Survival of the fittest.....

Primary tabs

झपाटलेला फिलॉसॉफर's picture
झपाटलेला फिलॉसॉफर in काथ्याकूट
23 May 2020 - 3:30 pm
गाभा: 

परवा ऑफिसला जाण्यासाठी ठाण्याहून बस पकडली. बाजुच्या सिटवर बसलेल्या मुलाने बॅगेतुन पुस्तक काढुन वाचायला लागला. मोबाईलच्या जमान्यात चक्क पुस्तक वाचताना पाहुन माझं कुतुहलही चाळवलंच. हळुच वाकुन पाहिलं तर पब्लिक सर्व्हिस परिक्षेचं पुस्तक होतं. म्हटलं घ्यावा जरा याचा इंटरव्हयू. तेवढाच आपलाही टाईमपास होईल.
तोपर्यंत बसही सुसाट वेगाने निघाली होती.

मी- कसला अभ्यास करतोयस ? कोरोना चा का ? (खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा व्हाव्यात म्हणून मी कोपरखळीने सुरुवात केली..

तो-पब्लिक सर्व्हिस कमिशन परिक्षेचा अभ्यास करतोय..

मी- मग कोरोना बद्दल काही वाचलंस का ? काय होईल पुढे ? आटोक्यात येईल का ?

तो-कोरोना बद्दल अधिकृत काॅमेंट करायला मी डाॅक्टरही नाही आणि वैज्ञानिकही नाही.. पण हो, W.H.O., केंद्र सरकार, राज्य सरकार, जागतिक पातळीवरच्या घडामोडी यांवरून काही गोष्टी स्पष्ट होतायत.. कोरोना हा विषाणू आता आपल्या सोबत किमान काही वर्षे तरी राहणार.. आणि याबाबत वेळोवेळी प्राप्त होणार्या सुचना काटेकोरपणे पालन कराव्या लागतील. *डार्विनच्या सिद्धांतानुसार it's survival of the fittest..* so, fit रहायचा प्रयत्न करायचा..

मी- म्हणजे यापुढे कायम योगा प्राणायाम, व्यायाम करावा लागणार..

तो-ते तर आहेच.. पण त्याहुन थोडं पुढे जाऊन मी असं म्हणेन कि आपण आपल्या औकातीत रहायला शिकायला हवं..

मी- म्हणजे ?

तो-आपण जन्माला येताना तीन गोष्टी सोबत घेऊन येतो.. बौद्धिक- शारीरिक आणि मानसिक ताकद, घरचे संस्कार आणि आपलं नशीब... यातुन जे निर्माण होतं त्याला व्यक्तिमत्व विकास म्हणतात.. त्यातूनच निर्माण होते इम्युनिटी.. कुठल्याही रोगाशीच नाही तर समस्येशी लढण्याची ताकद.. ती कुणाची थोडी कमी अधिक असु शकते.. ती प्रामाणिकपणे कशी वाढवता येईल याचा प्रयत्न करायला हवा..
पण सध्या प्रोटीन पावडर खाऊन दंडावर बेडकुळ्या दाखवत फिरण्याच्या शाॅर्टकट काळात ,स्पर्धेत टिकण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जातो त्यातुन तयार होतं tension आणि त्यातुन तयार होतात विविध आजार.. त्याने इम्युनिटी कमी होते आणि नेमका तेव्हाच कोरोना चा शिरकाव होतो.. हेच जर आपण वास्तव स्विकारून प्रामाणिकपणे राहिलो तर कमी त्रास होईल..

मी-मग यात सरकारच्या कामाबद्दल तुझं काय मत ? तू जर पंतप्रधान असतास तर काय केलं असतंस ?

तो- शाळेतल्या निबंधाची आठवण झाली.. जर मी पंतप्रधान असतो तर.... असो, मी जर पंतप्रधान असतो तर केंद्रीय आरोग्य खात्याला जागतिक पातळीवर गांभीर्याने लक्ष ठेवायला लावलं असतं.. जगात कुठल्या देशात कोणत्या रोगाची साथ पसरतेय ते लक्ष ठेऊन तिथुन देशात येणार्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली असती.. एअरपोर्टवर इमिग्रेशन पासूनच त्यांना ट्रॅक केलं असतं.. त्या रोगावर कोणते औषधोपचार उपलब्ध आहेत ते प्रयोग आणि प्रयत्न केले असते.. जगभर रोग पसरल्यावर तीन महिन्यांनी अचानक रातोरात सगळं बंद नसतं केलं.. सव्वाशे कोटींचा देश आहे आपला.. किमान आठवडा दिला असता आपापल्या घरी/ गावी पोहोचायला, किराणा सामान भरुन ठेवायला आणि मग महिनाभर पुर्ण संचारबंदी लागू केली असती..फक्त दवाखाने आणि मेडिकल स्टोअर सुरु ठेवली असती.. जे आजारी असतील / होतील त्यांना आरोग्यसेवा आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहिली असती बाकी सर्व बंद..

लाॅकडाऊनच्या काळात तसंही प्रदुषण कमी झालंय.. लोकांना स्वतःसाठी, कुटुंबासाठी वेळ देता येतोय.. त्याचा चांगला वापर करायला सांगितलंं असतं..

मी- हे झालं .. आता पुढे काय करावं असं तुला वाटतं ?

तो-आता आपण कचाट्यात सापडलोत.. लाॅकडाऊन उठवला तर कोरोना जोमाने पसरण्याची भिती आणि नाही उठवला तर अर्थव्यवस्था अडचणीत सापडण्याची भिती..

मी- मग ? यावर उपाय काय ?

तो- मला वाटतं.. आता हळुहळु लाॅकडाऊन उठवायला हवा.. कोरोना सोबत जगायच तर टप्प्याटप्प्याने सगळं सुरू व्हायला हवं.. भाजीपाला विकायला परवानगी आहे.. पण ज्याचा चष्मा तुटला त्याने काय करायचं ? चष्म्याचं दुकान बंद.. इलेक्ट्रिकचं दुकान बंद.. गर्दी कुठे जास्त होणार- भाजीपाला घ्यायला कि चष्मा, लाईटस् घ्यायला ? ते गरजेचे नाही का ? निर्णयात विसंगती जास्त दिसते..

मी- पण शेतकर्याला मदत नको का करायला ?

तो- हवी ना.. पण मग मदत नको असा कोण आहे इथे ? उद्योजकांना नको का मदत ?
छोट्या व्यापार्यांना- दुकानदारांना नको का मदत ? हे सगळे टिकले तर नोकर्या टिकतील.. शेतकरी उद्योजक आणि नोकरदार सगळेच टिकले पाहिजेत ना..

मी-पण त्यासाठी पैसा कुठून आणायचा ?

तो-कोण म्हणतं अर्थव्यवस्था अडचणीतून बाहेर काढायला पैसा लागतो म्हणुन ?

मी- नक्की काय म्हणायचंय तुला ?

तो- शाळा काॅलेजमधे शिकवलं जातं कि धंदा व्यवसाय करण्यासाठी land, labour आणि capital लागतं.. पण वास्तवात धंदा व्यवसाय करण्यासाठी लागतो आत्मविश्वास.. कधी तो कुणात जन्मतः असतो तर कधी तो द्यावा लागतो.. सरकार जेव्हा तो देते, तेव्हा धंदाच काय अख्खा देश उभा राहतो.. फक्त तो मनापासून द्यायला हवा..

बरं, पुढच्या स्टाॅपवर उतरायचंय.. मी निघु ?

मी- खुप छान बोलतोस ....एक शेवटचा प्रश्न-
कोरोनाच्या या काळात आपलं काय होईल ?

तो -- शक्य होईल इतकी दक्षता घ्यावी.. आणि आपापली कामे प्रामाणिकपणे करावी..
तीन तत्वं लक्षात ठेवायची-

Survival of the fittest..
जगा आणि जगू द्या..
एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ..

एवढं बोलून तो उतरला..

श्रीकृष्णाने अर्जुनाला रणभूमीवर गीता सांगितली होती हे ऐकलं होतं.. या पोराने मला कोरोनाच्या या बसप्रवासातील या रणभूमीवर आयुष्याची दिशा दिली..

('मराठी संस्कृती' ग्रुप वरून साभार)

प्रतिक्रिया

गणेशा's picture

23 May 2020 - 4:15 pm | गणेशा

करेक्ट बोलला आहे मुलगा

चौकटराजा's picture

23 May 2020 - 6:10 pm | चौकटराजा

विमानतळावर चूक झालीच ,पण रोग जगात पसरलाय ! सगळा दोनशे देशाच्या प्रमुखानी अगदी ठरवून ही चूक केली असे म्हणायचे का ? बाकी चालू द्या ...

संजय क्षीरसागर's picture

23 May 2020 - 7:24 pm | संजय क्षीरसागर

या वाचनमात्र झालेल्या पोस्टवर नेमका हाच मुद्दा होता !

> सव्वाशे कोटींचा देश आहे आपला.. किमान आठवडा दिला असता आपापल्या घरी/ गावी पोहोचायला, किराणा सामान भरुन ठेवायला आणि मग महिनाभर पुर्ण संचारबंदी लागू केली असती

सुबोध खरे's picture

23 May 2020 - 7:36 pm | सुबोध खरे

वाचनमात्र झालेल्या पोस्टवर नेमका हाच मुद्दा होता

तीन दिवसाचा आठवडा झाला का?

आणि "कोट्यवधी लोक" गायब आहेत.
असो

गोष्ट घडून गेल्यावर त्यावर विशेष टिप्पणी देणे फार सोपे असते.

आणि जालावर ज्ञानेश्वर भरपूर असतात.

संजय क्षीरसागर's picture

23 May 2020 - 7:59 pm | संजय क्षीरसागर

प्रश्न आणखी सोपा करतो
19 May 2020 - 8:40 pm | संजय क्षीरसागर
ट्रायल लॉकडाऊन करुन नक्की काय साधलं ? मधले दिवस वाया का घालवले ? सर्जिकल स्ट्राईकसारखा लॉकडाऊन न करता, लोकांना घरी सुखरुप पोहोचता येईल असा अवधी देऊन, एका प्री-डिक्लेअर्ड तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ?

इथे उत्तर दिलं तरी चालेल

ऋतुराज चित्रे's picture

23 May 2020 - 7:50 pm | ऋतुराज चित्रे

' Prevention is better than cure ' असलं काहीबाही शाळेत शिकवलं जातं आपल्याला. जगातील कुठल्याच राष्ट्र प्रमुखाला शाळेत असे काही शिकवले जात नसावे.

कुमाऊचा नरभक्षक's picture

23 May 2020 - 8:51 pm | कुमाऊचा नरभक्षक

आत्मनिर्भर बनने का रे बाबा

कपिलमुनी's picture

24 May 2020 - 12:38 am | कपिलमुनी

कोरोना ही काही इमर्जन्सी नाही, भारताला घाबरण्याचे मुळीच काम नाही - हेल्थ मिनिस्टर

जगात डोंब उसळला असता हे ट्रम्प च्या मागे पुढे नाचत होतें , सरकार पाडत होते , पहिला रुग्ण आढळल्यानंतर सरकारी पातळीवर शुन्य जागरूकता होती , कोणतेही प्लॅनिंग नव्हते, quarantine करायचे नियोजन नव्हते, टास्क फोर्स नव्हता . मार्च नंतर याना जाग आली.

फेब्रुवारी - मार्च हे दोन महत्त्वाचे महिने केंद्र सरकारने वाया घालवले

कुमाऊचा नरभक्षक's picture

24 May 2020 - 2:27 am | कुमाऊचा नरभक्षक

अगदी रागांनी सुद्धा Corona साठी कोणताही प्रत्यक्ष पाठपुरावा केला नाही त्यांचेही लक्ष NRC CAA आधारित राजकारण करणे यात होते

कपिलमुनी's picture

24 May 2020 - 2:56 am | कपिलमुनी

कोणत्या पदावर आहे ही व्यक्ती ?

कुमाऊचा नरभक्षक's picture

24 May 2020 - 3:03 am | कुमाऊचा नरभक्षक

पण फेब्रुवारीमध्ये कोरोना वॉर्निंग ट्विटर वर दिली होती म्हणून त्यांच्या नावे बरेच वॉट्सप फॉर्व्हर्ड्स येत असतात म्हणून त्यांचा उल्लेख केला अन्यथा त्यांच्या बाबत उल्लेखनीय काहीच नाही

सुबोध खरे's picture

24 May 2020 - 12:03 pm | सुबोध खरे

असं कसं असं कसं?

राष्ट्रीय विनोदवीर म्हणून त्यांचे योगदान आपण असं कसं विसरू शकता?

आणि ते युगपुरुष सध्या दिल्लीतील रुग्ण संख्या लपवण्यात मग्न आहेत. त्यांच्या बद्दल काहीच कसं ऐकू येत नाही.

CAA आणि NRC मध्ये कोलांट्या मारून झाल्या. तेवढ्यात आलेल्या कोव्हिडने त्यांना )(bail out)जामीन मात्र दिलाय.

अर्थात श्री जेटली यांनी त्यांना बिनशर्त माफी मागायला लावल्यापासून वाचाळता बरीच कमी झाली आहे असेही एक निरीक्षण आहे.

संजय क्षीरसागर's picture

24 May 2020 - 12:35 pm | संजय क्षीरसागर

केजरीवाल नाही राहूल गांधींच्या रेफरंसमधे चर्चा चालू होती : बघा

> अगदी रागांनी सुद्धा Corona साठी कोणताही प्रत्यक्ष पाठपुरावा केला नाही त्यांचेही लक्ष NRC CAA आधारित राजकारण करणे यात होते.

पण देशाचे सर्वेसर्वा मोदी आहेत आणि लॉकडाऊन हा त्यांचा निर्णय आहे.

त्यामुळे खरा प्रश्न हा आहे >

ट्रायल लॉकडाऊन करुन नक्की काय साधलं ? मधले दिवस वाया का घालवले ? सर्जिकल स्ट्राईकसारखा लॉकडाऊन न करता, लोकांना घरी सुखरुप पोहोचता येईल असा अवधी देऊन, एका प्री-डिक्लेअर्ड तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ?

कुमाऊचा नरभक्षक's picture

24 May 2020 - 12:45 pm | कुमाऊचा नरभक्षक

रागांचा यथोचित त्यांनी सन्मान केला आहेच त्यापलीकडे कोणीही रागांबाबत सध्या तरी जास्त बोलू शकणार नाही.

केजरीवाल यांना इट्रोड्यूस करून त्यांनी चर्चात महत्वाचा घटकही समाविष्ट केला आहे त्यावर सगळेच गप्प का हा एक मुद्दा आहेच (मी व्यक्तिशः अरूणजी यांनी दिल्लीत साध्य केलेल्या काही गोष्टींचा मोठा चाहता व समर्थक आहे)

सर्जिकल स्ट्राईकसारखा लॉकडाऊन न करता, लोकांना घरी सुखरुप पोहोचता येईल असा अवधी देऊन, एका प्री-डिक्लेअर्ड तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ?

ना ही. परिस्थिती अजुन बिघडली असती जुलै ऑगस्टमधे जी अवस्था असेल ती आत्ताच उदभवली असती

मराठी कथालेखक's picture

27 May 2020 - 4:31 pm | मराठी कथालेखक

मध्य प्रदेशमधले काँग्रेसचे सरकार खाली उतरु पर्यंत कोरोना ही इमर्जन्सी नव्हतीच मुळी :)
मध्यप्रदेशातले सत्तांतर नक्कीच जास्त महत्वाचे नव्हते का ?

संजय क्षीरसागर's picture

27 May 2020 - 4:43 pm | संजय क्षीरसागर

मोदींचे निर्णय तसे समजायला फार सोपे असतात.

जे बदलांशी जुळवून घेतात ते टिकून राहतात हे वास्तव आहे...

चौकटराजा's picture

24 May 2020 - 4:52 pm | चौकटराजा

त्या "फिट " चा अर्थ बलवान असा नाहीच तो जुळवून घेतो असाच आहे ! उदा एखाद्या कम्पनीत साहेबान्ची सिगरेट पेटवा म्हणजे प्रमोशन मिळेल अशी वर्क कल्चर असेल तर सिगरेट पेटवूनच ते मिळते कार्यक्षमतेमुळे नाही.

कुमाऊचा नरभक्षक's picture

24 May 2020 - 9:10 pm | कुमाऊचा नरभक्षक

आपण जास्त सुस्पष्टता आणली, सहमत आहे.

