सहजच...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
10 Sep 2020 - 10:21 am

सहजच चुकुनी वाट तुझी तू चुकून माझ्यासमोर यावे,
तुला पाहुनी हसून मीही तुझ्या चुकीला माफ करावे
सहजच मग तू हसता हसता हातामध्ये हात विणावा,
उगाच मग मी लटक्या रागे क्षणात तोही दूर करावा.
सहजच तुझिया गाली तेव्हा खट्याळ कलिका फुलून यावी,
पोक्त समंजस शब्दांची मग तिथेच नकळत वाट चुकावी.
सहजच तुजला सोडायाला, तुझ्या घराशी मी पोचावे,
कशी एकटी परतू मी? मग माझ्या सोबत तूही यावे.
अशी सहजता अपुल्यामधली, नाव कोणते देऊ याला?
जुने जाणते झालो तरीही सदैव खळखळ वाहत -हावी..

कविता

प्रतिक्रिया

चलत मुसाफिर's picture

10 Sep 2020 - 10:52 am | चलत मुसाफिर

"पोक्त समंजस शब्दांची मग तिथेच नकळत वाट चुकावी."

हे फारच छान!! शब्दांशी वाट अशी चुकू लागल्यावर समजावे की आपली 'वाट' लागण्याची वेळ समीप आली आहे :-)

आवडली कविता.

प्राची अश्विनी's picture

10 Sep 2020 - 11:05 am | प्राची अश्विनी

:)

Bhakti's picture

10 Sep 2020 - 5:28 pm | Bhakti

हा हा

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Sep 2020 - 11:09 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडली...
झकास कविता आहे
पैजारबुवा,

श्वेता२४'s picture

10 Sep 2020 - 4:17 pm | श्वेता२४

आवडली कविता

किती सुंदर भावना.. सुंदर.. आवडली कविता

सहजच तुजला सोडायाला, तुझ्या घराशी मी पोचावे,
कशी एकटी परतू मी? मग माझ्या सोबत तूही यावे.
भारीच
.. ह्याच्या वर खुप मोठ्ठा लेख लिहतेय मी.

प्राची अश्विनी's picture

12 Sep 2020 - 10:16 am | प्राची अश्विनी

अरे वा! प्रतिक्षेत..

प्रचेतस's picture

11 Sep 2020 - 9:16 am | प्रचेतस

नाही आवडली ही कविता, ओढून ताणून लिहिल्यासारखी वाटली.

प्राची अश्विनी's picture

12 Sep 2020 - 10:17 am | प्राची अश्विनी

:)

प्राची अश्विनी's picture

12 Sep 2020 - 10:18 am | प्राची अश्विनी

धन्यवाद सर्वांना.

Suraj Mane's picture

12 Sep 2020 - 4:26 pm | Suraj Mane

अतिशय उत्तम लिखाण आवडली कविता
marathi-mangalashtak

रातराणी's picture

13 Sep 2020 - 4:41 am | रातराणी

=))

माझी पण एक सहजच

रातराणी's picture

13 Sep 2020 - 4:42 am | रातराणी

आणि कविता आवडली :)

प्राची अश्विनी's picture

16 Sep 2020 - 4:12 pm | प्राची अश्विनी

Suraj mane आणि रारा , धन्यवाद!