मिपाकट्टा@नाशिक ०७/११/२०२१

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
7 Nov 2021 - 10:33 pm

मिपाकट्टा@नाशिक ०७/११/२०२१

आज दिनांक 07/11/2021, रविवार, नाशिक मध्ये मिपाकरांची छोटी भेट (मीनी कट्टा) आयोजित केला गेला. त्याचा हा वृतांत.

आपणास माहित असेलच की मिपाकर नाशिककरांनी गेल्याच महिन्यात मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ साजरा केला होता.

आजचा दिनांक 07/11/2021, रविवार, हा कट्टा अचानक दोन दिवस आधीच ठरला. सकाळी ठरल्या वेळेत योगेश पुराणिक (yogi900), व सचिन बोरसे (पाषाणभेद) मुंबई नाक्यावर हजर झाले. थोड्याच वेळात जानु - सर्वेशसरांचा फोन आला व तेथे पोहोचले. त्याच दरम्यान डॉ. दातरंगे सरांचा फोन आला. ते पण वेळेत पोहोचले. नेहमीप्रमाणे इतर दोन जणांनी येण्याचे कबूल करूनही ऐनवेळी टप्पा दिला.

त्यानंतर चहा आणि त्यासोबत गप्पा झाल्यात. सर्वेश - जानु सरांना बाहेरगावी जायचे असूनही आवर्जून, आग्रहाने, आपुलकीने ते कट्याला हजर झाले. पुराणिक सरांनाही त्यांच्या गावी जायचे होते. तरीदेखील ते कट्याला हजर झालेत. डॉक्टरांच्या बीजी शेड्यूमधून तसेच मागच्या कट्याला ते येवू न शकल्याने ह्या वेळी ते आवर्जून सकाळच्या थंडीत हजर झाले. बघा, प्रेम असेल, कट्याला उपस्थित राहण्याची उर्मी असेल तर कसेही कट्याला येता येते.

मिपाकट्टा@नाशिक ०७/११/२०२१
मिपाकट्टा@नाशिक ०७/११/२०२१
डावीकडून: श्री. योगेश पुराणीक - MipaPremiYogesh ((आखाडी जॅकेट), डॉ. दातरंगे (लाल टी शर्ट जॅकेट), सचिन बोरसे (पाषाणभेद) - (आकाशी शर्ट), श्री. सर्वेश सर (जानु) (पांढरा शर्ट).

निरनिराळे विषय चर्चीले गेलेत. भरपूर गप्पा झाल्यात. आमचा कट्टा आनंदाने साजरा झाला.

मिपाकट्टा@नाशिक ०७/११/२०२१
मिपाकट्टा@नाशिक ०७/११/२०२१

श्री. योगेश पुराणीक - MipaPremiYogesh ((आखाडी जॅकेट), डॉ. दातरंगे (लाल टी शर्ट जॅकेट), सचिन बोरसे (पाषाणभेद) - (आकाशी शर्ट), श्री. सर्वेश सर (जानु) (पांढरा शर्ट).

मिपाकर एकत्र येतांना पाहून अतिशय आनंद झाला. आभासी दुनियेतील असूनही प्रत्यक्ष भेटीचा आनंद काही वेगळाच असतो. आगामी काळात मिपाकरांचे असले कट्टे वेळोवेळी आयोजीत व्हावेत.

त्यानंतर कट्याची सांगता झाली.

- पाषाणभेद
07/11/2021, नाशिक

समाजजीवनमानप्रवासविचारबातमीअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रीगणेशा's picture

7 Nov 2021 - 11:53 pm | श्रीगणेशा

मिपावरील संवादातून आभासी आयडी विषयी एखादी प्रतिमा तयार होते आणि कट्ट्याच्या निमित्ताने खरं नाव व फोटो पाहिल्यावर "अरे! ही माणसं तर आपल्या चार चौघांसारखीच आहेत" असा साक्षात्कार होतो :-)

मिपावर मी त्या मानाने खूप नवीन. कट्ट्याचा अनुभव नाही.
पण आमच्या इथे, हैदराबादमधेही, असा एखादा कट्टा व्हावा असं वाटत आहे. पाहूया, कधी योग जुळून येतोय ते!

तसेच, आता ऑनलाईन जगातून बाहेर पडून, यापुढे कट्ट्यांचे धागे नियमितपणे येतील अशी आशा आहे _/\_

योगी९००'s picture

8 Nov 2021 - 8:47 am | योगी९००

मस्त मजा आली. छोटासाच पण मस्त कट्टा झाला. सर्वांना भेटून आणि विविध विषयांवर गप्पा मारून फार छान वाटले.

(माझा मिपा आयडी योगी९०० असा आहे.)

योगी९००'s picture

8 Nov 2021 - 8:49 am | योगी९००

स्पेशल धन्यवाद पाभे यांना. त्यांच्यामुळेच ही भेट शक्य झाली.

ते आखाडी जॅकेट काय आहे? कुस्तीला गेल्यासारखे वाटतेय.

मुक्त विहारि's picture

8 Nov 2021 - 9:09 am | मुक्त विहारि

नाशिकला आलो की भेटूच

चित्रगुप्त's picture

8 Nov 2021 - 2:57 pm | चित्रगुप्त

असे आटोपशीर कट्टे असले की गप्पा, विचारांचे आणि माहितीचे आदानप्रदान वगैरे करायला चांगले, असे 'ह्यां'चे मत.
-- बाईसाहेब फुरसुंगीकर.

प्रचेतस's picture

9 Nov 2021 - 6:37 am | प्रचेतस

मस्त एकदम.
ह्या आठवड्यात नाशिकला यायचा विचार आहे,आलो तर अवश्य भेटूच.

चौथा कोनाडा's picture

9 Nov 2021 - 2:36 pm | चौथा कोनाडा

व्वा, भारी कट्टा !

एक नंबर मिपाकट्टा !
पाषाणभेद, MipaPremiYogesh, डॉ. दातरंगे, जानु या ख्यातनाम मिपाकरांचे मुखडे पाहून आनंद झाला !

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Nov 2021 - 2:44 pm | ज्ञानोबाचे पैजार

उत्साही कट्टेकरी पहायला मजा आली.

लागोपाठ दुसरा कट्टा यशस्वी पणे आयोजित केल्या बद्दल पाभेंचा एक भव्य मिपा बॅनर देउन सत्कार करण्यात येत आहे.

पैजारबुवा,