६० वर्षांपूर्वी...

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
14 Aug 2021 - 8:25 am

बर्लिनच्या भिंतीने शीतयुद्धाच्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारणावर मोठा प्रभाव टाकला होता.

लोकशाही, भांडवलशाही व्यवस्थेमुळे ‘पश्चिम जर्मनी’ आणि ‘पश्चिम बर्लिन’मध्ये वेगाने आर्थिक विकास होत गेला. पश्चिमकडील लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यही होते. या बाबी साम्यवादी ‘पूर्व जर्मनी’ आणि ‘पूर्व बर्लिन’मधील नागरिकांच्या नजरेत येऊ लागल्या. आपल्याही परिस्थितीत लवकरात लवकर सुधारणा होण्याची इच्छा सामान्य जर्मन नागरिकाला होती. त्यामुळं पूर्वेकडून पश्चिमेकडे होणारे पलायन पूर्णपणे रोखण्यासाठी ‘पूर्व जर्मनी’च्या साम्यवादी राजवटीने दोन्ही बर्लिनच्या सीमेवर तारेच्या कुंपणाच्या जागी भिंतच बांधण्याचे ठरवले. त्यानंतर ताबडतोब 13 ऑगस्ट 1961 ला बर्लिनला विभागणारी ऐतिहासिक भिंत उभारण्यास सुरुवात झाली.

भिंतीच्या उभारणीतील पहिले 3 टप्पे लागोपाठ आणि त्वरेने हाती घेण्यात आले होते. कारण 60च्या दशकात वॉशिंग्टन आणि मॉस्को यांच्यातील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता.

पूर्वेकडून पश्चिमेकडे कोणीही पळून जाऊ शकू नये आणि तसा प्रयत्न करणाऱ्याला लगेच ठार करता यावे यासाठीची व्यवस्था Death Trap म्हणून ओळखली जात होती.

1985 नंतर पूर्वेकडील नागरिकांनी पश्चिमेकडे जाण्यासाठी काही सवलती देण्याची जोरदार मागणी सुरू केली होती.

पुढील पिढ्यांना इतिहासातील त्या अध्यायाची ओळख व्हावी या हेतूने ‘बर्लिनच्या भिंती’च्या काही भागांचे संवर्धन करण्यात आलेले आहे. आज ते अवशेष बर्लिनला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे आकर्षण ठरत आहे.

या विषयी अधिक जाणून घ्यायचं असल्यास खालील लिंकवर जाता येईल.
https://avateebhavatee.blogspot.com/2021/08/60.html?m=1

इतिहासराजकारणसमीक्षालेख

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

14 Aug 2021 - 9:39 am | पाषाणभेद

याच संकेतस्थळावर दुसरीकडे मराठी संस्थळे अन त्याविषयी चर्चा चालू आहे. त्या अनुषंगाने....

जर्मनीचे विभाजन तेथील भिंतीमुळे झाले होते. अनेक लोकांनी कुटूंबाच्या आशेने आपले प्राण गमावले. हे सारे तुम्ही लिहीले आहे. पुढे काय घडले याची उत्सूकता आहे. आपण लगोलग लिहाल अन आम्ही ते वाचू.

एक लक्षात घ्या की तुमचा लेख येथे अपूर्ण आहे. तुम्ही येथे त्रोटक लिहून पुढील लेख तुमच्या खाजगी ब्लॉग असलेल्या ठिकाणची लिंक दिली आहे, जेणे करून येथून पुढच्या वाचनासाठी वाचक तुमच्या खाजगी संस्थळावर जावेत.

असले घोरण मराठी संस्थळाच्या फोरमला मारक आहे.

वास्तविक पाहता, येथेच संपूर्ण लेख तुम्ही टाकून या लेखाची लिंक तुमच्या खाजगी ब्लॉगवर टाकू शकत होता.

वास्तविक पाहता, येथेच संपूर्ण लेख तुम्ही टाकून या लेखाची लिंक तुमच्या खाजगी ब्लॉगवर टाकू शकत होता.