अर्धवटराव's picture

26 May 2020 - 4:34 am | अर्धवटराव

एक दिवस ट्रायल घेऊन मग तातडीने लॉकडाऊन जाहीर केलं हेच बरं झालं. इन्फेक्टेड लोक्स जागीच लॉक झाले. पब्लीकला आठवडाभराची उसंत देऊन मग लॉकडाऊन केलं असतं तर फार घेळपूरी झाली असती.

संजय क्षीरसागर's picture

26 May 2020 - 3:17 pm | संजय क्षीरसागर

२२ मार्च आणि २५ मे यात स्थलांतरासाठी कोणती तारीख योग्य होती ?

२२ मार्चपेक्षा भयावह परिस्थीती आज आहे.

सध्या स्थलांतरीत होणार्‍यात करोना कॅरीअर्स नाहीत याची हमी कुणी घेतलीये ?

की मी प्रथम निगेटिव्ह होतो. कुणाच्या तरी जवळ जावून पॉझिटिव्ह झालो .त्यानंतर मला कोणतीही लक्षणे आली नाहीत.( त्यामुळे मी रुग्णालयात जाण्याचा प्रश्न च आला नाही ) मी नैसर्गिक प्रतिकार शक्तीने निगेटिव्ह झालो आता मी कॅरियर देखील नाही. ही सर्व प्रक्रिया साठ दिवसात घडू शकते की नाही,,,,,, ?
सबब माझी नोंद संशयित, ग्रस्त, उपचारित, पूर्ण बरा... पूर्ण विषाणू विरहित अशा कोणत्याच यादीत नाही. असे आणिक लोक असू शकतील की नाही..... ? खरे तर हा प्रश्न मी डोक्टरना विचारावयास हवा पण याचा पाया तर्क इतकाच घेतल्याने तो तुम्हाला विचारत आहे.

२) लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय सुधारणात लक्षणीय वाढ झाली का ?
The period of the lockdown gainfully utilized to ramp up health system
capacity and infrastructure in the country, details here.
• 3027 dedicated COVID Hospitals and COVID Health Centres along with
7013 COVID Care Centres identified
• 2.81 lakh isolation beds, 31,250 ICU beds, and 1,09,888 oxygen
supported beds identified in Dedicated COVID Hospitals and COVID
Health Centres
• 65.0 lakh PPE coveralls and 101.07 lakh N95 masks supplied to the
States with 3 lakh PPE coveralls and 3 lakh N95 masks manufactured
per day by domestic producers

कुणी काहीही लिहिलं तरी वाचायचंच नाही आणि आपलंच खरं हा हट्ट धरून बसलेल्या माणसाला कोणीही काहीही शिकवू शकत नाही.

१) लॉकडाऊनमुळे कर्व फ्लॅट झाला का ?

Coronavirus Live Updates: India cases now double every 13 days, fatality rate among lowest in the world

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/coronaviru...

३) आता स्थलांतर होत असलेल्यात करोना कॅरिअर्स नसण्याची हमी आहे का ?
त्यात करोनाचे रुग्ण नक्कीच आहेत आणि त्यांच्याकडून कोरोना चे संक्रमण नक्कीच होणार आहे. परंतु जिल्हावार ते कुठे जात आहेत आणि त्यांच्या वर लक्ष( SURVEILLANCE) ठेवल्यामुळे त्यांना आजार झाला तर त्यांच्या यावर उपचार करता येतील अशी सरकारने तयारी केली आहे. शिवाय ते कोणाच्या संपर्कात तेथील त्यावरही लक्ष ठेवले जाणार आहे. यासाठीच आरोग्य सेतू ऍप्प तयार केला आहे.

एका विशिष्ट कालावधी नंतर लॉक डाऊन काढायला लागणार आहे याची जगभरातील सर्व सरकाराना (भारत सरकार सुद्धा) कल्पना होतीच. आणि हा लॉक डाउन कसा काढायचा याचा संपूर्ण आराखडा सुद्धा तयार होता. जसजशी स्थिती बदलत गेली त्याप्रमाणे त्या आराखड्यात बदल केला गेला.
आता सरकारची तयारी झाली आहे कि लॉक डाऊन काढला कि रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

याच बरोबर घरात बसून कंटाळलेल्या आणि त्यांच्या वर नजर ठेवताण थकलेल्या पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा आणि हाताला काम अंह आणि खिशात पैसे नाही अशा जनतेचीसुद्धा रुग्ण संख्या वाढणार आहे याची मानसिक तयारी झाली आहे.

कारण अर्थव्यवस्था नको इतकी अपंग केली तर करोना ऐवजी गरिबीमुले जास्त माणसे दगावतील हेही अर्थतज्ज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञ याना माहिती होते / आहे. त्या प्रमाणे सरकारची वाटचाल चालू आहे.

योजना (PLAN) बिनचूक( FOOLPROOF) असेलच असे नाही आणि त्यात त्रुटी(ERROR) तर नक्कीच असतील पण कोणतीही योजनाशून्यतेपेक्षा ते १०० पटीने चांगले.

बाकी सरकार वर टीका करणे आणि त्यात सुधारणा काय करायला हवी आहे हे सांगणे एकदम सोपे आहे. पण आपण जे सांगतो ते प्रत्यक्षात उतरवणे शक्य आहे का? असले तर सोपे आहे का? असा विचार न करता लॉक डाऊन लागू करण्यापूर्वी कोट्यवधि मजुरांना घरी जाण्यासाठी ३ दिवस द्यायला पाहिजे होते असे वक्तव्य करणे फार सोपे असते. तीन दिवसात फार तर ३० लाख मजुरांना पाठवता आले असते असे सप्रमाण दाखवले तरीही संक्षी आपले टुमणे अजूनही चालुच ठेवतात याचे आश्चर्य वाटते.

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

26 May 2020 - 9:30 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

बाकी सरकार वर टीका करणे आणि त्यात सुधारणा काय करायला हवी आहे हे सांगणे एकदम सोपे आहे. अरोबर

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

26 May 2020 - 9:30 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

बरोबर*

> असा विचार न करता लॉक डाऊन लागू करण्यापूर्वी कोट्यवधि मजुरांना घरी जाण्यासाठी ३ दिवस द्यायला पाहिजे होते असे वक्तव्य करणे फार सोपे असते

१९ तारखेपासून किमान सात वेळा "पुरेसा अवधी" असा बदल करुन विचारलं आहे.

आता संपूर्ण मजूरांचं ज्या पद्धतीनं स्थलांतर चाललेलं आहे आणि ज्याप्रमाणात लागण झालेली आहे त्यावरनं सगळी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

पुरेसा अवधी देऊन कामगारांना लॉकडाऊन करण्यापूर्वी घरी जाऊ दिलं असतं तर अशी शोचनीय परिस्थिती उद्भवली नसती. शिवाय आता कामगारांचे जे अतोनात हाल चालू आहेत आणि लॉकडाऊनमधे त्यांना ज्या यातना भोगाव्या लागल्या त्याचा तर हिशेबच नाही.

______________________________________________

आता मुद्दा पुन्हा वाचा :

प्रश्न आणखी सोपा करतो
19 May 2020 - 8:40 pm | संजय क्षीरसागर
ट्रायल लॉकडाऊन करुन नक्की काय साधलं ? मधले दिवस वाया का घालवले ? सर्जिकल स्ट्राईकसारखा लॉकडाऊन न करता, लोकांना घरी सुखरुप पोहोचता येईल असा अवधी देऊन, एका प्री-डिक्लेअर्ड तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का

____________________________________

> १) लॉकडाऊनमुळे कर्व फ्लॅट झाला का ?

Corona virus Live Updates: India cases now double every 13 days, fatality rate among lowest in the world

ही बातमी चांगली आहे पण तुमचं स्वतःचं निरिक्षण आणि तुम्ही तुमच्या लेखात सांगितलेली ग्राऊंड रिअ‍ॅलिटी, याच्याशी ते सुसंगत नाही:

मुंबईत रुग्ण संख्या झपाट्याने वाढते आहे .............

ही तफावत कशामुळे ?

___________________________________

> ३) आता स्थलांतर होत असलेल्यात करोना कॅरिअर्स नसण्याची हमी आहे का ?

त्यात करोनाचे रुग्ण नक्कीच आहेत आणि त्यांच्याकडून कोरोना चे संक्रमण नक्कीच होणार आहे...... यासाठीच आरोग्य सेतू ऍप्प तयार केला आहे.

