म्युच्युअल फंड्स .... हमखास कोट्याधीश होण्याचा मार्ग (भाग - १)

अमर विश्वास's picture
अमर विश्वास in जनातलं, मनातलं
7 Apr 2021 - 4:42 pm

ही लेखमाला लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे गणेशा भाऊंची "शेअर मार्केटची बाराखडी" ही लेखमाला. या लेखमालेत शेअर्स मध्ये गुंतवणूक कशी करावी (विशेषतः Position Trading) हे उत्तम पणे सांगत आहेत ... अर्थात ही प्रक्रिया किचकट आहे. तसेच High Risk High Gain हे तत्व इथेही लागू होते.

पण ज्यांना अशा पद्धतीने ट्रेडिंग शक्य नाही (अभ्यास नाही / वेळ नाही / रिस्क ची तयारी नाही ) त्यांच्या साठी दुसरा पर्याय काय ? माझ्या स्वतः च्या अनुभवावरून बऱ्याच गोष्टी शिकलो. सुरवातीला डे ट्रेडिंग / पोझिशन ट्रेडिंग केले. शेअर्स घेऊन लॉग टर्म इन्व्हेस्टमेंट (३+ वर्षे) ही केली. यात बराच फायदा आणि पुरेसा तोटाही पहिला. हे करत असताना गेली बारा तेरा वर्षे म्यॅच्युअल फंड्स मध्ये सिप (Systematic Investment Plan) च्या माध्यमातून गुंतवणूक करत आहे. आणि आज मी खात्रीने सांगू शकतो कि याप्रकारे योग्य गुंतवणूक केली तर नक्की कोट्यधीश होता येते
_____________________________________________________________________________________________________________________________

म्युच्युयल फंड्स मुखतः ३ प्रकारात विभागले जातात
१. इक्विटी
२. डेट
३. हायब्रीड

या प्रत्येकाचे अनेक उपप्रकार आहे जसे small cap, mid cap, large cap, focused, sectoral, Gold ETF, US opportunity, FMP इत्यादि इत्यादि .....
या सर्वांचे फायदे - तोटे आहेत. त्याच्या आढावा आपण पुढल्या भागात घेऊच

तत्पूर्वी म्युच्युअल फंड्स इन्व्हटमेंट्स चे मूलभूत नियम बघू या

१. म्युच्युअल फंडात कोणी गुंतवणूक करावी
याचे सोपे उत्तर म्हणजे .. सर्वानी गुंतवणूक करावी. सिप (SIP) च्या माध्यमातून केलेली गुंतवणूक ही दीर्घ मुदतीत धन संचय करण्यासाठी आहे.

२. म्युच्युअल फंडात किती गुंतवणूक करावी ?
याचेही सोपे उत्तर जास्तीत जास्त ...
दरमहा किती सिप करावी हे ठरवण्याचे दोन मार्ग आहेत ...
अ) आपले टार्गेट व कालावधी ठरवावा व SIP calculator वापरून गुंतवणूक किती ते ठरवावे
SIP calculator : https://www.mutualfundssahihai.com/en/calculators

उदाहरणार्थ मला पुढच्या १५ वर्षात ५० लाख रुपये जमा करायचे आहेत (रिटायरमेंट फंड). तर १२% CAGR धरला तर मला फक्त दहा हजार महिना SIP च्या माध्यमातून गुंतवावे लागतील. ...

ब) दुसरा मार्ग म्हणजे आपले उपन्न आणि खर्च याचा अंदाज घेऊन आपण किती रक्कम गुंतवयाची ते ठरवावे

यात एक महत्वाची गोष्ट... सिप ची रक्कम एका महिन्याच्या सूचनेने बदलता येते. नोकरी करणाऱ्यांसाठी दरवर्षी पगार वाढ झाली कि सिप ची रक्कम वाढवावी

३. शिस्तबद्ध गुंतवणूक :
सिप मुळे दरमहा ठरलेल्या तारखेला ठराविक रक्कम जाते त्यामुळे एक आर्थिक शिस्त रहाते

४. गुंतिवणुकीची तरलता (Liquidity)
साधारणतः ३ दिवसात आपली रक्कम (मार्केट व्हॅल्यू नुसार) काढून घेता येते. पण त्याच वेळी हे पण लक्षात घ्यावे कि मार्केट हे आपल्याला अनुकूल असेलच असे नाही .. त्यामुळे साधारणतः: योग्य बाजारभाव हवा असेल तर साधारणतः ३ महिन्याचा कालावधी गृहीत धरावा
थोडक्यात ही गुंतवणूक medium liquidity देते

५. एकदा सिप चालू केल्यावर रोज पोर्टफोलिओ बघू नये. तसेच वारंवार म्युच्यअल फंड्स च्या योजना बदलू नयेत. तीन महिन्यातून एकदा परीक्षण (review ) करणे योग्य

६. डेट - इक्विटी रेशो
तुमची किती टक्के गुंतवणूक डेट फंडात आणि किती टक्के गुंतवणूक इक्विटी फंडात करावी हे तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते .
उदाहरणार्थ ३० ते ४० वयोगटातील नोकरी करणारा माणूस जास्त रिस्क घेऊ शकतो . अशा लोंकासाठी साधारणतः ८०-२० किंवा ७०-३० (८०% इक्विटी - २०% डेट ) योग्य आहे, जसजसे वय वाढेल तसे हा रेशो ६०-४० किंवा ५०-५० करायला हरकत नाही

७. विविधता (diversification )
सिप ची रक्कम वेगवेगळ्या स्कीम मध्ये गुंतवावी तसेच सिप च्या तारखाही वेगवेगळ्या असाव्यात. जसे महिन्याच्या १ , ५, १० , १५ इत्यादी

आता पुढच्या भागात म्युच्युअल फंडाच्या योजनांचे विविध प्रकार आणि त्यांचे फायदे तोटे बघू या ...

____________________________________________________________________________________________________________________________

डिस्क्लेमर :
Mutual fund investments are subjected to market risk
Past results are no guarantee to future performance
I am one of the happy investor getting benefit of log term sustained investment. I am sharing my experiences & have no personal gains intended by this

गुंतवणूकविचार

प्रतिक्रिया

आंद्रे वडापाव's picture

7 Apr 2021 - 5:02 pm | आंद्रे वडापाव

म्युच्युअल फंड्स .... हमखास कोट्याधीश होण्याचा मार्ग ...
कोणासाठी ?
फंड मॅनेजर साठी असेल , तर मग प्रश्नच नाही.
कोट्यावधी साठी किती गुंतवणूक ?, किती कालावधी साठी ? कोणत्या फंडात ?
काय रिटर्न % ? वै प्रश्न भंडावून सोडतात.

अमर विश्वास's picture

7 Apr 2021 - 5:25 pm | अमर विश्वास

आंद्रे वडापाव... फार भंडावून जायची गरज नाही ..

वर लिहिले आहे त्याप्रमाणे SIP Calculator वापरा सर्व प्रश्नची उत्तरे मिळतील

उत्तम पोर्टफोलिओ आणि ८०-२० इक्विटी-डेट रेशो असेल तर १२ ते १५% CAGR (Compound annual growth rate) मिळतो

त्यामुळे वर उदाहरण दिले आहेच .. पण कोट्याधीश व्हायचे असेल तर :
.

आंद्रे वडापाव's picture

7 Apr 2021 - 6:01 pm | आंद्रे वडापाव

उत्तम फंड कसा शोधायचा ?
फंड मॅनेजर बदलत असेल तर फंडाचा उत्तमपणा कसा ठरवायचं ?
उत्तम फंड मॅनेजर कसा शोधायचा ?
उत्तम फंड मॅनेजर जो फंड मॅनेज करतो त्यात गुंतवणूक करायची ? फंड मॅनेजर बदलला तर काय करावे ? फंड मधेच बंद पडला तर काय करावे ? किती एक्स्पेन्स रेशो हा वाजवी ?

कपिलमुनी's picture

9 Apr 2021 - 2:30 am | कपिलमुनी

पंधरा वर्षाचा एव्हरेज 12 % रिटर्न देणारे कोण कोणते फंडस आहेत ?

अमर विश्वास's picture

9 Apr 2021 - 9:37 am | अमर विश्वास

कपिलमुनीजी

१५ वर्षे सलग एकाच फंडात मी गुंतवणूक केलेली नाही .
मी सुरुवात केली तेंव्हा पहिली ७-८ वर्षे HDFC Top २०० मध्ये सिप चालू होती. उत्तम परतावा दिला. नंतर रिस्ट्रक्चरिंग करताना हा फन्ड बंद करून STP (systematic transfer plan) च्या माध्यमातून दुसऱ्या फंडात गुंतवणूक केली ... काही रकमेचे FMP घेतले.

अशी अनेक उदाहरणे आहेत. पोर्टफोलिओ कसा बनवावा आणि कसा सांभाळावा यावर शेवटच्या भागात लिहीनच.

पण तुमच्या प्रश्नाचे उत्तर : पंधरा वर्षे सलग एकच फंड high performance देईल हे अवघड वाटते. योग्य वेळी सिप दुसऱ्या फंडात फिरवणे आणि जमलेल्या रकमेचे रेडिस्ट्रिब्युशन करणे हाच उपाय आहे.

अर्थात हे करताना दोन गोष्टी नक्की बघाव्या लागतात : म्युच्युअल फंड मधून मिळणार नफा टॅक्सेबल आहे. त्यामुळे वारंवार रिस्ट्रक्चरिंग टाळावे.
दुसरे म्हणजे म्युच्यअल फंडात रिइन्वेस्ट करताना STP चा वापर करावा... lumpsum गुंतवणूक नको

सोत्रि's picture

7 Apr 2021 - 6:27 pm | सोत्रि

कोणासाठी ?
फंड मॅनेजर साठी असेल , तर मग प्रश्नच नाही.

सबका साथ सबका विकास. आपण कोट्याधीश झालो तर त्याबरोबर फंड मॅनेजरही कोट्याधीश होणार असेल तर त्यात काय वाईट आहे.

-(कर्मयोगी) सोकाजी

आंद्रे वडापाव's picture

7 Apr 2021 - 7:40 pm | आंद्रे वडापाव

आपण कोट्याधीश झालो तर त्याबरोबर फंड मॅनेजरही कोट्याधीश होणार असेल तर त्यात काय वाईट आहे.

देवा सर्वाना कोट्याधीश कर, पण सुरुवात माझ्यापासून कर ...

कुमार१'s picture

7 Apr 2021 - 5:42 pm | कुमार१

उपयुक्त लेख.

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Apr 2021 - 5:49 pm | राजेंद्र मेहेंदळे

चांगला ईंटरेस्टिंग धागा आहे. येउद्या अजुन.

आपला पोर्टफोलिओ सुद्धा इथे सांगु शकलात तर बरे होइल. मी साधारण २०१५ पासुन म्युचुअल फंड्स मध्ये गुंतवणुक चालु केली आणि अजुन करतोय.
मी शक्यतो डायरेक्ट फंड हाउस कडुन विकत घेतो, म्हणजे कमिशन कमी लागते. म्हणजे एच डी एफ सी चे म्युचुअल फंड्स त्यांच्या वेबसाईट्वरुन ईत्यादी.

माझ्याकडे
एच डी एफ सी मिड कॅप,
एस बी आय स्मॉल कॅप,
मिरे अ‍ॅसेट लार्ज कॅप्,
निपॉन ईंडिया फार्मा, टाटा फार्मा
एल अँड टी मिड कॅप
आय सी आय सी आय ब्लु चिप
हे सध्या आहेत.

माझा त्यावेळेस काहीच अभ्यास नव्हता, upwardly म्हणुन एक site होती, त्यावरून मी त्यातल्या त्यात best mf select केले
३ वर्षात २०% च्या आसपास वाढलेत..

Sbi blue chip - मुलीच्या लग्नासाठी ३k/month
Kotak select focus (नाव बदलले आहे )- असाच भविष्यात तीच्या education ला कधी लागला तर १k /month
Nippon growth and small cap असे २ fund -प्रत्येकी १k/month - emargancy साठी भविष्यात किंवा गाडीच्या वेळेस लागले तर..
Gold - वर्षाला १ तोळा मुलीच्या लग्ना साठी..

Mutual fund आपली investment diverse sector मध्ये गुंतवतात, त्यामुळे आपली गुंतवणूक जास्त mf मध्ये divese करायची आपण...

पण गेल्या वर्षी मी mf चा अभ्यास थोडा केला आणि कळाले, यात खुप paramter आहेत, ते आपण पाहिले नव्हते, पण चालू ठेवले तसेच बदल न करता..

Nippon एकदा मी बंद केलेला म्हणुन पुन्हा चालू केला.. नंतर कळाले, पहिला pause झालेला फक्त २ महिने आणि त्यामुळे त्यात २ mf झाले..

मी सुद्धा direct mutual fund काढलेत.. Regular नाही..

अमर विश्वास's picture

7 Apr 2021 - 6:36 pm | अमर विश्वास

राजेंद्र सर
म्युच्युअल फंडाचे वेगवेगळे प्रकार पुढच्या भागात येतील ...
तेंव्हा प्रत्येक प्रकारातील चांगल्या योजना (schemes ) नक्कीच सांगीन

अर्थात या योजना ज्यात मी गुंतवणूक केली आहे / अभ्यास केला आहे त्यावर अवलंबून असतील. इतरही चांगले पर्याय आहेतच

प्रथमता अतिशय उत्तम सुरुवाती बद्दल अभिनंदन..
(मला तर मनापासुन वाटले कि आपण एकत्रच एकाच सिरीज मध्ये धागे लिहिले पाहिजेत.. लेखक वेगवगेळे पण सिरीज एक.. )

तुमचा प्रत्येक धागा वाचून नक्कीच बऱ्याच गोष्टी कळतील म्हणुन छान वाटते आहे..कारण mf चा माझा अभ्यास जास्त नाही..

माझ्या गुंतवणुकी बद्दल -

Mutual fund आणि gold मध्ये हि मी पैसे गुंतवतो आहे, share market मधून मला जास्त return मिळत असले तरी systematic investment असावी म्हणुन मी ती ४ mutual fund मध्ये चालू ठेवलेली आता ३ वर्षे झाली..

इथल्या वाचकांना मी सांगू इच्छितो,
३ वर्षांपूर्वी मी कर्जात होतो, आणि saving शून्य होती.
मुलगी, माझे भविष्य याबद्दल खुप विचार करत असे मी.
पगार भरपूर असला तरी emi, कर्ज ह्यात अवघड होते सगळे..

पण तुम्ही ठरवल्यावर काहीच अवघड नसते..

मी स्वतः खर्च जास्त करणारा माणुस आहे, पण saving च्या सवयीने, आणि त्याच्या अभ्यासाने खुप stress कमी झालाय..
आता सोने, mf आणि share market मुळे पुढे भवितव्य नीट वाटतेय..
उलट अजून १५ वर्षे राहिलेल्या गृहकर्जा ला मी ५ वर्षात संपवून आणि नंतर IT सोडून मी तरी मस्त माझ्या लहानपणीच्या मित्रांसोबत market मध्ये पुर्ण लक्ष घालणार आहे..

लवकरच credit card हा मला लागलेला विळखा हि nil करतोय..

तुम्ही positive विचार करता झाला कि खुप गोष्टी चांगल्या घडत जातात..( Office मध्ये हि त्यामुळे चांगली hike मिळाले आहे..:-))

अमर विश्वास's picture

7 Apr 2021 - 6:45 pm | अमर विश्वास

धन्यवाद गणेशा ..

जेंव्हा मी सुरवात केली तेंव्हा फक्त पाच हजाराची सिप होती .. हळूहळू वाढवत नेली. गृहकर्ज संपल्यावर सरळ हफ्त्याएवढ्या रकमेची सिप केली ...
आता बारा वर्षांनी उत्तम फळे दिसत आहेत. नोकरी चालू हं तो पर्यन्त सिप ही चालू ठेवणार आहे ....

आत्ता माझा इक्विटी डेट रेशो ७५-२५ आहे आणि CAGR १२.५%.