सहमत

गॉडजिला's picture

14 Aug 2021 - 9:45 am | गॉडजिला

येथेच संपूर्ण लेख तुम्ही टाका तसेच ब्लॉगवरही संपुर्ण लेख लिहा व या लेखाखाली त्याची लिंक द्या... जर चुकून उद्या लेख इथून उडाला तर तुमच्या ब्लॉग वर त्याचा बॅकप अवश्य राहील

पाषाणभेद's picture

14 Aug 2021 - 10:12 am | पाषाणभेद

माझा मुद्दा मूळ लेखकाला राग येण्याजोगा जरी असला तरी त्यात मराठी संस्थळाविषयीची माझी कळकळ असल्याने तुम्हाला जाणवली त्याबद्दल आभार.
(अवांतरः आजकाल मला स्पष्ट लिहीणे, बोलणे असे व्हायला लागले आहे. आधी जे जे घडते आहे त्याविषयी काहीही भाष्य न करणे असा माझा स्वभाव होता. पण तो आता बदलला जावून लगेच मत व्यक्त करणे, स्पष्ट बोलणे, आडपडदा न ठेवणे, मनात काळे न ठेवता निर्णय देणे असे होवू लागले आहे. अगदी कौटुंबीक सदस्यही माझ्यात हा बदल झाला आहे असे नमुद करतात. )

आपण बोललात तसेच लेख येथेच लिहीणे अन तसाच लेख येथून कॉपी करून आपल्या खाजगी ब्लॉगला पेस्ट करून येथील लेखाची लिंक ब्लॉगवर चिकटवणे असे करणे योग्या आहे अन तसेच मी केले आहे.

अर्थात लेखकाची लिहीण्याची उर्मी मराठी फोरम्सनेच जोपासली. त्याचे उतरायी आपण नेहमीच व्हायला हवे.

फेसबूक इत्यादी ठिकाणी जे लिहीले जाते, ते साहित्य या व्याख्येत न बसणारे असावे. अपवाद आहेतच.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

14 Aug 2021 - 9:45 am | रावसाहेब चिंगभूतकर

अशा पद्धतीने अर्धवट लेख लिहून वाचकांना आपल्या ब्लॉग वर खेचून आणणे चुकीचे आहे. तुमची खरेच इच्छा असती तर तुम्ही सर्व लेख इथे टाकला असता. अशी गोष्ट चुकीचा पायंडा पाडेल.

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Aug 2021 - 12:28 pm | चंद्रसूर्यकुमार

दुसर्‍या महायुध्दानंतर पूर्व युरोपात कम्युनिस्ट राजवटी आणण्यात आल्या. नागरीकांच्या स्वातंत्र्याच्या गळचेपीवरच या सगळ्या राजवटी अवलंबून होत्या. त्यातून मग पूर्व बर्लिनच्या लोकांना पश्चिम भागात जाता येऊन स्वातंत्र्याचा अनुभव घेता येऊ नये म्हणून पूर्व जर्मनीच्या कम्युनिस्ट राजवटीने कुप्रसिध्द बर्लिनची भिंत बांधली. माझा कम्युनिझम या विचारसरणीला अगदी टोकाचा विरोध आहे आणि कम्युनिझम हा मानवतेला लागलेला कलंक आहे हे माझे मत मी मिपावर कित्येकवेळा लिहिले आहेच. तेव्हा त्यात आणखी नव्याने लिहिल्यासारखे काही नाही. तरीही काही गोष्ट लिहितो.

पहिली गोष्ट म्हणजे सामान्य लोकांची पलायनाची दिशा कायम कम्युनिस्ट देश ते भांडवलशाही देश अशीच होती. उदाहरणार्थ पूर्व ते पश्चिम जर्मनी, क्युबा ते अमेरिका, उत्तर ते दक्षिण कोरिया वगैरे. राजकारणी/ हेर वगैरे लोकांविषयी हे लिहित नाहीये तर सामान्य लोकांविषयी लिहित आहे. असे सामान्य लोक वेळी आपला जीवही पणाला लाऊन आपल्या स्वातंत्र्यासाठी पलायन करायचे. स्वातंत्र्य ही मानवाची मूलभूत प्रेरणा असते. त्याची पायमल्ली करणारी कोणतीही राजवट फार काळ टिकत नसते आणि जितका वेळ चालते ती पण बंदुकीच्या धाकाच्याच जोरावर टिकते.

