(...मारीला म्यां डोळा ;)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
5 Oct 2020 - 12:10 pm

पेरणा http://misalpav.com/node/47605

अनंतयात्रींची "...पाहिले म्यां डोळा" लैच अस्वस्थ करून गेली

म्हणून वातावरण जरा हलके करण्याचा प्रयत्न...

...मारीला म्यां डोळा 😉

पालथ्या मुठीत घट्ट पकडलेला गुलाब
जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरा.
घर्मबिंदूच्या ठिबकसिंचनाचा
शशकासम कापऱ्या शरीरावरुन अविरत अभिषेक.
बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित.
धपापते विद्रोही तप्तश्वास.
ओढणीने आच्छादलेल्या चेहऱ्यामागच्या नि:शब्द कवायतीमुळे कोंदलेले भवताल.
स्वप्न-जागृती, शुध्दी-बेशुध्दीच्या अस्थिर सीमारेषांवर भोवंडणार्‍या जीवनाची ही अनिश्चिततेची जीवघेणी कडवी.
संपतील एकदाची आत्ताच?
की,
ध्रुपदत राहतील
पुन्हा नव्या पाखराच्या मागे
आज
उद्या
परवा
तेरवा
पुढच्या आठवड्यात
पुढच्या महिन्यात
पुढच्या वर्षी
पुढच्या दशकात
पुढच्या जन्मात???????

(अनुभवातून शहाणा न होता पुन्हा पुन्हा प्रेमात पडणारा सच्चा आशिक) पैजारबुवा,

काणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडरोमांचकारी.कविताइंदुरीऔषधोपचारकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

5 Oct 2020 - 12:14 pm | महासंग्राम

मारलेला डोळा अंमळ मोठाच झालाय जणू

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Oct 2020 - 12:18 pm | ज्ञानोबाचे पैजार

असा डोळा मोठा होण्याचीही आता सवय झाली आहे
झाला नाही तरच चुकल्या सारखे वाटते
पैजारबुवा,

महासंग्राम's picture

5 Oct 2020 - 1:29 pm | महासंग्राम

पालथ्या मुठीत घट्ट पकडलेली चिलीम
जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरी .
मदिरेचाठिबकसिंचनाचा कापऱ्या शरीरावरुन अविरत अभिषेक.
बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित.
धपापते विद्रोही तप्तश्वास.
गांजाच्या धुराने आच्छादलेल्या चेहऱ्यामागच्या नि:शब्द कवायतीमुळे कोंदलेले भवताल.
स्वप्न-जागृती, शुध्दी-बेशुध्दीच्या अस्थिर सीमारेषांवर भोवंडणार्‍या जीवनाची ही अनिश्चिततेची जीवघेणी .
संपतील LSD एकदाची आत्ताच?
की,
ध्रुपदत राहतील
पुन्हा नव्या नशे मागे
आज
उद्या
परवा
तेरवा
पुढच्या आठवड्यात
पुढच्या महिन्यात
पुढच्या जन्मात???????

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Oct 2020 - 1:26 pm | ज्ञानोबाचे पैजार

पुढच्या वर्षी
पुढच्या दशकात

हे चार शब्द वगळले असते तर वास्तवदर्शी झाली असती

पैजारबुवा,

दुर्गविहारी's picture

6 Oct 2020 - 8:46 pm | दुर्गविहारी

भारी प्रयत्न !
बाकी

ओढणीने आच्छादलेल्या चेहऱ्यामागच्या नि:शब्द कवायतीमुळे कोंदलेले भवताल.

हे डोस्कीवरन गेलं. ;-)
असो.

प्रचेतस's picture

6 Oct 2020 - 9:12 pm | प्रचेतस

कहर =))

प्राची अश्विनी's picture

8 Oct 2020 - 8:46 am | प्राची अश्विनी

भारी!!!
शेवटची ओळ तर खत्रा!:)

राजा सोवनि's picture

8 Oct 2020 - 11:10 am | राजा सोवनि

मस्त.