जेंव्हा नोकरी सोडीन .. तेंव्हा २ वर्षे आधीपासून पोर्टफोलिओ ची पुनर्रचना करून ५०-५० किंवा ४०-६० करीन आणि
systematic withdrawal plan आणि अन्य मार्गाने मासिक उत्पन्न चालू करीन

राघव's picture

7 Apr 2021 - 7:05 pm | राघव

गृहकर्ज संपल्यावर सरळ हफ्त्याएवढ्या रकमेची सिप केली

हे भारीये. आवडलं. :-)

गणेशा's picture

7 Apr 2021 - 8:06 pm | गणेशा

नक्कीच वाचायला आवडेल..
माझी चूक अशी आहे कि माझे पैसे हे equity मध्ये आहेत सगळे..
आणि मला तेंव्हा debt फलाना इतर mutual fund माहिती ही नव्हते आणि आवडले हि नव्हते..

नंतर वाचल्यावर कळाले..

Swp चांगला समजावून सांगा.. मी बदल करेल भविष्यात..

Mf बद्दल जास्त जाणून घ्यायचे आहे..

( मात्र, माझी जास्त गुंतवणूक share market मध्ये राहिल असे मला वाटते आहे, कारण त्याचा परतावा हा नक्कीच जास्त आहे )

चौकटराजा's picture

7 Apr 2021 - 6:13 pm | चौकटराजा

माझा अनुभव असा आहे की हे फंड अगदी जादूची कांडी नाहीत. प्रत्यक्ष फंडाला जो फायदा होतो त्याची ऑपरेशनल ( व्यवस्थापन खर्च म्हणू या ) जाऊन क्रान्तिकारी असे काही हातात पडत नाही. वास्तविक ही कल्पना कागदावर फार भारी आहे ! सीप ही कल्पना चांगली आहे पण तिचे व्यवस्थापक आपणच असले पाहिजे असे माझा एक निकट चा नातेवाईक सांगतो. माझी कल्पना अशी आहे की तुम्ही पाच क्षेत्रे निवडा . त्यातील एक नंबर व दोन नंबर फन्डामेन्टल चा अभ्यास करून पक्के करा व प्रत्येकाचा एकेक असे दहा शेअर महिन्याला विकत घ्या ! साहस एक नम्बराचा व दोन नंबराचा व्यावासायिक त्याच्या सेक्टर मध्ये रसातळाला गेला असे होत नाही ! उदा बजाज आटो . विक्रीत पहिला नसेल पण शेअर मजबूत आहे ! माझ्या पुढच्या पिढीला धडपडण्यात रस नसल्याने मी डी मॅट अकाउंट नावाला ठेवले आहे !!

अमर विश्वास's picture

7 Apr 2021 - 7:04 pm | अमर विश्वास

चौकट राजा साहेब ...

म्युच्युअल फंड ही जादूची कांडी नाही . ३ वर्षात दामदुप्पट किंवा वर्षाला ५०% परतावा असले अचाट दावेही मी करणार नाही

प्रत्येक फंडाला व्यवस्थापन खर्च आहे असतोच आणि तो जास्तीतजास्त २.५% निर्धारित आहे.
फंडाची NAV हा खर्च वजा केल्यानांतरच ठरवली जाते.

चांगल्या इक्विटी म्युच्युअल फंडाला १२% CAGR मिळतोच

एक उदाहरण घेऊ ... (सोर्स : Moneycontol.com )

scheme : Canara Robeco Bluechip Equity Fund - Direct Plan - Growth

तुम्ही जर गेली पाच वर्षे सिप केली असती तर तुमचा CAGR १८.८१% असता . हा खरा डेटा आहे. कुठलीही जादू नाही आणि हो ... एकदा सिप चालू केली की परत बघायला नको

.

सुबोध खरे's picture

7 Apr 2021 - 8:14 pm | सुबोध खरे

मुख्य गोची आहे ती म्हणजे आज बाजार चढता आहे आणि जवळ जवळ १००% चढला आहे.

हाच CAGR मागच्या वर्षी ६ एप्रिललाच काढला असतात तर किती आला असता हे पाहणे रोमांचक ठरेल. ६ एप्रिल २०१७ ला या फंडात १०००० रुपये टाकले असता ६ एप्रिल २०२० मध्ये १०५३८ रुपये देताना दिसतो आहे.म्हणजेच १.७७% याचा अर्थ महागाई दराशी निगडित केल्यास उणे नफा मिळेल

आज सुद्धा हा फंड सेन्सेक्स पेक्षा कमी नफा देतो आहे.

आणि त्यावेळेस (एप्रिल २०२०) कुणाला पैशाची गरज भासली असती तर व्याज सोडाच मुदलात खोट निघाली असती.

याच साठी मी धागा काढला आहे कि चढत्या बाजारात आपल्या गाईचे दूध काढून घ्या

अमर विश्वास's picture

8 Apr 2021 - 9:36 am | अमर विश्वास

डॉक्टर साहेब

कृपया राग मनू नये . स्पष्टच सांगतो .. आपले मत चुकीच्या गृहीतावर (Assumption) आधारित आहे किंवा आपणास म्युच्युअल फंड आणि सिप चा मूळ उद्देश कळलेलाच नाही .

आपल्यला म्युच्युअल फंड / शेयर्स मधली गुंतवणूक आवडत नाही हे तुमच्या धाग्यांवरून / प्रतिसादांवरून कळले ... पण तुमच्या या प्रतिसादांमुळे इतरांच्या मनात संदेह निर्माण होऊ नये म्हणून हा उत्तराचा प्रपंच

याचे उत्तर वर लेखातच आहे . कसे ते सांगतो

१. ही गुंतवणूक सिप च्या माध्यमातून करणे अपेक्षित आहे .... म्हणजे दरमहा ठराविक रक्कम. तेंव्हा एकदम दहा हजार टाकले आणि तीन वर्षांनी किती झाले .. असे करणे अपॆक्षित नाही. तसेच ही गुंतवणूक दीर्घ मुदतीची असणे अपेक्षित आहे. उदाहरण देतानाही मी १० वर्षे दिले आहे. शेअर बाजारात रोजचे उतार चढाव चालूच असतात. पण दीर्घ मुदतीत शेअर बाजार फक्त वरच गेला आहे.

२. लेखातला चवथा मुद्दा गुंतिवणुकीची तरलता (Liquidity) समजून घ्यावात हे विनंती. स्पष्ट लिहिले आहे ... मार्केट हे आपल्याला अनुकूल असेलच असे नाही .. त्यामुळे साधारणतः: योग्य बाजारभाव हवा असेल तर साधारणतः ३ महिन्याचा कालावधी गृहीत धरावा
माझे स्वतः चे उदाहरण देतो. एप्रिल २०२० मध्ये माझ्या पोर्टफोलिओ चा CAGR ६.५% टक्क्यांपर्यंत घसरला होता ... पण पॅनिक न होता सिप चालूच ठेवल्या ... दोन महिन्यात CAGR १०.५% आणि तीन महिन्यात पुन्हा १२% झाला.

परत एकदा लिहितो ... सिप चा उद्देश emergency fund उभा करणे नाही. कारण याची तरलता (liquidity) मध्यम आहे ...

याचे एक उदाहरण देतो ... माझ्याकडे दुसरे घर (फ्लॅट) आहे. त्याची किंमत आज पन्नास लाख आहे. पण मला पैसे हवे असतील तर ते हातात येण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो ... या उलट सेविंग अकाउंट मध्ये मला ४% मिळतात पण पैसे लगेच काढता येतात. म्हणून मी सगळे पैसे सेविंग मध्येच ठेवायचे का ?

प्रत्येक असेट क्लास चे उद्दिष्ट समजावून घ्या. मग कशात गुंतवणूक करायची ते ठरावा.

दुसऱ्या धाग्यावर प्रतिसाद दिला होता तो परत इथे चिटकवतो

गुंतवणुकीचे अनेक मार्ग आहेत आणि don't put all the eggs in one basket हे ही मान्य

गुंतवणूक करताना सामन्यतः या गोष्टी बघतो :

१. ROI किंवा परतावा (काही बाबतीत ग्रोथ पोटेन्शिअल )
२. कालावधी
३. कमीतकमी किती गुंतवणूक लागेल
४. तरलता (Liquidity)
५. तुमची जोखीम घेण्याची क्षमता

यानुसार वेगवेगळ्या असेट क्लास मध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरते

Asset Classes :
Equities (stocks), fixed Income (bonds), cash and cash equivalents, real estate, commodities, Gold, futures or other financial derivatives etc. etc...

अर्थात या सगळ्यात आपण गुंतवणूक करू शकत नाही (technically yes.. practically no)

सरते शेवटी शेअर मार्केट ही वाहती गंगा आहे. गेली पंचवीस वर्षे जोमाने वाहत होती .. पुढची पंचवीस वर्षे जोमाने वाहत राहणार आहे .. या गंगेत हात धुवू नका .. तर नावेतून सफर करा .. दीर्घ कालीन गुंतवणुकीचा लाभ घ्या

चौकटराजा's picture

8 Apr 2021 - 10:02 am | चौकटराजा

दीर्घ मुदत म्हटली की त्याची सांगड एक तर तांत्रिक पद्धती ने घालावी लागते व दुसरी तात्त्विक पद्धतीने ! दीर्घ काळात महागाई वाढत असते .जगाच्या इतिहासात कधी दीर्घकाळ स्वस्ताई झाल्याचे उदाहरण नाही ! अर्थशास्त्राच्या प्रकाशात ते शक्य ही नाही ! आपल्याला मिळालेला परतावा हा महागाईच्या तुलनेतच पाहावा लागतो म्हणून लाईफ इन्सुअरन्स मध्ये अचाट गुंतवणूक करू नये या मताचा मी आहे ! फक्त आपले कुटुंब अगदीच उघडे पडणार नाही इतकीच करावी ! कारण दीर्घ काळात पैशाचे मूल्य हे कमी होत जात असतेच ! तात्त्विक पद्धतीने सांगड अशी की काही गोष्टी आपण तारुण्यात वा मध्य वयात उपभोगल्या असत्या तर बरे झाले असते उगाच वाढीव पैशाच्या पाठीमागे लागलो असे जर वाटले तर ती एक शोकांतिकाच आहे !

आयुष्य एकदाच येते त्यात बाल्य ,तारुण्य व वार्धक्य यांना पर्याय नाही याचा विचार हरेक घडीला विचार करूनच खर्च कसा व किती करायचा ,बचत वा गुंतवणूक कशी किती व कुठे करायची याचा सम्यक अभ्यास करीत पुढे जायचे हे महत्वाचे !

सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व प्रकारचे एजंट मग ते एल आय सी ,पोष्ट , एम एल एम ,युरेका वाले , क्रेडिट कार्ड वाले हे कोणी देवदूत नव्हेत ते पोटार्थी असतात हे कधी विसरू नये त्याच्या कह्यात सापडू नये !

अमर विश्वास's picture

8 Apr 2021 - 10:16 am | अमर विश्वास

चौकट राजा साहेब ...

लाइफ इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम म्हणजे इन्वेस्ट्मेन्ट्स नाहीत.
तसेच इन्वेस्ट्मेन्ट्स आणि लाईफ एन्जॉयमेंट्स या परस्पर विरोधी नाहीत ...

जीवनाचा आनंद घ्यायला जो पैसा लागतो तो इन्वेस्ट्मेन्ट्स मधून येतो .... मग हा आनंद वयाच्या ३० व्या वर्षी असो किंवा ५०-६०-७० व्या

चौकटराजा's picture

8 Apr 2021 - 10:35 am | चौकटराजा

खरे तर कोणताच विमा ही गुंतवणूक नसते तरी देखील "लाइफ इन्शुरन्स" ही एक गुंतवणूक आहे असे तुम्हाला पटविण्यात एजंट यशस्वी होत असतात ! जीवनाचा आनंद हा बचत करून देखील घेता येतो . माझ्या परिचयात असे अनेक आहेत की ज्याचे साधे डी मॅट अकाउंट देखील नाही ! बाजारात थेट पैसे गुंतविण्याचे आज भारतातील प्रमाण फार कमी आहे ! बचत याचा अर्थ एकच आपल्यातील अनावश्यक खर्चाना " तूर्त " काट" लावून मोठा खर्च एकदम करणे ! अगदी फालतू उदा द्यायचे झाले तर फुलपुडा बन्द करून देवाची फुलाविना फक्त अक्षता वाहून पूजा करणे .वर्षाला १८०० रू वाचतात . त्यात किचन मधील एखादे युटेन्सील येउ शकते . ते दीर्घकाळ सेवा देते . प्रकट होउन देव काही फुले नाही म्हणून तक्रार करीत नाही !!

@ चौकटराजा @ सुबोध खरे @ अमर (येथील आणि दुसऱ्या धाग्यावरील same अशी ) मते वाचली..

थोडा वेळ द्या.. ह्या प्रश्नाची उत्तरे माझ्याकडे नीट आहेत..
खाली separate प्रतिसादात थोड्या वेळाने देतो आहे...

मी वेगळा प्रतिसाद लिहायला घेतला, पण तो इतका मोठा झाला आणि महत्वाचा वाटला सो मी नविन धागा म्हणुन दिला आहे

https://misalpav.com/node/48624

धन्यवाद

वामन देशमुख's picture

9 Apr 2021 - 10:12 am | वामन देशमुख

अगदी फालतू उदा द्यायचे झाले तर फुलपुडा बन्द करून देवाची फुलाविना फक्त अक्षता वाहून पूजा करणे .वर्षाला १८०० रू वाचतात . त्यात किचन मधील एखादे युटेन्सील येउ शकते . ते दीर्घकाळ सेवा देते . प्रकट होउन देव काही फुले नाही म्हणून तक्रार करीत नाही !!

काय हे चौकटराजा साहेब? तुमच्या अर्थविषयक युक्तिवादात देवाधर्माला आणण्याची काही गरज नाही. तुम्ही सुशिक्षित, सभ्य, शहाणे असाल तर हिंदू देवतांचे अवमान करणारे हे विधान मागे घेऊन आस्तिक हिंदूंची क्षमा मागाल अशी नम्र अपेक्षा आहे.

संपादक मंडळ, चौकटराजांचा हा वरील प्रतिसाद संपादित करून त्यातील आक्षेपार्ह भाग काढून टाकावा ही नम्र विनंती.

https://www.misalpav.com/comment/1102053#comment-1102053

चौकटराजा's picture

9 Apr 2021 - 10:22 am | चौकटराजा

पूजा करू नका असे मी म्हणालो आहे का ...... ? फुले वहाणे हे कर्मकान्ड आहे पूजा करणे नव्हे या माझ्या मतावर मी पक्का आहे. माझ्या मताबद्द्ल तुम्ही मिपा काय सुप्रीम कोर्टात गेलात तरी चालेल मी क्षमा मागण्याचा प्रश्नच येत नाही ! ब्राह्मो समाज मूर्तीपूजा करतो का .. याचाही शोध घ्या ! दुसरे असे की पूजा करणे म्हन्जे अस्तिकता हे नक्की का याचा शोध घ्या मग माझ्या नादाला लागा ! आता इतकेच ! फालतू उदाहरण याचा अर्थ लहानसे उदाहरण असा मला अभिप्रेत आहे ! त्याचा कुणाच्या भावना दुखावण्याशी सम्बन्ध असेल तर त्याला तसा कोर्टात सिद्ध करावे लागेल .

वामन देशमुख's picture

9 Apr 2021 - 10:45 am | वामन देशमुख

अगदी अपेक्षित प्रतिसाद! "तुमच्या अर्थविषयक युक्तिवादात देवाधर्माला आणण्याची काही गरज नाही" एवढंच कॉमन सेन्स असलेल्यांचं म्हणणं आहे.

पूजा करू नका असे मी म्हणालो आहे का ...... ?

असं म्हणण्याचा तुम्हाला अधिकार आहे का?

फुले वहाणे हे कर्मकान्ड आहे पूजा करणे नव्हे या माझ्या मतावर मी पक्का आहे. माझ्या मताबद्द्ल तुम्ही मिपा काय सुप्रीम कोर्टात गेलात तरी चालेल मी क्षमा मागण्याचा प्रश्नच येत नाही ! ब्राह्मो समाज मूर्तीपूजा करतो का .. याचाही शोध घ्या ! दुसरे असे की पूजा करणे म्हन्जे अस्तिकता हे नक्की का याचा शोध घ्या मग माझ्या नादाला लागा ! आता इतकेच ! फालतू उदाहरण याचा अर्थ लहानसे उदाहरण असा मला अभिप्रेत आहे ! त्याचा कुणाच्या भावना दुखावण्याशी सम्बन्ध असेल तर त्याला तसा कोर्टात सिद्ध करावे लागेल .