याविषयी अमेरिकेच्या दोन माजी अध्यक्षांची भाषणे मला प्रचंड आवडतात. ती इथे देत आहे. पहिले भाषण होते जॉन केनेडींनी* २६ जून १९६३ रोजी बर्लिनमध्ये केलेले भाषण. इश बिन आएन बर्लिनर (मी एक बर्लिनर आहे) या नावाने ते भाषण प्रसिध्द आहे. त्यात केनेडी म्हणाले होते--

Freedom has many difficulties and democracy is not perfect, but we have never had to put a wall up to keep our people in, to prevent them from leaving us.

यात चुकीचे काय आहे? लोकशाही आणि स्वातंत्र्यावर आधारीत असलेल्या पाश्चिमात्य व्यवस्थेत कितीही दोष असले तरी त्यापैकी एकाही देशाला आपल्याच लोकांना आपल्याच देशात कोंडून ठेवायला कधीही भिंत बांधावी लागली नव्हती- ती कम्युनिस्ट राजवटीने बांधली.

दुसरे भाषण होते १२ जून १९८७ रोजी बर्लिनमध्येच रॉनाल्ड रेगन यांनी केलेले. "श्री.गोर्बाचेव्ह ती भिंत पाडून टाका" (Mr. Gorbachev, tear down that wall) हे त्यातील प्रसिध्द वाक्य होते. आणि ती भिंत दोन वर्षात खरोखरच पडली. कोणत्याही बाहेरच्या सत्तेच्या हस्तक्षेपामुळे नाही तर पूर्व जर्मनीतल्या लोकांनी कम्युनिस्ट दमनशाहीविरोधात उठाव करून पाडली.

ही दोन्ही भाषणे मी अक्षरशः शेकडो वेळा बघितली आहेत. या विषयात रस असलेल्या कोणी मिपाकराने ती यापूर्वी बघितली नसतील तर जरूर बघावीत ही विनंती. नक्कीच आवडतील.

*: माझे स्वतःचे जॉन केनेडींविषयी मत प्रतिकूल आहे (अर्थात त्याने कोणाला काय फरक पडतो तरीही ते माझे मत आहेच). अमेरिकेने इटली आणि टर्कीमध्ये अण्वस्त्रे नेऊन ठेवली होती त्याला उत्तर म्हणून ऑक्टोबर १९६२ मध्ये रशियाने फिडेल कॅस्ट्रोच्या क्युबामध्ये अण्वस्त्रे आणली होती. क्युबा हे फ्लॉरीडात मायामीच्या किनार्‍यापासून अवघ्या शंभर मैलांवर आहे. अमेरिकेच्या इतक्या जवळ रशियाने अण्वस्त्रे आणून ठेवली होती. तेव्हा ताबडतोब ही अण्वस्त्रे हलवावीत अन्यथा आम्ही रशियाविरूध्द अणुयुध्द छेडू ही धमकी केनेडींनी दिली. तेव्हा केनेडी आणि रशियाचे निकिता क्रुश्चेव्ह हे दोघेही मध्यममार्ग काढून परिस्थिती चिघळणार नाही याचा प्रयत्न करत होते. कारण अणुयुध्द झाल्यास सगळ्याच मानवजातीचा विनाश व्हायची शक्यता होती. तसे झाले नाही तरी कोट्यावधी लोक मरायची शक्यता नक्कीच होती. तेव्हा ते युध्द जिंकले तरी ही किंमत मोजणे परवडणारे होणार नाही हे दोघांनाही कळत होते. तेव्हा सगळ्या डाव्या विचारवंतांच्या गळ्यातला ताईत चे गव्हेरा मात्र रशियाने अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकावा हा आग्रह धरून होता. म्हणजे गंमत बघा- चे गव्हेरा मुळचा बोलिव्हियाचा. होता क्युबात फिडेल कॅस्ट्रोच्या मंत्रीमंडळात. आणि रशियाने अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकावा हा आग्रह धरून होता. याला आयजीच्या जीवावर बायजी उदार नाही तर आयजीच्या आयजीच्या जीवावर बायजीची बायजी उदार असेच म्हणायला हवे. नंतर रशियाने क्युबातून अण्वस्त्रे काढावी आणि अमेरिकेने इटली-टर्कीमधील अण्वस्त्रे काढावी असे ठरले. म्हणजे आपल्या किनार्‍यापासून शंभर मैल दूर असलेली शत्रूची अण्वस्त्रे काढावी या बदल्यात शत्रूच्या प्रदेशापासून हजारो मैल दूर असलेल्या प्रदेशातून आपली अण्वस्त्रे काढायला केनेडी तयार झाले होते. क्युबन मिसाईल क्रायसिसमध्ये अमेरिकाचा खरोखरच विजय झाला का हा प्रश्न नक्कीच पडतो. इतकेच नव्हे तर बर्लिनमध्ये वर दिलेले भाषण करायच्या काही दिवस आधी म्हणजे १० जून १९६३ रोजी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये भाषण करताना केनेडींनी पुढील तत्वज्ञान पाजळले होते--