याचा आणि लॉकडाऊन करण्यापूर्वी पुरेसा अवधी देऊन कामगारांना सुखरुप घरी जाऊ देण्याचा संबंध कुठे आहे ?

या सुविधा तयार करण्याचं काम स्वतंत्रपणे चालू होतंच आणि २४ मार्च ते २६ मे इतक्या कालावधीत ते वाढलं नसतं तरच नवल !

____________________________________________

> योजना (PLAN) बिनचूक( FOOLPROOF) असेलच असे नाही आणि त्यात त्रुटी(ERROR) तर नक्कीच असतील पण कोणतीही योजनाशून्यतेपेक्षा ते १०० पटीने चांगले.

हाच तर खरा कळीचा मुद्दा आहे !

मोदी आधी निर्णय घेतात आणि तो हाताबाहेर गेला की प्लानिंगवाल्यांना कामाला लावतात !

थोडक्यात, असा नियोजन शून्य आणि सर्जिकल स्ट्राईकसारखा लॉकडाऊन करण्याची गरज होती का ?

लॉकडाऊन किती काळ चालेल हे अगदी पहिल्या दिवशी सरकार सांगुच शकत नाहि. आणि आपल्या पोटापाण्याची सोय होणार्‍या ठिकाणाहुन कोणीच हलत नाहि. मोदि, फॉर दॅट मॅटर कोणिही राज्यकर्ता, नियोजनशुण्य पद्धतीने काम करतो म्हणणं साध्या कॉमनसेन्सच्या विरुद्ध आहे. आता त्या व्यक्ती विशेषाला शिव्याच द्यायच्या म्हटलं तर ठीक आहे.. पण अगदी सुरुवातीला जो आकड्यांचा अंदाज बांधण्यात आला होता तो भयानक होता. त्याला तसाच तातडीचा रिस्पॉन्स मार्ग निवडण्यात आला.

हे कुणी सांगितलं ?

संपूर्ण देश लॉकडाऊन होणारे म्हटल्यावर लोक घरीच जाणार.

आणि मोदींनी सांगितलं म्हटल्यावर तर पर्यायच नाही.

तुमची इच्छा असो, नसो करायलाच पाहिजे.

> कोणिही राज्यकर्ता, नियोजनशुण्य पद्धतीने काम करतो म्हणणं साध्या कॉमनसेन्सच्या विरुद्ध आहे.

सर्जिकल स्ट्राईकसारखा लॉकडाऊन नियोजन शून्यता दर्शवतो

सर्जिकल स्ट्राईक मध्ये नियोजन शून्यता आहे म्हणण्यासाठी आपल्याकडे काय माहिती आहे?

संजय क्षीरसागर's picture

27 May 2020 - 12:09 am | संजय क्षीरसागर

लॉकडाउन ज्या पद्धतीनं केला त्याचं वर्णन आहे.

त्याला विशेषण म्हणतात.

अ‍ॅकच्युल सर्जिकल स्ट्राईकशी त्याचा संबंध नाही

अर्धवटराव's picture

27 May 2020 - 12:59 am | अर्धवटराव

आजही अगदी फुकट रेल्वे प्रवास मिळतो आहे म्हणुन सगळे परप्रांतीय आपापल्या गावी गेले हे तुम्ही ठाम सांगु शकता का? ज्यांची घरची परिस्थीती मुंबईच्या वास्तव्यापेक्षा देखील बिकट आहे ते लोकं अजुनही मुंबईतच असतील. कॉमनसेन्स आहे. प्रश्न स्थलांतराचा नव्हता... रोगाचा प्रसार थांबवण्याचा होता.

सर्जिकल स्ट्राईकसारखा लॉकडाऊन नियोजन शून्यता दर्शवतो

मोदिंची नियोजन क्षमता माझ्यापेक्षा निश्चित जास्त आहे. मी त्यांच्या ठिकाणी असतो तर काहि ना काहि नियोजन करुनच निर्णय घेतले असते. त्यामुळे त्यांनीही काहि ना काहि नियोजन केलं असावं असं मला सहाजीकच वाटतं. पंतप्रधान पदावर बसलेला व्यक्ती इतक्या मोठ्या संकटात नियोजन शुन्यतेने वागतो हा दावा हास्यास्पद आहे. असो. कोणाला काय वाटावं हा ज्याच्या त्याच्या मानसीकतेचा प्रश्न आहे.

रोगप्रसार वाढल्यावर स्थलांतर चालू आहे. ते अत्यंत धोकादायक आहे.

रोगप्रसार आटोक्यात असतांना स्थलांतर सुलभ होतं. शिवाय त्यात सध्या चालू असलेला वारेमाप सरकारी खर्च झाला नसता.

> ज्यांची घरची परिस्थीती मुंबईच्या वास्तव्यापेक्षा देखील बिकट आहे ते लोकं अजुनही मुंबईतच असतील ?

घरी परतणार्‍यांची संख्या बघितली तर वरच्या वाक्यातली व्यर्थता लक्षात येईल.

> पंतप्रधान पदावर बसलेला व्यक्ती इतक्या मोठ्या संकटात नियोजन शुन्यतेने वागतो हा दावा हास्यास्पद आहे.

सध्या जे निस्तरण्या पलिकडे गेलं आहे त्याला नियोजन शून्यतेचा पुरावा म्हणतात.

अर्धवटराव's picture

27 May 2020 - 1:53 am | अर्धवटराव

स्थलांतर करणे हा उद्देशच नव्हता. महिन्याभरात रोग प्रसाराची साखळी तोडणे वा आटोक्यात आणणे हाच उद्देश होता. आज दोन महिन्यांनी देखील मुंबई सारखे ठिकाण पुर्वपदावर येत नाहि म्हटल्यावर लोक आपापल्या गावी निघालेत. पण मार्चमधे त्यांना असं परत जायची तितकीशी गरज वाटलीच नसती. शिवाय प्रश्न फक्त मजुरांचा नव्हता. लाखो लोकं आपापल्या घरांपासुन लांब गेले असतील. तेव्हढ्या सगळ्यांना परत जायला सांगायचे ? आठवड्याभरात ताक घुसळ्यासारखं लोकं मिक्स करायचे? करोनाचा लंगर लावायचा होता का?

सध्या जे निस्तरण्या पलिकडे गेलं आहे त्याला नियोजन शून्यतेचा पुरावा म्हणतात.

हा पुरावा शोधणार्‍याच्या मानसीकतेचा खेळ आहे. एकदा का कोणावर नियोजनशुन्यतेचा आरोप करतोच म्हटलं तर कशातही काहिही दिसतं. मग पंतप्रधानपदी बसलेला माणुस इतक्या गंभीर प्रसंगी नियोजनशुन्यतेने वागु शकत नाहि हा कॉमनसेन्स देखील फाट्यावर मारण्यत येतो.

संजय क्षीरसागर's picture

27 May 2020 - 12:36 pm | संजय क्षीरसागर

> महिन्याभरात रोग प्रसाराची साखळी तोडणे वा आटोक्यात आणणे हाच उद्देश होता ?

एका महिन्यात साखळी तोडणं असंभव आहे हे कळायला कितपत शिक्षणाची आवश्यकता आहे ?

अर्धवटराव's picture

27 May 2020 - 6:11 pm | अर्धवटराव

१) "महिन्याभरात साखळी तोडणे किंवा आटोक्यात आणण्याच्या उद्देशाने लॉकडाऊन करणे" आणि "महिन्याभरात साखळी तोडणे" हि दोन समानार्थी वाक्यं आहेत
२) भारताचा प्रधानमंत्री संकटकाळात नियोजनशुन्य वागतो
या दोन थेअरी मांडायला जितक्या शिक्षणाची आवष्यकता असेल त्यावरुन अंदाज बांधा

चौकस२१२'s picture

27 May 2020 - 6:22 pm | चौकस२१२

" पंतप्रधान पदावर बसलेला व्यक्ती इतक्या मोठ्या संकटात नियोजन शुन्यतेने वागतो हा दावा हास्यास्पद आहे."
अगदि बरोबर ,,

नुसती टीका करणाऱ्यांकडे बरं स्वतःकडे काही सकारात्मक हि नाही
आणि समजा "योग्य" अशी सूचना देऊन लोकडवून केला असते आणि गोष्टी हाताबाहेर गेल्या असत्या तर उंटावरून शेळ्या हाकलायला हि लोक तयार...
मोदींनी केल ना म्हणजे चूकच हा मंतर घोळवत बसणाऱ्यांना बाकी काय दिसणार.. जगात ना भूतो ना भविष्यातो हा प्रसंग आला आहे kharjawadhi रुपयांचा/ डॉलर, युरो नुकसान सोसून जगाने अशी बंदी आणली पण बंदी आणणारे मोदीच आणि भाजपाच फक्त मूर्ख .. बकि हे टिकोजीराव शहाणे

अर्धवटराव's picture

26 May 2020 - 10:14 pm | अर्धवटराव

करोनाविरुद्ध वेगवेगळ्या पातळ्यांवर लढा चालु आहे, सहचर्य तपासलं जातय... आणि बरच काहि

२२ मार्च आणि २५ मे यात स्थलांतरासाठी कोणती तारीख योग्य होती ?

२५ मे

२२ मार्चपेक्षा भयावह परिस्थीती आज आहे.

अक्ख्या जगात ति स्थिती आहे. सरकार आणि जनतेने आपापल्या परिने जे करता येईल ते केलय. पुढेही करतील.

सध्या स्थलांतरीत होणार्‍यात करोना कॅरीअर्स नाहीत याची हमी कुणी घेतलीये ?

कुणीच नाहि. काहि मार्गदर्शक तत्व नेमली आहेत.. सर्वच बाबतीत... पण या बाबतीत हमी देण्याची अपेक्षा करणं मूर्खपणाचं आहे.

संजय क्षीरसागर's picture

27 May 2020 - 12:06 am | संजय क्षीरसागर

२४ मार्चला पुरेशी मुदत देऊन लोक वेळच्या वेळी घरी गेले असते

तर आज २६ मे जो गोंधळ झाला आहे आणि परिस्थिती संपूर्ण हाताबाहेर गेली आहे ती वेळच आली नसती.

अर्धवटराव's picture

27 May 2020 - 1:05 am | अर्धवटराव

२४ मार्चला पुरेशी मुदत देऊन लोक वेळच्या वेळी घरी गेले असते

अजीबात नाहि.
शिवाय रोगाचा प्रसार वाढण्याची भिती.

तर आज २६ मे जो गोंधळ झाला आहे आणि परिस्थिती संपूर्ण हाताबाहेर गेली आहे ती वेळच आली नसती.

परिस्थीती काहिही हाताबाहेर वगैरे गेलेली नाहि. २६ मे ला जो गोंधळ झाला तो थोड्याफार प्रमाणात तसाही झालाच असता. हातातला घास पानात सोडुन आहे त्या अवस्थेत आपापल्या घरी जा असं सांगुन फार मोठा गोंधळ निवारण झालं असतं असं वाटत असेल तो गैरसमज आहे.

मुद्दा नीट वाचाल तर पुन्हा पुन्हा त्याच चुका होणार नाहीत.

> सर्जिकल स्ट्राईकसारखा लॉकडाऊन न करता, लोकांना घरी सुखरुप पोहोचता येईल असा अवधी देऊन, एका प्री-डिक्लेअर्ड तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ?

अर्धवटराव's picture

27 May 2020 - 2:05 am | अर्धवटराव

लोकांना घरी सुखरुप पोहोचता येईल, घरी परत जाताना बायका-मुलांसाठी करोनाचा खाऊ घेऊन जाता येईल, अशा चुकीच्या समजुतीत सरकार अडकलं नाहि हे भारताचं नशीब. एक प्री-डिक्लेअर्ड तारीख वगैरे शोधायच्या भानगडीत सरकार पडलं नाहि. अर्थात, तसं केलं असतं तरी ही प्रि-सिलेक्टेड डेट शोधण्यात देखील नियोजन शुन्यता होती वगैरे आरोप झालेच असते.
देशाची गाडी करोनाच्या दरीत पडण्यापुर्वी ब्रेक मारायला लागणार हे सरकारला कळलं. सरकारने एक दिवस ट्रायल करुन करकचुन ब्रेक मारला. अगदी योग्य लेकं. लॉकडाउन नंतर परिस्थीचा आढावा घेत सरकार त्या त्या वेळी आवष्यक ति पाउलं उचलत आहेच. अन्यथा आहे त्या पेक्षा दयनीय परिस्थीती ओढावली असती.

१००० वेळा सहमत आहे अर्धवट यांच्याशी,
पण समोरच्याला समजावून सांगायच्या स्थितीत समोरचा माणूस नाहीये हो. काही जण अहंकाराने मदमस्त होतात त्यांना वास्तवाची जाणीवच नसते किंवा त्यांना ती करून घेण्याची गरजच भासत नाही.

असो. तात्पर्य दगडावर डोके आपटून फायदा नाही.

२४ मार्चचा स्प्रेड आणि आताचा स्प्रेड यात कमालीची वाढ झाली आहे.

त्यामुळे स्थलांतरीत होणार्‍यांमधे करोना कॅरिअर्सचं प्रमाण लक्षणीय असणार आहे.

थोडक्यात, सध्याची परिस्थिती पराकोटीची दयनीय आहे.

त्यात खुद्द मोदींनी " आता करोनाबरोबर जगायचं आहे" असं म्हटलं आहे. याचा साधा अर्थ करकचून मारलेला ब्रेक हा नियोजनशून्य निर्णय होता असा होतो.

मराठी_माणूस's picture

27 May 2020 - 4:41 pm | मराठी_माणूस

२४ मार्चचा स्प्रेड आणि आताचा स्प्रेड यात कमालीची वाढ झाली आहे.

त्यामुळे स्थलांतरीत होणार्‍यांमधे करोना कॅरिअर्सचं प्रमाण लक्षणीय असणार आहे.

ह्यात निश्चितच तथ्य आहे.

अर्धवटराव's picture

27 May 2020 - 6:20 pm | अर्धवटराव

२४ मार्चचा स्प्रेड आणि आताचा स्प्रेड यात कमालीची वाढ झाली आहे.

महाराष्ट्र, त्यातल्या त्यात मुंबई, सर्वात जास्त करोना स्प्रेड झाला असं वाचलं होतं... तो २६ मे च्या स्थलांतरामुळे झाला होय... बरं बरं.

त्यात खुद्द मोदींनी " आता करोनाबरोबर जगायचं आहे" असं म्हटलं आहे. याचा साधा अर्थ करकचून मारलेला ब्रेक हा नियोजनशून्य निर्णय होता असा होतो.

सुदैवाने मोदिंचा कॉमनसेन्स अजुनही चलनात आहे. परिस्थीती कुठलं वळण घेते, आणि त्यानुसार नवीन पाउलं काय उचलायला हवीत, याबाबत मोदि ,आणि इतर सरकारं देखील तज्ञांच्या मदतीने काय ते निर्णय घेतीलच.

थोडक्यात, सध्याची परिस्थिती पराकोटीची दयनीय आहे.

याबाबत सहमत. देशाचं सरकार संकटकाळात नियोजनशुन्य असतं असं वाटायला परिस्थिती खरच पराकोटीची दयनीय असावी लागते.

कोणाची परिस्थीती खरच पराकोटीची दययीन असावी लागते, हे ज्याचं त्याने ठरवावं.

ऋतुराज चित्रे's picture

26 May 2020 - 8:45 pm | ऋतुराज चित्रे

कोट्यवधी मजूर संख्या हे उगाच लंगडे कारण सांगत आहे बचाव करणारे. सध्या कितीतरी श्रमिक ट्रेनला अर्ध्यापेक्षा कमी प्रवासी मिळत आहेत. काही ट्रेन पुरेसे प्रवासी न मिळाल्याने रद्द कराव्या लागत आहे. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान आलेल्या प्रवाशांना सरकारी खर्चाने जरी १४ दिवस देखरेखीखाली ठेवले असते तरी भारतात ही साथ पसरली नसती. लॉकडाऊन ची गरज पडली नसती. आता साथ आटोक्यात आणण्यासाठी किती खर्च होईल ते सांगता येणार नाही. सगळाच गोंधळ. प्रतिबंध करण्यात केंद्र सरकार कमी पडले.आज लोकांना मास्क लावा , शारीरिक सुरक्षित अंतर ठेवा, हात साबणाने धूवा, सॅनिटायझर वापरा ई. प्रतिबंधात्मक उपाय सुचविनाऱ्या सरकारने कोरोनाचा भारतात शिरकाव होऊ नये म्हणून स्वतः कोणते प्रतिबंधात्मक उपाय केले? उगाच लंगड्या सबबी पुढे करून स्वतः च्या निष्काळजीपणावर पांघरूण घालत आहे केंद्र सरकार.