अरे अरे अरे ! सावरा स्वतःला... हा अर्थविषयक / गुंतवणूकविषयक धागा आहे, पूजा करण्याच्या पद्धतीबद्धलचा नाही. तुमच्या अर्थविषयक युक्तिवादात देवाधर्माला आणण्याची काही गरज नाही. एवढंच म्हणणं आहे.

बाकी, तुम्ही सुशिक्षित, सभ्य, शहाणे असाल + "तुमच्या अर्थविषयक युक्तिवादात देवाधर्माला आणण्याची काही गरज नाही" हा कॉमन सेन्स तुम्हाला असेल हा माझा गैरसमज दूर झाला!

चौकटराजा's picture

9 Apr 2021 - 12:01 pm | चौकटराजा

तुम्ही सुशिक्षित, सभ्य, शहाणे असाल + "तुमच्या अर्थविषयक युक्तिवादात देवाधर्माला आणण्याची काही गरज नाही" हा कॉमन सेन्स तुम्हाला असेल हा माझा गैरसमज दूर झाला!
हे फार चांगले झाले. गैरसमज प्रथम करूनच कशाला घ्यायचा पण तो करून घेण्याची देखील काहींना खाज असते ना ! मी सभ्य नाही .सुशिक्षित नाही व शहाणा तर बिलकूल नाही ! बस्स झालं समाधान मला शिव्या घालून ?

वामन देशमुख's picture

9 Apr 2021 - 2:09 pm | वामन देशमुख

मी सभ्य नाही .सुशिक्षित नाही व शहाणा तर बिलकूल नाही

ते तर तुमच्या भाषेवरून उघडच झाले आहे. मिपा हे सभ्य सदस्यांचे संस्थळ आहे; इथे तुमच्यासारख्यांचे काय काम?

आधी "तुमच्या अर्थविषयक युक्तिवादात देवाधर्माला आणण्याची काही गरज नाही" हा कॉमन सेन्स शिकून घ्या मग कीबोर्ड चालवा.

चौकटराजा's picture

9 Apr 2021 - 4:46 pm | चौकटराजा

तुम्ही मिपाचे मालक झालात की न्यायनिवडा करायला शिका पहिले ! मग आपण कुणाला कॉमन सेन्स आहे अन कोणाला नाही ते पाहू ! आणि ट्रोलिन्ग मुळे इथले अनेक उडालेले आहेत याचे भान ठेवा म्हणजे झाले. बळेबळेच अखिल हिन्दू जगतातील अस्तिकाचे नेत्रुत्वचा डान्गोरा पिटू नका ! हिम्मत असेल तर पोलिसात तक्रार करा !

आणि ट्रोलिन्ग मुळे इथले अनेक उडालेले आहेत याचे भान ठेवा म्हणजे झाले.

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही हो साहेब!

रच्याक - "अर्थविषयक युक्तिवादात देवाधर्माला आणण्याची काही गरज नाही" एवढ्या कॉमन सेन्सचा अभाव एका जुन्याजाणत्या आयडीला कुठवर फरफटत नेतोय हे पाहून वाईट वाटलं.

वामन देशमुख's picture

9 Apr 2021 - 5:45 pm | वामन देशमुख

Please ignore this duplicate stuff.

वामन देशमुख's picture

9 Apr 2021 - 5:04 pm | वामन देशमुख

आणि ट्रोलिन्ग मुळे इथले अनेक उडालेले आहेत याचे भान ठेवा म्हणजे झाले.

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही हो साहेब!

रच्याक - "अर्थविषयक युक्तिवादात देवाधर्माला आणण्याची काही गरज नाही" एवढ्या कॉमन सेन्सचा अभाव एका जुन्याजाणत्या आयडीला कुठवर फरफटत नेतोय हे पाहून वाईट वाटलं.

सुबोध खरे's picture

8 Apr 2021 - 10:25 am | सुबोध खरे

मी समभाग नि म्युच्युअल फंड( विशेषतः ग्रोथ) हा एकाच ऍसेट क्लास मानतो. त्यामुळे ज्याला ज्यात जमेल त्यात गुंतवणूक करावी आणि ती दीर्घ मुदतीची असावी यातसुद्धा कोणताही प्रत्यवाय नाही.

माझे म्हणणे एवढेच आहे कि केवळ एस आय पी करण्यापेक्षा थोडे पैसे हातात ठेवावे आणि बाजार पडला कि त्या पैशात समभाग किंवा म्युच्युअल फंड घ्यावे आणि बाजार जेंव्हा कारण नसताना चढवलेला असतो तेंव्हा हे पैसे नफ्यासह काढून घ्यावे आणि परत बाजूला ठेवावे. असे केल्यास एस आय पी पेक्षा जास्त परतावा मिळतो असे सर्व तज्ञ खाजगीत सांगतात.

आपलेच उदाहरण घेतले तर ६ एप्रिलला आपण १ लाख त्याच म्युच्युअल फंडात टाकले असते तर आज ते १ लाख ९७ हजार झाले असते. याउलट दर महा ८ हजार ३०० ची एस आय पी ( एक वर्षासाठी) केली असता हेच पैसे १ लाख ४७ हजार होतील.

मी थोडा फार अभ्यास करतो त्यामुळे म्युच्युअल फंड साठी द्यायला लागणारे चार्जेस मला वाचवता येतात. यात एंट्री लोड एक्झिट लोड आणि असेट मॅनेजमेंट चार्जेस सारखे गृहीत आहेत जे २ ते २.५ % होतात तर स्वतः गुंतवल्यास ०.७ % आहेत.

दुर्दैवाने जेंव्हा बाजार पडतो तेंव्हा म्युच्युअल फंड किंवा ब्रोकर आपल्या जाहिराती बंद करतात. आणि आता एक वर्षाने सर्व जण CAGR अमुक आहे तमुक आहे म्हणून मोठ्या मोठ्या जाहिराती करू लागतात. हा त्यांच्या धंद्याचा भाग आहे हे गृहीत धरले तरी सामान्य माणसे (लोभामुळे असले तरी) या बुडबुड्यात ओढली जातात आणि आपले घामाचे पैसे गुंतवून बसतात.

आज बाजार हा उच्ची ला आहे तो सूज आल्यामुळे आहे. आता एस आय पी करण्यापेक्षा आपले म्युच्युअल फंड किंवा समभाग विकून थंड बसणे हे माझ्या विचाराने जास्त बरोबर ठरेल.

वाहत्या गंगेला पूर आलेला असता काठावर बसण्यापेक्षा सुरक्षित अंतर राखून बसणे आणि पूर ओसरला कि परत येणे हे जास्त संयुक्तिक ठरेल.

अमर विश्वास's picture

8 Apr 2021 - 10:45 am | अमर विश्वास

डॉक्टर साहेब

म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून इक्विटी आणि डेट या दोन्ही असेट क्लास मध्ये गुंतवणूक करता येते. तसेच गोल्ड या असेट क्लास मध्ये ही.
त्यामुळे अशा प्रतिसादाबद्दल काय बोलायचे

दुसरे म्हणजे सिप चा एक उद्देश आर्थिक शिस्त हा देखील आहे (मुद्दा क्र. ३)

मुळात तुम्हला सिप चा हेतूच काळलेलाच नाही ...

सिप करू नका हे सांगणारे कोण हे तज्ञ ? आणि थोडे पैसे बाजूला ठेवायचे म्हणजे किती ? आणि मार्केट पडले कि म्हणजे ? किती टक्के ? आणि किती काळ वाट पाहायची ?

स्पष्टच सांगतो .. अत्यंत चुकीचे विधान आहे हे

सुबोध खरे's picture

8 Apr 2021 - 10:49 am | सुबोध खरे

माझा विचार असा आहे कि आपली १० % गुंतवणूक अशा रोख पैशात ठेवावी ज्यामुळे संधी आली कि त्याचा फायदा घेता यावा.

बाकी आपले आणि माझे विचार जुळत नाहीत त्यामुळे मी येथेच थांबतो.

