श्रीगणेश लेखमाला २०२१
कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेश वंदनेने करण्याची आपल्या कडे परंपरा आहे. मग ती पूजा असो, कोणताही सांस्कृतीक कार्यक्रम असो गायन असो किंवा इतर कोणताही. लहान मुलांच्या शिक्षणाची सुरुवात सुध्दा “श्री गणेशायनम:” असे लिहूनच केली जाते.
अनेक संतानी सुध्दा त्यांच्या ग्रंथ रचनांचा आरंभ गणेशाच्या वंदनेने केला आहे.
ज्ञानोबारायाने सुध्दा “ॐ नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंदेद्या आत्मरुपा” अशी ज्ञानेश्वरीची सुरुवात केली आहे .
तर संत एकनाथ भावार्थ रामायणाची सुरुवात “ॐ नमो अनादी आद्या, वेद वेदांत वेद्या, वंद्याही परम वंद्या, स्वसंवेद्या श्री गणेशा” अशी करतात.
रामदास स्वामी,
“गणाधीश जो इश सर्वा गुणांचा, मुळा रंभ आरंभ तो निर्गुणाचा,
नमु शारदा मुळ चात्वारवाचा, गमु पंथ आनंत या राघवाचा”
अशी सुरुवात करून मग मनाचे श्लोक सांगतात
गणेशाला सर्वानीच अग्रस्थानी ठेवायचे कारण काय असावे? तर गणपती हा ओंकाराचे प्रतीक आहे असे मानले जाते, पहा ना गणपतीच्या एकंदर देहाचा आकृतीबंध बघितल्यास त्याचा आकार ॐ या बीजमंत्रासारखा दिसतो आणि ॐ हा मुलध्वनी आहे असे मानले जाते, म्हणून त्याचे प्रतीक असलेला गणेश पहिला
ज्ञानोबाराया गणेश प्रतिमा आणि ओंकाराची सांगड घालताना म्हणतात
अकार चरणयुगुल, उकार उदर विशाल
मकार महामंडल मस्तकारे, हे तिन्ही एकवटले
तेथ शब्दब्रम्हं कवळले, ते मियां श्री गुरुकृपे नमिले, आदिबीज
श्रीरामरक्षास्तोत्राचं नमन-वाक्य आहे “श्रीगणेशाय नमः” तर श्रीमतभगवत गीतेचं नमन-वाक्य आहे – “ॐ श्रीपरमात्मने नमः” ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ-दीपिका ही भगवतगीतेवरची टीका असल्याने हेंच नमनवाक्य मराठीत “ॐ नमोजी आद्या” अशा प्रकारे आले आहे.
भावार्थदीपिकेची (ज्ञानेश्वरीची) पहिली ओवी व्यासमुनींच्या नमनवाक्याशी एकदम सुसंगत आहे. व्यासमुनींनी ज्या “श्रीपरम” अशा आत्म्याला नमन म्हटलं, त्याचंच विवेचन माउलीनं आद्य, वेदप्रतिपाद्य, स्वसंवेद्य असं केलंय. त्या तशा आत्म्याला आवाहन केलंय. त्या तशा आत्म्याला आवाहन करताना “हे आत्म्या” असं न म्हणतां आत्मरूपा असे म्हणत भाषेचं मार्दव राखलंय.
आदी शंकराचार्य गणेशाला वंदन करताना म्हणतात, “मुदाकरात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकं ,कलाधरावतंसकं विलासिलोकरक्षकम्, अनायकैकनायकं विनाशितेभदैत्यकं, नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम्”
मोद म्हणजेच आनंदाचे प्रतिक असलेला मोदक ज्याने धारण केला आहे, जो आपल्या भक्तांबरोबर मुक्तीमार्गावर सतत असतो, ज्याने भालावर कलाधर अर्थात चंद्र धारणा केला आहे आणि जो या जगाचे रक्षण करतो, जो या जगताचा एकमेव नायक आहे, ज्याने इभ दैत्याचा नाश केला आहे आणि ज्याच्या स्मरणाने मनातील अशुभगोष्टींचा नायानाट होतो अशा विनायकाला माझा नमस्कार असो!
संपूर्ण स्त्रोत्र नादमय आहे, ह्या स्तोत्रातील गेयताच खूप भावते, पण अर्थ जसा लक्षात येत जाईल तसतसे हे स्त्रोत्र अधिकच आवडायला लागते.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हा श्लोक तर घराघरात म्हटला जातो
तर “प्रणम्य शिरसा देवं” आणि गणपती अथर्वशीर्ष या बद्दल तर नेक ठिकाणी अनेकदा लिहिले गेले आहे.
रामदास स्वामी गणेशाचे वर्णन करताना लिहितात
ध्यान गणेशाचें वर्णितां । मतिप्रकाश होये भ्रांता ।
गुणानुवाद श्रवण करितां । वोळे सरस्वती ॥
ऐसा जो परम समर्थ । पूर्ण करी मनोरथ ।
सप्रचीत भजनस्वार्थ । कल्लौ चंडीविनायेकौ ॥
ऐसा गणेश मंगळमूर्ती । तो म्यां स्तविला येथामति ।
वांछ्या धरूनि चित्तीं । परमार्थाची ॥
एकनाथ महाराजांनी केलेले गणेशाचे वर्णन तर सर्वश्रुत आहे, ते म्हणतात
ॐकार स्वरुपा, सदगुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुज नमो !