Some say that it is useless to speak of world peace or world law or world disarmament--and that it will be useless until the leaders of the Soviet Union adopt a more enlightened attitude. I hope they do. I believe we can help them do it. But I also believe that we must reexamine our own attitude--as individuals and as a Nation--for our attitude is as essential as theirs. And every graduate of this school, every thoughtful citizen who despairs of war and wishes to bring peace, should begin by looking inward--by examining his own attitude toward the possibilities of peace, toward the Soviet Union, toward the course of the cold war and toward freedom and peace here at home.

शत्रूबरोबर शांतता प्रस्थापित व्हावी वगैरे सगळे ठीक आहे. पण त्यासाठी शत्रूला चोप देऊन त्याला शांतता हवीशी वाटायला लावणे गरजेचे असते. असले तत्वज्ञान पाजळून फार तर विचारवंतांच्या सभेत टाळ्या मिळू शकतील पण देशाच्या हितसंबंधांचे नुकसानच होत असते. क्युबन मिसाईल क्रायसिस वगैरे घटनांमध्ये सगळा दोष एका बाजूचा नक्कीच नसतो. पण दुसर्‍या बाजूला काहीही न सुनावता आपण आपले काय चुकले ते बघू हे नेत्याने म्हणणे कितपत योग्य आहे?असे म्हणतात की या कारणांमुळे केनेडी कम्युनिझमवर खूप सौम्य आहेत असे चित्र उभे राहिले आणि असा बोटचेपा अध्यक्ष आपल्याला नको म्हणून सी.आय.ए ने केनेडींचा काटा काढला अशी एक कॉन्स्पिरसी थिअरी आहे. आणि १९६८ मध्ये जॉन केनेडींचे भाऊ रॉबर्ट केनेडी अध्यक्ष म्हणून निवडून आल्यास तीच धोरणे पुढे चालू राहतील म्हणूनच रॉबर्टचाही काटा काढला गेला का? कल्पना नाही. वरकरणी पॅलेस्टिनी युवकाने रॉबर्ट केनेडींची हत्या केली असे आहे पण आत काही वेगळी कारस्थाने शिजत होती का याची कल्पना नाही.

तुषार काळभोर's picture

14 Aug 2021 - 7:17 pm | तुषार काळभोर

मी साम्यवादाचा टोकाचा नसलो तरी विरोधक नक्कीच आहे. समाजवादाचा अगदीच विरोधक नसलो तरी त्याला कुरवाळत बसणे अजिबात पटत नाही.