अमर विश्वास's picture

8 Apr 2021 - 11:21 am | अमर विश्वास

१००% गुंतवणूक सिप च्या माध्यमातून करावी असे माझे म्हणणे नाही ...

तसेच १००% गुंतवणूक म्युच्यअल फंडात करावी असेही मी सुचवणार नाही

पण सिप हे अत्यंत परिणामकारी साधन आहे त्याच्या फायदा मी घेतला आहे .. इतरांनाही व्हावा इतकीच सदिच्छा

मुक्त विहारि's picture

8 Apr 2021 - 11:52 am | मुक्त विहारि

तुम्हाला मेसेज करतो

चौकस२१२'s picture

8 Apr 2021 - 12:55 pm | चौकस२१२

म्हणून लाईफ इन्सुअरन्स मध्ये अचाट गुंतवणूक करू नये या मताचा मी आहे !
आपल्या डोकयावर एकूण कर्ज ( बहुतेक करून गृहकर्ज ) जेवढे आहे तेवढे + थोडे निदान "मृत्यू, अपंगत्व " याचा विमा तरी नक्की घयव्वा माणसाने !

आपण म्हणता तसे सिप आणि डॉ खरे म्हणतात तसे सिप + बाजूला ठेवलेले पैसे यातून चढ उतारा प्रमाणे वेगळे गुंतवणे हे दोन्ही करता येते कि!
अर्थात हे हि खरे कि डॉ म्हणतात त्यात हे गृहीत आह कि एक तर तसे वेगळे पैसे असले पाहिजेत आणि दुसरे असे कि त्यात नेमका तुमचा अंदाज चुकीचा निघालं तर एक दोन शेअर मध्येच जर पॅसीए असतील तर जास्त धोका घेतला गेलं कारण जरी एकूण बाजार परत वॉर आलं तरी त्या त्या कंपनी चाय बिझिनेस मॉडेल मध्ये गोची होऊ शकते !

चौकटराजा's picture

8 Apr 2021 - 3:13 pm | चौकटराजा

आपण घेतलेले खास करून गृहकर्ज कव्हर होईल हा मुद्दा आपोआप अमलात येतो कारण कर्ज देणारी संस्थाच त्याची चौकशी अगोदर करते मगच कर्ज देते ! अर्थात कर्ज किती घ्यायचे हा मुद्दा फारच महत्वाचा असतो. मी ८८ साली घर घेताना १ लाख ३८ हजार पैकी माझे ८० हजार व बायकोचे २५ हजार तयार होते. बाकीचे वडिलांकडून बिनव्याजी घेऊन परत केले . वडिलांचा १० वर्षे व आईचा ३२ वर्षे सांभाळ केला. हे मी का करू शकलो कारण आज ना उद्या बजाज आपल्याला ढुंगाणावर लाथ मारून बाहेर घालवणार याची मला भीती होतो. म्हणून कोणतातरी लहानसा व्यवसाय तरी करता यावा यासाठी खरेतर मी पैसे साठवीत होतो . माझा अंदाज बरोबर ठरला ,बजाजने एक अख्खी फॅक्टरी बंद केली व दोन ब्रॅंचेस ही बंद केल्या ! माझ्या सारखा कॉस्टिंगचा विचार फारच कमी लोक करतात . प्लेझर ऑफ बीइंग फूल्ड अशी मानसिकता असलेली माणसेही मी पाहिली. तसे होणे मी टाळले तरी ही डी एस के नावाच्या एका नावाने मी मूर्खपणा केला याचा अनुभव मला दिलाच !

मुक्त विहारि's picture

7 Apr 2021 - 6:15 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

सोत्रि's picture

7 Apr 2021 - 6:24 pm | सोत्रि

'Know nothing' Invester साठी इंडेक्स फंड हा उत्तम पर्याय आहे.
मोतीलाल ओसवालचे इंडेक्स फंड्स s&p 500 index आणि nasdaq 100 index ह्या अमेरिकेतील इंडेक्समधे गुंतवणुकीचा पर्याय देतात.

-(म्युच्युअल फंड गुंतवणुकदार) सोकाजी

राघव's picture

7 Apr 2021 - 6:43 pm | राघव

हे बेश्ट झालेय बंधो! गणेशाभौनं काढलेल्या लेखमालेमुळे चांगला "ट्रेंड" येतोय! :-)
बरेच प्रश्न फंड्स बद्दलही आहेत. जसजसे पुढचे लेखन होईल त्यातून कदाचित गुंते सुटतील. वाचतोय.

Bhakti's picture

7 Apr 2021 - 9:01 pm | Bhakti

फारच सकारात्मक आणि सोप्या भाषेत सांगत आहात.भविष्यातील गुंतवणूकसाठी वाचत आहे, समजून घेत आहे.

आंद्रे वडापाव's picture

8 Apr 2021 - 10:21 am | आंद्रे वडापाव

तुम्हाला फंडा विषयी चांगली माहिती दिसतेय.
कृपया, खालील माहिती आपल्याला असल्यास/ वा नसल्यास, त्याप्रमाणे मार्गदर्शन करावे.

उत्तम फंड कसा शोधायचा ?
फंड मॅनेजर बदलत असेल तर फंडाचा उत्तमपणा कसा ठरवायचं ?
उत्तम फंड मॅनेजर कसा शोधायचा ?
उत्तम फंड मॅनेजर जो फंड मॅनेज करतो त्यात गुंतवणूक करायची ? फंड मॅनेजर बदलला तर काय करावे ? फंड मधेच बंद पडला तर काय करावे ? किती एक्स्पेन्स रेशो हा वाजवी ?

अमर विश्वास's picture

8 Apr 2021 - 10:49 am | अमर विश्वास

फंड निवडताना मी काय बघतो हे पुढच्या भागात येईलच .. तेंव्हा यावर जरूर चर्चा करू या

फंड निवडण्याचा हाच एकमेव मार्ग असे असा दावा मी कधीच करणार नाही पण मला याचा फायदा झाला तेंव्हा माझे अनुभव नक्कीच सांगेन

king_of_net's picture

8 Apr 2021 - 10:48 am | king_of_net

अमर विश्वास तुमच्याशी १००% सहमत
मला टंकायचा प्रचंड कंटाळा आहे म्हणुन थोडक्यात सांगतो.

savings वैगेरे मधे मलाही काडीचा रस नव्हता पण आयुष्यात अशा काही गोष्टि घडल्या कि २०१६ ला सुरवात करावी लागली.
महिना १००० नी सुरवात केली
१- SBI Blue Chip Fund - Regular Plan - Growth
२- Mirae Asset Emerging Bluechip Fund - Regular Plan Growth
३- ICICI Prudential Value Discovery Fund - Growth
४- HDFC Mid-Cap Opportunities Fund - Regular Plan - Growth
५- ABSL Frontline Equity Fund -Growth-Regular Plan

ही गुंतवणुक professional च्या सल्ल्याने केली होती ज्याचे त्याला आजही commission मिळत आहे.
ह्या नंतर मी बर्याच financial sites वर जावुन अभ्यास केला आणी MF चे अनेक प्रकार समजुन घेतले आणि direct इन्वेस्टमेंट सुरु केली..
मागल्या वर्षी जेंव्हा market ३०००० ला गेले होते त्यावेळेस तर मी एक मोठी amount lumpsum इन्वेस्ट केली माझ्या top 5 फंड्स मधे.
आजच्या घडीला माझ्या portfolio मधे diverse फंड्स आहेत आणि overall average ३४% चा परतावा देत आहेत.

बाकी ज्या लोकांमधे नकारात्मता खचाखच भरली आहे त्यांचे काहीही करता येणे नाही..

वैयक्तिक सांगायचे तर, हे आर्थिक गणित माझ्या आकलन शक्तीच्या बाहेर आहे...

पण, माझ्या मुलाला हे गणित पटत आहे...

