✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(...मारीला म्यां डोळा ;)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Mon, 10/05/2020 - 12:10
पेरणा http://misalpav.com/node/47605 अनंतयात्रींची "...पाहिले म्यां डोळा" लैच अस्वस्थ करून गेली म्हणून वातावरण जरा हलके करण्याचा प्रयत्न...

...मारीला म्यां डोळा 😉

पालथ्या मुठीत घट्ट पकडलेला गुलाब जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरा. घर्मबिंदूच्या ठिबकसिंचनाचा शशकासम कापऱ्या शरीरावरुन अविरत अभिषेक. बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित. धपापते विद्रोही तप्तश्वास. ओढणीने आच्छादलेल्या चेहऱ्यामागच्या नि:शब्द कवायतीमुळे कोंदलेले भवताल. स्वप्न-जागृती, शुध्दी-बेशुध्दीच्या अस्थिर सीमारेषांवर भोवंडणार्‍या जीवनाची ही अनिश्चिततेची जीवघेणी कडवी. संपतील एकदाची आत्ताच? की, ध्रुपदत राहतील पुन्हा नव्या पाखराच्या मागे आज उद्या परवा तेरवा पुढच्या आठवड्यात पुढच्या महिन्यात पुढच्या वर्षी पुढच्या दशकात पुढच्या जन्मात??????? (अनुभवातून शहाणा न होता पुन्हा पुन्हा प्रेमात पडणारा सच्चा आशिक) पैजारबुवा,

प्रतिक्रिया द्या
6789 वाचन

💬 प्रतिसाद (8)

मारलेला डोळा अंमळ मोठाच झालाय

महासंग्राम
Mon, 10/05/2020 - 12:14 नवीन
मारलेला डोळा अंमळ मोठाच झालाय जणू
  • Log in or register to post comments

त्यात काय?...

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 10/05/2020 - 12:18 नवीन
असा डोळा मोठा होण्याचीही आता सवय झाली आहे झाला नाही तरच चुकल्या सारखे वाटते पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

पालथ्या मुठीत घट्ट पकडलेली

महासंग्राम
Mon, 10/05/2020 - 13:29 नवीन
पालथ्या मुठीत घट्ट पकडलेली चिलीम जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरी . मदिरेचाठिबकसिंचनाचा कापऱ्या शरीरावरुन अविरत अभिषेक. बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित. धपापते विद्रोही तप्तश्वास. गांजाच्या धुराने आच्छादलेल्या चेहऱ्यामागच्या नि:शब्द कवायतीमुळे कोंदलेले भवताल. स्वप्न-जागृती, शुध्दी-बेशुध्दीच्या अस्थिर सीमारेषांवर भोवंडणार्‍या जीवनाची ही अनिश्चिततेची जीवघेणी . संपतील LSD एकदाची आत्ताच? की, ध्रुपदत राहतील पुन्हा नव्या नशे मागे आज उद्या परवा तेरवा पुढच्या आठवड्यात पुढच्या महिन्यात पुढच्या जन्मात???????
  • Log in or register to post comments

झकास.. विडंबन का विडंबन

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 10/05/2020 - 13:26 नवीन
पुढच्या वर्षी पुढच्या दशकात
हे चार शब्द वगळले असते तर वास्तवदर्शी झाली असती पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

भारी प्रयत्न !

दुर्गविहारी
Tue, 10/06/2020 - 20:46 नवीन
भारी प्रयत्न ! बाकी
ओढणीने आच्छादलेल्या चेहऱ्यामागच्या नि:शब्द कवायतीमुळे कोंदलेले भवताल.
हे डोस्कीवरन गेलं. ;-) असो.
  • Log in or register to post comments

कहर =))

प्रचेतस
Tue, 10/06/2020 - 21:12 नवीन
कहर =))
  • Log in or register to post comments

भारी!!! शेवटची ओळ तर खत्रा!:)

प्राची अश्विनी
गुरुवार, 10/08/2020 - 08:46 नवीन
भारी!!! शेवटची ओळ तर खत्रा!:)
  • Log in or register to post comments

मारीला म्या डोळा

राजा सोवनि
गुरुवार, 10/08/2020 - 11:10 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा