तृष्णा

कुंद हवेच्या संथ दुपारी
मंद येतसे गंध जुईचा
गुंग होउनी आम्र पाहतो
झिम्मड दंगा गेंदफुलांचा.
फांदीवरती उभा खिन्नसा
खंत कशाची काक वाहतो
पंखावरती रोजच त्याच्या
इंद्रधनुष्ये मित्र काढतो.
अरुंद छोट्या बांधावरती
लालबुंदशा गुंजा पडती
सांभाळत ते लांब पिसारे
वेचायाला मयूर जमती.
पुंजी अपुली जलबिंदूंची
पर्णमंचकी खुली ठेवती
शांत बैसली पंकजपुष्पे
भृंगसख्याची वाट रोखती.
......
तडागतीरी बिंब न्याहळी
यौवनातली मुग्ध राधिका
कशी कळेना तंग कंचुकी
नंदपुत्र तो स्वप्नी दिसता.
रंध्रांध्राला स्पर्शुन जाईल
मृद्-गंधाने बोझल वारा
धुंद मनाला चिंब कराया
येतिल आता पाउसधारा.

वाचने
26882
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१ अत्यंत सुरेख रचना
+१
फांदीवरती उभा खिन्नसा
+1 द्यायचाच राहिला कवितेच्या
In reply to फांदीवरती उभा खिन्नसा by गणेशा
नितांत सुंदर!
सुंदर
मतदान पद्धत : सदस्यांनी
In reply to सुंदर by प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला)
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.
छान
मतदान पद्धत : सदस्यांनी
In reply to छान by मीनल गद्रे.
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.
+१
+१ वा!
+१ आवडलली कविता. मस्तच.
छान
मतदान पद्धत : सदस्यांनी
In reply to छान by आगाऊ म्हादया......
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.
+१ फारच छान.
+१
+१
+1
+१
अतिशय सुंदर
मस्त
छानच!
अरेरे
In reply to छानच! by चांदणे संदीप
+१
+१
+1
सुपर्ब!! +१
+१
+१
तडागतीरी बिंब न्याहळी
खरंय. ते कडवं टाकावं की
In reply to तडागतीरी बिंब न्याहळी by पाषाणभेद
बघा मी म्हनलो नव्हतो का येक
In reply to खरंय. ते कडवं टाकावं की by प्राची अश्विनी
नाही हो, राहू दिले तेच चांगले
In reply to खरंय. ते कडवं टाकावं की by प्राची अश्विनी
सहज वाटलेलं...
In reply to तडागतीरी बिंब न्याहळी by पाषाणभेद
अभिनंदन
सर्व वाचकांचे, प्रतिसाद देणा
प्राची