ही लेखमाला लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे गणेशा भाऊंची "शेअर मार्केटची बाराखडी" ही लेखमाला. या लेखमालेत शेअर्स मध्ये गुंतवणूक कशी करावी (विशेषतः Position Trading) हे उत्तम पणे सांगत आहेत ... अर्थात ही प्रक्रिया किचकट आहे. तसेच High Risk High Gain हे तत्व इथेही लागू होते.
पण ज्यांना अशा पद्धतीने ट्रेडिंग शक्य नाही (अभ्यास नाही / वेळ नाही / रिस्क ची तयारी नाही ) त्यांच्या साठी दुसरा पर्याय काय ? माझ्या स्वतः च्या अनुभवावरून बऱ्याच गोष्टी शिकलो. सुरवातीला डे ट्रेडिंग / पोझिशन ट्रेडिंग केले. शेअर्स घेऊन लॉग टर्म इन्व्हेस्टमेंट (३+ वर्षे) ही केली. यात बराच फायदा आणि पुरेसा तोटाही पहिला. हे करत असताना गेली बारा तेरा वर्षे म्यॅच्युअल फंड्स मध्ये सिप (Systematic Investment Plan) च्या माध्यमातून गुंतवणूक करत आहे. आणि आज मी खात्रीने सांगू शकतो कि याप्रकारे योग्य गुंतवणूक केली तर नक्की कोट्यधीश होता येते
_____________________________________________________________________________________________________________________________
म्युच्युयल फंड्स मुखतः ३ प्रकारात विभागले जातात
१. इक्विटी
२. डेट
३. हायब्रीड
या प्रत्येकाचे अनेक उपप्रकार आहे जसे small cap, mid cap, large cap, focused, sectoral, Gold ETF, US opportunity, FMP इत्यादि इत्यादि .....
या सर्वांचे फायदे - तोटे आहेत. त्याच्या आढावा आपण पुढल्या भागात घेऊच
तत्पूर्वी म्युच्युअल फंड्स इन्व्हटमेंट्स चे मूलभूत नियम बघू या
१. म्युच्युअल फंडात कोणी गुंतवणूक करावी
याचे सोपे उत्तर म्हणजे .. सर्वानी गुंतवणूक करावी. सिप (SIP) च्या माध्यमातून केलेली गुंतवणूक ही दीर्घ मुदतीत धन संचय करण्यासाठी आहे.
२. म्युच्युअल फंडात किती गुंतवणूक करावी ?
याचेही सोपे उत्तर जास्तीत जास्त ...
दरमहा किती सिप करावी हे ठरवण्याचे दोन मार्ग आहेत ...
अ) आपले टार्गेट व कालावधी ठरवावा व SIP calculator वापरून गुंतवणूक किती ते ठरवावे
SIP calculator : https://www.mutualfundssahihai.com/en/calculators
उदाहरणार्थ मला पुढच्या १५ वर्षात ५० लाख रुपये जमा करायचे आहेत (रिटायरमेंट फंड). तर १२% CAGR धरला तर मला फक्त दहा हजार महिना SIP च्या माध्यमातून गुंतवावे लागतील. ...
ब) दुसरा मार्ग म्हणजे आपले उपन्न आणि खर्च याचा अंदाज घेऊन आपण किती रक्कम गुंतवयाची ते ठरवावे
यात एक महत्वाची गोष्ट... सिप ची रक्कम एका महिन्याच्या सूचनेने बदलता येते. नोकरी करणाऱ्यांसाठी दरवर्षी पगार वाढ झाली कि सिप ची रक्कम वाढवावी
३. शिस्तबद्ध गुंतवणूक :
सिप मुळे दरमहा ठरलेल्या तारखेला ठराविक रक्कम जाते त्यामुळे एक आर्थिक शिस्त रहाते
४. गुंतिवणुकीची तरलता (Liquidity)
साधारणतः ३ दिवसात आपली रक्कम (मार्केट व्हॅल्यू नुसार) काढून घेता येते. पण त्याच वेळी हे पण लक्षात घ्यावे कि मार्केट हे आपल्याला अनुकूल असेलच असे नाही .. त्यामुळे साधारणतः: योग्य बाजारभाव हवा असेल तर साधारणतः ३ महिन्याचा कालावधी गृहीत धरावा
थोडक्यात ही गुंतवणूक medium liquidity देते
५. एकदा सिप चालू केल्यावर रोज पोर्टफोलिओ बघू नये. तसेच वारंवार म्युच्यअल फंड्स च्या योजना बदलू नयेत. तीन महिन्यातून एकदा परीक्षण (review ) करणे योग्य
६. डेट - इक्विटी रेशो
तुमची किती टक्के गुंतवणूक डेट फंडात आणि किती टक्के गुंतवणूक इक्विटी फंडात करावी हे तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते .
उदाहरणार्थ ३० ते ४० वयोगटातील नोकरी करणारा माणूस जास्त रिस्क घेऊ शकतो . अशा लोंकासाठी साधारणतः ८०-२० किंवा ७०-३० (८०% इक्विटी - २०% डेट ) योग्य आहे, जसजसे वय वाढेल तसे हा रेशो ६०-४० किंवा ५०-५० करायला हरकत नाही
७. विविधता (diversification )
सिप ची रक्कम वेगवेगळ्या स्कीम मध्ये गुंतवावी तसेच सिप च्या तारखाही वेगवेगळ्या असाव्यात. जसे महिन्याच्या १ , ५, १० , १५ इत्यादी
आता पुढच्या भागात म्युच्युअल फंडाच्या योजनांचे विविध प्रकार आणि त्यांचे फायदे तोटे बघू या ...
____________________________________________________________________________________________________________________________
डिस्क्लेमर :
Mutual fund investments are subjected to market risk
Past results are no guarantee to future performance
I am one of the happy investor getting benefit of log term sustained investment. I am sharing my experiences & have no personal gains intended by this
वाचने
47227
प्रतिक्रिया
70
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्युच्युअल फंड्स .... हमखास
आंद्रे वडापाव... फार भंडावून
In reply to म्युच्युअल फंड्स .... हमखास by आंद्रे वडापाव
उत्तम फंड कसा शोधायचा ?
In reply to आंद्रे वडापाव... फार भंडावून by अमर विश्वास
12 %
In reply to आंद्रे वडापाव... फार भंडावून by अमर विश्वास
कपिलमुनीजी
In reply to 12 % by कपिलमुनी
कोणासाठी ?
In reply to म्युच्युअल फंड्स .... हमखास by आंद्रे वडापाव
आपण कोट्याधीश झालो तर
In reply to कोणासाठी ? by सोत्रि
उपयुक्त लेख.
जे ब्बात
माझा त्यावेळेस काहीच अभ्यास
In reply to जे ब्बात by राजेंद्र मेहेंदळे
राजेंद्र सर
In reply to जे ब्बात by राजेंद्र मेहेंदळे
प्रथमता अतिशय उत्तम सुरुवाती
धन्यवाद गणेशा ..
In reply to प्रथमता अतिशय उत्तम सुरुवाती by गणेशा
भारी
In reply to धन्यवाद गणेशा .. by अमर विश्वास
नक्कीच वाचायला आवडेल..
In reply to धन्यवाद गणेशा .. by अमर विश्वास
म्युच्युअल फंड
चौकट राजा साहेब ...
In reply to म्युच्युअल फंड by चौकटराजा
मुख्य गोची आहे ती म्हणजे आज
In reply to चौकट राजा साहेब ... by अमर विश्वास
डॉक्टर साहेब
In reply to मुख्य गोची आहे ती म्हणजे आज by सुबोध खरे
दीर्घ मुदत ..
In reply to डॉक्टर साहेब by अमर विश्वास
चौकट राजा साहेब ...
In reply to दीर्घ मुदत .. by चौकटराजा
लाइफ इन्शुरन्स
In reply to चौकट राजा साहेब ... by अमर विश्वास
@ चौकटराजा @ सुबोध खरे @ अमर
In reply to लाइफ इन्शुरन्स by चौकटराजा
मी वेगळा प्रतिसाद लिहायला
In reply to @ चौकटराजा @ सुबोध खरे @ अमर by गणेशा
अगदी फालतू उदा द्यायचे झाले
In reply to लाइफ इन्शुरन्स by चौकटराजा
वैचारिक गोंधळ
In reply to अगदी फालतू उदा द्यायचे झाले by वामन देशमुख
अगदी अपेक्षित प्रतिसाद!
