✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सहजच...

प — प्राची अश्विनी, गुरुवार, 09/10/2020 - 10:21
सहजच चुकुनी वाट तुझी तू चुकून माझ्यासमोर यावे, तुला पाहुनी हसून मीही तुझ्या चुकीला माफ करावे सहजच मग तू हसता हसता हातामध्ये हात विणावा, उगाच मग मी लटक्या रागे क्षणात तोही दूर करावा. सहजच तुझिया गाली तेव्हा खट्याळ कलिका फुलून यावी, पोक्त समंजस शब्दांची मग तिथेच नकळत वाट चुकावी. सहजच तुजला सोडायाला, तुझ्या घराशी मी पोचावे, कशी एकटी परतू मी? मग माझ्या सोबत तूही यावे. अशी सहजता अपुल्यामधली, नाव कोणते देऊ याला? जुने जाणते झालो तरीही सदैव खळखळ वाहत -हावी..

प्रतिक्रिया द्या
9091 वाचन

💬 प्रतिसाद (15)

आवडली!

चलत मुसाफिर
गुरुवार, 09/10/2020 - 10:52 नवीन
"पोक्त समंजस शब्दांची मग तिथेच नकळत वाट चुकावी." हे फारच छान!! शब्दांशी वाट अशी चुकू लागल्यावर समजावे की आपली 'वाट' लागण्याची वेळ समीप आली आहे :-) आवडली कविता.
  • Log in or register to post comments

:)

प्राची अश्विनी
गुरुवार, 09/10/2020 - 11:05 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

हा हा

Bhakti
गुरुवार, 09/10/2020 - 17:28 नवीन
हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

मस्त..

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/10/2020 - 11:09 नवीन
आवडली... झकास कविता आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

मस्त!

श्वेता२४
गुरुवार, 09/10/2020 - 16:17 नवीन
आवडली कविता
  • Log in or register to post comments

किती सुंदर भावना.. सुंदर..

गणेशा
गुरुवार, 09/10/2020 - 17:19 नवीन
किती सुंदर भावना.. सुंदर.. आवडली कविता
  • Log in or register to post comments

सहजच तुजला सोडायाला, तुझ्या

Bhakti
गुरुवार, 09/10/2020 - 17:28 नवीन
सहजच तुजला सोडायाला, तुझ्या घराशी मी पोचावे, कशी एकटी परतू मी? मग माझ्या सोबत तूही यावे. भारीच .. ह्याच्या वर खुप मोठ्ठा लेख लिहतेय मी.
  • Log in or register to post comments

अरे वा! प्रतिक्षेत..

प्राची अश्विनी
Sat, 09/12/2020 - 10:16 नवीन
अरे वा! प्रतिक्षेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

नाही आवडली ही कविता, ओढून

प्रचेतस
Fri, 09/11/2020 - 09:16 नवीन
नाही आवडली ही कविता, ओढून ताणून लिहिल्यासारखी वाटली.
  • Log in or register to post comments

:)

प्राची अश्विनी
Sat, 09/12/2020 - 10:17 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

धन्यवाद सर्वांना.

प्राची अश्विनी
Sat, 09/12/2020 - 10:18 नवीन
धन्यवाद सर्वांना.
  • Log in or register to post comments

कविता

Suraj Mane
Sat, 09/12/2020 - 16:26 नवीन
अतिशय उत्तम लिखाण आवडली कविता marathi-mangalashtak
  • Log in or register to post comments

=)) माझी पण एक सहजच

रातराणी
Sun, 09/13/2020 - 04:41 नवीन
=)) माझी पण एक सहजच
  • Log in or register to post comments

आणि कविता आवडली :)

रातराणी
Sun, 09/13/2020 - 04:42 नवीन
आणि कविता आवडली :)
  • Log in or register to post comments

Suraj mane आणि रारा , धन्यवाद

प्राची अश्विनी
Wed, 09/16/2020 - 16:12 नवीन
Suraj mane आणि रारा , धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा