श्रीगणेश लेखमाला २०२१ - संत साहित्यातील गणेश

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in लेखमाला
10 Sep 2021 - 12:32 pm

.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;}
.field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}

श्रीगणेश लेखमाला २०२१

कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेश वंदनेने करण्याची आपल्या कडे परंपरा आहे. मग ती पूजा असो, कोणताही सांस्कृतीक कार्यक्रम असो गायन असो किंवा इतर कोणताही. लहान मुलांच्या शिक्षणाची सुरुवात सुध्दा “श्री गणेशायनम:” असे लिहूनच केली जाते.

अनेक संतानी सुध्दा त्यांच्या ग्रंथ रचनांचा आरंभ गणेशाच्या वंदनेने केला आहे.
ज्ञानोबारायाने सुध्दा “ॐ नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंदेद्या आत्मरुपा” अशी ज्ञानेश्वरीची सुरुवात केली आहे .

तर संत एकनाथ भावार्थ रामायणाची सुरुवात “ॐ नमो अनादी आद्या, वेद वेदांत वेद्या, वंद्याही परम वंद्या, स्वसंवेद्या श्री गणेशा” अशी करतात.

रामदास स्वामी,
“गणाधीश जो इश सर्वा गुणांचा, मुळा रंभ आरंभ तो निर्गुणाचा,
नमु शारदा मुळ चात्वारवाचा, गमु पंथ आनंत या राघवाचा”

अशी सुरुवात करून मग मनाचे श्लोक सांगतात

गणेशाला सर्वानीच अग्रस्थानी ठेवायचे कारण काय असावे? तर गणपती हा ओंकाराचे प्रतीक आहे असे मानले जाते, पहा ना गणपतीच्या एकंदर देहाचा आकृतीबंध बघितल्यास त्याचा आकार ॐ या बीजमंत्रासारखा दिसतो आणि ॐ हा मुलध्वनी आहे असे मानले जाते, म्हणून त्याचे प्रतीक असलेला गणेश पहिला

ज्ञानोबाराया गणेश प्रतिमा आणि ओंकाराची सांगड घालताना म्हणतात
अकार चरणयुगुल, उकार उदर विशाल
मकार महामंडल मस्तकारे, हे तिन्ही एकवटले
तेथ शब्दब्रम्हं कवळले, ते मियां श्री गुरुकृपे नमिले, आदिबीज

श्रीरामरक्षास्तोत्राचं नमन-वाक्य आहे “श्रीगणेशाय नमः” तर श्रीमतभगवत गीतेचं नमन-वाक्य आहे – “ॐ श्रीपरमात्मने नमः” ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ-दीपिका ही भगवतगीतेवरची टीका असल्याने हेंच नमनवाक्य मराठीत “ॐ नमोजी आद्या” अशा प्रकारे आले आहे.

भावार्थदीपिकेची (ज्ञानेश्वरीची) पहिली ओवी व्यासमुनींच्या नमनवाक्याशी एकदम सुसंगत आहे. व्यासमुनींनी ज्या “श्रीपरम” अशा आत्म्याला नमन म्हटलं, त्याचंच विवेचन माउलीनं आद्य, वेदप्रतिपाद्य, स्वसंवेद्य असं केलंय. त्या तशा आत्म्याला आवाहन केलंय. त्या तशा आत्म्याला आवाहन करताना “हे आत्म्या” असं न म्हणतां आत्मरूपा असे म्हणत भाषेचं मार्दव राखलंय.

आदी शंकराचार्य गणेशाला वंदन करताना म्हणतात, “मुदाकरात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकं ,कलाधरावतंसकं विलासिलोकरक्षकम्, अनायकैकनायकं विनाशितेभदैत्यकं, नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम्”

मोद म्हणजेच आनंदाचे प्रतिक असलेला मोदक ज्याने धारण केला आहे, जो आपल्या भक्तांबरोबर मुक्तीमार्गावर सतत असतो, ज्याने भालावर कलाधर अर्थात चंद्र धारणा केला आहे आणि जो या जगाचे रक्षण करतो, जो या जगताचा एकमेव नायक आहे, ज्याने इभ दैत्याचा नाश केला आहे आणि ज्याच्या स्मरणाने मनातील अशुभगोष्टींचा नायानाट होतो अशा विनायकाला माझा नमस्कार असो!

