Skip to main content

[कविता' २०२०] - तृष्णा

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 11/05/2020 17:31 या दिवशी प्रकाशित केले.

तृष्णा




कुंद हवेच्या संथ दुपारी मंद येतसे गंध जुईचा गुंग होउनी आम्र पाहतो झिम्मड दंगा गेंदफुलांचा. फांदीवरती उभा खिन्नसा खंत कशाची काक वाहतो पंखावरती रोजच त्याच्या इंद्रधनुष्ये मित्र काढतो. अरुंद छोट्या बांधावरती लालबुंदशा गुंजा पडती सांभाळत ते लांब पिसारे वेचायाला मयूर जमती. पुंजी अपुली जलबिंदूंची पर्णमंचकी खुली ठेवती शांत बैसली पंकजपुष्पे भृंगसख्याची वाट रोखती. ...... तडागतीरी बिंब न्याहळी यौवनातली मुग्ध राधिका कशी कळेना तंग कंचुकी नंदपुत्र तो स्वप्नी दिसता. रंध्रांध्राला स्पर्शुन जाईल मृद्-गंधाने बोझल वारा धुंद मनाला चिंब कराया येतिल आता पाउसधारा.


वाचने 26892
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

In reply to by प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला)

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.


In reply to by मीनल गद्रे.

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.


In reply to by आगाऊ म्हादया......

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.


आईची आन , काय शॉलिड लिखाण येक नंबरी कविता झालीय इथे , इथे या मनात खोलवर रुजलीय मलापण वाटते , असाच काहीसं अर्थपूर्ण लिहावंसं स्वतःच्याच मनाशी तासनतास बोलावसं

'औदुम्बर' या जुन्या सुन्दर कवितेची आठवण जागी झाली.

In reply to by चांदणे संदीप

इतक्या सुंदर कवितेला गुण द्यायचा राहून गेला. :( २० प्रतिसादांचा (गुण नव्हे!) टप्पा ओलांडणारी एकमेव कविता! सं - दी - प

तडागतीरी बिंब न्याहळी यौवनातली मुग्ध राधिका कशी कळेना तंग कंचुकी नंदपुत्र तो स्वप्नी दिसता. या कडव्याने कवितेला निराळे वळण मिळत आहे. हे कडवे नसते तरी चालले असते. कविता एकदम चित्रमय आहे! एक नंबर!

In reply to by पाषाणभेद

खरंय. ते कडवं टाकावं की वगळावं यावर मीसुद्धा विचार केला होता.

In reply to by प्राची अश्विनी

बघा मी म्हनलो नव्हतो का येक नंबर! आला का न्हाई येक नंबर. मंग. हाबीनंदन!

In reply to by प्राची अश्विनी

नाही हो, राहू दिले तेच चांगले झाले. काही-काही विषयांना आपण का अस्पर्श ठेवतो कोणास ठाऊक?

In reply to by पाषाणभेद

तडागतीरी बिंब न्याहळी यौवनातली मुग्ध वाटिका कशी कळेना तंग कंचुकी कृष्ण-मेघ तो स्वप्नी दिसता. असं काहिसं कवितेच वळण कदाचित बदललं नसतं! कविता मोहक चित्रवती आहेच!अभिनंदन!

प्राची कविता खूपच आवडली . नादरम्य आहे . ( फक्त बोझल शब्द नको होता )