In reply to वैचारिक गोंधळ by चौकटराजा
बरे मी ...
In reply to अगदी अपेक्षित प्रतिसाद! by वामन देशमुख
मी सभ्य नाही .सुशिक्षित नाही
In reply to बरे मी ... by चौकटराजा
तुम्ही
In reply to मी सभ्य नाही .सुशिक्षित नाही by वामन देशमुख
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
In reply to तुम्ही by चौकटराजा
Please ignore this duplicate
In reply to कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही by वामन देशमुख
आणि ट्रोलिन्ग मुळे इथले अनेक
In reply to तुम्ही by चौकटराजा
मी समभाग नि म्युच्युअल फंड(
In reply to डॉक्टर साहेब by अमर विश्वास
डॉक्टर साहेब
In reply to मी समभाग नि म्युच्युअल फंड( by सुबोध खरे
माझा विचार असा आहे कि आपली १०
In reply to डॉक्टर साहेब by अमर विश्वास
१००% गुंतवणूक सिप च्या
In reply to माझा विचार असा आहे कि आपली १० by सुबोध खरे
तुम्हाला मेसेज करतो
In reply to १००% गुंतवणूक सिप च्या by अमर विश्वास
सिप + बाजूला ठेवलेले पैसे
In reply to डॉक्टर साहेब by अमर विश्वास
बरोबर ..
In reply to सिप + बाजूला ठेवलेले पैसे by चौकस२१२
माहिती बद्दल धन्यवाद .....
झक्कास मालिका!
वाह!
उत्तम
तुम्हाला फंडा विषयी चांगली
फंड निवडताना मी काय बघतो हे
In reply to तुम्हाला फंडा विषयी चांगली by आंद्रे वडापाव
छान माहिती!
नकारात्मता खचाखच भरली आहे त्यांचे काहीही करता येणे नाही..
In reply to छान माहिती! by king_of_net
३४ टक्के ..
In reply to छान माहिती! by king_of_net
एक वाक्य वाचनांत आले होते ...
In reply to ३४ टक्के .. by चौकटराजा
प्रतिसाद आवडला! प्रत्येकाचं
In reply to ३४ टक्के .. by चौकटराजा
Target
In reply to ३४ टक्के .. by चौकटराजा
वाचत आहे
काहीसा असाच विचार केला होता.
In reply to वाचत आहे by राजेंद्र मेहेंदळे
ONGC आणि
In reply to वाचत आहे by राजेंद्र मेहेंदळे
Lump Sum vs SIP - Which Mode
---म्युच्युयल फंड्स मुखतः ३
म्युच्युअल फंड किंवा सिप
बाळबोध प्रश्न : स्वतः धागाकर्ता किती काळात कोट्याधीश झाला आहे ?
साजेशे शीर्षक द्या
In reply to बाळबोध प्रश्न : स्वतः धागाकर्ता किती काळात कोट्याधीश झाला आहे ? by चित्रगुप्त
चौकस जी
In reply to साजेशे शीर्षक द्या by चौकस२१२
चित्रगुप्ताजी ...
In reply to बाळबोध प्रश्न : स्वतः धागाकर्ता किती काळात कोट्याधीश झाला आहे ? by चित्रगुप्त
काल मुलांच्या बरोबर...
In reply to चित्रगुप्ताजी ... by अमर विश्वास
लिंक पेस्ट करता येईल का ?
In reply to काल मुलांच्या बरोबर... by मुक्त विहारि
आंतरजालावर अनेक SIP
In reply to लिंक पेस्ट करता येईल का ? by उगा काहितरीच
अमरजी छान धागा.
प्रतिसाद आवडला....
In reply to अमरजी छान धागा. by कोहंसोहं१०
valueresearchonline
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to valueresearchonline by मराठी कथालेखक
जर फंडांची माहिती (डिटेल्स /
In reply to valueresearchonline by मराठी कथालेखक