चौकटराजा's picture

8 Apr 2021 - 12:21 pm | चौकटराजा

३४ टक्के परतावा देत असतील तर ते विकून टाका व नफा इतर मजा करण्यासाठी वापरा . मी रिलायन्स चा शेअर ३१५० ला एकदा व १५४० ला दुसऱयांदा विकला . आलेले पैसे वापरले ! विकायचे धाडस असेल तरच मार्केटात घुसावे ! मी ३१५० ला विकल्यावर तो शेअर कधीही त्या पातळीला गेला नाही ! आपण एक आपला परतावा ठरवावा तो मिळाला की बाजाराला रामराम करावा . पैसे खर्च करावेत . पुन्हा कधीतरी असेच घुसावे ! कोणत्या एका कंपनीच्या ,उद्योग पतीच्या ,सेक्टर च्या प्रेमात कधीही कायमचे पडू नये असा तिथला मूलभूत नियम आहे !! मी वरच म्हटले आहे की आता आयुष्याची संध्याकाळ झाली आहे व पुढच्या पिढीला यात रस नाही ! सबब मी थांबलो आहे ! बाकी गुंतवणुकीचे महत्व खास करून अत्यंत दीर्घ काळाच्या मला मान्य आहे. १ लाख ३८ हजाराचा फ्लॅट मी २७ लाखाला विकला . त्यात महागाई विचारात घेता मला २५ लाख सुटले की कमी तो विचार आता अभ्यासकानी करावा. माझ्या एक नातेवाईकाचे ४ फ्लॅट आहेत . मी त्याला नेहमी म्हणतो त्यातला एक तरी विकून ऐश करून दाखव ! पुढच्या पिढीच्या प्रेमात माणूस पडला की या जन्मांतील आपला आनंद ( अर्थात ऎहिक ) आपल्याला पुरेसा मिळत नाही !

मुक्त विहारि's picture

8 Apr 2021 - 12:50 pm | मुक्त विहारि

अपत्य नालायक असेल तर, पैसा ठेऊ नये

आणि

अपत्य कर्तृत्ववान असेल तरीही पैसा ठेऊ नये

बिटाकाका's picture

9 Apr 2021 - 12:01 am | बिटाकाका

प्रतिसाद आवडला! प्रत्येकाचं गुंतवणूक, परतावा, आणि त्यातून करायची ऐश याचं तत्वज्ञान वेगळं असतं, पण वरील प्रतिसादाच्या गाभ्याशी मी सहमत आहे.

आपण एक आपला परतावा ठरवावा तो मिळाला की बाजाराला रामराम करावा .

याच्याशी हजार बार सहमत! मी माझे टार्गेट ठरवतो आणि तिथे बाहेर पडतो. एकुणात तोट्याचे दुःख हे फायद्यात झालेल्या तोट्याच्या दुःखापेक्षा सुसह्य असते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे :)

king_of_net's picture

9 Apr 2021 - 11:01 am | king_of_net

चौकटराजा,
मी जी काही गुंतवणुक करत आहे ती retirement फंडसाठी करत आहे.
आज जो परतावा मिळत आहे तो अजुन ८-१० वर्षांनी ७०-८०% होउ शकतो.
SIP करताना Target ठरवणे खुप जरुरीचे आहे.
मजा करायला मला फंड्स विकायची गरज नाही. त्याची सोय पगारातुन केली आहे.

ज्यांना retirement साठी किती पैसे लागतील हे जाणुन घ्यायचे असेल, त्यांनी खालिल व्हिडिओ पहावा
https://www.youtube.com/watch?v=5oaRprVv0Go

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Apr 2021 - 1:01 pm | राजेंद्र मेहेंदळे

लोकांची वेगवेगळी मते वाचत आहे. मी स्वतः म्युचुअल फंड निवडण्यासाठी ही किवा अशाच वेब साईट वापरतो(एच डी एफ सी चे उदाहरण घेतले आहे, उजव्या बाजुला वरती फंड फॅमिली ड्रॉप डाउन वापरुन कोणताही फंड बघु शकता)
https://www.moneycontrol.com/mutual-funds/amc-details/HD

१. मी एस आय पी चा पंखा आहे, आज माझा एस बी आय म्युचुअल फंडचा पोर्ट्फोलिओ ४०% तर एच डी एफ सीचा जवळपास ३५ टक्के नफा दाखवतोय तो केवळ थंड डोक्याने केलेल्या एस आय पी मुळेच. हे पैसे मी मुलांच्या शिक्षणासाठी जमवतोय. पण क्वचित गरज लागल्यास १०-२० हजार काढतोही. बँकेला हात घालण्यापेक्षा ते बरे पडते.
२. जर एंट्री/एग्झिट लोड्/कमिशन वगैरे टाळायचे असेल तर एक उपाय आहे. १० टॉप् म्युचुअल फंड घ्या. प्रत्येक म्युचुअल फंडचा एक कॉलम बनवा आणि त्याखाली तो म्युचुअल फंड कोणत्या कंपन्यांमधे पैसे गुंतवतो ती नावे(ही माहिती कुठेही वेबसाईटवर मिळते) लिहा. हे कोष्टक तयार झाले, की कुठल्या कंपन्या समान आहेत ते बघा आणि त्या कंपन्यांचे शेअर्स जमवायला सुरुवात करा--३-५ वर्षांचे टार्गेट ठेवुन. आता हे ओळखायला कुणा तज्ञाची गरज नाही की तुमच्या ह्या कोष्टकात विप्रो,इन्फोसिस्,टी सी एस, रिलायन्स,एच डी एफ सी,एस बी आय्,अ‍ॅक्सिस,आय टी सी,सन फार्मा या कंपन्या येणारच. कारण हे मार्केट लीडर्स आहेत. त्यामुळे जमेल तसे शेअर्स घेत रहा आणि मुलांची शिक्षणे,लग्ने,घर किवा कार खरेदी, गृह कर्ज फेडणे, परदेश वारी अशा वेळेला पाहीजे तेव्ह्ढे विकुन पैसे वापरा. या पर्यायात चांगली तरलता, कमी जोखीम, उत्तम परतावा, वाढती महागाई सगळेच साधेल. टॅक्स चा विचार करु नका. तो जायचा तेव्हढा जाणारच.पण कमिशन नक्की वाचेल.

उगा काहितरीच's picture

8 Apr 2021 - 1:15 pm | उगा काहितरीच

काहीसा असाच विचार केला होता. सकळ्या टॉप च्या कंपन्यात महिना ५००० तरी गुंतवायचे पण प्रत्यक्ष गुंतवणूक करायला गेलो तेव्हा काही प्रॕक्टिकल अडचणी आल्या. जसेकी ज्या दिवशी पैसे टाकायचे नेमकं त्याच दिवशी मार्केट चढलेलं असायचं. ज्या भावात अॉर्डर टाकली त्या भावात शेअर मिळायचे नाही. इत्यादी इत्यादी . आणि हे करण्यात वेळ बराच खर्ची जात होता. काम कमी असेल तेव्हा तर काही नाही पण काम जास्त असलं कि २-३ दिवस मार्केटकडे पहाणही होत नव्हत अशात काही संधी वाया गेली की दुःख होत होतं. म्हणून मग MF चाच पर्याय योग्य असं वाटतंय.

मुक्त विहारि's picture

8 Apr 2021 - 4:55 pm | मुक्त विहारि

IOCL, BPCL, HPCL ह्या बद्दल, तुमचे काय मत आहे?

Oil and Gas Sector, ह्यानेच मला चांगले आर्थिक बळ दिले...नौकरी करत होतो, शेयर नाही ...

सुबोध खरे's picture

8 Apr 2021 - 1:12 pm | सुबोध खरे

Lump Sum vs SIP - Which Mode Will Give You Better Returns ?

The answer to this question depends on the stock market conditions.
During upward trends, the lump sum mode of mutual fund investment tends to give relatively higher returns whereas during falling markets, investments made via a SIP generally provides better returns than a lump sum investment.

https://www.paisabazaar.com/mutual-funds/lump-sum-vs-sip-better-mode-mut....

सिरुसेरि's picture

8 Apr 2021 - 3:21 pm | सिरुसेरि

---म्युच्युयल फंड्स मुखतः ३ प्रकारात विभागले जातात
१. इक्विटी
२. डेट
३. हायब्रीड

या प्रत्येकाचे अनेक उपप्रकार आहे जसे small cap, mid cap, large cap, focused, sectoral, Gold ETF, US opportunity, FMP इत्यादि इत्यादि .....
----------------
उपयुक्त माहिती . याबरोबरच म्युच्युयल फंड्स चे उपप्रकार म्हणजे -- growth , dividend , reinvest .

बिटाकाका's picture

8 Apr 2021 - 11:54 pm | बिटाकाका

म्युच्युअल फंड किंवा सिप मध्ये मी स्वतः कधी हातपाय मारले नाहीयेत, पण या लेखाने बऱ्याच गोष्टी डोक्यात स्पष्ट झालेल्या आहेत. धन्यवाद या सुंदर लेखाबद्दल.

'हमखास कोट्याधीश होण्याचा मार्ग' हे शीर्षक वाचून एक बाळबोध वा बालिश प्रश्न विचारतो आहे.
स्वतः धागाकर्ता म्युच्युअल फंडामुळे किती काळात कोट्याधीश झालेला आहे, आणि त्यासाठी एकूण भांडवल किती लागले ?
याचे समाधानकारक उत्तर मिळाले तर मी माझ्या मुलाला सुचवेन. मला स्वतःला यात काहीच कळत नाही आणि आवडही नाही.
माझ्या एका मित्राला निवृत्तीच्या वेळी चाळीस -पन्नास लाख मिळाले, ते त्याने बँकेच्या फंड मॅनेजरच्या सल्ल्याप्रमाणे म्युच्युअल फंडात गुंतवले, परिणामी कित्येक लाखाचे नुकसानच झाले.

चौकस२१२'s picture

9 Apr 2021 - 4:48 am | चौकस२१२

मलाही या धाग्याचे शीर्षक अतिशयोक्तीचे वाटले जसे "महिना १०% मिळवणारे शेअर ..." असा जसा दुसरा धागा काढलं गेलं होता तसेच
पण या धाग्यातील माहिती रोचक असल्यामुळे शीर्षकाकडे दुर्लक्ष केले

पण एक प्रामाणिक विनंती जे कोणी आर्थिक विषयवार धागा काढणार असतील त्यांना कृपया उगाच असले सनसनाटी शीर्षक देऊ नका .. साधे सरळ जे मांडायचे आहे त्याला साजेशे शीर्षक द्या
" सिप / म्युच्युअल फुंडतील गुंतवणूक, संधी आणि धोके " असे शीर्षक कोठे आणि "हमखास कोट्याधीश बनण्याचा मार्ग .." हे शीर्षक कोठे ...

अमर विश्वास's picture

9 Apr 2021 - 10:09 am | अमर विश्वास

चौकस जी

पूर्ण जबाबदारीने आणि स्वानुभवानंतर हे शीर्षक दिले आहे. आत्ताच चित्रगुप्ताजींना तपशीलवार प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सनसनाटी वगैरे काही नाही.

गुंतवणूक ही कुठले तरी लक्ष (target ) ठेऊन करायची असते आणि माझे लक्ष १ कोटीचे आहे (होते)

तरीहि तुम्हाला शीर्षक पटले नसेल तर दुर्लक्ष करावे .

अमर विश्वास's picture

9 Apr 2021 - 10:03 am | अमर विश्वास

चित्रगुप्ताजी ...

तुमच्या कडे तर सगळ्यांच्या पापपुण्याचा हिशोब असतो ... आमच्या पोर्टफोलिओ चे काय घेऊन बसलात ....

विनोदाचा भाग जाऊदे ....

तुमच्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आहे : हो .. हा टप्पा (,milestone ) मी केंव्हाच पार केला आहे.सुरवातीला मी कन्सल्टन्ट च्या माध्यमातून गुंतवणूक करत होतो. मी सुरुवात केल्यावर एक दोन वर्षांनंतर उत्तम परतावा बघून माझ्या मित्रांनाही प्रोत्साहित केले. आज त्यातल्या काहींनी हा टप्पा पार केला आहे. काही या मार्गावर आहेत.

मी साधारणतः दहा वर्षांत हा टप्पा ओलांडला. जसे मी आधी प्रतिसादात दिले आहे त्याप्रमाणे माझे गृहकर्ज संपल्यावर हफ्त्याएव्हड्या रकमेचे (३० हजार महिना) सिप चालू केले. आधीचेही होतेच.

बाकी आधी एका प्रतिसादात मी लिहिले आहे त्याप्रमाणे SIP Calculator वापरून तुम्ही स्वतः अन्दाज घेऊ शकता .

तरी परत लिहितो ...

.

मुक्त विहारि's picture

9 Apr 2021 - 11:36 am | मुक्त विहारि

हाच कॅलक्युलेटर वापरला....

तुमच्या आणि गणेशाच्या धाग्यांचा आमच्या कुटुंबाला फायदा नक्कीच होईल....

उगा काहितरीच's picture

9 Apr 2021 - 12:49 pm | उगा काहितरीच

लिंक पेस्ट करता येईल का ? बरेच सापडले पण हे नाही सापडले.

अमर विश्वास's picture

9 Apr 2021 - 2:16 pm | अमर विश्वास

आंतरजालावर अनेक SIP calculators आहेत

ही लिंक वापरू शकता

SIP calculator : https://www.mutualfundssahihai.com/en/calculators

कोहंसोहं१०'s picture

11 Apr 2021 - 10:38 pm | कोहंसोहं१०

अमरजी छान धागा.

आपण कोणत्याही प्रकारचे गुंतवणूकदार असलो तरी थोड्या प्रमाणात का होईना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक असावीच या मताचा मी आहे. भविष्यासाठी, मग कारण कोणतेही असो जसं की मुलांचे शिक्षण, लग्न, परदेशवारी, रिटायरमेंट इत्यादी; एफडी, पीपीएफ किंवा तत्सम डेट प्रकारातील इन्व्हेस्टमेंट काही महागाईपेक्षा जास्त रिटर्न देऊ शकत नाहीत. पैसे उभे करायचे असतील तर equity इन्व्हेस्टमेंट हवीच.

ज्यांना यातले काहीच कळत नाही आणि तरीही पैसे गुंतवायचे असतील त्यांनी सरळ इंडेक्स फंड्स घेऊन मोकळे व्हावे. इतरांनी थोडी जोखीम घेऊन जास्त परताव्यासाठी इतर फंड प्रकारात गुंतवणूक करावी.

शेयर की म्युच्युअल फंड या वादामध्ये न पडता आपल्या ज्ञानाप्रमाणे, आवडीप्रमाणे योग्य तो निर्णय घ्यावा. माझ्या मते अगदी थोडासा अभ्यास करून निफ्टी किंवा सेन्सेक्स मधील काही मोठ्या कंपनीचे शेयर घेता येऊ शकते. हे काही रॉकेट सायन्स नाही.

मी स्वतः शेयर मधील सिप कटाक्षाने टाळतो. अगदी मोजक्या शेयरमध्ये मोठी गुंतवणूक कधीकधी धोकादायक ठरू शकते. त्यासाठी नियमितपणे बाजारावर लक्ष ठेवावे लागते. कितीही काळजी घेतली तरी DLF, युनिटेक, सत्यम, Yes Bank, Idea सारखी उदाहरणे काही काही वर्षांनी डोकं वर काढत असतात. शेयर मधील सिप अशावेळी मोठे नुकसान देऊ शकते. त्यामानाने म्युच्युअल फंड मधील सिप गुंतवणूक केंव्हाही बरी.

मुक्त विहारि's picture

12 Apr 2021 - 8:27 am | मुक्त विहारि

हे काही रॉकेट सायन्स नाही.....

आमचे राॅकेट दर शनिवारी उडते.. हे आर्थिक राॅकेट सायन्स, आमच्या बौद्धिक कुवते बाहेर आहे...

मराठी कथालेखक's picture

12 Apr 2021 - 6:55 pm | मराठी कथालेखक

इथे बरेच जण moneycontrol वापरताना दिसतात. valueresearchonline सुद्धा बघा असे मी सुचवेन.

मुक्त विहारि's picture

12 Apr 2021 - 7:14 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

अमर विश्वास's picture

12 Apr 2021 - 8:50 pm | अमर विश्वास

जर फंडांची माहिती (डिटेल्स / डेटा ) बघायचा असेल तर

https://www.valueresearchonline.com/
https://www.moneycontrol.com/
https://www.mutualfundindia.com/

यापैकी कुठलीहि साईट वापरा . सर्व माहिती मिळेल