Survival of the fittest.....
परवा ऑफिसला जाण्यासाठी ठाण्याहून बस पकडली. बाजुच्या सिटवर बसलेल्या मुलाने बॅगेतुन पुस्तक काढुन वाचायला लागला. मोबाईलच्या जमान्यात चक्क पुस्तक वाचताना पाहुन माझं कुतुहलही चाळवलंच. हळुच वाकुन पाहिलं तर पब्लिक सर्व्हिस परिक्षेचं पुस्तक होतं. म्हटलं घ्यावा जरा याचा इंटरव्हयू. तेवढाच आपलाही टाईमपास होईल.
तोपर्यंत बसही सुसाट वेगाने निघाली होती.
मी- कसला अभ्यास करतोयस ? कोरोना चा का ? (खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा व्हाव्यात म्हणून मी कोपरखळीने सुरुवात केली..
तो-पब्लिक सर्व्हिस कमिशन परिक्षेचा अभ्यास करतोय..
मी- मग कोरोना बद्दल काही वाचलंस का ? काय होईल पुढे ? आटोक्यात येईल का ?
तो-कोरोना बद्दल अधिकृत काॅमेंट करायला मी डाॅक्टरही नाही आणि वैज्ञानिकही नाही.. पण हो, W.H.O., केंद्र सरकार, राज्य सरकार, जागतिक पातळीवरच्या घडामोडी यांवरून काही गोष्टी स्पष्ट होतायत.. कोरोना हा विषाणू आता आपल्या सोबत किमान काही वर्षे तरी राहणार.. आणि याबाबत वेळोवेळी प्राप्त होणार्या सुचना काटेकोरपणे पालन कराव्या लागतील. *डार्विनच्या सिद्धांतानुसार it's survival of the fittest..* so, fit रहायचा प्रयत्न करायचा..
मी- म्हणजे यापुढे कायम योगा प्राणायाम, व्यायाम करावा लागणार..
तो-ते तर आहेच.. पण त्याहुन थोडं पुढे जाऊन मी असं म्हणेन कि आपण आपल्या औकातीत रहायला शिकायला हवं..
मी- म्हणजे ?
तो-आपण जन्माला येताना तीन गोष्टी सोबत घेऊन येतो.. बौद्धिक- शारीरिक आणि मानसिक ताकद, घरचे संस्कार आणि आपलं नशीब... यातुन जे निर्माण होतं त्याला व्यक्तिमत्व विकास म्हणतात.. त्यातूनच निर्माण होते इम्युनिटी.. कुठल्याही रोगाशीच नाही तर समस्येशी लढण्याची ताकद.. ती कुणाची थोडी कमी अधिक असु शकते.. ती प्रामाणिकपणे कशी वाढवता येईल याचा प्रयत्न करायला हवा..
पण सध्या प्रोटीन पावडर खाऊन दंडावर बेडकुळ्या दाखवत फिरण्याच्या शाॅर्टकट काळात ,स्पर्धेत टिकण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जातो त्यातुन तयार होतं tension आणि त्यातुन तयार होतात विविध आजार.. त्याने इम्युनिटी कमी होते आणि नेमका तेव्हाच कोरोना चा शिरकाव होतो.. हेच जर आपण वास्तव स्विकारून प्रामाणिकपणे राहिलो तर कमी त्रास होईल..
मी-मग यात सरकारच्या कामाबद्दल तुझं काय मत ? तू जर पंतप्रधान असतास तर काय केलं असतंस ?
तो- शाळेतल्या निबंधाची आठवण झाली.. जर मी पंतप्रधान असतो तर.... असो, मी जर पंतप्रधान असतो तर केंद्रीय आरोग्य खात्याला जागतिक पातळीवर गांभीर्याने लक्ष ठेवायला लावलं असतं.. जगात कुठल्या देशात कोणत्या रोगाची साथ पसरतेय ते लक्ष ठेऊन तिथुन देशात येणार्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली असती.. एअरपोर्टवर इमिग्रेशन पासूनच त्यांना ट्रॅक केलं असतं.. त्या रोगावर कोणते औषधोपचार उपलब्ध आहेत ते प्रयोग आणि प्रयत्न केले असते.. जगभर रोग पसरल्यावर तीन महिन्यांनी अचानक रातोरात सगळं बंद नसतं केलं.. सव्वाशे कोटींचा देश आहे आपला.. किमान आठवडा दिला असता आपापल्या घरी/ गावी पोहोचायला, किराणा सामान भरुन ठेवायला आणि मग महिनाभर पुर्ण संचारबंदी लागू केली असती..फक्त दवाखाने आणि मेडिकल स्टोअर सुरु ठेवली असती.. जे आजारी असतील / होतील त्यांना आरोग्यसेवा आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहिली असती बाकी सर्व बंद..
लाॅकडाऊनच्या काळात तसंही प्रदुषण कमी झालंय.. लोकांना स्वतःसाठी, कुटुंबासाठी वेळ देता येतोय.. त्याचा चांगला वापर करायला सांगितलंं असतं..
मी- हे झालं .. आता पुढे काय करावं असं तुला वाटतं ?
तो-आता आपण कचाट्यात सापडलोत.. लाॅकडाऊन उठवला तर कोरोना जोमाने पसरण्याची भिती आणि नाही उठवला तर अर्थव्यवस्था अडचणीत सापडण्याची भिती..