अर्धवटराव's picture

26 May 2020 - 10:23 pm | अर्धवटराव

करोना नामक संकट त्याच्या टेस्ट सिस्टीम डेव्हलप होण्या अगोदरच जगात पसरलं होतं. सर्व आंतराष्ट्रीय प्रवाशांना तोवर होल्ड करणं शक्यच नव्हतं.

ऋतुराज चित्रे's picture

26 May 2020 - 10:35 pm | ऋतुराज चित्रे

सरसकट सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना फक्त १४ दिवस विलग करणे इतके कठीण होते का? काय प्रोब्लेम होता? लॉक डाऊन मध्ये तर सव्वाशे कोटी जनता घरात बसवून ठेवले ,हे कसे शक्य झाले?

चीन मधे पहिला मृत्यु झाला त्या दिवसापासुन ? कि भारतात पहिला रुग्ण सापडला त्या दिवसापासुन?
सरकारने काहि विवीक्षीत देशांतुन आलेल्या प्रवाशांना तसंही विलगीकरणात ठेवलं होतं. पण रोग भारतात अगोदरच येऊन ठेपला होता. तब्लीगी सारख्या प्रकाराने तर मुळं धरलीच होती.

ऋतुराज चित्रे's picture

27 May 2020 - 1:03 pm | ऋतुराज चित्रे

चीन मधे पहिला मृत्यु झाला त्या दिवसापासुन ? कि भारतात पहिला रुग्ण सापडला त्या दिवसापासुन?
अगदी योग्य प्रश्न. जेव्हा केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याला कोरोनाचा धोका कळला तेव्हाच आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे १००% सक्तीचे १४ दिवस विलगीकरण करायला हवे होते,फक्त काहींचे नव्हे. इतक्या साध्या गोष्टी केंद्र सरकारला कळत नसतील तर कशाला हवे ते आरोग्य खाते. कोरोनावर खास औषधी उपचार नसताना प्रतिबंधात्मक उपाय फक्त जनतेनेच पाळायचे का? सरकारची काही जबाबदारी आहे की नाही?
इथे केंद्र सरकारचे समर्थन करणाऱ्या एकालाही सरकार प्रतिबंधात्मक उपाय करण्यात कमी पडले असे का वाटत नाही?

संजय क्षीरसागर's picture

27 May 2020 - 1:30 pm | संजय क्षीरसागर

केवळ बिजेपी कनेक्शनमुळे ती एअरपोर्टवरुन बिनधास्त सुटली.

तीनं बिनधास्त पब्लिक इवेंटस केले.

तीनं तो संपर्क बिजेपीच्या दुष्यंत सिंहमार्फत पार पार्लमेंटपर्यंत पोहोचवला !

हे सगळं फुल लॉकडाऊन चालू असतांना.

सरकार आणि सरकारई यंत्रणांनी जे काहि केलं त्यापेक्षा अजुन चांगलं करता आलं असतं का? निश्चितच करता आलं असतं. इंप्रुव्हमेण्टचा स्कोप प्रत्येक ठिकाणी असतोच.
सरकारला (केवळ भारत नव्हे... जगातल्या सर्व सरकारांना) जेंव्हा करोनाचा धोका कळला तोवर करोना विमानतळांवर आटोक्यात आणण्याच्या पलिकडे गेला होता. ते रोखणं शक्य होतं का? थेरोटीकली हो, शक्य होतं.. प्रॅक्टीकली चान्सेस कमी होते.

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

26 May 2020 - 9:29 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

सरकारने कोरोनाचा भारतात शिरकाव होऊ नये म्हणून स्वतः कोणते प्रतिबंधात्मक उपाय केले?

केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान आलेल्या प्रवाशांना सरकारी खर्चाने जरी १४ दिवस देखरेखीखाली ठेवले असते तरी भारतात ही साथ पसरली नसती. लॉकडाऊन ची गरज पडली नसती.

चौकस२१२'s picture

27 May 2020 - 1:34 pm | चौकस२१२

"जेव्हा केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याला कोरोनाचा धोका कळला तेव्हाच आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे १००% सक्तीचे १४ दिवस विलगीकरण करायला हवे होते,"
हा धोका जगातील अनेक सरकारांना लगेच कल्ला नाही हे आपण का गृहीत घेत नाही?
जगात इतर हि देश हे टप्य्या टप्य्या ने आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर बंदी आणत होते..एकदम सगळ्या सरकारांना एका रात्रीत उमगले असे झाले नाही
ऑस्ट्रेलियात प्रथम चीन, नंतर इटली आणि नंतर इराण आणि मग अमेरिका येथील प्रवाश्यांवर बंदी आणली गेली
म्हणजे आम्रिकेवर बंदी अणे पर्यंत थेथून काही रोगग्रस्त आले असणारच
फक्त भारत सरकारचाच चुकले हि जी टीका आहे त्यांनी जरा जगात काय चाललंय याची पण दखल घावयाविकि .

संजय क्षीरसागर's picture

27 May 2020 - 1:43 pm | संजय क्षीरसागर

केवळ बिजेपी कनेक्शनमुळे एअरपोर्टवरुन बिनधास्त सुटली.

तीनं बिनधास्त पब्लिक इवेंटस केले.

तीनं तो संपर्क बिजेपीच्या दुष्यंत सिंहमार्फत पार पार्लमेंटपर्यंत पोहोचवला !

हे सगळं फुल लॉकडाऊन चालू असतांना.

__________________________________

याला जवाबदार कोण ?

ऋतुराज चित्रे's picture

27 May 2020 - 1:55 pm | ऋतुराज चित्रे

जगातील कोणत्याही देशाचे काय केले ह्याने माझ्या जीवनावर काय फरक पडत नाही, माझ्या भारत सरकारने काय केले ह्याने निश्चितच फरक पडतो. पुन्हा पुन्हा हाच प्रश्न विचारतो, आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे सरकारी खर्चाने विलगिकरण करण्यास केंद्र सरकारला काय अडचण होती? आपले सरकार स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घेऊ शकत नाही का? जगाचे उदाहरण न देता कोणी सांगू शकेल का?

चौकस२१२'s picture

27 May 2020 - 6:05 pm | चौकस२१२

जगाचे उदाहरण दिले ते का एवढा बोचतंय ..
केवळ या साठी ते दिले कि या लढाईत अनेक देशांचे अधिकारी एकमेकांशी देवाण घेवाण करीत आहेत ..

ऋतुराज चित्रे's picture

27 May 2020 - 2:03 pm | ऋतुराज चित्रे

जगात इतर हि देश हे टप्य्या टप्य्या ने आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर बंदी आणत होते..एकदम सगळ्या सरकारांना एका रात्रीत उमगले असे झाले नाही
चूक, सगळेच देश आपापल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची काळजी करत होते. कोरोना मुळे मृत्यूचे प्रमाण फक्त ३-४ % असेल अशा तेव्हा बातम्या येत होत्या. त्यामुळे सगळे बेफिकीर होते, आपले सरकारही.

मूकवाचक's picture

27 May 2020 - 2:55 pm | मूकवाचक

अप्रेझलमधे ४/५ किंवा ८/१० रेटिंग व्यवस्थापकाने दिले आणि तरीही एखादा कर्मचारी त्यात समाधानी नसेल तर असले मुद्दे पुढे केले जातात (उदा. जगावेगळे काहीच केले नाही, सहावे इंद्रिय (अंतर्ज्ञान) वापरून अमुक एक नुकसान थांबवले नाही इ. इ.). थोडक्यात मोदींचे ४/५ किंवा ८/१० असे अप्रेझल झालेले दिसते आहे. असो.