Freedom has many difficulties and democracy is not perfect, but we have never had to put a wall up to keep our people in, to prevent them from leaving us.
>>
या वाक्यात उजवे विरुद्ध डावे या संघर्षाचं फलित आहे.
१९४०-१९५० साली ब्रिटिश सरकार भारतावर अन्याय करत असताना, किती भारतीय स्वेच्छेने ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, जपान, रशिया येथे स्थायिक झाले याचा तुलनात्मक सांख्यिकी अभ्यास केला, तर मिपावर बरळणारे प्रतिसाद टाकणे आणि सामान्य लोकांना काय हवं असतं, यातला फरक लक्षात येईल.
साम्यवादाचं आकर्षण आणि समाजवादाचा अतिरिक्त पुळका असलेल्या लोकांना रशिया, चीन, उत्तर कोरियात स्थायिक व्हायला आवडेल की अमेरिका, (सध्याचा) जपान, दक्षिण कोरियात, हे पाहणे मनोरंजक ठरेल.

बर्लिन भिंत पडणे, ही केवळ जर्मनीच्या एकीकरणाची नव्हे तर सोव्हिएत युनियन विघटित होण्याची नांदी होती. त्या घटनेनंतर हळूहळू एक एक सोव्हिएत राज्य युनियन मधून बाहेर पडू लागलं आणि पुढील दोन वर्षात पूर्ण युनियन विघटित झालं होतं. (१९९१ मध्ये भारताने खुली अर्थव्यवस्था स्वीकारणं हा तत्कालीन आर्थिक दुरवस्थेचा परिपाक असला, तरी त्या वर्षातच भारताने तसं पाऊल उचलणं हा योगायोग नक्कीच वाटतं नाही.)

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Aug 2021 - 8:00 pm | चंद्रसूर्यकुमार

साम्यवादाचं आकर्षण आणि समाजवादाचा अतिरिक्त पुळका असलेल्या लोकांना रशिया, चीन, उत्तर कोरियात स्थायिक व्हायला आवडेल की अमेरिका, (सध्याचा) जपान, दक्षिण कोरियात, हे पाहणे मनोरंजक ठरेल.

साम्यवाद/ समाजवाद कित्ती कित्ती चांगला हे बोलणार्‍या प्रकांडपंडित विचारवंतांना तो स्वतःसाठी हवा असतो असे थोडी आहे? तो इतरांसाठी चांगला असतो. त्यांना स्वतःसाठी तो कुठे हवा असतो?अनेक डावे लोक म्हणतात की सरकारने श्रीमंतांवर जबरदस्त कर लावावेत आणि सगळ्यांचे उत्पन्न असे कृत्रिमपणे सारखे करावे. तसे असेल तर मग सरकार अस्से जबरदस्त कर लावत नाही तोपर्यंत तुमचे स्वतःचे उत्पन्न वजा सरासरी उत्पन्न यातील फरक तुम्हाला जे समाजोपयोगी काम करतात असे वाटते त्यांना दान करायला काय हरकत आहे? सरकारने कर वाढवला की मग तुमची दानाची रक्कम कमी करता येऊ शकेल. तसे करणारे लोक फारच थोडे असतात. बाकी सगळे ज्या व्यवस्थेला इतकी नावे ठेवतात त्याचेच सगळे फायदे घेऊन जे काही करायचे ते इतरांनी करायचे (हे स्वतः त्यातले काहीही करणार नाहीत) अशा उंटावरून शेळ्या हाकणारे असतात. सोव्हिएत रशियात पॉलिट ब्युरोचे सदस्य आणि इतर सत्तापदावरींल लोकांची राहायची घरे आणि एकूणच जीवनमान हे सामान्य रशियनांसारखे थोडीच होते? विविध बी-स्कूल्समध्ये डाव्या विचारांचे बरेच विद्यार्थी असतात. आणि विशेष म्हणजे नंतर हेच लोक इन्व्हेस्टमेंट बँकांमध्ये नोकर्‍याही करताना दिसतील. कॅपिटल (भांडवल) हे सगळ्या समस्यांचे मूळ आहे वगैरे पोपटपंची ते करणार पण नोकरीच्या ठिकाणी आपल्या क्लाएंटला तेच भांडवल उभे करायला मदत करण्यात काही विसंगती आहे हे त्यांच्या गावीही नसेल. लठ्ठ पगाराचा चेक दिसला की हे सगळे लोक आपली तत्वे विसरून जातात. आपला स्वार्थ आला की तत्वे विसरणे हा पण मानवी स्वभाव आहे त्यामुळे त्यांनी तसे करू नये असे अजिबात नाही. मात्र तसे करतानाच इतरांना मात्र त्याच तत्वांची लेक्चरबाजी करणे हे मात्र पूर्ण ढोंग झाले.

जाता जाता: अमेरिकेचे माजी अध्यक्ष रॉनाल्ड रेगन भाषणात बोलता बोलता कम्युनिस्ट पध्दतीवर काही खुसखुशीत विनोद सांगायचे. क्युबातल्या लोकांना अमेरिकेत जायला आवडते यावर त्यांनी सांगितलेला एक विनोद--

पराग१२२६३'s picture

15 Aug 2021 - 10:48 pm | पराग१२२६३

१९९१ मध्ये भारताने खुली अर्थव्यवस्था स्वीकारणं हा तत्कालीन आर्थिक दुरवस्थेचा परिपाक असला, तरी त्या वर्षातच भारताने तसं पाऊल उचलणं हा योगायोग नक्कीच वाटतं नाही.

बरोबर आहे.

श्रीगुरुजी's picture

14 Aug 2021 - 7:37 pm | श्रीगुरुजी

पहिली गोष्ट म्हणजे सामान्य लोकांची पलायनाची दिशा कायम कम्युनिस्ट देश ते भांडवलशाही देश अशीच होती.

पलायनाची/स्थलांतराची दिशा कायमच गरीब प्रदेशाकडून तुलनेने समृद्ध प्रदेशाकडे असते. यात सत्ताधाऱ्यांची राजकीय विचारसरणी याला दुय्यम महत्त्व आहे.

भारतात बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशातून तुलनेने श्रीमंत राज्यात (महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक इ.) होणारे स्थलांतर, मध्य व दक्षिण अमेरिकेतून अमेरिकेत होणारे स्थलांतर, पाकिस्तान/बांगलादेशातून भारतात होणारे स्थलांतर, भारतातून अमेरिका/इंग्लंड वगैरे देशात होणारे स्थलांतर इ. मागे एकच विचारसरणी आहे ती म्हणजे अधिक संपन्न प्रदेशात संधी शोधणे. धर्मांध राजवट व धार्मिक बंधने असूनही याच कारणांमुळे भारतीय पर्शियन आखातात जातात. देशात साम्यवादी राजवट आहे म्हणून कोणी स्थलांतर करेल असे वाटत नाही. उद्या भारताने नियंत्रण काढून टाकले तरी साम्यवादी चीनमधून लोकशाही भारतात येण्यास फार कोणी उत्सुक नसेल.

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Aug 2021 - 8:15 pm | चंद्रसूर्यकुमार

पलायनाची/स्थलांतराची दिशा कायमच गरीब प्रदेशाकडून तुलनेने समृद्ध प्रदेशाकडे असते. यात सत्ताधाऱ्यांची राजकीय विचारसरणी याला दुय्यम महत्त्व आहे.

पहिली गोष्टः
उत्तर कोरिया ते दक्षिण कोरिया, पूर्व जर्मनी ते पश्चिम जर्मनी असे पलायन (स्थलांतर नाही) हे अगदी सुरवातीपासून होत होते. १९९० मध्ये जर्मन एकीकरण झाले तेव्हा पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या आर्थिक स्थितीत खूपच फरक होता. तसा फरक सुरवातीच्या काळात नव्हता. दुसर्‍या महायुद्धात जर्मनीचे दोन्ही भाग उध्वस्त झाले होते. तरीही पलायन (परत एकदा- स्थलांतर नाही) एकाच दिशेने होत होते. तीच गोष्ट कोरियात. तेव्हा स्थलांतराला सुरवात झाली तेव्हा आपला प्रदेश गरीब आणि दुसरा प्रदेश समृध्द हे कारण तितक्या प्रमाणावर नसावे. असे लोक जात आहेत हे बघून साम्यवादी राजवटींनी सीमांवर अजून कडक निर्बंध आणले.

दुसरी गोष्टः
सध्याच्या काळातही वेनेझ्युएलामधून आजूबाजूच्या देशांमध्ये असे पलायन होतच आहे. त्या बाजूच्या देशांमध्ये थोडीच सोन्याची घरे आहेत. वेनेझ्युएलामधून लोक अंमली पदार्थांसाठी बदनाम असलेल्या कोलंबियासारख्या देशातही जातच आहेत.

चौकस२१२'s picture

16 Aug 2021 - 5:22 am | चौकस२१२

पलायनाची/स्थलांतराची दिशा कायमच गरीब प्रदेशाकडून तुलनेने समृद्ध प्रदेशाकडे असते. यात सत्ताधाऱ्यांची राजकीय विचारसरणी याला दुय्यम महत्त्व आहे.
स्थलान्तर यात मूलभूत फरक आहे ,,, पण आपला मुद्दा बरोबर वाटतो
स्थलांतराबाबत बोलायचे तर फक्त श्रीमंती एवढा एकाच मुद्दा नेहमी असतो असे नाही , उदाहरण देतो
- आशियातील सिंगापुर समृद्ध आहे, आणि तिथे राहणे बरेच जण पसंद करता, त्यांच्यायाच शेजारी मलेशिया तसा अगदी गरीब नाही .. लोकसंख्येचा खूप ताण नाही .. त्यामुळे रोज मढला पूल ओलांडून सिंगापुरात कामाला येणारे हजारो मलेशिय नागरिक असतात , अगदी १ लया श्रेणीपासून ४ श्रेणी पर्यंत चे.
त्यातील खास करून जे चीनी वंशाचे आहेत त्यानं अधून मधून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अन्याय सोसावा लागतो मलेशियात आणि त्या मामाने सिंगापोर हे जास्त सर्वधर्म समभावी परंतु चिनी वंशाचे वर्चस्व असलेले .. त्यामुळे अश्या चिनी मलेशियानचा सिंगापुर कडे ओढा जास्त असला पाहिजे ... परंतु एका अनुभवी व्यक्तीला विचारल कि बाबारे तू सिंगापुरात काम करतोस तुला येथे कायमचे रहिवाशी होणे हि तसे सोप्पे आहे मग तू का करीत नाहीस तर तो म्हणाला नको ते ओझे मी काम करिन येथे पण राह्यला मात्र मलेशियातच आवडेल , निवृत्ती नंतर तर नक्कीच .. तिथे मला माझाही जमीन असले , ४ कोंबड्या पाळीन , चार झाडे लाविन ... सिंगापुर मधील राहण्यामागेचे कष्ट आणि खर्च आता मला जमतील पण निवृत झाल्यावर नको .. मग भले मलेशियात चिनी लोकांना दुय्यम वागणुकीला कधी कधी मिळत असो ... ( तसे पहिले तर सिंगापोर ला मलेशिया तुन हाकलले तवेच ली क्वान उ रडले होते त्यानं माळशियातच राहायचे होते चिनी असून सुद्धा )