मी- मग ? यावर उपाय काय ?
तो- मला वाटतं.. आता हळुहळु लाॅकडाऊन उठवायला हवा.. कोरोना सोबत जगायच तर टप्प्याटप्प्याने सगळं सुरू व्हायला हवं.. भाजीपाला विकायला परवानगी आहे.. पण ज्याचा चष्मा तुटला त्याने काय करायचं ? चष्म्याचं दुकान बंद.. इलेक्ट्रिकचं दुकान बंद.. गर्दी कुठे जास्त होणार- भाजीपाला घ्यायला कि चष्मा, लाईटस् घ्यायला ? ते गरजेचे नाही का ? निर्णयात विसंगती जास्त दिसते..
मी- पण शेतकर्याला मदत नको का करायला ?
तो- हवी ना.. पण मग मदत नको असा कोण आहे इथे ? उद्योजकांना नको का मदत ?
छोट्या व्यापार्यांना- दुकानदारांना नको का मदत ? हे सगळे टिकले तर नोकर्या टिकतील.. शेतकरी उद्योजक आणि नोकरदार सगळेच टिकले पाहिजेत ना..
मी-पण त्यासाठी पैसा कुठून आणायचा ?
तो-कोण म्हणतं अर्थव्यवस्था अडचणीतून बाहेर काढायला पैसा लागतो म्हणुन ?
मी- नक्की काय म्हणायचंय तुला ?
तो- शाळा काॅलेजमधे शिकवलं जातं कि धंदा व्यवसाय करण्यासाठी land, labour आणि capital लागतं.. पण वास्तवात धंदा व्यवसाय करण्यासाठी लागतो आत्मविश्वास.. कधी तो कुणात जन्मतः असतो तर कधी तो द्यावा लागतो.. सरकार जेव्हा तो देते, तेव्हा धंदाच काय अख्खा देश उभा राहतो.. फक्त तो मनापासून द्यायला हवा..
बरं, पुढच्या स्टाॅपवर उतरायचंय.. मी निघु ?
मी- खुप छान बोलतोस ....एक शेवटचा प्रश्न-
कोरोनाच्या या काळात आपलं काय होईल ?
तो -- शक्य होईल इतकी दक्षता घ्यावी.. आणि आपापली कामे प्रामाणिकपणे करावी..
तीन तत्वं लक्षात ठेवायची-
Survival of the fittest..
जगा आणि जगू द्या..
एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ..
एवढं बोलून तो उतरला..
श्रीकृष्णाने अर्जुनाला रणभूमीवर गीता सांगितली होती हे ऐकलं होतं.. या पोराने मला कोरोनाच्या या बसप्रवासातील या रणभूमीवर आयुष्याची दिशा दिली..
('मराठी संस्कृती' ग्रुप वरून साभार)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जगातील कोणत्याही देशाचे काय
का एवढा बोचतंय
जगात इतर हि देश हे टप्य्या
अप्रेझल
टप्य्या टप्य्या ने आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर
आपण भारत सरकारचं काही
आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १४ दिवस सरकारी खर्चाने
मला एक समजत नाहीये
विटेकर !
केवल मोदि द्वेश
सहमत.
तारतम्य
अपेक्षाच चुकीची आहे.
तान घेऊ नका
टिके साठी टीका नाही
नमस्ते....( जुमला)
चौकस
बोबडे
लेखन सुधारणं हा त्यावर उपाय आहे
प्रतिसाद वाचून काही
आपण संक्षीनाच का बरे
आपण संक्षीनाच का बरे पंतप्रधान करत नाही आहोत ?भारतात एक पप्पू पंतप्रधानपदाची आस लावून बसलेला आहे.. तितके पुरेसे नाहीये का..? >>>त्यांना सगळ्या गोष्टीतील सगळे कळते - हे चुकीचे वाक्य आहे. थोडा बदल करतो. त्यांनाच सगळ्याच गोष्टीतील सगळेच कळतेच्चमजूरांनी स्थलांतर २२ मार्च ला
अर्रर्र...
जरा आपल्या बघायच्या कक्षा रुंदावा
साहेब अपयशी सरकारबद्दल काही सांगू नका ?
मुद्दा नसला
पैसा लागतो म्हणुन
मी मोदींचा पंखा..
एक राहिले
जरा मोदी व उद्धव यांची
सरजी एक सांगू का ? (मी खरे तर
एकदा घालवून देऊन परत आलेल्या दिव्य पुरुषाबद्दल न बोललेले बरे
सरकारने जीएसटी लावला
तुम्ही राहता त्या देशात जिएसटीचे दर काय आहेत ?
इकडे सरसकट १०% आहे जीएसटी ,
इकडे सरसकट १०% आहे जीएसटी
आजीव सभासद!
जिएसटी हा मोदी सरकार महान पराक्रम म्हणून मिरवते आहे
अगदी
असे आहे ना .............?
वेगळा मुद्दा आहे
आणि आता ही निष्कारणची ३% दरवाढ
परिणाम : काहीही कारण नसतांना
The services supplied by the
@ सुबोध खरे
@ सुबोध खरे
झिरो बॅलन्सचा अर्थ त्यांना
आधी नीट वाचलं असतं तर कळलं असतं
महागाई वाढली
आता थोडं थोडं कळतंय तुम्हाला