चूक? मी स्वतः ऑस्ट्रेलियात अनुभवलंय.. तुम्ही कोणत्या माहितीच्या जोरावर हे बोलताय?
टप्य्या टप्य्या ने आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर बंदी आणत होते
आता जेव्हा उठवली जाईल तेव्हा पण सुरवातील शेजारच्या नुझिलन्ड मधून सुरु होईल असे दिसते
आपण भारत सरकारचं काही निर्णयावर नाराज साला तर ते समजू शकतो पण म्हणून उगाच दुसऱ्या देशात असे घडलेच नाही हे काय
एक उद्धरण म्हणून तुम्हाला माहिती आहे का जर ऑस्ट्रेलिया ला आपली आम्हन्याप्रमाणे फक्त "देशाच्या अर्थव्यवस्थेची काळजी कऱ्यांची असती" तर चीन मधून येणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्यांनी बंदी आणली नसती! परदेशी विद्यार्थी हे फार मोठे अर्थार्जनाचे स्तोत्र आहे येथे ..जसे पुण्यात बाहेरून शिकायला येणार्यांमुळे खूप पैसे पुण्यात येतो तसेच

ऋतुराज चित्रे's picture

27 May 2020 - 8:40 pm | ऋतुराज चित्रे

आपण भारत सरकारचं काही निर्णयावर नाराज साला तर ते समजू शकतो पण म्हणून उगाच दुसऱ्या देशात असे घडलेच नाही हे काय
अपवाद असेल, नाही म्हणत नाही,परंतू तुम्ही अप्रत्यक्षपणे माझ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या मुद्याला दुजोरा देत आहे, चीनच्या विद्यार्थ्यांवर ऑस्ट्रेलियाने बंदी घालणे.
मी साधा प्रश्न विचारलाय, भारत सरकारला आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १४ दिवस सरकारी खर्चाने विलगीकरण करण्यात काय अडचण होती? बाकीचे देश काय करत होते हे थोडा वेळ बाजूला ठेवा.

विटेकर's picture

27 May 2020 - 2:39 pm | विटेकर

आपण संक्षीनाच का बरे पंतप्रधान करत नाही आहोत ? त्यांना सगळ्या गोष्टीतील सगळे कळते ... इतका अलौकिक दैवी महापुरुष भारतात उपलब्ध असताना आपण इतक्या असामान्य बुद्धीमत्तेचा उपयोग आपण न करुन घेणे या करंटेपणाला काय म्हणावे ?
मिपाकर हो , तुम्हाला तरी कळ्ते की नाही ? एक साधा प्रश्न ते विचरताहेत .. ते वेगेवेगेळ्या पद्धतीने तुम्हाला सांग्ताहेत की मोदीनी घोड्चूक केली आहे .. तुम्ही अप्रबुद्ध .. ही साधी गोष्ट तुम्हाला समजत नाही ? किती तो निलंडपणा ??

मला अगदी हताश हताश वाटते आहे .. नशीब त्यन्च्यासारखे प्रचितीचे प्रज्ञापुरुष मिपावर आहेत .. अन्यथा आमचे काय झाले असते कोणास ठाऊक ?
हे परम पित्या , किती रे तुझे उपकार आमच्यावर ! धन्य आहेस तू !

संजय क्षीरसागर's picture

27 May 2020 - 4:07 pm | संजय क्षीरसागर

हे रामदासांनीच का गादी चालवली नाही ? असं विचारणं झालं !

मोदी आणि शिवाजी महाराज यांच्यात तोच नेमका फरक आहे.

महाराज रामदासांचं म्हणणं ऐकायचे आणि मग समग्र विचार करुन लोकहिताचा निर्णय घ्यायचे

मोदींच्याकडे एकसोएक सल्लागार आहेत.

ते सगळ्यांच ऐकतात, पण कुणाचं काही मनावर घेत नाहीत.

त्यांच्या निर्णयात फक्त एकच विचार असतो : माझी प्रतिमा कशी उंचावेल !

(बाकी काय वाट्टेल ती काशी झाली तरी हरकत नाही)

चौकस२१२'s picture

27 May 2020 - 6:07 pm | चौकस२१२

यातच सर्व आले आपला केवल मोदि द्वेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 May 2020 - 6:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझी प्रतिमा कशी उंचावेल आणि बाकी काय वाट्टेल ती काशी झाली तरी हरकत नाही.

इतकंच सुरुय सध्या.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

27 May 2020 - 6:25 pm | चौकस२१२

एवढा व्यक्तीद्वेष खरंच चांगला नाही .. म्हणजे याचाच अर्थ असा होतो कि मोदी या व्यक्तीला देशाची काह्ही पडली नाहीये
हे विसरू नका कि हा माणूस एका राज्याचा १५ वर्षे मुख्यमंत्री होता आणि देशाचा ६-७ वर्षे पंतप्रधान... आणि ते सुद्धा लोकशाही पद्धतीने निवडून आलेला
जरा टीका करताना तारतम्य बाळगा प्रोफेश्वर

अर्धवटराव's picture

27 May 2020 - 6:34 pm | अर्धवटराव

तारतम्य वगैरे अफुच्या गोळ्या.. कशाला उगाच ओढायच्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 May 2020 - 6:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>टीका करताना तारतम्य बाळगा प्रोफेश्वर...

फार तान घेऊ नका. संयम ठेवा. _/\_

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

27 May 2020 - 6:49 pm | चौकस२१२

आहे संयम... टिके साठी टीका नाही करत आपण.. उद्या मोदी आणि भाजप चुकले तर ते चुकले म्हणायला लाज नाही वाटत आपल्याला

गोंधळी's picture

27 May 2020 - 7:00 pm | गोंधळी

नमस्ते मोदी जी

https://www.youtube.com/watch?v=gqJ9cts4QPA

संजय क्षीरसागर's picture

27 May 2020 - 7:06 pm | संजय क्षीरसागर

एकतर तुमचं लेखन वाचतांना बोबडे बोल ऐकू येतात आणि काही टोटल लागत नाही. त्यामुळे सुसंगत लिहलं तर वाचवेल तरी.

मुद्दा काये ? मोदी कुणाचं ऐकत नाहीत !

हा घ्या पुरावा > साक्षात त्यांचाच विडिओ

एक्पर्टस सांगतायंत सर्जिकल स्ट्राईकची डेट बदलू कारण ढगाळ हवामानात टार्गेट दिसणार नाहीत >पण मोदी सांगतायंत आता डेट ठरली म्हणजे ठरली. ढगांच्या आड आपली फायटर्स पण पाकिस्तानी रडारवर दिसणार नाहीत ! तुम्ही निघा !

चला रडारला फसवू या !

चौकस२१२'s picture

27 May 2020 - 7:11 pm | चौकस२१२

बोबडे बोल...मिपावर टंकलेखन करताना होतो त्रास पण हा मुद्दा आहे का? पण तुम्हाला वयक्तिक पाणउतारा करायचा असेल तर काय .. चालू द्या
आणि मोदी गेले खड्यात .. तुम्ही पण सतत लोकडवून असं का केलं हेच गुऱ्हाळ चालू ठेवलाय ! जगात आज थोड्या फार फरकाने अशी बंदी चालू आहे पण ते दिसत नाही !

कुमाऊचा नरभक्षक's picture

27 May 2020 - 9:49 pm | कुमाऊचा नरभक्षक

माझी प्रतिमा कशी उंचावेल आणि बाकी काय वाट्टेल ती काशी झाली तरी हरकत नाही.

इतकंच सुरुय सध्या.

मिपावर ?

मराठी कथालेखक's picture

27 May 2020 - 5:05 pm | मराठी कथालेखक

मजूरांनी स्थलांतर २२ मार्च ला केले काय की २५ मे ला केले काय किंवा दरम्यानच्या काळात केले काय ... सगळे वाईटच (कोरोनाचा प्रसार होणे, पायी , सायकलवर मिळेल ,त्या वाहनाने, लपून छपून जीवावर उदार होवून .. ई)
पण मजूरांनी स्थलांतर का केले ? किंवा त्यांना स्थलांतर का करावे लागले ? काय शक्यता असतील ?
१) केवळ कोरोनाच्या भीतिने ?
२) केवळ मुर्खपणा म्हणून हे पाऊल उचलले ?
की
३) उत्पन्नाचे साधन बंद झाले, घरभाडे देणे आणि किराणा भरणेही जिकरीचे झाले ? सरकारी मदतही मिळाली नाही ? असे काही झाले असेल का ?
या तीनपैकी कोणती गोष्ट जास्त प्रमाणात स्थलांतराला कारणीभूत असावी बरे ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 May 2020 - 5:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख वाचलाच नव्हता. मुलगा आणि तुमचा संवाद उत्तम झाला आहे. मुलाला कळत आहे पण काही लोकांना कळत नै ये असंय ते.