Rajesh188's picture

14 Aug 2021 - 8:43 pm | Rajesh188

अगदी टोकाची गळचेपी साम्यवादी राष्ट्र करत नाहीत.आणि काही राष्ट्र करत असतील तर ती अगदी नगण्य असतील .
साम्यवादी देशातून भांडवशाही देशात स्थलांतर होते असे सरसकट म्हणता येणार नाही.
पण गरीब राष्ट्र तून श्रीमंत प्रदेशात स्थलांतर होते हे सरसकट खरे आहे.
भांडवल शाही राष्ट्रात सामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक होण्याची शक्यता पण जास्त होते.
लोकशाही राज्य व्यवस्था जी सदोष आहे.
लोकशाही मध्येच अनागोंदी कारभार सरकारी पातळीवर असतो.
त्या साठी च अमेरिकेच्या ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक ,सामाजिक स्थिती काय आहे ह्याची माहिती जगाला करून दिली जात नाही.
अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय लोकांचे विश्व म्हणजे अमेरिकेची दोन चार शहर इथपर्यंत च मर्यादित आहेत.
नरिमन पॉइंट, पाली हिल बघून पूर्ण मुंबई अतिशय सुंदर,स्वच्छ ,श्रीमंत आहे हा अंदाज जसा साफ खोटा आहे .
त्या प्रमाणे अमेरिकेत राहणारी भारतीय लोक फक्त तेथील शहरांची च वर्णन करत असतात.
त्यांना पूर्ण अमेरिका कधीच माहीत होत नाही.

अनन्त अवधुत's picture

15 Aug 2021 - 1:08 pm | अनन्त अवधुत

अगदी टोकाची गळचेपी साम्यवादी राष्ट्र करत नाहीत.आणि काही राष्ट्र करत असतील तर ती अगदी नगण्य असतील .

जगात जवळपास २०० राष्ट्रे आहेत. त्यातील किती राष्ट्रात साम्यवादी राजवट अहे हे सांगा बघू. मग त्यातील ती नगण्य कोणती ते पण सांगा.

अजून थोडे: जगातल्या सर्वच साम्यवादी राष्ट्रांत भांडवलशाहीवादी अर्थ सुधारणा स्वीकृत करण्यात आल्या आहेत. चीन हे त्याचे ढळढळीत उदाहरण.

2
पश्चिमेकडील वरची तीन ' नारिंगी राज्ये' ब्रिटनच्या ताब्यात होती.
पश्चिमेकडील शेवटचे नारिंगी व त्याखालील कोपऱ्यातील लाल राज्य फ्रान्सच्या ताब्यात होते.
दक्षिणेकडील उर्वरित लाल प्रदेश अमेरिकेच्या ताब्यात होता.
पूर्वेकडील फिकट रंगाचा प्रदेश रशियाच्या ताब्यात होता. (त्यातील छोटा लाल तुकडा बर्लिन आहे, जे निम्मे पाश्चात्य राष्ट्रांच्या ताब्यात होते.)
तीन दशके उलटली तरीही सरासरी उत्पन्नात 'प्रचंड फरक' दिसतो.

I wonder where the West-haters would like to settle if given a choice.

Rajesh188's picture

16 Aug 2021 - 1:38 am | Rajesh188

भांडवल शाही देशात सुद्धा साम्य वादी आणि समाज वादी निर्णय हे सरकार ल घेणे भाग च पडते.
तसे नाही केले तर देशात गृहयुद्ध सुरू होण्यास किंवा तालिबान सारखी दडपशाही करून सत्ता टिकविण्यास सत्ता धारी मजबूर होतील.शोषित आणि शोषक हे गट भांडवल शाही निर्माण करते..ह्या मधील अंतर कमी करायचे असेल तर साम्यवाद,समाजवाद ह्यांची तत्व पाळावी च लागतील .
नहितर सशस्त्र संघर्ष अटळ असतो..
अस्तित्वाची लढाई तत्वांनी होत नाही शस्त्रांनी होते .

चंद्रसूर्यकुमार's picture

16 Aug 2021 - 9:20 am | चंद्रसूर्यकुमार

I wonder where the West-haters would like to settle if given a choice.

ते पश्चिमेतच सेटल होतील, तिकडच्या सगळ्या सोयीसुविधांचा उपभोग घेतील पण त्याचवेळी पश्चिम किती वाईट आणि पूर्व किती चांगला असे गोडवे पण गातील.

याला म्हणतात ढोंगीपणाची विचारवंत स्केल.