साधा कृन्टिन्युईटी टेस्टर
सोल्डर गन २५ वॉट.,
सोल्डर वायर, फ्लक्स पेस्ट.
जंपर वायर . फ्लेक्सिबल कोटेड वायर.
चाकू, स्क्रू ड्राइवर,
ब्रश, चिकटपट्टी.

____________
सूचना
इलेक्ट्रिकची कामे आहेत. कुणाच्या मार्गदर्शनाखाली काम करावे.

चुका आणि सूचनांचे स्वागत.

प्रतिक्रिया

आग्या१९९०'s picture

17 Nov 2021 - 1:00 pm | आग्या१९९०

छान माहिती.
खराब झालेले कॅल्क्युलेटर, रिमोटचे बटन पॅनल जपून ठेवतो. जुगाड कामाला उपयोग होतो.

मुक्त विहारि's picture

17 Nov 2021 - 5:45 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

जेम्स वांड's picture

19 Nov 2021 - 1:35 pm | जेम्स वांड

त्यामुळे ह्यापेक्षा सामान किंवा स्पेयर्स नवीन घेतलेले परवडतात मला तरी.

आमच्या इथे चार दुकानं आहेत टीवी,वाशिंग मशिन वगैरे इलेक्ट्रॉनिक गुड्सचे पार्टस मिळू शकणारी. पण बरीच वर्षे झाली की स्पेअरस नसतात. २००८ मधलं टीवीएस कंपनीचं बुश कुठे मिळणार. मग तात्पुरते रबर लावले.

बऱ्याच इलेक्ट्रिक उपकरणातला पावर सेक्शन बंद पडतो. SMPS .Mechanic लोक काही वेळा ते युनिट काढून नेतात व दुसरे बसवतात. पण प्रत्यक्षात मॉसफेट ( २०रु) गेलेला असतो.

कपिलमुनी's picture

24 Nov 2021 - 10:16 pm | कपिलमुनी

गेलेले स्पेयर पार्टस नेहमी स्वतःकडे ठेवावेत.

सुक्या's picture

25 Nov 2021 - 2:50 am | सुक्या

ईबे वर बहुदा खुप जुन्या गुड्सचे पार्टस मिळू शकतात. पार्ट नंबर वगेरे किंवा मॉडेल नं वगेरे असेल तर सोपे पड्ते. मी माझ्या घारातले डिशवाशर / ड्रायर असेच पार्ट विकत आणुन दुरुस्त केले आहेत. रग्गद पैसा वाचतो.

काही टारगट मुलांनी भोपळे फेकल्यामुळे माझ्या गाडीचा रेअर व्हिव्यु मिरर तुटला होता. मेकॅनिक ला विचारले तर त्याने पार्ट / मजुरी मिळुन ७०० डॉलर सांगितले. ईबे वर तोच आरसा ७०डॉलर ला मिळाला शिपिंग धरुन १०५ डॉलर. मग काय घरच्या घरी बसवला.

D I Y आलेच पाहिजे ... नाहीतर तासाच्या भावाने पैसा मोजावा लागतो.

श्रीरंग_जोशी's picture

25 Nov 2021 - 2:54 am | श्रीरंग_जोशी

तुम्ही माफक किमतीत रिअर व्ह्यू मिरर स्वतः बदलू शकला हे चांगलेच आहे. पण तुमच्या कार इन्शुरन्समधे हे कव्हर होऊ शकले असते. अर्थात डिडक्टीबल जर $२५० किंवा $५०० असल्यास खिशातूनही अधिक पैसे गेले असतेच.

चौकस२१२'s picture

25 Nov 2021 - 6:47 am | चौकस२१२

३ डि प्रिंटिंग मुले बंदुक बनवणे / बदलणे इत्यादी गोष्टी सहज शक्य होत आहेत त्यामुळे सरकार कावलेले आहे (अर्थात ज्या देशात बंदूक बाळगणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे बर्याचजणांना वाटते तिथे बोलणेच खुंटले ...)

जेम्स वांड's picture

25 Nov 2021 - 11:47 am | जेम्स वांड

D I Y आलेच पाहिजे ... नाहीतर तासाच्या भावाने पैसा मोजावा लागतो.