हे गणेश वर्णन मराठी किंवा संस्कृत साहित्या पुरते मर्यादित नाहीये संत तुलसी दास गणेश स्तुती करताना म्हणतात
गाइये गनपति जगबंदन । संकर -सुवन भवानी नंदन ॥ १ ॥
सिद्धि-सदन, गज बदन, बिनायक । कृपा -सिंधु ,सिंधुसुंदर सब-लायक ॥ २ ॥
मोदक-प्रिय, मुद -मंगल -दाता । बिद्या-बारिधि,बुद्धि बिधाता ॥ ३ ॥
माँगत तुलसिदास कर जोरे । बसहिं रामसिय मानस मोरे ॥ ४ ॥
हे एक पारंपारिक हिंदि भजन ऐकायला फार गोड वाटते :-
सबसे पहले तुम्हे मनाऊँ, गौरी सूत गणराज, तुम हो देवों के सरताज,
दूंद दुँदाला सूँड़ सुन्डाला, मस्तक मोटा कान, तुम हो देवों के सरताज।।
तर ही गणपतीची हिंदी आरती प्रसिध्द आहे :-
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा। माता जाकी पार्वती पिता महादेवा ..
लेखाचा शेवट श्री आदी शंकराचार्यांच्या गणेश पंचरत्न स्त्रोत्राने करतो
ॐ सरागिलोकदुर्लभं विरागिलोकपूजितं, सुरासुरैर्नमस्कृतं जरापमृत्युनाशकम् ।
गिरा गुरुं श्रिया हरिं जयन्ति यत्पदार्चकाः नमामि तं गणाधिपं कृपापयः पयोनिधिम् ॥ १॥
गिरीन्द्रजामुखाम्बुज प्रमोददान भास्करं, करीन्द्रवक्त्रमानताघसङ्घवारणोद्यतम् ।
सरीसृपेश बद्धकुक्षिमाश्रयामि सन्ततं, शरीरकान्ति निर्जिताब्जबन्धुबालसन्ततिम् ॥ २॥
शुकादिमौनिवन्दितं गकारवाच्यमक्षरं, प्रकाममिष्टदायिनं सकामनम्रपङ्क्तये ।
चकासतं चतुर्भुजैः विकासिपद्मपूजितं, प्रकाशितात्मतत्वकं नमाम्यहं गणाधिपम् ॥ ३॥
नराधिपत्वदायकं स्वरादिलोकनायकं, ज्वरादिरोगवारकं निराकृतासुरव्रजम् ।
कराम्बुजोल्लसत्सृणिं विकारशून्यमानसैः, हृदासदाविभावितं मुदा नमामि विघ्नपम् ॥ ४॥
श्रमापनोदनक्षमं समाहितान्तरात्मनां, सुमादिभिः सदार्चितं क्षमानिधिं गणाधिपम् ।
रमाधवादिपूजितं यमान्तकात्मसम्भवं, शमादिषड्गुणप्रदं नमामि तं विभूतये ॥ ५॥
पैजारबुवा.
विशेष
वाचने
35839
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख.....!
गणपती बाप्पा मोरया...
वा !
बरीच माहिती!
+१
In reply to बरीच माहिती! by कंजूस
लेख आवडला.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - He Aaradhya Ganpati Song 2021 | Swapnil Bandodkar | Akshay Dabhadkar | Eros Now Musicछानच!
छान!
उत्तम
लेख आवडला...
सुरेख लिहिलंत माऊली.
+ १
In reply to सुरेख लिहिलंत माऊली. by प्रचेतस
शिवतांडवस्तोत्र पण त्यांचीच
In reply to + १ by तुषार काळभोर
शिवतांडव स्त्रोत्र हे रावणाने रचले आहे असे वाचनात आले होते
In reply to शिवतांडवस्तोत्र पण त्यांचीच by प्रचेतस
हो, ते रावणरचित आहे असं
In reply to शिवतांडव स्त्रोत्र हे रावणाने रचले आहे असे वाचनात आले होते by ज्ञानोबाचे पैजार
शिवतांडव स्त्रोत्र हे रावणाने रचल्याचे माझ्याही वाचनात आले
In reply to शिवतांडवस्तोत्र पण त्यांचीच by प्रचेतस
शंकराचार्यांनी लिहिलेली
In reply to + १ by तुषार काळभोर
तर श्रीमतभगवत गीतेचं नमन
हो बरोबर आहे तुमचे
In reply to तर श्रीमतभगवत गीतेचं नमन by प्रचेतस
सापडले
In reply to हो बरोबर आहे तुमचे by ज्ञानोबाचे पैजार
ही सुरुवात बहुधा रामकृष्ण
In reply to सापडले by ज्ञानोबाचे पैजार
गैरसमज टाळण्यासाठी थोडीशी दुरुस्ती
In reply to ही सुरुवात बहुधा रामकृष्ण by प्रचेतस
पैजारबुवारचीत भगवद्गीतेची सुरुवात
In reply to गैरसमज टाळण्यासाठी थोडीशी दुरुस्ती by ज्ञानोबाचे पैजार
छान.
प्रथम लेखन, गणेश वंदन !
उत्तम सुरुवात
समयोचित सुंदर सुरुवात!
माहितीपूर्ण
छान लेख! आवडला!!
माहितीपूर्ण आहे लेख
सुंदर गणेशलेख आवडला !
सुंदर गणेशलेख
सुंदर गणेशलेख
सुंदर संकलन पैजारबुवा !