संपूर्ण स्त्रोत्र नादमय आहे, ह्या स्तोत्रातील गेयताच खूप भावते, पण अर्थ जसा लक्षात येत जाईल तसतसे हे स्त्रोत्र अधिकच आवडायला लागते.

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हा श्लोक तर घराघरात म्हटला जातो

तर “प्रणम्य शिरसा देवं” आणि गणपती अथर्वशीर्ष या बद्दल तर नेक ठिकाणी अनेकदा लिहिले गेले आहे.

रामदास स्वामी गणेशाचे वर्णन करताना लिहितात
ध्यान गणेशाचें वर्णितां । मतिप्रकाश होये भ्रांता ।
गुणानुवाद श्रवण करितां । वोळे सरस्वती ॥
ऐसा जो परम समर्थ । पूर्ण करी मनोरथ ।
सप्रचीत भजनस्वार्थ । कल्लौ चंडीविनायेकौ ॥
ऐसा गणेश मंगळमूर्ती । तो म्यां स्तविला येथामति ।
वांछ्या धरूनि चित्तीं । परमार्थाची ॥

एकनाथ महाराजांनी केलेले गणेशाचे वर्णन तर सर्वश्रुत आहे, ते म्हणतात
ॐकार स्वरुपा, सदगुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुज नमो !

हे गणेश वर्णन मराठी किंवा संस्कृत साहित्या पुरते मर्यादित नाहीये संत तुलसी दास गणेश स्तुती करताना म्हणतात
गाइये गनपति जगबंदन । संकर -सुवन भवानी नंदन ॥ १ ॥
सिद्धि-सदन, गज बदन, बिनायक । कृपा -सिंधु ,सिंधुसुंदर सब-लायक ॥ २ ॥
मोदक-प्रिय, मुद -मंगल -दाता । बिद्या-बारिधि,बुद्धि बिधाता ॥ ३ ॥
माँगत तुलसिदास कर जोरे । बसहिं रामसिय मानस मोरे ॥ ४ ॥

हे एक पारंपारिक हिंदि भजन ऐकायला फार गोड वाटते :-
सबसे पहले तुम्हे मनाऊँ, गौरी सूत गणराज, तुम हो देवों के सरताज,
दूंद दुँदाला सूँड़ सुन्डाला, मस्तक मोटा कान, तुम हो देवों के सरताज।।

तर ही गणपतीची हिंदी आरती प्रसिध्द आहे :-
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा। माता जाकी पार्वती पिता महादेवा ..

लेखाचा शेवट श्री आदी शंकराचार्यांच्या गणेश पंचरत्न स्त्रोत्राने करतो
ॐ सरागिलोकदुर्लभं विरागिलोकपूजितं, सुरासुरैर्नमस्कृतं जरापमृत्युनाशकम् ।
गिरा गुरुं श्रिया हरिं जयन्ति यत्पदार्चकाः नमामि तं गणाधिपं कृपापयः पयोनिधिम् ॥ १॥
गिरीन्द्रजामुखाम्बुज प्रमोददान भास्करं, करीन्द्रवक्त्रमानताघसङ्घवारणोद्यतम् ।
सरीसृपेश बद्धकुक्षिमाश्रयामि सन्ततं, शरीरकान्ति निर्जिताब्जबन्धुबालसन्ततिम् ॥ २॥
शुकादिमौनिवन्दितं गकारवाच्यमक्षरं, प्रकाममिष्टदायिनं सकामनम्रपङ्क्तये ।
चकासतं चतुर्भुजैः विकासिपद्मपूजितं, प्रकाशितात्मतत्वकं नमाम्यहं गणाधिपम् ॥ ३॥
नराधिपत्वदायकं स्वरादिलोकनायकं, ज्वरादिरोगवारकं निराकृतासुरव्रजम् ।
कराम्बुजोल्लसत्सृणिं विकारशून्यमानसैः, हृदासदाविभावितं मुदा नमामि विघ्नपम् ॥ ४॥
श्रमापनोदनक्षमं समाहितान्तरात्मनां, सुमादिभिः सदार्चितं क्षमानिधिं गणाधिपम् ।
रमाधवादिपूजितं यमान्तकात्मसम्भवं, शमादिषड्गुणप्रदं नमामि तं विभूतये ॥ ५॥

पैजारबुवा.