तुम्ही बहुतेक अमेरिकेत राहता, अमेरिका किंवा इतर फर्स्ट वर्ल्ड कंट्रीजमध्ये लेबर आणि इतर किमती अफाट असल्यामुळे डी आय वाय यायलाच हवे हे पटण्यासारखे आहे, पण भारतात ती परिस्थिती नाही, मुंबईचा एखाद सिम्पल चाकरमानी माणूस पहा, येण्याजण्याची वेळ धरून दिवसाला १२-१२ तास रोजीरोटीत मोडतात, वीकएंड कल्चर म्हणलं तरी आठवडाभर बापाच्या/मुलाच्या/भावंडांच्या प्रेमाला मुकलेल्या कुटुंबियांना पण वेळ द्यावा लागतो अश्यात जर माणूस स्पॅनर अन प्लायर अन सोल्डर गन घेऊन बसला तर काय अर्थ उरेल, सेकंडली

भारतात स्वस्त मजूर, मिस्त्री, स्पेयर्स सगळेच मिळते, कल्चर जुगाड चे आहे इथे, ह्या जुगाडवर कित्येक लोक पोसले जातात, रिप्लेसमेंट पेक्षा रिपेयरवर भिस्त जास्त आहे, तुटलेले फायबरचे पॅनल बरोबर क्रॅकवर क्रॅक लावून गरम लोखंडी पट्टीने सांधणाऱ्या "प्लॅस्टिक वेल्डर"ला पण बघितलं आहे मी ह्याची डोळा गोवंडीत ! त्यामुळे परिस्थिती अनुरूप डी आय वाय येणे उत्तम असले तरी प्रत्येकाला आवड अन मुख्य म्हणजे प्रत्येक परिवेषात त्याची गरज उरेलच असे नाही.

कंजूस's picture

25 Nov 2021 - 2:00 pm | कंजूस

ज्याला करावंसं वाटतंय त्यांच्यासाठी आहे. पण ती चळवळ काही ठिकाणीच आहे.

सुक्या's picture

25 Nov 2021 - 2:52 pm | सुक्या

अमेरिका किंवा इतर फर्स्ट वर्ल्ड कंट्रीजमध्ये लेबर आणि इतर किमती अफाट असल्यामुळे

तसे काही नाही. ईथे जर लायसन्ड कारागीर हवा असेल तर तो जास्त भावाने पैसा घेतो. एखादी कंपणी चा माणुस हायर केला तर तो अजुन जास्त महाग पडतो. पण जर कमी पैसे घेणारा कारागीर निवडला तर तो कामही तसेच थातुर मातुर करतो. भारतातही हेच आहे. मजुर स्वस्त मिळतो पण मग काम ही जुगाडी करुन जातो. त्यांच्या मानगुटीवर बसुन काम करुन घेतले नाही तर कधी कधी तर डोक्याला हात मारायची पाळी येते. माझ्या वाकड च्या घरात गॅस पाईपलाईन भिंतीला भोक न पाडता पठ्ठयाने खिडकीच्या काचेला भोक पाडुन घरात आणली होती . वरुन "भिंत कशाला तोडता साहेब, जास्त काम वाढेल" असेही ऐकवले होते ... सांगुन वेळेवर येणारा प्लंबर मला अजुन भेटायचा आहे . .

बाकी D I Y मधे घरच्यांना सामील करुन घेतले तर अजुन मजा येते. मी माझ्या घराचे आतले रंगकाम असेच सगळ्यांनी मिळुन केले. ३/४ वीकएंड लागले काम पुर्ण व्ह्यायला पण सगळ्यांनी मस्त मजा करत काम केले .. त्यामुळे कुटुंबियांना वेळ द्यायचा असेल तर स्पेशली असे काही करावे लागत नाही ... कुठलीही गोष्ट करताना सगळ्यांनी मिळुन केली की त्यात जास्त मजा येते ...

अमेरिका किंवा इतर फर्स्ट वर्ल्ड कंट्रीजमध्ये लेबर आणि इतर किमती अफाट असल्यामुळे

तसे काही नाही

असे का म्हणताय कळत नाही
तसेच आहे बहुतेकदा .. म्हणजे कायद्या नुसार जायचे तर,, लायसंन नसलेला कामगार आणि तशी कामे करून घेणें इकडे अगदीच नाहीत असे नाही पण फार कमी लोक त्या फंदात पडतात कारण पुढे इन्शुरन्स चा प्रश्न असतो .. चार अणे वाचवतांना १०० रुपये चा फाटक बसू शकतो
अमेरिकेतील माहित नाही कारण तिथे यूरोप किंवा ऑस्ट्रेल्यात चाय मामाने "सेमी स्किलंड) लेबर ला पगार थोडा कमी आहेत बहुतेक , येथील कमीत कमी तशी दर आहे $२०. ३३ गुणिले ५२ = १०४८ रुपये / अमेरिकेत आहे $८. ते १३ गुणिले ७२ = ९३६ रुपये
याशिवाय अमेरिकेत कमी पैशात काम करणाऱ्या "इलिगल" मैग्रंट ची संखय त्यामानाने जास्त आहे

उदाहरण म्हणून घेऊयात
१ स्प्लिट एअर कोंडिश्नर ची किंमत १००० असेल ( मशीनची) तर ती बसवणायसाठी येथे, इलेकट्रिशिअन आणि गॅस प्लंबर दोन्ही लागते त्याची किंमत $७०० चाय आसपास म्हजे ७०%
अमेरिकेत किती सांगा %
भारतात कसे आहे गणित? मूळ युनिट चाय किमतीच्या %वारीत किती
अर्हताःत हा मुद्दे हि आहे कि भारत , सिंगापोरे सारखया ठिकाणी एखाद्या अत्यंत व्ञ्स्त असणाऱ्य व्यक्तीने डी आय वाय शिकले पाहिजेच असे नाही म्हणा .. ती व्यक्ती म्हणेल अरे मी लाखाचा पोशिंदा आहे माझा एक तास फार किमती आहे ! ठीक आहे देश तसआ वेष
फक्त थोडे तरी स्वालंबन असावे आणि उद्या कुठे दुसरया देशात अहसानाक जावे लागले तर असह्य छोटया प्रसंगांना तोंड देता आलं लेपाहिजे
उदाह - बेसिन नळाचे वॉशर बदलणे - फ्लाय स्क्रीन बदलणे - रंग देणे - बागकाम - डिश वॉशर आणि वॉशिंग मशीन नवीन आणल्यास ते जोडणे

जेम्स वांड's picture

26 Nov 2021 - 7:37 am | जेम्स वांड

ती व्यक्ती म्हणेल अरे मी लाखाचा पोशिंदा आहे माझा एक तास फार किमती आहे ! ठीक आहे देश तसआ वेष
फक्त थोडे तरी स्वालंबन असावे आणि उद्या कुठे दुसरया देशात अहसानाक जावे लागले तर असह्य छोटया प्रसंगांना तोंड देता आलं लेपाहिजे

म्हणूनच मी वरती सुक्या ह्यांचे डी आय वाय पटण्यासारखे आहे असेच म्हणतोय.

सुक्याजी म्हणतात की फॅमिलीला त्यात सहभागी करून घ्यावे, अन जर त्यांना इंटरेस्ट नसेल तर ? उगाच त्यांच्या प्लॅन्सला सुरुंग लावून काय हशील, बायकोला काय सांगणार ? घाल खड्ड्यात ते मरीन ड्राईव्ह अन जुहू बीच भर भित्ताडात लांबी ! अगदीच तिसरे महायुद्ध प्रकरण व्हायचे हो ते.
&#129315 &#129315 &#129315 &#129315

(हलके घेणे वाद म्हणून नाही मेंटलिटीतला फरक अन संभावित फॅमिली प्रेफ्रांसेस वर बोलतोय, तुमच्या मतांचा आदर कायमच असेल :) )

सुक्या's picture

27 Nov 2021 - 12:50 pm | सुक्या

हा हा हा वांडोजी . .
तिसरे महायुद्ध होईल अशी परीस्थीती निर्माण झाली तर गप गुमान गारेगार आय मॅक्स मधे पिक्चर बघावा .. परत येताना मार्केट मधे काही खरेदी करुन द्यावी.

तिसरा डोळा शांत होइल.

जेम्स वांड's picture

27 Nov 2021 - 1:14 pm | जेम्स वांड

तुमच्यातले भारतीयत्व अजून जिवंत आहे म्हणायचं

&#129315

हल्लीच बातम्या आणि माध्यमांत "द राईट टु रिपेअर" (the right to repair) चळवळीबद्दल पुन्हा एकदा वाचायला ऐकायला मिळू लागलं आहे. रोचक आहे.

कंजूस's picture

19 Nov 2021 - 5:03 pm | कंजूस

जर्मनीत ही लोकं फार आहेत. बरेचसे चांगले तंत्रज्ञही असतात. करतात ते.

असे काही नाही जर्मनीमध्ये.
नवीन वस्तु दुरुस्तीपेक्षा स्वस्त पडते.

हे पहा.
https://www.youtube.com/watch?v=p4nzcGTRqtk

चौकस२१२'s picture

25 Nov 2021 - 6:16 am | चौकस२१२

३ डी प्रिंटिंग हे उत्पादनाचे तंत्र आता सगळ्यांपर्यंत पोचत असल्यामुळे यात आणि अगदी लॉ ( कायदे) याच्यावर परिणाम होत आहे
- उत्पदकांच्या दृष्टितीने बघितले तर हि एक डोकेदुखीच कारण एकतर सुटे भाग विकण्याचा धंदा कमी होती .. आणि दुसरे ग्राहकांना जर परत दुरुस्तील आणले आणि तयात जर असले दि आय वाय ( स्वतः निर्मिलेले ) सुटते भाग असतील तर अडचण होऊ शकते
- या शिवाय इन्शुरन्स चे काय? तुम्ही घरी बनवलेलंय भाग मुले जर ती वस्तू जास्त धोकादायक झाली तर?
त्यामुळे जितकी गोष्ट जास्त धोकादायक होऊ शकण्याची शक्यता जास्त ( गाडी , विजेची काही उपकरणे , कोणतेही वैद्यकीय उपकरण ) तवेधाय त्या वास्तूला असे दुरुस्त करण्याचं भानगडीत ना पडलेले बरे !

- दुसरा महत्वाचाच मुद्दा ३डी प्रिंटिंग बद्दल ,, यात सर्वच प्रकारचे भागाचे मूळ गुणधर्म ( मटेरियल प्रॉपर्टी ) प्रतिंबीबीत होतीलच असे नाही !
धातूतील ३डी प्रिंटिंग तर अजून सर्वसामान्यांपर्यंत आलेले नाहीये फारसे
असो ३डी प्रिंटिंग हा एक मोठा वेगळं विषय आहे आणि त्याच्यात खूप काही बदल आणि नवीन संशोधन रज चालू आहे , शरीरातील पेशींना पासून ते काँक्रीट ची इमारत बांधण्यापर्यंत

कंजूस's picture

25 Nov 2021 - 8:58 am | कंजूस

त्यामुळे जितकी गोष्ट जास्त धोकादायक होऊ शकण्याची शक्यता जास्त ( गाडी , विजेची काही उपकरणे , कोणतेही वैद्यकीय उपकरण ) तवेधाय त्या वास्तूला असे दुरुस्त करण्याचं भानगडीत ना पडलेले बरे !

- दुसरा महत्वाचाच मुद्दा ३डी प्रिंटिंग बद्दल ,, यात सर्वच प्रकारचे भागाचे मूळ गुणधर्म ( मटेरियल प्रॉपर्टी ) प्रतिंबीबीत होतीलच असे नाही !

सहमत.

डीआइवाईमध्ये आपण काय करतो आहोत आणि त्याने काय नुकसान/धोका असू शकतो इकडे लक्ष द्यायला हवे.

बंदूक किंवा इतर विशेष भागात प्रिंटिंग नव्हे तर स्टीलचे हीट टेंपरिंग आणता येणार नाही.