सव्वाशे कोटींचा देश आहे आपला.. किमान आठवडा दिला असता आपापल्या घरी/ गावी पोहोचायला, किराणा सामान भरुन ठेवायला आणि मग महिनाभर पुर्ण संचारबंदी लागू केली असती..फक्त दवाखाने आणि मेडिकल स्टोअर सुरु ठेवली असती.. जे आजारी असतील / होतील त्यांना आरोग्यसेवा आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहिली असती बाकी सर्व बंद..

अगदी सहमत आहे. काहीही करुन धक्कादायक निर्णय घेऊन धक्का द्यायचा या चमत्कारवजा अवतारातून आता देशाच्या नेतृत्त्वाने बाहेर यायला हवे असे वाटते. परिणामांची कल्पना न करता देशाच्या वाटेला जे आलं ते भयंकर आहे. पूर्वीही असा अनुभव घेतलाच आहे. काही वेळ देऊन लॉकडाऊन केला असता तर आज मजुरांचे जे अतोनात हाल झाले ते हाल तरी झाले नसते. बाकी कित्येक दिवसांपासून म्हणत आहे की, सरकारने योग्य निर्णय घेतले नाहीत. पहिला रुग्ण सापडल्यानंतर हालचाली करायला सुरुवात केली पण जगभर जेव्हा चर्चा सुरुच होती त्यापूर्वी काय प्रतिबंधाचे उपाय केले ? लॉकडाऊनमुळे चौन तुटेल आणि भराभर रुग्णसंख्या कमी होऊन जूनच्या सुरुवातीला आपण कोरोना मुक्त होऊ असे वाटत राहीलेले, तिसर्‍या आणि चौथ्या लॉकडाऊनच्या 'भाईयो और बहनो' म्हणून नव्या घोषणेला आले नाहीत यातच सर्व आलं.

बाकी चालू द्या. चर्चा छान सुरु आहे.

-दिलीप बिरुटे

लॉकडाऊनमुळे चौन तुटेल आणि भराभर रुग्णसंख्या कमी होऊन जूनच्या सुरुवातीला आपण कोरोना मुक्त होऊ असे वाटत राहीलेले
"करोनामुक्त" होऊ असा दावा कोणी केलाय? जगातील कोणत्याही सरकारने असा दावा केलं नाहीये
लोकडवून मुळे करोना चा "प्रसार कमी होईल आणि वैद्यकीय सेवा सावरून तयारी करिता येईल" असा विचार जगातील जवळ जवळ सर्व देशांच्या सरकारने केला
आणि हे व्हायला वेगवेगळ्या देशांना वेगवेगळं वेळ लागेल , काही देश लवकर साधय करू शकतील काही नाही... हा एवढा तर्क नाही समजत नाही तुम्हाला?
" २१ दिवसांनंतर सगळं काही आलबेल होईल असा स्वतःचा गृहीत धरायचं आणि २२ वया दिवशी सरकारचं नावाने आरडाओरड"
आज ज्या देशात हे आटोक्यात येतंय असा दिसतंय तिथे सुद्धा सरसकट बंदी उठवलेली गेली नाहीये हे लक्षात घ्या
जरा आपल्या बघायच्या कक्षा रुंदावा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 May 2020 - 6:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साहेब आम्हाला आमच्या कक्षा वगैरे सर्व माहिती आहेत, आमचे तर्क आमच्यासाठी उत्तम आहेत. सरकारने गेली काही दिवस काय दिवे लावले ते सर्व आम्हाला माहिती आहे, उघड्या डोळ्यांनी ते आम्ही पाहतो आहोत हमे हमारे हाल पर छोड़ दो....!

आभार....!

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

27 May 2020 - 6:30 pm | चौकस२१२

मुद्दा नसला कि हे अस्त्र बाहेर काढायचं "भारताबाहेर राहणाऱ्याला भारताबद्दल काय कळतंय.." हाहाहाहाहा
जगाच जाऊद्या, निदान हे तरी टीका कर्नाऱ्यारें बघावे कि भारतासारखाय देशात हा प्रश्न सोडवणे किती कठीण आहे ते, मग ते मोदी असोत किंवा नेहरूं असते किंवा शरद पवार ..आणि महाराष्ट्रात तर पवारांचे राज्य आहे ना मग ?

चौकस२१२'s picture

27 May 2020 - 6:41 pm | चौकस२१२

"कोण म्हणतं अर्थव्यवस्था अडचणीतून बाहेर काढायला पैसा लागतो म्हणुन ?
पैसे नाही लागत? इंग्लंड ने ८०% पगार दिला जनतेला आणि ऑस्ट्रेल्याने १३० बिलियन डॉलर ( गुणिले साधारण ४६) दिले जनतेला ते पैसे काही तिजोरीत नवहते .. आपली पत वापरून कर्ज घेऊन .. पुढील काही पिढ्या हे कर्ज आम्ही फेडणार...
तेव्हा एक तर पॆसा लागतोच आणि दुसरे असे कि "लॉकडवून तातडीने करणे जरुरीचे वाटले ते सुद्धा एवढे कर्ज घेऊन आणि ते भांडवशाही सरकारे म्हणजे खरंच गंभीर असणार !

चौकटराजा's picture

27 May 2020 - 7:59 pm | चौकटराजा

मी एरवी मोदी यांचा काही प्रमाणात पंखा आहे,. निदान मनमोहन सिंग यांच्या पार्श्वभूमीवर तर नक्कीच ! पण मी ही आता या निष्कर्षाला आलो आहे की स्थलांतरित मजूर या विषयी माझे व मोदींचे ज्ञान सारखेच आहे .आपण सर्व नेहमी ऐकतो की उत्तर भारतातून इकडे मजूर, कारागीर आले आहेत पण इथे शपथ घेऊन सांगा की याची व्याप्ती इतकी मोठी आहे असे कुणास वाटले होते का ? ज्या प्रमाणात गाड्या भरून जात आहेत किवा आता रिकाम्या जात आहेत याला काही कारणे आहेत. घरी उपाशी मरू पण परत येणार नाही अशी मनोधारणा वाला एक गट व दुसरा लवकरच सरकार धोका पत्करून कंटाळून हे निर्बंध उठवेल व आपल्याला काम मिळेल असे वाटणारा गट. मला मोदींचे असे दिसले की मी जे जगाला जमले नाही ते 15 दिवसांच्या मुदतीत करून दखवतो. तो पर्यत कोण कुठे अडकले तरी जीवनासाठी सम्भाळून घेतील .हिटलरला रशियाने ( व थंडीने )कडवा प्रतिकार केला तसा या रोगाने व लोकांच्या खुळेपणाने ही प्रतिकार केला व युद्ध लाम्बले.

नोटाबंदी ही जर "बदली "होती तर प्रथम कोण कसल्या किती नोटा देतो याचे विश्लेषण करणारी यंत्रणा विकसित करून नोटा बदलता आल्या असत्या. श्रीमंतानी त्या गरीबांकडे रोकडा म्हणून ठेवायला दिल्या असत्या तर गरीब सापडले असते. अशा केवळ कुठलीही लिखापढी न करता नोटा काळा पैसा वाल्यानी
गरीबाना दिल्या असत्या..... ? मला शंका आहे. मोदीना धक्का देण्याची जी एक सवय लागली आहे त्यातून काय साध्य होते हा आता इतिहास सर्वाना माहीत आहे.

चौकटराजा's picture

27 May 2020 - 8:26 pm | चौकटराजा

आज लोक म्हणतात की आरोग्य यंत्रणा (रोग प्रसार वाढणारच आहे याची खात्री असल्याने ) सज्ज करण्यासाठी " लॉकडाउन" केला .जरा मोदी व उद्धव यांची सुरूवातीची भाषणे पुन्हा ऐका. त्यात या मुद्याचा उल्लेख देखील नाही. त्यांचा सर्व भर "साखळी तोडणे" यावर होता. आता ते तरी काय करतील बिचारे ! ज्या देशात 130 कोटी लोकसंख्या आहे इथे साखळी तोडणे या अल्प खर्ची उपायाखेरीज काय शक्य होते ? 130 कोटी आधारकार्डे देखील अजून 10 वर्शे झाली तरी झाली नाहीत. तिथे 130 कोटी टेस्ट ...? आज माझी परिस्थीती अशी आहे की मला डॉ ची अपोइंटमेट 20 दिवस अगोदर घ्यावी लागते. तेच डॉ मी होस्पिटलाएज झालो तर अर्ध्या तासात हजर. सरकारी दवाखान्यात जाउ तर तिथे गर्दी म्हणजे आनंद !