श्रीगणेश लेखमाला २०२१

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

10 Sep 2021 - 1:30 pm | तुषार काळभोर

श्रीगणेश लेखमालेचा याहून चांगला शुभारंभ असू शकत नाही!

माउलींना सरस्वतीचे वरदान होते यात शंका नाही. “ॐ नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंदेद्या आत्मरुपा” .. काय सुंदर शब्द आहेत!

समर्थांचे श्लोक शाळेत असताना पाठ झाले होते. त्यात अर्थातच "गणाधीश जो ईश.." हा पहिला होता.

ओंकार स्वरुपा.. हे तर मला सुरेश वाडकर यांनी स्वतः लिहिलंय असं दहा मिनिटांपूर्वी वाटत होतं! :)

पैजारबुवा.. या सुंदर लेखासाठी खूप धन्यवाद!

टर्मीनेटर's picture

10 Sep 2021 - 1:30 pm | टर्मीनेटर

गणपती बाप्पा मोरया... 🙏
सलामीचा लेख आवडला पैजारबुवा!

कुमार१'s picture

10 Sep 2021 - 1:40 pm | कुमार१

सलामीचा सुंदर लेख आवडला.

कंजूस's picture

10 Sep 2021 - 2:13 pm | कंजूस

छान संकलन.

गॉडजिला's picture

10 Sep 2021 - 6:54 pm | गॉडजिला

सुरेख माहिती...

मदनबाण's picture

10 Sep 2021 - 2:20 pm | मदनबाण

लेख आवडला.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - He Aaradhya Ganpati Song 2021 | Swapnil Bandodkar | Akshay Dabhadkar | Eros Now Music

Bhakti's picture

10 Sep 2021 - 7:20 pm | Bhakti

छानच!

रंगीला रतन's picture

10 Sep 2021 - 9:13 pm | रंगीला रतन

छान!

सर्वसाक्षी's picture

10 Sep 2021 - 11:32 pm | सर्वसाक्षी

उत्तम माहिती, चांगला लेख

गणेशा's picture

11 Sep 2021 - 12:54 am | गणेशा

लेख आवडला...

लिहित रहा... वाचत आहे...

प्रचेतस's picture

11 Sep 2021 - 9:25 am | प्रचेतस

सुरेख लिहिलंत माऊली.
शंकराचार्यांनी लिहिलेली गणेशस्तोत्रं विलक्षण नादमय आहेत.

तुषार काळभोर's picture

11 Sep 2021 - 10:46 am | तुषार काळभोर

शंकराचार्यांनी लिहिलेली गणेशस्तोत्रं विलक्षण नादमय आहेत.
>>
त्यांची इतर स्तोत्रे सुद्धा अत्यंत नादमय आहेत.
महिषासुरमर्दिनी स्तोत्र
सहितमहाहव मल्लमतल्लिक मल्लितरल्लक मल्लरते
विरचितवल्लिक पल्लिकमल्लिक झिल्लिकभिल्लिक वर्गवृते।
शितकृतफुल्ल समुल्लसितारुण तल्लजपल्लव सल्ललिते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते॥

अच्युताष्टकम् -
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम्।
श्रीधरं माधवं गोपीकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे ।।

श्रीराम स्तोत्र
विशुद्धं परं सच्चिदानन्दरूपं । गुणाधारमाधारहीनं वरेण्यम्।
महान्तं विभान्तं गुहान्तं गुणान्तं । सुखान्तं स्वयं धाम रामं प्रपद्ये।।

शिवतांडवस्तोत्र पण त्यांचीच रचना असावी असे वाटते.

जेव्हा रावणाने कैलासपर्वत उचलून घेतला होता तेव्हा तो हे स्त्रोत्र म्हणत होता.
ते पण असेच लयबद्ध आनि नादमय आहे. बाहुबली सिनेमात याचा चपखल वापर केला आहे.

जटाटवीगलज्जल प्रवाहपावितस्थले
गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजंगतुंगमालिकाम्‌।
डमड्डमड्डमड्डमनिनादवड्डमर्वयं
चकार चंडतांडवं तनोतु नः शिवः शिवम

शम्कराचार्यांनी :- शिवपंचाक्षर स्त्रोत्र लिहिले आहे

नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय, भस्माङ्गरागाय महेश्वराय ।
नित्याय शुद्धाय दिगम्बराय, तस्मै न काराय नमः शिवाय ||

शंकराचार्यांचे अजून एक आवडते स्त्रोत्र म्हणजे नर्मदाष्टकम.

ऐकायला आणि म्हणायला फार मस्त वाटते.

पैजारबुवा,

प्रचेतस's picture

11 Sep 2021 - 1:26 pm | प्रचेतस

हो, ते रावणरचित आहे असं म्हणतात पण अर्थातच ते वास्तवात शक्य नाही, एकंदरीत भाषा, नादमयता, गेयता बघता हे शंकराचार्यांनीच लिहिलेले असावे असे वाटते. त्यांनी लिहिलेले नसेल तर कुणी एक अज्ञात रचयिता असावा.

शिवतांडव स्त्रोत्र हे रावणाने रचल्याचे माझ्याही वाचनात आले आहे.
अवांतर :
रात्री बेड वर पडून; इअरफोन लावून; डोळे बंद करून युट्युब वरचा शिवतांडव स्तोत्राचा हा 8D AUDIO ट्रॅक ऐकण्याची मजा काही औरच आहे!

टर्मीनेटर's picture

11 Sep 2021 - 7:24 pm | टर्मीनेटर

शंकराचार्यांनी लिहिलेली गणेशस्तोत्रं विलक्षण नादमय आहेत.

+१
विशेषतः महिषासुरमर्दिनी स्तोत्र!

अवांतर : ए. आर. रेहमान हा संगीतकार भक्तिसंगीताला एका वेगळ्याच पातळीवर नेउन ठेवतो असे मला नेहमीच वाटते. मग ते लगान मधले 'ओ पालन हारे', जोधा-अकबर मधलं 'ख्वाजा मेरे ख्वाजा' , रॉकस्टार मधलं 'कून फाया' असो की 'अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते' हे महिषासुरमर्दिनी स्तोत्र असो, सगळ्यातून भक्तिरस कसा ओसंडून वहात असतो!

काँम्प्युटर / लॅपटॉप वर काम करत असताना एका टॅब मध्ये यूट्यूब वर पार्श्वसंगीत म्हणून म्युझिक व्हिडीओ लावून इअरफोन वर गाणी ऐकायची मला सवय आहे. त्यात ए. आर. रेहमानच्या "Chaturbhujam" ह्या अल्बम मधील 'Aigiri Nandini' हे महिषासुरमर्दिनी स्तोत्र हमखास असते. आत्ता हा प्रतिसाद लिहितानाही तेच गाणे चालू आहे :)

प्रचेतस's picture

11 Sep 2021 - 10:49 am | प्रचेतस

तर श्रीमतभगवत गीतेचं नमन-वाक्य आहे – “ॐ श्रीपरमात्मने नमः”

हे वाक्य भगवद्गीतेत नेमके कुठे आहे? गीतेची सुरुवात तर 'धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे' ने होते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Sep 2021 - 12:01 pm | ज्ञानोबाचे पैजार

तुमचा प्रतिसाद वाचल्यावर गीता उघडुन पाहिली त्याची सुरुवात "धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे" अशीच आहे.

"ॐ श्रीपरमात्मने नमः" हे कुठे वाचले होते ते शोधुन सांगतो.

पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Sep 2021 - 1:01 pm | ज्ञानोबाचे पैजार

ॐ श्रीपरमात्मने नमः

गीताप्रेसच्या भगवतगीते ची सुरुवात ॐ श्रीपरमात्मने नमः ने केलेली वाचली होती. पण रामकृष्ण मठाने प्रसिध्द केलेल्या प्रति मधे मात्र तुम्ही म्हणता तशी सुर्वात आहे.

https://instapdf.in/download-pdf/?pdfid=33671 ही त्याच्या पीडीएफ फायलीची लिंक.

अर्थात तुमचा या विषयातला अभ्यास लक्षात घेता तुमचे मत हेच ग्राह्य धरायला पाहिजे हे मान्यच आहे.

पैजारबुवा,

प्रचेतस's picture

13 Sep 2021 - 11:26 am | प्रचेतस

ही सुरुवात बहुधा रामकृष्ण मिशनचीच असावी. मूळ भगवद्गीतेत ही सुरुवात नाहीच.

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Sep 2021 - 7:53 am | ज्ञानोबाचे पैजार

गीता प्रेसच्या भगवद्गीतेची सुरुवात "ॐ श्रीपरमात्मने नमः" अशी आहे.

पैजारबुवा,

तुम्ही पैजारबुवारचीत भगवद्गीतेची सुरुवात "ॐ श्रीपरमात्मने नमः" अशी आहे सांगीतलेत तरी आमची काहीच हरकत नाही!
मुळात एवढं सगळं वाचुन त्याचा सारांश (ह्या पैकी काहीच नं वाचलेल्यां) माझ्या साऱख्यांपर्यंत सोप्या भाषेत पोचवताय हेच फार कौतुकास्पद आहे. त्यावरच्या तु.का.शेठ, प्रचेतस आणि तुमच्या माहितीपुर्ण चर्चा वाचल्यावर आपला व्यासंग किती कमी आहे ह्याचीही जाणिव होते...🙏

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Sep 2021 - 12:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण लेखन आहे, आवडले.

-दिलीप बिरुटे

सस्नेह's picture

11 Sep 2021 - 5:06 pm | सस्नेह

प्रथम लेखन, गणेश वंदन !
नमन आमचेही, गणरायाला.
स्नेहा

सौंदाळा's picture

13 Sep 2021 - 10:30 am | सौंदाळा

उत्तम सुरुवात

प्राची अश्विनी's picture

13 Sep 2021 - 10:57 am | प्राची अश्विनी

समयोचित सुंदर सुरुवात! प्रतिसाद सुद्धा ज्ञानात भर टाकणारे.

गुल्लू दादा's picture

18 Sep 2021 - 7:51 pm | गुल्लू दादा

छान आवडले. गणपती बाप्पा मोरया.

अथांग आकाश's picture

22 Sep 2021 - 12:42 pm | अथांग आकाश

छान लेख! आवडला!!
0

बांवरे's picture

23 Sep 2021 - 10:36 pm | बांवरे

लोककलेतही - पयलं नमन हे गणपतीलाच असतं.

पयलं नमन हो पयलं नमन
तुम्ही ऐका हो गुणिजन
आम्ही करितो कथन

पयलं नमन करुनी वंदन
इडा मांडून, इडा देवाला
इडा गावाला, इडा पाटलाला
आणि इडा मंडळिला

गणपती आला अन्‌ नाचुन गेला रं
गणपती आला अन्‌ नाचुन गेला
नटवार पार मांग झाला रं
गणपती आला अन्‌ नाचुन गेला

पयलं नमन हो करितो वंदन
पयलं नमन हो पयलं नमन

चौथा कोनाडा's picture

24 Sep 2021 - 1:17 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

24 Sep 2021 - 1:17 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

24 Sep 2021 - 1:18 pm | चौथा कोनाडा

सुंदर गणेशलेख आवडला !
श्री आदी शंकराचार्यांच्या गणेश पंचरत्न स्त्रोत्र सुंदरच !
गणपती बाप्पा मोरया...

पैजारबुवा _/\_

अनिंद्य's picture

27 Sep 2021 - 11:22 am | अनिंद्य

सुंदर संकलन पैजारबुवा !