चौथा कोनाडा's picture

20 Nov 2021 - 1:39 pm | चौथा कोनाडा

व्वा भारीच की कंजूस साहेब !
आम्हाला असल्या गोष्टींमध्ये खुडबुड करायची आवडच नाही, इथंपण जेमतेम पास असतो,
जेव्हां असे उद्योगी लोक अश्या खुडबुडी करुन सुधारणा (रिपेर किंवा दुरुस्तीला हा शब्द चालेल, का दुसरा कुठला आहे ?) करुन त्यांचा आनंद घेतात त्या लोकांचे मोठे कौतिक वाटते !

चीयर्स, कंजूस साहेब !

पाषाणभेद's picture

24 Nov 2021 - 9:52 pm | पाषाणभेद

+१

श्रीरंग_जोशी's picture

25 Nov 2021 - 12:50 am | श्रीरंग_जोशी

घरगुती उपकरणांची स्वतः दुरूस्ती करणे व त्याची माहिती मिपावर इतरांशी वाटणे स्पृहणीय आहे.

मी या बाबतीत खूपच मागे आहे. चित्रगुप्त यांच्या छंदिष्ट, हरहुन्नरी, उद्योगी मिपाकर सध्या काय करत आहेत या धाग्यावरील प्रतिक्रियेत मी हाती घेतलेल्या पण रखडलेल्या शेल्फ लावण्याबद्दल हा प्रतिसाद लिहिला होता. बर्‍याच मिपाकरांनी उपयुक्त उपाय सुचवले. दोन महिन्यांपूर्वी ते काम मी यशस्वीपणे पूर्ण केले. मिपाकरांनी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद.

कंजूस's picture

25 Nov 2021 - 5:18 am | कंजूस

घरगुती उपकरणांची स्वतः दुरूस्ती करणे व त्याची माहिती मिपावर इतरांशी वाटणे स्पृहणीय आहे.

मिपा मराठीत आहे आणि त्यासाठी मला वेगळी वेबसाईट काढावी लागत नाही. एखादा प्रश्न नेटवर शोधल्यास त्याची माहिती देणाऱ्या अनेक वेबसाईटस आणि विडिओ इंग्लिश भाषेत आहेत हिंदीतले विडिओ सुद्धा खूप आहेत.

खटपटे लोक वाढले तर माहिती देणारेही वाढतील

एखादी गोष्ट दुरुस्त करायची का फेकून नवी घ्यायची हे बाजारातील त्याची उपलब्धता, त्यासाठीचे पर्याय आणि वस्तूती भावनिकदृष्ट्या गुंतागुंत ठरते.

ओडिशातला एक वडे विकणारा मनुष्य चटणी वाढण्यासाठी एकच डावलं ( नारळाच्या करवंटीला लाकडाची काठी लावलेलं) गेली पन्नास वर्षं वापरतो आहे. आता हे पाहायला लोक येतात.

उपयोजक's picture

26 Nov 2021 - 5:41 pm | उपयोजक

त्यासाठी तो छंदच असावा लागतो. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग करुन लठ्ठ पैसे मिळतात म्हणून बरेचसे भारतीय आयटी कंपनीत नोकरी पकडतात. पैसा छंद,स्वप्न,संशोधकी वृत्ती यावर पाणी फिरवायला लावतो. महागडी गाडी घेणे, OTT वर सिनेमे,वेबसेरिज बघणे, सतत चमचमीत खाणे याचा नाद लागतो

जेम्स वांड's picture

26 Nov 2021 - 5:52 pm | जेम्स वांड

एखादा मुद्दा हाती आला का सरळ सरसकटीकरण करून त्याची वासलात लावणे बहुतेक आपला छंद असावा का सरजी ?

वैयक्तिक घेऊ नका पण खरंच मौज वाटली हो

उपयोजक's picture

27 Nov 2021 - 7:44 am | उपयोजक

तुम्ही बहुतेक आयटोित असणार ;)

जेम्स वांड's picture

27 Nov 2021 - 9:07 am | जेम्स वांड

तुमचा अंदाज चुकलेला आहे सरजी....

&#129322