[कविता' २०२०] - तृष्णा

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
11 May 2020 - 5:31 pm

तृष्णा

कुंद हवेच्या संथ दुपारी
मंद येतसे गंध जुईचा
गुंग होउनी आम्र पाहतो
झिम्मड दंगा गेंदफुलांचा.

फांदीवरती उभा खिन्नसा
खंत कशाची काक वाहतो
पंखावरती रोजच त्याच्या
इंद्रधनुष्ये मित्र काढतो.

अरुंद छोट्या बांधावरती
लालबुंदशा गुंजा पडती
सांभाळत ते लांब पिसारे
वेचायाला मयूर जमती.

पुंजी अपुली जलबिंदूंची
पर्णमंचकी खुली ठेवती
शांत बैसली पंकजपुष्पे
भृंगसख्याची वाट रोखती.
......

तडागतीरी बिंब न्याहळी
यौवनातली मुग्ध राधिका
कशी कळेना तंग कंचुकी
नंदपुत्र तो स्वप्नी दिसता.

रंध्रांध्राला स्पर्शुन जाईल
मृद्-गंधाने बोझल वारा
धुंद मनाला चिंब कराया
येतिल आता पाउसधारा.

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

11 May 2020 - 6:43 pm | प्रचेतस

+१
अत्यंत सुरेख रचना

कौस्तुभ भोसले's picture

11 May 2020 - 7:44 pm | कौस्तुभ भोसले

सुंदर सुरेख

गणेशा's picture

11 May 2020 - 11:15 pm | गणेशा

फांदीवरती उभा खिन्नसा
खंत कशाची काक वाहतो
पंखावरती रोजच त्याच्या
इंद्रधनुष्ये मित्र काढतो.

वाह

+1 द्यायचाच राहिला कवितेच्या विचारात

+1

मन्या ऽ's picture

11 May 2020 - 11:20 pm | मन्या ऽ

+१

मोगरा's picture

12 May 2020 - 12:02 am | मोगरा

सुंदर

साहित्य संपादक's picture

15 May 2020 - 9:34 pm | साहित्य संपादक

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.

मीनल गद्रे.'s picture

12 May 2020 - 8:28 am | मीनल गद्रे.

कविता छान आहे. आवडली.

साहित्य संपादक's picture

15 May 2020 - 9:34 pm | साहित्य संपादक

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.

आवडाबाई's picture

12 May 2020 - 12:59 pm | आवडाबाई

सुंदर गेय कविता

स्मिताके's picture

12 May 2020 - 7:09 pm | स्मिताके

+१ सुंदर.

बरखा's picture

12 May 2020 - 8:35 pm | बरखा

+१ आवडलली कविता. मस्तच.

आगाऊ म्हादया......'s picture

13 May 2020 - 7:50 am | आगाऊ म्हादया......

गेय आहे, वर्णने फार सुंदर केली आहेत

साहित्य संपादक's picture

15 May 2020 - 9:34 pm | साहित्य संपादक

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.

पलाश's picture

13 May 2020 - 10:18 am | पलाश

+१
फारच छान.

खिलजि's picture

13 May 2020 - 5:28 pm | खिलजि

आईची आन , काय शॉलिड लिखाण

येक नंबरी कविता झालीय

इथे , इथे या मनात खोलवर रुजलीय

मलापण वाटते , असाच काहीसं अर्थपूर्ण लिहावंसं

स्वतःच्याच मनाशी तासनतास बोलावसं

राघव's picture

14 May 2020 - 10:56 am | राघव

चांगलंय.

अजब's picture

14 May 2020 - 1:46 pm | अजब

+1 वा!

बबु's picture

14 May 2020 - 4:55 pm | बबु

'औदुम्बर' या जुन्या सुन्दर कवितेची आठवण जागी झाली.

तुषार काळभोर's picture

14 May 2020 - 7:07 pm | तुषार काळभोर

नादबद्ध सुंदर कविता..

+१

चलत मुसाफिर's picture

15 May 2020 - 5:44 pm | चलत मुसाफिर

+१
चाल लावल्यास खूप चांगलं गाणं होईल

चांदणे संदीप's picture

17 May 2020 - 1:08 pm | चांदणे संदीप

सुरेख कविता!
गुणगुणतच रहावी अशी.

सं - दी - प

चांदणे संदीप's picture

24 May 2020 - 1:00 pm | चांदणे संदीप

इतक्या सुंदर कवितेला गुण द्यायचा राहून गेला. :(
२० प्रतिसादांचा (गुण नव्हे!) टप्पा ओलांडणारी एकमेव कविता!

सं - दी - प

आवडाबाई's picture

20 May 2020 - 7:27 pm | आवडाबाई

आहाहा
पाऊस पडल्यासारखाच वाटला !

गोंधळी's picture

20 May 2020 - 7:37 pm | गोंधळी

१ नंबर.

प्राची अश्विनी's picture

22 May 2020 - 11:52 am | प्राची अश्विनी

+1

जव्हेरगंज's picture

22 May 2020 - 12:24 pm | जव्हेरगंज

सुपर्ब!!
+१

कुमार जावडेकर's picture

23 May 2020 - 6:31 pm | कुमार जावडेकर

+१

g.priya's picture

23 May 2020 - 8:07 pm | g.priya

सर्वात भावलेली कविता.

पाषाणभेद's picture

24 May 2020 - 11:13 am | पाषाणभेद

तडागतीरी बिंब न्याहळी
यौवनातली मुग्ध राधिका
कशी कळेना तंग कंचुकी
नंदपुत्र तो स्वप्नी दिसता.

या कडव्याने कवितेला निराळे वळण मिळत आहे. हे कडवे नसते तरी चालले असते.

कविता एकदम चित्रमय आहे! एक नंबर!

प्राची अश्विनी's picture

25 May 2020 - 10:38 am | प्राची अश्विनी

खरंय. ते कडवं टाकावं की वगळावं यावर मीसुद्धा विचार केला होता.

पाषाणभेद's picture

25 May 2020 - 7:16 pm | पाषाणभेद

बघा मी म्हनलो नव्हतो का येक नंबर!
आला का न्हाई येक नंबर. मंग.
हाबीनंदन!

नाही हो, राहू दिले तेच चांगले झाले.
काही-काही विषयांना आपण का अस्पर्श ठेवतो कोणास ठाऊक?

सत्यजित...'s picture

1 Jun 2020 - 4:11 pm | सत्यजित...

तडागतीरी बिंब न्याहळी
यौवनातली मुग्ध वाटिका
कशी कळेना तंग कंचुकी
कृष्ण-मेघ तो स्वप्नी दिसता.

असं काहिसं कवितेच वळण कदाचित बदललं नसतं!

कविता मोहक चित्रवती आहेच!अभिनंदन!

चलत मुसाफिर's picture

25 May 2020 - 9:23 am | चलत मुसाफिर

मिपा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल अभिनंदन

प्राची अश्विनी's picture

25 May 2020 - 10:37 am | प्राची अश्विनी

सर्व वाचकांचे, प्रतिसाद देणा-यांचे खूप खूप धन्यवाद.

बिपीन सुरेश सांगळे's picture

25 May 2020 - 12:54 pm | बिपीन सुरेश सांगळे

प्राची
कविता खूपच आवडली . नादरम्य आहे .

( फक्त बोझल शब्द नको होता )